filename
stringlengths 5
8
| image
imagewidth (px) 1.27k
1.27k
| text
stringlengths 10
452
|
---|---|---|
1179.jpg | असे मी ठरविले होते पण आपल्या व्याख्यानाच्या आधले दिवसी मी एकाएकी आजारी पडलो मुख्यत |
|
118.jpg | भेटी द्यावी यैसी बोली केली त्यावरी राजश्री स्वामी जमावासह वर्तमान प्रतापगडास आले कान्होजी नाा यांचा जमाव वरकड देशमुखाचा जमाव जाऊलीस ठेविला बादलाचा जमाव मौजे दरे येथे ठेविला हैबतराऊ सिलिबकर व |
|
1180.jpg | ताप व पोटदुखी घेरी येणे यांनी बेजार केले डॉ ढमढेरे यांचे औषध घेत होतो आता गेले ३ ४ दिवसापासून |
|
1181.jpg | दिवसापासून बरे आहे तात्पर्य तुमच्या व्याख्यानांच्या प्रसादास ऐनवेळी मला मुकावे लागले खरे अस्तु |
|
1182.jpg | तुमचा होत असलेला उत्कर्ष जयजयकार पाहून परम संतोष वाटतो निरंतर लोभ ठेवा आपला मित्र स वि बापट |
|
1183.jpg | पुणे ता ती रा गोविंद महादेव ऊर्फ नानासो भिडे वकील यांना अत्यादरपूर्वक प्रणाम विशेष भारत इतिहास
|
|
1184.jpg | संशोधक मंडळ पुणे या संस्थेचे चिटणीस श्री रा शं ना जोशी हे धुळे चोपडे येथे व्याख्यानासाठी त्याबाजूस येत
|
|
1185.jpg | आहेत वाटेत अमळनेरलाही ते येत आहेत आपणाकडे मी त्यांना उतरावयास सांगत आहे जरूर ती सर्व त-हेची मदत व योग्य ते मार्गदर्शन |
|
1186.jpg | त्यांस आपण कराल याची मला पूर्ण खात्री आहे ती रा नारायणराव ऊर्फ भाऊसो भिडे यांचे ते स्नेही असून आपला व त्यांचाही पूर्वपरिचय |
|
1187.jpg | पूर्वपरिचय थोडा बहुत असेलच भा इ सं मंडळात गेल्या जानेवारी पासून फुटकळ तासांवर लिहिण्याचे |
|
1188.jpg | वगैरे काम मी हली करीत असतो कळावे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना आपला नीलकंठ विनायक ऊर्फ बाबा भिडे १४ ६ ५७ |
|
1189.jpg | कृतानेक सा नमस्कार वि वि आज रोजी पाडवा आहे सबब पाडव्याच्या भेटीदाखल प्रभावती गुप्तेच्या ताम्रपटाच्या सारांशाची एक प्रत आपणास नजर करीत आहे हा सारांश मुंबईत इंडियन |
|
119.jpg | बाळाजी नाा सिलिबकर जमाव देखील बोचे घोलीचे घाटी ठेविले राजश्री स्वामी किलीयावरी गेले तेव्हा कान्होजी नाा यांस किलीयावरी बोलाविले आणी अंतस्ते विचार केला की
|
|
1190.jpg | अँटीक्वेरीत प्रसिद्ध होऊन देशोदेशी रवाना जाला इंग्लंडात लंडन शहरात रॉयल एशिअॅटिक सोसायटीचे जरनलातही प्रसिद्ध जाला आपल्या इच्छेप्राो मंडळाचे नाव जगभर गाजविले पण मंडळाचा |
|
1191.jpg | त्रैमासिकाचा अंक अद्याप हाती येत नाही पाडव्याच्या मुहूर्ताने तरी आमच्या २० प्रती इकडे पाठवा महाराष्ट्र साहित्याचा १९२४ च्या जानेवारीचा अंक नुकताच हाती आला |
|
1192.jpg | त्यात बाळाजी बाजीरावाची दोन नाजूक पत्रे प्रसिद्ध जाली आहेत हे मासिक मंडळास न घेऊन भागणार नाही त्यात महत्वाची ऐतिहासिक माहिती येत जाईल |
|
1193.jpg | कन्हाडकर गिजऱ्यांचे तीन कागद विविध ज्ञानविस्ताराचे मे महिन्याचे अंकात प्रसिद्ध होतील तिकडे लक्ष असू दयावे कळावे लोभ करावा ही विनंती आपला यशवंत राजाराम गुप्ते |
|
1194.jpg | श्रीयुत दत्तो वामन पोतदार सेक्रेटरी भारत इतिहास संशोधक मंडळ मु पुणे यांसी कृ सा नमस्कार वि वि आज रोजी सायंकाळी कै राजवाडे यांच्या आकस्मिक निधनानिमित्त |
|
1195.jpg | मंडळातर्फे सभा भरणार आहे शक्य असते तर मी हजर राहिलो असतो कै राजवाडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक अष्टपैलू आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा बृहस्पती नाहीसा |
|
1196.jpg | झाला यात मुळीच संशय नाही मतभेद कितीही असले तरी महाराष्ट्र सारस्वताच्या आणि विशेषत इतिहासाच्या क्षेत्रात राजवाड्यांच्या तोडीचा एकनिष्ठ निष्काम कर्मयोगी |
|
1197.jpg | पूर्वी झाला नाही पुढे होणे नाही असे मला वाटते त्यांच्या विषयी माझ्या भावना प्रबोधनच्या येत्या अंकी मी आदरपूर्वक व्यक्त करणार आहे सभेच्या कार्यक्रमाला माझी पूर्ण सहानुभूती आहे आपला नम्र केशव सीताराम ठाकरे |
|
1198.jpg | श्री गणेशाय नम कल्याण ता २७ ५ २३ रविवासर राजमान्य रा नरसोपंत केळकर मु पुणे साो सेवेशी कृतानेक सां नमस्कार विनंती असिजे ता २९ ५ |
|
1199.jpg | सन १९२३ रोजी कारभारी मंडळाची सभा भरणार आहे तिच्या पुढे माझा अध्यक्षपदाचा राजीनामा सोबत जात आहे तो दाखल करावा माझ्याने आता या पदाचे काम होत नाही |
|
12.jpg | न काहीच कळले नाहीं राजश्री आनंद बाबूराव यासी मात्र तुमचे पत्र सरसरी आले त्याजवरून कळले त्यास वरचेवर पत्र पाठऊन वर्तमान लिहित जावे मंडळ्याचा
|
|
120.jpg | तुमचा भरवसा सर्व विशई आहे वरकडाचा ईतबार वाटत नाही मुसलमान बेईमान आहे फते जाली तरी किलीयावरी तीन अवाज ईशारतीचे होतील तेव्हा पारावरी चालोन घेणे कदाचीत फतेन जाली आणि आम्ही त्यांचे हाती
|
|
1200.jpg | याकरिता राजीनामा देणे अवश्य आहे २ अध्यक्ष कोणास नेमावे हे सांगण्याचा अधिकार मला नाहीच पण सूचना करण्यास हरकत नाही मला |
|
1201.jpg | वाटते रा रा चिंतामणराव वैद्य यांस अगर श्री सरदार तात्यासाहेब मेहेंदळे यांस अध्यक्ष नेमावे त्यातही तात्या साो मेहेंदळे पुण्याचे रहिवासी तेथेच राहणारे तेव्हा त्यांचा |
|
1202.jpg | उपयोग अधिक होईल तात्यासाो यांच्या जागी राजश्री दत्तोपंत पोतदार यांस उपाध्यक्ष करावे अशीही माझी |
|
1203.jpg | सूचना आहे सेक्रेटरी या नात्याने मंडळाचे काम दत्तोपंतांनी चांगल्याप्रकारेच केले आहे या बदल मतभेद होणार नाही मात्र |
|
1204.jpg | अलीकडे कार्य बाहुल्यामुळे त्यांस पूर्वी इतका वेळ मंडळाच्या कामास देता येत नाही असे ऐकू येते करिता त्यांस उपाध्यक्ष करून त्यांच्या |
|
1205.jpg | जागी दुसरा पत्रव्यवहार करणारा वगैरे सेक्रेटरी ऑनररी नेमून त्याच्या हाताखाली पगारदार असिष्टंट सक्रेटरी अगर दफतरदार नेमावा म्हणजे कामाचा बोजा आनररी सक्रेटरी |
|
1206.jpg | वर पडणार नाही त्यांच्या देखरेखीखाली पगारदार दफतरदार कामे करील दत्तोपंतांनी काम चांगले केले त्याबा त्यांचे आभार फारफार मानून त्यास उपाध्यक्ष करावे पुढे मागे अध्यक्ष |
|
1207.jpg | पदालाही चढतील अशी माझी उमेद आहे अशाप्रकारची काही व्यवस्था होणेची जरूर भासू लागली आहे ती आपणास ही व्यक्त असेलच कळावे लोभ असावा ही विनंती काशिनाथ नारायण साने |
|
1208.jpg | राजमान्य राजश्री नीळकंठ माहादेव यासी आज्ञा केली ऐसीजे तुम्ही आम्हापासी वेंकाजी माणकेश्वर व विष्णु नरहर कारभार करावयासी ठेविले त्यास तुमचा मागलाचा बिघाड होऊन |
|
1209.jpg | तुम्ही भागानगराप्रांतास गेला मोगल व भोसले यासी सदासिव येमाजी याचेहाते विष्णु नरहल बाने राज्यकारण केले त्यासूत्रे सदासिव येमाजी व भा भोसल्याकडील फौज आणून किल्यास |
|
121.jpg | हती लागलो तरी तुम्ही खासा व अपला जमाव वरधानी पासून मार्गावरी ठेवणे लस्करचे लोक चढो न देणे कालकलातरी तुम्ही खासा व आपला जमाव घेऊन मारामारी करून आम्हांस त्या पासून आपल्या जवळ जमावांत घेणे आ |
|
1210.jpg | किल्यास उपद्रव मांडीला आम्हासी विष्णु नरहर याने कित्येक विपरीयासी सांगून सदासिव येमाजी यास अनकूल होणे म्हणून बोलू लागला तेव्हा स्वामीचे मर्जीस हे गोष्ट कसी येती अजी चौदा वर्षे तीर्थरूप कैलासवासी मातुश्री आईसाहेब यांनी निग्रह |
|
1211.jpg | जीवासी केला कि पेशव्यांचे लक्ष सोडणे परंतु ते न ऐकता श्रम भोगून हा काल परीयंत दुसरा अर्थ चितात आणिला नाही व पुढेही येणार नाही विष्णु नरहर येथे फोडोफोड |
|
1212.jpg | करू लागला तो बोभाट सपूर्ण जगप्रसिध जाला तुम्हासही कलला असेल तेव्हा लौकिक स्वामीचे नावे केला ऐशास जाले वर्तमान राजश्री सदासिव दीक्षित व सोनो अनंत यांसी |
|
1213.jpg | येकांती सांगितले त्यास सत्य घालून तुम्ही पुसावे सारौष तुम्ही येकनिष्ट शेवक तुम्हास कळावेच असे चितात आणून संकेत मात्र लिहिला असे सर्व राज्याचा बदोबस्त करणे तुम्हांस अवश्यक असे तुम्ही स्वारीस जातेसमई |
|
1214.jpg | बोलून गेला त्याचे स्मरण धरून सेवा करून दाखववी राज्यास अपाय इछिले त्याचे परिपत्य सत्वर करणे खासगीस पा बाई व कराड व माहालची जी खेडी असतील ती बालिल्या प्रो खासगीकडे चालती करणे लोकाचा गवगवा पोटाचा |
|
1215.jpg | पोटाचा कोटवर ल्याहावयाचा बदोबस्त करणे जाणिजे छ १९ मोहोरम सु अर्बा सीतेन मया व अलफ विष्णु नरहरी गमाजीसी मिळोन आम्हासी |
|
1216.jpg | मोर्चे लाऊन प्रांत खराबा करून राज्याचे वाईट इछिले हे तुम्हास कळावे दीक्षितास व सोनोपतास पुसणे खासगी सोडून देणे येथील लोकाची बेगमी करणे बहुत काय लिहिणे |
|
1217.jpg | यादी भाऊसो माहलकरी पेठ त्रिबक तो कावनई जिल्हा अहमदनगर याजकडे नारायणराव कासीनाथ जोगळेकर इनामी जाहागीरदार मौजे कलमुस्थे परगणे हरसुल सबस्थान पेठ व कसबे |
|
1218.jpg | त्रिबक याजकडून लिहून नाव याचे असे कि सवस्थान मजकूर येथील मामलेदार याचे पत्र मु जा नंबर ३६८ तारीख ९ सत्पबर सन १८५६ इसवीचे आल्यात ज्याजकडे गावअमल चालतात |
|
1219.jpg | ते लोक हयात असल्याब त्याजकडून हयातेचा दाखले दरसाल दिशेबरअखेरच आत अमलदार याचे सहीनिसी पाठविणेविसी लिहिले आहे त्याजवरून आपल्यास कळविणेकरिता लिहिले आहे तर |
|
122.jpg | ठिकाण नव्हता त्याची वतनावरी स्छापना केली नीमे वतन सीका दील्हा केदारजी खोपडे त्यांमुळे ईदीलशाहीत गेले यैसे असोन त्याणे बेईमानी करून अफजलखानाकडे जाऊन
|
|
1220.jpg | तर आम्ही त्रिबक मुकामी हयात असल्याबिसी आपले कडून सबस्थान पेठ येथील मामलेदार याजकडे लिहून जाणेची तजवीज मुदतीत जाली पाहिजे तारीख ११ दिशेबर सन १८५६ इ नारायणराव कासीनाथ जोगळेकर इनामी जाहागीरदार मौजे |
|
1221.jpg | कर्जरोखा शके १७९५ श्रीमुख नाम संवछरे माहे श्रावण व ३ रोज सोमवार ते दिवसी श्रीमंत रा गण पतराव नीलकंठ नगरकर जाहागीरदार को कान्हूर तो पारनेर यासी रिणको नाम पाताजी व रामजी मुढे ३ हसाजी व मल्हारी जगताप मीजे पिंपळगाव रोटा तो मजकूर मुकाम काो कान्सूर सन १२८३ फसली |
|
1222.jpg | करणे रोखा लिहून देतो ऐसाजे मौजे पिंपळगाव रोटा येथील तुमची इनामी जमीन कुरणाची आहे त्या हो खाजगत तुमची निमे वाटणी दक्षण बाजूची आहे ती आम्ही पेस्तर साल सन १२८४ फसली सालास वनचराईस घेऊन तिचे मत्याबदल देणे कबूल केले ते रुपये १५० अक्षरी दीडशे रुपये सुर्ती |
|
1223.jpg | देणे पाौं शके १७९६ चे पौषमासी रुपये ७५ पाऊणशे व शके १७९६ चे फाल्गुन अखेरीस रुपये ७५ अक्षरी पाऊणशे याप्रमाणे दोन वेळा वसूल देऊन पावती घेऊ हापता लिहिले मुदतीस न पोहोचल्यास दरमाहा दरशेकडा रुपया येकप्रमाणे व्याज देत जाऊ सदरहू रुपये तुम्ही |
|
1224.jpg | सदरी लिहिले मुदतीपुढे मागाल ते वत्की सदरी लिहिले व्याजसु बिनहरकत फडशा करून देऊ सदरहू जमीन वनचराईस तुमचे मुत्यार मुखत्यार गंगाधर बाळकृष्ण गोडबोले याजपासून ठरवून घेऊन त्याचे मत्याबदल हा रोखा आम्ही लिहून दिल्हा आहे भरण्याविसी हरकत राहिली नाही |
|
1225.jpg | यासी जामीन गणू वा कुमाजी पा घुले व कोंडाजी वा मल्हारजी पा घुले मौजे मजकूर मु कान्हूर जामीनकी लिहून देतो कि सदरी रिणको नाम पातजी व हासाजी यांणी लिहून दिल्ह्याप्रमाणे तुमचे सर्व रुपयाचा उलगडा करतील त्याजकडून उलगडा न जाल्यास त्यांचा अक्षेप न सांगता आम्ही |
|
1226.jpg | उभयता येकजती येकमतीने तुमचे रुपयाचा फडशा करून देऊ हा रोखा जामीनकी सहि आम्ही आपले राजीखुशीने व अकलहुशारीने लिहून दिल्हा सही |
|
1227.jpg | कर्जरोखा शके १७८६ रक्ताक्षी नाम संवत्सरे माहे कार्तिक व ४ तेज गुरुवार ते दिवसी खत लिखिते धनको नाम राजश्री संभाजी सदासिव घुले वा पेट कसबा यासी रिणको नाम हरी बिन विटोजी सुतार भांबवडेकर |
|
1228.jpg | या पेट सदासिव कारणे रोखा लिहून देतो ऐसीजे आम्ही तुम्हापासून घेतले कर्ज मुदल सुर्ती रुपये १०० अक्षरी शंभर यासी व्याज दरमाह दरशेकडा रुपये २ दुहोत्रा प्रो देऊ यासी फेड माहे नवबंर सन १८६४ |
|
1229.jpg | चे महिन्याचे पगारा पौ रुये ३० व दिजंबर महिन्याचे पगाराचे वेलेस रुये ३० व माहे ज्यानेवारी सन १८६५ महिन्याचे पगाराचे वेलेस रुये ४० येकूण तीन पगारातून मुदल रुये १०० शंभर व सिवाय व्याज दरमाहाचे दरमाहा |
|
123.jpg | लबाडी केली आणि हतेर धरिले तो हरामखोर त्याची च्यार धडे चौमार्गी टाकावी त्याची रदबदल तुम्ही न करणे त्यास कौल देत नाही यैसे बोलिले रदबदल यैकेनात तेव्हा कान्होजी नाा उभे राहो अर्ज केला की खंडोजीचा गुन्हा
|
|
1230.jpg | देऊन फडशा करू याप्रमाणे आम्हाकडून उलगडा न जाल्यास है खताचे नितीपासून व्याज दरमाहा दर रुपयास 6 येक आण्याप्रमाणे तुमचे रुये फिटे तो पावेतो देत जाऊ व व्याज दरमाहाचे दरमाहा देत जाऊ |
|
1231.jpg | यासी जामीन दादूमिया व शकरभाई सिकलकर व लस्कर सदर बाजार सदरी लिहिल्याप्रो कुल तुमचे ऐवजाचा फडशा करील त्याने न केल्यास कुळाव्रल वर हुजूर न धरिता अटीचे व्याजासुद्धा सर्व रुये |
|
1232.jpg | मी आपले जात नि फडशाकरून देऊ जो वसूल देऊ तो आपले हाताने याखतावर मांडीत जाऊ मांडल्याखेरीज वसुलाची तकरार सागणार नाही याखताचे रुपये अगोधर रोख घेऊन नंतर लिहून दिल्हा सबब भरणे |
|
1233.jpg | भरणे पावतीची जरूर राहिली नाही हा रोखा आम्ही कुल व जामिनानी आपले राजीखुसीने व अकलहुशारीने लिहून दिल्हा सही तारीख १७ नवंबर १८६४ |
|
1234.jpg | इसवी दस्तुर विनायक सदासिव येरहवडेकर कुलकर्णी पेट कसबा सही हरी बिन बिटोजी सुतार भाबवडेक र व पेठ सदासिव दस्तुरखुद |
|
1235.jpg | रा शंकर नारायण जोसी यास इकडू डॉ चितळे यांचेमार्फत भोर मोटार सर्विसने चित्रमय शिवाजी ही पुस्तके ४० चाळीस व रायगड मार्गदर्शक ही पुस्तके ८८०
|
|
1236.jpg | आठसे ऐशी पाठविली आहेत तरी मोटारचे आफिसमध्ये जाऊन पुस्तके घेणे व आम्हांस कळविणे चित्रमय शिवाजीचे विक्रीपैकी
|
|
1237.jpg | रुपये ३ तीन व रायगड मार्गदर्शकचे विक्रीपैकी रुपये १७१२ असे येकूण रुपये ४७१२ चार रुपये बाराआणे मजपासी आहेत आता |
|
1238.jpg | मजपासी अगर बापूराव जोसी यांचेपासी आपली कोणतीही पुस्तके सिलक नाहीत बापूराव यांनी स्वता पुण्याहून पुस्तके आणिली त्या |
|
1239.jpg | सुद्धा वरील हिसेब आहे चित्रमय शिवाजीची ४४ पुस्तके इकडे ठेउन गेल्याचे तुम्ही लिहिता परंतु आमचेकडे फक्त ४३ पुस्तकेच |
|
124.jpg | गुन्हा अम्हांस द्यावा आणि त्याचा जीव वांचवावा वतन चालवावे यैसी अतिशयाची रदबदल केली त्यास राजश्री स्वामी बोलिले की तुम्हीं भीड घातली यांस उपाय नाही तुमचे भिडे करिता मान्य केले त्यास |
|
1240.jpg | निज्ञाली त्याचा हिसेब वर दिला आहे. येक पुस्तक तुटत आहे त्याचा तपास करता मिळत नाही त्यास नाईलाज आहे कळावे हे वि आपला सु मे बुटाला |
|
1241.jpg | रा दत्तोपंत आपटे यांसी कृतानेक सा नमस्कार विनंती वि लिंगरस गंगरस प्रकरणाची आपण पाठविलेली पत्रे वाचून पहिली ती परत पाठविली आहेत माझ्याकडे परस्पर आलेले पत्र |
|
1242.jpg | ही आपल्या अवलोकनार्थ पाठविले आहे अधिक माहिती मिळविण्याकडे यापत्राचा उपयोग करितायेण्यासारखा असल्यास तो आपणासारख्यांनाच करिता येईल व तो |
|
1243.jpg | आपण न सांगता करालही केसरीतील विनंतीला मिळालेल्या प्रत्युत्तरावरून लोक सावध व जागरूक झाले आहेत असे अनुमान काढावयास हरकत नाही |
|
1244.jpg | विनंतीत माझे नाव न घालता आपण आपलेच घालावयास पाहिजे होते शिवचरित्र कार्यालयात काही एक काम न करिता तसे करीत असल्याब लोकांची विनाकारण |
|
1245.jpg | दिशाभूल व्हावयाची व माझे आजारीपण खोटेच ठरावयाचे असो एकंदर ९ लोकांकडून पत्रे आली असे धरले तर रसांत नावे पुढीलप्रो दिसून येतात |
|
1246.jpg | १ देवरस २ गावरस ३ लिंगरस ४ मुदरस ५ आरस ६ हेगरस ७ चंदरस ८ गोंदरस ९ बावरस १० नाग रस ११ भानरस १२ बीररस १३ भरमरस १४ लकमरस १५ कलरस १६ गंगरस १७ लकरस १८ घाकरस |
|
1247.jpg | यापैकी बरेच ऋग्वेदी देशस्थ ब्राम्हण असून कांही सारस्वत ब्राम्हण असल्याचे दिसून येते शिवाय काही व्यक्तीनामे असून कांहीं आडनांवे आहेत |
|
1248.jpg | असेही दिसून येते ज्ञानप्रकाशात गेल्या पंधरवड्यात केव्हातरी कोणीतरी यावर उतर दिल्याचे ऐकतो ज्ञानप्रकाशचा अंक मला मिळाला नाही |
|
1249.jpg | आपण वाचलाच असेल नसल्यास सवडीने पहावा अगदी मागे मी आपणास पत्र लिहिले होते त्यांत १ लिंगरस लिंगराज अर्थात लिंगाइत धर्माचा |
|
125.jpg | त्यास आणवणे तेव्हा खंडोजी खोपडीयास आणून मजुरा देविला राजश्री स्वामी काही बोलिले नाहीत त्यावरी कान्होजी नाा यांणी निरोप घेऊन खंडोजीस घेऊन खाले आले येक वेल
|
|
1250.jpg | अनुयायी असा काही तर्क बसविला होता परंतु पंत जायणापंत यातील उपपद पाहून तो ग्रह टाकून द्यावा लागला ज्ञानप्रकाशातील पत्रकर्त्याने |
|
1251.jpg | रस हे राज याचे रूप असल्याब लिहिले आहे असे ऐकतो असो मुद्याची गोष्ट गंगरस संबंधी ते घराणे बुलडाळा जिल्ह्यात पो लोणार येथे आहे |
|
1252.jpg | तेथे अधिक चौकसी करावी व लिंगरस संबंधी संस्थान भोर ताो पौन मावळ मु बेले येथे बळवंतराव लिंगरसाकडे चौकसी करावी चंदरस घराणे ब्राम्हणी राज्यातून आले व |
|
1253.jpg | गंगाधरराव देशपांडे यांचेपूर्वज बेदरचे राहणारे व तेथून मिरज प्रांती राहण्यास आले यागोष्टी विचार करण्यासारख्या आहेत कळावे याब आपण काय करीत आहात ते कळवावे |
|
1254.jpg | श्री राजमान्य राजश्री हरी विष्णु खरे रार वाई यासी भाडेचिटी लिहून देणार शंकर रामचंद्र दीक्षित रार सातारा हली वस्ती वाई भाडेचिटी लिहून देतो कि कसबे वाई ताो मजकूर जिल्हा सातारा यागावी पेठ धर्मपुरीत तुमचे मालकीचे घर म्युनसीपाल |
|
1255.jpg | म्युनसीपाल कमेटीचा नंबर ९०९ पैकी पश्चिम बाजूकडील तीन खणी तिघई दुम जला पुढे सोपा व मागील परसाची खुलीजागासुधा आहे यासी चतु सीमा पूर्वेस गंगाधरभट बिन भास्करभट खरे याचे घर दक्षणेस सडकेचा रस्ता पश्चिमेस |
|
1256.jpg | त्रिंबक हरी रास्ते यांचा मधील बोळापलीकडे वाडा उत्तरेस त्रिंबक हरी रास्ते याची कुसवा पलीकडे बाग याघरापैकी पुढील ओटी खण तीन माजघर खण तीन व स्वयपाधर खण साहा व मागील स्वयपाघरावरील माडी खण साहा इतकी जागा आम्ही राहण्याकरिता |
|
1257.jpg | तीन महिन्याचे कराराने दरमाहा सवादोन रुपये भाड्याने ठरऊन घेतले आहे सदरहू भाडे दरमाहाचे दरमाहा देत जाऊ पुढे राहिल्यास सदरहू प्रमाणे भाडे देऊ घराची शाकारणी |
|
1258.jpg | व घरपटी तुमचे तुम्ही देत जावी घराची झाडलोट आम्ही करीत जाऊ तसे न झाल्यास जागा खाली करून देऊन जाऊ कोणतेही प्रकारे तक्रार सांगणार नाही ही भाडेचिटी |
|
1259.jpg | भाडेचिटी आम्ही आपले राजीखुषीने व हुषारीने लिहून दिली सही तारीख २४ माहे दिसंबर सन १९०३ इसवी दस्तूर शंकर रामचंद्र दीक्षित शंकर रामचंद्र दीक्षित दस्तुरखुद्द
|
|
126.jpg | मजुरा जाला या करिता परभारे राजश्री स्वामीस मजुरा करावयास जाऊ येऊ लागले राजश्री च्या चितात राग होता येके दिवसी हुकूम करून खंडोजीचा उजवा हात व डावा पाय कापविला आणि शास्ती
|
|
1260.jpg | दाखला शिधेश्वर विटल फडके रा र हली सांगली यास देण्यात येतो कि याजला ज्चरयत असून वत वात पितशूल आहे त्यास आमचेकडील औषध सुरू |
|
1261.jpg | आहे यास हिंडण्यास शक्ती नाही यास बर होणेस अदमासे २ महिने लागतील असे आम्हास वाटते कळावे ता ४ जून सन १८९० इ रामचंद्र विष्णु साभारे वैद्य नि सरकार सांगली |
|
1262.jpg | कुल मुखत्यारनामा मी वासुदेवराव धोडदेव रास्ते राहणार कसबे वाई ता मजकूर जिल्हा सातारा हाली मुकाम जमखडी यालेखावरून विष्णु कृष्ण वोकार राहणार कसबे वाई ता |
|
1263.jpg | मजकूर जिल्हा सातारा यास मजकरिता व माझे नावे व माझे तर्फून कोणतेही कोर्टातील फिर्यादीत किवा आफिलात स्पेशल आफिलात किवा दुसरे इनसाफी कामात किवा रजेष्टर |
|
1264.jpg | रजेष्टर खात्यात हजर होण्यास किवा फिर्याद किवा उतरपक्ष चालविण्यास किवा कोणचे हो कोडतातील किवा कलकटरचे खजिन्यातील किवा नेटिव राजा किवा नेटिव संवस्थान |
|
1265.jpg | याचे मुलखातील कोणचेही कोर्टातील येवज घेऊन पावती देण्यास आणि सर्व कागद घेण्यास व देण्यास मी हाजर असता तर असे सर्वकामात जे काही कर्णयास मजला परवानगी असती |
|
1266.jpg | किवा कर्णयास हुकूम जाहाला असता ते सर्वकाम कर्णयास माझा खरा व कायदेसीर मुखत्यार पसत केला आहे आहे व नेमिला आहे मुखत्यार ही च्यार अक्षरे सेवटचे बोळीस वर घातली
|
|
1267.jpg | या गोष्टीचे साक्षीकरिता मी आपली सही ता २८ माहे ऑगस्ट सन १८७२ इसवी रोजी सही केली असे सही वासुदेवराव घोडदेव रास्ते दस्तुरखुद्द मु जमखडी |
|
1268.jpg | श्री राजश्री गंगाधरपंत स्वामीचे सेवेसी पाो बलवंतराव नारायण नगरकर सां नमस्कार विनंती उपर तुम्ही आनाजी नवला याबरोबर चिकण सुपारी वा 66 १ |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.