text
stringlengths
0
147
ऐसे सहसा करू नये । दोघां भांडण तिसऱ्या जाय।
धीर करोन महत्कार्य । समजोन करावे ।।
राजी राखता जग । मग कार्यची लगबग।
<<<
ऐसी जाणोनी सांग । समाधाने करावी ।।
आरंभीच धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती ।
याकारणे समस्ती । बुद्धी शोधावी ।।
सकळ लोक येक करावे । गनिमा निपटुनी
येणे करिता कीर्ति धावे । दिगंतरी ।।
आधी गाजवावे तडाखे । तरी मग भूमंडळ धाके।
पैसे न होता धके । राज्यास होती ।।
समय प्रसंग वोळखावा । राग निपटुनी ।
आला तरीं कळो न द्यावा । जनामाजी
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे येक ।
लोकांचे मनामध्ये धाक । उपजोची नयें ।।
बहुत लोक मेळवावे । येक विचारे भरावे ।
कष्ट करोनी घसरावे । म्लेंच्छांवरी ।।
आहे तितके जतन करावे। पुढे आणिकही मेळवावे
मऱ्हाष्ट्र राज्य करावे । जिकडे ।।
लोके हिंमती धरावी । शर्थीची तरवार करावी
पदवी । पावाल येणे ।।
शिवराजांस आठवावे । जिवीत तृणवत मानावे ।
इहलोकी-परलोकी रहावे। कीर्तिरूपें ॥।
शिवराजाचे आठवावे रूप । शिवराजाचा आठवावा प्रताप ।
शिवराजाचा आठवावा साक्षेप । या भूमंडळी
शिवराजाचे कैसे बोलणे । शिवराजाचे कैसे चालणे ।
शिवराजाची सलगी देणे । कैसी असे ।।
सकळ सुखाचा त्याग । करूनी साधीजे तो योग ।
राज्यसाधनेची लगबग । कैसी केली ।।
त्याहून करावे विशेष । तरीच म्हणवावे पुरुष ।
याउपरी आता विशेष । काय लिहावे? ।।
श्री समर्थांचा हा उपदेश म्हणजे अंधारात चाचपडणाऱ्या संभाजी राजांकरता नंदादीपच
होता. त्यांनी पूर्वीचे सर्व राग-लोभ विसरून आपल्या विरोधातील दस्त केलेल्या असामींना
कैदेतून मोकळे केले. 'मागील अपराध क्षमा' करून कारभाऱ्यांनाही 'हाती धरीले'. परंतु
दि. १२ ऑक्टोबर १६८०, अश्विन शु. १, स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे
वारले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे करून, संभाजीराजांनी त्यांना पेशवेपद दिले.
निळोपंत हे आता स्वराज्याचे पेशवे बनले.
माघ शु. ७, दि. १४ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांनी
राज्याभिषेक करून घेतला. यानंतर सर्व कारभार सुरळीत सुरू झाला. हे पाहून अन् आपली
<<<
सारी राजकारणे धुळीस मिळालेली बघून सोयराबाईंनी विष प्राशन करून
आत्महत्या केली. सोयराबाईंच्या या आत्मघातकी कृत्याच्या धक्क्यातून रायगड बाहेर
न तोच एक भयंकर बातमी रायगडावर येऊन धडकली. दि. १३ नोव्हेंबर १६८१ रोजी
खासा औरंगजेब तीन लाख शाही फौजेनिशी बऱ्हाणपुरात येऊन दाखल झाला होता.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केव्हा ना केव्हा तरी ही परिस्थिती उद्भवणार
होतीच. संभाजीराजे मोगलाईतून पुन्हा स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना
अखेरचे समजावले होते. खासा औरंगजेब दख्खनेत उतरणार हे महाराजांना ठाऊक
असल्यानेच प्रथम त्यांनी 'दक्षिणी पंथाची एकजूट' करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले
होते. संभाजी महाराजांची आता खरी कसोटी होती. परंतु, या काळात शिवाजी महाराज,
जिजाऊ साहेबांच्या अधिकाराने उपदेश करणारं असं कोण होतं? होते ना! श्री समर्थ
रामदास स्वामी. परंतु दैवगतीही अशी विचित्र की या महाप्रलयाच्या सुरुवातीसच दि. २२
जानेवारी १६८२, माघ वद्य. ९ या दिवशी समर्थांनी सज्जनगडावर जिवंतपणी समाधी
घेतली. आता मात्र संभाजी महाराज एकटे पडले अगदी खऱ्या अर्थाने एकाकी पडले!
दि. १८ १६८२ या दिवशी गांगोली या गावात शंभूराजांच्या आणि
येसूबाईंच्या प्रथम पुत्राचा जन्म झाला. आपल्या थोर पित्याच्या स्मरणार्थ संभाजीराजांनी
पुत्राचे नाव ठेवले 'शिवाजी राजे' (हेच पुढे शाहूराजे म्हणून प्रसिद्ध).
दि. १४ एप्रिल १६८५ या दिवशी विजापूरला मोंगली फौजांचा वेढा पडला. रहिमतखान,
रूहुल्लाखान, रणमस्तखान अशा शाही सरदारांनी विजापूरला मोर्चे लावले. वास्तविक
आदिलशाही आणि कुतुबशाही या 'इस्लामी शाह्या' होत्या. तरीही त्या 'दख्खनी' असल्याने,
अन् मुख्य म्हणजे मराठ्यांना साहाय्य करत असल्याने औरंगजेबाने आपला रोख आता
आधी या दोघांकडे वळवला. दि. ११ ऑक्टोबर १६८५ रोजी बादशहाजादा मुअज्जम याने
थेट भागानगरवरच हल्ला चढवला. खुद्द बादशहा अबुल हसन कुत्बशहा भागानगरात होता.
औरंगजेबाने बादशहाची बेगम सरिमाजानी हिला 'मजहब' च्या नावाखाली चिथावले आणि
मादण्णापंत या काफीर पंडिताला दूर करण्याच्या कानपिचक्या दिल्या. या मूर्ख बेगमेने
तिच्या खास खोजामार्फत भागानगरच्या चौकात सर्वांदेखतच मादण्णापंत आणि आकण्णा
यांचे खून करवले. असे केल्याने मोंगल मागे हटतील अशी तिला अपेक्षा होती. परंतु हे दोन
हुशार पंडित कायमचे दूर झालेले पाहताच मुअज्जमने अधिक जोर केला. शेवटी एक कोट
रु. देण्याच्या बदल्यात (बापाशी गद्दारी करून) मुअज्जमने भागानगरचा वेढा उठवला.
दि. १३ सप्टेंबर १६८६ या दिवशी विजापुरी फौजेने हत्यार खाली ठेवले. मोंगली
फौजांनी विजापूर ताब्यात घेतले. खासा सुलतान सिकंदर आदिलशहा कैद झाला. इकडे
मुअज्जमने भागानगरचा वेढा उठवल्याचे कळताच औरंगजेबाने त्याची चांगलीच खरडपट्टी
काढली आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, विजापूर जिंकल्यानंतर केवळ एका
वर्षातच दि. २७ सप्टेंबर १६८७ या दिवशी शाही फौजांनी भागानगरही जिंकले. खासा
कुतुबशहा- अबुल हसन तानाशाह कैद झाला. विजापूरचा सिकंदर आदिलशहा आणि
भागानगरचा तानाशाह कुतुबशहा या दोन्ही शाही कैद्यांना प्रथम अहमदनगरच्या किल्ल्यात
<<<
अन् नंतर दौलताबादेवर कैदेत ठेवण्याचा हुकूम झाला आणि आता मोंगली फौजांचा संपूर्ण
रोख वळला महाराष्ट्राकडे ... मराठ्यांकडे !!
भागानगर आणि विजापूरचा पाडाव केल्यानंतर औरंगजेब आता आपलं लक्ष पूर्णतः
महाराष्ट्राकडे वळवणार हे तर उघडच होतं. अन् म्हणूनच तो महाराष्ट्राच्या वाटेवर असतानाच
त्याचे खच्चीकरण करण्यासाठी मराठे त्याच्या फौजेवर एकदम हल्ला अन्
करत मागच्या मागे पसार होत. परंतु, अशाच एका छाप्याच्या वेळी वाईजवळ
मोंगल अन् मराठ्यांच्यात चकमक सुरू असतानाच मोंगलांच्या एका जंबुरीयाचा (लहान
तोफेचा) तापलेला गोळा थेट सरसेनापतींच्या, हंबीरराव मोहित्यांच्या छाताडावरच येऊन
आदळला. हंबीरराव जागच्या जागी गतप्राण झाले. हंबीररावांच्या मृत्यूने संभाजीराजांना फार
मोठा धक्का बसला. परंतु, आता शोक करत बसून चालणार नव्हते. राजांनी ताबडतोब
पन्हाळ्याचे किल्लेदार म्हलोजी घोरपडे यांना स्वराज्याची सरनौबती दिली. महाराष्ट्रात
आल्यावर औरंगजेबाचा शाही डेरा पडला अकलूजला !!
औरंगजेब दख्खनेत विजापूर अन् भागानगरच्या मोहिमेवर गुंतला होता, त्या वेळेस
संभाजीराजेही गप्प बसले नव्हते. त्यांनी जंजिरा स्वराज्यात आणण्याची फार खटपट केली.
जंजिरा येत नाही हे पाहताच संभाजीराजांनी अक्षरशः खाडीत भराव घालून तो घेण्याचा
प्रयत्न केला. परंतु, औरंगजेबाच्या आक्रमणाने ती मोहीम फसली. यानंतर संभाजीराजांनी
गोमांतकावर स्वारी केली. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर तर अत्यंत घाबरला होता. त्याने गलबते
तयार ठेवून पोर्तुगालला जाण्याची तयारी ठेवलीच होती. परंतु, या मोहिमेतही संभाजीराजांना
यशाने थोडक्यासाठी गुंगारा दिला.
औरंगजेबाचा अकलूजला तळ पडताच त्याने आपला सरदार आणि वजीर
जाफरखानाचा मुलगा एतिकादखान याला रायगडावर हल्ला करायला पाठवले. अर्थात