text
stringlengths 0
147
|
---|
राहून राज्यकारभार सांभाळावा युवराजांचे प्रमुख कर्तव्य असते. परंतु, संभाजीराजांच्या |
उतावळ्या अन् अविवेकी स्वभावामुळे त्यांचे सरकारकूनांशी पटत नसे. अशातच |
राज्याभिषेकानंतर सोयराबाईंची सातमहालातून अनेक 'जनानी राजकारणे' सुरू |
असल्यामुळेच असेल बहुदा पण युवराज संभाजीराजे शृंगारपुरात येऊन स्थायिक झाले. |
संभाजीराजे हे संस्कृत पंडित अन् उत्तम कवीही असल्याने त्यांचे मन या ठिकाणी रमणे |
स्वाभाविकच होते. संभाजीराजांच्या सेवेत केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कलश |
यांसारखे संस्कृत पंडित सतत हजर होते. दिवस जात होते. शृंगारपूरच्या मुक्कामी |
संभाजीराजांनी 'नायिकाभेद' हे अष्टनायिकांचे स्वभाव-भेद सांगणारं हिंदी काव्य आणि |
'बुधभुषणम्' या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केली. येथून जवळच शिर्क्यांचा होता. शिर्के |
म्हणजे शंभूराजांचं सासर! |
दिवस जात होते. दि. ४ सप्टेंबर १६७७ या दिवशी संभाजीराजांना येसूबाईसाहेबांच्या |
पोटी कन्यारत्न झाले. या कन्येचे नाव ठेवण्यात आले 'भवानी'. मधल्या काळात अनेक |
लहान-मोठ्या कारणांवरून सरकारकून आणि युवराजांच्यातला वाद अत्यंत विकोपाला गेला |
होता. शिवाजी महाराज रायगडावर आले अन् त्यांना या साऱ्या घटना समजल्या. |
महाराजांना युवराजांबद्दल काळजी वाटू लागली होती. त्यांनी युवराजांना एखाद्या पवित्र |
वातावरणात, साधूंच्या, संतांच्या सहवासात ठेवावे असा विचार केला आणि |
त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवून आज्ञा केली, 'आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या |
सहवासात राहण्यास सज्जनगड़ी जावे. त्यांचा उपदेश घ्यावा.' अन् मनातून रूष्ट झालेले |
संभाजीराजे नाईलाजानेच डिसेंबर १६७८ मध्ये दाखल झाले. |
संभाजीराजे सज्जनगडावर आले तेव्हा समर्थ तेथे नव्हते. युवराजांच्या मनाची घालमेल |
अधिकच वाढली. 'आतापर्यंत सरकारकून आणि सोयराबाईच विरोधात होत्या. परंतु, आता |
आबासाहेब शिवछत्रपतींना देखील आपण 'बिघडलो' असे वाटू लागले आणि म्हणूनच |
त्यांनी आपल्याला सज्जनगडावर पाठवले' या एकाच विचाराने युवराजांना हैराण केले |
आणि अखेर दि. १३ डिसेंबर १६७८ या दिवशी युवराज संभाजीराजे मोगलांचा सरलष्कर, |
सालार-ए-दख्खन दिलेरखान पठाणाकडे जाऊन मिळाले !! |
युवराज मनात बंडाची भावना घेऊन दिलेरकडे गेले नव्हते. त्यात आपणही पराक्रमी |
आहोत हे शिवाजी महाराज आणि इतर कारकुनांना दाखवून देण्याची भावना होती. |
परंतु युवराजांच्या या भाबडेपणाचा फायदा दिलेरखान घेतल्याशिवाय कसा राहील? त्याने |
संभाजीराजांना पुढे करून महाराजांचा साताऱ्याजवळचा 'भूपाळगड' हा किल्ला घेतला. |
यानंतर दिलेरने फौजेचा मोहरा वळवला दार-उस-सल्तनत विजापूरकडे! विजापूरचा पूर्वीचा |
<<< |
वजीर पठाण बहलोलखान हा दि. २३ डिसेंबर १६७७ रोजी मरण पावला होता. त्यामुळे |
आता 'सिद्दी मसूद' हा आदिलशहाचा वजीर होता. याच मसूदने (जौहरचा जावई) पूर्वी |
महाराजांना विशाळगडच्या वाटेवर पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. परंतु आता हाच |
मसूद दिलेरला प्रचंड घाबरला अन् त्याने शिवाजी महाराजांना मदतीची साद घातली. |
आदिलशहाने महाराजांनी आजपर्यंत घेतलेल्या शाही मुलखाला 'अधिकृत' परवानगीच |
देऊन टाकली. महाराजांच्या 'दक्षिणी पंथाच्या एकजुटीतला' दुसरा महत्त्वाचा दुवादेखील |
आज साध्य झाला. महाराजांनी आदिलशहाला निर्धास्त राहायला सांगितले आणि त्यांनी |
गनिमीकाव्याने दिलेरची अक्षरशः लांडगेतोड सुरू केली. शेवटी विजापूरचा नाद सोडून दि. |
१४ नोव्हेंबर १६७९ रोजी दिलेरच्या फौजा तिकोट्याच्या रोखाने वळल्या. |
तिकोट्यात आल्यानंतर तेथील हिंदू प्रजेचे दिलेरने अत्यंत हाल सुरू केले. हे सहन न |
झाल्यानेच संभाजीराजांचे दिलेरशी अत्यंत कटू खटके अन् संभाजीराजांना आपली |
चूक कळून आली. अशातच औरंगजेबाचा 'संभाजीला कैद करून दिल्लीस पाठवा' या |
आशयाचा गुप्त खलिता दिलेरला मिळाल्याच्या बातम्या संभाजी महाराजांना समजल्या. |
आता मात्र संभाजीराजांचे डोळे उघडले आणि अखेर दि. २० नोव्हेंबर १६७९ या |
दिवशी संभाजीराजे मोंगल छावणीतून पळाले आणि थेट विजापूर गाठले आणि तेथून दि. ४ |
डिसेंबर १६७९ रोजी स्वराज्यात पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. |
महाराजांनीही मग मोठ्या उदारमनाने आपल्या पुत्राला मायेने पोटाशी धरले आणि |
समजावले. संभाजीराजांनीही मोठ्या मनाच्या समजुतीने महाराजांना म्हटले, |
'आपणास साहेबांच्या पायाची जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे (शिवाजी |
महाराजांच्या) पायाचे चिंतन करून राहीन.' यानंतर महाराजांनी युवराजांना पुन्हा |
अधिकारात घेऊन पन्हाळा प्रांतावर नेमले आणि महाराज परतले. |
महाराज रायगडावर आल्यानंतर राजाराम महाराजांची मुंज अन् लग्न उरकण्याचा त्यांनी |
निश्चय केला. दि. १५ मार्च १६८० या दिवशी राजारामांचे लग्न सरसेनापती कै. प्रतापराव |
गुजर यांची कन्या जानकीबाई हिच्याशी लावून देण्यात आले. |
दि. २० मार्च १६८० या दिवशी सूर्यग्रहण होते. महाराजांचे मन आणि शरीर आधीच |
थकले होते. अशातच महाराज कदाचित ग्रहणकाळात करण्यात येणारे स्नानविधी करण्यास |
गंगासागराच्या थंड पाण्यात उतरले असावेत. कारण ग्रहणानंतर दोन दिवसातच महाराजांना |
प्रचंड ताप भरला. दिवसेंदिवस ताप वाढतच चालला होता. |
- आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा (हनुमान जयंती), दि. ३ एप्रिल १६८० चा दिवस उजाडला. |
महाराजांनी साऱ्या सवंगड्यांना जवळ बोलवून आपल्या मागे राज्य कसे सांभाळावे ते |
सांगितले. सर्व जण अत्यंत दुःखी होते. महाराज अत्यंत शांतपणे म्हणाले, |
"आपली आयुष्याची अवधी झाली. आपण आता कैलासास श्रींचे दर्शनास जाणार!" |
यानंतर महाराजांनी शेवटची निरवानिरव केली. सर्वांना बाहेर बसण्यास सांगितले. |
- आणि भर मध्यान्ही आवस झाली. दुपारी बाराच्या सुमारास महाराजांनी हे जग सोडले. |
<<< |
महाराष्ट्र पोरका झाला. |
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पहावा हा प्रश्न साहजिकच उभा |
राहिला. अर्थात परंपरा आणि रितीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचित |
होते. परंतु, संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेरखान |
प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच |
सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव |
यांनी वैशाख शु.३, दि. २१ एप्रिल १६८० रोजी राजारामांना मंचकावर बसवले (राज्याभिषेक |
केला नाही!). याचवेळी मोरोपंत आणि अण्णाजी यांनी संभाजीराजे पुन्हा बंड करू नये |
म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगड़ाकडे सैन्यासह कूच केले. स्वराज्याचे सरसेनापती |
हंबीरराव मोहिते हे मात्र प्रथमपासूनच संभाजीराजांच्या पक्षात होते. ते सरसेनापती |
असल्याने फौजेचे वळणही युवराजांकडेच होते. पंत पेशवे आणि सचिव पन्हाळ्याच्या |
वाटेवर असतानाच कराड प्रांतात तळबीडजवळ हंबीररावांनी दोघांनाही कैद केले. |
संभाजीराजांचे बळ होते. |
दि. २६ जून १६८० रोजी संभाजीराजांनी येसाजी कंक आणि रायगडचा किल्लेदार |
चांगोजी काटकर यांच्या मदतीने रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि कारभार सुरू केला. |
वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी आपल्या पुत्राला क्षमाच केली होती. |
तरीही बहुतेकांच्या मनात अजूनही संदेह होताच. कारभार सुरू झाल्यानंतर श्री |
समर्थ रामदासस्वामी यांनी शंभूराजांना त्यांच्या थोर पित्याची आठवण करून देत |
राज्यकारभार नेमका कसा करावा याकरिता एक विस्तृत पत्रच पाठवले. ते पत्र असे - |
अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे । |
तजवीज करीत बैसावे । येकांत स्थळी ।। |
काही उग्रस्थिति सांडावी । काही सौम्यता धरावी। |
चिंता पराची लागावी । अंतर्यामी ।। |
मागील अपराध क्षमा करावे। कारभारी हाती धरावे। |
सुखी करुन कामाकडे ।। |
पाटातील तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना। |
तैसे जनांच्या मना । कळले पाहिजे ।। |
जनांचा प्रवाह चालीला । म्हणजे कार्यभाग आटोपला । |
जन ठायी ठायी तुंबला । म्हणीजे ते खोटे ।। |
श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले। |
तरी मग जाणावे, फावले । गनिमासी ।। |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.