text
stringlengths
0
147
राज्यकर्ते (पेशवे) त्यांचे साहाय्यक हे सर्व अत्यंत नालायक होते असं रंगवणं जेत्यांना
(इंग्रजांना) क्रमप्राप्तच होतं. ते त्यांनी अगदी मनापासून केलं ... पेशवाई नष्ट झाल्यावर
पेशव्यांचा प्रचंड दफ्तरखाना आणि निरनिराळ्या सरदारांची-जहागिरदारांची दफ्तरं
एलफिन्स्टन आणि ग्रँट या जोडगोळीच्या हातात अनायासेच पडली. त्यांनी ती किती
साफसूफ करून ठेवली असतील हे आता कल्पनेवरच सोपवलं पाहिजे. याला आणखी एक
कारण आहे. परवापरवापर्यंत मोठ्या दिमाखानं उभं असलेलं मराठी राज्य अकस्मात लयाला
गेल्यामुळे मराठी मनात विस्मययुक्त संताप दाटला होता. उघडपणे त्याचं खापर इंग्रजांच्या
डोक्यावर फोडता येत नव्हतं. त्याचमुळे नकळत आम्ही आमच्याच लोकांना दोषी धरून
<<<
त्यांच्याबद्दल आमचा संताप व्यक्त करू लागलो. अशा संतापाचा सर्वात मोठा बळी दुसरा
बाजीराव पेशवा ... " इनामदारांनी मांडलेली ही गोष्ट अत्यंत खरी आहे. सामान्य जनतेने
पेशवाई बुडाल्याचा संताप आणि इंग्रजांविरुद्ध बोलण्याची भीती यामुळे बाजीरावांनाच दोषी
धरलं. परंतु 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोपाळ हरी देशमुखांनीही सत्य न
तपासता पेशव्यांनाच शिव्या द्याव्यात ही अत्यंत गोष्ट होती. वास्तविक या
लोकहितवादींचे वडील सरदार बापू गोखल्यांचे 'फडणीस' होते. गोपाळ अष्टीच्या लढाईत
बापू पडले. देशमुखांचेही कुटुंब उघड्यावर आले. परंतु, माल्कमला शरण आल्यानंतर
'आपल्या व आपल्या सरदारांच्या सरंजामांची योग्य सोय इंग्रजांनी लावावी' अशा
बाजीरावांच्याच अटीमुळे माल्कमनेही ती सोय विनातक्रार लावली. यातच काही काळात
हरिपंत देशमुखांचं निधन झालं आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र गोपाळराव याला इंग्रजी भाषेचं उत्तम
ज्ञान असल्याने एलफिन्स्टनने आपल्या कचेरीत नोकरी दिली. इ. स. १८४२ मध्ये वयाच्या
एकोणिसाव्या वर्षी गोपाळराव नोकरीला लागले. इ. स. १८४८ पासून त्यांच्या विचारांची
'शतपत्र' निघण्यास सुरुवात झाली. या शतपत्रांत बालविवाह, विधवा विवाह, जुन्या अनिष्ट
चालीरिती यांबाबत टीका असली तरी टीकेचा मुख्य विषय होता 'ब्राह्मण आणि त्यांचा
मूर्खपणा'. लोकहीतवादींनी आपले विचार लोकांच्या गळी उतरवले. एका पत्रात ते म्हणतात
की, 'फक्त भट आणि लोकच बाजीरावाची स्तुती करतात.' लोकहितवादींचा जन्म
आहे १८२३ सालचा. त्यांची शतपत्र निघायला लागली तेव्हा त्यांचं वय जवळपास पंचवीस
वर्षे होतं. अन् यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर, १८५१ साली दुसऱ्या बाजीरावांचा मृत्यू झाला.
मग इकडे एलफिन्स्टनच्या कचेरीतील सुरक्षा बाजूला सारून ब्रह्मावर्तावर जाऊन
बाजीरावांना त्यांच्या चुकांबद्दल जाब विचारण्याचं धाडस लोकहितवादींनी दाखवलं नाही.
ब्रिटिश रेसिडेन्सीच्या भिंतीं आडून बाजीरावांना शिव्या देणं तसं फारसं 'धोकादायक' नव्हतं
हेच यामागचं कारण असावं बहुदा !! लोकहितवादी म्हणत की, पेशवाईत फक्त ब्राह्मणांचीच
चलती होती. परंतु 'अत्यंत नालायक' म्हणून हिणवलं गेलेल्या दुसऱ्या बाजीरावांच्या
काळातही जे सरंजाम दिलेत ते पाहण्यासारखे आहेत. त्यात नवीन पागा ज्यांना दिल्या
आहेत असे केवळ तीन ब्राह्मण आणि चोवीस अब्राह्मण आहेत. याच्यात एका महाराचं अन्
एका मुसलमानाचंही नाव आहे. गाड़दी बाळगण्याचा अधिकार तीन ब्राह्मण आणि तीन
अब्राह्मणांना दिला आहे. ही माहिती तपासूनही नजरेआड केली असल्यास त्यात शंका
नाही !!!
त्रिंबकजी डेंगळे या माणसाविषयीही अनेक पूर्वग्रह आहेत. हा माणूस बाजीरावाचा
खुषमस्कऱ्या होता, एलफिन्स्टनचा हेर होता, त्याने बाजीरावाला अनभिज्ञ ठेवून कारभार
'कब्जात' घेतला असे अनेक आक्षेप त्यांच्याबद्दल आहेत. परंतु मूळ साधनांच्या
माहितीवरून त्यांची तुलना केवळ नाना फडणवीसांसारख्या बृहस्पतीशीच करता येऊ
शकते. एकीकडे त्रिंबकजीकडे असे आरोप होत होते. परंतु दुसरी गोष्ट कोणी मानायलाच
तयार नव्हतं. प्रकरणात हस्तक्षेप करून त्रिंबकजींनी एलफिन्स्टनला
पहिल्यांदा अडचणीत आणलं. हे प्रकरण जाणार असं वाटत असतानाच त्रिंबकजींनी
<<<
इंग्रजांविरुद्ध मोठंच राजकारण आरंभलं. नेपाळच्या राजाने इंग्रजांचा प्रचंड पराभव केला
होता. याचाच आधार घेऊन त्रिंबकजींनी, पूर्वी नाना जशी चौकड़ी उभी केली
तसं करायचं ठरवलं. पूर्वेकडून ब्रह्मदेशच्या राजाने, उत्तरेकडून नेपाळच्या राजाने,
पश्चिमेकडून पंजाबच्या शीख रणजितसिंह यांनी आणि दक्षिणेकडून पेशवे आणि त्यांच्या
सरदारांनी एकदम इंग्रजांवर हल्ला अशी त्रिंबकजींची योजना होती. परंतु, दुर्दैवाने
ब्रह्मदेशच्या राजाने आणि इंग्रजांशी स्वतंत्र तह केलेल्या मराठी सरदारांनी या योजनेला
प्रतिसाद न दिल्याने ही योजना बारगळली अन् अपयश मात्र त्रिंबकजींच्या पदरी पडले.
अर्थात बाळाजीपंत नातूंसारखे इंग्रजांनी फेकलेले तुकडे चघळणारे अनेक फितूर
आपल्याकडे असल्याने त्रिंबकजींच्या या गुप्त राजकारणाचा सुगावा एलफिन्स्टनला लागला
आणि त्रिंबकजींपासून असणारा धोका ओळखून त्यांना गंगाधरपंत शास्त्रांच्या खुनाच्या
प्रकरणात अडकवण्यात आले. एलफिन्स्टनने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जला स्पष्ट लिहिलं
होतं की, "पेशवाईचा खरा सूत्रधार बाजीराव नसून त्रिंबकजीच आहे. त्याला कारभारातून दूर
केल्याशिवाय आपल्याला काहीही करता यायचं नाही ... " या साऱ्या गोष्टींवरूनच
त्रिंबकजींची हुशारी अन् त्यांचे महत्त्व लक्षात येते आणि बाजीरावांनी सारा कारभार त्यांच्या
हातात का दिला हेही स्पष्ट होते.
बाजीरावांविषयीचा आणखी एक आक्षेप म्हणजे ते स्त्री-लंपट होते. त्यांची अकरा लग्नं
झालेली होती, ते कायम बायकांच्याच घोळक्यात असायचे इ. अनेक! मुळातच मराठी
राज्यकर्त्यांचं बहुभार्या असण्याचं कारण हे एकपत्नी व्यवस्था असणाऱ्या इंग्रजांना
मानवणारं नव्हतं. परंतु अगदी भगवान श्रीकृष्णापासून आपल्याकडे बहुभार्या पद्धत
अस्तित्वात आहे. खुद्द शहाजीराजांची तीन लग्नं झालेली हे तर सर्वज्ञात आहेत. श्री थोरल्या
राजारामांनाही जानकीबाई, ताराबाई आणि राजसबाई अशा तीन पत्नी होत्या. थोरल्या
शाहूमहाराजांनाही अंबिकाबाई, सावित्रीबाई, सकवारबाई, सगुणाबाई अशा चार राण्या
याशिवाय विरूबाई नावाची रक्षा होती. याशिवाय लक्ष्मीबाई आणि सखुबाई या नाटकशाळा
होत्या. त्यामुळे एलफिन्स्टनसारख्या इंग्रजाचं ठीक आहे, परंतु वरील उदाहरणे ज्ञात
असणाऱ्या मराठी माणसांनीही बाजीरावांना शिव्या द्याव्यात? मग बाजीरावांना एक न्याय
आणि वरील माणसांना दुसरा हे कसे? काही इतिहासकार शाहिरांच्या पोवाड्यातील
कथानकावरून बाजीराव पेशव्यांना स्त्रीलंपट म्हणतात. उदा .- 'कृष्णदास' नावाच्या एका
शाहिराने रचला आहे. या पोवाड्यात तो म्हणतो-
"बाजीराव महाराज अर्जी ऐकितो बायकांची,
चल गडे, जाऊ पुण्याशी, हौस मोठी माझ्या मनाची ...
हा सर्वस्वी देह केला अर्पण करुनी आण तुमची,
शुक्रवार पेठेत बसूनी हाजिरी घेतो बायकांची ... "
शिदरामा नावाचा एक शाहीर म्हणतो-
"गेले बाजीराव श्रीमंत पडली त्याला
भ्रांत, लुटविली दौलत कसबिणीला
<<<
कोण पुसेना त्या, राव-कंचनिला
नित करीती गायनकला या नाटकशाळा
मेण्यांमध्ये बसवून आणती त्यांला,
ये आयने महाल त्याच्या राव बैठकीला ... "
परंतु या शाहिरांच्या पोवाड़ा 'कथना' वर विश्वास कितपत ठेवायचा हाच सर्वात मोठा प्रश्न
आहे. जसे बाळाजीपंत नातू होता तसेच हे शाहीरदेखील एलफिन्स्टनने फेकलेले चार तुकडे
चघळत बाजीरावांच्या विरोधात बोलत नसतील कशावरून? शाहिराची लोकप्रियता अन्
जनमानसात त्यांची सहज एकरूप होण्याची प्रवृत्ती यामुळे बाजीरावांच्या बाबतीत लोकांच्या
मनात विष पेरण्याकरता एलफिन्स्टननेच या शाहिरांना फितूर केले नसेल हे कशावरून
सांगता येईल? आणि जर शाहिरांवरच विश्वास ठेवायचा झाला तर मग दुसऱ्या बाजीरावांना
अक्षरशः देवासमान मानणारे शाहीरही होतेच की ... शाहीर होनाजी शिलारखाने (होनाजी
बाळा) म्हणतो-
"दिन असता अंधार, आकाशतळी पडला बाई,
विश्वतरंगाकार प्रभूवीण शून्य दिशा दाही
निर्मळ शशीसारखी आचळ आहे पदरी पुण्याई
तरीच भेटतील स्वामी येरव्ही नसे उपाय काही ...