text
stringlengths
0
147
सतराव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी अंगावर पडूनही नारायणरावांच्या मनात पोच
निर्माण झाली नव्हती. वयाने ते अल्लडच राहिले होते. एका समकालीन पत्रात म्हटलं आहे
की, "श्रीमंतांची मर्जी फारच उतावीळ आहे असे आहे. लहान माणसांची चाल पडलेसी
दिसते. आपपर कळत नाही. कारभारी करतील ते प्रमाण. धन्यात धनीपण अजिबात
नाही." वास्तविक नानासाहेबांनंतर पेशवेपद आपल्याला मिळावे अशी सुप्त
इच्छा होती. परंतु माधवरावांच्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे रघुनाथरावांचे काही चालले
नाही. परंतु माधवरावसाहेब गेल्यानंतर नारायणराव पेशवाई सांभाळण्यास योग्य नाहीत असे
म्हणून त्यांनी पुन्हा कारस्थाने सुरू केली. सखारामबापूंसारख्या 'देशस्थाने'ही दादासाहेबांना
साथ दिली. बापूंनी पहाऱ्यावरच्या गारद्यांना फितवले. गारद्यांच्या प्रमुखांना- सुमेरसिंगाला,
महंमद इसाफ, खरकसिंग आणि बहादूरखान यांना तीन लक्ष रु. देण्याचे मान्य केले. बापूंनी
'नारायणरावांस धरावे' अशा अर्थाचे पत्र करून, त्यावर रघुनाथरावांची स्वाक्षरी घेऊन ते
गारद्यांना दिले. नारायणरावांची 'हत्या' झाली. या प्रसंगावरून अनेक तर्कवितर्क पुढे आले.
पेशवाईला धनी म्हणून आपलाच पती त्या गादीवर बसावा असे म्हणून आनंदीबाईंनीच मूळ
पत्रात 'ध'चा 'मा' केला असा गैरसमज पसरवण्यात आला. परंतु असत्य आहे.
नारायणरावांच्या हत्येनंतर नानासाहेबांनी पकडलेल्या महंमद इसाफने जबानी दिली की,
'नारायणरावांना मारावे असे कोणाचेच मत नव्हते. ते काम आयत्या वेळेस सुमेरसिंगाने
केले.' त्यामुळे बखरकार आणि इतिहासकारांनी पुढे आनंदीबाईवर सर्व आरोप केले ते
चुकीचे आहेत. आनंदीबाई या अत्यंत कडक परंतु शिस्तप्रिय अन् सुस्वभावी होत्या.
नारायणरावांना धरण्याच्या (कदाचित मारण्याच्याही) मसलतीत फक्त रघुनाथरावांचाच हात
असावा. कारण यानंतरच्या एका पत्रात म्हटलं आहे, "(मृत्यूचे) सुतक नाही. नित्य नमस्कार
सूर्यास घालीतात. 'वैरियाचे सुतक कशास?' ऐसे म्हणतात ... ". यामुळेच नारायणराव
पेशव्यांच्या खुनाच्या प्रकरणात आनंदीबाईंचा काही हात नसावा असे दिसून येते. स्वतःच्या
सख्ख्या पुत्राचे (बाजीरावांचे) सर्व दोष जगासमोर मांडणाऱ्या, नारायणरावांच्या मृत्यूनंतर
त्यांच्या गरोदर पत्नीला गारद्यांपासून वाचवणाऱ्या, त्यांच्या पुत्राला (सवाई माधवराव) 'सुख
पडेल तेथे न्यावे' असे नाना फडणवीसांना खडसावणाऱ्या आनंदीबाईंना उगाचच आरोपीच्या
पिंजऱ्यात उभे केले गेले.
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या बाबतीत तर ते 'अस्सल भट कुलोत्पन्न' आहेत की
नाहीत यावरूनच वाद उत्पन्न झाले होते. सवाई माधवरावांचा चेहरा हा नाना
बराचसा मिळताजुळता होता. योगायोगाने गंगाबाई गरोदर असतानाच नाना
पत्नीही गरोदर होती. बारभाईंच्या कारकीर्दीत नाना गंगाबाईंसोबत आपलेही
कुटुंब पुरंदरावर नेले होते. सवाई माधवरावांच्याच जन्माच्या वेळी नानांनाही अपत्य झाले.
पण ती कन्या होती. हे पाहून नानांच्या विरोधकांनी आणि रघुनाथरावांच्या समर्थकांनी असा
अपप्रचार चालवला की, वास्तविक नारायणरावांना, म्हणजेच गंगाबाईंना 'कन्या' झाली
असून नानांना 'पुत्र' झाला आणि केवळ पेशवाई चालवायची म्हणून नानांनी आपला पुत्र हा
<<<
नारायणरावांचा 'पुत्र' म्हणून गादीवर बसवला. तेव्हा या मुलाचा, म्हणजेच सवाई
माधवरावांचा गादीवर काही हक्क नाही. परंतु या सर्व गोष्टींवर नानांनी मात केली आणि
बाळ केवळ ४० दिवसांचं असताना त्याला पेशवाई मिळवून दिली.
हे झालं अस्सल समकालीन वर्तमान. परंतु नंतरच्या काळात तर मात्र कहरच झाला.
राज्य करण्याच्या हेतूने इंग्रज इतिहासकारांनी आणि एकंदरीतच ब्राह्मण अन् पेशवाईबद्दल
आकस असणाऱ्या जातीयवादी लोकांनी असाही गैरसमज पसरवला की, नाना फडणवीस
आणि गंगाबाई यांचे अनैतिक संबंध होते आणि सवाई माधवराव हा नाना
गंगाबाईला झालेला अनौरस पुत्र आहे !! अन् याहूनही अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे बऱ्याच
लोकांनी या गैरसमजुतीवर विश्वास ठेवला.
रघुनाथराव पेशव्यांचे पुत्र बाजीराव (दुसरे) यांच्याबद्दल तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड राग
आहे. परंतु, त्याबद्दलच अनेक गैरसमजही आहेत. अन् काही गैरसमज हे मुद्दाम पसरवण्यात
आले आहेत.
सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतरच्या राजकारणातून बाजीरावांना अचानक अनपेक्षितपणे
पेशवाईची सूत्रे मिळाली. इतकी वर्षं कैद अन् एकदम अशी सत्ता हातात आल्यानंतर काय
करायचं हे बाजीरावांना न समजल्याने सुरुवातीला त्यांच्या हातून अनेक गंभीर चुका घडल्या.
नाना कैदेत टाकणे, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्यावेळी मराठी सरदारांना मदत
न करणे, इंग्रजांशी 'वसईचा तह' करणे या सर्व बाजीरावांच्या अत्यंत मोठ्या घोडचुकाच
म्हणायला हव्यात. परंतु, इ. स. १८११ मध्ये पुण्याचा रेसिडेंट म्हणून कर्नल बॅरी क्लोज
याच्या जागेवर जेव्हा माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन या शिस्तप्रिय इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक
झाली तेव्हा मात्र बाजीरावांनाही 'कंपनी सरकार'चा खरा हेतू आणि आपण केलेल्या चुकांची
जाणीव होऊ लागली. परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला होता. एलफिन्स्टन हा अत्यंत धूर्त
गृहस्थ होता. त्याचं हेरखातं जबरदस्त होतं. बाजीराव पेशवे जेवायला बसण्यापूर्वीच त्यांच्या
ताटात काय पदार्थ असणार आहेत याची त्याला कल्पना येत असे. बाजीरावांनाही ही गोष्ट
कळून चुकली होती. आपण एलफिन्स्टनच्या जाळ्यात पुरते आहोत अन् आता
यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत सावधपणे अन् नाजूक हातांनी जाळं तोडायला पाहिजे
हे त्यांना पक्क समजून चुकलं होतं. म्हणूनच बाजीराव दरवेळेस एलफिन्स्टनसमोर 'आपण
खूप मृदू स्वभावाचे, युद्ध-लढाईऐवजी ख्यालीखुशालीत रमणारे आहोत. मोहिमांचा
आपल्याला खूप तिटकारा आहे. तोफांचा आणि बंदुकांचा नुसता आवाजही आपल्याला
सहन होत नाही' असे बहाणे करत असत. परंतु, याच बरोबरीने इंग्रजांचे मूळ कायमचे
उखडून टाकण्याची तयारीदेखील सुरू होतीच. म्हणूनच बाजीरावांनी सदाशिव
माणकेश्वरांच्या फितुरीचे निमित्त करून त्यांचा कारभारी म्हणून त्रिंबकजी डेंगळे या
जबरदस्त असामीला नेमले. त्रिंबकजी डेंगळे म्हणजे दुसरे नाना फडणवीसच होते. नानांची
शिस्त, कारभारावरची मजबूत पकड, शत्रुंविषयीचे योग्य ते धोरण, परकीय
गोऱ्यांविषयीची शंका इ. साऱ्या गोष्टी त्रिंबकजींमध्ये जशाच्या तशा होत्या. आपण स्वतः फार
कर्तबगार नाही आहोत हे स्वतःला समजल्यामुळेच बाजीरावांनी सर्व कारभाराची मुखत्यारी
<<<
त्रिंबकजींना दिली होती. नेमकी हीच गोष्ट बाजीरावांच्या भवतीच्या लोकांना खटकू लागली
आणि त्यातूनच 'बाजीराव हा भित्रा आहे. तो पूर्णपणे त्याचा खुषमस्कऱ्या त्रिंबकजी
डेंगळ्यांच्या कह्यात गेला आहे' अशा अफवा उठू लागल्या.
त्रिंबकजी डेंगळ्यांनी बापू गोखले, आबाजीपंत पुरंदरे, गणपतराव पानसे अशा शूर
सरदारांना एकत्र करून गुप्तपणे इंग्रजांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केली. नेमकं
हेच एलफिन्स्टनला जाऊ लागलं. कसंही करून त्रिंबकजींना कारभारातून हटवणं
गरजेचं होतं. नेमकं याच वेळेस गंगाधरशास्त्र्यांचं प्रकरण उद्भवलं. एलफिन्स्टनने गोविंदराव
बंधुजी या माणसामार्फत पंढरपुराण शास्त्रयांचा खून करवला आणि त्याबद्दल त्रिंबकजीला
दोषी ठरवून कैद केलं. पुढे त्रिंबकजी डेंगळे कैदेतून निसटले, परंतु बाजीरावांना मात्र त्यांच्या
जिवाखातर 'पुणे करार' करावा लागला.
१८१७-१८ च्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मात्र बाजीराव पेशवे स्वतः हाती शस्त्र
घेऊन इंग्रजांविरुद्ध मैदानात उतरले असता, बाकीच्या सरदारांनी मात्र ऐनवेळी पेशव्यांचा
घात केला. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले हे ऐनवेळी वतन हवे म्हणून अडून बसले.
नागपूरकर भोसल्यांना 'सेनासाहेब सुभा' हे पद हवे होते. ग्वाल्हेरच्या शिंद्यांना
'अलिजाबहाद्दर' अशी पदवी हवी होती. शिदोजीराव नाईक निंबाळकर उर्फ निपाणकर
देसाई, घोरपडे, रास्ते असे अनेक सरदारही इंग्रजांना सामिल झाले. गोखले, पानसे, दीक्षित हे
लोक रणांगणात पडले आणि बाजीरावांच्या शरणागतीपर्यंत केवळ त्रिंबकजी डेंगळे,
विठ्ठलराव विंचूरकर आणि आबा पुरंदरे हे तीनच सरदार पेशव्यांच्या पाठी सावलीसारखे उभे
होते.
पेशवाई बुडाल्यानंतर जनमानसात दुसऱ्या बाजीरावांविषयी अन् त्रिंबकजी
डेंगळ्यांविषयी प्रचंड चीड अन् राग होता. तो असणं स्वाभाविक होतं. कारण थोरल्या
शिवछत्रपतींनी पाया घातलेलं आणि थोरल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी कळसाला नेलेलं
मराठी राज्य, धरणीकंपात एखादी कोसळावी तसं कोसळलं होतं. परंतु मराठी राज्य
बुडण्याचा दोष फक्त बाजीरावांनाच देणं हे कितपत योग्य आहे याचा विचार मात्र दुर्दैवाने
कोणीही केला नाही. ललित लेखक आणि इतिहासाचे जाणकार असलेल्या श्री. ना. सं.
इनामदार यांनी या गोष्टीचं अत्यंत योग्य अन् मोजक्या शब्दात विवेचन केलं आहे- ('झेप'-
प्रस्तावना (ले. ना. सं. इनामदार)) " ... मराठ्यांपासून राज्य हिसकावून घेताना आमचे