audio
audioduration (s)
2.36
25.8
text
stringlengths
18
172
gender
class label
2 classes
गुरु पहाटे उठले, त्या वेळी अर्ध्या छपरातून चंद्र दिसत होता.
0female
त्यांनी कविता लिहिली, त्या कवितेत होते, देवा, आम्हाला आधीच ज्ञात असते, तर आम्ही आधी अर्धेच छप्पर बांधले असते.
0female
आता आम्ही झोपतांना चंद्रही बघू शकतो.
0female
बक-यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली.
0female
वाघीण गरोदर होती, उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली.
0female
तिचे पिल्लू त्या बक-यांच्या कळपात वाढू लागले, बकऱ्यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले.
0female
बकऱ्या बें बें करीत, तसेच तेही बें बें करू लागले.
0female
हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले.
0female
एक दिवस त्या बकऱ्यांच्या कळपावर एका वाघाने आक्रमण केले.
0female
कळपातील गवत खाणाऱ्या वाघाला पाहून तो रानातील वाघ आश्चर्यचकित झाला.
0female
धावत जाऊन त्याने त्या गवत खाणाऱ्या वाघाला पकडले, तो बे-बें करून ओरडू लागला.
0female
रानातल्या वाघाने त्याला ओरडत फरफटत तलावापाशी नेले.
0female
मग तो त्याला म्हणाला, पहा, जरा पाण्यात आपले प्रतिबिंब पहा, पाण्यात तुझे तोंड दिसते आहे.
0female
नीट पहा, तू अगदी माझ्यासारखा दिसत आहेस आणि हे घे थोडेसे मांस खा.
0female
असे म्हणून रानातल्या वाघाने त्याच्या तोंडात बळेबळे मांस कोंबले.
0female
आधी तो गवत्या वाघ मांस खायला सिद्ध होईना.
0female
तो एक सारखे बें बें करून ओरडत होता.
0female
थोडीशी रक्ताची चटक लागताच तो ते मांस आनंदाने खाऊ लागला.
0female
तेव्हा रानातला वाघ म्हणाला, कळले ना आता, अरे, जो मी आहे तोच तू आहेस, चल आता माझ्यासह वनात.
0female
एक राजा आणि शेठजी यांची गाढ मैत्री होती.
0female
शेठजी चंदनाच्या लाकडांचा व्यापारी होता.
0female
चार पाच वर्षे त्याच्या लाकडाची विक्री झालीच नाही.
0female
त्याला असे वाटले की, हे लाकूड मूल्यवान आहे, हे लाकूड कोण विकत घेईल ?
0female
हे केवळ राजाच विकत घेऊ शकतो.
0female
शेठजीला असे वाटले की, राजा जर मेला, तर त्याला जाळण्याकरता चंदनाच्या लाकडांची आवश्यकता लागेल.
0female
त्यामुळे माझा व्यापार चांगला होईल.
0female
इकडे राजाच्या मनात शेठजींच्या विषयी कुभाव उत्पन्न झाला की, हा शेठजी निपुत्रिक आहे.
0female
जर हा मेला, तर याचे धन राज्य भांडारात जमा होईल.
0female
दोघांच्याही मनात असे कुविचार येऊन गेले.
0female
जेव्हा ते भेटले, तेव्हा त्यांनी एकमेकांना आपापल्या मनातील विचार सांगितले.
0female
राजाच्या मनात असे विचार यायचे कारण काय?
0female
शेठजींच्या मनात राजाविषयी वाईट विचार आला; म्हणून राजाच्या मनात त्याची प्रतिक्रिया उमटली.
0female
राजाने शेठजींची कान उघडणी केली की, वाईट विचारांपेक्षा मनात चांगले विचार आणावे.
0female
राजाने आपल्या महालाचे दरवाजे चंदनाचे करावे आणि माझे सर्व चंदन विकले जावे.
0female
एकदा एक पिता-पुत्र एका घोड्याला घेऊन जात होते.
0female
मुलाने वडिलांना सांगितले, तुम्ही घोड्यावर बसा, मी पायी चालतो.
0female
वडील घोड्यावर बसले, रस्त्याने जात असता लोक म्हणू लागले, बाप निर्दयी आहे.
0female
लहान मुलाला उन्हातून चालवतो आणि आपण मात्र आरामात घोड्यावर बसला आहे.
0female
हे ऐकून वडिलांनी मुलाला घोड्यावर बसवले आणि आपण पायी चालू लागले.
0female
पुढे भेटलेल्या लोकांनी म्हटले, मुलगा किती निर्लज्ज आहे पहा!
0female
आपण तरुण धडधाकट असूनही घोड्यावर बसला आहे आणि बापाला पायी चालवतो आहे!
0female
हे ऐकून दोघेही घोड्यावर बसले.
0female
पुढे गेल्यावर लोक म्हणाले, हे दोघेही म्हसोबासारखे आहेत आणि छोट्याशा घोड्यावर बसले आहेत.
0female
बिचारा यांच्या वजनाने दबून जाईल.
0female
हे ऐकून दोघेही पायी चालू लागले.
0female
काही अंतरावर गेल्यानंतर लोकांचे बोलणे ऐकू आले, किती मूर्ख आहेत हे लोक ?
0female
बरोबर घोडा आहे, तरीही आपले पायीच चालले आहेत.
0female
काही केले तरी लोक टीका करतात.
0female
लोकांना काय आवडेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा भगवंताला आपण काय केलेले आवडेल, इकडे लक्ष द्या.
0female
सगळ्या जगाला प्रसन्न करणे कठीण आहे, भगवंताला प्रसन्न करणे सोपे आहे.
0female
कंबन हा तामिळनाडूमधील महाकवी होता.
0female
तो प्रतिभावान आणि सूक्ष्मदर्शी विद्वानही होता.
0female
त्याला ओटूक्कूत्तन नावाचा मित्र होता, तोही मोठा विद्वान होता.
0female
कंबन रामायण रचतो आहे, हे समजल्यावर कूत्तनलाही स्फूर्ती आली.
0female
त्यानेही तामिळमध्येच रामायण रचनेला प्रारंभ केला.
0female
दोघांचीही रामायणे स्वतंत्रपणे चालू झाली आणि यथावकाश ती पूर्णही झाली.
0female
कंबनचे रामायण लोकप्रिय झाले.
0female
कंबन आपले रामायण गायला लागला की, श्रोते तल्लीन व्हायचे आणि वाहवा करायचे.
0female
कंबन जाईल तेथे त्याचा आदर व्हायचा, सन्मान मिळायचा, सगळीकडे त्याचाच जयजयकार होता.
0female
कूत्तन आपले रामायण गायला बसला की, श्रोते नगण्यच असायचे, त्यामुळे कूत्तन हिरमुसला व्हायचा.
0female
त्याला आपले सारे श्रम वाया गेले, असे वाटायचे.
0female
आपण उपेक्षित अवस्थेत जगणार अन् शेवटी मरणार, असा विचार करता करता त्याचे डोके सैरभैर झाले.
0female
त्याच्या जीवनात सर्वत्र निराशेचा अंधार पसरला.
0female
एके दिवशी कूत्तनने, स्वतःच रचलेले रामायण जाळून, त्या रामायणाची राख अंगाला फासून, गोसावी बनण्याचे ठरवले.
0female
ही वाईट बातमी कंबनच्या कानी गेली, तो धावतपळत मित्राकडे पोहोचला.
0female
त्याने पाहिले, तेव्हा कूत्तन, स्वतःच्या रचलेल्या रामायणाच्या पोथीचा, स्वाहाकार करत होता.
0female
कंबन म्हणाला अरे वेड्या, हा काय प्रकार चालवला आहेस ?
0female
स्वतः रचलेले रामायण असे का जाळत आहेस?
0female
त्यावर कूत्तन म्हणाला, तुझ्यापुढे मी काजवा आहे.
0female
माझ्या रामायणाला कोणीही विचारणार नाही, ते धूळ खात पडेल, त्यापेक्षा ते जाळलेले बरे !
0female
कंबनने कूत्तनचा हात पकडला, तेव्हा कूत्तनच्या रामायणातील उत्तरकांड तेवढे जाळायचे राहिले होते.
0female
कंबनने ते स्वतःकडे घेतले, कंबन कूत्तनला म्हणाला, वेड्या, तू माझा मित्र ना!
0female
हा स्वाहाकार करायच्या आधी मला बोलायचेस तरी !
0female
आता मी सांगतो ते ऐक, तुझे रामायण लिहून पूर्ण झाले आहे.
0female
माझ्या रामायणाचे उत्तरकांड अजून रचायचे आहे, ते मी आता रचणार नाही.
0female
माझ्या रामायणाला तुझे हे उत्तरकांड जोडीन, म्हणजे रामायण पूर्ण होईल.
0female
लोक तुला आणि मला रामायणकर्ते म्हणून ओळखतील !
0female
मित्रप्रेमाचा हा एक आदर्श ठरेल !!
0female
शूरसेन नावाचा एक राजा होता.
0female
त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले, त्याची प्रजाही सुखी होती.
0female
राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता.
0female
त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली, तेव्हा शूरसेनाने आपल्या प्रधानाला बोलावले.
0female
राज्यातील सर्वश्रेष्ठ अध्यात्मातील अधिकारी असलेल्या गुरूंचा मानसन्मान करण्यास सांगितले.
0female
अध्यात्म शिकवण्यासाठी त्यांना प्रतिदिन राजवाड्यात घेऊन येण्यास सांगितले.
0female
आपल्या राजधानीच्या जवळच रानामध्ये एका झोपडीत आत्मानंद महाराज राहतात.
0female
त्यांना साक्षात्कार झालेला आहे; पण ते येथे राजवाड्यात येतील, असे वाटत नाही.
0female
तू रथ घेऊन जा, त्यांचा मानसन्मान कर आणि कसेही करून त्यांना घेऊन ये.
0female
प्रधान आत्मानंद महाराजांकडे गेला.
0female
त्यांच्या पाया पडला आणि राजाचा निरोप सांगितला.
0female
हे पहा, मला राजवाड्याची आवश्यकता नाही.
0female
राजाला अध्यात्म शिकायचे आहे, तर आवश्यकता राजाला आहे.
0female
त्याला खरीच तळमळ असेल, तर त्याने माझ्या झोपडीत शिकायला यावे.
0female
प्रधानाने राजास त्याप्रमाणे कळवले.
0female
शेवटी राजा अध्यात्म शिकण्यासाठी आत्मानंदांच्या झोपडीत यायला सिद्ध झाला.
0female
राजा झोपडीत आला, त्या वेळी झोपडीतील एका बाजूच्या खोलीत आत्मानंद महाराज बसलेले होते.
0female
राजाने प्रधानासमवेत, मी आलो आहे, असा महाराजांना निरोप पाठवला.
0female
त्यालावाटले, महाराज त्याच्या स्वागताला बाहेर येतील.
0female
आत्मानंद महाराजांनी प्रधानाला सांगितले, राजांना घेऊन आपण माझ्या खोलीत या.
0female
खोलीचे दार केवळ ४ फूट उंचीचे होते.
0female
राजा आणि प्रधान यांना वाकून खोलीत यावे लागले.
0female