diff --git "a/About Peshwai - Detail book by Kaustubh Kasture.txt" "b/About Peshwai - Detail book by Kaustubh Kasture.txt" new file mode 100644--- /dev/null +++ "b/About Peshwai - Detail book by Kaustubh Kasture.txt" @@ -0,0 +1,8271 @@ +Peshwaai +पेशवाई ... पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्णपानच. थोरल्या महाराज +श्री शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या अस्तानंतर आता स्वराज्य नामशेष होणार की +काय अशी भीती वाटत असतानाच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्न पडले! बाळाजी विश्वनाथ +भट ... + सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राची जी वाताहात झाली होती, मोगली फौजांनी +महाराष्ट्राची जी वाट लावली होती, तेच चित्र अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पालटू लागले. +इ. स. १७०७ मध्ये शाहजादा आझमशहाच्या कैदेतून सुटून शाहूराजे महाराष्ट्रात आल्यानंतर +हाच आपला खरा राजा आहे हे अचूक ओळखून बाळाजीपंतांनी आपले संपूर्ण आयुष्यच +शाहूराजांच्या सेवेत अर्पण केले. बाळाजी विश्वनाथांसारख्या 'अतुल पराक्रमी सेवका' ची ती +प्रेमळ राजनिष्ठा पाहून शाहूराजेही भारावून गेले. त्यांनी बाळाजीपंतांना स्वराज्याचे पेशवेपद +बहाल केले. + बालाजी विश्वनाथ पेशव्यांनी तीस वर्षे मोगलांच्या कैदेत खितपत असलेल्या +राजघराण्यातील कबिल्याची अन् असामींची सुटका केली आणि त्याशिवाय स्वराज्याचे 'पोट +भरावे' यासाठी राजकारणं करून चतुराईने दिल्ली दरबारातून चौथाई- सरदेशमुखीच्या +सनदाही मिळवल्या. या सनदा म्हणजे भविष्यातील पातशाहीला नामोहरम करण्याची पहिली +पायरी होती. + बालाजी विश्वनाथांनंतर त्यांच्याइतक्याच हुशार, कर्तबगार आणि पराक्रमी असणाऱ्या +त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला, बाजीरावांना दरबारातील अनेक मंत्र्यांचा विरोध असतानाही शाहू +महाराजांनी पेशवेपदी नेमले. बाजीरावांनीही शाहूराजांचा विश्वास सार्थ करून दाखवला. + औरंगजेबाच्या मृत्यूनंतर केवळ तीस वर्षांच्या काळातच मराठी फौजा थेट दिल्लीवर जाऊन +धडकल्या. पेशव्यांच्या या 'झंझावाती' फौजांना अडवण्याची हिंमत आता एकाही यवनी +पातशाहीत उरली नव्हती. परंतु केवळ दुर्दैवाने वयाच्या केवळ अवघ्या चाळीसाव्या वर्षी हा +पराक्रमी पेशवा जग सोडून गेला ... +<<< + + बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहूराजांनी नानासाहेब ऊर्फ बाळाजी बाजीराव यांना + पेशवेपद दिले. नानासाहेब वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षापासून साताऱ्यात राहून +राज्यकारभाराचे घेत असल्याने, शाहू राजांची त्यांच्यावर फार मर्जी होती. इ.स. १७४९ +मध्ये शाहू राजांनी आपल्या मृत्यू��ूर्वी राज्याची सारी जबाबदारी आणि राज्यकारभाराचे सारे +हक्क फक्त पेशव्यांना बहाल केले. त्यामुळे छत्रपतींऐवजी पेशवे आता महाराष्ट्राचे सार्वभौम +परंतु अनभिषिक्त राज्यकर्ते झाले. मराठ्यांची कागदोपत्री राजधानी म्हणून 'सातारा' असले +तरीही पुण्याच्या 'शनिवारवाड्याला' अधिक महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांच्या खड़्गाची अन् + शनिवारवाड्याच्या फडाची कीर्त साऱ्या शत्रूंच्या उरात भरवत होती. परंतु १७६१ च्या + झालेल्या प्रचंड नरसंहारानंतर केवळ पाच महिन्यातच नानासाहेब जग सोडून +गेले. नानासाहेबांचा थोरला पुत्र विश्वासराव पानिपतावर पडला असल्याने त्यांच्या द्वितीय + पुत्रावर- माधवरावावर वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी पडली. या +तरुण पेशव्याने आपल्या चुलत्याच्या राज्यलालसेला आणि परकीय शत्रूंना प्रसंगी चुचकारून +वा प्रसंगी धाक दाखवून नियंत्रणात ठेवले आणि वयाची सत्तावीस वर्षे पूर्ण होतात न होतात +तोच माधवरावही दौलतीला पारखे झाले. + माधवरावसाहेबांचा मृत्यू ही जणू मराठी सत्तेच्या उतरत्या कळेची नांदी होती. 'परशुराम + चरित्र' या ग्रंथाचा कवी वल्लभदास याने तर बाळाजी विश्वनाथांच्या रूपाने परशुराम या + पृथ्वीवर पुन्हा अवतरले आणि आता माधवरावांच्या मृत्यूने भार्गवरामाचाही अवतार संपला + असेच सूचित केले आहे. कारण माधवरावांनंतरच्या एकाही पेशव्याच्या हातात राज्याची + संपूर्ण मुखत्यारी कधीही राहिली नाही. तसं म्हटलं तर खरी 'पेशवाई' ही केवळ बावीस वर्षेच +होती. कारण इ. स. १७५० मध्ये शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत पेशव्यांना महत्त्व असले तरी ते + 'सार्वभौम' नव्हते आणि यानंतरच्या काळात, इ. स. १७७२ मध्ये माधवरावांचा मृत्यू +झाल्यानंतर बारभाई कारस्थानापासून पेशवेपद हे कोणालाही मिळाले तरी सारे राज्य + 'कारभारी' च पाहत असत. नारायणराव आणि सवाई माधवरावांच्या काळात सारा कारभार +नाना फडणवीस आणि महादजी शिंदेच बघत होते. पुढे बाजीराव पेशव्यांनी काही काळ +स्वतः कारभार पाहिला, परंतु या काळात राज्याचे काहीही भले न होता नुकसानच झाले. + अखेरच्या काळातही त्रिंबकजी डेंगळ्यांसारखे कारभारीच राज्य चालवत होते. परंतु, तरीही + एकूणच पाहता या कारभाऱ्यांनीही 'राज्य' उत्तमरीत्या सांभाळले आणि विस्तार केला यात +तिळमात्रही श��का नाही. + आज पेशवाई आणि पेशव्यांबाबत जनमानसात प्रचंड गैरसमज पसरले आहेत. या + गैरसमजांमुळेच अनेक लोकांना (आणि इतिहासकारांनाही) पेशवाई ही 'मोगलाई'पेक्षाही +वाईट वाटते. यात इतर अनेक तांत्रिक आणि वैचारिक गोष्टी असल्या तरीही याचे मुख्य +कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले जातीयवादाचे विष !! पेशवे हे + ब्राह्मण होते आणि केवळ याच कारणाने आजपर्यंत स्वतःला ‘सेक्युलर' म्हणवणाऱ्या + इतिहासकारांनीही पेशव्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन न करता त्यांची कायम अवहेलनाच +केली. इतिहासकारांचा असा आक्षेप आहे की, पेशवाईतच 'जातीय निर्माण झाली. परंतु +<<< + +एका अस्सल समकालीन पत्रातून यासंबंधी बरीच कल्पना येते "खावंदांचे (पेशव्यांचे) घरी +सर्व लहान-मोठे आहेत, बरे-वाईट आहेत परंतु आपपरत्वे जातीचा अभिमान हा काही एक +नसावा. सर्वही खावंदांची लेकरे. आम्ही (सर्व) सेवक हे जाणतो की देशस्थ, कोकणस्थ, +कऱ्हाडे, प्रभू, शेणवी, मराठे (इ.) सर्व स्वामींचे. स्वामी इतक्यांचे मायबाप. चाकरी मात्र +सर्वांनी करावी. जातीभेद अभिमान नसावे." सरदार नाना पुरंदरे यांच्या या +पत्रावरूनच तत्कालीन व्यवस्थेत, निदान स्वतः पेशव्यांच्या आचरणात जातीभेद नव्हता +स्पष्ट दिसून येते. श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या आणि सवाई माधवरावांच्या काळात + 'रमण्यां' वर फार खर्च केला जात होता ही गोष्ट खरी असली तरीही ब्राह्मण नाही म्हणून +एखाद्यावर अन्याय केला जात होता हा शुद्ध गैरसमज आहे. + श्रीमंत दुसऱ्या बाजीरावांच्या काळात उलथापालथ झाली. त्यांनी त्रिंबकजी डेंगळ्यांना + आपला मुख्य कारभारी बनवलं. या त्रिंबकजींना मराठी माणसांनी तोंडभरून शिव्या दिल्या, +परंतु त्यांचा कट्टर शत्रु, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन त्यांच्याविषयी म्हणतो- " ... मराठ्यांशी युद्ध +पुकारण्यापूर्वी त्रिंबकजीला कारभारी पदावरून खाली ओढलं पाहिजे. पेशवाईचा खरा +सूत्रधार त्रिंबकजी डेंगळे आहे. त्याला दूर केल्याशिवाय आपला कोणताही कार्यभाग +साधणार नाही. पण त्रिंबकजीचा कुठल्यातरी कटाशी संबंध जोडल्याखेरीज ही संधी कशी +मिळणार याची मला चिंता आहे." आता एल्फिन्स्टनसारखा बुद्धिमान कट्टर +डेंगळ्यांचं कौतुक करत असताना आमच्याच माणसांनी त्यांच्यावर चिखल उडवण्याचं पाप +केलं यात नवल काहीच नाही + पेशवाईबद्दलचं माझं हे लिखाण म्हणजे समग्र पेशवाईचा इतिहास नक्कीच नाही. मी +स्वतः कोणी इतिहासकार अथवा इतिहास संशोधक नाही. केवळ एक लहानसा अभ्यासक + आहे. जगात एकासारखा दुसरा माणूस होणे केवळ अशक्य आहे. थोरल्या छत्रपती श्री +शिवाजी महाराजांच्या तोडीचा नंतर जन्मला नाही. तो जन्माला येणं शक्यही नाही. +त्यांच्यानंतर महाराष्ट्रात काही शूर, पराक्रमी आणि उदार असे पुरुष झाले. शिवाजी +महाराजांच्या मृत्यूनंतर दोन तपांच्या काळातच बाळाजी विश्वनाथांचा उदय झाला आणि +त्यांच्या पराक्रमी वंशजांनी शिवरायांचे 'हिंदवी स्वराज्याचे' स्वप्न बऱ्याच अंशी पूर्ण केले. +वास्तविक पाहता लो. टिळक म्हणाले त्याप्रमाणे 'पेशव्यांच्या अतुल पराक्रमाने मराठी +राज्याचा मृत्यू शंभर वर्षांच्या एका दिवसाने लांबणीवर पडला' हीच अत्यंत सुदैवाची गोष्ट +होती. परंतु महाराष्ट्राने मात्र पेशव्यांना कायमच उपेक्षित ठेवलं. काही स्वार्थी लोकांनी तर +शिवशाहीला 'मराठेशाही' आणि पेशवाईला 'ब्राह्मणशाही' अशी विशेषणं बहाल केली. +यातूनच पुढे जातीयवादाची ठिणगी आणखीनच शिलगावली गेली. + पेशव्यांबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले. अन् म्हणूनच पेशवाईची तोंडओळख + आणि त्यांच्याबद्दलचे जनमानसात असणारे गैरसमज दूर करण्याचा माझा हा मनापासून +केलेला लहानसा प्रयत्न आहे. हे पुस्तक परिपूर्ण आहे असा माझा अजिबात दावा नाही. +किंबहुना, आजही हजारों कागद धूळ खात पडून आहेत. ते उजेडात आले की कदाचित नवा +इतिहास समोर येईल. परंतु, उपलब्ध आणि महत्त्वाच्या अशा निवडक साधनांच्या आधारे +<<< + +सोप्या शब्दात इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हे माझे पहिलेच पुस्तक. तेही जवळपास +चार वर्षांपूर्वी लिहून झालेले. परंतु, नंतरही अनेक साधने हाती येत गेली आणि काही +ठिकाणी मांडलेल्या गोष्टींना भक्कम पुरावे मिळाले. अर्थात, हे संदर्भ तपासून लिहिण्याचे +वेड म्हणा वा व्यसन म्हणा, ते अंगिकारले गेले, दोन व्यक्तींमुळेच. ज्येष्ठ इतिहास संशोधक, +शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पेशवाईचे अभ्यासक, संशोधक श्री. निनादराव +बेडेकर यांच्यामुळे. इतिहास हे एकप्रकारे पाहिले तर एक शास्त्रच आहे आणि त्याचा +शास्त्रशुद्ध अथवा प्रमाणभूत चौकटीत राहून अभ्यास करणे हे महत्त्वाचे असते, हे या दोन +संशोधकांमुळे मला समजले. निनादराव आज आपल्यात नाहीत, याचे दुःख फार आहे. पण + भाग्याने म्हणा वा पुण्यकर्माने, मला त्यांचा काही सहवास लाभला. माझे भाग्य एवढे +थोर की, मला महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रस्तावना लिहून या +पुस्तकाला आशिर्वाद दिले. ही गोष्ट खरे सांगायचे तर जाहली'. त्याबद्दल त्यांचे +आभार मानावे इतकाही मी मोठा नाही. इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे आणि श्री. +सदाशिव शिवदे यांच्याकडूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ही +गोष्टही मला विसरून चालणार नाही. नानासाहेब पेशव्यांच्या अंतःकाळचे वर्णन करणारे दोन +अस्सल मोडी कागद इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांनी तत्काळ उपलब्ध +दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. काही ऐतिहासिक नोंदींसंबंधी विशेष मदत करणारे +आमचे स्नेही भारत महारुगडे, कोल्हापूर यांचे मनःपूर्वक आभार. कोणत्याही परिस्थितीत +कायमच घरच्या मंडळींनी, माझी आई सौ. स्वामिनी कस्तुरे, वडील श्री. सतीश शंकर कस्तुरे +आणि दादा समीर यांनी इतिहासाच्या अभ्यासाला प्रोत्साहनच दिले, याबद्दल खरेच शब्दच +कमी आहे. आज मी जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच. + मी 'पेशवाई'वर पुस्तक लिहिले आहे आणि आता दीर्घ प्रतिक्षेनंतर ते प्रकाशित +करण्याचा मानस आहे, असे गप्पांच्या ओघात बोललो असता, तत्क्षणी हे पुस्तक +'राफ्टर'कडूनच प्रकाशित करू असे सांगणारे वास्तविक वयाने मोठे असले तरीही माझे +मित्रवर्य श्री. उमेश जोशी यांच्याबद्दल काय बोलावे? उमेश स्वतः थोरल्या रायांच्या +इतिहासातील अभ्यासक आणि विशेष म्हणजे कै. निनादराव बेडेकर यांचे शिष्य +असल्यामुळे पुस्तक अतिशय बारकाईने तपासून त्यातील त्रुटी दाखवून मगच स्वीकारणार, +याची खात्री होती. पुस्तक कसे सजवावे जेणेकरून, वाचकांना तत्कालीन घटना समजून घेणे +सोपे जाईल. विशेषतः ठिकाणे आणि हालचाली वगैरे माहित असाव्यात म्हणून +नकाशे बनवण्याचा विषय निघाला. पण हे नकाशेही अगदीच कंटाळवाणे नसावेत, याकरिता +स्वतः उमेशरावांनी नकाशात जीव येण्याकरिता त्याच्या भौगोलिक रचना अभ्यासून आपल्या +हातातील कामाचा डोंगर कौशल्याने हाताळत अत्यंत कमी वेळात हे अवघड काम पूर्ण केले. + 'येकरिता राजेश्रींचे ऋण कैसे उतरावे?' पुस्तकासाठी अक्ष���जुळवणी करणारे श्री. मिलिंद- +मंजिरी सहस्रबुद्धे, मुद्रितशोधन करून अत्यंत बारीक चुका शोधण्याचे काम करणाऱ्या उमेश +जोशींच्या आईसाहेब सौ. मेघना जोशी, लोकसन्मुख चेहरा असणारे पुस्तकाचे मुखपृष्ठ +बनवणारे 'अस्मी क्रिएशन्स'चे श्री. आशुतोष केळकर आणि सरतेशेवटी पुस्तकाचे मुद्रण +<<< + +उत्तमप्रकारे करणारे 'मौज प्रकाशन' चे श्री. संजय भागवत यांचे मनापासून आभार! + या सर्वांव्यतिरिक्त बाह्य जगातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतिहासप्रेमी वाचक. सदर +पुस्तकातील माझे हे लिखाण कोण्या मोठ्या भाषापंडिताच्या गोडीचे नाही अथवा एखाद्या +इतिहासपंडिताच्या तोडीचेही नाही. त्यामुळे आपला अभिप्राय हाच मार्गदर्शक असल्याने +त्याच्या प्रतिक्षेत आहे. + अखेरीस शाहीर प्रभाकराच्या शब्दातच पेशवाईचे महत्त्व सांगावेसे वाटते- + + "मुलुख सरंजामास देऊन केली कायम गलिमाई। + मनुष्य मात्रादिकांचे माहेर होती पेशवाई।।" + + बहुत काय लिहिणे लेकराचे कायम ऐसेच अगत्य असो द्यावे ही विज्ञापना. + राजते लेखनावधी।। + आपला +<<< + + शिवराज्याभिषेक +२. दक्षिण दिग्विजय +३. छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज +४. श्रीमंत पेशवे बालाजी विश्वनाथ +५. पेशवे बाजीराव बल्लाळ (थोरले बाजीराव) +६. पेशवे बाळाजी बाजीराव (थोरले नानासाहेब) +७. पेशवे माधवराव बल्लाळ (थोरले माधवराव) +८. पेशवे नारायणराव बल्लाळ +९. पेशवे रघुनाथराव बाजीराव (राघोबादादा) +१०. पेशवे माधवराव नारायण (सवाई माधवराव) +११. पेशवे बाजीराव रघुनाथ (दुसरे बाजीराव) +१२. पेशवाई : समज-गैरसमज + १३. मोडी पत्रे +१४. छत्रपती आणि पेशवे यांच्या मुद्रा +<<< + + ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, श्री नृप शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सर, शनिवारची +पहाट झाली. महाडच्या उत्तरेस असणाऱ्या, आठ कोसांवरच्या किल्ले मोठी +लगबग उडाली होती. पहाटेच मंगलवाद्ये वाजायला लागली होती. गडाच्या टोकाटोकांवर, +बुरुजा-बुरुजांवर अन् इमारतींच्या हरएक कोनाड्यात मशाली, पणत्या उजळल्या जात +होत्या. बालेकिल्ल्याच्या दोनही दरवाज्यांबाहेर- पालखी आणि मेणा दरवाज्याबाहेरचा +परिसर गोमयानी सारवलेला होता. राजवाड्यातल्या स्त्रिया आज नाकात नथ घालून, +डोईवरचा पदर सांभाळत हातातल्या चांदीच्या तबकातून दरवाज्याबाहेर रंगोळी घालीत +होत्��ा. राजवाड्यातल्या कारकूनांची सदरेच्या पाठीमागचा प्रचंड परिसर सजवायची घाई +लागली होती. फुलांच्या माळा भराभर उलगडल्या जात होत्या. महादरवाजा आज +सूर्य उगवायच्या आधीपासून 'आ' वासून सताड होता. पायथ्याच्या चित +दरवाज्यापासून आणि नाणे दरवाज्यापासून गडावर जाण्याकरता माणसांची रीघ लागली +होती. गडाखालच्या पाचाड, रायगडवाडी, कोंझर या गावांमधून गोरसाचे अन् दह्याचे हंडे +भरून घेऊन गवळणी गडाच्या वाटेला लागल्या होत्या. गडाच्या जगदीश्वर-भवानी +टोकाकडून, बाजारपेठेकडून येणारी माणसे आणि महादरवाज्याकडून गड चढून येणारी +माणसे होळीच्या माळापाशी एकत्र येऊन नगारखान्याच्या दिशेने झपाझप पावले उचलत +होती. + होळीच्या माळाच्या दक्षिणेला असलेल्या एका प्रचंड या नगारखान्याची +भव्य इमारत उभी होती. वास्तविक हा एक प्रचंड मोठा दरवाजाच होता. हत्तीवरच्या + अंबारीवरचा झेंडा जराही न वाकवता हत्तीला दरवाजातून जाता येईल इतका हा दरवाजा उंच +होता. दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना मंगलमय अशी कमलपुष्पे कोरली होती. अन् त्यांच्याही +बाजूला दोन अप्रतिम शिल्पं खोदली होती. एका वनराजाने आपल्या चारही पायांखाली चार +हत्ती चिरडले असून शेपटीत एका हत्तीला पकडले आहे. असं वाटतं की जणू हा वनराज +सह्याद्रीच्या एका उत्तुंग कड्यावर उभा आहे आणि पाहता पाहता तो त्या शेपटीतल्या हत्तीला +खालच्या खोल दरीत भिरकावून देईल. महादरवाज्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर झुली पांघरलेले, +दातांच्या अग्रभागी मोत्यांच्या घसघशीत माळा लावलेले दोन 'गजराज' उभे होते. + बालेकिल्ल्यातल्या राजवाड्यात गोड धांदल उडाली होती. राजवाड्याच्या द्वारांवरती +तोरणे लागली होती. स्वस्तिकादी शुभचिन्हे उमटवण्यात आली होती. नगारखान्यातला +चौघडा लागला. त्यातच सनईचे सूर मिसळले जाऊ लागले. राजवाड्यातल्या देवघरात +आई भवानीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. राजपुरोहित मंत्र म्हणत होते अन् समोर महाराष्ट्राचे +महाभाग्य, श्री शिवाजी महाराज वीरासन घालून बसले होते. बाळंभट्ट आर्विकरांच्या पाया +पडून महाराज राजवाड्याच्या आतल्या भागात गेले. इकडे राजवाड्यातल्या एका प्रशस्त +महालात गागाभट्ट, महाराजांचे राजोपाध्ये व इतर वैदिक ब्राह्मण वेदमंत्रांचे घोष करू लागले. +महाराजांचे मोरोपंत पिंगळे, ब���ळाजीपंत, अण्णाजी दत्तो, रामचंद्रपंत अमात्य, रघुनाथपंत +पंडित इ. अष्टप्रधान तयारीनिशी राजवाड्यात दाखल झाले. मावळचे मुख्य अन् मातब्बर +<<< + +देशमुख आणि देशपांडेही आले. महालात तीन सुवर्णचौरंग मांडण्यात आले होते. राजपुत्र +संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाईंसोबत महाराज महालात प्रवेशले. त्यांनी सोवळे +नेसले होते. गागाभट्टांनी अष्टप्रधानांना वेगवेगळ्या नियोजित ठिकाणी उभे राहण्यास +सांगितले. त्याप्रमाणे मोरोपंत पेशवे तुपाने भरलेला सुवर्णकलश घेऊन महाराजांच्या पूर्वेस, +रामचंद्रपंत अमात्य दह्याने भरलेला ताम्रकलश घेऊन पश्चिमेस, रघुनाथ पंडितराव मधाने +भरलेला सुवर्णकलश घेऊन उत्तरेस तर दक्षिणेस हंबीरराव मोहिते सरसेनापती दुधाने +भरलेला रौप्यकलश घेऊन उभे राहिले. महाराजांच्या आग्नेयेला अण्णाजी दत्तो सचिव छत्र +घेऊन उभे होते. नैऋत्येस त्र्यंबकपंत डबीर पंखा घेऊन उभे होते. वायव्येला दत्ताजीपंत मंत्री +मोर्चेल घेऊन तर ईशान्येस निराजी रावजी न्यायाधीश दुसरे मोर्चेल धरून उभे होते. जवळच +निरनिराळ्या हंड्यांमध्ये तीनही सागरांचे जल, सप्तगंगांचे जल साठवून ठेवले होते. +राजपुरोहित मंत्र म्हणत होते. गागाभट्टांनी महाराजांना, युवराजांना अन् महाराणींना पवित्र +जलाचा अभिषेक घालायला सुरुवात केली. सप्तगंगांच्या पाठोपाठ समुद्रस्नानही झाले. +उष्णोदकांचे घट महाराजांच्या मस्तकावर रीते होऊ लागले. त्यापाठोपाठ गागाभट्टांनी +अष्टप्रधानांच्या हातातील दूध, दही, तूप, मध अशा पदार्थांचीही अभिषेकधार धरली. प्रत्येक +अभिषेक होताना उच्चस्वरात मंत्रघोष कानी पडत होता. काही वेळातच 'अभिषेक' पूर्ण +झाला. गागाभट्टांनी महाराजांना राजवेश परिधान करून राजसभेत यायला सांगितले. +'राज्याभिषेक' पूर्ण झाला. आता होणार होते 'सिंहासनारोहण'. + अभिषेक झाल्यावर महाराज आपल्या महालात आले. त्यांनी आपला राजवेश परिधान +केला. यावेळेस महाराजांनी आपल्या अंगात पांढऱ्या शुभ्र रंगाचा अंगरखा घातला होता. +पायी पांढरी सुरवार घातली होती. डोक्यावर जिरेटोप व त्यावर केशरी रंगाचा मंदिल अथवा +किमाँश बांधलेला होता. मंदिलाच्या टोकातून अत्यंत तेजस्वी अशा मोत्यांचा तुरा व मोत्यांची +माळ खोवलेली होती. हाताच्या अस्तन्या सारलेल्या होत्या. मनगटात सुवर्णाची पोहोची व +सुवर्णकडी शोभत होती. कमरेला केशरी दुपट्टा बांधलेला होता, अन् त्यातच महाराजांच्या +लाडक्या 'भवानी' फिरंगीचा गोफ अडकवला होता. गळ्यात मोत्यांच्या माळा होत्या अन् +त्यावर पांढऱ्या शुभ्र कवड्यांची जगदंबा भवानीची माळ होती. महाराजांच्या कपाळावर +कुंकवाची चंद्रकोर रेखाटली होती. त्यावर 'शिवगंध' होते. कानात मोत्यांचा चौकडा झुलत +होता. असे ते अत्यंत तेजस्वी 'शिवरूप' होते. महाराज राजवाड्याच्या अंगणात आले. +महाराणी सोयराबाईसाहेब आणि युवराज संभाजीराजेही आले. नंतर तिघांनी कुलदेवतेचे +दर्शन घेतले व आऊसाहेब जिजाऊंच्या पाया पडून महाराज पालखी दरवाज्याने +होळीमाळावरून राजसभेच्या महादरवाज्याकडे निघाले. महाराजांच्या पाठीमागे अष्टप्रधान +मंडळ व खाशी माणसे होती. महाराज राजसभेच्या महाद्वारापाशी येताच शृंगारून ठेवलेल्या +त्या शुभलक्षणी हत्तींनी सोंड उंचावून महाराजांना वंदन केलं. त्याचबरोबर तिथे उभ्या +असलेल्या पहारेकऱ्यांनी आणि हाती सुवर्णदंड घेतलेल्या प्रतिहारींनी महाराजांना मुजरे केले. +त्यांचे मुजरे स्वीकारून महाराज त्या उत्तुंग अशा महाद्वारातून आत प्रवेशले. महाराजांनी +महाद्वारात पाऊल ठेवताच वरच्या नगारखान्यातला चौघडा झणाणू लागला. +<<< + +नौबतीवर टिपरी पडली. आतला राजसभेचा प्राकार तर झेंडूच्या फुलासारखा माणसांनी +गच्च भरून गेला होता. प्रत्येकजण नटून-थटून आपल्या राजाचे दर्शन घ्यायला उत्सुक होता. +राजसभेच्या दरवाज्याच्या बरोबर समोर, सरळ रेषेत एक उंच चौथरा बांधण्यात आला होता. +त्या चौथऱ्यावर सुंदर नक्षीकाम केलेल्या अष्टखांबांची सुंदर मेघडंबरी होती. या मेघडंबरीच्या +खाली बत्तीस मण सोन्याचे सिंहासन झळाळत होते. सिंहासनावर अनेक शुभचिन्हे कोरली +होती. त्याचबरोबर राजसभेच्या प्रचंड गर्दीतही चौथऱ्यावरचे भाल्याच्या टोकांवर तोललेले +'न्याय प्रतिष्ठा' जपणारे सोन्याचे तराजू, दुसऱ्या भाल्यांच्या टोकांवर असलेला उघड्या +दातांचा सोन्याचा मासा म्हणजेच 'माहिमरातब'. घोडदळाचे सामर्थ्य दर्शवणारे अखपुच्छ +असणारे भाले, सोन्याचा राजदंड, नक्षत्रमाळा अन् मौक्तिकमाळा, शिवाय अनेक मोर्चेले, +पंखे, चवऱ्या, अब्दागिऱ्या इ. राजचिन्हे उठून दिसत होती. सिंहासनावरच्या मेघडंबरीच्या +खांबांना सुंदर कनाती आणि झालरदार पड़दे ���ावण्यात आले होते. + राजसभेच्या महाद्वारापासून सिंहासन चौथऱ्याच्या पायऱ्यांपर्यंत लाल मखमली +पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या मार्गावर बरोबर मध्यभागी हिरोजी इंदुलकरांनी एक +सुंदर कारंज तयार केलं होतं. जेणेकरून महाराज या मार्गावरून जाताना थंडगार पाण्याचे +सहस्रावधी तुषार महाराजांवर फवारले जातील. समोरच्या राज सिंहासनापाशी गागाभट्ट, +बाळंभट्ट राजोपाध्ये व इतर ब्रह्मवृंद सगळ्या तयारीनिशी आले होते. पहाटेची रम्य वेळ होती. +पश्चिमेकडे अंधाराचे गडद साम्राज्य पसले असताना पूर्व क्षितिजावर हळूहळू पांढरा रंग +पसरू लागला होता. राज्यारोहणाचा मुहूर्त जवळ येत चालला होता. साऱ्या सभेचे लक्ष +आता महाराजांच्या येण्याकडे लागले होते. इतक्यात नगारे वाजू लागले. राजसभेच्या माना +उंचावल्या गेल्या. प्रथम दोन प्रतिहारी राजसभेत प्रवेशले आणि त्यांच्यामागून एका हातात +धनुष्य घेऊन अन् दुसऱ्या हातात सोन्याची विष्णूची मूर्ती घेतलेले महाराज राजसभेत +प्रवेशले. शांत, धीरगंभीर पावले टाकत, महाराज अष्टप्रधानांसह सिंहासन चौथऱ्याजवळ +येऊन पोहोचले. सिंहासन चौथऱ्याच्या पायथ्याला उभे राहून त्या सोपानाकडे पाहताना +महाराजांना काय वाटलं असेल? 'आजपर्यंत आपण केलेल्या प्रवासाचा सोपान आजच्या +दिवसापर्यंत येऊन पोहोचेपर्यंत आपल्या कितीतरी जिवलगांनी प्राणांच्या आहुत्या दिल्या. हा +अभिषेक माझा नाही, त्यांचा आहे.' महाराजांना त्या साऱ्या सवंगड्यांचं स्मरण नक्कीच +झालं असेल. सावकाश पायऱ्या चढून महाराज सिंहासन चौथऱ्यावर पोहोचले. गागाभट्टांनी +आपल्या हातातला सोन्याचा राजदंड महाराजांच्या हातात दिला. महाराजांनी शपथ घेतली, +"या पुत्र म्हणून मी या भूमीचं व प्रजेचं पालन करीन. जर मला करणं +शक्य झालं नाही तर या सिंहासनाचा स्वतःहून त्याग करीन." शपथविधी पूर्ण झाला. +गागाभट्टांनी मंत्रोच्चारांचा घोष करत महाराजांना सिंहासनावर बसण्याची खूप केली. +महाराजांनी प्रथम सिंहासनाला वंदन केलं. आपल्या पायातल्या मोजड्या एका बाजूला +काढून ठेवल्या. आपली अत्यंत आवडीची 'भवानी फिरंग' महाराजांच्या जवळच असलेल्या +विश्वासराव गायकवाड या सरदाराच्या हातात दिली आणि मग राजसभेकडे तोंड करून +पाठमोरे जात सिंहासनाला पदस्पर्श जराही न करता महाराज सिंहासनावर आ��नस्थ झाले. +<<< + + "दक्षिणची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहिली पाहिजे !!! " + - छत्रपती शिवाजी महाराज + + दि. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. अन् +हिंदुस्थानातीलच नव्हे तर हिंदुस्थानाबाहेरीलही तमाम परकीय सत्ताधीशांचे आणि +सुलतानांचे डोळे खाड्कन उघडले. मोगल बादशहा मोईउद्दीन 'औरंगजेब' तर फारच +खवळला. तो तख्तावर बसल्यापासून शिवाजीची ही ‘शरारत' रोखण्याचे प्रयत्न करत होता. +शिवाजीवर सोडलेले सारे सरदार मार खाऊनच परत येत होते. एकट्या मिर्झाराजे +जयसिंहांनी चांगली कामगिरी केली म्हणावं तर शिवाजीने येऊन खुद्द +आपल्याला हातोहात बनवलं !! आता आपण स्वतः जातीनिशी दख्खनेत उतरून, मोंगल +सामर्थ्याच्या संपूर्ण शक्तिनिशी शिवाजीचे हे मूळ कायमचे उखडून टाकायला हवे हे +औरंगजेबाला कळून चुकले होते. आजपर्यंत शिवाजी हा एक मामूली जहागीरदार बंडखोर +होता. परंतु काशीच्या काफर पंडिताने त्याला राजा केलं, सिंहासन दिलं. इ. स. १५७५ च्या +विजयनगरम्च्या अस्ताबरोबरच नष्ट झालेलं हिंदूंचं साम्राज्य आज पुन्हा बरोबर शंभर +वर्षांनंतर झळाळून उठलं होतं. अर्थात या साऱ्या गोष्टी इकडे शिवाजी महाराजांनाही समजत +होत्याच! खवळलेला औरंगजेब आता लवकरात लवकर दख्खनवर चाल करून येणार हे +महाराज पुरते जाणून होते. + या वेळेस दख्खनेत स्वराज्याच्या व्यतिरिक्त विजापूरची आदिलशाही आणि +गोवळकोंड्याची कुतुबशाही या दोन 'बहमनी' शाह्या अजूनही जिवंत होत्या. औरंगजेब +दख्खनेत उतरण्याची चिन्हं दिसू लागल्याने, अन् त्याच्याशी लढणे हे एकट्या +मराठ्यांना शक्य नसल्याने महाराजांनी राजकारणाचा एक नवीनच डाव मांडला. औरंग हा +जरी मुसलमान असला तरीही, कितीही केलं तरी तो तैमूरलंग अन् चंगिझखानाचा वंशज +होता. तो 'सुन्नी' पंथीय मुसलमान होता. दख्खनी, 'शिया' पंथीय मुसलमानांच्या बदल्यात +त्याच्या मनात प्रचंड वैरभाव होताच. महाराजांनी नेमका याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचे +ठरवले. या दोन्ही शाह्यांना सोबत घेऊन मोगलांचे बस्तान हिंदुस्थानातून कायमचे उठवण्याचा +डाव महाराजांनी मांडला. + कुतुबशहाच्या दरबारात महाराजांचे प्रल्हाद निराजी नाशिककर या नावाचे एक वकील +होते. त्यांनी महाराजांचे सारे म्हणणे कुतुबशहाला सांगितले. या कुतुबशहाचे नाव ���ोते अबुल +हसन कुत्बशाह ऊर्फ 'तानाशाह'. या कुतुबशहाचा सारा कारभार त्याचे वजीर मादण्णापंत +पिंगळी हे अत्यंत हुशार ब्राह्मण पाहात होते. एखाद्या सुलतानीत बादशाही वजिरी हिंदू अन् +त्यातूनही ब्राह्मणाला देण्याची घटना अपवादात्मक होती. मोंगल बादशहा अकबराचा वजीर +पंडित 'महेश दास' ऊर्फ 'बिरबल' याच्यानंतर मादण्णापंतांचे हे एकमेवाद्वितीय उदाहरण +होते. बादशहाने मादण्णापंतांना 'सूर्यप्रकाशराव' असा किताब दिला होता. मादण्णापंतांनी +महाराजांचे हे राजकारण कुतुबशहाला समजावून सांगितले आणि कुतुबशहाने मोठ्या +<<< + +आनंदाने महाराजांना भेटण्याची तयारी दर्शवली. + दि. ६ ऑक्टोबर १६७६ या दिवशी विजयादशमी होती. याच दिवशी महाराजांनी 'दक्षिण +दिग्विजयार्थ' सीमोल्लंघन केलं. या दक्षिणी पंथांच्या एकजुटीत एक अडसर मात्र अजूनही +कायम होता. विजापूरच्या आदिलशाहीत दख्खनी मुसलमानांच्या तुलनेत हिंदुस्थानी +पठाणांचंच प्राबल्य अधिक होतं. यावेळी विजापूरचा वजीरही एक पठाणच होता. त्याचं नाव +होतं 'बहलोलखान'. त्यामुळे प्रथम दख्खनेतून या पठाणांना हाकलून देऊन मग +औरंगजेबाकडे पहाणे गरजेचे होते. महाराज भागानगर-गोवळकोंड्याकडे जात असतानाच +कर्नाटकच्या कोप्पळ प्रांतात विजापूरच्या हुसेनखान मियाना या पठाणाशी मराठ्यांची गाठ +पडली. या युद्धात सर्जेराव जेध्यांचा तरुण पुत्र नागोजी मारला गेला, परंतु पठाणांचा मात्र +जबरदस्त पराभव झाला. खुद्द हुसेनखान मियाना कैद झाला !! + फेब्रुवारी १६७७ च्या पहिल्या आठवड्यातच महाराजांची स्वारी भागानगरात प्रवेशती +झाली. या पराक्रमी राजाचे तेलंगणच्या रयतेने आणि खुद्द कुतुबशहांनी जंगी स्वागत केले. +महाराजांसोबत या वेळी सुमारे पंचवीस हजार मराठी फौज होती. भागानगरच्या मुक्कामी +मराठेशाही आणि कुतुबशाही यांच्यात एक महत्त्वाचा तह झाला. तो तहनामा थोडक्यात +असा- + १) भागानगरच्या मुक्कामी मराठी सैन्याच्या खर्चासाठी कुतुबशहांनी साडेचार लक्ष रु. +रोख द्यावेत. + २) मराठ्यांच्या दक्षिणेकडील मोहिमेमध्ये कुतुबशाहीचे चार हजार पायदळ व एक हजार +घोडदळ मराठ्यांच्या सोबत असावे. + ३) कुतुबशाही सैन्यावर कुतुबशाहीच सेनापती मिर्झा मुहम्मद अमिन सरलष्कर असेल. +त्याचा खर्च, दारूगोळा इ. बादशहांनी पुरवावा. + ४) कुतुबशाहीने पूर्वी ठर���्याप्रमाणे दरसाल एक लक्ष रु. खंडणी मराठ्यांना देत जावी. + ५) पूर्वीप्रमाणेच मराठी वकील (प्रल्हाद निराजी नाशिककर) कायम कुतुबशाही +दरबारात रहावा. + ६) दख्खनच्या मोहिमेत जिंकला जाणारा जो भाग पूर्वी शहाजीराजांकडे नसेल असा +मुलुख कुतुबशाहीच्या ताब्यात असावा. + ७) उभय पक्षांनी कायम एकरूप राहून पठाण आणि मोगलांचा बिमोड करावा. + महाराज आणि कुतुबशहा यांच्यात हा अत्यंत महत्त्वाचा करार झाला. यानंतर दि. १० +मार्च १६७७ रोजी महाराजांनी पुढील मोहिमेकरिता भागानगर (सध्याचे हैदराबाद) सोडले. +या वेळी त्यांच्याबरोबर तहात ठरल्याप्रमाणे कुतुबशाही सैन्यही होते. + कुतुबशाहीच्या मुक्कामातच महाराजांनी दक्षिणी पंथाच्या एकजुटीकरिता अनेक +संस्थानिक, मांडलिक, सरदार इत्यादींना पत्रे पाठवली. परंतु, दुर्दैवाने महाराजांना त्याचा +काहीही परिणाम दिसून आला नाही. यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या आणि +सम्राट कृष्णदेवरायाने बांधलेल्या पवित्र श्री शैल मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन थेट चंदीच्या +<<< + +रोखाने निघाले. चंदीचा (जिंजी) हा प्रचंड किल्ला विजापूरकरांकडे होता. महाराजांनी थेट +किल्लेदार नसिर मुहम्मदला वश केले आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता हा प्रचंड किल्ला +स्वराज्यात दाखल झाला. चंदीच्या या विजयानंतर वेल्लोरला वेढा पडला. पण किल्ला दाद +देईना, तेव्हा फौज वेल्लोरला ठेवून (सुमारे दोन हजार घोडदळ व पाच हजार पायदळ) +महाराज तंजावरच्या रोखाने निघाले. + तंजावरच्या वाटेवर असतानाच तिरूवाडी प्रांतात विजापूरच्या शेरखान लोदी या +पठाणाचा महाराजांनी समाचार घेतला. दि. ६ जुलै १६७७ या दिवशी शेरखानाचा अत्यंत +दारुण पराभव झाला. + शेरखानाच्या या प्रचंड पराभवाची इतकी धास्त विजापुरी सैन्याने घेतली की, या +प्रांतातील वालदूर, तेवेनापट्टणम्, बाणागिरी इ. किल्लेही विनासायास मराठ्यांना मिळाले. +शेवटी शेरखानाने अत्यंत बिकट अवस्थेत महाराजांशी तह केला आणि अखेर १६७७ च्या +पावसाळ्याच्या सुरुवातीला महाराज तंजावरमध्ये दाखल झाले. महाराजांनी एकोजीराजे +भोसले (माता तुकाबाई), संताजीराजे (माता नरसाबाई) या आपल्या सावत्र बंधूंची भेट +घेतली. यांच्यासोबतच महाराजांनी भिवजीराजे, प्रतापजीराजे, कोयाजीराजे +(शहाजीराजांच्या नाटकशाळांचे पुत्र) यांच्याह��� भेटी घेतल्या आणि महाराजांनी एकोजी +राजांपाशी विषय काढलाच !- + "आपण आम्हांस सामील व्हावे. ते जमत नसेलच तर शहाजी राजांच्या दौलतीपैकी +निम्मी दौलत वाटून ती आम्हांस द्यावी. आजपर्यंत आम्ही काही मागितले नाही. तुम्ही +आपल्या मनाप्रमाणे सारी वहिवाट केली. आता तुम्ही स्वतः मिळवलेल्या दौलतीतले आम्हास +काही नको, परंतु वडिलांच्या दौलतीतील निम्मा हिस्सा आम्हास द्यावा!" + परंतु एकोजीराजांच्या मनास ते काही केल्या पटेना. अन् एके दिवशी ते महाराजांना न +सांगताच छावणीतून अक्षरशः पळून गेले. का? तर महाराज त्यांना कैद करतील म्हणून !! हे +पाहून महाराजांना फार वाईट वाटले. ते उद्वेगाने उद्गारले ... + ' ... धाकुटे ते धाकुटेच! बुद्धीही धाकुटेपणायोग्य केली. महाराजांचे एक सावत्र बंधू +संताजीराजे महाराजांना येऊन मिळाले. परंतु, एकोजीराजे ऐकेनात हे पाहून महाराजांनी +कोलेरन नदीच्या उत्तरेकडचा, एकोजीराजांचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. पुढे होसकोट, +कोलार, बाळापूर, कावेरीपट्टणम्, वृद्धाचलम् इ. प्रदेश जिंकून महाराज उत्तरेकडे येत +असतानाच, इकडे एकोजीराजांनी कर्नाटकातच असलेल्या संताजीरावांवर प्रचंड हल्ला +चढवून संताजीराजांना पराभूत केले. परंतु माघार घेतलेल्या संताजीराजांनी आणि +रघुनाथपंत हणमंत्यांनी ऐन मध्यरात्रीच एकोजीराजांवर हल्ला चढवला. दिवसभरच्या +थकव्याने विश्रांती घेत असलेल्या तंजावरी फौजेचा पाडाव झाला. यात एक हजार +आणि प्रचंड लूट संताजीराजांना मिळाली. + एकोजीराजांच्या पराभवामुळे महाराजांनाही दुःख हे झालेच. एकोजी राजांना आता फार +उदासीनता आली होती. महाराजांनी मोठ्या उदार मनाने चंदी नजीकचा सात लक्ष रु. +<<< + + उत्पन्नाचा मुलुख एकोजीराजांना देऊन टाकला आणि एक अत्यंत रसाळ पत्र लिहून राजांनी + समजूत काढली. महाराज म्हणतात, + " ... आम्ही तुम्हांस वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची आहे? याउपरी सहसा + वैराग्य न धरिता मनातून विषण्णता (काढून) कालक्रमण करीत जाणे ... रिकामे बैसोन + लोकाहाती नाचीज खावून काल व्यर्थ न गमावणे. कार्यप्रयोजनाचे दिवस हे आहेती. वैराग्य + उतारवयी कराल ते आज उद्योग करून आम्हासही तमासे दाखविणे ... " + यानंतर कर्नाटकातील विजापूरकरांचाच गदग प्रांत काबीज करून जून १६७८ मध्ये +महाराज परतले. +<<< + + महाराज दि. ६ ऑक्टोबर १६७६ या दिवशी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले आणि +एक महिन्यातच, दि. १ नोव्हेंबर १६७६ या दिवशी संभाजीराजे पत्नी शृंगारपुरात +येऊन राहिले. महाराजांनी युवराज संभाजीराजांना शृंगारपूर-प्रभावळी या प्रांताचे सुभेदार +म्हणून नेमले होते. वास्तविक संभाजीराजे हे युवराज होते. राजांच्या माघारी राजधानीत +राहून राज्यकारभार सांभाळावा युवराजांचे प्रमुख कर्तव्य असते. परंतु, संभाजीराजांच्या +उतावळ्या अन् अविवेकी स्वभावामुळे त्यांचे सरकारकूनांशी पटत नसे. अशातच +राज्याभिषेकानंतर सोयराबाईंची सातमहालातून अनेक 'जनानी राजकारणे' सुरू +असल्यामुळेच असेल बहुदा पण युवराज संभाजीराजे शृंगारपुरात येऊन स्थायिक झाले. +संभाजीराजे हे संस्कृत पंडित अन् उत्तम कवीही असल्याने त्यांचे मन या ठिकाणी रमणे +स्वाभाविकच होते. संभाजीराजांच्या सेवेत केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कलश +यांसारखे संस्कृत पंडित सतत हजर होते. दिवस जात होते. शृंगारपूरच्या मुक्कामी +संभाजीराजांनी 'नायिकाभेद' हे अष्टनायिकांचे स्वभाव-भेद सांगणारं हिंदी काव्य आणि +'बुधभुषणम्' या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केली. येथून जवळच शिर्क्यांचा होता. शिर्के +म्हणजे शंभूराजांचं सासर! + दिवस जात होते. दि. ४ सप्टेंबर १६७७ या दिवशी संभाजीराजांना येसूबाईसाहेबांच्या +पोटी कन्यारत्न झाले. या कन्येचे नाव ठेवण्यात आले 'भवानी'. मधल्या काळात अनेक +लहान-मोठ्या कारणांवरून सरकारकून आणि युवराजांच्यातला वाद अत्यंत विकोपाला गेला +होता. शिवाजी महाराज रायगडावर आले अन् त्यांना या साऱ्या घटना समजल्या. +महाराजांना युवराजांबद्दल काळजी वाटू लागली होती. त्यांनी युवराजांना एखाद्या पवित्र +वातावरणात, साधूंच्या, संतांच्या सहवासात ठेवावे असा विचार केला आणि +त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवून आज्ञा केली, 'आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या +सहवासात राहण्यास सज्जनगड़ी जावे. त्यांचा उपदेश घ्यावा.' अन् मनातून रूष्ट झालेले +संभाजीराजे नाईलाजानेच डिसेंबर १६७८ मध्ये दाखल झाले. + संभाजीराजे सज्जनगडावर आले तेव्हा समर्थ तेथे नव्हते. युवराजांच्या मनाची घालमेल +अधिकच वाढली. 'आतापर्यंत सरकारकून आणि सोयराबाईच विरोधात होत्या. परंतु, आता +आबासाहेब शिवछत्रपतींना देखील आपण 'बिघडलो' असे वाटू लागले आणि म्हणूनच +त्यांनी आपल्याला सज्जनगडावर पाठवले' या एकाच विचाराने युवराजांना हैराण केले +आणि अखेर दि. १३ डिसेंबर १६७८ या दिवशी युवराज संभाजीराजे मोगलांचा सरलष्कर, +सालार-ए-दख्खन दिलेरखान पठाणाकडे जाऊन मिळाले !! + युवराज मनात बंडाची भावना घेऊन दिलेरकडे गेले नव्हते. त्यात आपणही पराक्रमी +आहोत हे शिवाजी महाराज आणि इतर कारकुनांना दाखवून देण्याची भावना होती. +परंतु युवराजांच्या या भाबडेपणाचा फायदा दिलेरखान घेतल्याशिवाय कसा राहील? त्याने +संभाजीराजांना पुढे करून महाराजांचा साताऱ्याजवळचा 'भूपाळगड' हा किल्ला घेतला. +यानंतर दिलेरने फौजेचा मोहरा वळवला दार-उस-सल्तनत विजापूरकडे! विजापूरचा पूर्वीचा +<<< + + वजीर पठाण बहलोलखान हा दि. २३ डिसेंबर १६७७ रोजी मरण पावला होता. त्यामुळे + आता 'सिद्दी मसूद' हा आदिलशहाचा वजीर होता. याच मसूदने (जौहरचा जावई) पूर्वी +महाराजांना विशाळगडच्या वाटेवर पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. परंतु आता हाच + मसूद दिलेरला प्रचंड घाबरला अन् त्याने शिवाजी महाराजांना मदतीची साद घातली. + आदिलशहाने महाराजांनी आजपर्यंत घेतलेल्या शाही मुलखाला 'अधिकृत' परवानगीच +देऊन टाकली. महाराजांच्या 'दक्षिणी पंथाच्या एकजुटीतला' दुसरा महत्त्वाचा दुवादेखील + आज साध्य झाला. महाराजांनी आदिलशहाला निर्धास्त राहायला सांगितले आणि त्यांनी + गनिमीकाव्याने दिलेरची अक्षरशः लांडगेतोड सुरू केली. शेवटी विजापूरचा नाद सोडून दि. + १४ नोव्हेंबर १६७९ रोजी दिलेरच्या फौजा तिकोट्याच्या रोखाने वळल्या. + तिकोट्यात आल्यानंतर तेथील हिंदू प्रजेचे दिलेरने अत्यंत हाल सुरू केले. हे सहन न + झाल्यानेच संभाजीराजांचे दिलेरशी अत्यंत कटू खटके अन् संभाजीराजांना आपली + चूक कळून आली. अशातच औरंगजेबाचा 'संभाजीला कैद करून दिल्लीस पाठवा' या + आशयाचा गुप्त खलिता दिलेरला मिळाल्याच्या बातम्या संभाजी महाराजांना समजल्या. + आता मात्र संभाजीराजांचे डोळे उघडले आणि अखेर दि. २० नोव्हेंबर १६७९ या + दिवशी संभाजीराजे मोंगल छावणीतून पळाले आणि थेट विजापूर गाठले आणि तेथून दि. ४ + डिसेंबर १६७९ रोजी स्वराज्यात पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. + महाराजांनीही मग मोठ्या उदारमनाने आपल्या पुत्राला मायेने पोटाशी धरले आणि + समजावले. संभाजीराजांनीही मोठ्या मनाच्या समजुतीने महाराजांना म्हटले, + 'आपणास साहेबांच्या पायाची जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे (शिवाजी + महाराजांच्या) पायाचे चिंतन करून राहीन.' यानंतर महाराजांनी युवराजांना पुन्हा + अधिकारात घेऊन पन्हाळा प्रांतावर नेमले आणि महाराज परतले. + महाराज रायगडावर आल्यानंतर राजाराम महाराजांची मुंज अन् लग्न उरकण्याचा त्यांनी + निश्चय केला. दि. १५ मार्च १६८० या दिवशी राजारामांचे लग्न सरसेनापती कै. प्रतापराव + गुजर यांची कन्या जानकीबाई हिच्याशी लावून देण्यात आले. + दि. २० मार्च १६८० या दिवशी सूर्यग्रहण होते. महाराजांचे मन आणि शरीर आधीच + थकले होते. अशातच महाराज कदाचित ग्रहणकाळात करण्यात येणारे स्नानविधी करण्यास + गंगासागराच्या थंड पाण्यात उतरले असावेत. कारण ग्रहणानंतर दोन दिवसातच महाराजांना + प्रचंड ताप भरला. दिवसेंदिवस ताप वाढतच चालला होता. + - आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा (हनुमान जयंती), दि. ३ एप्रिल १६८० चा दिवस उजाडला. + महाराजांनी साऱ्या सवंगड्यांना जवळ बोलवून आपल्या मागे राज्य कसे सांभाळावे ते + सांगितले. सर्व जण अत्यंत दुःखी होते. महाराज अत्यंत शांतपणे म्हणाले, + "आपली आयुष्याची अवधी झाली. आपण आता कैलासास श्रींचे दर्शनास जाणार!" +यानंतर महाराजांनी शेवटची निरवानिरव केली. सर्वांना बाहेर बसण्यास सांगितले. + - आणि भर मध्यान्ही आवस झाली. दुपारी बाराच्या सुमारास महाराजांनी हे जग सोडले. +<<< + +महाराष्ट्र पोरका झाला. + शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पहावा हा प्रश्न साहजिकच उभा +राहिला. अर्थात परंपरा आणि रितीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचित +होते. परंतु, संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेरखान +प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच +सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव +यांनी वैशाख शु.३, दि. २१ एप्रिल १६८० रोजी राजारामांना मंचकावर बसवले (राज्याभिषेक +केला नाही!). याचवेळी मोरोपंत आणि अण्णाजी यांनी संभाजीराजे पुन्हा बंड करू नये +म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगड़ाकडे सैन्यासह कूच केले. स्वराज्याचे सरसेनापती +हंबीरराव मोहिते हे मात्र प्रथमपासूनच संभाजीराजांच्या पक्षात ह���ते. ते सरसेनापती +असल्याने फौजेचे वळणही युवराजांकडेच होते. पंत पेशवे आणि सचिव पन्हाळ्याच्या +वाटेवर असतानाच कराड प्रांतात तळबीडजवळ हंबीररावांनी दोघांनाही कैद केले. +संभाजीराजांचे बळ होते. + दि. २६ जून १६८० रोजी संभाजीराजांनी येसाजी कंक आणि रायगडचा किल्लेदार +चांगोजी काटकर यांच्या मदतीने रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि कारभार सुरू केला. +वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी आपल्या पुत्राला क्षमाच केली होती. +तरीही बहुतेकांच्या मनात अजूनही संदेह होताच. कारभार सुरू झाल्यानंतर श्री +समर्थ रामदासस्वामी यांनी शंभूराजांना त्यांच्या थोर पित्याची आठवण करून देत +राज्यकारभार नेमका कसा करावा याकरिता एक विस्तृत पत्रच पाठवले. ते पत्र असे - + + अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे । + तजवीज करीत बैसावे । येकांत स्थळी ।। + काही उग्रस्थिति सांडावी । काही सौम्यता धरावी। + चिंता पराची लागावी । अंतर्यामी ।। + मागील अपराध क्षमा करावे। कारभारी हाती धरावे। + सुखी करुन कामाकडे ।। + पाटातील तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना। + तैसे जनांच्या मना । कळले पाहिजे ।। + जनांचा प्रवाह चालीला । म्हणजे कार्यभाग आटोपला । + जन ठायी ठायी तुंबला । म्हणीजे ते खोटे ।। + श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले। + तरी मग जाणावे, फावले । गनिमासी ।। + ऐसे सहसा करू नये । दोघां भांडण तिसऱ्या जाय। + धीर करोन महत्कार्य । समजोन करावे ।। + राजी राखता जग । मग कार्यची लगबग। +<<< + + ऐसी जाणोनी सांग । समाधाने करावी ।। + आरंभीच धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती । + याकारणे समस्ती । बुद्धी शोधावी ।। + सकळ लोक येक करावे । गनिमा निपटुनी + येणे करिता कीर्ति धावे । दिगंतरी ।। + आधी गाजवावे तडाखे । तरी मग भूमंडळ धाके। + पैसे न होता धके । राज्यास होती ।। + समय प्रसंग वोळखावा । राग निपटुनी । + आला तरीं कळो न द्यावा । जनामाजी + राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे येक । + लोकांचे मनामध्ये धाक । उपजोची नयें ।। + बहुत लोक मेळवावे । येक विचारे भरावे । + ���ष्ट करोनी घसरावे । म्लेंच्छांवरी ।। + आहे तितके जतन करावे। पुढे आणिकही मेळवावे + मऱ्हाष्ट्र राज्य करावे । जिकडे ।। + लोके हिंमती धरावी । शर्थीची तरवार करावी + पदवी । पावाल येणे ।। + शिवराजांस आठवावे । जिवीत तृणवत मानावे । + इहलोकी-परलोकी रहावे। कीर्तिरूपें ॥। + शिवराजाचे आठवावे रूप । शिवराजाचा आठवावा प्रताप । + शिवराजाचा आठवावा साक्षेप । या भूमंडळी + शिवराजाचे कैसे बोलणे । शिवराजाचे कैसे चालणे । + शिवराजाची सलगी देणे । कैसी असे ।। + सकळ सुखाचा त्याग । करूनी साधीजे तो योग । + राज्यसाधनेची लगबग । कैसी केली ।। + त्याहून करावे विशेष । तरीच म्हणवावे पुरुष । + याउपरी आता विशेष । काय लिहावे? ।। + श्री समर्थांचा हा उपदेश म्हणजे अंधारात चाचपडणाऱ्या संभाजी राजांकरता नंदादीपच +होता. त्यांनी पूर्वीचे सर्व राग-लोभ विसरून आपल्या विरोधातील दस्त केलेल्या असामींना +कैदेतून मोकळे केले. 'मागील अपराध क्षमा' करून कारभाऱ्यांनाही 'हाती धरीले'. परंतु + दि. १२ ऑक्टोबर १६८०, अश्विन शु. १, स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे + वारले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे करून, संभाजीराजांनी त्यांना पेशवेपद दिले. +निळोपंत हे आता स्वराज्याचे पेशवे बनले. + माघ शु. ७, दि. १४ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांनी +राज्याभिषेक करून घेतला. यानंतर सर्व कारभार सुरळीत सुरू झाला. हे पाहून अन् आपली +<<< + + सारी राजकारणे धुळीस मिळालेली बघून सोयराबाईंनी विष प्राशन करून + आत्महत्या केली. सोयराबाईंच्या या आत्मघातकी कृत्याच्या धक्क्यातून रायगड बाहेर + न तोच एक भयंकर बातमी रायगडावर येऊन धडकली. दि. १३ नोव्हेंबर १६८१ रोजी + खासा औरंगजेब तीन लाख शाही फौजेनिशी बऱ्हाणपुरात येऊन दाखल झाला होता. + शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केव्हा ना केव्हा तरी ही परिस्थिती उद्भवणार + होतीच. संभाजीराजे मोगलाईतून पुन्हा स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना + अखेरचे समजावले होते. खासा औरंगजेब दख्खनेत उतरणार हे महाराजांना ठाऊक + असल्यानेच प्रथम त्यांनी 'दक्षिणी पंथाची एकजूट' करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले + होते. संभाजी महाराजांची आता खरी क��ोटी होती. परंतु, या काळात शिवाजी महाराज, + जिजाऊ साहेबांच्या अधिकाराने उपदेश करणारं असं कोण होतं? होते ना! श्री समर्थ + रामदास स्वामी. परंतु दैवगतीही अशी विचित्र की या महाप्रलयाच्या सुरुवातीसच दि. २२ + जानेवारी १६८२, माघ वद्य. ९ या दिवशी समर्थांनी सज्जनगडावर जिवंतपणी समाधी + घेतली. आता मात्र संभाजी महाराज एकटे पडले अगदी खऱ्या अर्थाने एकाकी पडले! + दि. १८ १६८२ या दिवशी गांगोली या गावात शंभूराजांच्या आणि + येसूबाईंच्या प्रथम पुत्राचा जन्म झाला. आपल्या थोर पित्याच्या स्मरणार्थ संभाजीराजांनी + पुत्राचे नाव ठेवले 'शिवाजी राजे' (हेच पुढे शाहूराजे म्हणून प्रसिद्ध). + दि. १४ एप्रिल १६८५ या दिवशी विजापूरला मोंगली फौजांचा वेढा पडला. रहिमतखान, +रूहुल्लाखान, रणमस्तखान अशा शाही सरदारांनी विजापूरला मोर्चे लावले. वास्तविक + आदिलशाही आणि कुतुबशाही या 'इस्लामी शाह्या' होत्या. तरीही त्या 'दख्खनी' असल्याने, + अन् मुख्य म्हणजे मराठ्यांना साहाय्य करत असल्याने औरंगजेबाने आपला रोख आता + आधी या दोघांकडे वळवला. दि. ११ ऑक्टोबर १६८५ रोजी बादशहाजादा मुअज्जम याने + थेट भागानगरवरच हल्ला चढवला. खुद्द बादशहा अबुल हसन कुत्बशहा भागानगरात होता. + औरंगजेबाने बादशहाची बेगम सरिमाजानी हिला 'मजहब' च्या नावाखाली चिथावले आणि + मादण्णापंत या काफीर पंडिताला दूर करण्याच्या कानपिचक्या दिल्या. या मूर्ख बेगमेने + तिच्या खास खोजामार्फत भागानगरच्या चौकात सर्वांदेखतच मादण्णापंत आणि आकण्णा + यांचे खून करवले. असे केल्याने मोंगल मागे हटतील अशी तिला अपेक्षा होती. परंतु हे दोन + हुशार पंडित कायमचे दूर झालेले पाहताच मुअज्जमने अधिक जोर केला. शेवटी एक कोट + रु. देण्याच्या बदल्यात (बापाशी गद्दारी करून) मुअज्जमने भागानगरचा वेढा उठवला. + दि. १३ सप्टेंबर १६८६ या दिवशी विजापुरी फौजेने हत्यार खाली ठेवले. मोंगली + फौजांनी विजापूर ताब्यात घेतले. खासा सुलतान सिकंदर आदिलशहा कैद झाला. इकडे + मुअज्जमने भागानगरचा वेढा उठवल्याचे कळताच औरंगजेबाने त्याची चांगलीच खरडपट्टी + काढली आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, विजापूर जिंकल्यानंतर केवळ एका + वर्षातच दि. २७ सप्टेंबर १६८७ या दिवशी शाही फौजांनी भागानगरही जिंकले. खासा + कुतुबशहा- अबुल हसन तानाशाह कैद झाला. विजापूरचा सिकंदर आदिलशहा आणि + भागानगरचा तानाशाह कुतुबशहा या दोन्ही शाही कैद्यांना प्रथम अहमदनगरच्या किल्ल्यात +<<< + +अन् नंतर दौलताबादेवर कैदेत ठेवण्याचा हुकूम झाला आणि आता मोंगली फौजांचा संपूर्ण +रोख वळला महाराष्ट्राकडे ... मराठ्यांकडे !! + भागानगर आणि विजापूरचा पाडाव केल्यानंतर औरंगजेब आता आपलं लक्ष पूर्णतः +महाराष्ट्राकडे वळवणार हे तर उघडच होतं. अन् म्हणूनच तो महाराष्ट्राच्या वाटेवर असतानाच +त्याचे खच्चीकरण करण्यासाठी मराठे त्याच्या फौजेवर एकदम हल्ला अन् + करत मागच्या मागे पसार होत. परंतु, अशाच एका छाप्याच्या वेळी वाईजवळ +मोंगल अन् मराठ्यांच्यात चकमक सुरू असतानाच मोंगलांच्या एका जंबुरीयाचा (लहान +तोफेचा) तापलेला गोळा थेट सरसेनापतींच्या, हंबीरराव मोहित्यांच्या छाताडावरच येऊन +आदळला. हंबीरराव जागच्या जागी गतप्राण झाले. हंबीररावांच्या मृत्यूने संभाजीराजांना फार +मोठा धक्का बसला. परंतु, आता शोक करत बसून चालणार नव्हते. राजांनी ताबडतोब +पन्हाळ्याचे किल्लेदार म्हलोजी घोरपडे यांना स्वराज्याची सरनौबती दिली. महाराष्ट्रात +आल्यावर औरंगजेबाचा शाही डेरा पडला अकलूजला !! + औरंगजेब दख्खनेत विजापूर अन् भागानगरच्या मोहिमेवर गुंतला होता, त्या वेळेस +संभाजीराजेही गप्प बसले नव्हते. त्यांनी जंजिरा स्वराज्यात आणण्याची फार खटपट केली. +जंजिरा येत नाही हे पाहताच संभाजीराजांनी अक्षरशः खाडीत भराव घालून तो घेण्याचा +प्रयत्न केला. परंतु, औरंगजेबाच्या आक्रमणाने ती मोहीम फसली. यानंतर संभाजीराजांनी +गोमांतकावर स्वारी केली. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर तर अत्यंत घाबरला होता. त्याने गलबते +तयार ठेवून पोर्तुगालला जाण्याची तयारी ठेवलीच होती. परंतु, या मोहिमेतही संभाजीराजांना +यशाने थोडक्यासाठी गुंगारा दिला. + औरंगजेबाचा अकलूजला तळ पडताच त्याने आपला सरदार आणि वजीर +जाफरखानाचा मुलगा एतिकादखान याला रायगडावर हल्ला करायला पाठवले. अर्थात +रायगड हा काही मातीच्या ढेकळासारखा नव्हता. चांगोजी काटकर नावाचा जबरदस्त +सरदार रायगडाची किल्लेदारी पाहात होता. एतिकादखानाने मोर्चे लावले. या +एतिकादखानाला 'झुल्फिकारखान' अशी पदवी होती. + रायगडाला मोंगलांचा वेढा पडला ही बातमी पन्हाळ्यावर असणाऱ्या संभाजीराजांना +समजली. कोल्हापू��पासून पुण्यापर्यंतच्या मधल्या वाटेवर मोंगल सरदारांच्या छावण्या +पसरल्याने राजे कोकणच्या मार्गाने मार्गस्थ झाले. घाटमाथा उतरून संभाजीराजे +रायगडच्या वाटेवरच संगमेश्वरला एका रात्री मुक्कामासाठी थांबले. राजे उतरले तो देसायांचा +वाडा चांगला बळकट होता. राजांच्या सोबत फक्त पाचशे हत्यारबंद मावळे होते. +औरंगजेबाने ताबडतोब शेख निजाम मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा इख्लासखान दखनी +या दोघांना पाच हजार कडव्या स्वारांसह कोकणात उतरण्यास फर्मावले. + अकलूजच्या तळावरून रात्रीतच निघालेली ही पाच हजारांची फौज पन्हाळगडावरच्या +म्हलोजी घोरपड्यांनी पाहिली. त्यांना काय घडतंय याचा पुसटसा अंदाज आला अन् त्यांनी +लगेच आपले पुत्र संताजी अन् बहिर्जी घोरपडे यांना संभाजीराजांच्या मदतीसाठी पाठवून +दिले. त्याआधी वाऱ्याच्या वेगाने मराठी खबरगीर ही खबर संभाजीराजांकडे पोहोचवणार +<<< + +होते. + दि. ३ फेब्रुवारीची पहाट उजाडली. सरदेसायांच्या वाड्यात कोंबडं आरवायच्या आतच +पहिला मराठी खबरगीर दाखल झाला अन् झोपलेल्या संभाजीराजांना उठवून त्यांनी खबर +पेश केली. 'सरदार मुकर्रबखान फौजेनिशी कोकणात उतरतोय!' राजांना ही बातमी खरी +वाटली नाही. कारण मुकर्रबला उतरण्यासाठी जो रस्ता होता तो अंबाघाट सध्या मराठ्यांच्या +कब्जात होता. अन् अणुस्कुरा घाट उतरून येणे मोंगली सैन्याला या जन्मात तरी शक्य +नव्हते. तो घाटच फार भयानक होता. जरा वेळाने दुसरा खबरगीर आला. त्याने खबर पेश +केली 'शेख मुकर्रबखानाने अणुस्कुराघाट ओलांडला. तो वेगाने संगमेश्वर जवळ करतोय. +सोबतीला शिर्के पण आहेत' ही खबर ऐकताच संभाजीराजे जागे झाले. कारण +एकट्या मुकर्रबला एका रात्रीत अणुस्कुराघाट उतरणे शक्य नव्हते + राजांनी त्या खबरगीराला आपली फौज हुशार करण्यास सांगितले. ते त्याला म्हणाले, +'आत कविराज पूजा करत आहेत. त्यांचं आटोपलं की आम्ही तडक प्रचितगड गाठू!' कवि +कलश आत पूजा करत होते. राजांनी एकदा का प्रचितगड गाठला असता तर ते मुकर्रबला +कधीच सापडू शकणार नव्हते. परंतु इतक्यातच - घात झाला. तिसरा खबरगीर वाड्यात +येऊन पोहोचतो न पोहोचतो तोच वाड्याभवतालच्या मोगली फौजांच्या आरोळ्या +कानी येऊ लागल्या. क्षणार्धात वाडा घेरला गेला. संभाजीराजे आणि कवि कलश हाती +तलवार घेऊन धावले. इतक्यात खालू��� घोरपडे बंधूही आपल्या शेलक्या फौजेनिशी मोगली +फौजेवर तुटून पडले. परंतु, मोंगल फौजेचा जोरच इतका प्रचंड होता की, काही वेळ चकमक +उडाली अन् तोच राजे आणि कलश गराडले गेले. कवी कलश हे संभाजीराजांचे मुख्य प्रधान +होते. त्यांना 'छंदोगामात्य' आणि 'कुलएखत्यार' अशा पदव्या होत्या. मुकर्रबखानाने +दोघांनाही कैद केले अन् झपाट्याने तो अकलूजच्या रोखाने लागला. + संभाजीराजांना मुकर्रबखानाने पकडून आणल्यानंतर औरंगजेब खूप खूष झाला. त्याने +ताबडतोब आपला मोगली तळ बहादूरगडावर हलवण्याचा हुकूम सोडला अन् +संभाजीराजांना आणि कलशांना थेट तुळापूरला नेण्यात फर्मावले. + संभाजीराजे दस्त झाले ही खबर येसूबाईंना समजली. यावेळेस गडावर +मोठ्या अशा त्या एकट्याच होत्या. रडत बसायलाही वेळ नव्हता. गडाला +झुल्फिकारखानाचा वेढा होता. अन् म्हणूनच पुढच्या हालचालींनी लगेच वेग घेतला. दि. १२ +फेब्रुवारी १६८९ या दिवशी राजारामांना मंचकावर बसवण्यात आले. गडावर येसाजी कंक +शिवछत्रपतींचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. मंचकारोहणानंतर लगेचच राजारामांनी रायगड +सोडावा असे ठरले. अन् रात्रीच्या वेळी वाघदरवाज्याने, ज्या बाजूला पहारा सैल होता त्या +बाजूने राजाराम महाराज गड उतरले अन् तडक प्रतापगडला गेले. + - संभाजी राजे आणि कवी कलश यांना तुळापुरात भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या +त्रिवेणी संगमावर लाकडी खोड्यांमध्ये उभे करण्यात आले. प्रत्येक दिवशी त्यांचे अत्यंत +क्रूरपणे हाल हाल करण्यात येत होते. दि. १५ फेब्रुवारी रोजी औरंगजेबाने दोघांच्याही जिभा +उपटून काढण्याचा अन् डोळे काढण्याचा क्रूर हुकूम सोडला, तो हुकूम लगेच प्रत्यक्षातही +<<< + +आला. असेच दिवसांमागून दिवस जात होते आणि शेवटी दि. ११ मार्च १६८९ या दिवशी +फाल्गुन अमावस्याला औरंगजेबाने शेवटचा हुकूम सोडला. मृत्यूदंडाचा !! जल्लादांनी +संभाजीराजांची अन् कवी कलशांची कमळाच्या देठासारखी मान धडापासून कायमची +वेगळी केली. शिवछत्रपतींचा पराक्रमी पुत्र, कवी भूषणाच्या 'सर्जा'चा 'छावा' महाराष्ट्राचा +तरुण छत्रपती हे जग कायमचं सोडून गेला ... + राजाराम महाराज पळून गेले ही बातमी दोन दिवसांनी झुल्फिकारखानाला +समजली. त्याच्या अंगाचा अगदी झाला. त्याने वेढा अजूनच पक्का +आवळला आणि आपली फौज प्रतापगड़ाकडे रामराजांच्या पाठलागावर पाठवली. +अर्थात कधी ना कधी झुल्फिकारखानाला ही बातमी समजणारच हे राजारामांनाही ठाऊक +होतेच. त्यामुळे प्रतापगडावर एक दिवस विश्रांती घेऊन, श्री जगदंबा भवानीचे दर्शन घेऊन +सर्व मंत्री-मुत्सद्दयांसह मसलत करून राजाराम महाराजांनी तिसऱ्या दिवशी प्रतापगड +सोडला आणि थेट चंदी ऊर्फ 'जिंजी' कडे प्रयाण केले. + वेढा पक्का आवळलेला होता. झुल्फिकारखानाला अजूनही मदतीची गरज +आहे (असे वाटल्याने!) म्हणून औरंगजेबाने आणखी काही सैन्य पाठवले. +रायगड ही मराठ्यांची राजधानी होती. श्रीमंत शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक तेथे +झाल्यामुळे ती मराठ्यांच्या तख्ताची जागा होती. ते महाराष्ट्राचे पवित्र 'शिवमंदिर' होते. +मराठ्यांचा आत्मविश्वास उखडून असेल तर रायगड ताब्यात यायला हवा असे +औरंगजेब कायम म्हणत होता. अर्थात रायगड औरंगजेबाला सहजासहजी मिळणे अशक्यच +होते. किल्लेदार चांगोजी काटकर, येसाजी कंक ही मंडळी अत्यंत चिकाटीने गड +होती. गडाच्या सावलीतही मोंगलांचे सैन्य पोहोचू शकत नव्हते. जवळ गेलं तर गडावरून +धाड़कन तोफगोळे येऊन पडत. मग किल्ल्याकडे सरकणाऱ्या मोंगल सैन्याची प्रचंड +धावपळ उड़े. गडावरचे मराठे मात्र मोंगलांची ती तारांबळ पाहून हसत होते. परंतु, आता नऊ +महिने होत आले होते. गडावरची रसदही आता संपत आली होती. अंबारकोठ्या आणि +दारूकोठारं रिती होऊ लागली होती. गड केव्हा ना केव्हा सोडावा लागणारच होता. +राजारामांचीही काही खबर नव्हती. मोंगलांचा वेढा आवळला होता. उगाच मोंगल गडात +'घुसले' तर ते गडावर कत्तली करतील, मराठी स्त्रियांच्या अब्रुचीही किंमत उरणार नाही. +त्यापेक्षा त्याआधीच त्यांच्याशी 'तह' करून मराठ्यांचे जीव वाचवावे असा येसूबाईंनी विचार +केला. अखेरीस सर्वांच्याच विचार विनिमयाने दि. ३ नोव्हेंबर १६८९ या दिवशी मोंगल +सैन्याचे पाय गडाला लागले. येसूबाईंनी गड मोंगलांच्या हवाली केला. परंतु, येसुबाईसाहेब +आणि राजपुत्र शिवाजी हे मात्र अखेरपर्यंत मोंगलांचे कैदी राहणार होते. गडावर शिवाजी +महाराजांची 'सकवारबाई' या नावाची एक पत्नी होती. शिवाय संभाजी राजांची दुर्गाबाई +आणि इतरही काही उपस्त्रिया होत्या. त्या देखील मोंगलांच्या कैदेत गेल्या. राजाराम +महाराजांची पत्नी, सरसेनानी हंबीरराव मोहित्यांची कन्या ��ाराऊ ऊर्फ ताराबाई ही अद्याप +लहानच असल्याने तळबीडला माहेरीच होती. + रायगड पडला. म्हणजे मराठेशाही संपली असे औरंगजेबाला वाटायच्या आतच त्याला +<<< + +मराठ्यांच्या झणझणीत हल्ल्यांचा अनुभव येऊ लागला. राजाराम महाराज जिंजीला गेले +होते. आता 'जिंजी' ही मराठ्यांची नवी राजधानी होती. औरंगजेबाला हे समजताच त्याने +दक्षिणेतच असणाऱ्या आपल्या पुत्राला, आझमशहाला जिंजीकडे जाण्यास फर्मावले. +शहाजादा आझमचा 'जिंजीला' वेढा पडला. या वेळेस राजाराम महाराजांच्या बरोबर खंडो +बल्लाळ चित्रे चिटणीस. निळोपंत पेशवे, परशुरामपंत प्रतिनिधी, वासुदेव रामचंद्र अमात्य, +शंकराजी नारायण सचिव, नारोराम शेणवी अशी काही मातब्बर मंडळी होती. शहाजादा +आझमचा वेढा पडण्यापूर्वीच राजाराम महाराजांनी परशुरामपंत प्रतिनिधी यांना महाराष्ट्रात +पाठवून दिले होते. संभाजीराजांनी जसे 'कुलएखत्यार' हे नवे पद निर्माण केले तसेच आपण +जिंजीत असताना महाराष्ट्रातली व्यवस्था पाहण्यासाठी आपला एक मंत्री असावा म्हणूनच +राजारामांनी अष्टप्रधानांपेक्षाही वर असणारे 'प्रतिनिधी' हे पद निर्माण केले होते. परशुरामपंत +प्रतिनिधी महाराष्ट्रात आले, अन् पन्हाळगडावर दाखल झाले. पन्हाळगडावर सरसेनापती कै. +म्हलोजी घोरपड्यांचे पुत्र संताजी आणि बहिर्जी आणि धनाजी जाधव अशी पराक्रमी +मंडळी होती. जिंजीचा किल्ला प्रचंड होता. गडावर रसद आणि दारूगोळा मुबलक होता +त्यामुळे आझमशहाला गड (इतक्यात तरी) मिळणे अशक्य होते! आता महाराष्ट्रात राजाही +नव्हता अन् राणीही ... + महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपुत्र शिवाजीराजांना, इतर कुटुंबकबिल्यासह + औरंगजेबाच्या छावणीत दाखल करण्यात आले. औरंगजेबाने या सर्वांना कडक बंदोबस्तात +ठेवले. युवराज शिवाजीराजे या वेळेस जेमतेम ७-८ वर्षांचे होते. ते दिसायला अत्यंत गोड +होते. औरंगजेबाची धाकटी मुलगी झिनतुन्निस बेगम हिला बाळराजांचा लळा लागला. +कदाचित म्हणूनच औरंगजेबाने बाळराजांना मुक्तपणे कुठेही संचार करण्याची इजाजत दिली +होती. परंतु त्यांचे 'शिवाजी' हे नाव कानावर पडले की, त्याची भयंकर चिडचिड होत होती. +याच तीन अक्षरांनी त्याला जन्मभर सतावलं होतं. थोरल्या शिवछत्रपती महाराजांनाही तो + 'सिवा' असंच म्हणत असे. 'जी' हे आदरार्थी विशेषण या काफीर कशाला +लावायचे उगाच? आताही बाळराजांच्या नावातील 'सिवा' हे त्याला कायम बोचत +असल्यामुळेच त्याने 'सिवा' चं 'सावू' असं नामांतर केलं. (सावू या शब्दाचा अर्थातच मराठी +उच्चार झाला 'शाहू' !! ). बाळराजांचं नवं नाव पडलं 'शाहू राजे' !! + महाराष्ट्रात आता कोल्हापूर हे एक महत्त्वाचं ठाणं बनलं. बहिर्जी हे किल्ल्याची +जबाबदारी पाहू लागले. परशुरामपंत इतर घडामोडी आणि संताजी धनाजी +जाधवांच्या हाताखाली मराठी सैन्य पुन्हा तलवारी पेलत उभं ठाकलं. महाराष्ट्रात आता +राजघराण्याशिवाय लढण्यात येणारा लोकसंग्राम सुरू झाला होता. एके दिवशी गंमतच +झाली. बादशहा आलमगीर औरंगजेबाचा शाही तळ बहादूरगड आणि अहमदनगराच्या मध्ये +पडला असतानाच अचानक भयंकर गोंधळ माजला. मोंगली स्वाऱ्यांच्या किंकाळ्यांनी +छावणी भरून गेली. कोणाला समजेचना, झालंय तरी काय! अन् जेव्हा लक्षात आलं तेव्हा +समजलं की, मराठ्यांचा हल्ला आलाय. संताजी आणि धनाजी जाधवरावांच्या मराठी +फौजांनी खाशा औरंगजेबाच्याच तळावर हल्ला चढवला होता. राजमाता येसूबाईसाहेब +<<< + +आणि शाहूराजांची सुटका करण्याचा मराठ्यांचा बेत होता. परंतु, येसूबाईंभोवती कडेकोट +पहारा असल्यामुळे मराठ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हंत. शेवटी मिळेल तेवढ्या +मोंगलांना कापत मराठी फौजा माघारी फिरल्या. आता असे हल्ले वारंवार होणार होते. +औरंगजेबाला तो एकप्रकारचा दिलेला इशाराच होता, 'जोपर्यंत इथे आहेस तोपर्यंत सुखात +राहू शकणारच नाहीस !! ' + औरंगजेबाची आतापर्यंत मार खाऊन उरलेली २ लाखांची फौज रामसेजपासून +पन्हाळ्यापर्यंतच्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घालत होती. परंतु, मराठ्यांकडूनही +त्यांना तितकीच झुंज मिळत होती. शाहूराजे औरंगजेबाच्याच छावणीत लहानाचे मोठे +होत होते. + अशातच सात वर्षे उलटली आणि अचानक बातमी आली. राजाराम महाराज जिंजीच्या + निसटले! मध्यंतरी औरंगजेबाने, किंबहुना पूर्वी आझमशहानेच +जिंकलेला साताऱ्याचा 'आझमतारा' मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला होता. राजाराम +महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी याच सातारच्या मंगळाईच्या किल्ल्यावर आपली +राजधानी हलवली. किल्ले सातारा ही आता मराठ्यांची नवी राजधानी बनली होती. + महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोंगलांना अक्षरशः सळो की पळो करून +सोडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोंगल अगदी हैराण होऊन गेले होते. संताजी +आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोंगलांची अक्षरशः करत होत्या. +महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची +पाहणी केली. कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता. राजाराम महाराज सिंधुदुर्गावर +आले. महाराष्ट्राची ही 'शिवलंका' अभेद्य होती. महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा +दागिना घडवलेला होता. राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या, श्री +शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच 'शिवराजेश्वर' मंदिराची निर्मिती केली. यानंतर +दुर्दैवाने केवळ दोनच वर्षात, गेली काही वर्षे होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि +दगदगीमुळे दि. ३ मार्च १७०० या दिवशी या तरुण राजाचा, वयाच्या केवळ २९ व्या वर्षी +सिंहगडावर मृत्यू झाला. थोरल्या श्री शिवछत्रपती महाराजांचा दुसरा पुत्रही मृत्यूने लवकर +उचलून नेला ... + राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आता राज्याचं पुढे काय असा प्रश्न पडला. राजारामांचा +मुलगा 'शिवाजी' (दुसरा) हा अतिशय अल्पवयीन होता. त्यामुळेच महाराणी ताराबाईंनीच +सर्व कारभार पहावा असे ठरले. सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या असलेल्या +ताराबाईसाहेब या अतिशय हुशार होत्या. त्यांनी औपचारिकरित्या बाळ शिवाजीराजाला +गादीवर बसवले. पुन्हा पूर्वीप्रमाणेच धनाजी जाधवांच्या आणि कान्होजी आंग्रे-दाभाड्यांच्या +मराठी फौजा औरंगजेबाच्या छावणीवर अन् मुलुखावर हल्ले करू लागल्या. मराठ्यांनी +आता वेगळीच नीति अवलंबली होती. एखाद्या किल्ल्याला मोंगली फौजेचा वेढा पडला की, +किल्ल्यावरची रसद संपेपर्यंत किल्ला रसद संपली की तह करून किल्ला +मोंगलांच्या ताब्यात द्यायचा. गडाचा ताबा मिळवल्यावर रिकाम्या कोठारात मोंगली फौज +<<< + +नवी रसद भरून ठेवत असे. अन् मग काही दिवसांनी गनिमी काव्याने हल्ला करून +गड पुन्हा ताब्यात घ्यायचा. मराठ्यांच्या या खेळामुळे मोंगलांच्या ताब्यात एकही किल्ला +फार काळ राहात नव्हता. छत्रपती संभाजीमहाराज पुत्र शाहूमहाराज इ.स. १७०७ मध्ये परत +येईपर्यंत महाराष्ट्राचा हा लोकलढा छत्रपती राजारामपत्नी ताराराणीसाहेब तसेच परशुरामपंत +प्रतिनिधी आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारख्यांच्या नेतृत��वाखाली असा सुरू होता. + + शिवराज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, +छत्रपती संभाजीमहाराज आणि राजाराममहाराज या प्रकरणांची + एकत्रित संदर्भसूची : + +१) राजाशिवछत्रपती : बाबासाहेब पुरंदरे, २) मराठ्यांच्या इतिहासाची साधने (शिवकाल) : +राजवाडे, ३) मराठी रियासत (शिवकाल) : गो. स. सरदेसाई, ४) ज्ज्वलज्ज्वलनेतजस +संभाजीराजा : सदाशिव शिवदे, ५) श्री संप्रदायाची कागदपत्रे : शं. श्री देव, ६) शिवपुत्र +संभाजी : कमल गोखले, ७) परमानंद काव्यम : शिवदे-अयाचित, ८) संभाजी आणि +राजाराम चरित्र : वा. सी. बेंद्रे. +<<< + + सह्याद्रीचा घाटमाथा उतरून पश्चिमेकडे असलेल्या सिंधुसागराच्या दिशेने जात राहिलं +की, वाटेतला सारा परिसर मन मोहून टाकतो ... हा सारा प्रदेश भगवान परशुरामांचा! +चिपळूण- या लहानशा गावातल्या एका पर्वतावर भार्गवाचे वास्तव्य असल्याने या भूमीला +दक्षिणेच्या 'परशुराम भूमी' तेरेखोल असंही म्हणतात. अतिशय सव्वादोनशे सुपीक कोस प्रदेश लांबीच्या आहे हा. उत्तरेच्या या दमणगंगेपासून + प्रदेशातून सावित्री, +वासिष्ठी, कुंडलिका, तेरेखोल, काळ, उल्हास अशा अनेक नद्या वाहतात. कोकणातल्या नद्या +अगदीच लहान, पण सह्याद्रीच्या उतारावरून समुद्राकडे जाण्याची त्यांची पाहिली की +असं वाटतं, यांचं जन्मोजन्मीचं काहीतरी नातं असावं. सावित्री ही त्यातली ज्येष्ठ अन् श्रेष्ठ +नदी. महाबळेश्वरावरून श्रीशिवशंकराच्या दाट जटांमधून उगम पावलेली सावित्री सह्याद्रीच्या +कड्यावरून थेट कोकणात झेप घेते. तिचा वेग पाहता असं वाटतं की, भगवान शंकरही +तिला थोपवून धरण्यात अपयशी झाले आहेत. पण समुद्राला मिळताना या नद्या एकदम संथ +होतात. जणू काही प्रचंड अशा सिंधुसागराला पाहून त्या लाजतात अन् हलकेच त्याच्यात +सामावतात. कोकणातल्या नद्यांकाठचा प्रदेश अतिशय सुपीक आहे. येथे आणि क्षार +असणारी, 'लवणयुक्त' माती फार आढळते. 'भात' हे मुख्य धान्य पिकवण्यास यापेक्षा उत्तम +जमीन कुठेही सापडणार नाही. शिवाय सुपारी, नारळ अशा पिकांना येथे काय तोटा? हे तो +श्री भार्गवाचेच देणे! फणस, काजू, आंबा हा तर कोकणचा खास मेवा. कोकणातील +आंब्याची ख्याती पार दिल्लीपर्यंत पोहोचली होती आणि या सर्वांहूनही मुख्य मेवा म्हणजे +कोकणातला माणूस. कोकण ही भूमी मुख्य कोळी, आगरी, भंडारी इत्यादींची. ही माणसे +फार शूर होती. दर्यावरच्या गलबतातच यांचे सारे जीवन व्यतीत झालेले. मासा जसा +पाण्याबाहेर तडफडतो तशीच ही माणसे दर्यावाचून व्याकूळ होत असत. भात अन् मासे +यावरच मुख्यत्वेकरून गुजराण असणारी ही मंडळी स्वराज्याच्या आरमारावर अगदी जीव +ओतून काम करीत होती. यांच्याबरोबरीने कोकणात पूर्वी देशावरून उतरलेले मराठेदेखील +तितकीच महत्त्वाची कामे करीत होते. परंतु कोकणात, विशेषतः अलिबाग-थळपासून खाली +लांजा-राजापूरपर्यंतच्या ब्राह्मणांची वस्ती विशेष होती. 'चित्पावन' ब्राह्मण ... +कोकणातल्या ब्राह्मणांना 'चित्पावन' का म्हणतात याबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्या +काहीही असोत. परंतु काटक यष्टीचे, घाऱ्या पण तितक्याच शांत डोळ्यांचे, गौरवर्णाचे +असूनही उन्हात वावरताना होणारे हे ब्राह्मण हुशार तर होतेच, पण शूरही होते. त्यांनी +आपले वंशपरंपरागत असणारे पौरोहित्य, यज्ञकर्म इत्यादी व्यवसाय कमी करून +राज्यव्यवस्थेतही लक्ष घालण्यास सुरुवात केली. कोकणातल्या हिंदू-मुसलमान इ. साऱ्याच +राज्यकर्त्यांनी चित्पावनांच्या अंगातले गुण ओळखून त्यांच्या नेमणुका जोशी, खोत, देशमुख +किंवा देसाई, कुलकर्णी, महाजन अशा विविध हुद्दयांवर केल्या. एक राजवट संपून दुसरी +आली की, नवा व्यवसाय सुरू करण्याची आशा असे. वास्तविक पाहता खोत, देशमुखी, +पाटिलकी ही कामे घाटावर, देशावर जशी फक्त मराठ्यांनाच देण्याचा प्रघात होता तसेच तो +कोकणातही होता. परंतु अनेक सत्ता-हस्तांतरणामुळे वा घाटमाथ्यावरच्या महाराष्ट्रातील +अनेक राजकीय उलथापालथींमुळे कोकणातल्या मराठ्यांचे या वतनांमधले लक्ष कमी होत +<<< + +चालले होते. याचा नेमका फायदा चित्पावनांना झाला व या वतनांवर त्यांच्या नेमणुका +व्हायला लागल्या. घाटावर एक प्रघात प्रचलित होता. एखाद्या प्रांताच्या किंवा देशाच्या मुख्य + अधिकाऱ्याला देशमुख म्हणायचे त्याप्रमाणे कोकणातल्या प्रांताधिकाऱ्याला 'देसाई' म्हणत. +हा मूळ शब्द आहे 'देशस्वामी'. परंतु, 'देश-स्वामी' या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे देसाई हा +शब्द झाला. कोकणातल्या अशा अनेक प्रांतावरचे देशमुख अथवा देसाई हे 'चित्पावन' +होते. अन् अशाच एका देशमुखी वतनाचा हक्क श्रीवर्धनच्या भटांना मिळालेला होता. या +सुभ्यात श्रीवर्धनच्या दक्षिणेस लगत असणारे हरिहरेश्वर व उत्तरेस दिवे-आगर +यामधल्या सात-आठ कोसांच्या प्रदेशातली सारी गावे सामावली गेली होती. + भट घराणे हे श्रीवर्धनमधले एक प्रतिष्ठित घराणे. या घराण्यातील महादजींपत भट हे +दांडा-राजपुरी येथील देशमुखी सांभाळत असल्याचे उल्लेख आढळतात. पुढे +महादजीपंतांच्या नातवंडांपैकी महादजी नारोपंत भट हे राजमाची किल्ल्याची किल्लेदारी +पाहू लागले. त्यामुळे पुढे त्यांच्या वंशजांनी स्वतःस राजमाचीकर हे उपनाम घेतले. + महादजी विसाजींची इतर दोन नातवंडे, कृष्णाजी परशुराम व विश्वनाथ परशुराम +श्रीवर्धन येथे स्थायिक झाले व राजापुरीची देशमुखी पाहू लागले. याच काळात, +महादजीपंतांचे पुत्र परशुराम ऊर्फ शिवरामपंत आपल्या थोरल्या पुत्रासह काही काळ +घाटावर येऊन गेले. आता त्यांचा थोरला पुत्र म्हणजे नक्की कृष्णाजी की विश्वनाथ हे +समजावयास मार्ग नाही. एका बखरीत असा उल्लेख आहे की, भट +श्रीवर्धनकर सीवाजीराजियांजवळ येऊन करवीरचे मुक्कामी भेटले. पुढे चिरंजीव विश्वासराऊ +तेही आले व त्याजचे कर्तृत्व पाहून राजियाने (शिवाजी महाराजांनी) त्यासी दोन हजार +फौजेची सरदारी दिल्ही. विश्वासराव आपले पराक्रमेकरून कामकाजी प्रसिद्ध जाहले." हा +सर्व उल्लेख विसाजी-विश्वासराव म्हणजेच विश्वनाथांच्या संबंधातला आहे. + विश्वनाथपंतांना एकूण पाच पुत्र होते. कृष्णाजी, जनार्दन, रुद्राजी, बाळाजी व विठ्ठल. ही +पाचही मुले अतिशय कर्तबगार होती. मधल्या काळात परशुरामपंत महादजी यांना दांडा- +राजपुरीऐवजी श्रीवर्धन-हरिहरेश्वराची देशमुखी मिळाली. पण तरीही या पाचही पुत्रांना +देशावरच्या 'स्वराज्या'चीच अधिक होती. अशातच सिद्दींचा उपद्रव सोसावा लागत + असल्याने त्यांना 'बाहेर' पडणे अनिवार्य होऊन बसले. यात मुख्य वाटा होता तो बाळाजी +विश्वनाथांचा. बाळाजीपंतांचे मूळ नाव 'बल्लाळ' परंतु, घरात सहज हाक मारताना +बल्लाळाचे बाळ, बाळचे बाळाजी झाले. लहानपणापासूनच बाळाजींवर होणाऱ्या अनेक +ब्राह्मणी संस्कारांमुळे त्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास झपाट्याने झाला. जोडीला व्यायाम +होताच. एकंदरीत कोकणातील परिस्थिती पाहता साधनांचा अभाव व हवामानामुळे त्यांच्यात +मुळातला काटकपणा अधिक जोपासला गेला. अशातच तिकडे जंजिरेकर सिद्दींचा +उपद्रव भीती दाखवत होता. त्यामुळे बाळाजीपंतांनी श्रीवर्धन सोडण्याचा निश्चय केला. पण +जावे तरी कुठे? जवळपास साऱ्या कोकणात सिद्दींचेच राज्य. बाळाजींनी विचार केला. +हरिहरेश्वरजवळ वेळास या गावी भानू कुटुंब राहात होते. यापैकी हरी, रामाजी व बाळाजी या +महादेव भानूंच्या पुत्रांशी बाळाजींचे विशेष सख्य होते. या महादेव भानूंची पत्नी म्हणजेच +<<< + +बाळाजीची आत्या होती. म्हणजेच हे त्रिवर्ग भानू म्हणजे बाळाजींचे आतेभाऊ होत. +बाळाजींनी वेळासला जाऊन आपला श्रीवर्धन सोडण्याचा विचार आपल्या आतेभावांच्या +कानावर घातला. त्या त्रिवर्गालाही बाळाजीपंतांचा विचार पटला. सर्वानुमते असे ठरले की, +प्रथम कोकण सोडून देशावर जावे अन् मग रोजगार पहावा. याप्रमाणे प्रथम बाळाजीपंत +देशावर येण्यास निघाले. या मधल्या काळात सिद्दीला खबर मिळाली की श्रीवर्धनकर देशमुख +बाळाजी हा पुंडावा करण्यास घाटावर निघाला आहे. त्याने अंजनवेलीच्या हबशी +किल्लेदाराला बाळाजीपंतांना पकडण्याचे फर्मान धाडले. अंजनवेल आहे दाभोळ खाडीच्या +दक्षिणांगास. ठरल्याप्रमाणे बाळाजीपंत वेळास सोडून परशुराम घाटाकडे निघाले असता +वाटेतच अंजनवेलीच्या किल्लेदाराने त्यांना पकडून किल्ल्यावर आणले. भानू बंधू मागाहून +निघणार असल्याने थोडक्यात बचावले. बाळाजीपंत अंजनवेलीच्या किल्ल्यात +(गोपाळदुर्गात) साधारणतः एक महिनाभर असावेत. पुढे भानू बंधूंनी किल्लेदाराला वश +करून, लाच देऊन बाळाजीपंतांची मुक्तता केली. सुटकेनंतर भानूबंधू व बाळाजीपंत भट +तिवऱ्याच्या घाटाने प्रथम कराड प्रांतात उतरले व सासवडला येऊन राहिले. +बाळाजीपंतांचे (व भानू त्रिवर्गाचेही) आजोबा परशुरामपंत भट हे साधारणतः १६६० च्या +सुमारास कराड-कोल्हापूरच्या प्रदेशात शिवाजीमहाजारांना जाऊन भेटले होते. याच सुमारास +त्यांचा संपर्क सासवडमधल्या 'पुरंदरे' घराण्याशी आलेला दिसतो. या घराण्यातल्या तुकोपंत +त्र्यंबक पुरंदरे व अंबाजीपंत त्र्यंबकपंत पुरंदरे यांच्याशी बाळाजीपंतांचेही पूर्वीचे स्नेहसंबंध +असावेत. सासवडला कऱ्हा नदीच्या तीरावर पुरंदऱ्यांचा भलामोठा 'सरकारवाड़ा' दिमाखात +उभा होता. अंबाजीपंत पुरंदरे हे स्वराज्यातच चाकरी करीत होते. बाळाजीपंतांची मसलत +अंब���जीपंतांना पसंत पडली व ते बाळाजींना व भानू बंधूंना घेऊन साताऱ्यास आले. हा काळ +नक्की कोणता त्याबाबत आज काही पुरावे नाहीत, परंतु राजाराम महाराज जिंजीला +अडकून पडलेले असताना, (इ. स. १६९० ते १६९७ च्या मध्ये केव्हातरी) ही सारी मंडळी + मंगळाईगडावर पोहोचली. यावेळेस सातारा हीच मराठ्यांची राजधानी होती. +राजाराम महाराजांची दुसरी पत्नी महाराणी ताराबाई कारभार पाहात होत्या. अंबाजीपंत +पुरंदरे हे दौलतीतले कदिम चाकर असल्याने अनेक कर्त्या मंडळींशी त्यांचे स्नेहसंबंध होते. +त्यातलेच चासकर महादजीपंत जोशी हे होते. महादजीपंतांचेही शंकराजी नारायण सचिव, +धनाजी जाधवराव यांसारख्या मुख्य धुरिणांशी सलोख्याचे संबंध होते. महादजीपंत जोशी +बाळाजीपंतांना शंकराजी सचिवांपाशी घेऊन गेले. शंकराजीपंत हे शिवछत्रपतींच्या +काळापासूनचे सेवक होते. रामचंद्रपंत अमात्यांच्या साथीने शंकराजी नारायण सचिवांनी +संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रायगड, प्रतापगड़ासारखे किल्ले अत्यंत हुशारीने पुन्हा स्वराज्यात +सामील केले. या उत्तम कामगिरीबद्दल राजाराम महाराजांनी अमात्यांना 'हुकुमतपनाह' +आणि सचिवांना 'राजाज्ञा' हे किताब बहाल केले. शंकराजीपंतांनी बाळाजींना आपल्या +चाकरीत ठेवून घेतले. पुढे रामचंद्रपंत अमात्यांनी बाळाजींची हुशारी हेरून त्यांना आपल्या +पदरी फडावर ठेवून घेतले. त्यानंतरच्या काळात बाळाजीपंतांची फारशी माहिती समजत +नाही. परंतु, इ. स. १६९९ रोजी ते पुणे प्रांताचे 'सरसुभेदार' असल्याचा उल्लेख एका पत्रात +<<< + +आढळतो. + पत्र अस्सल मोडीत आहे. त्याचा देवनागरीतला तर्जुमा असा- + श्री उमाकांत + पदांभोज भजनाप्त + बाळाजी + विश्वनाथस्य मुद्रा + विजयते तरां + रोखा सरसुभा प्रांत पुणे ता मोकादम कसबे सासवड सुं।। मया अलफ कसबे सुपाचे +वाणी सुरसुभा ऐवजाबद्दल आणिले होते त्यास याकडे रुपये ३०० तीनशे येणे त्यास तुम्ही +जमान राहिले आहा तर देखत रोखा सदरहू रसद रु।। पाठवणे या कामास सिपाई सुभा +शंकरराव पा असे रुा + + ८ सरनोजी राजपुरे + ६ भीवराव + ६ संभाजी गायकवाड + २० + एकवीस रुा देविले असे सदरहू तीनशे रुपयांपैकी आदा करणे बाकी रसद पाठवणे + मोर्तब सुद जिल्हेज + यानंतरच्या इ. स. २४ १७०२ च्या एका पत्रानुसार बाळाजीपंत हे सरसेनापती धनाजी +जाधवरावांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख येतो. अस्सल मोडीतले देवनागरीत रूपांतर +पुढीलप्रमाणे- + + श्री ।। + श्री उमाकांत + पदांभोज भजनाप्त + बाळाजी + विश्वनाथस्य मुद्रा + विजयते तरां + अज स्वारी राजेश्री बालाजी विश्वनाथ दिम्मत राजेश्री सेनापती ता मोकादमानी कसबा +सासवड प्रा पुणे सुरू सलास मया अलफ कसबे मजकूर पैकी घासदाणा स्वार स्वारी +मजकूर देणे +<<< + + रु दाणा बकरे + ४० १ + एकूण चालीस दाणा दाहा मण रास आदा करणे + छ७ मोहरम + मोर्तब सुद + यानंतरच्या काळात बाळाजीपंतांना पुण्याच्या सरसुभेदारीवरून दौलताबाद प्रांताचे +सरसुभेदार म्हणून नेमले गेले, परंतु त्याची नक्की तारीख माहीत नाही. परंतु इ. स. १७०४ +च्या एका पत्राच्या मायन्यात त्यांचा उल्लेख दौलताबादचा सरसुभेदार म्हणून आला आहे. तो +मायना असा, + "स्वस्ती श्री राज्याभिषेक शके ३० तारणनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध ६ रविवासरे, +क्षत्रियकुलावतंस श्री राजाशिवछत्रपती (करवीरकर) यांणी राजमान्य राजेश्री बालाजी +विश्वनाथ सरसुभेदार, प्रांत दौलताबाद यांसी आज्ञा केली ऐसी जे की तुम्हास ... " + यावरून असा तर्क करता येतो की, इ.स. १७०७ अखेरपर्यंत बाळाजीपंत दौलताबादचे +सरसुभेदार होते आणि शाहूंच्या सुटकेनंतर ते शाहूराजांच्या पक्षात कार्यरत झाले ... + इ.स. १७०७ च्या एप्रिलमध्ये शाहजादा आझमशहाने शाहूंची माळव्यातील +भोपाळजवळच्या दोराहा येथे सुटका केली अन् शाहूंना मराठा मांडलिक राजा म्हणून दोनशे +स्वार दिले. गेली कित्येक वर्षे शाहूराजे याच क्षणाची वाट पाहात होते. कधी एकदा आपली +सुटका होते व आपण स्वराज्यात जाऊन कार्यरत होतो असे त्यांना वाटत होते. +औरंगजेबाच्या नजरकैदेत असताना शाहूंचा अनेक मोंगल सरदारांशी संपर्क होत होता. +शाहूंचा शांत, मवाळ व सकारात्मक माणसे जोडण्याचा स्वभाव त्यांच्या फार उपयोगी +पडला. कैदेतून सुटून दख्खनेत येतेवेळी अनेक मराठा मोंगल सरदारांनी त्याला आपल्या +वाड्यांवर बोलावून सरबराई केली. धनाचीही मदत केली. उत्तरेस असणाऱ्या राजपुतांपैकी +जयपूर-आमेरचा राणा सवाई जयसिंह, राणा इ. अनेक राजपूत, जाट व मुख्यत्वे +शिवछत्रपती महाराजांपासून प्रेरणा घेऊन बुंदेलखंड स्वतंत्र करणाऱ्या पराक्रमी अशा +महाराणा छत्रसाल बुंदेला यांचाही शाहूंना पाठिंबा होता. सुटका झाल्यापासून शाहूंनी हरएक +मराठा सरदाराला पत्रे पाठवली होती. त्याप्रमाणे शाहूंना फार कुमक मिळाली. पण +असे असले तरी मात्र अनेक मराठा सरदारांचे मन शाहूंकडे झुकत चालले होते. अखेरीस +१७०७ च्या अखेरीला शाहूंनी नर्मदा ओलांडून पुन्हा दख्खनेत पाऊल टाकले. यावेळेस +त्याच्याबरोबर मोंगलांनी दिलेले दोनशे स्वार व मोहनसिंह फौज होती. +परंतु थोड्याच अवधीत शाहूंचे सासरे रुस्तुमराव जाधव, चिमणाजी दामोदरपंत मोघे, +गणेशंपत सरनाईक, परसोजी भोसले, केशवपंत किंवा केसो त्रिमल पिंगळे, रामचंद्रपंत मंत्री, +पंताजी शिवदेव, महादाजीपंत बोकील इ. मंडळी शाहूंना उघड जाऊन सामील झाली. या +लोकांना असे वाटत होते की, श्री थोरल्या शिवछत्रपतींचा ज्येष्ठ वारस, श्री शंभूछत्रपतींचा +ज्येष्ठ औरसपुत्र शाहू हेच खरे स्वराज्याचे उत्तराधिकारी आहेत. शाहूराजे औरंगजेबाच्या +<<< + +कैदेत असताना राजाराम महाराज ज्येष्ठ व तद्नंतर महाराणी ताराबाईंनी राज्य सांभाळणे हे +परिस्थितीनुसार अनिवार्य होते. पण आता शाहूराजांची सुटका झालीय. मराठ्यांच्या +सिंहासनावरचा त्यांचा हक्क त्यांना मिळावयास हवा. परंतु, मराठी राज्यास घातक असा +अत्यंत निर्वाणीचा पेच इथे निर्माण झाला. शाहूंची सुटका झाल्याचे ऐकताच ताराबाईंचा +जळफळाट झाला. कारण संभाजीराजांच्या मृत्यूनंतर राजारामांना मिळालेली गादी पुढे +त्यांचेच वंशज चालवणार होते. पण शाहू राजे सुटल्यामुळे आता राज्याचा सारा कारभार +आपल्याला सोडावा लागणार या एकाच विचाराने ताराबाईंना हैराण करून सोडले. +वास्तविक पाहता राजारामांचा वा तातबाईंचा गादीशी काही संबंध नव्हता. इ. स. १६७९ +मध्ये स्वराज्य सोडून मोंगल सरदार दिलेरखानाला मिळालेल्या व आपण केलेल्या चुकीची +जाणीव होऊन पुन्हा स्वराज्यात आलेल्या युवराज संभाजीराजांना थोरल्या शिवाजी +महाराजांनी पन्हाळ्यावर एकांती समजावले होते. त्यांच्यासमोर स्वराज्याच्या वाटणीचा +प्रस्तावही मांडला होता. परंतु, त्यानंतर संभाजीराजांनी नम्रपणे उत्तर दिले की, "आपणांस +साहेबांचे पायाची ��ोड आहे. साहेबांचे (शिवरायांचे) पायाशी इमान वाहून दूधभात खाऊन +राहू." याचाच अर्थ संभाजीराजांना राजपदाची अभिलाषा नव्हती. पण याचबरोबर +राजारामांची मनस्थिती तपासून पाहिली पाहिजे. दि. २५ ऑगस्ट १६९७ च्या एका पत्रात +उल्लेख आहे की, "चिरंजीव शाहू कालेकरून तरी श्री देशी आणिल, तेव्हा संकटी जी माणसे +उपयोगी पडली, त्यांच्या तसनसी आम्ही करविल्या, याचा चित्ती द्वेष यावा हे तरी अविचाराचे +कलम. शाहू राज्यास अधिकारी, आम्ही करतो ते तरी त्यांचेसाठीच आहे. प्रसंगास सर्व +लोकांस त्याजकडेच पाहणे आहे. हे कारण ईश्वरेच नेमिले असेल ... " याचाच अर्थ असा आहे +की, राजाराम हे स्वतःला शाहूंचाच प्रतिनिधी समजत होते व राज्यकारभार चालवत होते. +परंतु हा उद्देश अथवा ही पोच ताराबाईंच्या मनात अजूनही रुजली नव्हती. हाती सत्ता +आल्यावर अन् मराठ्यांच्या सर्वोच्चपदाचा मान मिळाल्यावर ताराबाईंना इतर काही सुचेनासे +झाले. राजारामांच्या अकस्मात मृत्यूनंतर ताराबाईंनीच गादी चालवून मराठी राज्य सावरले ही +गोष्ट जरी खरी असली तरी आता त्यांना आपल्यावर अन्याय (?) होतोय असे वाटू लागले +होते. वास्तविक पाहता महाराणी राजारामांना रायगडच्या वेढ्यातून पाठवताना +जो दूरदृष्टीचा विचार केला तसाच समंजसपणे विचार जर ताराबाईंनी केला असता तर +मराठ्यांची मोठी हानी टळली असती. शाहूंचे म्हणणे होते की, "आपणांस जैसे शिवाजीराजे +(दुसरे) तैसेच आम्ही. आता राज्य आम्हांस द्यावे. आपण मातुश्री, आम्हांस वडील. पुढच्या +हरयेक मसलतीस दिशा देऊन आशीर्वाद द्यावा." पण हे काही ताराबाईंना पटले नाही. त्यांनी +शाहूंना असलेला विरोध चालूच ठेवला. शाहूंना आता ताराबाईंना नमवल्याशिवाय गादी +मिळणार नाही हे साऱ्यांनाच कळून चुकले. पण हे करण्यासाठी सर्वप्रथम स्वराज्याची +राजधानी सातारा कब्जा करायला हवी होती. शाहूंचे बळ अन् जनमत पाहून +ताराबाईदेखील संभ्रमात पडल्या. त्यांनी एक नवीनच खेळी आरंभली. त्यांनी मुद्दामच एक +बातमी आपल्या हेरांमार्फत पसरवली की 'शाहूंच्या डोईवर केस होते. आता आलेला हा +माणूस 'शाहू' असू शकत नाही. खरा 'शाहू' अजूनही आझमशहाच्याच कैदेत आहे. ही +<<< + +मोंगलांची एक खेळी आहे व आपण तीस भुलणारे नाही.' लगेचच ताराबाईंनी आपले +सेनापती धनाजी जाधवराव यांना चाळीस हजार फौजेनिशी शाहूंवर रवाना केलं. पर���तु +धनाजींचे अनेक नजरबाज खुद्द औरंगजेबाच्या छावणीत पूर्वीपासून फिरत असल्याने त्यांनी +शाहूंना लगेच ओळखले व ताराबाईंचे शाहूंना 'खोटा' ठरवण्याचे राजकारण फसले. हे +समजताच त्यांनी शाहूंना रोख जवाबच पाठवला की, तुमचा राज्यावर काहीही हक्क नाही, +सबब तुम्हांस राज्य मिळणार नाही. ताराबाईंनी एक नवीनच राजकारण आरंभले की, +मुळातच आपले अस्तित्व मान्य नव्हते. इतक्यात खंडो बल्लाळ चिटणीस आणि +बापूजी भोसले यांनी स्वतः शाहूची खातरजमा करून ते 'शाहूच' असल्याचे ताराबाईंना +कळवले. परंतु, तरीही बाहेर अशाच बातम्या पसरवल्या की, हे शाहू नाहीच. +आणि एकीकडे आपल्या परशुरामपंत प्रतिनिधी, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण +सचिव, नीळकंठ मोरेश्वर पिंगळे, खंडोबल्लाळ चिटणीस या खाशा लोकांना गुप्तपणे बोलवून +त्यांना शाहूंना विरोध करण्याची सक्त ताकीद दिली. परंतु सरसेनापती धनाजी जाधवरावांना +हे पटले नव्हते. पण तरीही काही न बोलता ते गप्प बसले. अशातच ताराबाईंनी रामचंद्रपंत +अमात्यांना विशाळगडावर नजरकैदेत ठेवले. कारण समजत नाही, परंतु बहुदा शाहूराजांच्या +खरेखोटेपणावरूनच काही वाद झाले असावेत असा तर्क आहे. परंतु रामचंद्रपंतांनी +बाळाजीपंतांना बोलावून घेतले व धनाजी जाधवरावांस निरोप धाडला, "शाहूराजे अस्सल वा +खोटे याची खातरजमा करून जर खरे असतील तर त्यांस सामील व्हावे. राज्याचे खरे +अधिकारी तेच!" बाळाजीपंतांनी हा निरोप धनाजींस कळवला. धनाजी जाधवरावांनी +आपल्या खाशा मर्जीतल्या बाळाजीपंत भट, खंडो बल्लाळ चिटणीस व नारोरामपंत शेणवी +यांना पुनश्च खातरजमा करण्यास शाहू महाराजांच्या गोटात पाठवून दिले. यावेळेस घडलेली +घटना कथन करताना 'परशुरामचरितम्'चा लेखक वल्लभदास कवी म्हणतो, "होता प्रत्यक्ष +भेटी, तनुधन रक्त चाकर्ण दृष्टी नासाग्रं संन् ललाटी रधर हनुवटी चारुंजं कबुकंटी + वाणी माधुर्य माने प्रहसित वदने राजचिन्हे प्रभुला पाहोनी स्वात्मिकाला स्वकी (य) नृप +गमला निश्चयो सिद्ध झाला ।।" म्हणजेच त्यांचे (शाहूंचे) दिसणे, चालणे बोलणे अगदी +एखाद्या अस्सल राजपुत्राप्रमाणे होते. यामुळे त्या तिघांची अगदी खात्री पटली की, हा +संभाजीराजांचाच पुत्र अन् आपला राजा आहे. पुढे ते तिघेही धनाजीरावांपाशी गेले व त्यांना +स्पष्ट कथन केले. "ते आपलेच (राजे) आ��ेत." बाळाजीपंतांनी तर सरळ म्हटले, "आपला +खराखुरा धनी समीर उभा ठाकला आहे. त्यांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य. शिवाजीराजे +(दुसरे) हे खरे उत्तराधिकारी नव्हेती." आणि धनाजी जाधवरावांनादेखील हे पटले. मात्र ते +लगेचच उघडपणे शाहूराजांना जाऊन सामील झाले नाहीत. ताराबाईंनी शाहूंविरोधात +युद्धाची घोषणा केली. शाहूंनीही आपले सैन्य जमवायला सुरुवात केली आणि साधारणतः +ऑक्टोबर १७०७ च्या मध्यावर पुण्याजवळच्या खेड-मंचर येथे दोनीही सैन्यं समोरासमोर +उभी ठाकली. धनाजी जाधवराव ताराबाईंच्या पक्षात होते, परंतु केवळ शरीरानेच. त्यांनाही +शाहूराजांचे 'अस्तित्व' पटले होते. युद्धाला तोंड लागले. वास्तविक पाहता ताराबाईंचे सैन्य व +मुत्सद्दी हे शाहू राजांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. परंतु ऐन लढाईत धनाजी +<<< + + जाधवरावांनी लढाईतून अंग काढून घेतले अलि मंचरच्या त्या उघड्या मैदानात शाहूंच्या + सैन्याने ताराबाईंच्या सैन्याचा प्रचंड पराभव केला. नंतर धनाजी जाधव सैन्यासह + शाहूराजांच्या पक्षात येऊन सामील झाले. बाळाजीपंत तर आधीच येऊन शाहूराजांना सामील + झाले होते. आता त्यांनी एक एक करून ताराबाईंच्या पक्षातील माणसे शाहूराजांच्या पक्षात + आणण्यास सुरुवात केली. खेडनंतर शाहूराजांनी एक एक ठाणे जिंकून घेत राजधानी +साताऱ्याकडे प्रस्थान ठेवले. ताराबाईंच्या पक्षातील रामचंद्रपंत अमात्य व धनाजी जाधवराव + यांचा पाठिंबा मिळाला होता. पण तिसरे मुख्य शंकराजी नारायण सचिव शाहूमहाराजांना + मिळाले नव्हते. शाहूंनी त्यांना पत्र पाठवून नव्या राज्यात येण्याबद्दल विनवले. परंतु, त्यांनी + ऐकले नाही. अशातच दि. २७ ऑक्टोबर १७०७ रोजी त्यांचा रोहिड्यावर मृत्यू झाला. + त्यामुळे त्यांच्या ताब्यातले पुरंदर- वज्रगड, राजगड, केंजळगड, तोरणा, सिंहगड इ. किल्ले + अनायसेच शाहूराजांच्या हाती पडले. त्याचबरोबर वाईजवळचे पांडवगड, चंदन-वंदन हेही + किल्ले शाहूराजांना न मिळाले. त्यामुळे शाहूराजांचे बळ वाढले. ते आता थेट +मंगळाईच्या किल्ल्याकडे निघाले. शाहूंच्या या विजयखबरा ऐकून ताराबाईंनी मंगळाईचा + किल्ला (सातारा) सोडला व आपला पुत्र शिवाजीला घेऊन त्या पन्हाळ्यावर गेल्या. इकडे + किल्ला परशुरामपंत प्रतिनिधी लढवत होते. शाहूराजांनी प्रथम त्यांस किल्ला हाती +देण्याबाब�� निरोप पाठवला. पण पंतप्रतिनिधींनी तो निरोप साफ लावला. तेव्हा + शाहूराजांनी किल्लेदार शेख मिरानखान यासच फितवले व परशुरामपंतांना अटक केली. +राजधानी सातारादेखील न शाहूराजांच्या हातात आली. + दि. १२ जानेवारी १७०८, सर्वजीतनाम संवत्सर, माघ शुद्ध प्रतिपदा, सोमवार शके + १६२९ या दिवशी शाहूराजांना साताऱ्यास राज्याभिषेक करण्यात आला. शाहूराजे "क्षत्रिय +कुलावतंस श्रीमंत महाराज श्री शाहू छत्रपती बनले." राज्याभिषेकाच्या वेळेस किंबहुना काही +दिवस आधी शाहूराजांनी आपले अष्टप्रधान व इतर सरदारांच्या नेमणुका केल्या. पेशवे किंवा +पंतप्रधान या मुख्य पदावर मोरोपंत पिंगळ्यांचे कनिष्ठ पुत्र बहिरोपंत पिंगळे यांना नेमले. +बहिरोपंतांचे ज्येष्ठ बंधू निळोपंत हे अजूनही ताराबाईंच्याच पक्षात होते. सरसेनापती अथवा +सरलष्कर पद धनाजीराव जाधवांकडेच दिले. सुमंत किंवा डबीर म्हणून काही काळ +महादजी गदाधर व नंतर आनंदराव रघुनाथ यांना नेमले. सुरनीस किंवा सचिव म्हणून +नारोपंत शंकर यांना नेमले. अमात्य उर्फ मुजुमदारपदावर बाळकृष्ण वासुदेवपंत हणमंते मंत्री + किंवा वाकनीस म्हणून नारोराम रंगराव शेणवी यांस नेमले. पंडितराव अथवा राजपुरोहित +म्हणून मुदगलभट्ट उपाध्ये यांना आणि न्यायाधीश पदावर होनाजी अनंत यांना नेमले. पूर्वी +राजाराम महाराज जिंजीला असताना महाराष्ट्रातील कारभार कोणीतरी एका ज्येष्ठ व्यक्तीने +पहावा म्हणून अष्टप्रधानांव्यतिरिक्त 'प्रतिनिधी' हे एक नवीन पद निर्माण करण्यात आले + होते. शाहूराजांनी हे पद तसेच पुढे चालवून प्रथम काही काळ गदाधर प्रल्हाद व त्यांच्या + मृत्यूनंतर श्रीपतरावांकडे सोपवले. राज्याभिषेकाचा समारंभ केला. अनेक + अन्नदाने घातली. कारभार सुरू झाला. राज्याभिषेकानंतर काही दिवसांतच शाहूमहाराजांनी + ताराबाईंना तह करण्याविषयीचे पत्र पाठवले. परंतु, इतके होऊनही ताराबाई अजूनही +<<< + +आपली बाजू सोडण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे शाहूमहाराजांना पुन्हा एकदा युद्धाची +आघाडी लागली. साताऱ्याचा योग्य बंदोबस्त लावून, फंदफितूरी होणार नाही याची +नीट काळजी घेऊन शाहू महाराज कोल्हापूरास निघाले. वाटेत पंचगंगा नदी ओलांडतानाच +त्यांना बातमी समजली की, ताराबाई पन्हाळा सोडून रांगणा गडावर गेल्या आहेत. ताबडतोब +शा���ूमहाराजांनी पन्हाळा व पावनगड काबीज केला आणि ते रांगण्याकडे निघाले. इकडे +ताराबाईंनी आपले सरखेल कान्होजी आंग्रे यांना मदतीसाठी बोलावले, पण काही +कारणास्तव आंग्रे रांगण्यावर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने +ताराबाईंनीच रांगणा सोडला व त्या घाट उतरून सिंधुदुर्गाकडे गेल्या. ताराबाईंचे सेनापती +पिराजी रांगणा मागेच थांबले. शाहूमहाराजांच्या सैन्याने रांगण्याला वेढा +घातला. परंतु पिराजी घोरपड्यांनी रांगणा नेटाने झुंजत ठेवला. शेवटी चार महिन्यांच्या +अथक परिश्रमांनंतर रांगणा न घेताच (न मिळताच!) दि. १४ जून १७०८ रोजी शाहूमहाराज +पन्हाळगडावर आले व तेथेच मुक्काम ठोकला. इतक्यात एक अतिशय वाईट खबर +पन्हाळ्यावर येऊन धडकली. सेनापती धनाजी जाधवराव दि. २७ जून रोजी वडगाव येथे +मृत्यू पावले. शाहूमहाराजांचे बळच खर्ची पडले. याचा वापर करून घ्यायला ताराबाई +विसरतील कशा? त्यांनी लगेचच येसाजी दाभाड्यांचे चिरंजीव खंडेराव दाभाडे यांना +आपल्याकडे वळते करून घेतले. दाभाडे हे पवन मावळातल्या तळेगावचे इनामदार होते. +खंडेराव दाभाडे सैन्यासह आपल्याला मिळाल्याचे पाहून ताराबाई सिंधुदुर्गातून खेळण्यावर +(विशाळगडावर) आल्या. ताराबाईंनी लगेचच रामचंद्रपंत अमात्य व पिराजी यांना +विशाळगडावर बोलावून घेतले व पुढे कसे करावे याबाबत सर्वांनी खल केला. रामचंद्रपंतांनी +ताराबाईंना सल्ला दिला की, सध्या युद्धकलह थांबवावा. वारणा नदी ओलांडून साताऱ्यास न +जाता प्रथम कोल्हापूर व इतर मुलुखाचा बंदोबस्त लावावा. याकरता कोल्हापूर हे राजधानीचे +केंद्र बनवावे. ताराबाईंनाही रामचंद्रपंतांचा सल्ला पटला. त्यांनी शाहूमहाराजांकडे तहासाठी +दूत पाठवला. बरीच ओढाताण झाली. शेवटी कोल्हापूर व सातारा अशी स्वराज्याची दोन +राज्यांत वाटणी होऊन उभय पक्षांत तह झाला. + या तहान्वये शत्रूचा फितूर जर आपल्या हातात पडला तर त्यास आपल्या चाकरीत ठेवू +नये असे ठरले. परंतू हे कलम हास्यास्पद होते, कारण खरंच शाहू महाराजांकडच्या नारोराम +शेणवी, बाळाजीपंत, खंडो बल्लाळ चिटणीस इ.ना शाहू महाराजांनी कायम जवळ ठेवले तर +दाभाड्यांसारख्या अनेक माणसांना ताराबाईंनी दूर केले नाही. एकंदरीतच या तहामुळे +शांतता प्रस्थापित झाली होती असे वरकरणी वाटत होते. परंतु आता एक नवेच शीतयुद्ध +रंगणार अशी चिन्हं दिसू लागली होती. शाहू राजांना मुक्त करताना शाहजादा आझमशहाने +त्यांना लेखी नव्हे, पण तोंडी आश्वासन दिले होते की, 'तुमचा परिवार मातुश्रींसह आम्हापाशी +ठेवावा व तुम्ही आपल्या राज्यात जाऊन नीट व्यवस्था लावावी. यथाकाळी आम्ही राज्य +(दिल्लीची गादी) हस्तगत करू. त्याचप्रमाणे मोंगलांच्या दख्खनेतील सहा सुभ्यांची चौथाई व +सरदेशमुखीदेखील आपणांस बहाल केली जाईल.' शाहू महाराजांचा कारभार सातारा +प्रांतास तर ताराबाईंचा कारभार कोल्हापूर प्रांतात सुरू झाला होता. त्यामुळे आता दोघांनीही +<<< + +दिल्लीच्या आपल्या सरदेशमुखी व चौथाईची मागणी केली. वास्तविक पाहता +आझमने हे आश्वासन फक्त शाहू महाराजांनाच दिले होते. परंतु इकडे दिल्लीतील परिस्थिती +वेगळीच होती. आश्वासने देणाऱ्या आझमशहाचा मृत्यू झाला होता आणि मुअज्जम उर्फ +शहाआलम बहादूरशहा हा गादीवर बसला होता. त्याने प्रथम शाहू व ताराबाईंची ही मागणी +धुडकावून लावली. पण नंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मराठ्यांच्यात पुन्हा एकदा फूट +पाडायची ही एक नामी संधी आहे. त्यामुळे त्याने एक अट दोन्ही पक्षांना घातली. "शाहू +महाराज व ताराबाई राणीसाहेब यांणी आपापसात लढून वा सामंजस्याने तंटा पूर्णपणे +मिटवावा व सनदांचे खरे हक्कदार आणि स्वराज्याचे खरे उत्तराधिकारी कोण ते कायमचे +ठरवावे. म्हणजे त्या वारसदाराला चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा देण्यात येतील." +याचबरोबर बादशहाने शिवाजीराजांना (ताराबाईपुत्र) सातहजारी तर शाहू महाराजांना दहा +हजारी मनसब बहाल केली. परंतु चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा कोणाच्याही वाट्याला +आल्या नव्हत्या. + मधल्या काळात शाहू महाराजांनी धनाजी जाधवरावांच्या जागी त्यांचे पुत्र चंद्रसेन जाधव +यांना सरसेनापतीपद तर बाळाजीपंतांना 'सेनाकर्ते' हे पद दिले. 'सेनाकर्ता' म्हणजे राज्याचा +संरक्षणमंत्री. साहजिकच सैन्याची काही हालचाल करण्यापूर्वी शाहू महाराज सेनापती ऐवजी +'सेनाकर्त्यांची मसलत घेत, त्यामुळे चंद्रसेन जाधवांच्या मनात बाळाजीपंतांविषयी द्वेष वाढू +लागला. यातूनच शाहूमहाराजांचे अन्न खाऊन इमान ताराबाईंकडे झुकू लागले. चंद्रसेन +जाधवांनी ताराबाईंना पाठवलेल्या पत्रात ते स्पष्ट म्हणतात, ‘आमची निष्ठा स्वामींचे +(शिवाजीच्या) पायाशी. स्वामींची चरणसेवा करावी व यशकीर्ति संपादावी हाच हेतु ... ' + यावरूनच त्यांच्या मनात काय होते ते स्पष्टच कळते. त्यामुळे एकनिष्ठ असलेल्या +बाळाजीपंतांचे व चंद्रसेन जाधवांचे पटले नाही यात विशेष नाही ... साधारणतः याच +सुमारास, म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर १७११ च्या सुमारास दख्खनच्या सुभ्यावर दाऊदखान पन्नी +याच्या जागेवर निजाम-उल-मुल्क याची नेमणूक करण्यात आली. हा निजाम फार कपटी- +कारस्थानी होता. शाहूंच्या पक्षात मुत्सद्दी फार आहेत. त्यामुळे प्रथम शाहूंना बुडवावे. +ताराबाईंना नंतर मात देता येईल. त्यामुळे आधी ताराबाईंना मदत करावी असा डाव +निजामाने टाकला. त्याच्या मदतीमुळे हातात जास्त बळ आल्यासारखे वाटले. +शाहूमहाराजांच्या समोर एक नवेच संकट उद्भवले. अशातच ताराबाईंनी शाहूमहाराजांच्या +विरोधकांना बंड मांडण्यास उदाजी चव्हाण, दमाजी थोरातांसारख्या बंडखोरांना +जेरीस आणण्यासाठी शाहूमहाराजांनी चंद्रसेन जाधव व बाळाजी विश्वनाथांना रवाना केलं. +मुळातच एकमेकांचे पटत नव्हते आणि अशा परिस्थितीत एके दिवशी या दोघांच्यात +कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले. उडाला. जाधव सेनापती असल्याने फौज +त्यांच्या हुकुमातली होती. जाधवांनी बाळाजीपंतांना पकडण्याचा हुकूम सोडला. परंतु, पंत +शिताफीने फौजेतून निसटले व थेट सासवडला अंबाजीपंत पुरंदऱ्यांकडे गेले. +अंबाजीपंतांच्या मदतीने बाळाजीपंत पुरंदर किल्ल्यात दबा धरून राहिले. पुरंदरगड हा +सचिवांच्या ताब्यात होता. सेनापती व सेनाकर्ते यांच्या भांडणात आपल्या जहागिरीची +<<< + +खराबी नको म्हणून सचिवांनी बाळाजीपंतांना पुरंदर सोडायला सांगितले. शेवटी बाळाजीपंत +बरोबर सातशे स्वार, कुटुंब व आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन परिंच्याच्या खिंडीने उतरत +असतानाच सेनापती जाधवांच्या फौजेने बाळाजीपंतांना पकडले व वाईजवळच्या +पांडवगडावर (माचीवर) कैदेत ठेवले. इतक्यात सासवडला अंबाजीपंत पुरंदरे व खंडो +बल्लाळ चिटणिसांना समाचार कळला. त्यांनी तातडीने साताऱ्यास जाऊन शाहू महाराजांची +भेट घेतली व त्यांना समजावले, "ते (बाळाजीपंत) कर्ते शिपाई, मुत्सद्दी, शहाणे, कर्ते माणूस +यांजवर सेनापतीने असे गुजरले, म्हणून स्वामींस शरण आले. सेनापतींचे पासून रक्षण्याचे +अभय देऊन, रक्षिले पाहिजे. संरक���षण होण्यास अन्य त्राता कोणीही नाही. बाळाजीपंत बहुत +चतुर मनसुब्याविषयी व शिपाई मोठे धाडसाचे आहेती. मोठी कार्ये तडीस न्यावयास योग्य +आहेत." शाहू महाराजांनाही बाळाजीपंतांची कामगिरी माहीत होती. त्यांनी विचार न करता +लगेचच अभय-पत्र जारी केले व बाळाजीपंतांच्या सुटकेचे आदेश दिले. शाहूमहाराजांनी +बाळाजी विश्वनाथांना अभय दिल्याची वार्ता चंद्रसेन जाधवांना समजली. त्यांनी थेट शाहू +महाराजांनाच पत्र पाठवले की, 'बाळाजीपंतास स्वामींनी आश्रय देण्याचे ठरवले असल्यास +आम्हास महाराजांचे पाय सुटतील. आम्ही त्यांचे पारिपत्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. +शाहू महाराजांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा चंद्रसेन जाधव उघड उघड +निजाम-उल-मुल्काच्या पक्षाला जाऊन मिळाले. शाहू महाराजांना ही एक नवीनच डोकेदुखी +झाली. त्यांनी रिकामे झालेले सेनापतीपद चंद्रसेन जाधवांचा भाऊ संताजी जाधवांना दिलं. +परंतु अनेक सरदार ताराबाईंकडे असल्याने व अनेकांनी बंड मांडल्यामुळे शाहू महाराजांना +सैन्याची निकड भासू लागली. + सैन्याची पुनर्उभारणी करण्याची सारी जबाबदारी बालाजी विश्वनाथांनी 'सेनाकर्ते' या +नात्याने आपल्या शिरावर घेतली. यात बाळाजींना अंबाजीपंत पुरंदऱ्यांची फार मोलाची मदत +झाली. अंबाजीपंतांच्या अनेक ओलखी व स्नेहसंबंधांमुळे बारामतीकर नाईक सावकार, +चासकर जोशी सावकार अशा सावकारांनी बाळाजी विश्वनाथांना भरपूर अर्थसाहाय्य केले. +याकरिता मदत म्हणून शाहू महाराजांनी बाळाजीपंतांना २५ लक्ष रु.चा सरंजाम व नाशिक +गाव मोकासा दिला. बाळाजीपंतांनी देखील या सावकार मंडळींचे ऋण आयुष्यभर उतरून +ठेवले नाही. त्यांनी या मंडळींशी सोयरिकी जोडल्या. आपली थोरली मुलगी भिऊबाई हीचा +विवाह कृष्णाजी नाईक बारामतीकर जोश्यांचा पुतण्या विश्वनाथ उर्फ बाबुजी नाईक +बारामतीकरांशी आणि थोरला मुलगा विसाजी (विश्वनाथ) उर्फ बाजीराव यांचे लग्न महादजी +कृष्णाजी जोशी चासकर यांची मुलगी काशिबाई हिच्याशी केले. नवीन सैन्य उभारले जात +होते. अशातच चंद्रसेन जाधव नवाब निजाम-उल-मुल्काच्या निसबतीची फौज घेऊन +बाळाजीपंतांवर पुन्हा चालून आले. बाळाजीपंत व नवे सेनापती संताजी जाधवराव खंबाटकी +घाट ओलांडून पुरंदरच्या नैऋत्येस असणाऱ्या नारायणगावापाशी येऊन पोहोचतात न +पोहोचतात तोच कात्रज ओलांडून चंद्रसेन जाधवांची मोंगली फौज नारायणपुराजवळ येऊन +पोहोचली. दोन्ही सेना त्वेषाने एकमेकांवर चालून गेल्या. लढाई सुरू होऊन पुरते दोन प्रहर +होत आले तरी कोणीही हटेनात. चंद्रसेन जाधवांचे बाळाजीपंतांशी शत्रुत्व होते. त्यांना +<<< + +बाळाजीपंतांना मारायचे होते. परंतु, पंतांच्या संरक्षणाची जबाबदारीच जणू संताजी +जाधवरावांनी घेतली होती. एका बाळाजी विश्वनाथांसाठी आजचे युद्ध सख्ख्या भावाभावांत +पेटले होते. एकाला पंतांना मारायचे होते, तर दुसऱ्याला पंतांना राखायचे होते. शेवटी +संध्याकाळी दोन्ही सैन्ये विश्रामासाठी आपापल्या तंबू-राहुट्यांकडे परतली. रात्री चंद्रसेन +जाधवांनी साताऱ्यास महाराजांकडे स्वार पाठवला. त्यांचे म्हणणे होते की, 'आम्ही तह +करायला तयार आहोत. पण जर महाराजांचे मनी बाळाजीस आमचे हाती द्यावयाचे नको +असल्यास, तरी महाराजांनी आपलेपासून त्यास दूर करावा. याउपरी आम्ही बाळाजीसी +वाकडे चालणार नाही.' पण हे महाराजांना अजिबात पटले नाही. त्यांनी चंद्रसेन जाधवांना +निरोप पाठवला, 'ते होणे नाही! आपण आग्रह धरू नये. पुन्हा माघारी यावे. स्वराज्यात +मानाची चाकरी करावी.' चंद्रसेन जाधवांना उमगले की, महाराज आता बालाजी विश्वनाथांना +सोडणार नाहीत आणि त्यांना हेही कळून चुकले की, आता जास्त काळ आपण मराठी +सैन्यासमोर तग धरू शकणार नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी उजाड़ायच्या आधीच चंद्रसेन +जाधव निजामाने जहागीर दिलेल्या भालकी ग्रामाकडे दौडत निघाले. ही लढाई संपून फौजा +सातारला पोहोचतात तोच खटावच्या कृष्णरावाने बंड मांडले. नवे सेनापती व बाळाजी +ताबडतोब खटावकरांवर चालून गेले. बंड मोडले. + परंतु, बाळाजीपंत व शाहू महाराजांना स्वस्थता मिळण्याची चिन्हे नव्हती असेच दिसते. +कारण इ. स. १७१२ च्या मार्च महिन्यात कोकणातून कान्होजी आंग्रे यांनी बंडाचे निशाण +फडकवले. चंद्रसेन जाधवांचा पराभव झाला पाहून ताराबाईंची चलबिचल झाली. त्यांनी +रामचंद्रपंत अमात्यांकरवी कान्होजी निरोप पाठवला. संपूर्ण कोकणपट्टीत सिद्दी, +पोर्तुगीज, इंग्रज, मोंगल अशा परकियांना तोंड देत ताठ उभा असलेला एकमेव मराठा +म्हणजे 'कान्होजी आंग्रे'. यावरूनच त्यांच्या ताकदीची कल्पना करता येते. पश्चिमेच्या सागरी +किनाऱ्याबरोबरच उत्तर कोकणातला जव्हार, कल्याण-भिवंडी, कर्जत, राजमाची व पेठचा +किल्ला अशी अनेक बलाढ्य ठाणी कान्होजी ताब्यात होती. वास्तविक इ. स. +१६७५ पासून उत्तर कोकणवर छत्रपतींच्या पेशव्यांचीच देखरेख असे. त्यामुळे सध्या हा प्रांत +पेशवे बहिरोपंत पिंगळे यांच्याकडे असावयास हवा होता. म्हणून तो मुलुख पुन्हा घेण्यासाठी +महाराजांनी बहिरो मोरेश्वर पिंगळे व खंडो बल्लाळ चिटणीस यांना कान्होजींशी +बोलण्याकरता पाठवले. कान्होजी हे ताराबाईंचे पक्षपाती होते. पेशवे व चिटणीस इंद्रायणी +ओलांडून बोरघाट उतरायला येत असतानाच वाटेवर मळवली-वडगावच्या माळावर कान्होजी + अचानक हल्ला चढवला. पेशवे आणि चिटणीस बेसावध होते. ते अलगद कान्होजी + ताब्यात आले. कान्होजींनी ताबडतोब त्यांची रवानगी कुलाब्याला केली व +सातारला बातमी पोहोचायच्या आधीच लोहगड-विसापूर, तुंग-तिकोना इ. किल्ले काबीज +केले. + इकडे महाराजांना चिंता लागून राहिली, आपले बहुतांश सैन्य जागेवर नाही. पुरेसा +अर्थसाठा नाही अशा वेळेस पेशवे व चिटणीसांना सोडवणारा कोण पराक्रमी सेनानी आहे +का आपल्याकडे? आता शक्तीपेक्षा युक्तीनेच काम करणे सोयीस्कर होते. पण असे जुने- +<<< + +जाणते बुद्धिवान तरी कुठे होते? रामचंद्रपंत अमात्य ताराबाईंकडेच होते. फक्त परशुरामपंत +प्रतिनिधी साताऱ्यात होते. त्यांचा विचार घ्यावा असे महाराजांनी ठरवले. सर्वात महत्त्वाचे +म्हणजें पेशवेपद रिकामे पडले होते ते पुन्हा चालवणे गरजेचे होते. महाराजांनी + परशुरामपंतांना पेशवेपद बहाल करायचे ठरवले. परंतु, परशुरामपंत हे पेशवेपदाकरता फारसे +उत्सुक नव्हते. त्यामुळे शाहूमहाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे असा प्रश्न पडला. + त्याचवेळेस अंबाजीपंत पुरंदरे सासवडहून सातारला आले. शाहूमहाराजांनी अंबाजीपंतांचाही + विचार घेतला. अंबाजीपंतांनी शाहूमहाराजांना स्पष्ट सांगितले, "बाळाजी विश्वनाथ भट कर्ते + अधिकारी, त्यांजकडे फौजेचे वळण आहे. त्यास पेशवाईची वस्त्रे द्यावी." कदाचित + शाहूमहाराजांना देखील अंबाजीपंतांचे म्हणणे पटले असावे आणि महाराजांनी विचार केला, + "बालाजी विश्वनाथ भट श्रीवर्धनकर, कोकण माहितगार. कोकणच्या माणसाची +पारख त्यांस अचूक. कान्होजी मात देणारे दुसरे कोणी याज जैसे नाही. सबब +पेशवेपद यांसच द्यावे." आणि बहिरोपंत पिंगळ्��ांच्या अटकेनंतर सुमारे पाच महिन्यांनी दि. + १७ नोव्हेंबर १७१३ रोजी पुण्याच्या जवळ चार कोसांवर 'मांजरी' या गावामध्ये छत्रपतींनी +बालाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्रे दिली. हे सारे बहुतांश करून अंबाजीपंतांच्या +सल्ल्याने घडले होते. पूर्वी बाळाजीपंत कोकणातून देशावर आले तेव्हादेखील अंबाजीपंतांनी +पूर्णपणे साहाय्य करून बालाजी विश्वनाथांना मदत केली होती. या उपकारांची जाण ठेवून +पेशवाई मिळाल्यानंतर पेशव्यांचे मुतालिक म्हणून अंबाजीपंत पुरंदऱ्यांना नेमावे अशी + शिफारस बाळाजीपंतांनी महाराजांकडे केली. महाराजांनीही मानले व त्यांनी अंबाजीपंतांना +पेशव्यांच्या मुतालकीची वस्त्रे दिली. त्याचबरोबर पोतनिशी व जामदारखान्याची +जबाबदारीदेखील अंबाजीपंतांवरच पडली. कोकणातून घाटावर येताना आपल्याला ज्या + भानू बंधूंनी सदैव साथ दिली त्यांच्याशी मदतीची परतफेड म्हणून बाळाजीपंतांनी हरिपंत + भानू यांना फडणविशी दिली. दुर्दैवाने काही दिवसांतच हरिपंत स्वर्गवासी झाले, म्हणून त्यांचे + बंधू बाळाजी महादेव भानू यांना फडणवीस केले. बाळाजीपंतांना पेशवाईपद मिळाल्यानंतर +त्यांचे रिक्त झालेले 'सेनाकर्ते' हे पद महाराजांनी होनाजी अनंतांस दिले. बाळाजीपंतांना +महाराजांनी १६ महाल बहाल केले. यात खेड (मंचर), शिरूर, वडगाव, आंबेगाव, +दौंड, सासवड, सुपे, इंदापूर, बारामती, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी व पुणे हे महाल +होते. त्याशिवाय पुरंदर आणि सिंहगड़ हे किल्ले बहाल केले व सालीना तनखा १३ हजार +होन कबूल केला. बाळाजीपंत पेशवेपदावर आल्यावर त्यांनी जी पत्रे रवाना केली त्या पत्रांवर +त्यांचा शिक्का आढळतो- "शाहू नरपती हर्षनिधान, बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान." + पेशवाई वस्त्र समारंभ होताच बाळाजी विश्वनाथ लगेचच कान्होजी मोहिमेवर + निघाले. कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमारावरचे एक जबरदस्त अधिकारी होते. ते +ताराबाईंच्या पक्षाचे सरखेलच होते. पूर्वी, जेव्हा बाळाजी विश्वनाथ देशावर आपली +कर्तबगारी दाखवण्याच्या उंबरठ्यावर होते तेव्हा कान्होजी आंग्रे हे राजाराम महाराजांतर्फे +कोकणात मोहिमा चालवत होते. कान्होजींनी मोंगली फौजांचे कोकणातून समूळ उच्चाटन +करून संपूर्ण नव्हे, पण कोकणच्या बहुतांश भागात पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व निर्माण ���ेले +<<< + +होते. राजाराम महाराज व ताराबाईंचा कान्होजींच्या पराक्रमावर फार विश्वास होता. श्री +थोरल्या शिवछत्रपती महाराजांच्या काळात जसे मायनाक भंडारी, वेंटाजी भाटकर, +दौलतखान, दर्यासारंग वगैरे आरमारी योद्धे होते. तसेच शूर म्हणून उभ्या +कान्होजींचे नाव भिरभिरणाऱ्या वाऱ्याप्रमाणे नाचत होते. परंतु देशावर शाहू महाराज व +ताराबाईंचा संघर्ष सुरू झाला असता कान्होजींनी ताराबाईंच्या पक्षाची कड घेतली व +शाहूमहाराजांच्या विरोधात जाऊन महाराजांच्या पेशव्यांना व चिटणिसांनाच कैद केले. आता +बालाजी विश्वनाथ पेशवे फौज घेऊन निघाले. बाळाजीपंतांनी प्रथम जे किल्ले +बंडाव्याने घेतले होते ते लोहगड-विसापूर, तुंग-तिकोना इ. किल्ले पुन्हा जिंकून घेतले. +तेवढ्यात पेशव्यांना खबर मिळाली की, कान्होजी बहिरोपंत पिंगळे व चिटणिसांना घेऊन +कुलाब्याच्या किल्ल्यावर गेलेत. बाळाजीपंत लोहगडाच्या दक्षिणांगास असलेल्या +उंबरखिंडीने पाली-नागोठणे मार्गाने अलिबागजवळ आले. आता मुख्य डाव इथेच रंगणार +होता. बाळाजीपंतांनी विचार केला की, जर कान्होजींबाबत आपण उलटा निर्णय घेऊन +युद्धाचीच आघाडी उघडली तर सारेच कठीण होऊन बसेल. शक्यतोवर प्रथम कान्होजींना +गोडी-गुलाबीनेच समजावावे. कारण कान्होजींसारखा आरमारावर मजबूत पकड असलेला +अधिकारी जर आपल्याला मिळाला तर स्वराज्याची कोकणपट्टी निर्धास्त होईल आणि सिद्दी, +मोंगल, पोर्तुगीज इ. परकियांनाही चाप बसेल. शेवटी विचार करून बाळाजी विश्वनाथांनी +कुलाब्याच्या किल्ल्याकडे आपला खास दूत पाठवला, कान्होजी किल्ल्यातच होते. +दरवाजाबाहेर पेशव्यांचा माणूस आलाय ही बातमी कान्होजींकडे गेली. पेशवे साताऱ्याहून +निघाल्यापासून पेशव्यांच्या फौजांच्या हालचाली कान्होजींना समजत होत्या. आपण घेतलेले +डोंगरी किल्ले पेशव्यांनी पुन्हा जिंकले व पेशवे फौजेसकट कोकणात उतरले आहेत या +खबराही कान्होजींना मिळाल्या. पेशवे आता आपल्याविरुद्ध युद्ध पुकारणार असे +कान्होजींना वाटले आणि म्हणूनच त्यांनी आपली गलबते व सैन्य जय्यत तयार ठेवले होते. +पण इतक्यातच पेशव्यांचा स्वार आल्याची बातमी कान्होजींना मिळाली आणि ते चमकलेच. +पेशव्यांचा मनसुबा तरी काय? दगाबाजी? नाही! दगाबाजी त्यांच्या रक्तात नाही. कान्होजींनी +त्या स्वाराला सदरेवर घेऊन यायला फर्मावले. कान्होजी स्वतः कुलाब्यातला सदरेवर बसले +होते. वेळ रात्रीची होती. मागच्या बाजूला सागराची प्रचंड गाज घुमत होती. लाटा किल्ल्यावर +थडाड् थडाड आपटत होत्या. कान्होजी विचार करीत होते. इतक्यातच दरवाजातून एक +स्वार आत आला. त्याने कान्होजींना मुजरा करून पेशव्यांचे पत्र दिले. कान्होजींनी पत्रावरून +नजर फिरवली. पेशव्यांनी कान्होजींना हरतऱ्हेने समज देण्याचा प्रयत्न केला होता. "आपण +सागराच्या छातीवरचे थोर सुभेदार. आपले तीर्थरूप तुकोजीराजे आंग्रे यांनी शिवाजी +महाराजांची मनोभावे चाकरी केली. आता त्यात शिवाजी महाराजांचे वंशज शाहूमहाराज +गादीवर बसले आहेत. आपण त्यांच्या पायाशी इमान वाहिले पाहिजे. असे असता आपण +ताराबाईंशी इमाने कसे राहता? आज सिंहासनावर शाहूमहाराजांचाच हक्क आहे. आपण +जरी ताराबाईंकडे निष्ठा वाहिली असेल तरी आमच्या कामात हस्तक्षेप करू नयेत. आपण +आमचे पेशवे (याआधीचे) व चिटणीस यांना कैद करून नेले. ते आपणास कसे नेववले? +<<< + + आम्हास महाराजांची आज्ञा आहे की, आपले (आमचे) किल्ले, प्रांत व ठाणी परत राज्यात + आणावीत व आपल्याशी युद्ध करून पेशवे व चिटणिसांना सोडवावे. एकदा लढाई सुरू +झाली की, आम्हास थांबणे अशक्य. तरी आधी विचार करून महाराजांची भेट घेऊन योग्य ते +करणे. देवाच्या कृपेने महाराज मोगलाईतून सुटून माघारा आले व स्थिर राज्य बसवले. + यास्तव तुम्ही लढाई करून विजय पावाल, ते घडणार नाही. बहुत काय लिहावे? सूजञपणे + विचार करावा!" पत्र घेऊन आलेला स्वारही पेशव्यांच्या खास विश्वासातला होता. त्यानेही +कान्होजींना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी पेशव्यांचा खास निरोप कान्होजींना + सांगितला. पेशव्यांनी त्या स्वारामार्फत कळवले होते की, आम्ही भट श्रीवर्धनचे. (म्हणजे + कोकणातलेच!) आपण दोघे शेजारी. कोकणातला सिद्दीकडून मराठी रयतेला उपद्रव किती + भयंकर आहे हे आपणास ठावे आहेच. महाराणी मातोश्री ताराबाईंचे सैन्यबळ आता फारसे + राहिले नाही. त्यामुळे जर जंजिऱ्याच्या सिद्दीला मात द्यायची असेल तर एकट्या कान्होजींना +ते शक्य नाही व ताराबाईंकडून पैशाची व सैन्याची फारशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. याउलट +जर कान्होजी व शाहूमहाराज एक झाले तर दोघांच्याही सामर्थ्याने नुसते सिद्दीच नाही तर +इंग्रज व पोर्तुगीजांनाही टाकता येईल. त्याकरिता आपणाकडे असलेले 'सरखेल'पद + महाराजांकडून पुढे चालवले जाईलच, शिवाय वेगळा सरंजामही मिळेल. कान्होजींनी त्या + स्वाराचे म्हणणे ऐकून घेतले व त्यास आपल्या मुक्कामावर जाण्यास सांगितले. रात्रभर +कान्होजी विचार करत होते. बाळाजीपंत पेशवे म्हणतात ते खरंच आहे. तसे पाहिले तर + ताराबाईंचा व त्यांच्या पुत्राचा गादीवर काहीच हक्क नाही. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या + पुत्रालाच राज्याभिषेक व्हायला हवा. पण दुर्दैवाने शाहूमहाराज मोंगलांच्या हाती पडल्याने +राजाराम महाराज व पुढे त्यांच्या पुत्राला गादी मिळाली. पण आता शाहूमहाराज मोंगलांच्या + कैदेतून सुटून आलेत व सिंहासनाधीश्वर झालेत. त्यातच ताराबाईंचा पक्षदेखील ढासळत +चालला आहे. यापुढे आपला निभाव लागेल का? आणि ज्या शिवाजी राजांकडे आपण + इमान वाहिले तेच आता गादीवर नाहीत. त्यामुळे आता शपथेची गरज ती काय? आज + शाहूमहाराज आपल्याला स्वतःहून बोलावणे पाठवतात. पूर्वीइतकाच किंबहुना त्याहूनही + अधिक सन्मान होईल अशी शपथ खुद्द महाराजांचे पेशवे आपल्याला देत आहेत. ही संधी + हातची दवडता कामा नये. दुसऱ्या दिवशी कान्होजींनी पेशव्यांच्या स्वाराला बोलावून घेतले. + त्याची उत्तम सर्फराजी करून बक्षिस दिले व त्यामार्फत पेशव्यांना निरोप कळवला. 'आपला + मनसुबा आम्ही जाणतो. आपण आपली लढाईची फौज सोडून खाशा फौजेसह भेटीस यावे. + म्हणजे खाशी भेट होताच एकविचारे जे मनी येईल ते करू. आम्ही महाराजांचे चरणी विनम्र + आहोत.' स्वार कुलाब्याच्या किल्ल्यातून थेट पेशव्यांच्या फौजेकडे दौडत निघाला व त्याने +ताबडतोब पेशव्यांची भेट घेऊन मनसुबा पेश केला. पेशव्यांनी कान्होजींचे म्हणणे आनंदाने +मान्य केले. लवकरच पोलवण (पल्लीवन? सुधागड-पाली?) या गावाजवळ खासे पेशवे + बालाजी विश्वनाथ व कान्होजी आंग्रे यांची भेट झाली. एकमेकांना नजराणे-फेर नजराणे + दिल्यावर उभयतांच्यात चर्चा झाली. पश्चिमेकडच्या कोकणपट्टीमध्ये आपल्या नाविक +सत्तेबरोबर जर स्वराज्याची घोडदळे उतरली तर कान्होजींच्याच पराक्रमास चाँद लागतील हे +<<< + +कान्होजींना व्यवस्थित पटले. ही भेट फेब्रुवारीच्या मध्यावर झाली असावी व यानंतर लगेचच +दि. २८ फेब्रुवारी १७१४ रोजी लोहगडाच्या जवळ पेशवे व आंग्रे यांच्यात लेखी तह झाला. तो +तहनामा ��सा - "थोरातांशी अपक्रिया करू नये. भाकर दिली आहे ती त्यांनी घ्यावी. +कोकणची मसलद दसऱ्यापासून मार्गशीर्षापावेतो तुम्ही राहून प्रतिवर्षी करावी. हबशी-फिरंगी +मारून गर्देस मिळवावे. राजमाची, श्रीवर्धन, मनरंजन, मृगगड, कोथळा आम्हांकडे + (शाहूमहाराजांकडे) द्यावे. लोहगड, तुंग, कोरीगड सामानासहित तुम्हांकडे +घ्यावे. तुम्हांकडील चाकर आम्ही न ठेवावा व आम्हांकडील तुम्ही न ठेवावा. खाजगत गाव +तुम्हाकडे आहेत ते चालवावे. १. पणवेली (पनवेल), १ शिरढोण, १ सोमाटणे, १ तळे घरचे +किल्ले यास तुम्ही राजकारण करून घेतले तर आमचे स्वाधीन करावे. कुलाब्यास जाताच +बहिरोपंत पिंगळे व चिटणिसांना कैदेतून मुक्त करावे. सातारियाहून महाराजांकडून +कान्होजींना पूर्वीप्रमाणेच सरखेल किताब बहाल करावा. त्याउपर कान्होजींनी +कोल्हापूरकरांचा पक्ष सोडावा. शाहूछत्रपतींनी १६ सबघड (डोंगरी किल्ले) व १० अवघड +(जलदुर्ग) असे एकूण २६ किल्ले बहाल करावेत व त्याभवतालचा एकूण २४ लक्ष +होनांचा मुलुख कान्होजींना सरंजामाकरता मिळावा. या डोंगरी किल्ल्यांमध्ये कोथळीगड, +बहिरवगड (ढाक बहिरी?), रायगड, व्यंकटगड, भिरागड, माणिकगड, रसाळगड, सागरगड, +पालगड, खारेपाटण, राजापूर, कामते, अंबरगड, साठवली, श्रीवर्धन व मनरंजन असे १६ +गिरीदुर्ग होते तर जलदुर्गांमध्ये खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अवचितगड, देवगड, +फत्तेगड, जयगड, यशवंतगड आणि कनकदुर्ग यांचा समावेश होता. कान्होजींकडे हा सारा +प्रदेश आल्यावर त्यांची ताकद कैक पटींनी वाढली. याच वेळेस महाराजांनी आंग्यांना +दिलेल्या काही मुलुखापैकी सुवर्णदुर्ग, श्रीवर्धन व मनरंजन (राचमाची) हे किल्ले जंजिऱ्याच्या +सिद्दी याकुतखानाच्या ताब्यात होते. पेशवे व आंग्रे यांच्या संयुक्त फौजांनी किल्ले अगदी +थोड्या अवधीतच जिंकले. त्यामुळे सिद्दी याकुतखान पुरता घाबरला. आत्तापर्यंत हा +कान्होजी एकटाच होता. पण आता साताऱ्याचा पेशवाही त्याच्या बरोबर आहे. आता +आपल्याला काहीही करून त्यांना रोखायलाच हवे, या विचाराने याकुतला ग्रासले. शेवटी दि. +३० जानेवारी १७१५ रोजी सिद्दीने कान्होजी आंग्यांशी म्हणजेच सातारा दरबाराशी तह केला. +कान्होजी व पेशवे बाळाजी विश्वनाथ एकत्र झाले. बाळाजीपंतांनी आपल्या हुशारीने +कान्होजींना पुन्हा शाहूमहाराजांकडे वळते क���ले हे पाहून इंग्रज, पोर्तुगीज, मोंगल, सिद्दी या +सर्व परकीय सत्तांची पाचावर धारण बसली. हे महत्त्वचे काम केल्याने शाहूंचा +बाळाजीपंतांवरचा विश्वास कैकपटीने वाढला व परिणामी दरबारातही बालाजी विश्वनाथांचे +वजन इतर मानकऱ्यांच्या तुलनेत वाढले. + सातारा दरबारात या अनेक घडामोडी घडत असताना तिकडे कोल्हापूर दरबारातही +अनेक गोष्टी घडत होत्या. ताराबाई आपल्या पक्षकारांबरोबर शाहूमहाराजांना पाडायच्या +गोष्टी करत असतानाच दुसरीकडे राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नीने, राजसबाईंनी +आपल्या मुलाला, संभाजीराजांना गादीवर बसवण्यासाठी फासे फेकले आणि एके दिवशी +ताराबाईंची खलबते चालू असतानाच राजवाड्यावर पहारे बसवून ताराबाई, शिवाजी व इतर +<<< + +माणसांना कैद केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीराजांना कोल्हापूर गादीवर अभिषेक +करण्यात आला. परंतु राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर सारा कारभार ताराबाईच पाहत +असल्याने ताराबाईंना अटक केल्यानंतर राजसबाईंना अचानक मिळालेल्या कारभाराचा +डोलारा सावरणे अत्यंत जाऊ लागलं. शाहूमहाराजांच्या वाढत्या यशापुढे आणि +बालाजी विश्वनाथांसारख्या अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान माणसाच्या राजकारणांमुळे +कोल्हापूरकरांचा निभाव लागणे अशक्य झाले होते. त्यामुळे सातारा दरबारने +कोल्हापूरकरांना सतत आपल्या दबावापुढे नमते केले. याचा उपयोग पुढे मराठ्यांचा कट्टर +शत्रू असणाऱ्या निजामाने पेशव्यांच्या विरुद्ध पुरेपूर करून घेतला. + इ.स. १७१५ च्या जानेवारीत पेशवे बाळाजी विश्वनाथ व कान्होजी तह +झाला. यानंतर बाळाजीपंत साताऱ्यात गेले असता पुणे प्रांतात निजामाच्या मोंगली फौजांनी +पुन्हा उच्छाद मांडला. अशातच या स्वाऱ्यांमध्ये निजामच्या फौजेबरोबर भुरटे चोर व +दरवडेखोरदेखील हात धुवू लागले. त्यामुळे महाराजांनी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना पुन्हा +पुणे प्रांताचे अधिकार देऊन मोंगलांच्या उपद्रवाला थांबवण्याकरता पाठवले. यावेळेस +निजामाच्या वतीने रंभाजीराव निंबाळकर पुण्याचा अंमलदार होता. त्याच्या निसबतीने बाजी +कदम हा पुण्याचा कारभार पाहत होता. बाळाजीपंतांनी पुण्यात येताच प्रथम या बाजी +कदमलाच आपल्या बाजूने वळवले. बाजी कदम व राव रंभाजी यांच्या खासगी मालमत्तेला +कोणत्याही पद्धतीची तोशी�� लागणार नाही या अटीवर बाजीने पुणे प्रांत सरळ पेशव्यांच्या +हवाली केला. पुणे प्रांत म्हणजे स्वराज्याचा गाभा. थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे +बालपण इथेच गेले. बाळाजीपंतांनी प्रथम लाल महालाभोवती आपले पहारे बसवले. +सततच्या हल्ल्यांमुळे व दरोडेखोरांच्या उच्छादामुळे पुण्याची रयत त्रासली होती. +बाळाजीपंतांनी सुरुवातीला सर्व कर माफ करून रयतेला मुक्त धान्य पिकवायला प्रोत्साहन +दिले. या सर्व गोष्टीत आणखी एक चांगली गोष्ट अशी घडली की, दिल्लीचा बादशाह +फर्रुखसियर याने निजामाला दख्खनच्या सुभेदारीवरून दूर केले व त्याच्या जागी हुसेनअली +सय्यद याची सुभेदार म्हणून नेमणूक केली. हा हुसेनअली निजामाचा कट्टर विरोधक होता. +म्हणूनच की काय, हुसेनअलीने कोल्हापूरकरांचा पक्ष उचलून न धरता शाहू महाराजांशीच +मित्रत्वाचे बोलणी सुरू केली. शाहूमहाराज व बालाजी विश्वनाथ पेशव्यांच्या मात्र +हुसेनअलीची नेमणूक पथ्यावरच पडली. इकडे निजामाची झाल्यामुळे बंडखोरी +करून निजामाला मिळालेल्या चंद्रसेन जाधव, दमाजी थोरात रुस्तुमराव इ.च्या कारस्थानांनी +आणखीनच जोर धरला. यात निजामाचा खास चेला तुर्कताजखान याचाही समावेश होता. +या सर्वांचा बंदोबस्त करण्याकरता शाहूमहाराजांनी पेशव्यांना रवाना केले. यावेळेस +रुस्तुमराव थोरात, यवत-भुलेश्वरजवळच्या पाटसच्या होते. इतर लोक कुठे होते याचा +पत्ता नव्हता. पेशवे बाळाजी विश्वनाथांबरोबर त्यांचे अतिशय परमस्नेही अंबाजीपंत +पुरंदरेदेखील मोहिमेत सामील झाले होते. परंतु रुस्तुमराव चलाख होता. बाळाजीपंत +फौजेसह पाटसच्या जवळ येताच रुस्तुमराव शरण यायच्या गोष्टी करू लागला. त्याने +अंबाजीपंत पुरंदरे, बाळाजी विश्वनाथ पेशवे, सरदार पिलाजी जाधवराव इ. खाशा मंडळींना +<<< + +तहाच्या बोलणीसाठी बोलावून घेतले. रुस्तुमरावाच्या दगाबाजीचा अंदाज न आल्याने +सारेजण सैन्य बाहेर ठेवून आले. परंतु, शिरतानाच रुस्तुमरावाने दरवाजा बंद +करून खाशांना पकडण्याचा हुकूम सोडला. क्षणात कैद झाली. रुस्तुमरावाने +बाळाजीपंताकडे भरपूर खंडणी मागितली व ती लवकर घ्यावी म्हणून अंबाजीपंत पुरंदरे यांना +त्रास द्यायला सुरुवात केली. राखेचे तोबरे भरायलाही रुस्तुमरावाने कमी केले नाही. इकडे +शाहूमहाराजांना ही बातमी समजली. आपला हनु���ानच पकडला गेला याचे महाराजांना +अतिशय दुःख झाले. त्यांनी ताबडतोब मागतोय खंडणी भरून सुटका करून घेण्याचा +निरोप पेशव्यांकडे पाठवला. शेवटी रुस्तुमरावाने अंबाजीपंत पुरंदरे व पिलाजी जाधवराव +यांना ओलीस ठेवून खंडणी आणण्याकरिता बाळाजीपंतांना मुक्त केले. ठरल्याप्रमाणे +बाळाजीपंतांनी ताबडतोब खंडणी भरून अंबाजीपंत व पिलाजींची सुटका केली. इकडे +पाटसच्या जवळच पुरंदर गडावर असणाऱ्या नारोशंकर सचिवांना दगाबाजीची बातमी +समजली. ते ताबडतोब फौजफाटा घेऊन पाटसवर चालून निघाले. प्रत्यक्षात इकडे खंडणी +देऊन सुटकासत्र झाल्यानंतर नारोशंकर पाटसला पोहोचले. रुस्तुमरावाने दगा करून +नारोशंकर सचिवांनाही पकडले. शेवटी सरदार पिलाजी जाधवरावांनी मध्यस्थी करून, + खंडणी देऊन सचिवांची सुटका करवली. इतक्यात साताऱ्याहून (संताजी जाधव?) +सेनापती फौजेसह बाळाजीपंतांना येऊन मिळाले. आता हाती अधिक बळ आल्यामुळे +सेनापती व पेशव्यांनी पाटसच्या हल्ला चढवला. चारही बाजूंनी तोफांचा मारा करून + तटबंदी पूर्णपणे पाडली व सैन्य आत घुसून रुस्तुमरावाच्या हातापायांत बेड्या +ठोकल्या व त्याला साताऱ्यास रवाना केले. + या मधल्या काळात रुस्तुमरावाच्या दगाबाजीचा फटका बहुतेक बाळाजीपंतांच्या +कुटुंबीयांनाही बसला असण्याची शक्यता आहे. नारोशंकर सचिवांच्या मातोश्री येसूबाईंनी +बाळाजीपंतांना आपला परिवार पुरंदरावर ठेवण्याबद्दल विनवले होते. त्याकरता पुरंदर गड व +पेठ सासवड ही बाळाजीपंतांना थेट देऊ केली होती. परंतु, महाराज असता त्यांच्या +सहीशिक्क्याशिवाय व्यवहार कसा व्हावा! याकरिता येसूबाईंनी व बाळाजीपंतांनी +शाहूमहाराजांकडे विचारणा केली असता ही मागणी महाराजांनी आनंदाने मान्य केली व +आपल्या सहीशिक्क्याची आज्ञापत्रे पाठवली. त्यानुसार सचिवांच्या ताब्यात असलेला पुरंदर +गड व ठाणे सासवड हे अधिकृतरीत्या पेशव्यांना मिळाले. सरदार अंबाजीपंत पुरंदऱ्यांचा +भला थोरला सरकारवाड़ा सासवडलाच होता. आता बाळाजीपंतांनीदेखील सासवडमध्ये +एक भलामोठा वाड़ा बांधायला सुरुवात केली व आपल्या कुटुंबासमवेत वाड्याचे बांधकाम +पूर्ण होईपर्यंत पुरंदऱ्यांच्याच वाड्यात राहू लागले. + बाळाजीपंतांच्या पत्नीचे नाव राधाबाई. गणपतीपुळ्याच्या जवळ असणाऱ्या नेवरे +गावातील दादाजी जोगदेव-बर्वे या सावकारांची ही मुलगी. बाळाजीपंत व राधाबाईंना एकूण +चार अपत्ये होती. सर्वात थोरले बाजीराव. यांचे मूळ नाव बाळाजीपंतांनी आपल्या वडिलांची +आठवण म्हणून विश्वनाथ ठेवले. पण सारेजण त्यांना बाजीराव किंवा विशेषकरून घरातले +लोक त्यांना राऊ म्हणत. बाजीराव हे नाव कसे पडले याबाबत अनेक आख्यायिका +<<< + +मिळतात. त्या दिवशी, म्हणजे दि. १८ ऑगस्ट १७०० साली बाळाजी विश्वनाथ, शिवकालात +'बाजी' नावाचे जितके पराक्रमी पुरुष होऊन गेले त्यांची बखर वाचत होते. इकडे पंतांची +बखर वाचून पूर्ण झाली आणि लगेचच सुईणीने येऊन वार्ता दिली, 'पुत्र प्राप्त झाला.' +बाळाजीपंतांना हा योगायोग वेगळाच वाटला. बखर वाचून झाल्यावर लगेच जणू 'माझीही +त्या बखरीतच जागा आहे' हे दाखवण्याकरताच पुत्र जन्माला आला असावा. हा शुभशकून +समजून बाळाजीपंतांनी त्या मुलाचे नाव 'बाजीराव' ठेवले. अर्थात या गोष्टीला अस्सल +कागदोपत्री पुरावा नाही. बाजीतवांच्या नंतर साधारणतः तीनएक वर्षींनी बाळाजीपंत व +राधाबाईंना दुसरा मुलगा झाला. (१७०३ सुमारास. नक्की तारीख उपलब्ध नाही.) त्याचे नाव +अंताजी ठेवण्यात आले. तो लहान म्हणून त्याला 'चिमणाजी' म्हणायचे, अन् हेच चिमणाजी +पुढे 'चिमाजीअप्पा' झाले. रामापाठोपाठ लक्ष्मणाचा जन्म झाला. इ. स. १७०८ साली +बाळाजीपंत व राधाबाईंना एक मुलगी झाली. तिचे नाव 'भिऊबाई' असे ठेवण्यात आले. +त्यांचे नाव जरी 'भिऊ' असले तरी त्या अत्यंत हुशार आणि कर्तबगार होत्या. भिऊताईनंतर +सुमारे सहा वर्षांनंतर बाळाजीपंतांना व राधाबाईंना आणखी एक मुलगीच झाली. हिचे नाव +'अनुबाई' ठेवण्यात आले. म्हणजे बाळाजीपंतांच्या सर्वात थोरल्या मुलात आणि सर्वात +धाकट्या मुलीत १४ वर्षांचे अंतर होते. मागेच सांगितल्याप्रमाणे बाळाजीपंतांना कर्जे +देणाऱ्या सावकारांच्या मुलाशी चासकर जोश्यांची मुलगी 'लाडूबाई' उर्फ 'काशिबाई' शी +बाजीरावांचे तर बारामतीकर नाईक जोश्यांकडच्या आबाजी नाईकांशी आपल्या मुलीचे, + 'भिऊबाई' चे लग्न लावून दिले. चिमाजीअप्पांचा विवाह १७१६ साली विसाजीकृष्ण पेठे +यांची कन्या रखमाबाई हिच्याशी करण्यात आला. अनुबाईंचा विवाह इचलकरंजीकर नारो +महादेव घोरपडे यांचा पुत्र व्यंकटराव यांच्याशी करण्यात आला. व्यंकटरावांचे वडील नारोपंत +हे संताजी घोरपड्यांच्या फौजेत होते. ��ंताजी हे त्यांना आपल्या पुत्राप्रमाणे मानत. +म्हणून त्यांच्यावरच्या प्रेमापोटी नारोपंतांनी आपले आडनाव घोरपडे म्हणून स्वीकारले. त्यांचे +मूळ आडनाव जोशी होते. अशा आपल्या चार मुलांसह बालाजी विश्वनाथ पेशवे राधाबाईंसह +सासवडला राहायला आले. सासवडच्या या वाड्याला पेशवेवाडा किंवा 'काळा वाडा' म्हणत +असत. + इकडे दिल्लीच्या राजकारणानेही वेगळाच रंग धरला होता. शाहूमहाराजांच्या सुटकेवेळी +किंबहुना सुटकेनंतरच्या काही महिन्यात मोंगल शहाजाद्यांत जी भाऊबंदकी माजली होती +त्यात आझमशहाचा काटा काढून शाहआलम उर्फ मुअज्जम हा 'बहादूरशहा' ही पदवी +घेऊन गादीवर बसला होता. इ. स. १७१२ सालच्या सुरुवातीला मुअज्जम वृद्धापकाळाने +मृत्यू पावला. (?) बादशहाच्या मृत्यूनंतर मोंगल घराण्याच्या रितीप्रमाणे त्याचा मोठा मुलगा +मोईउद्दीन उर्फ जहांदरशहा आपल्या सख्ख्या भावांचे मुडदे पाडून गादीवर बसला. परंतु, +यात त्याचा एक पुतण्या फर्रुखसियर बंगालमध्ये ढाक्याला असल्याने वाचला. दिल्लीत +आपल्या बापाचाही खून पडला आहे हे ऐकून अत्यंत चवताळला. आपले सैन्य +घेऊन तो दिल्लीकडे निघाला. त्याच्याबरोबर हुसेनअली सय्यद व हसनअली सय्यद हे कट्टर +शियापंथीय परंतु अत्यंत धूर्त व शूर असे सय्यदबंधु होते. जहांदरशहालाही +<<< + +आक्रमणाची बातमी समजली. त्याने दिल्लीत आपल्या सैन्याची जमवाजमव सुरू केली. +जहांदरशहा आपले सैन्य घेऊन आग्र्याजवळ पोहोचतो न पोहोचतो तोच समोरून +फर्रुखसियर व सय्यद बंधूंची फौज गर्जत येताना दिसली. काही क्षणातच लढाईला तोंड +लागले. सय्यदबंधूंच्या पराक्रमामुळे बळ वाढतच होते. थोड्याच वेळात +बातमी आली की, सय्यद बंधूंनी खुद्द बादशहा जहांदरशहालाच कैद केले. डाव फिरला. + प्रचंड जय झाला. केवळ सहा महिन्यातच दिल्लीचा बादशहा बदलला +जाऊन आता जहांदरशहाच्या जागी गादीवर बसला. या युद्धामुळे सय्यद बंधूंचे +राजकीय वजन वाढू लागले. नेमके हेच डोळ्यात खुपू लागले. त्याने दोघा +बंधूंना एकमेकांपासून वेगळे करण्याचा घाट घातला. हसनअली सय्यद याला वजिरी देऊन +दिल्लीतच बसवले आणि हुसेनअलीला निजाम-उल-मुल्क याच्याजागी दख्खनच्या +सुभेदारीवर नेमले. (एप्रिल १७१५) या काळात हुसेनअलीबरोबर शंकराजी मल्हार नावाचे +गृहस्थ होते. यांचा पूर्वी र��जाराम महाराजांशी संबंध असावा. त्यांनी हुसेनअली व +शाहूमहाराजांच्यात मध्यस्थी करून तह घडवून आणला. या तहाची मुख्यतः बाळाजी +विश्वनाथ पेशवे व महाराजांच्या तरुण, मुत्सद्दी चिमणाजी दामोदरपंत मोघे यांच्या सल्ल्यानेच +तयार करण्यात आली होती. हुसेनअली सय्यदाने तह ताबडतोब मंजूर केला. त्यानुसार त्याने +शिवछत्रपतींच्या स्वराज्यातले जे गडकोट मोंगलांच्या ताब्यात होते ते गडकोट आणि +खानदेश-वऱ्हाड, गोंडवन, हैद्राबाद, कर्नाटक इत्यादी प्रदेश लगेचच शाहूमहाराजांच्या हवाली +केला. शाहूमहाराजांनीही तह अमलात आणण्यास विलंब केला नाही. खुद्द शाहूमहाराजांच्या +खाशा फौजेचे नेतृत्व बालाजी विश्वनाथ पेशवे करत होते. हीच ती 'हुजुरातीची' फौज. स्वतः +बाळाजींच्या फौजेपैकी १५ हजार फौज तहाप्रमाणे मोंगलांच्या मदतीस पाठवली होती. +तहात एक कलम होते, की शाहूंनी कोल्हापूरकरांना उपद्रव करू नये. इतर व्यवस्थित +पार पाडण्यासाठी दोन्ही पक्षांनी योग्य पावले उचलली होती. परंतु, तहाप्रमाणे दख्खनच्या +सहा सुभ्यातील चौथाई व सरदेशमुखीचे हक्क प्रत्यक्ष बादशहाच्या सनदांशिवाय मिळू शकत +नव्हते व त्याचबरोबर राजमाता येसूबाई, संभाजीराजांचा दासीपुत्र मदनसिंह व इतर परिवार +दिल्लीत असल्याने त्यांची सुटका अजूनही झाली नव्हती. + हुसेनअली सैय्यदाने आपल्या स्वारामार्फत तहनाम्याचा कागद दिल्लीला बादशाह + पाठवला. हा तहनामा मिळाताच त्याच्या डोक्यांत वेगळाच +संशय फेर धरू लागला. या तहनाम्यात त्याला वेगळ्याच राजकारणाचा वास येऊ लागला. +यातच त्याच्या भोवतालच्या कट्टर सुन्नी मुसलमानांनी त्याच्या डोक्यात वेगळेच भरवायला +सुरुवात केली. "जहांदरशहाविरुद्ध सैय्यद बंधु तुमच्या मदतीला आले खरे. पण आता त्यांची +नियत बदलली आहे. सैय्यद बंधु शियापंथीय आहेत. महान तैमूरलंगाची सुन्नी राजवट खत्म +करून, बंड करून या दोघांना हिंदुस्थानात पुन्हा शियापंथियांचे साम्राज्य आणायचे आहे. +त्यासाठीच हुसेनअलीने मराठ्यांना हाताशी धरून तह केला आहे." त्याच्या भवतालच्या +लोकांचे हे म्हणणे ऐकून फर्रुखसियर आणखीनच त्याने त्या सैय्यद बंधूंचा +कायमचा निकाल लावायचे ठरवले व सैन्याची जमवाजमव सुरू केली. वजीर हसनअली +<<< + +सय्यदला या सर्व प्रकाराची कुणकुण लागली. त्याने ताबडतोब आपला हेर पाठवून +हुसेनअलीला फौजेसकट दिल्लीत बोलावले. हुसेनअली दिल्लीला निघाला. त्याच्याबरोबर +बालाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली पन्नास हजार मराठी फौज त्याचबरोबर अंबाजीपंत +पुरंदरे, संताजी भोसले, परसोजी भोसले (नागपूरकर), पिलाजी जाधवराव, उदाजी पवार, +बाळाजी महादेव फडणीस, बाळाजी विश्वनाथांचे पुत्र बाजीराव, शेख मिरा, नारो शंकर +सचिव, चिमणाजी दामोदर मोघे इ. मंडळीही निघाली. या मराठी फौजेच्या खर्चासाठी +हुसेन अलीने शाहूमहाराजांना दर दिवशीचे ५० हजार रु. याप्रमाणे दरमहा १५ लाख मोहीम +संपेपर्यंत देण्याचे कबूल केले. हुसेनअलीची स्वतःची अशी पन्नास हजार फौज सज्ज होती. + अशा या एक लाख फौजेने १५ नोव्हेंबर १७१८ रोजी औरंगाबादहून दिल्लीकडे कूच केले व + १६ फेब्रुवारी १७१९ रोजी फौजा दिल्लीच्या वेशीजवळ पोहोचल्या. हुसेनअलीची प्रचंड +तयारी पाहून गडबडला. इतक्या लवकर सय्यदबंधूंची तयारी पूर्ण होईल याचा +त्याला अंदाज नव्हता. त्याच्या फौजेची जमवाजमव अजूनही सुरूच होती. +ताबडतोब आपला स्वार हुसेनअलीकडे पाठवून आपल्याला तह मंजूर असल्याचे कळवले. +पण अजूनही बादशहाचा आपल्याबद्दलचा विचार बदलला नसल्याचे सय्यद बंधूंना समजून +चुकले होते. पुढे कधी ना कधी हा बादशहा आपल्याला मारण्यासाठी डाव मांडणार हे आता +दोघांनाही माहीत होते. दि. २३ फेब्रुवारीला सैय्यद बंधु व बादशहात वाटाघाटी झाल्या. त्या +नेमक्या कोणत्या ते माहीत नाही. परंतु, यानुसार मदनसिंहाला मोंगलांनी मुक्त केले. दि. २८ +फेब्रुवारीला हुसेनअलीची फौज दिल्लीत घुसली. यात महम्मद अमीन खान व मराठ्यांची +झटापट झाली. दुर्दैवाने या लढाईत बाळाजी महादेव फडणीस (भानू) आणि संताजी भोसले +मारले गेले. पुन्हा आपला शब्द फिरवला. त्याने शाहूमहाराजांच्या मातोश्री व +इतर परिवाराची सुटका करण्यास नकार दिला. आता मात्र सय्यद बंधु त्यांनी +लालकिल्ल्यातच सैन्य घुसवले व फर्रुखसियरलाच बेड्या ठोकल्या. सय्यदबंधूंनी + चुलतभाऊ रफिउदौरजत याला ताबडतोब दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित +केले. + दि. ३ मार्च १७१९ रोजी दिल्लीच्या लालकिल्ल्यात शाही दरबार भरला. वजीर +हसनअली सय्यदाने लहानग्या रफिउदौरजतला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात +झाली. आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहूमहाराजांबरो��र झालेल्या तहनाम्यावर नव्या +रफिउदौरजत बादशहाची संमती सनद उमटवली होती. दरबारात चौथाईच्या सनदा +जाहीरपणे शाहूमहाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या +हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. बाळाजीपंतांनी लवून बादशहाला मुजरा केला व +सनदापत्रे ताब्यात घेतली. मुजरा करताना बाळाजीपंतांच्या मनात काय आले असेल? 'हे +सिंहासन हिंदूंचे आहे. इंद्रप्रस्थच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे. आज +त्याच सिंहासनावर हे परके तुराणी बसलेत. हा मुजरा या बादशहाला नसून +युधिष्ठिराला आहे, भगवान श्रीकृष्णाला आहे, प्रभू श्रीरामाला आहे. थोरल्या शिवछत्रपतींनी +हे इंद्रप्रस्थचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांचे ते स्वप्न +<<< + +आपण नक्कीच पूर्ण करू. मला जमले नाही तर माझा मुलगा, माझा नातू ते पूर्ण करेल.' +इतर लहान-मोठ्या कारभारानंतर दरबार संपला. नंतर दि. १५ मार्च रोजी परत दरबार भरवून +सरदेशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत सनदा याचप्रमाणे पेशव्यांच्या हाती सुपूर्द करण्यात +आल्या. यानंतर लगेचच पाच दिवसांनी दि. २० मार्च १७१९ रोजी ५० हजार मराठी फौज +राजमाता येसूबाईसाहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाटेत नरवरपाशी +आल्यानंतर बाळाजीपंत आपले थोरले पुत्र व अंबाजीपंतांना सोबत घेऊन काशीविश्वेश्वराच्या +दर्शनाला गेले. इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली. + सुमारे महिन्याभरातच राजमाता येसूबाई व इतर राजपरिवाराची आणि शाहूमहाराजांची +भेट झाली. दि. ८ १७०७ रोजी आझमशहाने शाहूमहाराजांची माळव्यात सुटका +केल्यानंतर पुरत्या १२ वर्षांनी या मायलेकांनी एकमेकांना पाहिले. यादरम्यान घडलेल्या +साऱ्या घटना दिल्लीत कैदेत असताना येसूबाईसाहेबांना कळत होत्या. आपल्याच जावेने +केलेला विरोध त्यावर मात करत आपले स्वतंत्र राज्य हिकमतीने निर्माण करून +शाहूमहाराजांनी मिळविलेल्या नावलौकिक व बाळाजी विश्वनाथांसारख्या अनमोल रत्नांना +पाहून येसूबाई कृतार्थ झाल्या. याचवेळेस कोल्हापूरकर संभाजीमहाराजांचे पत्र सातारा +दरबारात आले. ते असे - + "श्रीमंत सकल तीर्थरूप राजेश्री शाहू श्री छत्रपती महाराज यांसी अपत्ये संभाजी राजे +कृतानेक दंडवत विनंती उपरी- +सम��धान येथील कुशल श्रीकृपे वडिलांचे आसीर्वादे जाणोन वडिली आसीर्वाद पत्र पाठवून + पाठविले पाहिजे. विशेष, तीर्थस्वरूप मातुश्री काकीसाहेब आली, दर्शन जाली ते +वर्तमान राजेश्री बाबाजी प्रभू यांणी लिहिले, त्यावरून परमसंतोष जाहला. परंतु वडिली हे +संतोष वृत्त लिहिले नाही हे अनुचित (झाले) तैसेच निरंतर वडिलांचे आसीर्वाद पत्र यावे ये +अपेक्षा यैसे असता पाठविलेल्या पत्राची उत्तरेही येत नाहीत हे वडिलांचे ममतेस विहित की +काय? या उपरी यैसे न होता आसीर्वाद पत्र पाठवून समाधान होय ते गोष्ट केली +पाहिजे राजेश्री बाबाजी प्रभू (स) पाठविले आहे. त्यांनी सविस्तर विनंती केलीच असेल +प्रस्तुतही ते विनंती करतील तद्नुरूप निर्वाह होऊन उभयपक्षी कीर्तिस्पद होईल ते करणार +वडील विवेकी आहेत. बहुत काय लिहिणे. वडील सुज्ञ आहेत. मोर्तब शिक्का." + या पत्रावरून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते. सय्यद बंधुंशी झालेल्या तहानुसार +सातारकरांकडून कोल्हापूरकरांना यत्किंचितही तोशीस लागत नसावी. यामुळेच +कोल्हापूरच्या संभाजीराजांमध्ये व शाहूमहाराजांमध्ये शांतता प्रस्थापित होत चालली होती. +शाहूमहाराजांच्या मातोश्री साताऱ्यास आल्या हे संभाजीराजांना त्यांचे वकील श्री. बाबाजी +प्रभू यांच्याकडून समजले. म्हणा वा इतर काही राजकारणांमुळे शाहूमहाराजांना +कोल्हापूरला पत्र पाठवून कळवता आले नाही. संभाजीराजांना या गोष्टीचा खेद वाटत होता. +आपल्या 'काकीसाहेब' सुखरूप सुटल्याचे आपल्याला दुसऱ्याच माणसाकडून कळते, +आपण पाठविलेल्या पत्रांना आशिर्वादपत्रे येत नाहीत. या बाबींवरून संभाजीमहाराज +शाहूमहाराजांवर (प्रेमाने) नाराज झाले होते. यावरूनच आता सलोख्याचे वातावरण निर्माण +<<< + +झाल्याचे समजते. + बाळाजी विश्वनाथ पेशवे, पुत्र बाजीराव, अंबाजीपंत पुरंदरे इ. मंडळी जूनच्या शेवटच्या +आठवड्यात साताऱ्यास (सासवडास) दाखल झाली. दि. ४ जुलै १७१९ रोजी +शाहूमहाराजांनी साताऱ्याच्या अदालत राजवाड्यात मोठा दरबार भरवला. हा दरबार दिल्ली +स्वारीच्या मानपानाचा होता. दरबारात सेनापती मानसिंग मोरे, शंकराजीपंत सचिव, +श्रीपतराव परशुरामपंत प्रतिनिधी, नारोराम शेणवी वाकेनवीस, आनंदराव रघुनाथ सुमंत, +चिमणाजी दामोदर मोघे, अंबाजीपंत पुरंदरे, नाथाजी धुमाळ, नारो गंगाधर मुजुमद��र, +खंडेराव दाभाडे, पिलाजीराव गायकवाड, बाजीराव बल्लाळ (बाळाजीपंतांचा मुलगा), +शंकराजी मल्हार, उदाजी पवार इ. अनेक मानकरी रांगेने उभे होते. दिल्लीच्या स्वारीनिमित्ये +प्रत्येकाचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर खुद्द शाहू छत्रपतींनी स्वहस्ते बाळाजी +विश्वनाथांचा भव्य सत्कार केला. त्यांना मानाची वस्त्रे दिली. बाळाजीपंतांच्याच थोरल्या +मसलतीमुळे स्वराज्याच्या अन् चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्या होत्या. पण शाहू +छत्रपतींना याहूनही आनंद झाला होता, तो म्हणजे बाळाजी विश्वनाथांनी येसूबाईची सुटका +करवली होती. आईच्या सुटकेपुढे चौथाईच्या सनदांचे काय मोल? म्हणूनच शाहूमहाराजांनी +बालाजी विश्वनाथ पेशव्यांना पाच महालांचे सरदेशमुखीचे वतन स्वतः पेश केले. त्याचबरोबर +दिल्लीत चकमकीत मारल्या गेलेल्या बाळाजी महादेव भानूंच्या कुटुंबाला सांत्वनाप्रीत्यर्थ +मौजे वाकसई हा गाव इनाम दिला. बाळाजी विश्वनाथांचा इतका भव्य सत्कार होताना पाहून +अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी गायकवाड, बाजीराव इत्यादींच्या मनात अतिशय आनंदाच्या +उर्मी उठल्या. पण श्रीपतराव प्रतिनिधी, नारोराम वाकनीस, आनंदराव सुमंत, चिमणाजी +दामोदर इ.च्या मनात द्वेषाची जळफळ उठली. त्यांना आता वाटू लागले, 'हा चित्तपावन +कानामागून आला आणि आता भलताच तिखट झाला.' स्वराज्याच्या सहा सुभ्यांची सनद +पुढीलप्रमाणे- (हमीपत्र) + "सा सुभे दखणच्या सरदेशमुखीची खिदमत हजरत यांचे कारकीर्दीचे +फर्मानाब मोजीब व दिवाणी दप्तराच्या सनदांप्रमाणे आमचे यजमानाकडे करार जाली सबब +ताहोद लिहून दिल्हा यैसा की यजमान खिदमतीच्या लाजिम्याविशी कायावाचामने सादर +राहून, रयतेस आबादी विशेष होय व सरकारची दौलतख्वाही व मुसफदाचे पारिपत्य ते +करितील व पंधरा हजार फौज सुभेदाराचे समागमे चाकरीस ठेऊनु रयतेस आपलेकडोन +राजी राखतील व उजाड गावाची लावणी तीन सालात करोनु जैसा बंदोबस्त करतील जे +दुष्टांचा उपद्रव होणार नाही. कदाचित कोणाचे घरी चोरी झाली किंवा कोणाचा माल चोरीस +गेला तरी चोरास शिक्षा व ज्याचा माल त्यास देतील. कदाचित चोरास शिक्षा करोन (जर चोर +मारला गेला व) चोरीचे ठिकाण न लागे तरी चोरीचे मालाची मिशा आपण करितील. शिवाय +चवथ (चौथाई) व सरदेशमुखी अधिक लोभ धरणार नाहीत, अगर जाहीर झाल्यास जे रुपये +ज्या���ा तलबी करून घेतील, ते सरकार आलीत दाखल करितील हा ताहोद लिहिला असे. छ. +२४ रबिलावल सन २ जुलूसी." +<<< + + वरील कागद म्हणजे सनदा मिळाल्यावर बादशहाला दिलेले हमीपत्र आहे. मराठ्यांना +ज्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळाले होते ते सभा सुभे असे होते- १) +दार-उल-जफर (विजापूर) २) मुहम्मदाबाद (बिदर) ३) एलिचपूर (वऱ्हाड) ४) +(खानदेश) ५) खुजास्त-ए-बुनियाद (औरंगाबाद) ६) फरखुंद-ए-बुनियाद (हैद्राबाद). + या सहा सुभ्यांचा दरसाल महसूल होता. १८,०५,१७,२९४ रुपये. + मोगलांच्या आधीपासूनच महाराष्ट्रात सरदेशमुखी ही होती. प्रत्येक प्रांतावर (अथवा +देशावर) एक देशमुख नेमलेला असे. आपल्या प्रांतातील उत्पन्नाचा, आपल्या वाट्याचा +दहावा हिस्सा काढून घेऊन बाकीचा महसूल सरदेशमुखांना द्यावा लागत असे. + चौथाई हा प्रकार काहीसा वेगळा होता. पूर्वी शिवाजी महाराज स्वराज्याबाहेरच्या +प्रदेशातल्या लोकांकडून त्यांना उपद्रव न देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांच्या उत्पन्नाच्या +चौथा भाग वसूल करून घेत असत. यालाच चौथाई म्हणत. + सहा सुभ्यांच्या अठरा कोटी महसूलापैकी जवळपास पावणेदोन कोटी रुपये +सरदेशमुखीची व साडेचार कोटी रुपये चौथाईची रक्कम स्वराज्यास मिळणार होती. या +सर्वांचे श्रेय बाळाजीपंतांसच होते हे नक्की. + दिल्ली स्वारीनंतर एक नवीनच कटकट उद्भवली. कोल्हापूरकर आणि सातारकरांत +वारणेचा तह झाला असला तरी वारणा नदीच्या दोन्ही तीरावर थोरात नावाच्या घराण्यातील +पाच बंधूंच्या पाटिलक्या होत्या. हे थोरात दोन्ही पक्षांत पुन्हा भांडणे लावून आपला स्वार्थ +साधीत होते. याच सुमारास पडदुल्लाखान नावाचा एक मोंगल सरदार बंडाच्या पवित्र्यात +कऱ्हाडजवळच तळ देऊन बसला होता. शाहूमहाराजांनी पडदुल्लाखानास कऱ्हाड +सोडण्यास सांगितले. परंतु, तो काही केल्या ऐकेना. मग शेवटी महाराजांनी पावसाळ्याच्या +अखेरीस बाळाजीपंतांना सोबत घेतले व स्वतः पडदुल्लाखानावर चालून गेले. +पडदुल्लाखानाचा पराभव झाला. शाहूमहाराजांनी इस्लामपूर व कऱ्हाड आपल्या ताब्यात +घेतले. बाळाजीपंतांनी पुढे वारणेवर जाऊन सिधोजी थोरातांचे येळवी गावही ताब्यात घेतले. +थोरात कोल्हापूराला पळाले. शाहूमहाराज सातारला परत आले आणि तिकडे कोल्हापूरची +फौज घेऊन थोरातांनी बत्तीस शिराळे व अष्टी हे सातारकरांचे प्रदेश हस्तगत केले. +इस्मामपूरला असलेल्या बाळाजी विश्वनाथांना थोरातांचा हा बंडावा समजला. त्यांनी +ताबडतोब जाऊन थोरातांवर हल्ला केला. शेवटी पंचगंगा ओलांडून पन्हाळ्याकडे जात +असता सिधोजी थोरात मारले गेले. बाळाजीपंतांनी मागे साताऱ्यास न फिरता +संभाजीराजांच्या कोल्हापूरलाच वेढा घातला. संभाजीराजे कोल्हापूरमध्ये नव्हते. परंतु, +त्यांना या वेढ्याची बातमी समजताच ते थेट बाळाजीपंतांवर सैन्यासह चालून आले. शेवटी +इस्लामपूरजवळच कृष्णा नदीच्या काठावर उरणबाहे या गावाजवळ दि. २० मार्च १७२० +रोजी लढाई झाली. यात संभाजीराजांचा पूर्ण पराभव झाला. शेवटी संभाजीराजांना घेऊन +बाळाजीपंत सातारला शाहूमहाराजांच्या भेटीकरिता आले. संभाजीराजे शाहूमहाराजांच्या +पाया पडले. शाहूमहाराजांनीही त्यांना पोटाशी धरले. माफ केले. पुन्हा एकदा सातारा व +कोल्हापूर गादीमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले. शाहूमहाराजांनी सातारा दरबारात +<<< + +बाळाजीपंतांचा यथायोग्य सन्मान केला. यानंतर राजमाता येसूबाई साहेबांचे दर्शन घेऊन +बाळाजीपंत सासवडला परतले. एक-दोन दिवस गेले असतील तोच बाळाजीपंत अतिशय +आजारी पडले. गेल्या दोन वर्षांतली सततची धावपळ, दिल्ली स्वारीनंतर लगेचच +कोल्हापूरस्वारीची दगदग बाळाजीपंतांना मानवली नाही आणि शेवटी दि. २ एप्रिल १७२० +रोजी शार्वरी नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध षष्ठी, शके १६४२ ला तीरावरच्या काळ्या +वाड्यात बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. शेवटपर्यंत शाहू छत्रपतींचे अन् स्वराज्याचे हित +बघणारे अन् आता स्वराज्याने सुखाच्या गृहात पाऊल टाकताच कृतार्थ झालेले स्वराज्याचे +एकनिष्ठ पाईक श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे काळाच्या पडद्याआड गेले ... + +संदर्भसूची : +१) बालाजी विश्वनाथ पेशवे : प्रमोद ओक, २) पेशवे घराण्याचा इतिहास : प्रमोद ओक, ३) +बालाजी विश्वनाथ पेशवे यांची बखर, ४) पेशवे व सातारकर राजे यांची टिपणे, ५) मेस्तक +शकावली - काव्येतिहास संग्रह, ६) मराठी रियासत : बाळाजी विश्वनाथ : गो. स. देसाई, ७) +पुरंदरे दफ्तर भाग १ : कृ. वा. पुरंदरे, ८) साधन परिचय (महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास) : +आपटे, ओतूरकर, ९) सातारा गादीचा इतिहास : विष्णु गोपाळ भिडे, १०) वतनपत्रे, +निवाडपत्रे वगैरे, ११) मराठ्यांच्या इतिहासाची साधने (निवडक) : ��ाजवाडे, १२) +रोजनिशीतील उतारे : गो. स. सरदेसाई, १३) मराठ्यांचे साम्राज्य : रा. वि. ओतूरकर, १४) +पेशवेकालीन महाराष्ट्र : वा. कृ. भावे, १५) शाहू बखर : मल्हार रामराव चिटणीस, १६) +ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र : द. ब. पारसनीस, १७) मराठी दफ्तर रूमाल १ व २ : +वि. ल. भावे, १८) ऐतिहासिक पोवाडे : अॅक्वर्थ १९) आंगरे यांची हकीकत, २०) +चौलची बखर. +<<< + + स्वराज्याचे पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी सासवड मुक्कामी मृत्यूलोकी प्रस्थान ठेवले ही +बातमी साताऱ्यास पोहोचली. शाहूमहाराजांना फार दुःख झाले. शाहूमहाराज मोंगलांच्या +कैदेतून सुटून महाराष्ट्रात आल्यानंतर हेच आपले खरे छत्रपती आहेत असा विश्वास धरून +त्यांच्या मदतीला तत्पर येणारे पहिले विश्वासू असे बाळाजीपंत होते. पेशव्यांच्या मृत्यूची +बातमी समजली त्यावेळेस शाहूमहाराज अदालत राजवाड्यात होते. दुखवटा म्हणून +पेशव्यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ महाराजांनी नगारखाना तीन दिवस बंद ठेवण्याचा हुकूम सोडला. +नित्याचा दरबार भरणेही बंद केले. आपल्या सख्ख्या भाऊबंदांपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम +करणारा आपला पेशवा गेल्याचे छत्रपतींना दुःख होते, पण त्यांचे कारभारी मात्र मनातून + आनंदले होते. कारण १७१३ साली कान्होजी मसलतीच्या वेळेस शाहूमहाराजांनी +बाळाजीपंतांना बहिरो मोरेश्वरांच्या जागी पेशवेपदावर नेमले होते. तेव्हा 'गरज होती' म्हणून +कोणालाही ते खटकले नाही. परंतु कान्होजी स्वराज्यात आणल्यापासून पंतांचा +सातारा दरबारातील दबदबा वाढू लागला होता. त्यानंतर पंतांनी मोठ्या अनेक मसलती +यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. त्यावर कळस म्हणजे दिल्लीदरबारातून चौथाई- +सरदेशमुखाच्या सनदा आणि राजमाता येसूबाईसाहेबांची मोंगलांच्या कैदेतून सुखरूप +सुटका. दि. ४ जुलै मध्ये शाहूमहाराजांनी अदालतवाड्यात पंतांचा फार मोठा सन्मान +केला. या सन्मानामुळे दरबारातल्या श्रीपतराव प्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, +चिमणाजी दामोदर इ. मानकऱ्यांचा जळफळाट झाला. कितीही म्हटलं, तरी ही सारी मंडळी +'देशस्थ' होती. बाळाजीपंतांच्या रूपाने राज्यात 'चिपळुण्यांची' होणारी स्थापना या लोकांना +खटकत होती. त्यातच महाराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद दिले. शिवाजीमहाराजांच्या +काळापासून पेशवेपदावर 'देशस्थ ब्राह्मण' होते. पहिले प्रधानपंत शामराजपंत निळकंठ +रांझेकर, मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे, निळोपंत पिंगळे, बहिरोपंत पिंगळे (भैरवपंत) ही सारी लोकं +देशस्थ होती. फक्त पंतांच्या रूपाने 'चित्पावन' पेशवा झाला होता. आता बाळाजी +विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद एखाद्या 'देशस्थाला' मिळावे असे या मंडळींना पुन्हा वाटू +लागले होते. या करता त्यांनी हळूहळू जाळं विणायला सुरुवात केली होती. + परंतु, बाळाजी विश्वनाथांच्या खास मर्जीतल्या पिलाजी जाधवराव, नाथाजी धुमाळ, +उदाजी पवार, अंबाजीपंत पुरंदरे, संताजी भोसले, कान्होजी आंग्रे इ. मंडळींना +बाळाजीपंतांनंतर त्यांच्या थोरल्या पुत्राला, बाजीरावांना पेशवेपद मिळावे अशी अपेक्षा होती. +स्वतः अंबाजीपंत पुरंदरे हे 'महाराष्ट्रीय' म्हणजेच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. पण तरीही +बाळाजीपंतांचे म्हणजेच श्रीवर्धनकर भटांचे व पुरंदऱ्यांचे अगदी सुरुवातीपासूनच घरोब्याचे +संबंध होते. त्यामुळे अंबाजीपंतांनी बाजीरावांनाच अनुकूलता दर्शविली. + बाळाजीपंतांच्या मृत्यूपूर्वी दख्खनच्या सहा सुभ्यातल्या चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा +कागदोपत्री जरी मिळाल्या असल्या तरी प्रत्यक्षपणे अंमलबजावणी अजून सुरू झाली +नव्हती. याच सुमारास बादशहा रफिउद्दौरजत याने निजाम-उल-मुल्क याला दख्खनचा सुभा +परत बहाल केला. हा निजाम मराठ्यांचा कट्टर विरोधक असल्याने तो सहजासहजी चौथाई +<<< + +व सरदेशमुखी देईल अशी चिन्हं नव्हती. मराठ्यांना ती निजामाकडून 'वसूल' करून घ्यावी + लागणार होती. याची शाहूमहाराजांना कल्पना होती. त्याकरिता सर्वप्रथम रिक्त असलेले + पेशवेपद भरणे गरजेचे होते. शाहूमहाराजांनी आपले दुःख विसरून पुन्हा दरबार भरवला. + पेशवेपद कोणाला द्यावे याकरिता सल्लामसलत करण्याकरिता साऱ्या मानकऱ्यांना आणि + मुत्सद्दयांना बोलावणे गेले. महाराजांचा स्वार दाखल झाला. आपल्या + मातोश्रींचे, राधाबाईंचे करून, बाजीराव व चिमाजीअप्पा सातारला निघाले. + दरबारात जाण्याची ही दोघांची पहिलीच वेळ नव्हती. याआधी दिल्लीला जाण्याच्या वेळी + शाहूमहाराजांनी बाजीरावांना 'सरदारी' बहाल केली होती. तसेच अंबाजीपंत पुरंदरे बाळाजी + विश्वनाथांबरोबर दिल्लीला जाणार असल्याने चिमाजीअप्पांना पेशव्यांचा 'मुतालिक' म्हणून + दरबारात स्थान मिळाले होते. दोघांनाही दरबारातल्या स्वकीय हितशत्रूंची माहिती + आधीपासूनच होती. + अदालत राजवाड्यात दरबार भरला. दरबारात आज दोन तट पडले होते. एक तट + म्हणजे सुमंत आनंदराव, प्रतिनिधी श्रीपतराव परशुराम इत्यादींचा तर दुसरा तट म्हणजे + अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव इ. मंडळींचा. प्रतिहारींनी खड्या आवाजात ललकारी + दिली. शाहूमहाराजांचे आगमन झाले. दरबाराच्या कामकाजाला सुरुवात झाली. + शाहूमहाराजांनी औपचारिकरित्या बाजीरावांचे व चिमाजीअप्पांचे केले आणि आता + 'पुढे काय करावे?' असे दरबाराला विचारले. प्रतिनिधी, मंत्री वगैरे याच क्षणाची वाट पाहात + होते. त्यांनी जराही वेळ न दवडता पेशवेपदासाठी 'चिमणाजी दामोदर मोघे' यांचे नाव पुढे + केले. आजपर्यंत चिमणाजीपंतांनी स्वराज्यासाठी काय काय केलं याचा पाढाच वाचायला + सुरुवात झाली. शाहूमहाराजांनी प्रथम सारं शांतपणे ऐकून घेतलं. मंत्र्यांचं चिमणाजीपुराण + थांबल्यानंतर महाराजांनी म्हटलं, "वडील मृत्यू पावता त्याचे पुत्रास पद द्यावे हा शिरस्ता. ये + वरून रावबाजीस पद मिळावयास हवे. यैसे आपणास वाटत नाही का?" यावर त्या मंडळींनी + उघडपणे स्पष्ट मत व्यक्त केलं नाही. शाहूमहाराजांनी अंबाजीपंत पुरंदऱ्यांकडे पाहिलं. + अंबाजीपंतांनी आपलं मत मांडलं. त्यांनी दिल्लीला बाळाजीपंतांबरोबर बाजीरावांनी केलेली + उत्कृष्ट कामे, त्यांची धडाडी, त्यांची निष्ठा, पराक्रमी व बेडर वृत्ती तसेच सैन्याबद्दलचा लगाव + इ. गोष्टी महाराजांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ खल केल्यावर, आपल्याच + मुत्सद्दयांमध्ये पेशवे पदाबाबत एकमत नाही, ही दुर्दैवी गोष्ट शाहूमहाराजांच्या ध्यानात आली. + दरबार बरखास्त झाला. तरीही दरबारानंतर सुमंत व मंत्री महाराजांना एकांतात भेटायला + उत्सुक होते. अशातच प्रतिनिधीही आले. हे त्रिकूट महाराजांकडे गेले व महाराजांच्या + कानाशी लागले. त्यांचे म्हणणे फक्त एकच होते, 'रावबाजी लहान आहे. राज्यकारभारात + अनभिज्ञ आहे. त्यातून स्वभाव तापट व अविवेकी. ते गादी चालवावयास थोर नाहीत. उलट + चिमणाजी दामोदरांस कामाचा अनुभव आहे. ते कारभारात कुशल आहेत. तेव्हा पेशवेपद + चिमणाजीपंतांसच मिळावे. तेच योग्य आहेत.' परंतु, या लोकांना अडत होती ती + बाजीरावांची 'चित्पावनी' धाटणी. महाराजांकडे उघड बोल���ा येणं शक्यच नव्हतं. परंतु + त्यांनी महाराजांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण +<<< + +महाराजांनी त्यांना मनातले काही कळू न देता सारे ऐकून घेतले. महाराजांच्या राणीसाहेब +विरूबाई यांचेही तेच मत होते, 'बाजीरावापेक्षा चिमणाजी दामोदरांसच पेशवेपद द्यावे.' + दुसऱ्या दिवशी सकाळीच शाहूमहाराज धावडशीला ब्रह्मेंद्रस्वामींच्या दर्शनाला गेले. +त्यांच्याबरोबर प्रतिनिधी, सुमंत, मंत्री वगैरे मंडळी होती. परंतु, पेशवा या नात्याने कोणीच +नव्हतं. वाटेत या मंडळींनी महाराजांना पेशवेपदाकरता चिमणाजी दामोदर मोघ्यांचं नाव +पुन्हा एकदा सुचवून पाहिलं. सारे धावडशीला आले. ब्रह्मेंद्रस्वामी व महाराजांची भेट झाली. +कदाचित ब्रह्मेंद्रस्वामींनी बाजीरावाचे नाव सुचवले असेल. कारण भट घराणे हे +ब्रह्मेंद्रस्वामींना गुरूस्थानी मानत होते. भेटीनंतर महाराजांचा चेहरा खुलला होता. इतरांना +वाटले, 'महाराजांनी चिमणाजीपंतांचेच नाव निश्चित केले.' सारी मंडळी निश्चिंत झाली. +परतताना महाराज कराडजवळच्या मसूर येथे सरदार जगदाळ्यांच्या गेले व तेथेच +दरबार भरवायचा ठरवून इतर मंडळींना बोलावणे पाठवण्यात आले. साताऱ्याहून अंबाजीपंत +बाजीराव व चिमाजीआप्पांना घेऊन मसूरला पोहोचले. दरबार भरला. प्रतिनिधी वगैरे मंडळी +आता फक्त चिमणाजी दामोदराचे नाव घोषित करण्याची वाट पाहात होती. शाहूमहाराजांनी +सुरुवातीला जराही वेळ न दवडता मुख्य मुद्दयालाच हात घातला. उत्सुकता ताणली गेली +होती आणि, 'चैत्र शुद्ध सप्तमी, शके १६४२, शार्वरीनाम संवत्सरी, गुरुवारी, राजेश्री +बाजीराव बल्लाळ, राजेश्री बालाजी विश्वनाथ मुख्य प्रधान यांचे पुत्र, राजेश्री बल्लाळ +विश्वनाथ मृत्यू पावले येकरिता त्यांचे पुत्र राव मशारनिल्हे यांजवरी स्वामी कृपाळू होऊन +पेशवाईची वस्त्रे दिल्ली.' बाजीरावांचे नाव घेताच सारा दरबार अवाक झाला. अष्टप्रधानांपैकी +काही मंडळींच्या उरात परत खळबळ माजली. बाजीरावांनी पुढे जाऊन शाहूमहाराजांना +नमस्कार केला. महाराजांनी आपल्या हाताने पेशवाईची वस्त्रे बहाल केली व बाजीरावांच्या +मस्तकी पेशवाई स्वहस्ते चढवली. दरबारात मंत्री, सुमंत इ. मंडळींचे चेहरे सुतकी +झाले होते. परंतु अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव, उदाजी पवार, नाथाजी धुमाळ इ. +सरदारांना मनातून खूप आनंद झाला होता. त्यांना बाजीरावांच्या कार्याबद्दल अन् +स्वामीनिष्ठेबद्दल विश्वास होता. बाजीरावांनीही शाहूराजांना स्वराज्याशी कायम एकनिष्ठ +राहण्याचा विश्वास दिला. महाराजांनी त्यांना सालीना १३००० होनांची तैनात लावून दिली. +दरबार संपला ... + सातारा दरबारात पेशवाईकरता खल चालू असता इकडे निजाम आणि मोंगलांनी +नवीनच उद्योग आरंभला होता. अशातच चौथाई व सरदेशमुखीची वसुली करणेही गरजेचे +होते. साताऱ्याहून निघताना बाजीरावांनी शाहूमहाराजांना विश्वास दिला, "आम्ही तो +सरकारचे चाकर, जिकडे हुकूम होईल तिकडे जाऊ. आपण शत्रूची भीती बाळगू नये. मोगल +म्हणजे काय? आज्ञा झाली असता मोठ्या काळाच्या तोंडातदेखील जाऊन, सरकारचे +पुण्यप्रतापे करून त्याचा बंदोबस्त करून येऊ. तेथे मोंगलांची काय कथा? महाराजांनी +निश्चिंत असावे." अशा तऱ्हेने शाहूमहाराजांना जणू विश्वासात घेऊनच बाजीराव बाहेर +पडले. यवतेश्वर अन् माहुली संगमाकडे थोडावेळ काढून श्रीमंत बाजीराव पेशवे, +चिमाजीआप्पा आणि अंबाजीपंत पुरंदरे सासवडच्या दिशेने दौडत निघाले. बरोबर +<<< + +स्वराज्याच्या पेशव्यांची खाशी फौज होती ... + साताऱ्यात बाजीराव पेशव्यांचे, अन् जाणते विश्वासू मुत्सद्दी म्हणून पिलाजी जाधवराव +मागेच थांबले होते. इकडे सासवड़ात राधाबाईंच्या जिवाची उलाघाल होत होती. बाळाजी +विश्वनाथांचे दिवस घालून पूर्णही होत नाहीत तोच बाजीराव व आप्पांना लगेचच सातारला +जावे लागले होते. साताऱ्यातली सारी परिस्थिती राधाबाईंना माहीत होती. कारभाऱ्यांचं +सतत महाराजांभवती असणं हे फार धोकादायक होतं. त्यांनी कधी महाराजांचे कान फुंकून +त्यांचं मत कलुषित केलं असेल याचा अंदाज प्रत्यक्ष महाराजांनाही यायचा नाही. बाळाजी +विश्वनाथांनी दिल्लीच्या सनदा आणल्यानंतर तर या कारभाऱ्यांच्या कारस्थानांना अजून वेग + आला होता. पेशवेपदाकरता त्यांनी राऊंना काही केलं तर? या विचाराने राधाबाई हैराण होत +होत्या. इतक्यात, सासवडच्या वेशीतून घोड्यांच्या टापांचा खडखडाट ऐकू आला. राधाबाई + अधीरतेने खाली धावल्या. काळावाड्यासमोर थांबली. बाजीराव, अंबाजीपंत व +चिमाजीआप्पा पायउतार झाले. तिघांचे हसरे चेहरे पाहताच राधाबाईंच्या जीवात जीव आला. +पेशवाई राऊंनाच मिळाल्याचे न बो��ताच समजले. आतून राऊंच्या पत्नी काशिबाई पंचारती +घेऊन बाहेर आल्या. ओवाळाताना त्यांची नजर बाजीरावांच्या डोळ्यात गेली. राऊंची नजर + आज काही वेगळीच चमकत होती. जणू ते मूक नजरेने म्हणत होते, "आता वनवास संपला. +थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण स्वराज्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आम्ही पूर्ण करू. + आता इंद्रप्रस्थ घेतल्याशिवाय स्वस्थता नाही!" + पेशवाई मिळाल्यावर बाजीरावांना स्वस्थता मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती. स्वराज्य +नाही म्हटलं तरी अजून असुरक्षितच होतं. तेवढ्यात साताऱ्याहून दोन खबरा येऊन +पोहोचल्या. दिल्ली दरबारातील शाहूंचे पक्षपाती सय्यदबंधु यांची एक तर दुसरी खबर +निजामाची होती. सय्यदबंधुंपैकी हुसेनअली सैय्यद हा खानदेशात आपल्याच एका बंडखोर +सरदाराविरुद्ध होता. अन् त्याच सुमारास हैद्राबादच्या निजामाने कुरापती काढायला +सुरुवात केली होती. सर्वप्रथम सैय्यद बंधूंच्या मदतीला जाणे गरजेचे होते. सरलष्कर +हैबतराव निंबाळकर मराठी फौजेनिशी खानदेशात निघाले. यावेळी फौज नक्की किती होती +ते समजत नाही, परंतु निदान वीस हजार मराठी फौज असावी. खानदेशातील बंड मोडले +गेले. इकडे निजामाच्या फौजा आता उघडउघड स्वराज्यात घुसखोरी करू लागल्या होत्या. + निजामाच्या मोंगली फौजा शेवगाव-पैठण ओलांडून औरंगाबादेत येण्याच्या मार्गावर होत्या. +मजल दरमजल करत मराठी फौजा औरंगाबादेस पोहोचल्या. दि. १५ डिसेंबर १७२० रोजी +निजामाच्या फौजांत आणि मराठी फौजांत मोठे युद्ध झाले. खानदेशातील विजयामुळे +मराठ्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण झाले होते. निजामाचा दारुण पराभव झाला. निजाम +दाती तृण धरून शरण आला. यानंतर दिनांक ४ जानेवारी १७२१ रोजी चिखलठाण येथे + श्रीमंत बाजीराव पेशवे आणि निजामाची भेट झाली. उभयतांची ही प्रत्यक्ष पहिलीच भेट +होती. पण पहिल्याच भेटीत निजामाला बाजीरावांची चांगलीच ओळख झाली होती. या +साऱ्या गोष्टी सासवडला पेशवेवाड्यात समजत होत्या. भेटीच्या एक दिवस आधी मातोश्री +राधाबाईंनी बाजीरावांना पत्र पाठवले होते. पूर्वी बाळाजी विश्वनाथांच्या कारभारात +<<< + +राधाबाईंनी प्रत्यक्ष सहभाग जरी घेतला नसला तरी राजकारणात कधी, काय अन् कसे +करायचे याची राधाबाईंना चांगलीच माहिती होती. म्हणूनच निजामाची भेट घेताना भेटीसाठी +कसे जावे, ���ेट केव्हा व कोणत्या ठिकाणी घ्यावी याचे संपूर्ण तपशीलवार मार्गदर्शन +राधाबाईंनी केले होते. राऊ अजून राजकारणात नवखे आहेत याच्या काळजीपोटीच त्या +सल्ले देत होत्या. बाजीरावांनीही मातोश्रींच्या सल्ला-मसलतीचा योग्य विचार केला व ते +निजामाच्या भेटीला गेले. मोंगली फौजांचा एक रिवाज होता, नियमच म्हणायचा! मोंगल +बादशहापासून अगदी सरदारापर्यंत सारेजण स्वाऱ्यांवर, मोहिमांवर असतानाही आपला +जनाना आपल्यासोबत घेऊन जायचे. कदाचित आपल्या माघारी जनानखान्यावर कोणाची +दृष्टी पडू नये म्हणून काळजीपोटीच असेल म्हणा! पण, याही स्वारीत निजामाजवळ त्याचा +जनानखाना होता. बाजीरावसाहेब दिसायला फार सुंदर होते. पिळदार शरीरयष्टी, घारे डोळे, +चित्पावनी बाज असल्याने केतकी गौरवर्ण, शांत पण भेदक नजर असा बाजीरावांचा मर्दानी +रूबाब होता. निजामाच्या जनानखान्यात ही वार्ता पसरली, 'हा बाजीराव पेशवा मोठा +देखणा व 'सुरतपाक' आहे.' म्हणून निजामाचा जनानखाना प्रत्यक्ष भेटीच्या महालात, थोडं +दूरवरच पण चिकाचे पडदे बाजूला सारून बाजीरावांच्या येण्याकडे डोळे लावून बसला +होता. बाजीरावांची व निजामाची भेट झाली. बाजीरावांनी घातलेल्या अटी, त्या नेमक्या +कोणत्या ते समजत नाही. परंतु त्या मुकाट्याने कबूल करणे निजामाला भाग पडले. शेवटी +निजामाने जिंकलेला स्वराज्याचा सर्व मुलूख परत हवाली करून निजामाला चरफडत +हैद्राबादला जावे लागले. निजाम-उल-मुल्क उर्फ मीर कमरुद्दीन सिद्दीकी उर्फ चिनकीलीज +खान ही मोंगल दरबारातली एक असामी होती. प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेब (मरहूम) +बादशहाच्या तालमीत शिकून तयार झालेला निजाम हा पराक्रमी कावेबाज अन् अत्यंत धूर्त +होता. त्याला हरवणे सहसा कोणालाही जमले नसते. पण ते बाजीरावांनी करून दाखवले. +याची प्रचिती निजामाला आता पुढेही वारंवार येणार होती. निजाम हा सैय्यद बंधूंचाही कट्टर +विरोधक असल्याने त्याच्या पराभवामुळे सैयद बंधूनाही हायसे वाटले. त्यांनी गुप्तरितीने +पेशव्यांना मुबारक बात अन् शुभेच्छा दिल्या. पहिलाच विजय संपादून श्रीमंत बाजीराव पेशवे +आपल्या फौजेसह साताऱ्याकडे दौडत निघाले. + मजल दरमजल करत मराठी फौजा साताऱ्यात आल्या. बाजीरावांचे धाकटे बंधू +चिमाजीआप्पा साताऱ्यात पेशव्यांचे मुतालीक म्हणून काम पाहात होते. दोघेही भाऊ राम- +लक्ष्मणासारखे, नव्हे नव्हे राम-लक्ष्मणच होते! आपल्या पराक्रमी बंधूंना विजयश्री घेऊन +आलेले पाहून आप्पांना फार आनंद झाला. शाहूछत्रपतींना पेशव्यांच्या आगमनाची खबर +गेली. महाराजांनी नगारे वाजवण्याचा हुकूम सोडला. बाजीरावांनी प्रथम राजवाड्यात जाऊन +महाराज शाहू छत्रपतींचे व महाराणी साहेबांचे आशिर्वाद घेतले. नंतर बाजीराव विश्रांतीसाठी +आज्ञा घेऊन साताऱ्यातील पेशव्यांच्या वाड्यात आले. साताऱ्यातील पेशव्यांचा फारसा +प्रशस्त नव्हता. सासवडास मुक्काम हलवण्यापूर्वी बाळाजी विश्वनाथ व त्यांच्या कुटुंबाचे +येथेच वास्तव्य होते. चिमाजीआप्पा दरबारात मुतालकी करत असल्याने त्यांना मात्र सतत +सासवड व सातारा असे जाऊन येऊन रहावे लागत होते. रात्री जेवणं झाल्यावर बाजीराव, +<<< + +चिमाजीआप्पा व अंबाजीपंतांच्या भरपूर गप्पा रंगल्या. + दुसऱ्या दिवशी अदालतवाड्यात दरबार भरवण्यात आला. हा दरबार खास श्रीमंत +बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे कौतुक करण्याकरता होता. दरबारात सारे मानकरी हजर +होते. अष्टप्रधान हजर होते. शाहूमहाराजांच्या समोर उजव्या बाजूला पेशव्यांच्या स्थानावर +बाजीराव विराजमान झाले होते. "निजामासारिखा शत्रू बुडवणे म्हणजे साथी गोष्ट नव्हे! +खासा आलमगीर बादशहाचा चेला, निजाम कपटी, कुबुद्धीचा, परंतु रावबाजींनी त्यासही +मात गोष्ट सामान्य न जाहली. रावबाजींनी कै. नानांचे नाव राखले. निजामाचे चित्तांत +मराठियांचा धाक उत्पन्न केला ... " शाहूमहाराजांनी पेशव्यांची फार नावाजणी केली. त्यांना +मानाचा पोशाख बहाल केला. अंबाजीपंतांचाही व इतर सरदारांचाही मान-सन्मान करण्यात +आला. हा सारा सन्मान सोहळा सुरू असताना काही जणांची उगीचच चुळबुळ सुरू झालेली +होती. विशेषतः श्रीपतराव परशुरामपंत प्रतिनिधी, आनंदराव सुमंत, खंडेराव दाभाडे, +नारोराम वाकेनवीस इ. लोकांच्या घशात द्वेषाची जळजळ उठली. आठवते का, यापूर्वी +दिल्लीहून आल्यानंतर बाळाजी विश्वनाथांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळेसही या लोकांच्या +घशात जळजळ उठली होती ते !! आता यापुढे त्या सर्वांना अशा प्रकाराची सवयच करायला +लागणार होती. + सातारा दरबारातील सन्मान समारंभ आटोपून महाराजांची अनुज्ञा घेऊन बाजीराव +सासवडला येण्यास निघाले. शाहूमहाराजांनी चिमाजीआप्पांनाही त्यांच्याबर��बर जाण्याची +अनुमती दिली. अंबाजीपंत आणि चिमाजीआप्पांना घेऊन बाजीराव सासवडला आले. +राधाबाईंना खूप आनंद झाला. निजामाची भेट घेणार हे कळल्यापासून राधाबाईंना झोप +लागली नव्हती. परंतु सर्व काही ठीक झाले. पेशवे सुखरूप परत आले. परतल्यानंतर तीन- +चार दिवस पेशव्यांना उसंतच नव्हती. देशोदेशीहून अन् स्वराज्यातल्या अनेक जाणत्या +सरदारांकडून अभिनंदनाचे खलिते आणि भेटीदाखल वस्तू येत होत्या. त्या खलित्यांना +जबाब देण्यातच अन् फेर-नजराण्याच्या वस्तू देण्यातच त्यांचा बराचसा वेळ खर्च होत असे. +पुढचे तीन-चार महिने बाजीरावांचा मुक्काम सासवडलाच होता. या मधल्या काळात +बाजीरावांनी आपल्या तिर्थरूपांची, कै. बाळाजी विश्वनाथांची समाधी कऱ्हा नदीच्या +काठावर बांधण्याचा हुकूम सोडला व वृंदावनाच्या रोजच्या नैवेद्य व पूजेअर्चेसाठी वर्षासने +लावून देण्यात आली. + साधारणतः मार्च महिन्याच्या अखेरीस बातमी आली की, सैय्यद बंधूंचा दिल्ली +दरबारातील विश्वासू सेनापती दाऊदखान पन्नी हा सैय्यद बंधुंविरुद्धच बंड करून माळव्यात +दंगे माजवतोय. तो एवढेच करून थांबला नाही तर सोरटी सोमनाथसारख्या पवित्र +ज्योतिर्लिंगालाही तो उपद्रव देऊ लागला. दाऊदखान निजामाला मिळाला. बादशहाने +मदतीकरिता शाहूमहाराजांना साद घातली. शाहूमहाराजांनी बादशहाच्या विनंतीचा विचार +करून बाजीराव पेशव्यांना माळव्यात जाण्याची आज्ञा केली. पेशव्यांनी आपल्या फौजनिशी +ताबडतोब माळव्याकडे प्रस्थान ठेवले. दाऊदखान पन्नी हा पूर्वी दख्खनचा सुभेदार होता. +त्यामुळे शाहूमहाराज व अंबाजीपंतांसारख्या मुत्सद्दी राजकारण्यांनी त्याचा कारभार प्रत्यक्ष +<<< + +पाहिला होता. बाजीरावांनीही लहानपणी बाळाजी पंतांकडून दाऊदखानाविषयी ऐकले होते. +या सगळ्याचा योग्य तो उपयोग करून बाजीरावांनी दाऊदखानाला युद्धाचे आव्हान दिले. +जून १७२१ च्या सुमारास माळव्यात मराठी फौजांत आणि दाऊदखानात घरघोर युद्ध झाले. +यात दाऊदखानाचा दारुण पराभव झाला. दाऊदखान रणांगण सोडून पळत सुटला. हा +प्रचंड विजय संपादून बाजीराव सातारला आले ... + दरम्यान, या मधल्या काळात बाजीरावांची पत्नी काशिबाई यांना दिवस गेले होते, म्हणून +त्या बाळंतपणासाठी माहेरी जाऊन राहिल्या होत्या. काशिबाईंचे माहेर पुण्याच्या उत्तरेला +आळंदीच्या जवळ असणाऱ्या चासेचे. परंतु चासकर जोशी सावकारांचा लोहगडाजवळ +वडगाव मावळात साते या गावातही एक वाड़ा होता. यावेळेस चासकर जोशी आपल्या +मुलीला घेऊन साते येथील वाड्यात मुक्कामाला होते. याच सुमारास बाजीरावांनी आपला +मुक्काम सासवडाहून पुण्यास हलवला. कारण पुणे हे राजकीयदृष्ट्या अन् लष्करीदृष्ट्या ऐन +मोक्याचे स्थान होते. अशा या महत्त्वाच्या ठिकाणी आपला कोणी ना कोणीतरी जबरदस्त +सरदार कायमचा हवा, तरच पुणे कायम स्वराज्यात राहू शकते हे शाहूमहाराजांना समजत +होते. थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यातच गेले होते. ती पवित्र जागा +आपल्याकडेच रहावी, पुण्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू नये म्हणून शाहूमहाराजांनी +बाजीरावांना पुणे ताब्यात घेण्यास सांगितले. पुण्यात पेशव्यांचा स्वतःचा राहता वाडा नव्हता. +सरदार धडफळे हे पुण्याचे ठाणेदार होते. त्यांचा प्रशस्त होता. पेशव्यांचा पुण्यातील +वाडा बांधून पूर्ण होईपर्यंत सरदार धडफळ्यांच्याच वाड्यात मुक्काम करायचे ठरले. परंतु +पेशव्यांचा वाडा प्रत्यक्षात उभा राहण्यासाठी पुढची आठ वर्षे वाट पहावी लागली. + पुण्यात मुक्कामाला आल्यावर काही महिने उलटले आणि एक आनंदाची खबर आली. +'मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीसह चतुर्दशी श्री शालिवाहन शके १६४३, प्लवनाम संवत्सरी, बुधवारी +वडगाव मावळात साते मुक्कामी श्रीमंत पेशव्यांच्या पत्नी सौभाग्यवती काशिबाईसाहेब प्रसूत +जाहल्या. पुत्ररत्न प्राप्त जाहले (दि. १६ डिसेंबर १७२१). पुण्याला धडफळ्यांच्या वाड्यावर +खबर पोहोचली. आपण पुण्यात आल्यावर हा शुभशकूनच झाला असे राधाबाईंना वाटले. हे +त्यांचे पहिलेच नातवंड होते. राधाबाईंनी पुण्याचे मावंदे केले. बाजीरावसाहेबांनी पुण्यात +साखरा वाटण्याचा हुकूम सोडला. खासा हत्ती आणून हत्तीवरून साखरा वाटल्या. +आपल्याला पुतण्या झाला याचा आप्पांनाही खूप आनंद झाला. सर्वप्रथम साताऱ्याला ही +खुशखबरीची थैली व साखरा पाठवण्यात आल्या. बाजीरावसाहेबांनी महाराजांना प्रत्यक्ष +येऊन चिरंजीवांस आशीर्वाद देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन +शाहूमहाराज पुण्याला आले. काशिबाईंनाही लहानग्या बाळासह पुण्याला आणण्यात आले +होते. छत्रपतींनी स्वतः बाळाला मांडीवर घेऊन कौतुक केले. बाळ मोठे गोड होते. पुत्रमुख हे +अगदी पितृमुखासारखेच होते. शाहूमहाराजांनी पुण्यात फार मोठा दानधर्म केला. +ब्राह्मणभोजनही घालण्यात आले. माघ शुद्ध एकादशी शके १६४९, प्लवनाम संवत्सरी +म्हणजेच दि. ११ जानेवारी सन १७२२ रोजी बाळाचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. +पूर्वीच्या काळी आजोबांचेच नाव नातवाला ठेवण्याचा प्रघात होता. म्हणूनच मुलाचे नाव +<<< + + 'बल्लाळ' ठेवण्यात आले. आजोबांच्या नावाचा वारसा घेऊनच पुत्र जन्माला आला होता. +समारंभ मोठ्या थाटात पार पडला. याच सुमारास कोकणात कान्होजी आंग्रे आणि + पोर्तुगिजांच्यात तंटे उत्पन्न झाले. पोर्तुगिजांच्या प्रभावापुढे आंग्रे तग धरू शकेनात. शेवटी +कान्होजी पुण्याला बाजीराव पेशव्यांकडे मदतीसाठी स्वार पाठवला. कान्होजींनी +मदतीसाठी पेशव्यांना पाचारण करण्याची बातमी कळताच पोर्तुगिजांचे धाबे दणाणले. +पेशव्यांपर्यंत स्वार पोहोचायच्या आधीच इकडे पोर्तुगिजांचा स्वार तहनामा घेऊन + आला. केवळ वर्षभरापूर्वीच पेशव्यांनी महाबलाढ्य निजामाचा कसा पराभव केला याचे + संपूर्ण चित्रच पोर्तुगिजांसमोर उभे होते. जिथे निजामाचा पाड लागत नाही तिथे आपले काय +होणार, या विचाराने पोर्तुगिजांनी आधीच घाबरून तहाची भाषा सुरू केली. शेवटी दि. ९ +जानेवारी १७२२ रोजी वरसोली येथे पेशवे (आंग्रे) व पोर्तुगिजांच्यात तह झाला. यावेळेस तह +करायला प्रत्यक्ष बाजीराव पेशवे वर्सोली येथे गेले असतील असे वाटत नाही. कदाचित +पेशव्यांच्या तर्फेने कान्होजी अथवा इतर कोणत्या मातब्बर सरदाराने तहनामा +स्वीकारला असू शकतो. कारण लगेचच दोन दिवसांनी पुण्यात बाजीरावांच्या पुत्राचे बारसे +मोठ्या उत्साहात साजरे झाले. + बारशानंतर शाहूमहाराज साताऱ्यात परत आले. पाठोपाठ बाजीराव आणि +चिमाजीआप्पाही आले. नव्या राजकारणाची डाळ शिजू लागली. बाळाजी विश्वनाथांनी +दिल्लीहून चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा आणल्या खऱ्या, पण त्या केवळ कागदोपत्रीच +राहिल्या होत्या. या मधल्या दीड-दोन वर्षात प्रत्यक्ष महसूल मात्र राज्याच्या तिजोरीत जमा +झालाच नव्हता आणि त्यातच मोंगलांचा दख्खनचा सुभेदार निजाम-उल-मुल्क याचे दिल्ली +दरबाराशीही फारसे पटत नसल्याने दख्खनच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी देण्यास +तो आडकाठी करत होता. त्यामुळे शाहूमहाराजांनी ठरव��े व मोंगल मुलुखात वसुली +करण्याची बाजीरावांना परवानगी दिली. बाजीरावांनी ताबडतोब सैन्यासह जाऊन नाशिक- +गोंडवन-बागलाणपास वऱ्हाड, खानदेशचा सारा मुलुख मराठ्यांच्या ताब्यात आणला. या + भागातून चौथाई व सरदेशमुखीच्या सुरळीत वसुलीसाठी त्यांनी उदाजी पवार या विश्वासू + आणि अनुभवी माणसाला या प्रांतांच्या जवळपासच माळवा-गुजरातच्या भागात थांबायला + सांगितले. त्याप्रमाणे उदाजी पवारांनी धार येथे मुक्काम करून मराठ्यांचं नवीन ठाणं +वसवलं. या मधल्या काळात बाजीराव पेशवे आणि चिमाजीआप्पा (कदाचित राधाबाईंना +बरोबर घेऊन) श्रीवर्धनला आपल्या वाड्यात गेले असावेत. याच सुमारास बाजीराव + पेशव्यांचा स्वतःचा पेशवेपदाचा शिक्का तयार केला गेला असावा. तो शिक्का असा- + "श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान" + "बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ।।" + हा शिक्का किंवा मुद्रा बाजीरावांनी आपले कुलदैवत श्री काळभैरव हरिहरेश्वराच्या चरणी +ठेवली. हरिहरेश्वरच्या देवालयाला आजपर्यंत जंजिरेकर सिद्धी राज्यकर्त्यांकडून सतत उपद्रव +होत असे. मंदिराची अवस्था फारशी चांगली नव्हती. राधाबाईंना हे पाहवत नव्हते म्हणून +बाजीराव पेशव्यांनी काळभैरव व हरिहरेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी देणग्या +<<< + +दिल्या व लगेचच कामाला सुरुवात झाली. हरिहरेश्वराहून चिमाजीआप्पा मातोश्रींना घेऊन +पुण्यात आले व बाजीराव पेशवे तसेच फौज घेऊन माळव्याच्या रोखानी निघाले. इ. स. +१७२३ च्या अखेरीस पेशव्यांच्या फौजा धारला येऊन पोहोचल्या. यावेळेस मोंगलांचे माळवा +प्रांतातले मुख्य ठाणे उज्जैन येथे होते. दयाबहाद्दर हा पराक्रमी मोंगल सुभेदार उज्जैनचा +सुभा सांभाळत होता. बाजीरावांनी प्रथम दयाबहाद्दरकडे आपला वकील पाठवला व +'आम्हाला दिल्ली दरबारातून चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार मिळाले आहेत तरीही तुमचे +दख्खनचे सुभेदार निजाम-उल-मुल्क आम्हाला चौथाई व सरदेशमुखी देत नाहीत. सबब ती +वसुली मराठ्यांना माळवा व गुजरात प्रांतातून मिळावी' या आशयाचा निरोप दयाबहाद्दरला +दिला. या निरोपाला दयाबहाद्दराने स्पष्ट नकार कळवला. पेशव्यांना अपेक्षित होतेच. + वास्तविक पाहता औरंगाबादजवळ निजामाला मात देणाऱ्या पेशव्यांना निजामाकडून +चौथाई व सरदेशमुखी 'वसूल' करता येत नव्हती असे नाही. परंतु माळवा-गुजरातचा प्रांत हा +दख्खनच्या इतर कोणत्याही सुभ्यांपेक्षा महत्त्वाचा होता. इथला प्रांत अतिशय सुपीक +असल्याने साहजिकच इथला महसूलही जास्त होता आणि तसंही निजामाकडून महसूल +भांडूनच मिळवावा लागणार होता, तर मग दयाबहाद्दरकडून माळव्यातूनच वसुली का करू +नये, असा फायद्याचा विचार बाजीरावांनी केला होता. अपेक्षेप्रमाणे दयाबहाद्दरने वसुलीला +विरोध दर्शवला. पण तोपर्यंत इकडे पेशवे आणि पवारांच्या फौजांनी वसुली करायला +सुरुवातही केली होती. दयाबहाद्दरला ही सारी घटना समजली. तो त्याने +बाजीराव पेशव्यांना युद्धासाठी आव्हान दिले आणि प्रचंड सैन्य घेऊन दयाबहाद्दर चालून +येण्याची तयारी करू लागला. बाजीराव पेशव्यांना दयाबहाद्दरच्या हल्ल्याची अपेक्षा होतीच. +म्हणूनच दयाबहाद्दर उज्जैनीतून बाहेर पडण्याअगोदरच बाजीरावांच्या फौजा वायूवेगाने +उज्जैनच्या परिसरात दाखल झाल्या. मराठी फौजा उज्जैनच्या आसपास लपून बसल्या. +दयाबहाद्दरला या साऱ्या गोष्टींचा मागमूसही नव्हता. फौजा उज्जैनीच्या +वेशीतून बाहेर न तोच मराठी फौजांनी एकदम हल्ला चढवला. +दयाबहाद्दरला अन् त्याच्या सैन्याला कल्पनाही नव्हती की मराठे आपल्याला इथेच घेरतील. +मोंगली सैन्य बावचळून गेले. परंतु दयाबहाद्दर हा शूर होता. त्याने ताबडतोब आपल्या +सैन्याला ओरडून धीर देत लढाईकरता हुशार होण्याचे आवाहन केले. परंतु तोपर्यंत +मराठ्यांनी निम्मी फौज गारद केली होती. अशातच खूद बाजीराव पेशव्यांची आणि +दयाबहाद्दरची गाठ पडली. युद्ध अजूनच भडकले. बाजीरावांच्या चपळाईचा, अन् शक्तीचा +प्रत्यय प्रत्येक वारानिशी दयाबहाद्दरला येत होता. शेवटी काय झालं, कोण जाणे, पण +दयाबहाद्दरने गुडघे टेकले. तो बाजीरावांना शरण आला. बाजीरावांनीही त्याला जीवदान +दिले, पण काही अटीही घातल्या. दयाबहाद्दरने त्या बिनशर्त कबूल केल्या. नंतर उदाजी +पवार आपल्या हाताखालची फौज घेऊन धारकडे वळते झाले आणि पेशव्यांनी आपल्या +खाशा फौजेसह साताऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. फौज दौडत होती. पण नुसतीच नव्हे! +माळव्यातून चौथाई व सरदेशमुखीचा महसूल बरोबर घेऊनच ... + माळव्याहून परत आल्यावर बाजीराव प्रथम साताऱ्यास जाऊन पुण्यात मुक्कामी आले. +<<< + + धडफळ्यांच्या वाड्यात पुन्हा चैतन्य आले. राऊ आपल्या लहानग्या, सुमारे दोन वर्षांच्या + पुत्राला भेटले. बाजीरावांनी आपल्या पुत्राचे नाव आपल्या वडिलांची आठवण म्हणून +बल्लाळ-बाळाजी ठेवले. बाळाजी विश्वनाथांना सारेजण नाना म्हणायचे म्हणून बाजीरावांच्या + पुत्रालाही सारे 'नाना' च म्हणू लागले. श्रीमंत बाजीरावसाहेब पेशव्यांचे सुपुत्र, 'नानासाहेब'! +साधारणतः याच सुमारास बाजीरावांनी नानासाहेबांना शिक्षण देण्याचे सुरू केले. त्याकरिता +बाजीरावांनी बाळाजी विश्वनाथ व पेशवे घराण्याच्या खास विश्वासातले रामचंद्रबाबा शेणवी + सुखटणकर यांची नेमणूक केली. रामचंद्रपंत मुत्सद्दी तर होतेच, पण त्याचबरोबर +वेदाभ्यासातही पारंगत होते. नानासाहेबांचे नित्यनेमाने शिक्षण सुरू झाले. बाजीराव +पुण्यातच होते. दिवस आनंदात जात होता. इ. स. १७२५ सालचा ऑक्टोबर महिना +उजाडला. बाळाजी विश्वनाथ पूर्वी 'सेनाकर्ते' असल्याने सैन्य जमवताना वा हुशार करताना +काय करावे अथवा नाही अशा सैन्यातल्या बऱ्याच बारीकसारीक गोष्टी बाजीरावांना माहीत + झाल्या होत्या. 'सैन्य एकाचजागी जास्त काळ ठेवू नये! शीण येतो. ते रोखण्याकरिता सैन्य +सतत फिरते ठेवावे!' आणि बाजीरावांचे लक्ष्य दक्षिणेकडे वळले. दक्षिण भागात अनेक +लहान-मोठी राज्ये होती. ती हिंदूंची होती. परंतु, जर आक्रमण झाले तर त्याविरुद्ध लढण्याचे + सामर्थ्य या लहान राज्यांकडे नव्हते. निजामाचे लक्ष्य या राज्यांकडे वळले होते. निजाम + दख्खनेत उतरून या राज्यांना गिळंकृत करण्याच्या आतच आपण ही राज्ये स्वराज्यात + सामील केली पाहिजेत, असा विचार बाजीराव पेशव्यांच्या मनात आला. हा विचार त्यांनी + शाहूमहाराजांपाशी बोलून दाखवला. महाराजांनाही ते पटले. कारण याचदरम्यान +कोल्हापूरकर संभाजी राजांचे वर्तनही काही संशयास्पद वाटत होते. त्यांनी काही नव्या +हालचाली करण्याअगोदर आपल्याला कर्नाटक घेणे गरजेचे आहे, हेही बाजीरावांनी + महाराजांना पटवून दिले. महाराजांनी आनंदाने संमती दिली. नोव्हेंबर सन १७२५ मध्ये + पेशव्यांच्या फौजांनी कृष्णा नदी ओलांडून कर्नाटकाच्या दिशेने कूच केले. दक्षिणेतील +राज्यांमध्ये बाजीरावांच्या या मोहिमेच्या बातम्या पोहोचत होत्याच. त्यातल्या काही राजांनी + आपणहून पेशव्यांचे म्हणजेच सातारकर छत्रपतींचे मांडलिकत्व स्वीकारले. परंतु काही + संस्थानिक मात्�� अजूनही आपल्याच तोऱ्यात होते. 'बाजीराव पेशवा कोण? तो असेल मोठा + पराक्रमी. पण तिकडे उत्तरेत. हिंदुस्थानात! इकडे दख्खनेत आम्हाला हरवण्याची त्याने स्वप्ने + पाहू नयेत. नाहीतर मारून मातीत मिसळू म्हणाव त्याला. आल्या पावली माघारी जा !! ' + बघितलं? हे आपलेच लोक ... काय बोलावं यांना? पण बाजीराव पेशवे हटले नाहीत. +दख्खनेतल्या हरएक राज्यात आपले खास दूत पाठवले व संस्थानिकांना समजावले, 'आज +पुन्हा अखिल आर्यावर्तात हिंदूंचे राज्य पुन्हा उभारण्याकरिता शाहूमहाराज सातारच्या +सिंहासनावर बसले आहेत. उत्तरेत मोंगल अजूनही आहेत. दख्खनेत मोंगलांचा क्रूर सुभेदार + निजाम-उल-मुल्क बसला आहे. आलमगीर औरंगजेबाचा पक्का चेला तो. त्याला +दख्खन (व हिंदुस्थानही) पादाक्रांत करावयाचा आहे. त्याच्या मस्तकी दिल्लीपतीचा वरदहस्त + आहे. अशावेळेस जर मोंगली फौजांनी कर्नाटकवर आक्रमण केले तर तुमचा निभाव लागणे +केवळ अशक्य. मागे औरंगजेब दख्खनेत उतरला तेव्हाचा प्रसंग आठवा. याक्षणी आपण +<<< + +सर्वजण एकत्र झालो तरच म्लेंच्छांना मात देऊ शकतो. याकरिता आपण सर्वांनी एकदिलाने +शाहूमहाराजांस सहकार्य करावे. या आशयाची पेशव्यांची पत्रे प्रत्येक संस्थानिकांकडे +पोहोचली आणि खरंच या पत्रांचा त्या संस्थानिकांवर परिणाम झाला. साऱ्या संस्थानिकांनी +सातारकऱ्यांचे मांडलिकत्व स्वीकारायचे ठरवले. मुरारराव म्हैसूरचा वडियार, +त्याचबरोबर अर्काट, गदग, कनकगिरी, चित्रदुर्ग, सुरापूर, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टणम्, बिदनूर इ. +सर्व लहान-मोठ्या संस्थानिकांनी शाहूमहाराजांचे मांडलिकत्व पत्करले. ही मोहीम काही +लगेचच संपली नाही. नोव्हेंबर १७२५ ते एप्रिल १७२६ दरम्यान बाजीरावांचा मुक्काम +चित्रदुर्गाजवळ तर पुढे एप्रिल १७२७ पर्यंत त्यांचा मुक्काम होता. वास्तविक +यापुढेही थेट तंजावर-मदुरैपर्यंत जाण्याचा बाजीरावांचा विचार होता. परंतु, सातारा +दरबारातील काही हितशत्रूंच्या कारस्थानांमुळे बाजीरावांना परत फिरणे भाग पडले. +बाजीरावांनी दख्खनच्या संस्थानिकांकडे, 'जैसे मोंगल चौथाई व सरदेशमुखी देतात तैसेच +तुम्हीही समयी देत जावे' अशी मागणी केली. संस्थानिकांनी ही मागणी काहीशा नाराजीने +का होईना पण मान्य केली ... बाजीरावांनी दख्खनेतल्या साऱ्या संस्थानिकांना एकत्र आणून +शा��ूमहाराजांचे मांडलिक बनवले. हे पाहून हैद्राबादकर निजाम आणि कोल्हापूरकर +संभाजीराजे यांचा जळफळाट झाला. बाजीराव पेशव्यांविरुद्ध म्हणजेच शाहूमहाराजांविरुद्ध +या दोघांनीही परस्परांत गुप्त तह केला. संभाजीराजांना तह झाला असल्याने उघडउघड +शत्रुत्व पत्करता येत नव्हते. निजामाने पुन्हा बंडखोरी सुरू केली. कोल्हापूरकरांचीही आतून +साथ होतीच. + बाजीराव पेशवे १७२५ मध्ये जेव्हा कृष्णा ओलांडून कर्नाटकात उतरले तेव्हा इकडे +निजामाने वेगळाच खेळ मांडला. निजाम हा महत्त्वाकांक्षी व उत्तम दर्जाचा सेनापती होता. +याचवेळी निजाम आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या बेतात होता. या त्याच्या राज्याला +त्याने नाव दिले होते, 'असफजाही'. १७२५ मध्ये शाहूमहाराजांनी प्रतिनिधी आणि पेशव्यांना +दक्षिणेत पाठवलेले पाहून कोल्हापूरकरांना आणि निजामाला आयतीच सवड मिळाली. +कोल्हापूरकर संभाजी छत्रपतींनी चंद्रसेन जाधवांना लिहिलेल्या पत्रात "आपणाकडे येणे +म्हणून निजामाची लिहीणी येतात. पठाणांचे श्रीपतराव (प्रतिनिधी) व बाजीराव +यात एकमत नाही. स्वामींकडील अगत्य धरावयाविशी निष्कर्ष तुम्ही निजामास कळवावा. +सातारावासीयांकडील तह मोडून स्वार्थ साधावा, हा अर्थ निजामांनी तुम्हांस सांगून पाठवला, +हे गोष्ट तुम्ही बरी केली." यावरून निजामाला पुण्यावर हल्ला करण्यास कोल्हापूरकरांची +फूस होती दिसते. इ.स. १७२५ ते १७२८ या तीन वर्षांत कोल्हापूरकर संभाजी +निजामाबरोबर स्वारीत होते, असे एका पत्रावरून दिसते. निजामाने प्रथम 'मी सरळ वागत +आहे, बाजीरावच मुदाम कुरापती हा तरुण पेशवा आणि खंडेराव दाभाडे सेनापती +तुम्हांस दगा करणार' अशी समजूत करून दिल्याने शाहूराजांचा गैरसमज झाला खरा आणि +म्हणूनच शाहूराजांनी अंबाजीपंत पुरंदऱ्यांना पत्र लिहून बाजीरावांना समज देण्याविषयी +सांगितले. पण लगेचच निजाम-कोल्हापूरकर यांच्या संगनमताचा प्रत्यय शाहूमहाराजांना येऊ +लागला. दि. १३ ऑक्टोबर १६२७ रोजी शाहूराजांनी आपल्या सरदारांना पत्रे पाठवून +<<< + +"किलीजखानाचे (निजामाचे) पिच्छावर येऊन पायबंद देऊन नतीजा पोहोचवून स्वामींचा +संतोष करणे" अशी आज्ञा दिली. + इ. स. १७२७ च्या सुरुवातीला निजाम बीड आणि जूनपासून पुढे धारूरला होता. निजाम +मराठ्यांना चकवा देऊ पाहात होता. एक���ा तो औरंगाबादेस जात आहे असे वारत +असतानाच अचानक तो बीडला आला आणि सरदार पाठवले ते रोखाने. +निजामाकडे तोफखाना होता तो अर्थातच मराठ्यांकडे नव्हता. गनिमी कावा हे मराठी +फौजेचे प्रमुख हत्यार होते. बाजीरावांनी नाशिकपासून साताऱ्यापर्यंतची जबाबदारी +चिमाजी आप्पांवर सोपवून आपण उत्तरेकडची बाजू सांभाळली. आप्पांच्या दिमतीला शिंदे- +होळकर-कदमबांडे असे शूर पराक्रमी सरदार होतेच. राणोजी शिदे एका पत्रात बाजीरावांना +म्हणतात, "ज्या प्रकारची आज्ञा होईल, त्याप्रमाणे वर्तू, भिऊन पुढे चालावयास अंतर +करणार नाही. प्रसंग पडलाच तर स्वामींचे पुण्य समर्थ आहे. आमचा सांभाळ ईश्वरच करीत +आहे." ऑगस्ट १७२७ च्या आसपास पावसाळ्यात ऐवजखान नाशिकजवळ असताना +सिन्नरला तुकोजी पवारांनी चांगलाच समाचार घेतला. + इ. स. १७२७ च्या अखेरीस निजाम पुण्यात शिरला आणि त्याने पुणे प्रांतात जो +धुमाकूळ घातला त्याचे वर्णन खुद्द चिमाजीआप्पा करतात ते असे- "तुरुकताजखान, संभाजी +निंबाळकर, नेवासकर थोरात, धीराजी पवार वगैरेंनी येऊन धुंदी माजवली. +लोहगडचे पेठेपर्यंत गेले. तेथे लोहोगडकरांनी ठेचून वाटेस लावले. ते माघारे येऊन चिंचवड- +पुण्यामध्ये राहिले. तो निजाम संभाजीराजीयांसह पुणे प्रांतात अंजनापुरास येऊन राहिला. +पुढे तळेगाव शिखरापूरावर जाऊन कौल घेतले. तेथून नारायणगड उदापूरचे रोखे जाऊन +राहिला. अवसरी पाबळकर ठाणी टाकून पळाले. खेडचे संरक्षक ठाणे सोडून गेले. +नारायणगडावरील शिबंदीने बेगास संभाजीराजांचे निशाण घेतले." +यावेळी चिमाजीआप्पा स्वतः पुरंदरगडावर शाहूराजांसह होते. निजामाने पुण्यात रामनगरच्या +शिसोदिया राजपूत राण्याच्या मुलीशी कोल्हापूरकर संभाजीराजांचे लग्न लावून दिले. + पुण्यावरून निजाम निघून त्याने सुपे जिंकले. तेथे संभाजी निंबाळकर आणि पाटसला +नेवासकर थोरातांना ठेवून बारामती जानोजी निंबाळकराला दिले. इतक्यात स्वतः बाजीराव +पुण्याच्या रोखाने येत आहेत, अशा बातम्या आल्याने निजाम पेडगावमार्गे अहमदनगरला +गेला. यावेळेस बाजीराव खानदेशात होते. ते पुण्याकडे यायच्या आत निसटावे या विचाराने +निजामाने आपला तोफखाना नगरलाच मागे सोडला आणि २२ फेब्रुवारी १७२८ रोजी तो +पुण्याहून निघाला औरंगाबादच्या मार्गाने निघाला. + बाजीरावांना ���िजामाच्या इत्थंभूत बातम्या वेळोवेळी मिळत होत्या. गनिमीकाव्याने +बाजीरावसाहेबांनी निजामाचा मुलुख उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला. बाजीरावांनी +निजामाचे जालना आणि सिंदखेड हे परगणे अक्षरशः जाळून बेचिराख केले. ऐवजखान +चालून आल्यावर बाजीरावांनी जाण्याची हूल उठवून थेट पूर्वेकडे वळून माहूर- +वाशिम वगैरे भागात धांदल उडवून दिली. ६ नोव्हेंबर १७२७ मध्ये जालन्याजवळ ऐवजखान- +बाजीराव लढाई होऊन बाजीराव गुजरातच्या रोखाने गेले. त्यानंतर थेट तापी उतरून +<<< + +बाजीराव जानेवारी १७२८ च्या आरंभी गुजरातेत भड़ोचला गेले आणि सुरतेवर येत आहे +असे दाखवून सरबुलंदखानाला चकवा दिला. १४ फेब्रुवारीला बाजीराव धुळ्याजवळ बेटावद +येथे दाखल झाले. + उत्तरेकडून निजामाला मिळणारी मदत त्याला पुणे सोडून उत्तरेत येणे भाग +पाडण्याचा बाजीरावांचा डाव सफल होत होता. बाजीराव जाण्याची अफवा +निजामाला खरी वाटून तो त्या दिशेने लगबगीने निघाला खरा, पण मध्ये अजिंठ्याच्या +डोंगररांगेतून अचानक खाली आलेल्या बाजीरावांच्या झंझावाती फौजांनी त्याला अक्षरशः +हैराण केले. औरंगाबादेच्या पश्चिमेस जवळपास सात कोसांवर असणाऱ्या पालखेड येथे +निजामाचा तळ पडला असतानाच २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मराठी फौजांनी पालखेडला +येऊन निजामाला चहूकडून वेढा घातला. निजामाचा तोफखाना मागे नगरलाच असल्याने +मराठी फौजांना आता त्याची भीती नव्हती. बाजीरावांनी निजामाच्या पाण्याच्या स्रोतावर +चौक्या बसवल्या. निजामाचे पाणी तुटले. दुसऱ्या दिवशी निजामाची फौज जागी झाली +आणि पाहतात तो काय? चारही बाजूंनी मराठे हातात तलवारी घेऊन हल्ला करण्याच्या +बेतात उभे होते. निजामाने आपल्या सैन्याला सज्ज होण्याचा हुकूम सोडला. जे शस्त्र हाती +येईल ते घेऊन निजामाची फौज उभी राहिली. 'अल्ला हो अकबर' च्या घोषणा देत निजामाची +फौज, कोंडी फोडण्यासाठी मराठ्यांवर चालून गेली. मराठे सज्ज होतेच. त्यातच एका +घोड्यावर स्वतः श्रीमंत बाजीराव पेशवे युद्धवेश चढवून बसले होते. निजामाने कोंडी +फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण मराठे त्याला पुन्हा पुन्हा आत ढकलत होते. +खानाच्या सैन्याला प्रचंड तहान लागलेली, मराठवाड्याचा मुलुख हा, त्यात उन्हाळ्याचे दिवस +आणि अशातही पाणवठा मराठ्यांच्या ताब्यात. त्यामुळ��� लढण्यापेक्षा जीव गेलेला बरा, अशी +निजामाच्या सैन्याची अवस्था झाली. बाजीरावांनी निजामाला स्पष्ट अटी कळवल्या की, +'मोंगल दरबारातून चौथाई-सरदेशमुखी आम्हाला मिळाली आहे, ती बिनतक्रार मिळणार +असेल आणि कोल्हापूरकरांना सातारकरांविरुद्ध भडकवून राजकारणे करणे निजाम +सोडणार असेल तरच जीवदान मिळेल." अखेर ऐवजखाननेही निजामाला समजावल्याने +निजाम नाक मुठीत घेऊन शरण आला. एका समकालीन पत्रात म्हटले आहे की, "ऐवजखान +नसता तर श्रीमंतांनी निजामाची विश्रांती केली असती." यानंतर निजामाने बाजीरावांच्या +अटी मान्य करून लिहून दिल्या. एकूण तहनामा १७ कलमी असून त्यातील महत्त्वाच्या या +अटी अथवा मागण्या अशा - + १. दक्षिणचे कामकाजाचा बंदोबस्त आमचे हाते घ्यावा. ईश्वरकृपेकरून दौलतखाई व +किफाईती केली जाईल. जबाबशर्त तुमचे हाते घेतला जाईल. + २. शाहूकडून आनंदराव आपणापाशी आहेत, त्यासी आम्हासी नीट नाही. सबब त्यांसी +निरोप द्यावा. आम्हाकडून कोणी आपल्यापाशी राहील. + ३. संभाजीराजे यांस निरोप द्यावा की, ते पन्हाळ्यास जात. + ४. प।। अक्कलकोट, खेड, तळेगाव, इंदापूर, नारायणगाव व पुणे वगैरे ठाणी +पहिल्यापासून स्वराज्यात आहेत. हाली आपण जप्त केली, ती मोकळी करावी. +<<< + + ५. सहा सरसुभे दख्खनच्या सरदेशमुखीची सनद नवी द्यावी. + ६. संभाजीराजे यांस विजापूर सुभ्यापैकी कृष्णा व पंचगंगेकडील प्रांत आम्हीं दिल्हा +आहे व त्याची सनदही आम्ही करून दिल्ली. तेच असावी, आपण न द्यावी. + ७. संभाजीराजे यांस सुभे विजापूरपैकी कृष्णा व पंचगंगेच्या पलीकडे प्रांत येथील चौथ +सरदेशमुखी आम्ही दिल्ली ते त्यांणी घेत जावी. कृष्णेच्या अलीकडे उपद्रव न करावा. + दि. ६ मार्च १७२८ रोजी झालेला हा तह मुंगी-शेवगावचा १७ कलमी तह म्हणून +इतिहासात प्रसिद्ध आहे. + पालखेडचे युद्ध २५ फेब्रुवारीला झाले व साधारण दहा दिवसांनी, ६ मार्च १७२८ रोजी +निजाम आणि मराठ्यांमध्ये तह झाला. बाजीरावांनी हा सारा तपशील सातारला +शाहूमहाराजांना लिहून कळवला. निजामाला मात दिली. आता कोल्हापूरकरांनाही समज +देणे गरजेचे होते. शाहूमहाराजांनी कोल्हापूरकरांशी वाटाघाटी करण्याचे सारे हक्क पेशव्यांना +दिले. बाजीरावांनी वकिलामार्फत संभाजीराजांशी वाटाघाटी चालू केल्या. शाहूमहाराजांनी +मोठ्या समजूतदारपणाने संभाजीराजांना मा��� केले. पेशव्यांनी त्यांना पुन्हा एकदा पूर्वी +झालेल्या ‘वारणेचा तह' आठवण करून दिली आणि त्यानुसार वारणेच्या आणि तुंगभद्रेच्या +दोआबातील सुभ्यातून (फक्त जे सुभे मोंगलांच्या अखत्यारित असतील त्यांच्याकडून) चौथाई +वसुलीचे हक्क संभाजीमहाराजांना दिले. परंतु कर्नाटकातील हिंदू संस्थानातील चौथाई +शाहूमहाराजांनाच मिळणार होती. कोल्हापूरकरांनीही हे मानले. पालखेडच्या लढाई व +तहामुळे शाहूमहाराजांना बाजीरावांबद्दल अधिक विश्वास वाटू लागला. + इकडे दक्षिणेत निजामाने थाटलेले स्वतंत्र राज्य, पालखेडची लढाई इ. साऱ्या गोष्टी +उत्तरेत बादशहाला समजत होत्या. बाजीरावाने निजामाला धूळ चारली आहे. त्यामुळे निजाम +आता (इतक्यात तरी) बाजीरावाविरुद्ध हालचाल करणार नाही. पण तो स्वस्थही बसणार +नाही. हळूहळू संधी साधून तो नर्मदेच्या वर मोंगली सुभ्यात घुसखोरी करणारच हे आता +बादशहाला उघड उघड दिसत होते. यावेळेस मोंगलांचा गुजराथचा सुभेदार सरबुलंदखान +नावाचा पठाण होता. बादशहाने निजाम उत्तरेत येण्याआधीच बाजीरावांना मदतीला येण्याचे +आवाहन केले. बाजीरावांनी मदत देण्याचे मान्य केले. आपला वकील बाजीरावांनी मोंगल +सुभेदार सरबुलंदखानाकडे पाठवला. बादशहानेही तहाबद्दलच्या वाटाघाटी करण्याचे सारे +अधिकार सरबुलंदखानास दिले होते. शेवटी 'बाजीरावांनी (मराठ्यांनी) आपली २५००० +फौज गुजराथेत ठेवावी व निजामादी बादशाही शत्रूंचा बंदोबस्त करावा. त्याच्या बदल्यात +बादशहाने मराठ्यांना गुजराथ व माळवा प्रांताच्या चौथाई व सरदेशमुखी बहाल करावी' +असा उभय पक्षांत तह झाला. + या सर्व मोहिमांमध्ये कागदोपत्री फायदा झाला होता, पण प्रत्यक्ष नगद महसूल मात्र +फारसा मिळत नव्हता. त्यामुळे राज्यावरचे कर्ज होते. शाहूमहाराजांनी बाजीरावांच्या +पाठी कर्जे फेडण्यासाठी तगादा लावला होता. वास्तविक झालेले कर्ज हे पेशव्यांच्या नावावर +होते. पेशवे मोहिमेवर जात तेव्हा मोहिमेचा सारा खर्च पेशवे स्वतःच्या खर्चाने करत. परंतु, +<<< + +मोहिमांत जी वसुली होत असे ती स्वतःकरता न ठेवता पेशवे सरकारी तिजोरीत जमा करत +असत. परंतु तरीही साताऱ्यातल्या काही विरोधकांनी महाराजांचे मन कलुषित केले. +बाजीरावांना या साऱ्या गोष्टी समजत होत्या. परंतु त्यांनी याबाबतीत शाहूमहाराजांना कधीही +दोष ��िला नाही हे महत्त्वाचे! शाहूमहाराजांच्या समाधानाकरता पेशव्यांनी माळव्याची मोहीम +आखायचे ठरवले. + माळवा प्रांत हा हिंदुस्थानातला एक महत्त्वाचा प्रांत होता. राजुपातान्याला लागून +असलेल्या या प्रांतावर हिंदुस्थानातल्या प्रत्येकाचे लक्ष होते. माळवा प्रांत हा बहुतांशी +राजपुतांच्याच ताब्यात होता. राजपूत सरदार हे मोंगलांचे अंकित असल्याने माळवा +मोंगलांच्या अखत्यारित येत होता. यावेळेस जयपूर-अंबरनरेश सवाई जयसिंह हा वरकरणी +जरी मोंगलांची तरफदारी करत असला तरीही आतून त्याची राजपूतांना स्वतंत्र करण्याची +खटपट चालूच होती. पेशवेदेखील हळूहळू हात पसरू लागले असल्याने जयसिंहाला आता +राजपूतांना स्वतंत्र करण्यासाठी पेशव्यांची मदत घेणे इष्ट वाटू लागले होते. बाजीरावांनाही +माळवा प्रांत हवा होताच. पूर्वी १७२१ साली दाऊदखान पन्नी या मोंगल सरदाराचा पराभव +केल्यानंतर १७२२ साली पेशव्यांनी माळव्यावर नजर व वचक ठेवण्यासाठी उदाजी पवारांना +'धार' या ठिकाणी नेमले होते व लगेचच दोन वर्षांत, १७२४ साली माळवा-उज्जैनीचा +मोंगली सुभेदार दयाबहाद्दरचा पराभव केला होता. वास्तविक यानंतर लगेचच संपूर्ण माळवा +ताब्यात घेण्याची बाजीरावांची इच्छा होती. परंतु नंतरच्या कर्नाटक मोहिमा, निजाम प्रकरण, +पालखेड मोहीम इ. मोहिमांमुळे बाजीरावांचे माळव्यात जाणे रखडले होते. परंतु आता +दक्षिण व निजाम या दोन्ही आघाड्यांवर स्वस्थता असल्याने बाजीरावांनी माळव्याच्या +मोहिमेला हात घालण्याचे ठरवले. जयपूरनरेश सवाई जयसिंहाने मराठ्यांशी हातमिळवणी +केली होतीच. सवाई जयसिंहाने इंदूरचा चौधरी (ठाणेदार) मंडलोई याला मराठ्यांकडे +पाठवून दिले. मंडलोईने माळव्यात घुसण्यासाठी नर्मदेवरच्या उतारांची व घाटरस्ते, खिंडी +इत्यादींची तपशीलवार माहिती बाजीरावांना पेश केली. यापूर्वी माळव्याचा सुभेदार +दयाबहाद्दरचा बाजीरावांनी पराभव केल्यानंतर त्याच्या ठिकाणी राजा गिरधरबहाद्दर हा +माळव्याचा सुभेदार म्हणून नेमला गेला होता. गिरधरबहाद्दरला सुभेदारी मिळवून देण्यात +सवाई जयसिंगाचा फार मोठा हात होता. आता बाजीराव पेशवे माळव्यात घुसण्याच्या बेतात +असताना गिरीधरबहाद्दराने पेशव्यांना मदत करावी, अशी जयसिंहाची अपेक्षा होती. परंतु, +गिरिधरबहाद्दर मात्र मनात वेगळेच मनसुबे बांधत होता. नर्मदेच्या खाली निजामाने आपला +मुलुख स्वतंत्र करून जसं स्वतंत्र राज्य थाटलं होतं तसंच आपणही माळव्यात आपला स्वतंत्र +कारभार करावा असं गिरीधरबहाद्दराला मनोमन वाटत होतं. गिरीधरबहाद्दर जयसिंहाने +केलेले उपकार विसरला. सवाई जयसिंहाच्या खलित्यांना त्याने बासनात गुंडाळून ठेवले. +जयसिंहाला घडत असलेला सारा प्रकार लक्षात येत होता. पेशवे एकीकडे आपल्याला मदत +करण्याचे आमिष दाखवून माळवा प्रांतच गिळंकृत करण्याच्या बेतात आहेत हे +केली. बादशहालादेखील समजले. त्यानेही गिरीधरबहाद्दरला आतून मदत पुरवण्यास सुरुवात +<<< + + इकडे बाजीरावांनी धारला यापूर्वीच उदाजी पवारांची नेमणूक केली होती. त्याशिवाय +ग्वाल्हेरच्या ठाण्यावर राणोजी शिंदे व इंदौरच्या ठाण्यावर मल्हारराव होळकर या आपल्या +खास आणि विश्वासू सरदारांना नेमले. माळव्यात घुसण्याची तयारी पूर्ण झाली. परंतु +इतक्यात दक्षिणेत काही कटकट उद्भवल्याने बाजीरावांना दक्षिणेत गुंतून लागले. +सैन्य तर आधीच पुढे गेले होते. अशावेळी मोहीम रद्द करणेही शक्य नव्हते. म्हणूनच +बाजीराव पेशव्यांच्या ऐवजी चिमाजीआप्पांनी धुरा सांभाळावी असे ठरले. पुण्यातून आपल्या +खाशा फौजेसह चिमाजीआप्पा उत्तरेत जायला निघणार होते. परंतु, याच सुमारास +पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई पंढरपूरच्या व तुळजापूरला जगदंबा भवानीच्या +दर्शनासाठी जाणार होत्या. म्हणून मग राधाबाईंची तुळजापूर-पंढरपूर यात्रा संपून राधाबाई +पुण्यात आल्यानंतर मातोश्रींचा आणि राऊंचा आशीर्वाद घेऊन चिमाजीआप्पा माळव्याच्या +रोखाने निघाले. (नोव्हेंबरच्या मध्यावर कधीतरी). आप्पांनी नर्मदा ओलांडल्यानंतर ठरलेल्या +योजनेप्रमाणे आधीच पुढे गेलेल्या शिंदे-होळकर आणि पवार यांच्या फौजा चिमाजी आप्पांना +येऊन मिळाल्या. दरम्यान मंगल सुभेदार गिरीधरबहाद्दरला चिमाजीआप्पांच्या साऱ्या +हालचाली दिसत होत्या. चिमाजीआप्पा माळव्यावर चालून येत आहेत हेही त्याला समजले +होते. परंतु, तरीही तो गुर्मीतच होता. चिमाजीआप्पा हा पोरवयीन आहे. त्याला लढाईचा काय +अनुभव असणार ... सहज मारू! अशा तोऱ्यात गिरीधरबहाद्दर युद्धाला तयार झाला. +चिमाजीआप्पा आपल्याबरोबर उदाजी पवार, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर इ. +सरदारांना घेऊन राजपुता���्याच्या रोखाने निघाले. गिरीधरबहाद्दर अजमेरला येऊन शहिला +होता. आमझेराजवळच गिरिधरबहाद्दर आणि चिमाजीआप्पांच्या फौजेची गाठ पडली. +भयंकर कडोनिकटीने युद्ध झाले. त्यातच चिमाजीआप्पांनी खुद्द गिरीधरबहाद्दरलाच गाठले. +दोघेही हटत नव्हते आणि एके क्षणी, काय झाले कुणास ठाऊक, पण चिमाजीआप्पांच्या +तलवारीच्या फटक्याखाली गिरीधरबहाद्दरचे मुंडकेच उडाले. गिरिधरबहाद्दरासारखा +समशेरबहाद्दर आप्पांनी स्वतःच्या हाताने मारला. 'स्वामी पुन्हा पुरुष यशस्वी. वडिलांचे पुन्य +समर्थ. त्या प्रांती मोहरा सामान्य नव्हता. त्यासच मोडला. या उपरी पृथ्वी +स्वामींस वश आहे. श्री कधीही न्यून देणार नाही ... ' चिमाजीआप्पांनी + मोंगल सरदार स्वतः मारला हे ऐकून शाहूमहाराजांना फार +आनंद झाला. राऊंनाही आनंद झाला. या मोहिमेत महसूलही मिळाला. त्यामुळे सातारा +दरबारातील विरोधकांची तोंडं आपोआप बंद झाली. चिमाजीआप्पा दक्षिणेत येण्यास +निघाले. +<<< + + Oधार O + + गिरीधर व मार्ग + दया O मोय + तोफखाना O + + चिमाजी + मनावर० मार्ग + धरमपूरीO + आमझेरा येथील युद्धात चिमाजी आप्पांध्या फौजांनी अतुलनीय पराक्रम गाजवून + पाडाव केला + इकडे पेशव्यांच्या फौजांनी मात दिली त्याच सुमारास बुंदेलखंडनरेश +महाराजा छत्रसाल यांच्या फौजांनी थेट दिल्लीवरच हल्ला करण्याची योजना आखली होती. +बादशहाने मोंगल सरसेनापती मुहंमदखान बंगश याला दिल्लीच्या संरक्षणार्थ नेमले. बंगशाने +दिल्लीवर चालून येणाऱ्या बुंदेली फौजांवर अचानक हल्ला चढवला. यात छत्रसालपुत्र +जगतराज याचा प्रचंड पराभव झाला. बुंदेली फौज उधळली गेली. यावेळेस महाराणा +छत्रसालांचा मुक्काम जैतपूरच्या किल्ल्यात होता. बंगशाने ताबडतोब जाऊन जैतपूरच्या +प्रचंड किल्ल्याला वेढा घातला. छत्रसालांचं वय यावेळेस ऐंशी वर्षांच्या आसपास होते. तरीही +ते एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा आवेशात होते. छत्रसालांचा जन्म १६४९ च्या +सुमारास राजपुतान्यात झाला. छत्रसाल यांचे वडील चंपतराय बुंदेला हे औरंगजेबाचे एकनिष्ठ +चाकर होते. औरंगजेबाने दिल्लीची गादी बळकवण्यासाठी जेव्हा आपल्या बापाविरुद्ध आणि +सख्ख्या भावांविरोधात बंड केले तेव्हा छत्रसाल बुंदेले यांच्या वडिलांनी, चंपतरायाने +मिर्झाराजे जयसिंगाच्या बरोबर औरंगजेबाला साथ दिली. औरंगजेबाचा जय झाला. +औरंगजेब दिल्लीच्या गादीवर तख्तनशीन झाला. सुमारे एक वर्ष गेले असेल, नसेल तोच +औरंगजेबाच्या शाही फौजा दिशेने रोरावत निघाल्या. चंपतराय बुंदेला +बुंदेलखंडात बंड मांडतोय असा फक्त संशय आला आणि औरंगजेबाचे बोट बुंदेलखंडाकडे +टवकारले गेले. युद्धात चंपतरायाने आपल्याला केलेली मदत औरंगजेब +विसरला. बादशाही फौजा जाळपोळ करीत बुंदेलखंडात घुसल्या. शाही फौजांपुढे +<<< + +चंपतरायाची फौज आणि बळ तोकडे पडले. पन्न्याचा किल्ला हातचा गेला. चंपतरायाचा +वनवास सुरू झाला. पूर्वी अकबराविरुद्ध लढताना राणाप्रतापाची जी परिस्थिती झाली होती, +त्याहूनही बिकट परिस्थिती चंपतरायाची झाली होती. अकबराने महाराणा प्रताप जर शरण +आला तर त्याला जीवदान देण्याचे आश्वासन दिले होते. पण इथे औरंगजेब मात्र चंपतराय +बुंदेल्याच्या जीवावरच उठला होता. अखेर भयंकर दारूण अवस्थेत औरंगजेबाशी एकांगी + ऑक्टोबर १६६१ मध्ये चंपतराय बुंदेला मृत्युमुखी पडला. चंपतरायाच्या +पत्नीने, म्हणजेच छत्रसालाच्या आईने, कालीकुमारीने आपली मान काटून आत्मार्पण केले. +छत्रसाल आणि त्यांचे चार भाऊ पोरके झाले. चंपतराय बुंदेल्याचा पराक्रम मिर्झाराजे +जयसिंह जाणून होते. त्यांनी चंपतरायाच्या पाचही पुत्रांचा सांभाळ केला. अशातच चार-पाच +वर्षे उलटली. मिर्झाराजे जयसिंह दख्खनवर शिवाजी महाराजांवर चालून निघाले. निघताना +त्यांनी छत्रसाल बुंदेल्याला आपल्या फौजेत सामावून घेतले. पुरंदरच्या लढाईत छत्रसाल +महाराष्ट्रात होता. औरंगजेबाची दाणादाण उडवणारा हा शिवाजी कोण आहे याचं +छत्रसालाला आश्चर्य वाटत होतं. पुढे आग्रा प्रकरण निघाले. महाराज आग्र्याहून निसटून +आले. औरंगजेबाची मर्जी फिरली. चंपतराय बुंदेल्याप्रमाणेच औरंगजेबाने मिर्झाराजांचाही +घात केला. त्यांना जेवणात विष मिसळून मारण्यात आले. नंतर छत्रसाल दिलेरखानाबरोबर +गोंडवनात गेला. पण तो जसा मोठा होऊ लागला तसा त्याच्या डोक्यात प्रकाश पडू लागला. +ज्या कपटी औरंगजेबाने आपले घर उद्ध्वस्त केले, आपल्या आई-वडिलांना ठार मारले, +आपली ससेहोलपट केली त्या औरंगजेबाची चाकरी ���पण का करतोय? त्यापेक्षा तो +शिवाजीराजा देवाधर्मासाठी, मायभूमीसाठी लढतोय त्याला सामील व्हावे, आपल्या धर्मांची +घोर विटंबना करणाऱ्या या तुर्कांना आपल्या या पवित्र भूमीतून कायमचे हाकलून द्यावे. +प्रसंगी शिवाजीराजांची चाकरी करावी लागली तरी पण आता औरंगजेबासाठी +आपला जीव द्यायचा नाही. असा विचार करून छत्रसाल शिवाजीमहाराजांच्या भेटीला +निघाला. महाराजांचा मुक्काम यावेळेस कुरुंदवाडच्या जवळच होता. पराक्रमी चंपतराय +बुंदेल्याचा पुत्र आपल्या भेटीसाठी येतोय हे पाहताच स्वतः शिवाजी महाराज त्याला सामोरे +गेले. छत्रसालाने स्वराज्यात चाकरी करण्याचा मनसुबा महाराजांना सांगितला. महाराजांना +फार आनंद झाला. पण महाराजांनी त्याला समजावले, 'महाराणा छत्रसालजी, आपण +क्षत्रियांचे सरताज आहात. आपण चाकरी करण्याच्या ऐवजी बुंदेलखंडात जा. जे +मी येथे केले तेच तुम्ही बुंदेलखंडात करा. बंड मांडा. बुंदेलखंड स्वतंत्र करा. तुम्ही उत्तरेकडे, +मी दक्षिणेकडे. आपण दोघेही या यवनांना हिंदूंच्या या पवित्र भूमीतून हाकलून देऊ. तुम्ही +नक्कीच विजयी व्हाल.' छत्रसालाच्या मनात शिवाजी महाराजांनी एक प्रकारचा +आत्मविश्वास निर्माण केला. छत्रसालाच्या अंगातला कण अन् कण महाराजांच्या त्या तेजस्वी +बोलांनी फुलून उठला. महाराजांनी एक तलवार स्वतःच्या हातांनी छत्रसालच्या +कमरेला बांधली आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन छत्रसाल बुंदेलखंडाकडे निघाला. तिथे +बुंदेलखंडात त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड मांडले व ते यशस्वीही करून दाखवले. बुंदेलखंड +स्वतंत्र झाला. (इ. स. १७७२). +<<< + + छत्रसाल अखेरपर्यंत शिवाजी महाराजांना देवासमान मानत होते. आता जैतपूरला +महंमदखान बंगशाचा वेढा पडल्यावर आपल्याला यातून सोडवणारा फक्त एकच वीर +छत्रसालांच्या नजरेसमोर होता. शाहूमहाराजांचे पेशवे- श्रीमंत बाजीराव बल्लाळ! छत्रसाल +महाराजांनी बाजीरावसाहेबांना सुटकेकरता बोलवणे पाठवले. छत्रसालांनी पत्रात म्हटले +होते, "जो गती ग्राह गजेंद्र की सो गती भई जानहू आज । बाजी जात बुंदेलन्की राखो बाजी +लाज ।।" छत्रसालांचा निरोप घेऊन स्वतः दुर्गादास बाजीरावांकडे आले. बाजीरावांचा +मुक्काम या सुमारास मध्यप्रदेशात येथे होता. बाजीरावांना छत्रसाल आणि +शिवाजी महाराजांच्या ���ाऱ्या घटना व परस्परसंबंध माहीत होते. छत्रसाल महाराजांनी +आपल्याकडे मदत मागितली असता मदत करणे हे बाजीरावांचे कर्तव्य होते. बाजीरावांनी +त्याच क्षणी आपल्या फौजेला सज्ज होण्याची आज्ञा केली आणि परत महाराष्ट्रात येणाऱ्या +चिमाजीआप्पांना सर्व हकीकत कळवली व आपण ताबडतोब फौजेसह बुंदेलखंडात जात +असल्याचे कळवले. त्याचबरोबर बाजीरावांनी माळव्यात असणाऱ्या राणोजी शिंदे आणि +मल्हारराव होळकरांना हुशार राहण्यास सांगितले. इकडे महंमदखान बंगशाने छत्रसालांना +शरण येण्याकरता निरोप पाठवला. त्याकरता त्याने चार दिवसांची मुदत दिली. बंगशाच्या +तोफा 'आ' वासून जैतपूरच्या किल्ल्याच्या रोखाने उभ्या होत्या. छत्रसाल महाराणा वाट +पाहत होते बाजीराव पेशव्यांची. पण पेशवे येण्याची काहीच चिन्हं दिसेनात. सारा +राजपरिवार अन् सेनापतींनी आशा सोडली होती. चार दिवस उलटले. महंमदखान बंगशाने +छत्रसालाला आता युद्धासाठीच आव्हान दिले. जैतपूरच्या जवळच एका मैदानात दोन्ही +फौजा समोरासमोर आल्या. बंगशाच्या मानाने छत्रसालांची फौज फारच होती. + छत्रसालांची ती फौज बघून बंगश हसत होता. आपण छत्रसालला चुटकीसरशी बुडवू +असंच तो समजत होता. पाचव्या दिवशी सकाळी छत्रसाल आपल्या पुत्रांसह रणचंडीचा +आशीर्वाद घेऊन मैदानात उतरले. त्या सर्वांनी बाजीरावांच्या येण्याची आशाच सोडली होती. +छत्रसालांना समोर पाहताच बंगश अजूनच चवताळला. कारण मागे याच छत्रसालांना +मोंगलांनी कैद केले होते. तेव्हा वयोवृद्धपणा व आजारी असल्याचे सांगत छत्रसालांनी +बुंदेलखंडात, पुन्हा बंड न करण्याच्या अटीवर आपली सुटका करून घेतली होती. पण +पन्न्याच्या त्या अभेद्य किल्ल्यात शिरताच छत्रसालांची तब्येत खणखणीत झाली. त्यांनी पुन्हा +बंड मांडले. इतकेच नव्हे, तर खुद्द मोंगल सेनापती महंम्मदखान बंगशाच्या फौजेवरच +(दिल्लीच्या वाटेवर) हल्ला चढवला. आता मात्र तेच छत्रसाल पुन्हा बंगशसमोर होते. बंगश +दात-ओठ खात होता. सूर्य वर आला. शिंगतुताऱ्यांचा तुई तुई " करणारा आवाज +गगनाला भिडला. एवढ्यात ... + एवढ्यात दक्षिणेकडून धुळीचे प्रचंड लोट गगनाला भिडलेले दिसू लागले. कमीत कमी +वीस हजार फौज युद्धभूमीच्या दिशेने दौडत होती. काय चाललंय ते प्रथम कोणाला +कळेचना! आणि मग एकदम छत्रसालांच्या सैन्यात हाकाटी उठली, "पेशवे आले! शाहू +छत्रपतींचे बाजीराव पेशवे आले !! आपल्या मदतीसाठी आले !!! ' दिवसाला तीस-पस्तीस +कोसांची मारून बाजीराव थेट देवगडापासून बुंदेलखंडात आले होते. +<<< + +छत्रसालांनी पेशव्यांना मदतीसाठी खलिता धाडलाय हे बंगशाला माहीत होते. पण त्याच्या +हेरांकडून त्याला हेही समजले होते की, पेशवा गोंडवनाच्या आसपास आहे. बुंदेलखंडात +यायला त्याला कमीत कमी पंधरा-वीस दिवस नक्कीच लागतील. त्यामुळेच बंगश निश्चिंत +होता. पण आता जे समोर दिसत होतं ते वेगळंच! पेशवा आपली फौज घेऊन बुंदेलखंडात +पोहोचला देखील. नकळत बंगशाची बोटे त्याच्याच तोंडात गेली. फौजेचे अंतर कमी होऊ +लागले, तसतशी फौज स्पष्ट दिसू लागली. 'हर हर महादेव' आणि 'छत्रपती शिवाजी +महाराज की जय!'चे रणघोष उठत होते. अगदी आघाडीला भगवे झेंडे नाचत होते. +छत्रसालांच्या फौजेपासून काही अंतर राखून मराठ्यांची फौज थांबली. त्या फौजेतून तीन- +चार स्वार छत्रसाल महाराजांच्या छावणीकडे निघाले. त्यांना बघताच छत्रसालांच्या चेहऱ्यावर +आनंद मावेनासा झाला. आघाडीच्या एका तरुण योद्धयाकडे बोट दाखवत छत्रसाल महाराज +आनंदाने ओरडले. 'राऊ! रावबाजी पेशवे !! ' डोक्यावर पोलादी शिरस्त्राण, अंगात पोलादी +चिलखत, त्यात गुंफलेल्या सोन्याच्या नक्षीदार पट्टया, कमरेला रत्नजडीत सोनेरी मुठीची +पल्लेदार तलवार, अंगात वेलबुट्टीचा पण साधा अंगरखा, पायात तंग सुरवार, पाठीला +भलीमोठी ढाल आणि अशातच घारी पण रोखलेली तीक्ष्ण नजर, केतकी गौरवर्ण, कानात +मोत्यांचा चौकडा-भिकबाळी, कपाळावर शिवगंध असे मर्दानी राजरूप असलेले, युद्धवेश +घातलेले बाजीराव आपल्या घोड्यावरुन उतरून छत्रसालांपाशी आले. त्यांनी छत्रसाल +महाराजांना मुजरा केला. छत्रसालांनी पटकन पुढे होत बाजीरावांना आलिंगन दिले. केवळ +आपल्या एका शब्दाखातर राऊ इतक्या लांबच्या मजला मारून आले हे पाहून छत्रसाल +गहिवरून गेले होते. यापूर्वी त्यांनी बाजीरावांना प्रत्यक्ष पाहिले नव्हते. पण बाजीरावांची +ख्याती, त्यांचे शौर्य कानांवर आले होते. बाजीरावांकडे पाहतानाच छत्रसालांच्या अंगावर +रोमांच उभे राहिले. 'तेच डोळे, तेच नाक, तीच नजर जी आपण मागे कृष्णेच्या +काठावर पाहिली होती.' छत्रसालांना आपल्यासमोर साक्षात शिवाजी महाराजच उभे +राहिल्याचा भास होत होता. बाजीरावांनी आपल्याबरोब��� असलेल्या त्या तीन-चार स्वारांचा +परिचय करून दिला. 'हे राणोजी शिंदे, हे मल्हारराव होळकर, हे बाजी भिवराव रेठरेकर. +छत्रसाल महाराज, आपण चिंता करू नये. हा बंगश आता राहात नाही.' असे म्हणून +बाजीरावांनी ताबडतोब आपल्या सर्व सरदारांना आपापल्या तुकड्या जय्यत तयार ठेवून +लढाईला उभे राहण्यास सांगितले. पाहतापाहता मराठे आणि राजपूत एक झाले. बंगशाला +बाजीरावसाहेबांच्या या साऱ्या हकीकती आणि हालचाली समजत होत्या. पण तरीही तो + होता. एकाएकी मराठ्यांच्या फौजेतून रणशिंगांचा अन् तुताऱ्यांचा आवाज घुमू +लागला. युद्धाला तोंड लागल्याची ती निशाणी होती. बंगशानेही आपल्या सैन्याला जोश +दिला. 'अल्ला हो अकबर'चा घोष करीत बंगशाची फौज चालून येऊ लागली. बाजीराव व +छत्रसालपुत्रांनीही आपल्या फौजेला आक्रमणाचा इशारा केला. 'हर हर महादेव' अन् +'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या युद्धघोषणा देत मराठेही बंगशच्या फौजेवर तुटून +पडले. भयंकर हलकल्लोळ माजला. प्रचंड धुराळा अस्मानात उडत होता. बंगशचा +तोफखाना सुरू होता. पण त्यांच्या माऱ्यापुढे मराठ्यांपेक्षा त्याचेच सैनिक मरत होते. +<<< + +महम्मदखान हा स्वतः एक उत्तम दर्जाचा सेनापती होता. तो शूर होता. बंगश स्वतः हातात +तलवार घेऊन रणमैदानात उतरला. रणघोषांनी अस्मान थरारले होते. दोन प्रहर उलटून गेले + आणि लढाई निर्णायकी झाली. बंगशचे सैन्य फार मोठ्या प्रमाणावर मारले जात होते. अन् + एक क्षण असा आला की, बंगशचे सैन्य उधळले गेले, दिसेल त्या दिशेला, वाट फुटेल तिकडे +पळत सुटले. बंगश सैन्याला धीर देत होता. पण शेवटी त्यालाही पाय घ्यावा लागला. + बंगश पळत सुटला, थेट जैतपूरच्याच दिशेने. बंगशाच्या सैन्याचा पाठलाग करणाऱ्या + आपल्या फौजेला बाजीरावांनी अडवले. बंगश जाऊन जाऊन जैतपूरलाच जाणार हे त्यांना +चांगले माहीत होते. विजयाच्या त्या आनंदात फौज माघारी फिरली व छावणीकडे दौडत +सुटली. या इकडे छावणीत तर आनंदाचे उधाण आले होते. फत्तेमुबारकीच्या तोफा झडत +होत्या. बाजीराव पेशव्यांचा जयजयकार सुरू होता. छत्रसालांना फार आनंद झाला. +बाजीरावांचा पराक्रम आजपर्यंत ते केवळ ऐकून होते. आज प्रत्यक्ष डोळ्यांनीच बाजीरावांना +लढताना पाहिले. साक्षात शिवशंकराचे तांडवच! छत्रसाल मोठ्या आनंदाने व खुशीने +बाजीरावांना आपल्या छावणीत घेऊन गेले. + दुस��्या दिवशी मराठे व राजपूतांच्या संयुक्त फौजा थेट जैतपूरच्या रोखाने दौडत +निघाल्या. जैतपूरच्या किल्ल्याला वेढा पडला. महंमदखान तटावरून मराठ्यांच्या हालचाली +पाहात होता. वेढा आधीच त्याने दिल्ली दरबारकडे मदत पाठवण्याबाबत खलिता + धाडला होता. वेढा पडल्यानंतर काही वेळात किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला. म्हणजे? +बंगश शरण आला की काय? छे! बंगशच्या सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्याबाहेर येऊन +पेशवे बेसावध असताना हल्ला करून बाजीरावांनाच मारण्याचा कट आखला होता. पण + (सुदैवानेच!) बाजीराव सावधच होते. बंगशचा हा कट उधळला गेला. गेलेल्या + तुकडीतले निम्मे हशम गारद झाले. निम्मी परत माघारी आली. बंगशला आता फक्त + आशा होती ती दिल्लीहून मदत येणार याची. तो वाट पाहत होता. दिल्लीत बादशहाला +बंगशचा खलिता मिळाला. त्याने ताबडतोब दहा हजार फौज बंगशच्या मदतीकरता रवाना +केली. फौजेने घौलपूर ओलांडताच बाजीरावांना दिल्लीहून फौज येतेय हे समजलं. त्यांनी + जैतपूरचा वेढा चालूच ठेवला. दिल्लीची फौज बुंदेलखंडात घुसली. बाजीरावांनी बाजीपंत +रेठरेकर व इतरांना काही फौज देऊन या शाही फौजेला अडवायला पाठवून दिले. इकडे चार- + पाच दिवस उलटून गेले तरी फौज का येत नाही या विचाराने बंगश हैराण झाला होता. बाजी +रेठरेकरांच्या फौजेने त्या शाही फौजेला जैतपूरच्या किल्ल्यापासून बऱ्याच लांब अंतरावरच + रोखले. या फौजेचा सेनापती महंमदखान बंगशाचा पुत्रच (कायुमखान?) होता. मराठे + अतिशय आवेशाने तुटून पडले. फारशी लढाई अशी झालीच नाही. मोंगल फौज पराभूत +होऊन पळत सुटली. मराठे विजयाच्या उन्मादात पुन्हा माघारी फिरले. बाजीरावांनी + वेढा अजून आवळून धरला. इकडे बंगशाला काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात +बंगशाचा खबरगीर शाही फौजेच्या पराभवाची अन् पलायनाची बातमी घेऊन आला. +कदाचित त्या खबरगिराला बाजीरावांनीच आत जाण्यास परवानगी दिली असावी, +जेणेकरून बंगशाने आता तरी शरण यावे. बंगशाला बातमी कळल्यावर धक्काच बसला. +<<< + +त्याची होती ती उरलीसुरली आशाही संपली. + वेढा पडल्यापासून आठवडाभरानंतर किल्ल्याचा दरवाजा पुन्हा करकरत उघडला गेला. +मराठे सावध होऊन पाहू लागले, मागच्या वेळेसारखी अजून एकदा फौज येते का? या +बंगशच्या मूर्खपणाचंही कौतुकच करायला हवं, तीनदा मार खाल्ल्यानंतरही फौज पाठवतोय +बेटा! पण असलं काहीच घडलं नाही. दरवाजा उघडताच एक मोंगली हशम हातात पांढरं +निशाण घेऊन बाहेर आला. एक-दोन क्षण गेले असतील नसतील तोच महंमदखान +बंगश खालमानेनं बाहेर येताना दिसू लागला. बाजीराव हा सारा प्रकार बघत होते. +खालमानेनं येणाऱ्या बंगशाला पाहताच पेशव्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. पेशवे पुढे +आले. आतापर्यंत साऱ्या सरदारांनी तलवारी म्यान केलेल्या होत्या. बाजीरावांच्या समोर +येताच बंगशाने मुजरा केला व अतिशय आर्जवी स्वरात दयेची भीक मागू लागला. शत्रूचा +एखादा सैनिक वा सरदार शरण आला असता त्याला जीवदान देणं ही मराठ्यांची रीतच +होती. बाजीरावांनीही बंगशाला जीवदान दिलं. पुन्हा बुंदेलखंडाकडे नजर वर करूनही +बघणार नाही या अटीवर बाजीरावांनी बंगशाला व त्याच्या फौजेला वाट दिली. खालमानेनं +मोंगल सैन्य जैतपूरच्या किल्ल्यातून बाहेर पडलं. जैतपूरच्या किल्ल्यावर पुन्हा निशाण +फडकू लागलं. + पन्न्याच्या त्या प्रचंड किल्ल्यामध्ये बाजीरावांचं मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत +करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी छत्रसाल महाराजांनी बाजीरावांच्या या विजयाप्रीत्यर्थ खास +दरबार भरवला. छत्रसाल महाराजांनी बाजीरावांची फार स्तुती केली. साऱ्या दरबाराला +उद्देशून छत्रसाल म्हणाले, "जग द्वै उपजे ब्राह्मण, और बाजीराव । उन ढाई रजपुतियां, +इन ढाई तुरकाव ।।" म्हणजे या जगात दोनच ब्राह्मण प्रसिद्ध असे उपजले आहेत. पहिले +भार्गव श्री परशुराम, ज्यांनी उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना वठणीवर आणले आणि दुसरे म्हणजे +बाजीराव पेशवे ज्यांनी तुर्कांची तीच स्थिती केली. साऱ्या दरबाराने दाद देत माना +डोलावल्या. आपल्या एका शब्दाखातर बाजीराव एवढ्या लांबवर आले, याची परतफेड +म्हणून खूष होऊन महाराण्यांनी बाजीरावांना, सुमारे बत्तीस लक्ष रुपये वार्षिक उत्पन्न +असलेला आपल्या राज्याचा एक तृतीयांश हिस्सा भेट म्हणून दिला. त्याचबरोबर पन्ना येथील +हिऱ्याच्या खाणीही बाजीरावांना नजर केल्या. बाजीरावांबरोबरच राणोजी शिंदे, मल्हारराव +होळकर, गोविंदपंत बुंदेले इ. सरदारांचेही सन्मान झाले. नंतर नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू +झाला. नर्तकी दरबारात येऊन मुजरा करून नाचू लागल्या. त्यांच्या नाचानंतर छत्रसालांनी +आपल्या जवळच्याच सेवकाला काहीतरी सांगून पाठवून दिले. थोडा वेळ गेल��� आणि +दरबाराच्याच एका कोपऱ्यातील राण्यांच्या कक्षातून एक नर्तकी आली, तिने छत्रसाल व +पेशव्यांना आदाब अर्ज फर्मावला व नृत्याला सुरुवात केली. ती नर्तकी स्वतः उत्तम गातही +होती. तिच्या नाजूक पदन्यासाकडे पाहताना साराच दरबार हरखून गेला. बाजीरावसाहेबही +भान हरपून नृत्य पाहात होते. त्या नर्तकीच्या सुंदर चेहऱ्यावरून कोणाचीच नजर हटत +नव्हती. ती अप्रतिम लावण्यवती होती. महाराणा छत्रसालांची राजकन्या, मस्तानी! मस्तानी +उत्तम गायिका अन् नृत्यांगना तर होतीच पण ती फेकण्यात आणि तलवारबाजीतही +<<< + +कुशल होती. महाराणा छत्रसाल हे स्वामी प्राणनाथ यांच्या प्रणामी पंथाचे अनुयायी होते. +भगवान श्रीकृष्ण हे त्यांचे आराध्यदैवत होते. मस्तानीची आई ही इराणच्या मुसलमानी +वंशातली असल्यामुळे तिने आपल्या मुलीचे नाव एक सुफी पीर मस्तानबाबा यांच्या +नावावरून 'मस्तानी' असे ठेवले. मस्तानी म्हणजे सौंदर्यवान, आकर्षक, मोहून टाकणारी! +छत्रसाल महाराजांचे या आपल्या एकुलत्या एक अशा लाडक्या मुलीवर फार प्रेम होते. +छत्रसाल महाराजांनी मस्तानीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा, अशी बाजीरावांना विनंती +केली. बाजीराव त्यावेळेस काहीच बोलले नाहीत. परंतु, त्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले (खेर), +बाजीपंत रेठरेकर, रघुनाथपंत नेवाळकर आदी ब्राह्मण सरदारांच्यात कुजबूज झाली. त्यांना +पेशव्यांच्या घरचे, विशेषतः पेशव्यांच्या मातोश्रींचा स्वभाव माहीत होता. सोवळे पाळणाऱ्या +चित्पावनांच्या घरात ही मुसलमान स्त्री कशी चालेल! त्यांनी बाजीरावांना समजावून पाहिले. +खुद्द बाजीरावांनाही ते माहीत होते, पण पटत नव्हते. जर राजपूतांशी अन् +आपले रक्तसंबंध जोडले गेले तर अनेक मोठी राजकारणे सहज तडीला नेता येतील, +असा मोठा विचार बाजीराव करत होते. त्यांना खात्री होती की, आपल्या घरचे मस्तानीस +समजून घेतील, तिचा स्वीकार करतील. बाजीरावांनी आपला होकार छत्रसाल महाराजांना +कळवला. छत्रसालांना फार आनंद झाला. अखेर मोठ्या थाटामाटात छत्रसालकन्या +मस्तानीचा विवाह श्रीमंत बाजीराव पेशव्यांशी पन्न्याच्या महालात संपन्न झाला. + ज्या कामाकरता बाजीराव उत्तरेत आले होते ते काम पूर्ण झालं होतं. बंगशही दिल्लीला +पोहोचल्याच्या खबरा मिळाल्या होत्या. बाजीरावांनी दख्खनेत परत येण्याची तया���ी सुरू +केली. छत्रसालांनी दिलेल्या प्रदेशाचे दोन भाग करून सागर येथे गोविंद बल्लाळ खेर +(गोविंदपंत बुंदेले) व झांशी येथे रघुनाथ हरीपंत नेवाळकर या आपल्या विश्वासू लोकांना +सुभेदार म्हणून नेमले आणि छत्रसाल महाराजांचा व इतर राजघराण्यातील व्यक्तींचा निरोप +घेऊन, मस्तानीला सोबत घेऊन बाजीराव पेशवे पुण्याला येण्यास निघाले. बाजीरावांच्या या +साऱ्या पराक्रमाच्या बातम्या सातारा दरबारात पोहोचल्या होत्या. एका मुसलमान स्त्रीबरोबर +पेशव्यांनी विवाह केला. हिंदू धर्म बुडाला अशा पद्धतीने सातारा दरबारातील काही मंडळींनी +शाहूमहाराजांचे कान भरवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शाहूमहाराजांनी तिकडे अजिबात +लक्ष दिले नाही. थोरल्या श्री शिवछत्रपतींनी, आपल्या आजोबांनी आज जे केले असते तेच +रावबाजींनी केले याचाच शाहूमहाराजांना अत्यंत आनंद होता. उत्तरेत नुसते बुंदेलखंड अन् + नव्हे तर मोंगल दरबारातही बाजीरावांचे वजन (खरं म्हणजे भीती!) वाढले +होते कारण आता, 'रावांचा पुण्यप्रताप ऐसा जाला आहे की हस्तनापूरचे राज्य घेऊन +छत्रपतींस देतील तर आज अनुकूल आहे !! " + पेशव्यांच्या फौजा पुण्याच्या नजीक आल्या. धडफळ्यांच्या वाड्यात खबर गेली. +चिमाजीआप्पा पुण्यातच होते. त्यांनी बाजीराव येताच भांबुर्डा आणि गारपिराच्या +टेकडीवरून (सध्याचे शिवाजीनगर आणि ससून हॉस्पिटल) तोफांचे बार काढण्याची आज्ञा +दिली. पण चिमाजीआप्पांना वेगळीच चिंता सतावत होती. बाजीरावांचे दुसरे लग्न झाले ही +गोष्ट नुकतीच समजली होती, कारण तिकडच्या मोहिमा आणि धावपळीत ही गोष्ट पुण्याला +<<< + +कळवून मातोश्रींचा विचार घेणे बाजीरावांना जमले नव्हते. आता ऐनवेळेस मातोश्रींना +समजवावे तरी कसे? राऊंनी दुसरे लग्न केले ते ठीक आहे एकवेळ. पण पत्नी धर्माने +मुसलमान आहे हे कसे स्वीकारतील मातोश्री? चिमाजीआप्पांनी यावर एक तोडगा काढला. +धडफळ्यांच्या वाड्यात जागा नाही, मस्तानीबाई राजकुमारी. त्यांचा गोतावळा वाड्यात कसा +रहावयाचा, सबब त्यांची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी लावावी, अशी विनंती आप्पांनी +बाजीरावांना केली. फौजा पुण्यात आल्या. गारपिराच्या टेकडीवरून मस्तानीचा मेणा +मुक्कामाच्या ठिकाणाकडे वळला आणि बाजीरावांचा धडफळ्यांच्या वाड्याकडे ... + पुण्यात येताच थोडी विश्रांती घेऊन ब���जीराव साताऱ्याला शाहूमहाराजांची भेट घेऊन +आले. पुण्याला परत येताच बाजीरावांनी जिवाजी गणेश खासगीवाले यांना बोलावून घेतले. +इ. स. १७२६ (२ एप्रिल १७२६- पेशवे दफ्तर) मध्ये शाहूमहाराजांनी पेशव्यांना पुणेगाव +वंशपरंपरागत इनाम म्हणून दिला होता. परंतु, तरीही पेशव्यांचा स्वतःचा असा पुण्यात वाडा +नव्हता. म्हणून बाजीरावांनी खासगीवाले यांना श्रीमंत पेशवे यांच्या इभ्रतीला अन् पराक्रमाला +शोभेल असा, झोकदार आणि मजबूत वाडा उभारण्याची आज्ञा केली. दोन दिवसात +वाड्याचा नकाशा तयार झाला. पण वाडा नेमका कुठे बांधावा याबद्दल एकविचार होत +नव्हता. शेवटी लालमहालाच्या पश्चिमेस आणि मुठेच्या दक्षिण तीरावर उत्तम जागा सापडली. +बाजीरावांनी जागा पाहिली. शेजारीच श्री कसबा गणपती आणि शिवछत्रपतींचा पवित्र +लालमहाल होता. बाजीरावसाहेबांनी ताबडतोब बांधकाम सुरू करण्यास सांगितलं. दिनांक +१० जानेवारी १७३० रोजी जागेचे भूमिपूजन झाले आणि लगेचच खाशा पेशव्यांच्या +वाड्याचे बांधकाम मोठ्या जोरात सुरू झाले. + बाजीराव बुंदेलखंडात मोहिमेवर असताना इकडे राधाबाई आणि चिमाजीआप्पांनी +नानासाहेबांच्या लग्नाची बोलणी सुरू केली होती. वाईचे सावकार भिकाजी गोखले यांची +कन्या गोपिका (माहेरचे नाव?) सून म्हणून सर्वांनाच पसंत होती. खरे म्हणजे गोपिकाबाईंचे +स्थळ खुद्द सातारकर शाहूमहाराजांनीच सुचविले होते. गोखले व शाहूमहाराजांचे संबंध +घरोब्याचे होते. एक दिवस, लक्ष्मीपूजनास (दिवाळी) शाहूमहाराज गोखल्यांकडे फराळाला +आले. फराळ वाढताना महाराजांनी गोपिकेला पाहिले. मुलगी मोठी गोड होती. नेमकी याच +वेळेस शाहूमहाराजांना नानासाहेबांची आठवण झाली. फार शोभून दिसेल म्हणून +शाहूमहाराजांनी भिकाजी नाईकांना विचारले. अखंड हिंदुस्थानात आपली पराक्रमी तलवार +गाजवणाऱ्या बाजीराव पेशव्यांचा मुलगा आपल्याला जावई म्हणून लाभतो आहे, हे पाहून +भिकाजी नाईकांना आनंदच झाला. महाराजांनी ताबडतोब चिमाजी आप्पांना बोलावून घेतले. +आप्पांनाही मुलगी पसंत पडली. बाजीरावांना खलिता धाडून कळविण्यात आले. +बाजीरावांनी होकार कळवला. अखेर लग्न ठरले आणि दि. ११ जानेवारी १७३०, पुण्याच्या +वाड्याच्या भूमिपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी श्री क्षेत्र वाई येथे बाजीरावांचे चिरंजीव +नानासाहेब व भिकाजी ��ाईकांची कन्या गोपिका यांचा विवाह झाला. लग्नात अक्षता +टाकायला सातारहून खुद्द छत्रपती महाराज आले होते. शाहूमहाराजांचे म्हणणे ऐकून +गोखल्यांनी 'रास्त काम केले' म्हणून महाराजांनी त्यांना 'रास्ते' नाव दिले. +<<< + + लग्न आटोपून मंडळी नव्या नवरीसह पुण्यात आली. दरम्यानच्या काळात, कसे काय +कोण जाणे पण राधाबाईंना मस्तानीबद्दल समजले. घरात लग्नकार्य म्हणून राधाबाईंना +फारसे काही बोलता येईना. पण राधाबाईंनी नानासाहेबांच्या लग्नात मस्तानीने येऊ नये, + अशी खबरदारी घेतली. तरीही लग्न समारंभात मस्तानीचा नाच होऊन, तिला बिदागीही +मिळाली. बाजीरावांच्या सारे लक्षात आले होते. परंतु, तेही काही जास्त बोलले नाहीत. +मस्तानीचा विरस होऊ नये म्हणून बाजीरावांनी वरमाईला वधू पक्षाकडून मिळणारी वस्त्रे +आपल्या सेवकांकरवी मस्तानीकडे पोचती केली. नंतरच्या काळात बाजीराव बहुधा सातारा +दरबारातच असत आणि पुण्यात आले की, एकतर फडावर नाहीतर मस्तानीकडे! त्यामुळे +बाजीरावांशी मस्तानीविषयी प्रत्यक्ष काही बोलण्याइतका वेळ चिमाजीआप्पांना व मातोश्री +राधाबाईंना मिळतच नव्हता. अशातच बाजीरावांचे दुसरे लग्न होऊन चित्पावनाने यवन पत्नी +केली ही कुजबूज पुण्यात सुरू झाली ... + अशातच सहा-सात महिने गेले. इकडे चिमाजीआप्पांच्या पत्नी रखमाबाईंना दिवस गेले +होते आणि भाद्रपद (अधिक मास) शुद्ध द्वितीया, श्री शालिवाहन शके १६५२, साधारण नाम +संवत्सरी, सोमवारी म्हणजेच इ. दि. ४ ऑगस्ट १७३० रोजी रखमाबाईंना पुत्र झाला. +बाजीरावसाहेबांना फार आनंद झाला. वाड्यावरचा चौघड़ा वाजू लागला. चिमाजीआप्पांचे हे +पहिलेच पुत्ररत्न. पुण्यात साखऱ्या वाटण्यात आल्या. दि. १४ ऑगस्ट रोजी बाळाचा +नामकरणविधी करण्यात आला. प्रथेप्रमाणे आजीने म्हणजेच राधाबाईंनी नाव ठेवले + 'सदाशिव'. हेच ते पुढच्या काळातले प्रख्यात सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब पेशवे. +सदाशिवपंतांच्या जन्मानंतर आई रखमाबाईंची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. +वैद्यांची औषधे, मात्रा चालू होत्या. परंतु शेवटी कसलाही परिणाम न होता दि. ३१ ऑगस्ट + १७३०, सोमवारी रात्री रखमाबाई मृत्यू पावल्या. जेमतेम एक महिन्याचे असलेले +सदाशिवपंत आईला पारखे झाले. रखमाबाईंच्या मृत्यूमुळे, आनंदात असलेल्या घरावर +दुःखाची छाया पसरली. सद��शिवपंतांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून काशीबाई सर्वतोपरी +काळजी घेत. राधाबाईंनाही सदाशिवपंतांची काळजी वाटत होती. त्यांच्या संगोपनावर +राधाबाईंचीही नजर असे. + दिवसांमागून दिवस जात होते. याच सुमारास एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे +सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही राजगाद्यांमधील समेट. दिनांक १३ एप्रिल १७३१ रोजी या +दोघांच्यात झालेला तह असा- + १) इलाखा वारुण महाल तहद संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलूख दरोबस्त देखील +ठाणी व किल्ले तुम्हास दिले असेत. + २) दिली तुंगभद्रेपासून असेत. तहद रामेश्वर संस्थाने निम्मे आम्हांकडे ठेवून निम्मे तुम्हाकडे करार + + ३) किले कोपळ तुम्हाकडे दिला, त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाकडे दिला. + ४) वडगावचे ठाणे पाडून टाकावे. +<<< + + ५) तुम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. तुम्ही आम्ही एक विचारे +राज्याभिवृद्धी करावी. + ६) वारणेच्या व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहद निवृत्तीसंगम तुंगभद्रेपावेतो +दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हाकडे दिली असेत. + ७) कोकण प्रांत साळशी पलिकडे तहद पंचमहाल अंकोले पावेतो दरोबस्त तुम्हाकडे +दिले असेत. + ८) इकडील चाकर तुम्ही ठेवू नये, तुम्हाकडील चाकर आम्ही ठेवू नये. + ९) मिरज प्रांत विजापूर प्रांतीची ठाणी देखील अथणी, तासगाव वगैरे तुम्ही आमचे +स्वाधीन करावी. + एकूण ९ करार करुन तहनामा दिल्हा असेत. सदरहू प्रमाणे. आम्ही चालू, यास +अंतराय होणार नाही. + अशाप्रकारे वारणेचा तह पार पडला. दोन्ही मराठी राज्यांत वारणेचा तह झाल्यामुळे +दोन्ही राज्यांच्या आघाड्यांवर शांतता प्रस्थापित झाली होती. + या दरम्यान १७३१ सालच्या सुरुवातीलाच नवीन कटकट उद्भवणार अशी चिन्हे दिसत +होती. नवीनच उद्भवलेले प्रकरण होते दाभाड्यांचे. वास्तविक खंडेराव दाभाडे व बाळाजी +विश्वनाथ हे एकमेकांना दूधभाऊ मानत असत. खंडेराव दाभाड्यांच्या मृत्यूनंतर +शाहूमहाराजांनी गुजरातची सुभेदारी त्यांचे पुत्र त्र्यंबकराव दाभाडे यांना दिली. त्र्यंबकराव +गुजरातेत व्यवस्था पाहात असतानाच इकडे पेशवे आणि निजाम यांच्यात पालखेडची लढाई +झाली आणि लगेचच निजामापासून दिल्ली दरबाराचे रक्षण करण्याच्या बदल्यात बादशहाने +तमाम गुजरात प्रांताच्या चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा पेशव्यांना बहाल केल्या. +बाजीरावांनी माळवा जिंकल्यामुळे तोही प्रांत पेशव्यांकडेच राहणार होता. वस्तुतः माळवा व +गुजरातच्या सनदा, दोन्हीही बाजीरावांनी शाहूमहाराजांकडेच सुपूर्द केल्या होत्या. +महाराजांनी पूर्वीप्रमाणेच गुजरात दाभाड्यांना व माळवा पेशव्यांना देऊ केला. गुजरातला +लागून असलेला माळवा प्रांत अत्यंत सुसंपन्न आणि मोक्याचा होता. दाभाड्यांना माळवा +हवा होता. परंतु, शाहूमहाराजांनी माळवा पेशव्यांना दिल्यामुळे दाभाड्यांच्या मनात +पेशव्यांविषयी निर्माण झाली होती. पेशव्यांनी दाभाड्यांची नाराजी जाणून गुजरात व +माळव्याची पेशवे आणि दाभाड्यांमध्ये समविभागणी करण्याची विनंती शाहूमहाराजांना +केली. परंतु, त्र्यंबकराव अजून नवखे होते आणि माळव्यासारख्या मोक्याच्या ठिकाणी +पेशव्यांसारखा शूर आणि बलाढ्य माणूसच योग्य असल्याने बाजीरावांचीच नियुक्ती कायम +करण्यात आली. त्र्यंबकरावांना राजकारणाचा हवा तसा अनुभव नव्हता. त्यामुळे ते सारा +कारभार आपली आई उमाबाईंच्याच सल्ल्याने करत होते. उमाबाई या स्वतः लढवय्या होत्या. +पेशव्यांच्या सततच्या विजयांमुळे शाहूमहाराजांचे मन पेशव्यांकडेच कलले आहे. सातारा +दरबारात आता सेनापती दाभाड्यांना काडीमात्रही किंमत नाही असे उमाबाईंना सतत वाटू +लागले होते. पण आता करावे काय, कारण आपण जर गप्प बसलो तर पेशवे गुजरातेतूनही +<<< + +दाभाड्यांना हद्दपार करतील. म्हणूनच पेशव्यांना मात देऊ शकणारा त्यांचा कोणी हितशत्रू +आहे का, हे उमाबाई शोधू लागल्या. आणि लागला एक हिरा उमाबाईंना गवसला +कोण? निजाम-उल-मुल्क. मोंगल सत्तेपासून फारकत घेऊन स्वतः दख्खनचा सत्ताधीश बनू +पाहणारा निजाम! बाजीरावाने निजामाला पालखेडच्या रणात चांगलीच धूळ चारली होती. +त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी निजाम आपल्याला नक्कीच मदत करेल असे उमाबाईंना +वाटले. त्यांनी निजामाला गुप्त खलिता धाडला. आपण काहीच न करता मराठ्यांच्या +दरबारात घुसखोरी करण्याची आलेली संधी निजामासारखा कसा सोडेल. यात +निजामाचाही फार मोठा स्वार्थ होता. पेशवे आणि दाभाडे या बड्या मराठा सरदारांच्यात +दुफळी माजवून माळवा पुन्हा आपल्याकडे घेणे हा निजामाचा मुख्य उद्देश होता. निजाम +फार धूर्त होता. दाभाड्यांच्या मदतीने पेशव्यानां दूर करु या भ्रमात होता. त्या��ुळे +पेशव्यांसारख्या धोकादायक, पराक्रमी सरदाराला दाभाड्यांच्या मदतीने बाजूला करून दिले +की, मग दाभाड्यांना सहज मारता येईल, असा डाव निजामाने आखला होता. दाभाड्यांना +मात्र निजामाची कूटनीती ओळखता आली नव्हती. दाभाड्यांच्या मनात फक्त एकच होते. +पेशव्यांना दूर करून शाहूमहाराजांना सिंहासनावरून पदच्युत करून सातारा आणि +कोल्हापूर गादी एकत्र करावी. छत्रपतीपद संभाजीराजांना (कोल्हापूरकर) द्यावे आणि +आपणच सेनापतीपदी राहावे परंतु, सैन्यातल्या कोणीही दाभाड्यांच्या या युक्तीला संमती +दर्शविली नाही. बाजीराव पेशव्यांच्या कानी दाभाड्यांचा पुंडावा गेला होता. परंतु जेव्हा +बाजीरावांच्या हेरांनी निजामाकडे जाणारी दाभाड्यांची फितुरीची पत्रे तेव्हा मात्र +बाजीरावांनी या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष घातले. बाजीरावांनी साताऱ्यात छत्रपती +शाहूमहाराजांना दाभाड्यांची पकडलेली सारी पत्रे पेश केली. शाहूमहाराजांना धक्काच +बसला. त्यांनी प्रथम तळेगावाकडे आपला जासूद पाठवून त्र्यंबकराव दाभाड्यांना सातारा +दरबारात येण्याचे आमंत्रण दिले. दाभाडे तर आले नाहीच, परंतु जासूदाने आणलेली बातमी +अधिक धक्कादायक होती. दाभाड्यांनी जेजुरी गडावर जाऊन, मार्तंड भैरव खंडोबाचा +भंडारा मळवटी लावून पेशव्यांचा सर्वनाश करण्याची शपथ घेतली होती. आता मात्र +गोडीगुलाबाने दाभाडे वठणीवर येणार नव्हते. शाहूमहाराजांनी बाजीरावांना गुजराथेत +उतरण्याची परवानगी दिली. (१७३१) पेशवे गुजराथेत जात आहेत ही बातमी कळल्यावर + आपली फौज घेऊन बाजीरावांच्या पाठलागावर गेले. पण शेवटी व्हायचे तेच +झाले. त्र्यंबकराव दाभाडे आपल्या पिलाजी गायकवाड या सरदारानिशी बाजीरावांवर चालून +आले. बाजीरावही हुशार होतेच. दि. १ एप्रिल १७३१ रोजी गुजराथेतील डभईनजीक +भिलापूरच्या मैदानात सेनापती दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांच्यात लढाई जुंपली. पेशवे +स्वतः घोड्यावर बसून होते. त्र्यंबकराव मात्र हत्तीवर अंबारीत बसून सैन्याला सूचना +देत होते. एकाएकी कसे झाले, कोणाच्या हातून झाले ते माहीत नाही. परंतु, त्र्यंबकरावांना +बंदुकीच्या गोळीचा (जंबुरियाचा) जबरदस्त फटका बसला आणि गोळी वर्मी लागून +त्र्यंबकराव दाभाडे पडले. त्र्यंबकराव पडले ही बातमी ऐकताच दाभाड्यांचे सैन्य +चोहोदिशांना पळत ��ुटले. पिलाजी गायकवाडही पसार झाले. ते थेट तळेगावच्या दिशेने. +<<< + +कितीही झाले तरी त्र्यंबकराव हे स्वराज्याचे सेनापती होते. त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी +छत्रपतींकरिता स्वतःचे रक्त सांडले होते. युद्ध संपले, वैर सरले. बाजीरावाने मोठ्या मनाने +त्र्यंबकरावांचे अंत्यसंस्कार केले. इकडे पिलाजी गायकवाड तळेगावात येऊन पोहोचले. +आपल्या पुत्राचा रणांगणात मृत्यू झाला ही बातमी ऐकताच उमाबाई चवताळल्या. +बाजीरावांच्या रक्तानेच त्र्यंबकरावांना तिलांजली देईन, अशा निश्चयानेच त्या बाजीरावांवर +चालून निघाल्या. इकडे जेव्हा त्र्यंबकराव बाजीरावांवर चाल करून गेले होते तेव्हा +निजामानेही आपले सैन्य दमणच्या आसपास पेरून ठेवले होते. अर्थात बाजीरावांना +याची कल्पना होतीच. त्र्यंबकरावांच्या मृत्यूनंतर बाजीराव डभईवरून थेट वेगाने दमणलाच +पोहोचले. त्र्यंबकरावांचे काय झाले, ही बातमी कळायच्या आतच निजामाच्या फौजेवर हल्ला +आला. आपल्या सेनापतींना फितवणारा हाच तो हरामखोर असे म्हणून मराठ्यांनी +निजामाच्या फौजेचा पार धुव्वा उडवला. दमणहून बाजीराव थेट पुण्याला आले. सेनापती +त्र्यंबकराव पडल्याची आणि उमाबाई पुन्हा बाजीरावांवर चालून निघाल्याची बातमी +शाहूमहाराजांना समजली. शाहूंनी पुन्हा एकदा उमाबाईंना समजावण्याचा प्रयत्न करून +पाहिला आणि अखेर यावेळेस उमाबाई समझोता करण्यास तयार झाल्या. त्र्यंबकरावांचा पुत्र +खंडेराव हा यावेळेस जेमतेम चार वर्षांचा असावा. महाराजांनी उमाबाईंना सातारा दरबारात +बोलावून त्यांचे केले व गुजरात पुन्हा तसेच दाभाड्यांकडेच राहील याची हमी दिली. +दि. ४ नोव्हेंबर १७३१ रोजी शाहूमहाराजांनी पेशवे बाजीराव आणि उमाबाई यांची प्रत्यक्ष +भेट घडवून आणली. 'श्रीमंतांचे बोलणे बहुत मिठास. हरप्रकारे करून उमासाहेबांची मर्जी +राखली. वर कटकट न जाहली.' उमाबाईंनीही मोठ्या मनाने बाजीरावांना माफ केले. +बाजीरावांनी निजामाची सारी उमाबाईंना समजावून सांगितली. उमाबाईंनाही ते +पटले. अन् सलूख होऊन उमाबाईंनी शाहूमहाराजांना आणि बाजीरावांना भोजनासाठी +तळेगावात येण्याचे आमंत्रण दिले. उभयतांनी हे आमंत्रण आनंदाने कबूल केले. या काळात +एक गोष्ट फार चांगली झाली. दाभाड्यांकडचे पिलाजी गायकवाड हे अत्यंत शूर सरदार +बाजीरावांनी आपल्या बोलण्यानेच जिंकून घेतले. शाहूमहाराजांनी उमाबाईंच्या वतीने +पिलाजी गुजराथच्या सुभ्यावर नेमले. पुढे गायकवाडच गुजराथचे +सत्ताधीश बनले व स्वराज्याशी निष्ठेने राहू लागले. दाभाड्यांचा प्रश्न मार्गी लागला. +बाजीरावसाहेब पुन्हा पुण्यात आले. चिमाजीआप्पांच्या पत्नी रखमाबाई निवर्तल्याला वर्ष +होऊन गेलं होतं. आप्पांचं मनही तेव्हापासून उदासच होतं. पण वरकरणी तसं अजिबात +जाणवू न देता आप्पा साताऱ्यात राहून पेशव्यांची मुतालकी पाहात होते. नानासाहेबांनाही +हळूहळू शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. तेही आप्पांच्या बरोबर साताऱ्यात राहून रोज +फडावरची कामं पाहात होते. आप्पांचे चिरंजीव सदाशिवरावही आता सव्वा वर्षांचे झाले +होते. राधाबाईंच्या मनात होते की, आप्पांचे दुसरे लग्न करवे. पण आप्पा कोणाचेच +नव्हते. शेवटी बाजीरावांनी आप्पांना तेवढ्याकरता खास सातारहून बोलावले व त्यांची +समजूत काढली आणि शेवटी कोणाचंही नाही, पण आपल्या थोरल्या बंधूंचं ऐकलं. +राधाबाईंना अलिबागच्या (कुलाबा) थत्ते सावकारांची कन्या सून म्हणून पसंत होती. +<<< + +चिमाजीआप्पाही लग्नाला तयार झाले होते. दि. ९ डिसेंबर १७३१ रोजी कन्या +अन्नपूर्णा व चिमाजीआप्पांचा विवाह झाला. सदाशिवपंत केवळ सव्वा वर्षाचे होते. त्यांच्या +आयुष्यात त्यांना सावत्र वागणूक मिळू नये, म्हणून आप्पा विवाह करण्यास नकार देत होते. +परंतु, अन्नपूर्णाबाईंनीदेखील शेवटपर्यंत भाऊंचा अतिशय मायेने प्रतिपाळ केला. त्यांना +सावत्रपणाची अजिबात जाणीव होऊ दिली नाही. + चिमाजीआप्पांच्या लग्नानंतर बाजीरावाने नव्याने तयार होणाऱ्या पेशव्यांच्या हवेलीकडे +लक्ष वळविले. हवेलीचे बांधकाम पूर्ण झालं होतं. कितीही ऐसपैस म्हटलं तरीही दोनशे +माणसे सहज राहू शकतील अशी प्रशस्त हवेली उभारण्यात आली होती. खासगीवाले यांनी +प्रत्यक्ष जीव ओतून हा वाडा घडवला होता. वाडा एका प्रचंड जोत्यावर उभारण्यात आला +असून तो दुमजली होता. वाड्याला तीन चौक होते. भट घराणे हे देव भक्त असल्यामुळे +वाड्यातले देवघरही प्रशस्त असणे साहजिकच होते. परंतु, त्याशिवाय अनेक असे +मराठी, हिंदी, संस्कृत ग्रंथ, पोथ्या व इतर हस्तलिखितांसाठी एक विशेष महाल होता. याला +म्हणत 'ग्रंथशाळा'. वाड्याच्या पश्चिम भागास 'अश्वशाळा' व 'ग��शाळा' होती. धान्याचे +जिन्नस साठवून ठेवण्याकरता स्वतंत्र 'अंबारकोठ्या' म्हणजेच धान्यकोठी शाळा होती. खासे +बाजीराव व चिमाजीआप्पा तालमीतल्या कुस्तीगीरांसारखे व्यायाम करीत असल्याने व +शस्त्रास्त्रांचा सराव करीत असल्याने 'व्यायामशाळा' व शस्त्रागारही बांधण्यात आले होते. +सरदार, मुत्सद्दी व पेशव्यांच्या नित्याच्या व्यवहारासाठी इमारत होती. यातच +परराष्ट्रीय वकिलांच्या राहण्याचीही सोय करण्यात आली होती. खुद्द बाजीरावसाहेबांचा +आणि काशिबाईंचा महाल, आप्पा आणि अन्नपूर्णाबाईंचा महाल, राधाबाईंचा महाल असे +खासे महाल तर फारच झोकदार होते. बाजीरावांच्या दिवाणखान्या शेजारीच मोकळ्या जागी +एक कारंजे उभारण्यात आले होते. याला म्हणत 'चिमणबाग'. चिमाजीआप्पांचे मूळचे नाव +अंताजी. पण ते लहान म्हणून लहानपणापासून सारेजण त्यांना चिमणाजी म्हणायचे. +(चिमणाजींचेच पुढे चिमाजी झाले) बहुदा म्हणूनच बाजीरावांनी आपल्या लाडक्या बंधूंच्या +नावे ही बाग वसविली असावी. वाड्याभोवताली आराखड्यात ठरल्याप्रमाणे भक्कम तटबंदी +उभारण्याचे काम सुरू होते. परंतु, शाहूमहाराजांनी आदेश केल्यामुळे तटबंदीचे काम +रोखण्यात आले. त्यामुळे वाड्याभोवती नेहमीप्रमाणेच दहा हात उंच असे कुंपण व दिंडी +दरवाजा ठेवण्यात आला. या दिंडी दरवाज्याचे नाव होते 'दिल्ली दरवाजा'. याखेरीज + दरवाजा या नावाचा आणखी एक दरवाजा बांधण्यात आला होता. असा हा संपूर्ण +वाडा बांधण्याकरता एकंदर सोळा हजार एकशेवीस रुपये खर्च झाले होते. + अखेर वाड्यात राहायला जाण्याचा मुहूर्त ठरला. दि. २२ जानेवारी १७३२, +रथसप्तमीच्या मुहूर्तावर वाड्याची वास्तुशांत थाटात करण्यात आली. वास्तुशांतीकरता खुद्द +बाजीराव पेशवे साताऱ्यास महाराजांना आमंत्रण द्यायला गेले होते. पण काही कामानिमित्त +महाराज येऊ शकले नाहीत. साताऱ्याहून अष्टप्रधानांपैकी काहीजण आले होते. नव्या +हवेलीचे नाव काय असावे, याबाबत काही निर्णय होत नव्हता. शेवटी बाजीरावसाहेबांनीच +नाव सुचवले. वाड्याची पाहणी करण्यात आली. तो शनिवार होता. वाड्याची पायाभरणी +<<< + + झाली, तोही शनिवार होता. आज (२२ जानेवारी १७३२) वाड्याची वास्तुशांत व गृहप्रवेश + होतोय, तोही शनिवारच. म्हणून वाड्याचे नाव ठेवले 'शनिवारवाडा'. वाडा बांधताना ज्या + लोकांच्या जमिनी व��कत घेतल्या होत्या, त्यांना व इतरांनाही बाजीरावांनी वाड्याच्या + आसपास जागा दिल्या व वस्ती करण्यास परवानगी दिली. ही वस्ती म्हणजेच पुणे कसबाच्या + शेजारची 'शनिवार पेठ'. वास्तुशांतीनिमित्ते मोठ्याप्रमाणावर अन्नदान करण्यात आले. + पेशव्यांनी सोहळा मोठा थाटाचा केला. + शनिवारवाड्यात गृहप्रवेश झाल्यानंतर काही दिवसातच बाजीराव आणि काशिबाईंना + मुलगा झाला. मुलाचे नाव मोठ्या कौतुकाने रामचंद्र ठेवण्यात आले. परंतु काही महिन्यांच्या + आतच 'रामचंद्राचा' मृत्यू झाला. हा मृत्यू बहुदा 'देवी' मुळे झाला असण्याची शक्यता आहे. + या दुःखातून शनिवारवाडा बाहेर येत असतानाच काशिबाईंना पुन्हा दिवस गेले. दि. ३ मार्च + १७३३ रोजी काशिबाई बाळंत झाल्या. पण पेशव्यांचे दुर्दैव असे की, जन्मल्यानंतर काही + वेळातच त्याचा मृत्यू झाला. शनिवारवाड्यावर परत दुःखाचा डोंगर कोसळला. मधल्या + संपूर्ण काळात मस्तानीचा मुक्काम अजूनही शनिवारवाड्याबाहेरच होता. पेशव्यांच्या या + दोन्ही पुत्रांच्या अकाली निधनामुळे काही कर्मठ पुणेकरांनी या साऱ्या गोष्टींचा संबंध + मस्तानीशीच जोडला. 'ती यवनी येथे आली, अन् वाताहात सुरू झाली'. या साऱ्या प्रकाराने + राधाबाईंच्या मनातली मस्तानीविषयीची चीड अजून वाढली. काशिबाईंना तर आपल्या दोन्ही + लहानग्या बाळांचा लागोपाठ मृत्यू झाल्याने तर प्रचंड मानसिक धक्का बसला होता. + बाजीरावसाहेब इकडे काशिबाईंनाही सांभाळत होते व दुसरीकडे मस्तानीचीही योग्य + काळजी घेत होते. दिवस भराभर सरकत होते. साधारणतः दीड वर्ष गेले अन् + शनिवारवाड्यावर पुन्हा एकदा बाळाच्या येण्याच्या चाहुलीने आनंदाचे उधाण आले. यावेळेस + काही अनुचित व अभद्र घडू नये म्हणून राधाबाईंनी सप्ताहास आणि अनुष्ठानास ब्राह्मण + बसविले. पवित्रस्थानी अपत्य जन्मास यावे म्हणून काशिबाई साताऱ्यास माहुलीक्षेत्री +राहायला आले. माहुलीला पेशव्यांचा एक लहानसा होता. आणि दि. १ ऑगस्ट १७३४, + श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवारी + माहुलीच्या वाड्यात पुत्र जन्माला आला. बाळाचे बारसेही माहुलीलाच झाले. पेशव्यांच्या या + नव्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले 'रघुनाथ'. (हेच पुढे रघुनाथराव उर्फ राघोबादादा म्हणून + प्रसिद्ध) साधारणतः त्याच सुमारास मस्तानीबाईंनाही पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचे नाव + मस्तानीने 'कृष्णसिंह' ठेवले. रघुनाथपंतांच्या जन्मानंतर पुण्यात साखरा वाटण्याचा आणि + चौघड़ा वाजविण्यासाठी चिमाजीआप्पांनी हुकूम सोडले. इकडे कृष्णसिंहाचा जन्म + झाल्यानंतर त्या आनंदाप्रीत्यर्थ मस्तानीने खैरात वाटली. या दोन्ही पुत्रांच्या जन्माच्या वेळेस + बाजीराव कुठे होते? बाजीराव होते कोकणात! शिवाजी महाराजांच्या काळापासून + कोकणात पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी या परकीय सत्ता जम बसवत होत्या. महाराजांनी इंग्रज व + पोर्तुगीजांना धाकात ठेवले होते. परंतु, सिद्दी मात्र उपद्रव देतच होता. प्रत्यक्ष शिवाजी + महाराज आणि संभाजी महाराज यांनी सिद्दीचा जंजिरा घेण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु + शेवटपर्यंत जंजिरा हाती आला नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहूमहाराजांच्या +<<< + +आगमनापर्यंत सारा काळ धामधुमीचा होता. राजाराममहाराज व राणी ताराबाई यांना +सिद्दीकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. नेमका याचाच फायदा घेऊन सिद्दीने कोकणात हैदोस +घालायला सुरुवात केली. संपूर्ण कुलाबा जिल्हा आणि खुद्द शिवछत्रपतींच्या तख्ताचा +रायगड सिद्दयांच्या ताब्यात गेला होता. शिवाय तळे-घोसाळे, नागोठणे, बिरवाडी, पनवेली +(पनवेल), पेण अशी महत्त्वाची ठाणी सिद्दीकडेच होती. म्हणूनच फार माजलेल्या या सिद्दीचा +माज उतरविण्यासाठी दिल्ली आणि निजामाच्या आघाडीवर काही काळ स्वस्थता लाभल्याने +बाजीरावसाहेब कोकणात उतरले. पूर्वी बाजीराव मराठवाड्यात निजामाशी होते. +(पालखेड-१७२९) त्याच सुमारास इकडे कुलाब्यात सरखेल कान्होजी मृत्यू झाला +होता. कान्होजींच्या पुत्रामध्ये आता भाऊबंदकी सुरू झाली होती. सध्या 'अधिकृत' सरखेल +होते 'सेखोजी आंग्रे'. बाजीराव कोकणात उतरले, हे पाहून सेखोजींनी आपली पूर्ण आरमारी +मदत त्यांना देऊ केली. बाजीराव आणि सेखोजींची कुलाब्याच्या किल्ल्यात भेट झाली. +पेशव्यांनी आपल्या मोहिमेचा सारा आराखडा सेखोजींना समजावून सांगितला. सर्वप्रथम +बाजीरावांच्या झंझावाती फौजा सिद्दीचे जमिनीवरील किल्ले आणि ठाणी घेतील. +त्यापाठोपाठ लगेच रायगड काबीज करून जंजिऱ्यालाही मोर्चे लागतील आणि जंजिरा +घेऊनच मोहीम पूर्ण होईल, असे ठरले. शाहूमहाराजांनी श्रीपतराव प्रतिनिधी व पोतनीस +वकिलांना स���ताऱ्याहून बाजीरावांच्या मदतीकरिता जाण्यास सांगितले. पोतनीस कोकणात +गेले, पण बाजीराव पेशव्यांना 'मदत' करायची हे कमीपणाचे वाटल्यामुळे प्रतिनिधी +आजाराचे निमित्त काढून साताऱ्यातच थांबले. एप्रिल १७३३ मध्ये बाजीरावांनी मोहिमेला +प्रारंभ केला. फौजा दौडत सुटल्या. बाजीराव पेशव्यांनी जंजिऱ्यातील काही 'हिंदूंना' +फितवले होते. पण ते सारे इशाऱ्याची वाट पाहात थांबणार होते. इकडे बाजीरावांनी तख्ताची +जागा असलेल्या भेद केला होता. खुद्द किल्लेदारालाच फितवला होता. +बाजीराव सैन्यासह निघाले. प्रथम त्यांनी नागोठणे, पनवेल, पेण इ. उत्तरेतली ठाणी कब्जा +केली. त्यानंतर हळूहळू दक्षिणेकडे येत चौल, रेवदंडा, करत स्वतः बाजीरावांनी दंडा- +राजपुरी जिंकून तेथेच तळ ठोकला. इतर फौजा पाचाड़, बिरवाडी, वेळास, श्रीवर्धन, +आगरकोट, दाभोळ, गुहागर इ. ठाणी जिंकून घेत होत्या. जंजिऱ्याबरोबर कांसा उर्फ पद्मदुर्ग +आणि उंदेरीलाही मोर्चे लागले होते. इकडे दक्षिणेकडे सिद्दीचा अंजनवेलीचा किल्ला अजूनही +दाद देत नव्हता. बाजीरावांनी आणि सेखोजींनी जंजिऱ्याचा वेढा पक्का आवळला होता. +जंजिऱ्याच्या भोवताली गलबते फेर धरून होती. यावेळेस जंजिऱ्याचा +'याकूतखान' म्हणजे मुख्य 'सिद्दीसात' होता. पेशवा आपल्यावर चालून येतोय आणि +आंग्रेही याला सामील झालाय, हे पाहून सिद्दीसातने प्रथम इंग्रजांकडे आरमारी मदत +मागितली. इंग्रजही ती लगेच द्यायला तयार झाले, कारण इंग्रजांना कोकणपट्टी घशात +घालायची होती. पण काटा अडकत होता. या ना त्या कारणाने आंग्रे बुडत +असतील, तर आपलाच फायदा आहे म्हणून इंग्रजांनी सिद्दीसातला मदत द्यायचे ताबडतोब +कबूल केले. सिद्दीसातने हैद्राबादच्या निजामाकडे मदत मागितली. निजाम तर बाजीरावांच्या +विरोधात म्हणून एका पायावर तयार झाला. वास्तविक सिद्दी इंग्रजांना गळ घालणार म्हणून +<<< + +बाजीरावांनी उदाजी पवार व पिलाजी इंग्रजांना समज द्यायला सांगितले होते. +पण प्रत्यक्ष काय झाले माहीत नाही, आणि इंग्रजांचा कॅप्टन इंचबर्ड हा आपली गलबते घेऊन +जंजिऱ्यावर येऊन दाखल झाला. निजामाचीही येण्याची तयारी सुरू होती. पण बाजीरावही +मागे हटणारे नव्हते. जंजिऱ्याचा वेढा पक्का आवळला गेला. इंग्रजांची गलबतं बाहेर आली +की, मराठ्यांच्या तोफा त्यांच्यावर प्रचंड आ��� ओकू लागत. त्यामुळे इंग्रजही धास्तावले होते. +सुरतेत बसून नावाने बोटे मोडणे आणि प्रत्यक्षात दर्यात उतरून लढणे यातला +फरक इंचबर्डला चांगलाच समजला होता. एकदा तर सिद्दीसातने रात्री अचानकपणे +बाजीरावांच्या छावणीवर छापा घालायचे ठरवले. लहान लहान होडक्यांतून सिद्दीसात +आपल्या हबशी सैनिकांनिशी राजपुरीच्या किनाऱ्यावर उतरला. बाजीराव सावध होतेच. +थोडीशी हातघाई झाली आणि सिद्दी परत जंजिऱ्यात पळाला. इकडे प्रतिनिधींनी वेगळेच +राजकारण आरंभले. पेशव्यांनी रायगड किल्ल्याचा किल्लेदार फितवला होता, हे प्रतिनिधींना +समजले. त्यांनी बाजीरावांना न कळवताच यल्गार करून रायगड घेतला. +बाजीरावांना तोंडघशी पाडण्याचा हा प्रतिनिधींचा प्रयत्न चालला होता. उत्तरेतही नव्या +हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर सिद्दीसात वाकला. इंचबर्डच्या मदतीने काहीच फायदा +न झाल्याने आणि निजामाच्या फौजेची आता आशाच नसल्याने सिद्दीसात पेशव्यांशी तह +करायला तयार झाला. बाजीरावांनाही शक्य लवकर मोहीम संपवायची होतीच. +चिपळूणच्या परशुराम मंदिराला सिद्दीसातचा फार उपद्रव होत असे. पेशव्यांचे आध्यात्मिक +गुरू ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांचे हे परमप्रिय स्थान. बाजीरावांनी सिद्दीला कडक शब्दात +ताकीद दिली, अन् नुसते चिपळूणचे मंदिरच नाही, तर कोकणातल्या कोणत्याही मंदिराकडे +वा मराठ्याच्या बाईकडे वाकड्या नजरेने नुसते बघितले तरी पेशव्यांच्या फौजा पुन्हा +कोकणात उतरतील अशी सख्त ताकीद दिली. पेशव्यांनी सिद्दीसातकडे खुद जंजिऱ्याचीच +मागणी केली. सिद्दीने ही मागणी मात्र नाकारली. शेवटी या एकाच अटीसाठी वाकलेल्या +सिद्दीला धुडकावणे आणि पुन्हा कोकणात वेळ काढणे हे बाजीरावांना तापदायक होते. +शिवाय प्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणाने अजूनच घोळ वाढण्याची शक्यता होती. म्हणून +शेवटी अंजनवेल, कांसा (पद्मदुर्ग) आणि जंजिरा या तीन किल्ल्यांच्या व्यतिरिक्त सारा मुलुख +पुन्हा मराठी राज्यात आला. अखेर डिसेंबर मध्ये कोकण मोहीम संपवून बाजीराव +घाटमाथ्यावर परत आले. वर येताच बाजीराव प्रथम साताऱ्यास गेले. शाहूमहाराजांना फार +आनंद झाला. मुख्य म्हणजे शाहूमहाराजांच्या बालपणीच्या सहा-सात वर्षांचा काळ ज्या +गडावर गेला, त्या गडावर साडेतीनशे वर्षांनंतर हिंदूंच्या पहिल्या राजाचा राज्याभिषेक झाला +तो रायगड पुन्हा स्वराज्यात आला होता. शाहूमहाराजांनी बाजीरावांचा मोठा सन्मान केला. + रघुनाथपंतांच्या जन्मानंतर काही काळातच बाजीराव पुण्यात परतले. एखादा महिना +गेला असेल-नसेल तोच इकडे मस्तानीला पुत्र झाला. मस्तानीने त्याचे नाव कृष्णसिंह ठेवले +होते, परंतु बाजीरावसाहेबांनी आपल्या या पुत्राचे नाव ठेवले 'समशेरबहाद्दर'. समशेरबहाद्दर +दिसायला अतिशय गोड व देखणे होते. मस्तानीही बुंदेलखंडातील असल्याने तिचे राजपुती +तेज व गोरेपणा तसेच बाजीरावसाहेबांचा अस्सल चित्पावनी थाट, घारेपणा +<<< + + लहानपणीच पुरेपूर दिसत होता. समशेरच्या जन्मानंतर बाजीरावांना +मस्तानीची अधिकच काळजी वाटू लागली होती. मस्तानीला महाराष्ट्रात येऊन आता तीन वर्षे +होऊन गेली होती. परंतु तिचा मुक्काम शनिवारवाड्याच्या बाहेरच होता. पुणे हे नुकतंच +उमलत्या झेंडूसारखं बहरू लागलं होतं. परंतु, पुण्याच्या बाहेरच्या परिसरात गर्दी किर्र रान +होतं. अशा ठिकाणी मस्तानी आपल्या चार-पाच दास्या आणि नोकरांसह लहानग्या +समशेरला घेऊन राहात असल्याने बाजीरावांना तिची काळजी वाटत होती. इकडे +शनिवारवाड्याच्या हवेलीत काशिबाई आपल्या पुत्रासह सुखरूप होत्या. म्हणून बाजीराव +पेशवे बहुतेकवेळा मस्तानीकडेच मुक्कामाला असत. मध्यंतरी मस्तानीला पुण्यात (किंवा +शनिवारवाड्यात) आणण्याबद्दल त्यांनी मातोश्री राधाबाई व चिमाजीआप्पांबरोबर बोलता +बोलता विषय काढला होता. पण मातोश्रींचा विचार स्पष्ट नकारात्मक असल्याचे +बाजीरावांच्या निदर्शनास आले. चिमाजीआप्पांचेही म्हणणे जवळपास 'नको' असेच होते. +म्हणून मग नाईलाजाने बाजीरावांनाच जास्त काळ शनिवारवाड्याबाहेर राहावे लागत होते. +याचा उलटा परिणाम शनिवारवाड्यात पडू लागला होता. काशिबाई या स्वभावाने शांत +असल्याने त्या फारसे काही बोलत नसत. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसे. +आपल्या सावित्रीसारख्या गुणी सूनबाईंच्या चेहऱ्यावर दुःख पाहून राधाबाई अजून त्रागा +करत. याचसुमारास राधाबाईंनी काशीयात्रा करायचे ठरवले. बहुदा अंदाज असा आहे, +मस्तानीवरूनच काही वाद निर्माण होऊन मातोश्री काशीयात्रेला जायला निघाल्या +असाव्यात. घरातल्या साऱ्यांनीच समजावून पाहिले. काशीयात्रा करू नका म्हणून नव्हे, तर +उत्तरेकडे परिस्थिती भयानक होती. बाजीरावांनी डिवचल्याने मोंगल होते. पठाण +सादतखान, कमरुद्दीन खान वगैरे तर साप चावल्यासारखे भयंकर थयथयाट करत होते. +अशातच पेशव्यांच्या मातोश्री काशीस निघाल्याचे समजताच ते गप्प बरे बसतील! पण +मातोश्री ऐकेनातच, तेव्हा बाजीराव पेशव्यांनी उदयपूर, जयपूरच्या महाराण्यांना, बुंदेलखंडात +छत्रसाल पुत्रांना तसेच इतर राजपूत व मोंगल सरदारांना जरबदाखल सूचनापत्रे रवाना केली. +राधाबाईंसोबत शे-दीडशे फौज त्यांचे जावई आबाजी नाईक बारामतीकर (भिऊबाईंचे पती) +आणि अतिशय घरोब्यातले आणि मुलासारखेच असणारे महादजीपंत पुरंदरे एवढीच माणसे +जाणार होती. त्यामुळेच इतरांना फार काळजी वाटू लागली होती. दि. १४ फेब्रुवारी १७३५ +रोजी राधाबाईंनी पुण्यातून प्रस्थान ठेवले. + पुण्यातून निघाल्यानंतर नगर- औरंगाबाद- बुऱ्हाणपूर- दि. ६ रोजी +उदयपूरला येऊन पोहोचल्या. उदयपूरच्या राण्याला, जगतसिंह यांना राधाबाईंच्या +आगमनाची आगाऊ वार्ता मिळाल्याने त्याने उत्तम बडदास्त ठेवली होती. उदयपूरच्या +राण्याने राधाबाईंना प्रेमाने आग्रह करून आठवडाभर थांबवून घेतले. निघताना त्याने एक +मोत्याची माळ, एक पदक, एक हत्ती आणि सोन्याचे त्याचबरोबर खर्चासाठी सहा हजार +रुपये देऊन मातोश्रींचा सत्कार केला. नंतर उदयपूरहून निघून राधाबाई २१ जून रोजी +जयपूरात येऊन पोहोचल्या. जयपूराचा महाराणा सवाई जयसिंह तर बाजीरावांचा पक्षपाती +होता. त्याने सुमारे दोन महिने राधाबाईंचा उत्तम पाहुणचार केला. दि. १५ सप्टेंबरला +<<< + +राधाबाई जयपूरहून निघाल्या व मथुरा, कुरुक्षेत्र करत प्रयागला येऊन पोहोचल्या. +प्रयागपासून दिल्ली अगदी जवळ होती. परंतु, 'आजपर्यंत आपण बाजीरावांचा पराक्रम +नुसताच पाहात होतो. आता तर त्याची आई आपल्या मुलुखातून जात आहे. तिच्या केसाला +जरी धक्का लागला तर आपली काही धडगत नाही.' या नुसत्या विचारानेच बादशहा +हादरला. बादशहाने आपल्या साऱ्या सरदारांना सक्त ताकीद दिली, 'त्या काफर पेशव्याची + आई काशीला जात आहे. तिला मुकाट्याने जाऊ द्या. तिला जरा जरी धक्का लागला +किंवा दगाफटक्याचा नुसता शक जरी आला, तरी तो पेशवा थेट दिल्लीत येईल. मग त्याला +आवरणे जड जाईल. तेव्हा काही हालचाल करू नका.' झालं! म्हणजे बाजीरावाच्या आईला +पकडून बाजीरावाला मात देण्याचे इमले रचणाऱ्या सादतखान, कमरुद्दीनखानाचे इमले उभे +राहायच्या आधीच धडाधड कोसळू लागले. पूर्वी बुंदेलखंडात येऊन जो पराक्रम पेशव्यांनी +गाजवला होता, तो अजून कोणीही विसरलं नव्हतं. मग महंमदखान बंगश तरी कसा +विसरू शकेल? यावेळी काशी हे तीर्थक्षेत्र महंमदखान बंगशाच्या हातात होते. पेशव्यांची +आई येते हे पाहताच तो जरासा गडबडलाच. राधाबाई १७ ऑक्टोबर १७३५ रोजी काशीत +(वाराणसी) येऊन पोहोचल्या. राधाबाईंचा मुक्काम काशीत म्हणजे आपल्याच हद्दीत आहे, +तेव्हा काही अनुचित प्रकार घडू नये, याचीच बंगशाला धास्ती वाटत होती. राधाबाई +काशीच्या जवळ पोहोचल्या आहेत ही बातमी समजल्यानंतर बंगशाने आपला दिवाण +हरिप्रसाद याला पेशव्यांच्या मातोश्रींच्या स्वागताकरता पाठवून दिले. हरिप्रसाद मातोश्रींना +सामीरा गेला. त्याने आपल्याबरोबर आणलेली आलवणं (विधवा स्त्रीला वापरायची +वस्त्र) आणि भेटीखातर एक हजार रुपये नजर केले. राधाबाईंनीही बंगशाची ती भेट +स्वीकारली. दिल्लीच्या बादशहाचा एवढा मोठा सेनापती, ज्याच्या नुसत्या नावानेच हिंदुस्थान +आणि इतर प्रांतातले राजे भयाने कापतात तो आज आपल्या पुत्राच्या जरबेने आपल्यासमोर +वाकतोय, झुकतोय हे पाहून त्या आईला काय बरं वाटलं असेल? राधाबाई कृतार्थ झाल्या +असतील! आज आपला पुत्र भगवंतांचंच कार्य करतोय या जाणीवेने राधाबाई गहिवरल्या +असतील. बाजीरावसाहेबांचा उभ्या हिंदुस्थानात असलेला दरारा, जबर राधाबाईंना प्रत्यक्ष +अनुभवायला येत होती. काशीहून राधाबाई पुढे गयेला गेल्या आणि त्यानंतर बुंदेलखंडातल्या +सागर या ठिकाणी येऊन पोहोचल्या. सागर हे आता बाजीरावांचेच ठाणे असल्याने तेथील +ठाणेदार/सुभेदार गोविंदबल्लाळ खेर उर्फ गोविंदपंत बुंदेले यांनी मातोश्रींचे जंगी स्वागत +केले. गोविंदपंत मूळचे पुण्याचेच असल्याने राधाबाईंना इतक्या महिन्यांनी प्रथमच 'आपल्या' +मुलुखात, आपल्या माणसात आल्यासारखे वाटले. मार्च महिन्याच्या अखेरीस नर्मदा +ओलांडून, राधाबाई आपली काशीयात्रा संपवून पुण्यात दाखल झाल्या. १७३६) + मातोश्री राधाबाईसाहेब काशी यात्रेला गेल्यानंतर इकडे पुणे व आसपासही अनेक घटना +घडत होत्या. दि. १० जुलै १७३५ रोजी बाजीरावसाहेब व काशिबाई यांना पुत्र झाला. याचे +नाव 'जनार्दन' ठेवण्यात आले. पुत्र शनिवारवाड्यात व आणखी कोणत्या ठिकाणी जन्मला +याची नोंद मिळत नाही. यानंतर दि. १९ फेब्रुवारी १७३६ रोजी चिमाजीआप्पांचे चिरंजीव +सदाशिवपंत उर्फ भाऊसाहेब पेशवे यांची मुंज करण्यात आली. आर्यांच्या परंपरेप्रमाणे +<<< + + ब्राह्मणाच्या मुलाची मुंज वयाच्या पाचव्या वर्षीच करायला हवी व ही परंपरा पेशवे-भट +कुटुंबातही चालत होती हेच यावरून दिसून येते. + ऑक्टोबर १७३५ मध्ये धनत्रयोदशीला म्हणजेच ऐन दिवाळीत बाजीराव पेशवे पुण्याहून + उत्तरेच्या रोखाने निघाले. ही मोहीम युद्धाची नव्हती. यावेळेस राधाबाई काशीयात्रा करीत + असल्याने मोंगलांविरुद्ध हालचाली करणे शक्य नव्हते. मग पेशवे उत्तरेत गेले तरी कशाला? + बाजीराव गेले होते, राजपुतातल्या राजपूत राजांना मोंगलांविरुद्ध एकत्र करण्यासाठी! + राजपुतान्यात अजमेर, जयपुर, बिकानेर, उदयपूर अशी अनेक राजपूत संस्थाने होती. या + दोन्ही संस्थानात प्रत्यक्ष नव्हे पण आतून एकमेकांवर करण्याचे सतत प्रयत्न सुरू + असत. बाजीराव प्रथम उत्तरेत उदयपूरला गेले. या मोहिमेत त्यांच्याबरोबर काशिबाईसाहेबही + होत्या. यात्रेला जाण्यापूर्वी राधाबाईंनी आपल्या लाडक्या सूनबाईंना बाजीरावांच्या सतत + बरोबर राहण्याचा 'महत्त्वाचा' सल्ला दिला होता. बाजीराव आणि त्यांच्या पत्नीचे मोठ्या + उत्साहाने स्वागत करण्यात आले. उदयपूरच्या जवळच 'चंपाबाग' या ठिकाणी उदयपूरच्या + महाराण्यांनी प्रचंड मोठा मंडप उभारून शाही माहोल तयार केला होता. याच महालात + बाजीरावसाहेबांचे स्वागत होणार होते. चंपाबागेत एका कोपऱ्यात दोन सुवर्णांची आसनं + एका शेजारी एक मांडण्यात आली होती. खाली पाय ठेवण्यासाठी चांदीचे चौरंग होते. + भवताली फुलांच्या अन् मोत्यांच्या माळा सोडण्यात आल्या होत्या. त्या सुवर्णासनांच्या + चौथऱ्याच्या पायऱ्यांवरून बागेच्या प्रवेशद्वारापर्यंत सुंदर गालिचे घालण्यात आले होते. + बाजीराव व काशिबाई बागेच्या जवळच आल्याचे कळताच उदयपूरचा राणा त्यांच्या + स्वागताकरता बागेच्या दरवाजापर्यंत गेला. बागेत प्रवेश करताच साऱ्या जमलेल्या माणसांनी + वा मानकऱ्यांनी जयजयकार करत फुलांची वृष्टी सुरू केली. राण्यांनी काशिबाईंना + आपल्याबरोबर जनानखान्यात नेले आणि उदयपूरचा राणा बाजीरावसाहेबांना त्या + सुवर्णासनांच्य��� चौथऱ्यावर घेऊन गेला. चौथऱ्यावर येताच त्या राण्यांनी बाजीरावांना एका + सुवर्णासनावर बसण्याची विनंती केली. बाजीरावांनी त्याच्याकडे पाहात स्मितहास्य केले. + सारी सभा हे पाहात होतीच. बाजीरावांनी सभेकडेही पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न + करता बाजीराव खालच्या चांदीच्या चौरंगावर जाऊन बसले. सारा दरबार चकित झाला. + महाराणाही पटकन गडबडला. तो बाजीरावसाहेबांना हाताला धरून उठवत त्यांना + सिंहासनावर बसण्याचा आग्रह करू लागला, तेव्हा बाजीरावांनी त्याला हातानेच थोपवलं + आणि त्याला म्हटलं की, 'राणाजी, ही गादी परमप्रतापी महाराणा प्रतापसिंहाची आहे. + तुमच्या महाराजांची आहे. मी सातारकर. छत्रपती शाहूमहाराजांचा पेशवा आहे, म्हणजे + सेवकच आहे. या आसनावर बसण्याची माझी योग्यता नाही.' तो महाराणा अन् सारा दरबार + थक्क झाला. महाराण्याने बाजीरावांचा उत्तम पद्धतीने सत्कार केला. हा सारा प्रकार + जयपूरच्या सवाई जयसिंगाच्या दिवाणाने, अयामल दिवाणाने पाहिला. त्याने घडलेला सारा + प्रकार जयसिंगाला जाऊन सांगितला. हळूहळू ही बातमी साऱ्या जयपुरात पसरली. + उदयपुरात पाहुणचार झाल्यानंतर बाजीराव जयपूरकडे निघाले. सवाई जयसिंगानेही + उदयपूरच्या महाराण्यासारखाच थाटमाट केला होता. त्यानेही आपल्या दरबारात आपल्या +<<< + +सिंहासनाशेजारी आणखी एक सिंहासन ठेवले आणि खाली दोन चांदीचे चौरंग ठेवले. +बाजीराव काशिबाईंसह जयपूरच्या वेशीवर आले. सवाई जयसिंहाने स्वतः जाऊन +बाजीरावांना दरबारात आणले. समोर दोन सिंहासने आणि चौरंग पाहताच बाजीराव जे काही +उमजायचे ते उमगले. सवाई जयसिंहाने बाजीरावांना हाताला धरून त्या सुवर्णासनापाशी +नेले आणि बाजीरावांना त्या आसनांवर बसण्याची विनंती केली. सारी सभा बाजीरावांकडे +पाहात होती. बाजीरावांनी एकदा जयसिंहाकडे आणि एकदा सभेकडे पाहिले. पुढच्याच +क्षणी अजिबात विलंब न करता बाजीरावसाहेब थेट एका सुवर्णासनावर जाऊन बसले. हे +बघत असताना सारी सभा हादरली. सवाई जयसिंहही अस्वस्थ झाला. बाजीराव उदयपुरात +चांदीच्या चौरंगावर बसले आणि इथे थेट सिंहासनावर बसले हे सवाई जयसिंहाला +अपमानास्पद वाटले असावे. त्याने धीर करून, थोड्या विनम्रतेने बाजीरावांना याचे कारण +विचारले. बाजीराव जयसिंहाकडे पाहून हसले आणि त्याला म्हणाले, 'राणाजी, आपल्याला +���े माहीत नसावं याचंच आश्चर्य आहे. उदयपूरची गादी ही महाराणाप्रतापाची आहे. मोंगल +सम्राट अकबराच्या आमिषाला भुलून, लाचार होऊन आपलं राज्य अन् आपल्या बहिणी +सर्व त्याने मोंगलांच्या घशात कधीही घातलं नाही. त्यामुळेच अखिल हिंदूंना +महाराणाप्रतापसिंह आणि त्यांचे सिंहासन सदैव शिरोवंद्य आहे. याउलट जयपूरचे राज्य, +आपले पितामह मिर्झाराजे जयसिंहांनी काय केले. आपल्या घरातल्या मुली मोंगलांना देऊन +त्यांची कायम गुलामगिरीच पत्करली. याचा आदर्श आम्ही कसा बाळगावा?' बाजीरावांचे ते +परखड बोल सवाई जयसिंहाने आणि सगळ्या राजसभेने निमूटपणे ऐकले. परंतु यानंतर +बाजीरावांनी जयसिंहाला अजून काही बोलून शरमिंदे न करता वस्तुस्थिती समजावून +सांगितली आणि शेवटी जयसिंहाचा पाहुणचार घेऊन, त्याच्याशी गुप्त वाटाघाटी करून +१७३६ मध्ये बाजीराव काशिबाईंसोबत पुन्हा दक्षिणेस येण्यास निघाले. नर्मदा नदीच्या +किनारी रावेरखेडी येथे पेशव्यांची टोलेजंग हवेली होती. वाटेत पेशव्यांचा मुक्काम +रावेरखेडीला असताना काशिबाईंनी नर्मदेच्या वाळवंटात श्री शिवशंकराचे मंदिर +बांधण्यासाठी आज्ञा केली. हेच ते प्रख्यात रामेश्वर महादेव मंदिर. (रावेरखेडी) आणि +महिन्याच्या अखेरीस पेशवे पुण्याला परतले. + पेशवे पुण्यात येण्याच्या सुमारासच राधाबाईसुद्धा यात्रेहून पुण्यात येऊन दाखल झाल्या +होत्या. (परंतु बाजीराव आणि राधाबाई एकत्र पुण्यात आले अशी नोंद नाही) आता +मोंगलांविरुद्ध आघाडी उघडण्यास काहीच हरकत नव्हती. दि. १ जून १७३६ रोजी +राधाबाईंच्या तीर्थयात्रेचे मावंदे झाले. यानंतर बाजीराव पेशवे राजपुतान्यात घडलेल्या +घटनांचा व झालेली खलबते शाहूमहाराजांना कथन करण्यासाठी साताऱ्याला गेले. +राजपूताना आता उघडपणे नसला तरी अंतस्थपणे मराठ्यांना अनुकूल झाला होता. +बाजीरावांना विश्रांती घेण्याचे सांगून उत्तरेत मोहीम करण्याची अनुमती दिली. प्रथम +मोहीम नको म्हणून बाजीरावसाहेबांनी दिल्लीच्या बादशहाला पत्रे पाठविली. गुजरात व +माळवा प्रांताची चौथाई आणि सरदेशमुखी द्यावी, अशी विनंती केली. बादशहाने पेशव्यांची +ही मागणी पूर्णपणे लावली. बाजीरावांना याचा अंदाज होताच, कारण गुजरात +<<< + +आणि माळव्याचा आता बहुतांश भाग आता मराठ्यांकडेच होता. परंतु तरीही मिळाले तर +बादशहाकडून वसूल करायचे या बाजीरावांच्या चालीत उघड राजकारण होते. बादशहा दाद +देत नाही हे पाहताच बाजीराव पेशवे नोव्हेंबर १७३६ च्या सुरुवातीस पुन्हा दिल्लीच्या रोखाने +निघाले. यावेळेस बाजीरावांबरोबर मस्तानीही मोहिमेत सहभागी झाली होती. कदाचित +आपल्यामागे पुण्यात मस्तानीची आबाळ होऊ नये, घरच्यांकडून तिला काही त्रास होऊ नये +म्हणूनच बहुतेक बाजीरावांनी मस्तानीला बरोबर न्यायचे ठरवले असावे. यावेळेस मात्र +राधाबाईंचा व चिमाजीआप्पांचा विरोध तोकडा पडलेला दिसतो. जानेवारी महिन्याच्या +सुरुवातीला पेशवे भोपाळला येऊन पोहोचले आणि भोपाळवरून थेट दिल्लीच्या रोखाने +पेशव्यांच्या फौजा दौडत निघाल्या. बादशहा वरकरणी संतापल्याचा आवेश दाखवत होता. +पण तो आतून अत्यंत घाबरला होता. राधाबाईंच्या तीर्थयात्रेच्या वेळेस सादतखान आणि +कमरुद्दीनखान हे अत्यंत होते. त्यांनाच बाजीरावांवर सोडण्याचा बादशहाने निर्णय +घेतला. हे खानद्वयी मोठे हुशार होते. सादतखानाची ताकद आणि कमरुद्दीनखानाचा +धूर्तपणा या खुबींमुळे मोठ्या मोठ्या रुस्तुमांना लववण्याची ताकद या दोघांत होती. हे दोघेही +प्रचंड सैन्यासह बाजीरावांवर चालून निघाले. पेशवेही हुशार होतेच. दि. २९ मार्च १७३७ रोजी +बाजीराव दिल्लीजवळ कुशबंदी येथे येऊन पोहोचले. सादतखान आणि कमरुद्दीनखान +पेशव्यांना रोखायला निघाले खरे, पण त्या दोघांनाही चकवा देत केवळ दहा-बारा दिवसातच +पेशव्यांच्या झंझावाती फौजा भोपाळहून थेट दिल्लीवर येऊन धडकल्या. बिचारे सादतखान +आणि कमरुद्दीनखान पेशव्यांना भोपाळजवळ शोधत बसले. आता पेशवे दिल्लीच्या वेशीवर +असताना दिल्लीत एकही सरदार हजर नव्हता. पुरेशी फौजही नव्हती. बाजीराव स्वतः +घोड्यावर बसून दिल्लीच्या वेशेवर उभे होते. त्यांचे, नव्हे नव्हे थोरल्या श्री शिवछत्रपती +महाराजांचेच स्वप्न आज सत्यात उतरत होते. दिल्ली! इंद्रप्रस्थ! युधिष्ठिराचे अन् +महापराक्रमी पांडवांचे राजनगर! या दिल्लीत गेल्या हजार वर्षांपासून परकीय आक्रमण +होऊन हे इराणी, अफगाणी लोक आमच्यावरच राज्य गाजवत आहेत. सिंधू नदीचे +पैलतीरापासून कावेरी नदीचे दक्षिण तीरापर्यंत साऱ्या प्रदेशावर हिंदूंचे राज्य व्हावे, ही +शिवाजी महाराजांची इच्छा बाजीरावांच्या मनात गुंजत होती. औरंगजेबाने स्वर���ज्य बुडवले +असे त्याला वाटले! परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुरती तीस वर्षे उलटत नाहीत तोच मराठे +थेट दिल्लीवर धडक देत होते. नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट होती. बादशहा दिल्लीच्या +लालकिल्लात भेकडासारखा दरवाजे बंद करून लपून बसला होता. बाजीरावांची ती संतप्त +नजर दिल्लीवरून फिरली. त्यांच्या समशेरीचे टोक दिल्लीच्या रोखाने उठले अन् "हर हर +महादेव", "छत्रपती शिवाजी महाराज की जय"च्या घोषात हजारो मराठी घोड्यांच्या टापा +खडखडाट करीत वेशीतून आत घुसल्या. मराठ्यांच्या हातात मशाली होत्या. दिसेल ती +चीजवस्तू लुटीत, आगी लावीत मराठे दौडत होते. दिल्लीची शाही बाजारपेठ पूर्णपणे लुटली +गेली. बाजीरावांची जळजळीत नजर लाल किल्ल्यावरून फिरली. जणू ते सूर्यतेजी डोळे +किल्ल्यातल्या बादशहाला बजावत होते, 'इतकी वर्षं तुम्ही आमच्यावर जुलुमाचं राज्य +केलंत. पण आम्हीही दुबळे नाही. महाराष्ट्राच्या बाहेरच नाही तर थेट दिल्लीत येऊन आम्ही +<<< + +जाळपोळ करू शकतो. आता इथे आमचंच, हिंदूंचंच राज्य होणार!' पण बाजीरावांनी +लालकिल्लाला थेट धडक दिली नाही. यातही त्यांचा निश्चित काही विचार होता. यावेळेस +फक्त दिल्लीकरांचे डोळे उघडण्याकरिता ही मोहीम होती. इकडे सादतखान आणि +कमरुद्दीनला पेशवे दिल्लीत घुसल्याची खबर मिळाली. ते दोघे ताबडतोब दिल्लीच्या रोखाने +निघाले. बाजीरावांच्या हेरांनी त्यांना लगोलग खबरा पेश केल्या. बाजीरावांनी मराठ्यांना +लगेच दख्खनेकडे कूच करण्याचा इशारा दिला आणि पुन्हा एकदा सादत आणि +कमरुद्दीनच्या शाही फौजांना चकवा देत जुलै १७३७ मध्ये बाजीराव पुण्यात पोहोचले. + दिल्लीत बादशहा सादतखान आणि कमरुद्दीनखानावर खूप भडकला. पेशव्यांना +मारण्याच्या वलाना करणाऱ्या या दोघांना बाजीराव दुरूनही दिसले नव्हते. बाजीरावांना मात +देईल असा कोणी रूस्तुम दिल्ली दरबारात दिसत नव्हता. शेवटी दरबारी मुत्सद्दी आणि +सरदारांच्या विनंतीवरून निजामाला पाठवायचे ठरविण्यात आले. वास्तविक, +निजामाने मोंगल सत्तेविरुद्ध फारकत घेऊन स्वतंत्र कारभार थाटला होता. म्हणून बादशहा +त्याच्यावर नाराज होता. परंतु यावेळेस अखिल हिंदुस्थानात शूर, कपटी, मुत्सद्दी आणि +प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेबाचा चेला निजामच काय तो मराठ्यांना रोखू शकेल, असे +वाटल्याने बादशहाने त्याला पत्र लिहून कळवले, 'तू मोठा समशेरबहाद्दर आहेस. त्या काफर +पेशव्याला मात देऊ शकेल असा तूच एक आहेस. तू काहीही करून दिल्लीच्या +रोखाने कूच करून आमचं रक्षण कर. त्या बदल्यात आग्रा, बुंदेलखंड, माळवा या प्रांतांच्या +सुभ्यांवर नासीरजंगची नेमणूक दिल्ली दरबारकडून केली जाईल.' माळवा, बुंदेलखंड आणि +प्रत्यक्ष आग्याची सुभेदारी जर विनासायास मिळत असेल तर बादशहाला मदत केलीच +पाहिजे, या लालसेने निजामाने मोंगलांना मदत करण्याचे ठरवले. प्रचंड सैन्य घेऊन निजाम +दिल्लीहून निघाला. निजाम हा बाजीरावांना मारण्यास निघाला असल्याने तो साहजिकच +पुण्याच्या रोखाने येणार हे उघड होतं. निजाम पुण्यात घुसला तर तो पुण्याची जाळपोळ +करीत हानी करेल म्हणून निजामाला पुण्यापासून दूर नेण्यासाठी ऑक्टोबर १७३७ +च्या अखेरीस बाजीरावांनी फौजेसह पुण्याहून उत्तरेकडे कूच केले. सोबत चिमाजीआप्पाही +होतेच. + दिल्लीच्या रोखाने निघालेल्या पेशव्यांना मदत करावी म्हणून शाहूमहाराजांनी नागपूरकर +रघुजी भोसल्यांना पत्र पाठवले होते. परंतु ते पत्र रघुजींनी बासनात गुंडाळून ठेवले व +आपणास काहीच माहीत नाही, या आविर्भावात ते तटस्थ राहिले. निजामाचा तळ भोपाळला +असताना बाजीरावांनी वायूवेगाने येऊन निजामाची संपूर्ण छावणी वेढली. फास +आवळल्यागत वेढा पडला. जवळून नर्मदा नदी वाहत होती खरी, पण बाजीरावांनी +पालखेडप्रमाणेच इथेही निजामाचे 'पाणी' तोडले. निजामाला टाचा घासत उभे +राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. ही बातमी औरंगाबादजवळच असलेल्या निजामाचा मुलगा +नासीरजंगपर्यंत पोहोचली. बापाच्या मदतीसाठी नासीरजंग ताबडतोब भोपाळच्या दिशेने +निघाला. या सर्व गोष्टींची कल्पना आधीपासूनच असल्याने बाजीरावांनी चिमाजीआप्पांना +फौजेसह तापी नदीच्या खोऱ्यातच थांबायला सांगितले होते. नासीरजंगच्या +<<< + +फौजा हंडीयाच्या घाटाच्या दिशेने निघाल्या असताना एकदम चिमाजीआप्पांच्या फौजांनी +त्याला अडसर घातला. झालं! नासीरजंग खालीच अडकून राहिला. इकडे बाजीरावांनी +निजामाची चांगलीच कोंडी केली होती. मराठ्यांकडून सतत गोळीबार आणि तिरंदाजी सुरू +होती. त्यामुळे निजामाचे अनेक लोक पडले. अनेकांनी लाकडाच्या आणि मातीच्या +(चिखलाच्या) भिंती रचून त्यामागे आश्रय घेतला. न��जाम तर आपल्या हत्तीच्या अंबारीतच +लपून बसला. लोकांना खाणेही अपुरे पडू लागले. अन्न एक रुपयास एक शेर मिळू लागले. +म्हणजे रात्रीच्या वेळेस मराठेच निजामाला अन्न विकत होते. भूतदया !!! पळसाचा +पाला खाऊन पोट भरत होती. निजामाच्या फौजांतल्या पठाणांनी तर भांड्यांचे म्हणजेच +मोठमोठ्या तोफा ओढणारे बैलच कापून काढले. राजपूत लोक गोमांस कसे खाणार? +त्यांच्यावर तर उपाशीच मरायची वेळ आली. चिमाजीआप्पांना पाठवलेल्या या दरम्यानच्या +एका पत्र मजकुरात बाजीरावसाहेब म्हणतात, "ऐसा प्रसंग जाहला, तेव्हा नबाब सर्वांचे दुःख +पाहून बहुतच काहिला होऊन सलोखा विसी (तहासाठी) त्वरा केली. जो नबाब चौथाई व +सरदेशमुखीची बाजीरावांनी अखेर नावे निजामाशी घेत नव्हता तह त्याने केला. माळवे नर्मदा दरोबस्त आणि ऐसे चंबळा खास या दस्तफाने नद्यांमधला लिहून दोआबातला + +सर्व प्रदेश व मोहीम खर्च म्हणून पन्नास लक्ष रुपये द्यावेत (बादशहाकडून देववावेत) या +अटीवर निजामाची सुटका झाली. जो निजाम 'बाजीराव काफराला नर्मदेच्या वर कधीच +पाऊल ठेवू देणार नाही' अशा बतावण्या करत होता, तो निजाम स्वतःच बाजीरावांसमोर +मान खाली घालून नर्मदेच्या खाली उतरला. मराठ्यांच्या या विजयी तहाला 'दुराई सराईचा +करार' म्हणतात. डिसेंबर सन १७३७ मध्ये युद्ध झाल्यानंतर या सर्व प्रदेशांची व्यवस्था लावून +बाजीराव आणि चिमाजीआप्पा जुलै १७३८ मध्ये पुण्यात परतले. +<<< + + थोरले बाजीराव पेशवे यांच्या + भोपाळ मोहिमेध्या संभाव्य हालचाली + + याआधी बाजीराव दिल्लीला जाण्याच्या सुमारासच (नोव्हेंबर १७३६) चिमाजीआप्पा +कोकणात उतरले होते. कारण यापूर्वी १७३३ च्या बाजीरावांच्या कोकण मोहिमेत +बाजीरावांनी जंजिऱ्याचा याकूतखान सिद्दीसात याच्याशी तह केला होता. परंतु, बाजीरावांची +पाठ वळताच सिद्दीने परत धुमाकूळ घालायला सुरुवात केली. यानंतर गेल्या दोन-अडीच +वर्षांत उत्तरेतल्या राजकारणामुळे कोकणात लक्ष देणे पेशव्यांना जमले नाही. अशातच +सरखेल सेखोजी आंग्रेही मृत्यू पावले. त्यामुळे सिद्दीला रान मोकळेच मिळाले होते. म्हणूनच +नोव्हेंबर १७३६ मध्ये चिमाजीआप्पा कोकणात उतरले. सेखोजीनंतर शाहूमहाराजांनी +मानाजी सरखेलपद दिले. मानाजीही लगेच चिमाजीआप्पांच्या मदतीला धावले. +चिमाजीआप्पांनी चिकाटीने सिद्दीला जंजिऱ्याबाहेर काढले व कुलाब्याच्या जवळच +चिमाजी आप्पांनी सिद्दीसातला ठार केले. कोकणातील प्रजेला महिषासुरासारख्या छळणाऱ्या +सिद्दीसातला आप्पांनी मारले ही बातमी ऐकून बाजीरावांनाही फार आनंद झाला. बातमी +सातारला शाहूमहाराजांकडे आणि धावडशीला ब्रह्मेंद्रस्वामींकडे धाडण्यात आली. +शाहूमहाराजांनी दूताकडून युद्धाचे तपशीलवार वर्णन ऐकलं आणि त्यांनी ताबडतोब तोफा +उडवण्याचा आणि नौबती वाजविण्याचा हुकूम सोडला. साखराही वाटण्यात आल्या. +धावडशीला ब्रह्मेंद्रस्वामींनीही आनंद साजरा केला. त्यांच्या परमप्रिय चिपळूणच्या भगवान +परशुरामांचं मंदिर विटाळून, उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम सिद्दीसाताला आज बाजीरावांच्या +<<< + +'लक्ष्मणाने' आप्पांनी मारले होते. शाहूमहाराजांनी नंतर चिमाजीआप्पा देशावर साताऱ्यात +आले तेव्हा मानाची वस्त्रे, पदक आणि तलवार देऊन त्यांचा मोठा सन्मान केला. सरखेल +मानाजी सत्कार करण्यात आला. चिमाजीआप्पांच्या या कोकण मोहिमेचे +फलित म्हणजे जंजिरा, पद्मदुर्ग आणि उंदेरी या दुर्गाशिवाय सिद्दीचा सारा मुलुख +चिमाजीआप्पांनी शाहूमहाराजांच्या नावे करून घेतला. जंजिरेकर मराठ्यांचे 'मांडलिक' +झाले. पण एक सल मात्र कायम उरात राहिला, 'जंजिरा' मात्र कधीही स्वराज्यात आला +नाही. या मोहिमेनंतर काही काळ पुण्यात येऊन चिमाजीआप्पा बाजीरावांबरोबर निजामाच्या +मोहिमेवर निघाले. + निजामाच्या मोहिमेच्या आधी बाजीरावांनी राधाबाई आणि चिमाजीआप्पांच्या विरोधाला +न जुमानता मस्तानीला शनिवारवाड्यात राहायला आणले. यावरून बरेच वादंग निर्माण +झाले. बाजीरावांनी शनिवारवाड्यात आपल्या महालाला लागूनच एक सुंदर महाल बांधला +होता. हा महाल इतर महालांपासून बराच लांब, चिमणबागेच्या उत्तरेला तटाला लागूनच +होता. महालात जाण्यासाठी एकतर तटाच्या दरवाजातून किंवा फक्त बाजीरावांच्या +महालातूनच वाट होती. मस्तानी ही छत्रसालांच्या यवन स्त्रीपासून झालेली मुलगी असल्याने +तिला पेशव्यांच्या महालात आणल्याने पुण्यातल्या समस्त ब्रह्मवृंदाने पेशव्यांच्या धार्मिक +कार्यावर बहिष्कार घालण्याची भाषा सुरू केली. आधीच झालेल्या मनस्तापामुळे मातोश्री +राधाबाई अजूनच त्यांनी ब्रह्मवृंदाला ठणकावून सांगितले, 'तुम्ही धर्मकार्यास +तयार नसाल तर पेशवे काशीहून ब्राह्मण आणवून धर्मकार्य करतील.' काशी यवनांच्याच +ताब्यात असल्याने तेथील ब्राह्मण विनातक्रार येतील असे पाहून पुण्यातल्या ब्रह्मवृंदाने +आपली बहिष्काराची भाषा बंद केली. यानंतर काही काळ मस्तानीलाही त्रास नको म्हणून +बाजीरावांनी तिला निजामाच्या मोहिमेवर नेले. परंतु बाजीराव मस्तानीसह विजय घेऊन +पुण्यात परतले तरी पुण्यात त्यांचे उत्साहाने स्वागत झाले नाही. सारा शनिवारवाडा उदास +होता. मातोश्रींच्या मनाविरुद्ध घडल्याने त्यांनीही बाजीरावांकडे पाठ फिरवल्यासारखेच केले +होते. काशिबाईंच्या चेहऱ्यावरची नाराजीही लपत नव्हती. चिमाजीआप्पांची तर द्विधा +मनस्थिती झाली होती. ते आपल्या पराक्रमी बंधूंना आणि करारी मातोश्रींना दोघांनाही +सांभाळून घेण्याची तारेवरची कसरत करत होते. नाही म्हणायला फक्त पेशव्यांच्या सर्वात +धाकट्या भगिनी अनुबाई इंचलकरंजीकरच काय त्या बाजीरावांना आणि मस्तानीला +समजून घेत होत्या. बाजीरावांपेक्षा चौदा वर्षांनी लहान असणाऱ्या अनुबाईंनी मात्र +शेवटपर्यंत ठामपणे बाजीरावांचा पक्ष उचलून धरला. परंतु, याव्यतिरिक्त बाजीरावांच्या +महालाकडचा घरच्यांचा राबता बहुतांशी बंदच पडल्यासारखा होता. + बाजीरावसाहेब दिवस ढकलत होते. घरच्या कटकटींपासून वैतागून बाजीराव यवत- +भुलेश्वरजवळ पाटसला येऊन राहिले. नेमकी हीच संधी साधून चिमाजीआप्पांनी +शनिवारवाड्यात मस्तानीच्या महालाभोवती चौक्या बसवून तिला नजरकैदेत टाकले. (१७३९ +सुरुवात) परंतु बाजीरावांचा विरह मस्तानीस साहवेना. काही महिने असेच गेल्यावर एके +दिवशी (राजी) मस्तानी चौकी पहाऱ्याची नजर चुकवून थेट पाटसला बाजीरावांकडे गेली. +<<< + +बाजीराव विषण्ण मनाने मस्तानीला भेटले. परंतु, यावेळेस बाजीरावांची फारशी घालमेल +झाली नाही. लवकरच मातोश्री व आप्पा मस्तानीला समजून घेतील याच एका आशेवर ते +आता राहात होते. मस्तानीशी मन भरून येईपर्यंत बोलल्यानंतर बाजीरावांनी मस्तानीला +परत शनिवारवाड्यात जाण्यास सांगितले. मस्तानीची बाजीरावांना सोडून कुठेही जाण्याची +इच्छा नव्हती. परंतु, बाजीरावांनी तिला बळेच मेण्यात बसवून पुण्यास रवाना केले. बाजीराव +मात्र पाटसहून परत आले नाहीत. + एप्रिल १७३९ मध्ये बाजीराव पाटसला असतानाच उत्तरेतून खबरगीर तातडीने दाखल +झाले. इराणचा नादिरशहा खैबरखिंडीतून थेट दिल्लीवर आक्रमण करण्याच्या बेतात होता. +बाजीरावांनी सातारला स्वार पाठवून शाहूमहाराजांची परवानगी घेतली आणि आपल्या +फौजेला तयार करण्याचा हुकूम शनिवारवाड्यावर पाठवला. फौज तयार झाली. बाजीरावांनी +आपल्या स्वारांना पुढे पाठवून सर्व राजपूत व बुंदेले, जाट इत्यादी सरदारांना तयार राहण्यास +सांगितले. याच वेळेचा फायदा घेऊन थेट दिल्ली हस्तगत करावी असा बाजीरावांचा डाव +होता. परंतु, सैन्याची जमवाजमव होऊन सैन्य बाहेर इकडे नादिरशहाने दिल्लीवर +आक्रमण केले. परंतु, दिल्लीत आल्यानंतर सगळ्या राजपूतांनी युद्धाची जय्यत तयारी +ठेवलेली असून ते बाजीरावांच्या येण्याचीच वाट पाहात आहेत, हे नादिरशहाला समजले. +त्याच्या तोंडचे पाणीच पळाले. घाईघाईने आपल्या मर्जीतल्या महंमदशहाला दिल्लीच्या +तख्तावर बसवून नादिरशहा इराणला निघून (पळून!) गेला. बाजीरावांना फार वाईट वाटले. +वास्तविक यावेळेस दिल्ली जिंकता येऊ शकली असती. आता काही करता येत नव्हतं. इथून +तिथून सारे बादशहा सारखेच! बाजीरावांनी केवळ उपचार म्हणून नवीन बादशहाला +अभिनंदनाचा खलिता आणि नजराणा पाठवला. बादशहानेही कृपा म्हणून मानाचा पोषाख, +संपूर्ण सुवर्णालंकारांनी मढवलेला व हत्ती आणि पूर्वीचे सारे अधिकार कायम ठेवले. हे +शाही फर्मान स्वीकारण्यासाठी बाजीरावांना दि. २२ १७३९ रोजी ठाणे जिल्ह्यातील +शहापूर उर्फ जैनाबाद येथे जावे लागले. + बाजीराव इकडे या कामात गुंतले असताना चिमाजीआप्पा कोकणात पोर्तुगीजांविरुद्ध + होते. याआधी मार्च १७३७ ते जुलै १७३७ दरम्यानही चिमाजीआप्पा कोकणात उतरले +होते. त्यावेळी पोर्तुगीजांचा 'ठाण्याचा' कोट व आसपासचा परिसर जिंकून मोहीम आटोपती +घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा उत्तर फिरंगाण जिंकून घेण्याकरता डिसेंबर १७३८ मध्ये +चिमाजीआप्पा पुन्हा कोकणात उतरले. वास्तविक या भागातला पेशव्यांचे सरदार गंगाजी +नाईक अणजूरकर हा १७२२ ते १७२३ पासून पेशव्यांना फिरंगणात उतरण्यास विनंती करीत +होता. परंतु प्रत्यक्ष फौजा उतरायला ३८ साल उजाडले. यावेळेस वसईच्या आसपासचे +लहान प्रदेश जिंकून दि. ७ जानेवारी १७३९ रोजी चिमाजीआप्पांच्या फौजांनी वसईच्या +किल्लाला वेढा घात��ा. किल्ला प्रचंड होता. दणकट होता. सिद्दींच्या जंजिऱ्यासारखाच हा +वसईचा किल्ला म्हणजे अक्षरशः यमपुरी होती. इथले ख्रिश्चन मिशनरीज त्यांना म्हणत +'प्राइस्ट'. हे प्राइस्ट आसपासच्या भागातून गरीब कोळी, भंडारी, ब्राह्मण अशा लोकांना +जबरदस्तीने पकडून वसईच्या किल्ल्यात नेत. किल्ल्यातल्या प्रचंड चर्चमध्ये या लोकांचे +<<< + +बळजबरीने धर्मांतरण करण्यात येई. ख्रिश्चनांचा मुख्य हेतू लढून सत्ता गाजवण्यापेक्षा माणसं +बाटवून त्यांना 'आपलं' करून राज्य करायचा हा होता. या साऱ्या गोष्टी जेव्हा अगदीच +असह्य होऊ लागल्या तेव्हा चिमाजीआप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नरला विलक्षण दमच दिला, 'जर +तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत, तर मराठे थेट किल्ल्यात घुसतील. मग तुमच्या +देवळांच्या (चर्चच्या) घंटानादाचे ध्वनी आमच्या (हिंदूंच्या) मंदिरात वाजू लागतील.' परंतु, +तरीही गव्हर्नरने चिमाजीआप्पांचे म्हणणे न ऐकल्यासारखेच केले. शेवटी ७ जानेवारी १७३९ +मध्ये आप्पांनी वसईचा किल्ला चोहोबाजूंनी घेरला. दोन महिने गेले तीन महिने गेले ... +चौथा महिना आला. तरीही वसईचा किल्ला दाद देत नव्हता. अखेर चिमाजीआप्पा भयंकर +संतापले. एके दिवशी आप्पा आपल्या सैन्याच्या समोर गेले आणि आवेशात त्यांच्याच +फौजेला उद्देशून म्हणाले, 'तुम्हाला जर कोट जिंकता येत नसेल तर ठीक आहे. आता मला +एका तोफेच्या समोर बांधून माझे मस्तक तरी कोटात जाऊन पडेल असे करा. मला त्यानेच +समाधान वाटेल!' आप्पांच्या या संतापी शिलगावणीने सैन्य आवेशाने कामाला लागले. रात्री +खलबते झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ल्याच्या तटबंदीखाली सुरूंग पेरण्यात आले. +बत्ती दिली आणि समोरचा एक प्रचंड बुरूज अस्मानात उडाला. पोर्तुगीजांच्या ध्यानीमनी +नसताना त्यांची बुरूजावरची पन्नास-साठ माणसे अस्मानात उडाली. हे पाहून मराठ्यांना +जोर चढला. दुसरा सुरूंग अजूनही उड़ाला नव्हता. कदाचित तो विझला असेल म्हणून मराठे +त्वेषाने तटाला पडलेल्या खिंडाराकडे धावले. यल्गार केला. परंतु, अचानक याच सुमारास +दुसरा सुरूंगही उडाला. यात मराठेही बरेच मारले गेले. तरीही मराठ्यांनी जोर लावून +किल्ल्यात घुसण्यात ते यशस्वी झाले. पोर्तुगीजांनी शर्थ केली. परंतु, मराठ्यांच्या प्रभावी +हल्ल्यापुढे त्यांचा टिकाव लागेना. शेवटी दि. ५ १७३९ या दिवशी संध्याकाळी पोर्तुगीज +शरण आले. त्यांचा विजरई म्हणजेच व्हॉईसरॉय पांढरे निशाण धरून चिमाजीआप्पांपुढे +गेला. आप्पांनी त्याला जीवदान दिले आणि ताबडतोब आपली माणसे आणि सैन्य घेऊन +किल्ला सोडायला सांगितले. अर्थात पोर्तुगीजांना संपूर्ण किल्ला खाली करण्यासाठी एक +आठवडा जावा लागला. तोपर्यंत एकही मराठा किल्ल्यात घुसला नाही वा कोणत्याही +पोर्तुगीजाला इजा झाली नाही, हे पोर्तुगीजांनीच एका पत्रातून आपल्या देशात, लिस्बनला +पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे. दि. १३ १७३९ वैशाख वद्य द्वितीया, सिद्धार्थ नाम +संवत्सर शके १६६२ या दिवशी वसईच्या किल्ल्यावर शाहूमहाराजांचे निशाण फडकले. +वसईबरोबरच आप्पांना लहान-मोठे वीस किल्ले, साडेतीनशे गावे आणि प्रचंड दारूगोळा +मिळाला. या वसईच्या मुक्ततेमुळे उत्तर कोकणातील प्रजा फार आनंदली. + वसईच्या मोहिमेमुळे आप्पांचा दरारा अखिल हिंदुस्थानात (सातारा दरबारातही) +शतपटीने नव्हे तर लक्ष पटीने वाढला. कारण वसई काबीज करणे शक्य नव्हते. +पोर्तुगीजांच्या लांब पल्ल्याच्या अचूक नेमबाजीच्या बंदुकींशी सामना करत बावीस हात +उंचीच्या आणि बारा हात रुंदीच्या त्या अजस्त्र तटात शिरकाव करणे केवळ अशक्यच. परंतु +चिमाजीआप्पानी ते शक्य करून दाखवले. 'फिरंगी निघोन गेले. वसई जाली! ईश्वरे +पेशव्यास स्थल दिल्हे. मोठी फत्ते झाली. यत्न राज्यात कोणी केला नाही (नव्हता)' +<<< + +चिमाजीआप्पा वसईशी टक्कर देत असतानाच बाजीरावांनी आपले मेव्हणे व्यंकटराव +घोरपडे (अनुबाईंचे पती यांना सैन्यासह गोव्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले. व्यंकटरावही +शूर होते. ते गोवा घेण्यासाठी हल्ला करणार तोच इकडे वसईकर शरण आले. मराठे व +पोर्तुगीजांच्यात तह झाला. त्यामुळे गोवा मराठ्यांकडे येता येता हुकले. परंतु या मोहिमेमुळे +पोर्तुगीजांबरोबरच आणखी एक धूर्त सत्ताधीश इंग्रजही पेशव्यांना वचकून राहू लागले. +वसईच्या तहापाठोपाठ इंग्रजांनाही पेशव्यांची 'मैत्री' हवीहवीशी वाटू लागली. आप्पांच्या +विजयाच्या खबरा पुण्यात पोहोचल्या. बाजीरावांनी ताबडतोब शनिवारवाड्यावरून तोफांची +सलामी देण्याचा हुकूम सोडला. साखरा वाटण्यात आल्या. दि. ४ सप्टेंबर १७३९ या दिवशी +चिमाजीआप्पा घाट चढून पुण्याजवळ आले. त्यांचे स्वागत करण्यासाठी म्हणून बाजीराव +पेशवे मोठ्या साजसरंजामासह औंधपर्यंत सामोरे गेले. + दोन महिने उलटले. याचवेळेस बाजीरावांना एक बातमी मिळाली. निजाम +मराठ्यांविरुद्ध दिल्ली दरबाराशी वाटाघाटी करण्यासाठी (?) दिल्लीला गेलाय. हीच योग्य +वेळ आहे असे वाटून १७४० च्या सुरुवातीला बाजीरावांनी फौजेसह थेट निजामाच्या +हैद्राबादेवरच हल्ला चढवला. परंतु, पेशवे हैद्राबादेवर चालून जायच्या वाटेवरच औरंगाबाद +आणि पैठण या प्रदेशात निजामाचा पुत्र नासीरजंग आडवा आला. गोदावरी नदीच्या +वाळवंटात मोठे युद्ध झाले. परंतु, पेशव्यांच्या तिखट आणि प्रभावी माऱ्यापुढे नासीरजंगचे +काही चालले नाही. नासीरजंग पराभूत झाला. दि. २७ फेब्रुवारी १७४० रोजी बाजीराव आणि +नासीरजंग यांच्यात मुंगी-पैठण येथे तह झाला. या तहान्वये नासीरजंगाने निजामाचे हंडिया व +खरगोण हे दोन सुभे बाजीरावांना देऊन टाकले. नासीरजंगशी तह झाल्यानंतर पुण्याला परत +न जाता बाजीराव या प्रांतांची व्यवस्था लावण्यासाठी तसेच खरगोणला गेले. बाजीराव +मोहिमेवर असताना इकडे पुण्यात विशेषतः शनिवारवाड्यात अनेक घटना घडत होत्या. +मस्तानी आप्पांच्या नजरकैदेतून निसटून पाटसला बाजीरावांकडे गेली आणि परतही आली. +परंतु, आता तिला कैद करणे शक्य नव्हते. साताऱ्यात शाहूमहाराजांनाही हा प्रकार +कळल्यामुळे त्यांनी चिमाजीआप्पांना पत्र पाठवले होते, "त्याची (बाजीरावांची) वस्तू त्यांस +द्यावी. त्याचे समाधान करावे. दुर्वेसनाचा मजकूर त्या वस्तूवर नाही. त्यांचे चित्तात +होऊन टाकतील तेव्हाच जाईल. यैसे असता त्या वस्तूस अटकाव करून सखा तोडू नये ऐसी +मर्जी आहे. ते वस्तूमुळे रायांस खट्टे न करावे." शाहूमहाराजांनी जरी राऊंस दुखवू नये असे +सांगितले, तरी आप्पांना मात्र ते पटलेले दिसत नाही. दि. २६ जानेवारी १७४० या दिवशी +नानासाहेबांनी मस्तानीला पर्वतीच्या बागेत कैद केले. नानासाहेबांनी लगेच चिमाजीआप्पांना +घडलेले सारे पत्राद्वारे कळवले आहे. नाना लिहितात, "मस्तानीस बागास बोलावून कैद +केली. कोणी हत्यार धरिले नाही. रात्री घरास घेऊन जाऊ. मग घरी ठेवावेसे जाले तर +स्वामींचे (आप्पांचे) लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेवू अथवा चोरून दहा माणसे बरोबर देऊन +कोथळागड (घनगड) येथे भलते जागा पाठवू. स्वामींनी राऊंचा जीव जतन करावा ... " +यानंतर मात्र नानासाहेबांनी मस्तानीला शनिवारव���ड्यातल्या तिच्याच महालात नेऊन +भवताली चौक्या बसविल्या. नंतर चिमाजीआप्पा पैठण येथे बाजीरावांपाशी गेले. यावेळेस +<<< + + बाजीराव आणि चिमाजीआप्पा यांच्यात मस्तानीबद्दल अनेक वाद झाले असावेत, असे +वाटते. आप्पांनी राऊंना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बाजीरावांना ते काही +पटले नाही. शेवटी नाईलाजाने बाजीरावांची तब्येत जपण्यासाठी चिमाजीआप्पांनी + मस्तानीला कैदेतून सोडून बाजीरावांकडे रवानगी करण्याचे ठरवले. दि. २९ मार्च १७४० च्या +एका पत्रात चिमाजीआप्पा नानासाहेबांना लिहितात, "राऊस्वामी १९ जिल्हेजी गेले. त्या +दिवसापासून आजपावेतो त्यांचे पत्र नाही. जेथपर्यंत येत्तच आले तो केला. परंतु ईश्वराचे + चित्तास न ये त्यास आमचा उपाय काय? त्यांचे प्राक्तनी असेल ते सुखरूप होऊ. आपण + निमित्त व्हावे यैसे नाही. पुण्यात गेल्यावर तिची (मस्तानीची) रवानगी + (बाजीरावांकडे) करावी ... " यानंतर चिमाजीआप्पा १० एप्रिल रोजी परत पुण्यात येऊन + पोहोचले. चिमाजीआप्पा आणि बाजीराव वरखेडे मुक्कामी असतानाच इकडे पुण्यात ४ +फेब्रुवारी रोजी बाजीरावांचे पुत्र रघुनाथराव यांची मुंज व ७ फेब्रुवारी रोजी सदाशिवराव + भाऊंचे भानू घराण्यातील उमाबाई यांच्याशी लग्न लावून देण्यात आले. महादजी नारायण + भानूंच्या या कन्या. या दोन कार्यांनंतर सुमारे दीड महिन्यांनी बाजीरावांचे सर्वात धाकटे पुत्र +जनार्दनपंत यांची दि. २६ मार्च १७४० रोजी मुंज लावण्यात आली. या मंगल प्रसंगांच्या वेळी + बाजीराव पुण्यात नव्हते, ही गोष्ट खटकणारी वाटली तरीही पेशव्यांच्या घरच्यांनी हे मुद्दाम +बाजीरावांच्या गैरहजेरीत केले असे नाही. बाजीराव मोहिमेवर होते. मोहीम म्हटले की किती +वेळ जाईल याचा काही नेम नसतो. म्हणूनच बहुदा ही मंगलकार्ये उरकून घेण्यात आली + असावीत. बाजीराव खरगोण प्रांताची व्यवस्था लावण्या गेले असताना नासीरजंगने + औरंगाबादेत चिमाजीआप्पांचा मोठा सत्कार केला. कदाचित पुढे आपल्या बापाच्या +मरण्याआधीच आपण गादी घ्यावी आणि त्यावेळेस पेशव्यांसारखा, निदान आप्पांसारखा + मोठा मातब्बर आपल्या सोबत असावा, असे नासीरजंगला वाटत असावे. नासीरच्याही +मूर्खपणाची तारीफ करावी ती किती? + बाजीरावांनी दि. २३ मार्च १७४० रोजी खरगोण प्रांतात प्रवेश केला. सुभ्याची व्यवस्था +लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती. दि. ५ एप्रिल रोजी बाजीराव +नर्मदाकाठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले. हंडिया व इतर प्रांतांची व्यवस्था + लावून पूर्ण झालेली होती. परंतु, तरीही बाजीराव पुण्याला न राहता रावेरखेडीलाच राहिले. +वास्तविक पुणे हे बाजीरावांचे अत्यंत प्रिय. शनिवारवाड्यासारखा बळकट महाल त्यांनी उभा +केला, पुण्याची पुनर्बांधणी केली. परंतु, मस्तानी प्रकरणाने त्याच पुण्याने आपल्या + घरातल्यांनीही त्यांना वाळीत टाकल्यासारखेच केले होते. सतत मस्तानीच्या असण्यावरून +घरातल्या मंडळींचे नाराज चेहरे त्यांना पुण्यापासून लांब राहण्यास प्रवृत्त करू लागले. + चिमाजीआप्पा राधाबाईंना पत्राने कळवतात, "रायासही च्यार गोष्टी नम्रतेने बोलणे तैस्या + बोललो. सांप्रत पहिल्यापेक्षा बोलूनचालून भोजन करून सुखरूप आहेत. देवाची दया आहे, +तर दिवसेंदिवस संतोषीच होत जाईन. चित्तांत मात्र वेध आहे. तो कललाच आहे." यावरून + असं दिसतं की, बाजीरावांची प्रकृती सुधारत होती, परंतु चित्तात असलेला मस्तानीचा वेध + अजून वाढला होता. चिमाजीआप्पा पुण्यात येताच कुलाब्याहून सरखेल मानाजी आंग्रे यांचा +<<< + +खलिता आला. कोकणात काही कटकट उद्भवल्याने आप्पा व नानासाहेब कुलाब्याला +मोहिमशीर झाले. परंतु, पुणे शहर सोडण्यापूर्वी चिमाजी आप्पांनी काशिबाई व त्यांचे नुकतीच +मुंज झालेले त्यांचे चिरंजीव जनार्दनपंत यांना मेण्यात बसवून मोठ्या बंदोबस्ताने +रावेरखेडीकडे पाठवून दिले. काशिबाईंसोबत घरचे कोणीतरी म्हणून महादजीपंत पुरंदरेही +होते. + तब्येतीत सुधारणा होत असतानाच परत दि. २० एप्रिल रोजी बाजीरावांची तब्येत +अतिशय बिघडली. दि. २३ एप्रिलपासून व आसपास अनेक दाने व धर्मकृत्ये +करण्यास सुरुवात केली होती. दि. २६ एप्रिल रोजी काशिबाई आपले पुत्र जनार्दन आणि +महादजीपंत पुरंदऱ्यांसोबत रावेरखेडीला पोहोचल्या. याच दिवशी पहाटे बाजीराव +बेशुद्धावस्थेत गेले. काशिबाईंना तर आपल्या पराक्रमी पतीला असे अंथरुणावर पाहून बळच +गेल्यागत झाले. त्यांनी जवळच्याच रामेश्वराच्या मंदिरात ब्राह्मणांना मृत्युंजय जपासाठी +बसायला सांगितले. अहोरात्र मृत्युंजयाचा घोष चालू होता. परंतु, त्याने बाजीरावांच्या +प्रकृतीत काहीही फरक पडला नाही. दि. २�� एप्रिल १७४० सोमवारी पहाटे श्रीमंत बाजीराव +पेशव्यांनी हे जग कायमचे सोडले. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात बेचाळीस +खेळून कायमच अजिंक्य राहिलेला हा 'ईश्वरदत्त सेनानी' शेवटच्या काळात मात्र आयुष्याची +लढाई हरला होता. अखिल हिंदुस्थानात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून देऊन दबदबा +निर्माण करणारा शिवछत्रपतींच्या स्वप्नातल्या 'स्वराज्याला' 'साम्राज्य' बनवणारा हा + पेशवा हा पुन्हा न परतण्याकरता स्वर्गाच्या मोहिमेवर गेला + संदर्भ : +१) रोजनिशीतील उतारे : गो. स. सरदेसाई, २) मराठी रियासत : बाजीराव बल्लाळ : गो. स. +सरदेसाई, ३) बाजीराव पेशवे यांची छोटी बखर (कैफियत) : काव्येतिहास संग्रह, ४) पेशवे व +सातारकर राजे यांची टिपणे : काव्येतिहास संग्रह, ५) मेस्तक शकावली : काव्येतिहास संग्रह, +६) पुरंदरे दफ्तर भाग १ : कृ. वा. पुरंदरे, ७) साधन परिचय (महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास) : +आपटे, ओतुस्कर, ८) सातारा गादीचा इतिहास : विष्णु गोपाळ भिड़े, ९) वतनपत्रे - +निवाडपत्रे वगैरे : वाड, मावजी, पारसनीस, १०) सनदापत्रांतील माहिती : द. ब. पारसनीस, +११) मराठ्यांच्या इतिहासाची साधने (निवडक) : राजवाडे, १२) मराठ्यांचे साम्राज्य : रा. +वि. ओतूरकर, १३) पेशवेकालीन महाराष्ट्र : वा. कृ. भावे, १४) शाहू बखर : मल्हार रामराव +(सं : र. वि. हेरवाडकर), १५) ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र : पारसनीस, १६) मराठी +दफ्तर रूमाल १ : वि. ल. भावे, १७) ऐतिहासिक पोवाडे : १८) +कैफियत-यादी इ. : वाड, मावनी, पारसनीस, १९) पेशवे दफ्तरातील हिंदी कागद : भ. ग. +कुंटे, २०) पुरंदरे दफ्तर भाग ३ : कृ. वा. पुरंदरे, २१) मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा : वि. गो. +दिघे, २२) मराठी दफ्तर भाग २ : वि. ल. भावे, २३) मराठी व इंग्रज : न. चि. केळकर, २४) +पेशवे घराण्याचा इतिहास : प्रमोद ओक, २५) पुण्याचे पेशवे : अ. रा. कुलकर्णी, २६) +शिंदेशाही इतिहासाची साधने : आनंद फाळके, २७) मराठ्यांची बखर : डेव्हिड केपन, २८) +<<< + +पेशव्यांची बखर : कृष्णाजी विनायक सोहोनी, २९) HISTORY OF MARATHAS +VOLUMES : GRANT DUFF, ३०) HISTORY OF MARATHA PEOPLE : किंकेड- +पारसनीस, ३१) PESHWA BAJIRAO I : MARATHA EXPANSION : वि. गो. दिघे, +३२) पेशवेकालीन पुणे : पारसनीस, ३३) शनिवारवाडा : ग. ह. खरे, ३४) वसईची मोहीम : +य. न. केळकर, ३५) निजाम-पेशवे संबंध : शेजवलकर, ३६) पेशवेकालीन सामाजिक व +आर्थिक पत्रव्यवहार : भा.इ.से.मं., ३७) जंजिरेकर सिद्दीची हकीकत, ३८) साष्टीची ब��र, +३९) आंगरे यांची हकीकत, ४०) चौलची बखर + + चिमणाजी बल्लाळ + (चिमाजीआप्पा) यांचे हस्ताक्षर + + यांचे हस्ताक्षर +<<< + + रावेरखेडी येथे श्रीमंत बाजीरावसाहेब स्वर्गवासी झाले ही बातमी महिन्याच्या +सुरुवातीला चिमाजीआप्पा आणि नानासाहेबांना कुलाब्याला समजली. सर्व विधी +कुलाब्यातच आटोपून उभय चुलते-पुतणे पुण्याला परतले. चिमाजीआप्पांचा तर रामच गेला +होता. नाना जेमतेम एकोणीस वर्षांचे होते. तर लहानग्या रघुनाथ-जनार्दन, काशिबाई आणि +राधाबाई यांच्यावर काय ओढवले असेल याची कल्पना आप्पांना आली होती. ते ताबडतोब +पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्यात शनिवारवाड्यावर राऊंच्या मृत्यूची बातमी पोहोचली +होती. राधाबाई या करारी आणि धीरोदात्त असल्याने मुलाच्या मृत्यूचा धक्का त्यांनी धीराने +पचवला. पूर्वीच अप्पांनी मस्तानीला कैदेतून सोडून देण्याचे कळवले असल्याने तीला मुक्त +करण्यात आले. परंतु बाजीरावांच्या मृत्यूची बातमी समजताच मस्तानी शनिवारवाड्यातून +गेल्यावर लगेचच तिनेही आत्मार्पण केले. पुढच्या काळात पाबळ या तिच्या (तिला +बाजीरावांनी इनाम दिलेल्या) गावात मस्तानीची कबर बांधण्यात आली. इकडे पेशव्यांच्या +मृत्यूनंतर सुमारे एक महिन्यानंतर, दि. ३ जून १७४० रोजी काशिबाई जनार्दनपंत आणि +महादोबा पुरंदऱ्यांसह पुण्यात परतल्या. नानांनी मातोश्रींना धीर दिला. परंतु आता +फार काळ पुण्यात राहून चालणार नव्हते. कारण भट हे चित्पावन असल्याचा राग +काहीजणांच्या मनात होता. त्यामुळे सातारा दरबारातील प्रतिनिधी, वाकनीस, सुमंत, भोसले, +दाभाडे अशा हितशत्रूंनी काही हालचाली करायच्या आत सातारा गाठणे गरजेचे होते. +बाजीराव गेले, त्यामुळे आता नवा पेशवा कोण याच्या चर्चांना ऊत आला होता. नागपूरकर +भोसले आणि पेशवे यांचं उभं हाडवैर! त्यामुळे बाजीरावांच्या नंतर पेशवाई नानासाहेबांना न +मिळता सावकार बाबूजी नाईक जोशी बारामतीकरांना मिळावी अशी शिफारस रघुजी +भोसल्यांनी शाहूमहाराजांकडे केली. बारामतीकर जरी पेशव्यांचे मेव्हणे असले तरीही +त्यांच्या मनातही पेशव्यांच्याबद्दल राग होताच. याचे कारण म्हणजे, पूर्वी दहा वर्षांपूर्वी +बुंदेलखंडाच्या मोहिमेतील लुटीत बारामतीकरांना एक हत्ती आवडला, म्हणून त्या��नी तो ठेवून +घेतला. बाजीरावांना हे समजले. युद्धात मिळालेली वस्तू, मग तो सुतळीचा वा हत्ती +असो, तो प्रथम सरकारात दाखल करावा हा बाजीरावांचा शिरस्ता होता. परंतु सावकारांनी +हत्ती द्यायला नकार दिला. बाजीरावांनी संतापून सावकारांच्या वाड्यांवर चौकीपहारे बसवले. +शेवटी चिमाजीआप्पांनी मध्यस्ती करून हे प्रकरण कसेबसे निभावले. परंतु याचा राग +बाबुजी नाईकांनी अखेरपर्यंत मनात धरला होता. + नानासाहेब वयाच्या सुमारे चौदा-पंधरा वर्षांपासूनच आप्पांबरोबर सातारा दरबारात येऊ +लागले होते. त्यांचा मुक्काम बऱ्याच वेळेला साताऱ्यातच असे. त्यामुळे त्यांना राजकारणाचे +उत्तम ज्ञान होते. शिवाय बाजीरावांचे चिरंजीव म्हणजे त्यांच्याकडून बरंच काही शिकले +असणार, असा विचार करून शाहूमहाराजांनी दि. २५ जून १७४०, बुधवार, शु. +द्वादशी शके १६६२, रौद्र संवत्सरी सकाळी अदालत राजवाड्यात नानासाहेबांना पेशवे +पदाची वस्त्रे बहाल केली. यात एकूण, १ मंदिल १ जामा (अंगरखा), १ चादर +(शाल), १ पटका, १ (सुरवार), १ तलवार, १ कट्यार, शिक्का, १ मोत्याचा तुरा आणि +<<< + +अंबारीसह १ हत्ती असे जिन्नस होते. दरबारात नानासाहेबांबरोबर आप्पांचाही मोठा सत्कार +झाला. त्यावेळी 'चिमणाजी बल्लाळ पंडित' यांना १ मंदिल, १ जामा, १ शाल, १ पटका, १ +सुरवार आणि १ मोत्यांचा तुरा देण्यात आला. मध्यंतरी बाजीरावांच्या काळात अंबाजीपंत +पुरंदरे हे दौलतीचे निष्ठावंत सेवक वार्धक्याने मृत्यू पावले होते. त्यांचे पुत्र महादजीपंत पुरंदरे +यांनाही मानाची वस्त्रे बहाल करण्यात आली. शाहूमहाराजांनी नानासाहेबांना ३० गाव +मोकांसा म्हणून दिले. शिवाय विरूबाई राणीसाहेबांनी नानासाहेबांना ११० रु. किमतीची +वस्त्रे दिली. पेशवाईचा समारंभ झाल्यानंतर चिमाजीआप्पा, नानासाहेब आणि महादजीपंत +पुण्यात आले. पावसाळ्याच्या अखेरीस लगेचच नानांनी मोहिमेची आखणी केली होती. +कारण बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सर्वबाजूंनी शत्रूंनी उचल खाल्ली होती. त्यांचा +बंदोबस्त करणे गरजेचे होते. चिमाजीआप्पांनी साऱ्या हितशत्रूंना पत्र पाठवून दम भरला, की +"राव गेले. परंतु कुल फौज व रावांचा आशिर्वाद आमच्या व चिरंजीव नानांच्या पाठी +आहे." मोहिमेकरता (ही मोहीम बहुदा निजामावरची असावी) ऑक्टोबरच्या मध्यावर, +दसऱ्यानंतर बाहेर आप्पांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना परत पुण्यात +आणण्यात आले. नानासाहेब पुढे मोहिमेवर गेले असावेत. आप्पांची तब्येत दिवसेंदिवस +ढासळतच होती. वैद्यांच्या चालूच होत्या. परंतु, या सर्वांचा काहीही उपयोग न +होता पौष शुद्ध दशमी शके १६६२, रौद्र संवत्सरी म्हणजेच दि. १७ डिसेंबर १७४० रोजी +चिमाजीआप्पांचा मृत्यू झाला. पेशव्यांच्या घरातील आणखी एक करारी, महत्त्वाकांक्षी, परंतु +प्रेमळ रत्न कायमचे गेले. चिमाजीआप्पांच्या पहिल्या पत्नी सदाशिवपंतांच्या जन्मानंतर +लगेचच वारल्या होत्या. आप्पांच्या मृत्यूची बातमी समजल्यावर त्याच दिवशी दि. १७ डिसेंबर +रोजी आप्पांच्या दुसऱ्या पत्नी अन्नपूर्णाबाईही सती गेल्या. केवळ तीन महिन्यांपूर्वी आप्पा +आणि अन्नपूर्णाबाईंना कन्यारत्न प्राप्त झाले होते. या कन्येचे नाव होते बयाबाई. आई- +वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यानंतर काशिबाईसाहेब व गोपिकाबाईंनी त्यांना सांभाळले. +चिमाजीआप्पांच्या मृत्युमुळे राज्यकारभाराचा सारा भार आता नानासाहेबांवर पडला. गुरू +ब्रह्मेंद्रस्वामींना नानासाहेबांनी पत्र पाठवून त्यात लिहिले आहे, "तीर्थरूप आप्पास्वामींनी +कैलासवास केला. मोठा घातच जाहला. तीर्थरूप राऊस्वामी याणी कैलासवास केल्याला +आठ महिने न जाहले तो श्रीने हा प्रसंग घडविला ... " + बाजीराव पेशव्यांनी भोपाळच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यानंतर झालेल्या +तहानुसार बादशहाकडून माळव्याची रीतसर सनद पेशव्यांना मिळणार होती. परंतु नंतर +मस्तानीवरून घरात गोंधळ, नादिरशहाचे आक्रमण यामुळे बाजीरावांना तिकडे +लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. अशातच बाजीराव अकाली मृत्यू पावले. त्यामुळे +दिल्लीतल्या स्थिरतेसाठी त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे होते. सवाई जयसिंग हा मराठ्यांना +अनुकूल असल्यामुळे दि. ४ जुलै १७४१ या दिवशी सवाई जयसिंगाच्या परिश्रमांमुळे +माळव्याची सनद बादशहाकडून मिळाली. त्यामुळे आता सध्या तरी दिल्लीच्या आघाडीवर +स्वस्थता लाभेल अशी चिन्हं होती. नानासाहेबांचे धाकटे बंधू रघुनाथरावही आता +जवळजवळ आठ वर्षांचे झालेच होते. त्यामुळे नानासाहेबांनी रघुनाथरावांचे लग्न काढले. +<<< + +राधाबाई या अजूनही 'कर्त्या' असल्यामुळे बहुदा त्यांनी आपल्या 'बर्वे' घराण्यातील एक +मुलगी सुचवली ��सावी, असे वाटते. म्हणून मौजे जळगाव (मूळ शाखा डुबेरे?) येथील +गणेशपंत बर्वे सावकारांची कन्या जानकीबाई (माहेरचे नाव?) यांचा दि. २५ फेब्रुवारी सन + १७४२, फाल्गुन शुद्ध द्वितीया शके १६६३, दुर्मतीनाम संवत्सरी गुरुवारी नानासाहेबांचे धाकटे +बंधू रघुनाथराव यांच्याशी करण्यात आला. राधाबाईंची आणखी एक नातसून घरात आली. + परंतु, या आनंदापेक्षाही मोठा आनंद राधाबाईंना आणखी काही महिन्यांतच मिळणार होता. +दि. २२ श्रावण शुद्ध द्वितीया शके १६६४ दुंदुभीनाम संवत्सरी, गुरुवारी +गोपिकाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला. नानासाहेबांचा हा पहिलाच पुत्र. शनिवारवाडा + आनंदाच्या चांदण्यात न्हाऊन निघत होता. सर्वात जास्त आनंद झाला होता राधाबाईंना! + कारण, आपल्या नातवाला मुलगा म्हणजे आपल्याला पणतू झाल्याचा हा तो आनंद होता. + पुत्र दिसायला मोठा गोड होता. बारशाच्या वेळी नाव काय ठेवायचे असे विचारले असता, +राधाबाईंनी नाव सांगितले 'विश्वास'. राधाबाईंच्या मुलाची व नानासाहेबांच्या वडिलांची, +बाजीरावांची आठवण म्हणून मुलाचे नाव विश्वासराव (विश्वनाथ) ठेवण्यात आले. + पुत्रजन्मानंतर त्याचे कोडकौतुक करण्यासाठी नानासाहेब पुण्यातच थांबले. साधारणतः याच +सुमारास नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाई दक्षिणकाशी रामेश्वराच्या यात्रेसाठी निघाल्या. + रामेश्वरच्या मार्गावर निजामाचा धोका होता. त्यामुळे नानासाहेबांनी काशिबाईंच्या +मेण्याबरोबर सशस्त्र तुकडीही रवाना केली. याच वर्षी अखेरीस नाशिकजवळ कुंभमेळा + होता. याचे प्रयोजन साधून सदाशिवरावभाऊ, रघुनाथपंत आणि जनार्दनपंत हे गंगा +गोदावरीच्या स्नानासाठी दि. २० डिसेंबर १७४२ रोजी नाशिक-पंचवटी येथे आले. यावेळेस +नानासाहेब दिल्लीहून मिळालेल्या माळव्याच्या सुभ्याची व्यवस्था लावण्याकरता माळव्यात +गेले होते. व्यवस्था लावून झाल्यानंतर पुढे प्रयागला जाऊन गंगास्थान करून नानासाहेब + पुन्हा पुण्यात परतले. (एप्रिल १७४३). नानासाहेब माळव्याची व्यवस्था शाहूमहाराजांना + सांगण्याकरता साताऱ्यास जाऊन परत आल्यावर, दि. २८ १७४३ या दिवशी रामेश्वर +यात्रेला गेलेल्या मातोश्री काशीबाई पुण्यात परतल्या. काशिबाईंच्या पायाच्या दुखण्याने + यात्रेदरम्यान बरीच उचल खाल्ली होती. त्यामुळे काही काळ काशिबाईंबर���बर + शनिवारवाड्यात घालवून नानासाहेब बुंदेलखंड-भेलसा येथील कटकटींची तड लावण्यासाठी +मार्च सन १७४४ मध्ये पुन्हा बुंदेलखंडात गेले. छत्रसालांच्या मृत्यूनंतर बुंदेलखंडात मोंगलांनी +परत घुसण्याचे प्रयत्न चालवले होते. त्यामुळे छत्रसालपुत्र जगतराज आणि हिरदेसाह +यांच्यातली भांडणे सोडवून बुंदेलखंडात शांती प्रस्थापित करून मोंगलांना धाकात +ठेवण्यासाठी नानासाहेब बुंदेलखंडात गेले. यावेळी त्यांचे सावत्रबंधू. मस्तानीपुत्र + समशेरबहाद्दरही नानांच्या बरोबर असण्याची शक्यता आहे. मस्तानीच्या मृत्यूनंतर सहा +वर्षांच्या समशेरबहाद्दरला नानासाहेबांनी (व सर्वच पेशवे कुटुंबियांनी) आपुलकीने व प्रेमाने +जवळ घेतले. बाजीराव व मस्तानी यांच्याबाबतीतल्या समज-गैरसमजाचा अथवा नाराजीचा +सूर कोणाच्याही वागण्यात उमटला नाही. समशेरबहाद्दरला सावत्रपणाची वागणूक +कोणाकडूनही मिळाली नाही. विशेषतः स्वतः नानासाहेब पेशवे आणि सदाशिवरावभाऊ +<<< + + समशेरबहाद्दराकडे प्रेमाने जातीने लक्ष देत असत. बुंदेलखंडाच्या मोहिमेत समशेरबहाद्दर + आपल्या आजोळच्या माणसांना, आपल्या मामांना भेटले. छत्रसाल पुत्रांनीही आपल्या या + भाच्यांचे मोठे कौतुक केले. ऑक्टोबर १७४५ च्या सुमारास पुण्यात आल्यानंतर दिवाळी + पुण्यातच साजरी करून लगेचच १७४७ मध्ये नानासाहेबांनी कर्नाटकची मोहीम आखली. + निजामाने कर्नाटकात पुन्हा पाय रोवायला सुरुवात केली होती; परंतु सातारा + दरबारातील हितशत्रूंची राजकारणे टोकाला गेल्याने नानासाहेबांना परतावे लागले. + नानासाहेब पेशवे इकडे मोहिमांमध्ये गुंतले असताना सातारा दरबारातील पेशव्यांचे + प्रतिनिधी बाबूजी नाईक बारामतीकर, नागपूरचे रघूजी भोसले, श्रीपतराव प्रतिनिधी, + आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, यमाजी शिवदेव दाभाडे, गायकवाड इ. मंडळींनी + शाहूमहाराजांच्या कानाशी एकच कुजबूज सुरू केली आणि शाहूराजांचे नानासाहेबांविरोधात + कान फुंकले. म्हणून या कटकटीला वैतागून दि. ९ मार्च १७४७ रोजी 'शिक्के कट्यार व जरी + पटका हुजुरे पाठवून जामदारखान्यात दाखल करविले' आणि नानासाहेबांना पेशवेपदावरून + दूर केले. बाजीरावांच्या काळात दौलतीला झालेले प्रचंड कर्ज नानासाहेब फेडू शकणार + नाहीत ही शंका आसपासच्या मंडळींनी शाहूमहाराजां��्या मनात निर्माण केल्याने त्यांना ते + खरे वाटून नानासाहेबांना पदच्युत केले. आता नानासाहेब एकतर पुन्हा पेशवेपद + मिळवण्यासाठी झोळी पसरतील अथवा शाहूमहाराजांविरुद्ध बंड करतील असे दरबारातील + प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच होते. परंतु, नानासाहेबही राजकारणात मुरलेले होते. त्यांना विनातक्रार + पेशवेपद सोडून उलट, "सर्वस्वी अपराधी अपत्य आहे. पायाशी कोणती सेवा ते) + सांगणे, (परंतु) आज्ञा होऊन (या) पायांचा वियोग न व्हावा ... " अशी अर्जदास्त + नानासाहेबांनी शाहूमहाराजांकडे केली. शिवाय पेशवेपदाच्या (नानासाहेबांच्या!) + तोलामोलाचा एकही मनुष्य न दिसल्याने दि. १३ एप्रिल रोजी शाहूमहाराजांनी + नानासाहेबांनाच पुन्हा पेशवेपदाची वस्त्रे दिली. यानंतर नानासाहेब लगेच कोकणात पुन्हा + जम बसवू पाहणाऱ्या पोर्तुगीजांवर चालून गेले. + नानासाहेब मोहिमांवर असताना शनिवारवाड्यातही अनेक मंगलप्रसंग घडत होते. दि. + २० एप्रिल १७४४, वैशाख वद्य पंचमी शके १६६६ रक्ताक्षीनाम संवत्सर, शुक्रवारी + नानासाहेबांचे धाकटे बंधू जनार्दनपंत आणि सगुणाबाई (भिडे) यांचा विवाह करण्यात + आला. यानिमित्त ब्राह्मणभोजने अन् अन्नदान करण्यात आले. यानंतर काही महिन्यातच, + माघ वद्य एकादशी शके १६६६, रक्ताक्षीनाम संवत्सरी, शनिवारी म्हणजेच दि. १६ फेब्रुवारी + १७४५ रोजी कर्नाटकात सावनूर येथे गोपिकाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला. मुलाचे + बारसेही सावनुरातच होऊन त्याचे नाव 'माधव' असे नामकरण करण्यात आले आणि + बारशानंतर नानासाहेब गोपिकाबाई व माधवरावांना सावनुरातच ठेवून पुढच्या कर्नाटकच्या + मोहिमेवर निघून गेले. सावनुरच्या नवाबाने गोपिकाबाई व माधवरावांचे योग्य सांभाळ करून, + जडजवाहीर, वस्त्रे व दागिने देऊन सत्कार केला आणि मोठ्या इतमामाने पुण्यास रवाना + केले. माधवरावांचे पुण्यात आगमन झाले. राधाबाईंना हा दुसरा पणतू झाला. त्यांना धन्य +वाटले. काशिबाईही आनंदल्या. माधवरावांच्या जन्माच्या आनंदातून शनिवारवाडा बाहेर येतो +<<< + +न येतो तोच चिमाजीआप्पा आणि अन्नपूर्णाबाईंच्या कन्या बयाबाई यांचा विवाह ठरला. दि. + २४ एप्रिल सन १७४५ म्हणजेच वैशाख शुद्ध चतुर्थी शके १६६७, क्रोधननाम संवत्सर, + बुधवारी ओंकार घराण्यातील व्यक्तीशी झाला. यानंतर दि. १६ फेब्रुवारी १७४�� या दिवशी +पेशव्यांच्या मातोश्री काशीबाईसाहेब काशीयात्रा करण्यासाठी पुण्याहून निघाल्या. + नानासाहेबांनी काशिबाईंबरोबर सशस्त्र सैन्य तर दिले होतेच, परंतु आपले मामा, म्हणजेच + मातोश्री काशीबाईंचे बंधू कृष्णराव चासकर जोशी यांनाही जाण्याची विनंती गेली. आपल्या + लाडक्या भाच्याचा आग्रह न मोडता कृष्णरावही काशिबाईंबरोबर यात्रेला निघाले. या +लोकांच्या सुरक्षिततेसाठी नानासाहेब पेशव्यांनी उत्तरेत मल्हारराव होळकर आणि राणोजी + शिंद्यांचे पुत्र, जयाप्पा शिंदे यांना पत्र पाठवून हुशार राहण्यास कळवले होते. मे महिन्याच्या + अखेरीस वेरूळ, बुऱ्हाणपूर, सिरोंज असा प्रवास करत काशिबाई वाराणसीला पोहोचल्या. +दि. २२ नोव्हेंबर १७४६, मार्गशीर्ष वद्य पंचमी शके १६६८, क्षयनाम संवत्सरी शनिवारी + सदाशिवरावभाऊ व उमाबाईंना पुत्ररत्न झाले. यांचे नाव ठेवण्यात आले 'कृष्णराव'. परंतु +दुर्दैवाने कृष्णराव फार काळ जगू शकले नाहीत. १३ एप्रिल १७४७ रोजी पेशवेपदावर पुन्हा + आल्यानंतर नानासाहेब पोर्तुगीजांच्या मोहिमेवर गेले. परंतु, मोहीम आटोपून परत पुण्यात + येतात न येतात तोच एक दुःखद बातमी आली. पेशवे नानासाहेबांच्या आत्याबाई सौ. + भिऊबाई जोशी बारामतीकर मृत्यू पावल्या. राधाबाईंवर तर दुःखाचा पर्वतच कोसळला. +सहा-सात वर्षांपूर्वी मृत्यूने आपले दोन्ही कर्तबगार पुत्र आपल्यापासून हिरावून घेतले. आता +मुलीचाही मृत्यू बघणे नशीबात होते. भिऊबाई फार कर्मठ होत्या. आपल्या या मुलीला + अपत्य नाही म्हणून राधाबाई अखेरपर्यंत त्यांना सांभाळून घेत असत. बाजीराव पेशव्यांनी + शनिवारवाडा बांधला तेव्हा मूर्तझा पेठेचा विस्तार करून नव्हा पेठेचे (नंतरची शनिवार पेठ) + उत्पन्न आपल्या बहिणीला-भिऊबाईंना साडी-चोळीसाठी लावून दिले होते. नाईक जोशी +बारामतीकरांशी असलेले दरबारी वैर विसरून नानासाहेबांनी त्यांचे केले. + या सर्व घडामोडी घडत असताना, डिसेंबर सन १७४६ च्या अखेरीस पेशव्यांचे चुलतबंधू + सदाशिवरावभाऊ, महादजीपंत पुरंदरे यांच्यासह कर्नाटकात मोहिमा करत होते. +कर्नाटकातील लहान संस्थानिक पेशव्यांविरुद्ध हालचाली करत होते. यमाजी शिवदेव +दाभाडे, गायकवाड इ. मंडळींची त्यांना फूस होतीच. या देशमुख मंडळींविरुद्ध जानेवारी + १७४७ मध्ये कोल्हापूरच्या दक्षिणे���ा असलेल्या आजरा या गावालगत सदाशिवरावभाऊंचे +युद्ध झाले. भाऊंनी तलवारीची शर्थ करून ही मारली. माधवराव पेशव्यांच्या +जन्मानंतरच्या काळात सावनूरच्या नबाबानेही बंड मांडले. त्यामुळे भाऊसाहेबांनी +बहादूरभेंड्याचा किल्ला जिंकून थेट तुंगभद्रेच्या काठावर सावनूरपर्यंत धडक मारली. +सदाशिवरावभाऊ सैन्यासह सावनूरकडे येत आहेत पाहिल्यानंतर सावनूरचा नबाब +गडबडला. त्याने ताबडतोब भाऊसाहेबांशी तहाचे बोलणे लावले. स्वारीत महादजीपंत + पुरंदऱ्यांसारखा अनुभवी आणि प्रचंड मुत्सद्दी सहकारी असल्यामुळे भाऊंनी सावनूरकर + नबाबासमोर काही अटी ठेवल्या. नबाबाने साऱ्या अटी कबूल केल्या. या तहानुसार कित्तूर, +यादवाड, बागलकोट, नवलगुंद (नरगुंद?), हरिहर, बसवापट्टणम्, तोरगड़, हल्ल्याळ, गोकाक +<<< + +(गोकर्ण?) इ. ३६ परगणे पेशव्यांनी मराठी राज्यात सामावून घेतले. आपल्या पराक्रमी +चुलतबंधूंच्या पहिल्याच मोहिमेतील या प्रचंड यशामुळे नानासाहेब पेशव्यांना फार फार +आनंद झाला. + 'आपले खावंद' म्हणून नानासाहेबांना शाहूमहाराजांबद्दल खूप आदर वाटत असे. इ. स. +१७४९ च्या मध्यापासून शाहूमहाराजांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला. शाहूमहाराज +सत्तरीच्या आसपास पोहोचले होते. आपले आता फार काळ जगणे नाही म्हणून महाराजांनी +ऑगस्ट १७४९ मध्ये नानासाहेबांना साताऱ्यात बोलावून घेतले. दि. १ ऑक्टोबर १७४९ या +दिवशी शाहूमहाराजांनी गोविंद खंडेराव चिटणीस (खंडो बल्लाळ चिटणीसांचा पुत्र) यांना +बोलावून आपल्या माघारी राज्याच्या कारभाराची यादी म्हणजे एकप्रकारे एक मृत्युपत्रच +तयार करून घेतले. आजार बरा होईल असे वाटत नव्हते. यातच चिंतेची बाब म्हणजे +शाहूमहाराजांना मुलगा नव्हता. नानांनाच ते आपल्या मुलासारखा मानत असत. आपल्या +माघारी राज्य आणि प्रजा सांभाळू शकेल असा अन्य कोणीही सरदार वा विश्वासू व्यक्ती न +दिसल्याने शाहूमहाराजांनी नानासाहेबांपासून पुढे 'पेशवाई' ही भट घराण्याकडे कायम +वंशपरंपरागत करून दिली व साऱ्या कारभाराची सूत्रे पेशव्यांकडे सोपवली आणि अखेरची +निरवानिरव करून दि. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहूमहाराज साताऱ्यात मृत्यू पावले. योद्धा +शिवछत्रपती महाराजांपासूनचे भोसल्यांचे जनक राजपद संपले. आता साताऱ्याच्या गादीवर +भोसले कुळातीलच कोणालातरी दत्तक घ्य��वे लागणार होते. म्हणूनच कोल्हापूरकर, ताराबाई +आणि राजारामांचा नातू, शिवाजीपुत्र राजाराम (दुसरे) यांना नानासाहेबांनी दि. ४ जानेवारी +१७५० या दिवशी साताऱ्याच्या गादीवर अभिषेक केला. वास्तविक शाहूमहाराजांच्या +मृत्यूनंतर सातारा आणि कोल्हापूरची गादी एक करून, पुन्हा 'एकच' अखंड स्वराज्य +निर्माण करण्याची नानासाहेबांची इच्छा होती. त्याकरता या नव्या राज्याचा अधिकारी म्हणून +कोल्हापूरकर संभाजीराजालाच नेमण्याचा नानासाहेबांचा विचार होता. परंतु आपल्याला +गादीवर बसले तरी सारा कारभार मात्र पेशवे नानासाहेबच बघणार, मग आपण नाममात्रच +राहणार या चिंतेने संभाजीरावांनी नानासाहेबांच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला. त्यामुळे +संभाजीराजांशी जास्त वाद न घालता नानासाहेबांनी त्यांचे सावत्र पुतणे, राजाराम यांना +सातारा गादीवर बसवले. अभिषेकानंतर महादजीपंत पुरंदऱ्यांच्या मदतीने आणि मोरोबादादा +फडणिसांच्या सल्ल्याने नानासाहेबांनी दरबारातील सर्व सरदारांची पुनर्व्यवस्था लावून दिली +आणि आपली विश्वासू माणसे सातारा दरबारात ठेवून दि. २२ एप्रिल सन १७५० रोजी +नानासाहेब पुण्याला आले. + नेवाईच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर (१७४८ अखेर) लगेचच काही महिन्यात +नानासाहेबांना शाहूमहाराजांचे बोलावणे आल्यामुळे साताऱ्याला जावे लागले होते. या +दरम्यानच्या काळात शनिवारच्या वाड्यातही काही बऱ्या-वाईट घटना घडून गेल्या होत्या. +श्रावण वद्य द्वितीया शके १६७०, विभवनाम संवत्सरी, शनिवारी म्हणजेच दि. ३० जुलै +१७४८ या दिवशी सदाशिवरावभाऊ व उमाबाईंना मुलगा झाला. परंतु, हा मुलगा +बारशापर्यंतही जगू शकला नाही. याच वेळी गोपिकाबाईंनाही दिवस गेलेले होते आणि +<<< + +भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शके १६७०, विभवनाम संवत्सरी, शनिवारी म्हणजेच दि. १३ ऑगस्ट + १७४८ या दिवशी गोपिकाबाई बाळंत झाल्या. नानासाहेब यावेळेस मोहिमेवर असल्याने +बारशाच्या वेळेस मुलाचे नाव ठेवण्यात आले 'यशवंत'. नानासाहेबांचा हा पुत्र पुढे जेमतेम +तीन वर्षे जगला. यशवंतरावांच्या बारशानंतर लगेचच नानासाहेब मोहिमेवरून परतले असे +दिसते. सबंध पेशवे कुटुंब, विशेषतः गोपिकाबाई आणि नानासाहेबांची गणपतीवर विशेष +श्रद्धा होती. त्यामुळे मोहिमांतील मिळालेल्या यशाच्या आनंदाप्रीत्यर्थ नानासाहेबांनी '��ान' +करायचे ठरवले. 'तुलादान' हे सर्वात मोठे, 'महादान' आहे. दि. ३० ऑगस्ट १७४८ या +दिवशी अंगारकी चतुर्थी येत असल्याने तो मुहूर्त साधून नानासाहेबांनी थेऊरला 'सुवर्णतुला' +करण्यात आली. हे सुवर्णदान गरिबांना वाटण्यात आले. यानंतर चार-पाच महिन्यांतच, चैत्र +शुद्ध द्वितीया शके १६७१, शुक्लनाम संवत्सरात गुरुवारी म्हणजेच दि. ९ मार्च १७४९ या +दिवशी नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव यांची मुंज करण्यात आली. विश्वासरावांच्या मुंजीनंतर +लगेचच नानासाहेबांचे सावत्र बंधू, मस्तानी आणि बाजीरावपुत्र समशेरबहाद्दर यांचे लग्न पेठ +संस्थानचे संस्थानिक लक्षधीर दलपतराय पवार यांची मुलगी लालकुंवर हिच्याशी करण्यात +आले. (एप्रिल १७४९). नंतर ऑगस्ट महिन्यात शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून साताऱ्याला +जात असताना, सातारा मुक्कामी नानासाहेबांचे धाकटे बंधू जनार्दनपंत यांचा मृत्यू झाला. +यावेळी जनार्दनपंत चौदा वर्षांचे होते. कदाचित राज्यकारभाराचा व दरबार-दरखदारांचा + अनुभव यावा म्हणूनच नानासाहेब त्यांना साताऱ्याला नेत असावेत. जनार्दनपंतांची सारी +क्रियाकर्मे माहुली संगमावरच करून नानासाहेबांनी पुण्याला पत्र पाठवून मातोश्री काशीबाई + आणि जनार्दनपंतांच्या पत्नी सगुणाबाई यांचे केले. + शाहूमहारांच्या मृत्यूनंतर माघारी साताऱ्याची सारी व्यवस्था लावून नानासाहेब पुण्यात +परतल्यावर, फाल्गुन वद्य दशमी शके १६७१ शुक्ल संवत्सरी गुरुवारी म्हणजेच २२ मार्च +१७५० या दिवशी सदाशिवरावभाऊंच्या पत्नी उमाबाईंचा मृत्यू झाला. शास्त्राप्रमाणे पुन्हा +मंगलकार्य एक महिन्याच्या आत करावे लागत असल्याने वैशाख शुद्ध द्वितीया शके १६७२ +प्रमोदनाम संवत्सरी गुरुवारी म्हणजेच दि. २६ एप्रिल १७५० या दिवशी भाऊसाहेबांचा +पार्वतीबाईंशी (कोल्हटकर घराणे) विवाह लावून देण्यात आला. सदाशिवरावभाऊंच्या या +द्वितीय विवाहानंतर लगेच एका आठवड्याभरात दि. २ १७५० या दिवशी नानासाहेबांचे +ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा विवाह हरि बाळकृष्ण दीक्षित-पटवर्धन यांची कन्या +लक्ष्मीबाई (माहेरचे नाव दुर्गाबाई) यांच्याबरोबर लावून देण्यात आला. विश्वासरावांच्या +लग्नाकरिता खास साताऱ्याहून राजाराम महाराजही पुण्यात आले होते. + विश्वासरावांच्या लग्नानंतर बहुदा राधाबाईंच्या इच्छे���ातर नानासाहेबांनी श्रीवर्धनच्या +देशमुखी वाड्याकडे लक्ष दिले असावे, असे दिसते. मध्यंतरीच्या बऱ्याच वर्षांच्या काळात या +वाड्याकडे फारसं कोणी फिरकलंही नव्हतं. त्यामुळे नानासाहेबांनी वसई प्रांताचे पेशव्यांचे +सुभेदार शंकराजी केशव यांना वाड्याच्या डागडुजीसाठी (पत्रामध्ये नवीन वाडा +बांधण्यासंबंधी उल्लेख आहे) ४३ तुळ्या, ८६ खांब, ५०० कड्या व सागवानी वासे इ. १३२९ +चीजवस्तू आणि जिवाजी गणेश खासगीवाले यांना कसबी गुजराथी सुतार पुरवण्याबद्दल पत्र +<<< + +पाठवून हुकूम दिले होते. त्याप्रमाणे ६० हात लांब आणि ४० हात रुंद चौथऱ्यावर भक्कम +दुमजली वाडा उभारला गेला असावा आणि कदाचित वाड़ा बांधून झाल्यावर नानासाहेब +राधाबाईंना सोबत घेऊन श्रीवर्धनला जाऊन आले असावेत. (ऑ. ५०) श्रीवर्धनहून पुण्यात +शनिवारवाड्यात परतल्यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदा शके १६७२ प्रमोदनाम संवत्सरी +बुधवारी म्हणजेच दि. ५ सप्टेंबर १७५० रोजी गोपिकाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला. या +नव्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले 'मोरेश्वर'. परंतु दुर्दैवाने पुढे दि. २३ मार्च १७५१ म्हणजेच +सात महिन्यांतच मोरेश्वरचा मृत्यू झाला. इ. स. १७५१ या वर्षांत पेशव्यांच्या 'मोरेश्वर' आणि + 'यशवंत' या दोनही पुत्रांचा चार महिन्यांच्या अंतराने मृत्यू झाला. यामुळे साऱ्याच +शनिवारवाड्यावर दुःखाची छाया पसरली होती. याच काळात धर्मकार्य म्हणून दि. १५ जुलै + १७५१ रोजी पुण्यात राधाबाईंची रौप्यतुला करण्यात आली. (श्रावण शु. ४ सोमवार) + याच सुमारास आता उत्तरेत दिल्लीच्या राजकारणाने भलतेच वळण घेतले होते. दिल्ली +दरबारात आता इराणी, तुराणी, दख्खनी (आणि त्यातही शिया-सुन्नी), राजपुती, पठाणी, +बुंदेली असे अनेक तट पडले होते. दिल्ली दरबारात आता गटा-तटाचे राजकारण सुरू झाले. +यातच इराणी लोकांनी एका पीराच्या सल्ल्याच्या मते इस्लाम वाचवण्यासाठी काबूल कंदाहार +कडून अहमदशहा अब्दाली याला पाचारण केले. अब्दालीलाही हिंदुस्थानात येण्याची इच्छा +होतीच. इ. स. १७४८ पासून अब्दालीने हिंदुस्थानवर स्वाऱ्या करायला सुरुवात केली होती. +त्याची पहिली दोन आक्रमणे शाही फौजांनी परतावून लावली. परंतु अहमदशहा अब्दाली हा +एक महत्त्वाकांक्षी आणि उत्तम दर्जाचा सेनापती होता. त्याच्या या आक्रमणांना तोंड देताना + आपली हालत कशी होतेय हे बादशहाला दिसत होतं. उभ्या हिंदुस्थानात अब्दालीला तोंड +देऊ शकेल असा पेशव्यांव्यतिरिक्त कोणीही नसल्याने बादशहा महंमदशहा बादशहाने +पेशव्यांशी तह केला (१७५१ मध्यावर). या तहानुसार बादशहा व दिल्लीची सत्ता यांचे रक्षण +करण्याच्या बदल्यात मोंगलाईत मराठ्यांनी चौथाई व सरदेशमुखी वसूल करतील ही +पेशव्यांची अट बादशहाने कबूल केली. याआधी ऑगस्ट सन १७५० मध्ये नानासाहेबांनी +सांगोल्यावर स्वारी करून यमाजी शिवदेव दाभाड्यांचे बंड मोडले होते. आता दाभाड्यांचे +दिवाण व पेशव्यांचेच गुजराथेतील सरदार दमाजी गायकवाड बंड करू पाहात होते. +पेशव्यांनी ताबडतोब गुजराथेवर स्वारी केली. नानासाहेबांच्या हल्ल्यापुढे दमाजीचा टिकाव +लागला नाही. अशातच दि. ३० एप्रिल १७५१ ला पेशव्यांनी अचानक छापा घालून दमाजीला +कैद केले. गुजरात प्रांत बाजीराव पेशव्यांनी पिलाजी दिला होता. पण याच +गुजरातच्या जोरावर दमाजी उड्या मारू लागले. म्हणूनच अर्धा गुजरात प्रांत पेशव्यांच्या +हवाली करण्याच्या अटीवर दि. १६ १७५२ रोजी नानासाहेबांनी दमाजीला सोडून दिले. +दमाजीच्या या मोहिमेवरून नानासाहेब थेट निजामाच्या मोहिमेवर निघाले. निजामाचा वजीर +गाझीउद्दीनखान हा मराठ्यांना अनुकूल होता. पेशव्यांनी निजामाचा भालकी येथे पराभव +केला. यात झालेल्या तहानुसार तापी ते गोदावरी नदीदरम्यानच्या दोआंबातला प्रदेश +मराठ्यांना मिळाला. + भालकीच्या तहानंतर सुमारे महिनाभर पुण्यात थांबून पेशवे नानासाहेब कर्नाटकच्या +<<< + +मोहिमेवर निघाले. यात पूर्वी ठरलेल्या रायचूर-श्रीरंगपट्टणम् अशा ३२ प्रांतांतून खंडण्या +गोळा करून इ. स. १७५३ च्या जून महिन्यात नानासाहेब पुण्यात परतले. + याच सुमारास नानासाहेबांनी शनिवारवाड्याची डागडुजी करून काही नवीन इमारतींचे +बांधकाम व पुण्याचा विस्तार करण्याच्या योजना आखल्या. शनिवारवाड्याचे बांधकाम +करताना वाड्याला भक्कम तटबंदी व उत्तरेला महादरवाजा असावे, अशी बाजीरावांची इच्छा +होती. परंतु काही लोकांनी 'बाजीराव बंड करण्यासाठीच कोट बांधून रहावयास पाहत +आहेत' अशा कागाळ्या शाहूंकडे केल्या. शाहूमहाराजांना हे पटले नसले तरी उत्तरेकडे तोंड +करून महाद्वार बांधल्यास आणि भक्कम तटबंदी बांधल्यास दिल्ली दरबाराचा अपमान +होईल, अशी शंका येऊन शाहूमहाराजांनी त्यावेळी तट-बुरूज आणि महादरवाजा बांधायची +परवानगी नाकारली होती. परंतु, आता शाहूमहाराज हयात नव्हते. त्यामुळे नानासाहेबांनी +वाड्याला औरसचौरस भक्कम तटबंदी उभारण्याची आज्ञा दिली. तटात एकूण सात बुरूज +बांधण्याची योजना होती. याप्रमाणे तटातले सात आणि उत्तरेच्या मुख्य महाद्वाराभवतीचे दोन +असे एकूण नऊ बुरूज बांधण्यात आले. उत्तरेच्या दरवाज्याला नाव देण्यात आले 'दिल्ली +दरवाजा'. चार पुरुष उंचीच्या या दरवाज्यावर हत्ती आणूनही दरवाजा येऊ नये +म्हणून अणकुचीदार खिळे लावण्यात आले होते. या दिल्ली दरवाज्यावर सुबक नक्षीकाम +केलेल्या सुरूदार खांबांनी सुशोभित केलेला 'नगारखाना' बांधण्यात आला. दरवाज्याच्या +आत दोन्ही बाजूंना देवड्या व त्यावर विष्णु, गजानन अशा देवदेवतांची चित्रं चितारण्यात +आली होती. दरवाज्यातून जाणारा मार्ग हा शिवकालीन दरवाज्यांप्रमाणेच गोमुखी अथवा +नागमोडी होता. दिल्ली दरवाज्याच्या डाव्या बाजूला तटाच्या कोपऱ्यात आणखी एक +दरवाजा होता. याला म्हणत 'मस्तानी दरवाजा'. (वास्तविक मस्तानी १७४० मध्ये मृत्यू +पावली आणि नंतर समशेरबहाद्दरला घरातल्यासारखीच वागणूक मिळत असल्याने पुढे +नानासाहेबांनी हा दरवाजा बुजवून का टाकला नाही हे कळत नाही) या दोन दरवाज्यांशिवाय +वाड्याला एकूण तीन दरवाजे होते. वाड्याच्या पूर्वेकडील तटात काहीसा दक्षिणांगास +'गणेश' दरवाजा होता. दिल्ली दरवाज्याइतकाच हा दरवाजाही अतिशय महत्त्वाचा होता. +पुढे नानासाहेबांनी 'गणपती रंगमहाल' बांधल्यानंतर तेथे जाण्याचा हा एकच मार्ग असल्याने +या दरवाज्यावर अत्यंत कडक पहारे असत. या वाड्यातून पेशव्यांच्या घरच्यांनाही परवानगी +दस्तकांशिवाय जाता येत नसे. या दरवाज्याच्या प्रवेशद्वारावरच, एक गणपतीचे मंदिर होते +(आजही आहे). याच तटार उत्तरेच्या बाजूलाही एक दरवाजा होता, याला म्हणतात +दरवाजा'. तसेच वाड्याच्या दक्षिण तटात, नैऋत्येस एक दरवाजा होता. याचे नाव होते +'जांभूळ दरवाजा'. बहुदा या दरवाज्याजवळ जांभळाचे झाड असल्याने 'जांभूळ दरवाजा' +व दरवाज्याजवळ कवठाचे झाड असल्याने त्याला 'कवठी दरवाजा' म्हणत असत. + दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यावर दोन लहान चौक होते. हे चौक व पुढची देवडी +ओलांडून गेल्यावर पुढच्या जागेत एक विस्तीर्ण चौक व त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला +भक्कम इमारती बांधण्यात आल्या. डावीकडे होती दफ्तर कचेरी व उजवीकडे होता +पेशव्यांचा जवाहिरखाना. या चौकाला म्हणत चौक'. याशिवाय अनेक चौक व +<<< + +महाल बांधण्यासाठी नानासाहेबांनी सूचना केल्या. सर्व महालात विशेष होता तो 'गणपती +रंगमहाल'. या महालात पेशव्यांचा खास दरबार भरत असे. महालाच्या एका भिंतीच्या +कोनाड्यात श्री गजाननाची सुंदर नक्षीदार मखरात विराजमान झालेली अतिशय सुंदर अन् +भव्य अशी संगमरवरी मूर्ती होती. आजूबाजूच्या भिंतींवर पुष्कळ पौराणिक चित्रे, रामायण- +महाभारतातील प्रसंग चितारण्यात आले होते. या इमारतीच्या एका टोकाला हौद होता आणि +त्यात कारंजी तयार केली होती, असा हा भव्य दिव्य गणपती रंगमहाल चार वर्षांत (१७५५) +मध्ये बांधून पूर्ण झाला. चिमणबागेच्या दक्षिणेला नानासाहेबांचा दिवाणखाना होता. त्याचीही +डागडुजी करण्यात आली. याशिवाय शनिवारवाड्यात पश्चिमेला तटाला लागूनच घोड्यांसाठी +लांबलचक पागा आणि हत्तींसाठी गजशाला उभारण्यात आली. अशा खास पेशवाई थाटाच्या +नव्या शनिवारवाड्याचे बांधकाम जोरात सुरू झाले. + शनिवारवाड्याच्या बांधकामाबरोबरच नानासाहेबांनी पुण्याच्या विस्ताराकडे आणि +प्रगतीकडेही लक्ष पुरवले. पुणे तसे खूपच जुने, 'राष्ट्रकुटांच्या' काळचे, किंबहुना त्याही +पूर्वीचे. इ. स. ७५८ च्या एका शिलालेखात या शहराचा उल्लेख 'पुण्य विषय' या नावाने +आला आहे. अर्थात हे 'शहर पुण्यविषय' म्हणजे भोसरी आणि कळस या +चार खेड्यांचं मिळून होतं! नंतर शंभर वर्षांनी पुण्यविषयचे 'पुनकविषय' झाले. मग +पुनकविषयचे 'पुनवडी' आणि पुनवडीचे 'पुणे' !! या पुण्याच्या नैऋत्य दिशेकडून मुठा नदी +आणि वायव्येकडून येणारी मुळा नदी यांचा पुण्यानजीकच संगम होत होता. शिवकाळात या +पुण्याला म्हणत 'कसबे पुणे'. या कसबे पुण्यात पूर्वीपासूनच ढेरे, कानडे, ठकार, वैद्य, +निलंगे, कवलंगे, शालीग्राम आणि भाराईत या आठ शास्त्री पंडितांची 'आठघरे' होती. +त्याशिवाय पुण्यात शितोळे देशमुख, झांबरे पाटील, होनप देशपांडे आणि राजऋषी +कुलकर्ण्यांचीही घरे अथवा होते. अनेक सुंदर अस्सल हेमाडपंती मंदिरे होती. कदाचित +एवढी सुंदर जागा पाहून हेमाद्रीपंतांनाही मंदिरं बांधायचा मोह आवरला नसावा. पण अशा +या पुण्याची आदिलशाही सरदार रावराया याने पुरती वाट लावली. पुण्यातली देवळे मोडली. +वाड्यांना खणत्या लागल्या. इतकंच नव्हे तर अब्रुवरही ... पुण्याची लोक हाती जे मिळेल ते +घेत बाहेर पळाली. (१६३०). पुढे सहा वर्षांनी शहाजीराजांच्या राणीसाहेब- +आणि शिवाजीराजे पुण्यात आले. त्यांच्याबरोबर वृद्ध कारभारी दादोजी कोंडदेवही होते. +पुण्याची ही भकास अवस्था पाहवली नाही. त्यांनी दादोजी कोंडदेवांना पुण्याची +पुनर्उभारणी करण्यास सांगितले. दादोजी कोंडदेवांनी पुण्याचा विकास सुरू केला. +कात्रजच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आंबिल ओढ्याला पर्वतीच्या उत्तरेला बांध घातला. +कोंढव्याजवळ धरण बांधले. पुण्यातच विनायकभट ठकार यांच्या मालकीचे पूर्वी एक मंदिर +होते. रावरायाच्या काळात ते उद्ध्वस्त झाले. जिजाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे पूर्वीप्रमाणे +मंदिर उभारण्यात आले. हाच तो पुण्याचा 'कसबा गणपती'. कसब्याच्या गणपतीला लागूनच +प्रचंड 'लाल महाल' उभारण्यात आला. यावेळेस पुण्यात लाल महालाच्या पश्चिमेस एक +'मूर्तजा पेठ' (पुढच्या काळातली शनिवार पेठ) होती. मोंगलांच्या काळात पुढे मलकापूर पेठ +(रविवार पेठ), शहापुरा पेठ (सोमवार पेठ) तसेच शास्तापुरा पेठ (मंगळवार पेठ) आणि +<<< + +मोहियाबाद पेठ (बुधवार पेठ) या पेठा अस्तित्वात आल्या. + परंतु पुण्याच्या विकासाचा उल्लेखनीय वाटा उचलला गेला तो पेशवाईत! पेठ +वसवल्यानंतर पेठेचा मुख्य असे त्याला 'शेटे' म्हणत आणि या 'शेटे' च्या मदतीला असणाऱ्या +अधिकाऱ्यास 'महाजन' म्हणत. जसे देशमुख-देशपांडे तसेच शेटे-महाजन होते. नानासाहेब +पेशव्यांच्या काळात खाशा कसबा पेठेत केवळ ९०० च्या आसपास घरे होती आणि +लोकसंख्या होती जेमतेम साडेपाच हजार. यातच इ. जुन्या सरदारांचीही वाडेवजा +घरे होती. पुण्याचा विकास-मुख्यतः सुरू झाला तो थोरल्या बाजीरावसाहेबांच्या काळात. +बाजीरावांनी लालमहालाच्या पश्चिमेस असलेल्या मोकळ्या जागेत शनिवारवाडा बांधला +आणि आसपासच्या मूर्तझा पेठेचा विस्तार केला. नानासाहेबांच्या काळात या मूर्तझा उर्फ +शनिवारपेठेत ३७० घरे आणि सव्वादोन हजार लोकवस्ती होती. शनिवारपेठेत बहुतांश +ब्राह्मणांचीच घरे होती. + बाजीराव पेशव्यांनी पुण्यात वास्तव्य करण्याचे ठरवल्यानंतर त्यांच्या सैन्यासाठी +कायमच्या वसाहती निर्माण करण्याची गरज भासू लागली. शनिवारवाड्याच्या +उभारणीबर���बरच चिमाजीआप्पांनी एक नवीन पेठ वसवण्यास सुरुवात केली. आपल्या प्रिय +बंधूंच्या, बाजीरावांच्या नावावरून या पेठेचे नाव 'पेठ विसापूर' ठेवण्यात आले. हीच ती +लष्करी छावणीसाठी प्रसिद्ध पावलेली 'शुक्रवार पेठ'. नानासाहेब पेशव्यांनी या पेठेचे +शेटेपण सोमशेट आणि हरशेट यांना दिले असल्याचे उल्लेख आहेत. याकरता त्या दोघांना +१००१ रु. कर भरावा लागत असे. शुक्रवार पेठेत पेशव्यांचा तोफखाना आणि शहर +कोतवालाचे ठाणे होते. तोफखाना हा सरदार पानशांच्या अखत्यारित होता. त्यामुळे सरदार +पानसे यांचा वाडाही येथेच बांधण्यात आला. + पुण्याच्या वेताळ मंदिराच्या आसपास पूर्वी काही घरे होती. या भागाला 'वेताळ पेठ' +असेही म्हणत असत. इथे 'पेठ' म्हणण्याइतकी वस्ती निश्चितच नव्हती. परंतु १७५१-५२ च्या +सुमारास नानासाहेब पेशव्यांनी गंगाराम खत्री आणि दयाराम खत्री यांना या पेठेचे शेटेपण +देऊन पेठेचे नवीन नामकरण केले 'गुरुवार पेठ'. नानासाहेबांनी जिवाजी गणेश खासगीवाले +यांना पेठेच्या विकासाकरता नेमले होते. नानासाहेबांच्या काळात या गुरुवार पेठेत ७०० घरे +आणि जवळपास सव्वाचार हजार लोकसंख्या होती. + मोंगलांच्या काळात पुण्यात 'मोहियाबाद' नावाची पेठ होती. नानासाहेब पेशव्यांनी इथे +नवीन पेठ वसवण्याची आज्ञा केली. या सुमारास या पेठेत ४०० च्या आसपास घरे होती. ही +पेठ प्रामुख्याने व्यावसायिकांची होती. कारण येथील लोकवस्तीत माळी, रंगारी, भुसारी, +कासार, गवळी, गुजर, दारूवाले (तोफखान्याची), तांबट इ. विविध जाती-जमातींचा भरणा +असल्याचे उल्लेख आहेत. याच पेठेत नारो आप्पाजी खिरे यांची प्रसिद्ध तुळशीबाग आणि +कसबा गणपतीनंतरचे पुण्यातले मानाचे दैवत असलेली जोगेश्वरी होती. मोरोबादादा +फडणीस, चिपळूणकर सावकार, नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांचे याच 'बुधवार +पेठे'त होते. नानासाहेबांनी बुधवार पेठेचे शेटेपण रामाजी आणि बाळाजी पोतदार (मूळ +आडनाव भिडे) यांच्याकडे सालीना २५०० रु.च्या करारावर दिले. नारो आप्पाजी खिरे तथा +<<< + +तुळशीबागवाले यांना पेशव्यांनी पुणे प्रांताचे सरसुभेदार नेमले होते. नारो आप्पाजी हे प्रचंड +ईश्वरभक्त होते. त्यांनी आपल्या तुळशीबागेजवळ रामचंद्र, गजानन, व्यंकटेश, आदिशक्ती, + शिवशंकर, विष्णू आणि विठ्ठलाची सात मंदिरे बांधली होती. (अर्थात ही मंदिरे बांधून पूर्ण + झाली तेव्हा स्वतः नारो आप्पाजी आणि नानासाहेबही हयात नव्हते- सन १७९१) + या मुख्य पेठांशिवाय नानासाहेब पेशव्यांनी गोपाळगंज पेठ, गणेश पेठ, नागेश पेठ इ. +पेठांची पायाभरणी केली होती. त्यातल्या त्यात गोपाळगंज पेठ ही लवकर पूर्ण झाली. गणेश + पेठही लवकर झाली असावी, असे वाटते. + आता पुण्याचा विस्तार करायचा तर नानासाहेबांसमोर मोठा प्रश्न होता पुण्याच्या + पाणीपुरवठ्याचा. पुण्याच्या जवळून जरी मुळा आणि मुठा या नद्या भरून वाहात असल्या + तरी या खळाळत्या नद्यांचे पाणी खूप होते. ते पिण्यायोग्य नसल्याने नानासाहेबांनी +नवीन योजना आखल्या. पूर्वी बाजीराव पेशव्यांनी कात्रजच्या जवळच असलेल्या तळ्यातून +पुण्याला पाणी आणण्याची योजना आखली होती. परंतु, लढायांच्या धावपळीत ही योजना +कागदावरच राहिली. नानासाहेबांनी तिकडे विशेष लक्ष पुरवले. सुमारे दोन लाख रुपये खर्चून + तेथे अजून विस्तृत बांधकाम केलेले तळे खोदण्यात आले. विटांमध्ये खाचा करून + कात्रजच्या या तळ्यातून नळांद्वारे पाणी पुण्यातल्या बुधवार हौद, तुळशीबाग हौद, +काळा हौद (शुक्रवार पेठ), गणेश पेठेतील हौद, बदामी हौद (शुक्रवार पेठ), + शनिवारवाड्यातले हौद, पर्वतीचा हौद अशा हौदांमध्ये आणण्यात आले. नानासाहेब + पेशव्यांचे सासरे सरदार भिकाजी नाईक रास्ते यांनी धरणातून नळाद्वारे पाणी + आणून आपल्या वाड्यांमधल्या तीन हौदांत सोडले. परंतु हे हौद रास्ते यांच्या खासगीचे होते. +यापूर्वी १७४५ च्या सुमारास नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या उत्तरेला एक तळे खोदण्यास + सुरुवात केली होती. परंतु त्याचे काम खूपच हळूहळू चालले होते. शेवटी नानासाहेबांनी +स्वतः जातीने लक्ष देऊन या तळ्याचे बांधकाम पूर्ण केले. या तळ्याच्या मध्यभागी एक +केली. टेकडीवजा उंटवाटा होता. येथे 'एक सुंदर श्रींची मूर्ती' वसवण्याची आज्ञा नानासाहेबांनी + + नानासाहेबांनी पुण्याच्या विकासासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे लोकांना + दिलेल्या निरनिराळ्या सवलती. या नव्या पुण्यात भिस्ती, सुतार, लोहार, खलाशी, चांभार, +कासार, माळी, कुणबी, बारदार, कामाठी, परदेशी लोकं, गवळी, कलावंत, गुरव अशा एकूण + ६३० कुटुंबांना (घरांना) 'घरपट्टी' माफ केली होती. या 'घरपट्टी माफ' असणाऱ्यांच्या यादीत + ब्राह्मणांची आणि मराठे लोकांची नोंद न���ही हे लक्षात घेण्यासारखे होते. पुणे शहरात प्रवेश +करण्यासाठी वेशीजवळ जकात नाकेही होते. नाका विठ्ठलवाडी, नाका कात्रज, गणेशखिंड, +संगमनाका ही पुण्याची जकात वसुलीची काही ठिकाणं होती. या प्रवेशद्वारांतून जाणाऱ्या +मुख्य सड़का तेवढ्या फरसबंदी असत. नानासाहेबांनी पुण्याच्या सुरक्षिततेचेही उपाय केले. +रात्रीच्या वेळेस, सामान्यतः सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत शहर कोतवाल आणि त्याचे +पहारेकरी पुण्यात आणि वेशीबाहेर पहारा देत. रात्री ११ वाजता गारपिरावरून तोफ + असे. त्यानंतर जर बाहेर झाले तर खास सरकारी परवाना असल्याशिवाय जाता येत +<<< + +नसे. शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर राजारामांना गादीवर बसवताना नानासाहेब पेशव्यांनी +त्यांच्याकडून अधिकृतपणे राज्याची अधिकारपत्र घेतली होती. त्यामुळे आता पुण्याच्या +विकासाबरोबरच पुण्याला नव्या राजधानीचे स्वरूपही प्राप्त होऊ लागले. निरोगी हवा, +रूचकर अन्न, पाचक पाणी, सुगंधी फुले, स्वादिष्ट फळे यांच्या समवायांत राजकीय ऐश्वर्य, +कौटुंबिक स्वास्थ्य व राष्ट्रीय उमेद या पुण्यनगरीत एकवटू लागल्या होत्या. या काळात पुण्यात +अनेक जातीची माणसे राहात होती. तरी स्वतः पेशवे ब्राह्मण असल्याने ब्राह्मणांना विशेष +महत्त्व प्राप्त झाल्यासारखें होते. यावेळी पुण्यात तैलंगी, गौड-सारस्वत, चित्पावन, देशस्थ, +वैष्णव, गुजराथी, शेणवी (सारस्वत), परमहंस, किरवंत, हिंदुस्थानी, कनोजी, +अग्निहोत्री, दैवज्ञ, देवरुखे असे अनेक ब्राह्मण जमा झाले होते. त्यातही चित्पावन ब्राह्मण हे +सर्वाधिक होते. ब्राह्मण सरदार, सावकार व उच्चपदाधिकारी वगळले तर पुण्यातील इतर +ब्राह्मणांच्या उत्पन्नाचे साधन होते पौरोहित्य आणि दक्षिणा. पेशव्यांच्या दक्षिणेसाठी अखिल +हिंदुस्थानातून अनेक पुराणिक, भट-भिक्षुकांची प्रचंड गर्दी पुण्यात जमत असे, असे दिसते. + विद्वान शास्त्रीपंडितांना आणि ब्राह्मणांना त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेऊन त्यांना वर्षासने +व बक्षिसपात्र दक्षिणा देण्याची पद्धत वास्तविक शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांनी सुरू +केली. परंतु नंतर औरंगजेबाचे आक्रमण आणि अंदाधुंदीचा काळ यात ही प्रथा बंद पडली. +तळेगाव परिसर हा भोसले घराण्याकडे खासगीत असल्याने येथे दक्षिणा वाटली जात असे. +कालांतराने हा भाग सरदार द���भाडे यांच्या मुलुखात गेला. त्यामुळे १७१८ च्या सुमारास +शाहूमहाराजांनी दक्षिणा वाटण्याचे पुन्हा सुरू करून त्याची व्यवस्था दाभाड्यांकडे +सोपवली. दाभाडे हा देकार व श्रावणमासातली दक्षिणा बरीच वर्षे देत होते. परंतु पेशव्यांशी +वितुष्ट आल्यामुळे दाभाड्यांनी ब्राह्मणांना देकार देण्याचे बंद केले. पुढे दाभाड्यांच्या +मृत्यूनंतर १७३१ साली थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ही प्रथा पुन्हा सुरू करून देकार पुण्यात +देण्यास सुरुवात केली. श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या काळात पुणे लहानच असल्याने +श्रावणमासातील देकार हे हुजूरपागेतच दिले जात. परंतु, नानासाहेबांच्या काळात पुण्याची +व्याप्ती वाढली म्हणून नानासाहेबांनी 'पार्वती' च्या दक्षिणेला चारही बाजूंनी बंदिस्त अशी +खास दक्षिणा वाटण्यासाठी इमारत निर्माण केली. याला म्हणत 'पर्वती रमणा'. या बंदिस्त +इमारतीला चार दरवाजे असत. रमण्याच्या आत रुपये अर्थात दक्षिणेची रक्कम साठवलेली +असे. या रमण्याच्या चारही दरवाज्यांवर खास सरकारी माणसे बसत व ही दक्षिणा वाटत +असत. दक्षिणेत रुपये, सोने-चांदीच्या मुद्रा, मोहरा, पैसे, पुतळ्या, कवड्या इ. गोष्टी एकत्रित +असल्याने याला म्हणत. पर्वती रमण्याच्या आवारातच एक गणेश मंदिर बांधण्यात +आले होते. याला म्हणत 'रमणा गणपती'. पावसामुळे ब्राह्मणांचे हाल होऊ नयेत म्हणून +धर्मशाळाही बांधण्यात आल्या. नानासाहेब पेशव्यांच्या काळात श्रावण दक्षिणेची रक्कम दीड +लाख रुपयांपासून अठरा लाख रुपयांवर पोहोचली होती. जे ब्राह्मण खूप विद्वान असत +त्यांचा खुद्द पेशव्यांच्या हस्ते सत्कार केला जाई. श्रावण शु. षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीपासून या +देकाराला सुरुवात होत असे, ती तीन-चार दिवसांनी संपत असे. + बाजीराव पेशव्यांच्या पत्नी आणि नानासाहेब पेशव्यांच्या मातोश्री काशीबाई यांना +<<< + +पायाचे दुखणे होते. म्हणून काशिबाईंनी पर्वतीवरच्या भवानी देवीला नवस केला होता. +कालांतराने काशीबाईंचा पाय पूर्णपणे बरा झाला. आपल्या मातोश्री काशीबाईंची +हरण केली म्हणून नानासाहेब पेशव्यांनी भवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. +त्याचप्रमाणे देवदेवेश्वराची स्थापना करून पुण्यशील राजा शाहू छत्रपतींच्या पादुका +नित्यपूजेस ठेवल्या. देवदेवेश्वराच्या भवताली श्री दे���ी, गजानन, सूर्य आणि विष्णू यांची +लहान मंदिरे बांधून एक 'पंचायतन' निर्माण करण्यात आले. या सर्व धार्मिक वातावरणात +आपल्यालाही निवासाची एक सोय असावी म्हणून नानासाहेबांनी देवदेवेश्वराच्या जवळच +वाडा बांधला. वास्तविक हा वाड़ा बांधायला १७४७ सालीच सुरुवात करण्यात आली होती. +नानासाहेबांनी या संपूर्ण मंदिर पंचायतनास १०८० तोळे सोन्याचे कळस चढवले. आता पुणे +शहर या पर्वतीवरच्या झळाळत्या सुवर्णकळसांमुळे लंकेसारखेच भासू लागले होते. पुढच्या +काळात प्रसिद्ध शाहीर रामजोशी यांनी या पुण्याच्या श्रीमंतीवर रचला. या +पोवाड्यात रामजोशी म्हणतात, "वसविले त्यांनी (नानासाहेबांनी) पुणे शहर टुमदारीचे । +जागोजाग बांधले दाट नळ पाण्याचे । ठायी ठायी शोभती हौद एक फरग्याचे । धनी कृपावंत +प्रभू कल्याण करी । लंकाच पुणीयामध्ये लेश ना दारिद्रयाचे । शहरात घरोघर +सावकार गबर घरचे ।।" एकूणच नानासाहेबांनी आपल्या राहत्या शनिवारवाड्याच्या +कायापालटाबरोबरच, 'कसबे पुण्या' चे 'शहर पुणे' केले होते ... + पुण्याच्या विकासाबरोबर नानासाहेबांचे घराकडेही लक्ष होतेच. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी +शके १६७५, श्रीमुखनाम संवत्सरी रविवारी म्हणजेच दि. ९ डिसेंबर १७५३ या दिवशी +नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांचा रमाबाई (जोशी) यांच्याशी मोठ्या थाटात विवाह +करण्यात आला. माधवरावांच्या विवाहानंतर नानासाहेब पेशवे मोहीमेवर निघाले. दि. २ +जानेवारी १७५४ रोजी पुण्यातून प्रस्थान ठेवल्यानंतर थेट बागलकोट हरिहर गाठून तेथून +राहिलेल्या खंडण्या वसूल करून नानासाहेब दि. ४ जून १७५४ या दिवशी पुण्यात परत +आले. याच महिन्यात, २६ जूनला नानासाहेब पेशव्यांची ओंकारेश्वराजवळ सुवर्णतुला +करण्यात आली. यावेळी नानासाहेबांचे वजन १७८ पौंड भरले. ही सारी सुवर्णसंपत्ती रयतेला +वाटण्यात आली. + यानंतर नानासाहेब पेशव्यांनी ऑक्टोबर १७५४ ते एप्रिल १७५५ च्या दरम्यान बेदनूरवर +स्वारी केली. दि. १२ एप्रिल रोजी पेशवे पुण्यात आले. चार महिने गेले आणि श्रावण शुद्ध +चतुर्थी शके १६७७, युवनाम संवत्सरी सोमवारी म्हणजेच दि. ११ ऑगस्ट १७५५ रोजी +गोपिकाबाईंना पुत्ररत्न झाले. पुत्रजन्मानंतर लगेचच दोन दिवसांनी चंपाषष्ठीपासून +श्रावणातले देकार सुरू होत असल्याने पुत्राच्या आगमनाप्रीत्यर्थ न���नासाहेबांनी प्रत्येकाला +एक-एक रुपया जास्त देण्यास सांगितले. बारशाच्या वेळी मुलाचे नाव ठेवण्यात आले +'नारायण'. नारायणरावांच्या जन्मानंतर पाचच दिवसांनी श्रावण शुद्ध नवमीला म्हणजेच १६ +ऑगस्ट १७५५ रोजी शनिवारी नानासाहेबांचे बंधू रघुनाथराव आणि जानकीबाई यांना पुत्र +झाला. पण दुःखाची गोष्ट अशी की, पुत्राचा जन्म सकाळी झाला आणि संध्याकाळी पुत्र +वारला. पुत्रजन्माच्या वेळी बाळंतरोगाने असेल वा पुत्राच्या मृत्यूच्या धक्क्याने दि. २२ +<<< + +ऑगस्ट रोजी रघुनाथरावांची पत्नी जानकीबाई यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही वेळेस +रघुनाथराव मात्र शनिवारवाड्यात नव्हते. इ. स. १७५२-५३ ची गोहद स्वारी करून लगेच दि. +३० ऑगस्ट १७५३ ला ते उत्तरेत जाटांच्या मोहिमेवर गेले. जाटांविरुद्ध लढताना +रघुनाथरावांनी कुंभेरीच्या प्रचंड किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्याची संपूर्ण नाकाबंदी केली. +शेवटी जाट शरण आले आणि त्यांनी रघुनाथरावांशी तह केला. ही मोहीम संपवून रघुनाथराव +ऑक्टोबर सन १७५५ रोजी शनिवारवाड्यात दाखल झाले. शनिवारवाड्यात आल्यावर +त्यांना या दोन अत्यंत दुःखाच्या बातम्या समजल्या. नानासाहेबांनी आपल्या बंधूंचे +केले. नानासाहेबांच्या खाशा पथकात असलेल्या ओक सरदारांची मुलगी नानासाहेबांना +पसंत होती. नानासाहेबांनी रघुनाथरावांना दुसऱ्या लग्नासाठी तयार केले. सुरुवातीला काही +दिवस नकार देताना अगदी नानासाहेबांचा आग्रह मोडवेना म्हणून रघुनाथराव लग्नाला तयार +झाले. याच सुमारास दक्षिणेला सावनूर उर्फ बसरूर भागात अचानक तंटा उद्भवल्याने +नानासाहेबांना ऑक्टोबर १७५५ मध्ये पुणे सोडावे लागले. या मोहिमेत रघुनाथरावही +सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यानच मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शके १६७७ म्हणजेच +बुधवार दि. १७ डिसेंबर १७५५ रोजी कर्नाटकातील गलगले या छावणीच्या ठिकाणी +रघुनाथराव आणि ओकांची कन्या आनंदीबाई यांचे लग्न पार पडले. दि. १९ जुलै १७५६ या +दिवशी नानासाहेब पेशवे रघुनाथराव आणि आनंदीबाईंना घेऊन पुण्यात दाखल झाले. +बसनूरच्या स्वारीवर जाताना एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे भाऊसाहेब पेशव्यांना +मिळालेली कोल्हापूर राज्याच्या प्रधानकीची वस्त्रे! कोल्हापूरकर संभाजीराजांनी कायमच +सातारा राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न चालवला होता. संभाजीराजांनी सांगोल्याच्या +स्वारीहून (१७५०) परतलेल्या सदाशिवरावभाऊंना वश करून पेशवाई-वस्त्रे, पारगड, +कलानिधी आणि हे तीन किल्ले देऊन फितवण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय +सालीना ५० हजार रुपये उत्पन्नाची जहागीरही देऊ केली. परंतु, भाऊसाहेबांनी वरवर +संभाजीराजांना अनुकूलता दाखवून नानासाहेबांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. +नानासाहेबांनीही आपल्याला जणू काहीच करता येत नाही, सदाशिवरावभाऊ आपले ऐकत +नाही असे दाखवले आणि १७५४ साली कर्नाटकांत स्वारीवर जाताना भाऊसाहेबांना बरोबर +घेऊन कोल्हापूरकर संभाजीराजांची भेट घेतली. (आणि भाऊंना प्रधानकीची वस्त्रे देववली) + देशावर या घडामोडी घडत असताना कोकणात मात्र पुन्हा अराजक माजले होते. +सरखेल सेखोजी मृत्यूनंतर पेशव्यांनी त्यांच्या मानाजी आणि तुळाजी या दोन +पुत्रांपैकी मानाजी सरखेल पद देऊ केलं. यामुळे तुळाजी मनात +पेशव्यांविषयी द्वेषाची भावना निर्माण झाली होती. १७५४ च्या सुमारास मानाजी +मृत्यूनंतर भाऊबंदकीने ग्रासलेल्या घराण्यातून तुळाजी आंग्रे सरखेल बनले. + ही मुख्यतः बाणकोटच्या तेरेखोलपर्यंत होती. याच्याच जोरावर तुळाजी +आंग्रे आपला पेशव्यांवरचा पूर्वीचा राग आता नव्याने उकरून होते. या +कोकणी पेशव्यांच्या अनेक सरदारांची घराणी होती. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या पेठे, +परचुरे, रास्ते, पानसे, फडके, ओक, भावे, जोशी, पटवर्धन, बर्वे, मेहेंदळे इ. सरदारांच्या +<<< + + घरादारांना उपद्रव देऊ लागले. ते या सरदारांची घरेच जाळत सुटले. शेवटी या सर्व +सरदारांच्या गाऱ्याण्यांमुळे नानासाहेबांना तुळाजीकडे लक्ष देणे भाग पडले. + संपूर्ण प्रकरणात नानासाहेब पेशव्यांनी प्रत्यक्षात कुठेही सहभाग घेतला +नव्हता. इ. स. १७५५ मध्ये चुलतबंधू सदाशिवरावभाऊ आणि धाकटी आत्या + इचलकरंजीकर व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी अनुबाई (जोशी) यांच्यासह +कर्नाटकातील सावनूरच्या नबाबावर स्वारी केली. मुरारराव आणि मुझफ्फरखान हे + पेशव्यांचेच कर्नाटकातले सरदार नवाबाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे कर्नाटकचा प्रश्न + अतिशय गंभीर होऊन बसला होता. नानासाहेबांनी या स्वारीसाठी आपल्या उत्तरेकडील + सरदारांनाही टेकले. कर्नाटकात बोलावून घेतले. अखेरीस सावनूरकर नवाबाने पेशव्यांसमोर + + नानासाहेब पेशवे कर्नाटकात सावनूरकर नबाबाशी लढताना इकडे कोकणात +प्रकरण उद्भवले. शाहूंच्या निधनानंतर स्वराज्याचा सांभाळ करणे, हे पेशव्यांचे कर्तव्य होते. +राजधानी रायगड कोकणात असल्याने कोकणाचे महत्त्व जास्तच. परंतु शाहूंच्या आगमना + पूर्वीपासूनच कोकणात वर्चस्व होते. कान्होजी आंग्रे या जबरदस्त माणसाला + थोरल्या राजाराममहाराजांनी सरखेल बनवले. पुढे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीमुळे +कान्होजी हे शाहूमहाराजांना येऊन मिळाले. पुढे बाजीराव पेशव्यांनीदेखील सेखोजी + कार्यात सामावून घेतले खरे, पण पुढे संभाजी, मानाजी, तुळाजी या आंग्रे +बंधूंत भाऊबंदकी माजली. गादीसाठी काय ते करायला ते तयार होते. त्यातल्या त्यात + मानाजी हे पेशव्यांना अनुकूल होते. तुळाजी मात्र पेशव्यांना मानायला तयार नव्हते. + पेशव्यांचे अधिकार त्यांना मान्य नव्हते. कोकण आपलेच आहे, अशा थाटात ते वावरत + असत. सागरी किल्ला असल्याने विजयदुर्गावर तुळाजींचे मुख्य ठाणे होते. आरमारही याच + किल्ल्यावर असे. पेशव्यांनी पोतुगीजांकडून वसई प्रांत जिंकल्यामुळे पोर्तुगीज पेशव्यांचे शत्रू + बनले होते. अशातच पेशव्यांनी वाडीकर-सावंतांना सोबत घेऊन गोव्यावर आक्रमण केले. +त्यामुळे पोर्तुगीजांनी तुळाजींशी सख्य जोडले. पोर्तुगीज आणि मराठे यांच्या भांडणात + इंग्रजांनी पडणे नानासाहेबांना नको होते. यासाठी नानासाहेबांनी नामी युक्ती केली. तुळाजी + आंग्रे हे कोकण दंडेली करत असल्याने प्रजाही असंतुष्ट होती. शिवाय तुळाजी + इंग्रजांचे हाडवैरी असल्याने इंग्रजांनाही तुळाजींचा बंदोबस्त व्हायला हवा होता. या साऱ्या +गोष्टीचा उपयोग नानासाहेबांनी असा करून घेतला की, इंग्रजांनी मराठ्यांच्या विरोधात + पोर्तुगीजांना मदत करू नये. त्या बदल्यात मराठे तुळाजींचा बंदोबस्त करतील. मराठे फ्रेंचांना + मदत करतील, अशी इंग्रजांना कायमच धास्ती वाटे. शिवाय आता तुळाजींचेही पारिपत्य +होणार हे पाहून इंग्रजांना बरे वाटले. नानासाहेब आणि इंग्रजांची युती ही फक्त तुळाजींना +नामोहरम करण्याबाबत आणि पोर्तुगीजांबाबत होती. त्यात कुठेही मराठी आरमाराचा नाश +व्हावा, असे नानासाहेब पेशव्यांच्या मनात कधीही आले नव्हते. + तुळाजी फारच बळजोर झाले होते. पेश���्यांच्या पक्षातील लोकांना तर ते फारच पाण्यात +पाहात. इ. स. १७५३ मध्ये तुळाजी आंग्रे काहीही कारण नसताना विशाळगडावर चालून +<<< + +गेले. केवळ प्रतिनिधी हे पेशव्यांच्या पक्षातले म्हणून. विशाळगडाचा किल्लेदार लिहितो, +"आंग्र्याने मर्यादा सोडून मुलकाचा उच्छेद केला. प्रभावळी, साखरपे दोनही तोंडास शह +देऊन बसला आहे. प्रतिनिधीच्या मुलकाची खराबी केली. कोणीही खावंद त्यास विचारता +नाही." ताराबाईंनीही तुळाजींना याबद्दल जाब विचारला असता, ताराबाईंनाही त्यांनी किंमत +दिली नाही. अखेरीस प्रतिनिधींनी आपले मोठे सैन्य पाठविल्यावर तुळाजी वेढा उठवून +माघारी फिरले. + तुळाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे या बंधूंमधले वैरही पेशवे-तुळाजी इतकेच प्रचंड होते. +तुळाजींनी मानाजींच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करून मानाजी कुटुंबकबीला +पकडून कैदेत ठेवला होता. आंग्रे आणि पेशव्यांचे दोघांचेही गुरु ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर +यांनीही याबाबत तोड काढण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मेंद्रस्वामींचा तुळाजींवर फार जीव होता. +याबाबतीत ते तुळाजींना म्हणतात, "चवदा लक्षांचा धणी तो आहे देवळी 'श्री परशुराम'. +त्याचा भक्तराज शिरोमणी तुळाजी सरखेल. तुम्हास शाहूजीने सरखेल तुम्हावरी दया +फार आहे हे आज्ञा." परंतु हेच ब्रह्मेंद्रस्वामी तुळाजींची पुंडगिरी पाहून तुळाजीस +फर्मावतात की, 'वास्तविक तुझे अपराध इतके झाले की, माझी बोलण्याचीही इच्छा +नव्हती. पण मानाजी आणि तुझे भावाभावांचे सख्य व्हावे यासाठी पत्र लिहिले. मानाजींच्या +मनात काहीही वाईट नाही. तेव्हा तूही लहान मुलांसारखे न वागता दोघे भाऊ एक होऊन +एका महत्त्वाच्या कामगिरीस हात घालणे.' मानाजी आंग्रे हे मात्र पेशव्यांशी कायम निष्ठा +ठेवून होते. १० ऑक्टोबर १७५२ च्या एका पत्रात मानाजी नानासाहेबांना म्हणतात, 'आमचा +एक निश्चय की आपले म्हणून आहो. आपला अवलंब करून मानाने आहो.' + या सुमारास निजामाची कटकट, नागपूरकर जानोजी भोसल्यांची बंडाळी, १७५३ पासून +सतत सावनूर, अर्काट, बिदनूर, म्हैसूर अशा सलग मोहिमांमुळे नानासाहेबांना तुळाजींकडे +लक्ष देण्यास सवड नव्हती. पण तुळाजींकडे दुर्लक्षही करून चालत नव्हते. अखेरीस, +नानासाहेबांनी कोकणातला पेशव्यांचा सरसुभेदार रामाजी महादेव बिवलकर यांच्याकडे +तुळाजींच्या मोहिमेची मुखत्यारी दिली. पेशव्यांचे आरमार अजिबातच नव्हते. मुळात +सुरुवातीपासूनच पेशवे किंवा मराठे असे वेगवेगळे नव्हते. आरमार हेच स्वराज्याचे +आरमार असल्यामुळे वेगळे आरमार असण्याची शक्यताही नव्हती. मानाजी असे +एक वेगळे लहानसे आरमार होते. पण तुळाजींच्या आरमारापुढे मानाजींचे आरमार तोकडे +होते. पण आता मात्र तुळाजींना आरमाराशिवाय हरवणे शक्य नाही, हे पेशवे जाणून होते. +याकरिताच रामाजी महादेवांनी समुद्री युद्धात बंध घालण्यासाठी इंग्रजी आरमाराची +मदत घेण्याचे ठरवले. जमिनीवरच्या युद्धात पेशव्यांच्या फौजांसमोर तुळाजींची धडगत नाही, +हे उघडच होते. रामाजी महादेव हे मूळचे कल्याणचे गृहस्थ थोरल्या बाजीराव पेशव्यांपासून +जवळपास तीस वर्षे उत्तर कोकणचे सरसुभेदार होते. तीस वर्षांहून अधिक काळ सुभेदारी +पाहिल्यामुळे रामाजी महादेव यांना कोकणातल्या तेथील माणसांच्या खाचाखोचा डोळे +झाकूनही सांगता येऊ शकत होत्या. पण या दरम्यान एक विचित्र गोष्ट घडली की, रामाजी +महादेवांनी मानाजी पेब उर्फ विकटगड हा किल्ला अचानक कब्जात घेतला. +<<< + +कदाचित तुळाजींच्या काही कटकारस्थानाची कुणकुण रामाजींनी लागली असावी. परंतु, +त्यामुळे मानाजी संतापले. पेबच्या खालचा मुलुखही रामाजीपंतांच्या कब्जात गेल्याने +मानाजींना खर्चाची अडचण भासू लागली. त्याच दरम्यान जंजिरेकर सिद्दीने कुलाब्यावर +हल्ला चढवला. मानाजींनी आपला भाऊ तुळाजी यांना मदतीची पत्रे पाठविली असता, +मानाजींचा तुळाजींनी पत्रातून भयंकर अपमान केला. अखेर मानाजी आणि रामाजी महादेव +यांच्यातील गैरसमज दूर होऊन ते पुन्हा एकत्र आले. रेवदंड्याच्या रामेश्वर मंदिरात सख्य +झाले. रामाजीने आखलेल्या या मोहिमेला १७५४ च्या अखेरीस नानासाहेबांनी कर्नाटकातून +मंजुरी कळविली आणि कृष्णाजी महादेव जोशी, मस्तानीपुत्र समशेरबहाद्दर, दिनकर महादेव +जोशी, खंडोजी माणकर, शंकराजी केशव अशा सरदारांना कोकणात रवाना केले. याशिवाय +मदतीला वाडीकर-सावंत, पंत-अमात्य, प्रतिनिधी इत्यादी लोक होतेच. विजयदुर्गाआधी +सुवर्णदुर्ग काबीज करण्यासंबंधी रामाजी महादेव आणि इंग्रजांचा मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड +बर्शिअर यांच्यात दि. १९ मार्च १७५५ रोजी एक करारनामा झाला तो असा- + * सर्व आरमार इंग्रजांच्या ताब्यात असावे, परंतु कारभार मात्र उभयतांच्या संमतीनेच +व्हावा. + * तुळाजी जी जहाजे काबीज करण्यात येतील, ती इंग्रज-मराठ्यांनी +निम्मी-निम्मी वाटून घ्यावीत. + * बाणकोट व हिम्मतगड (नंतरचा फोर्ट व्हिक्टोरिया) आणि नदीच्या दक्षिण काठावरील +पाच गावे मराठ्यांनी इंग्रजांना कायमची द्यावीत. + * पश्चिम किनाऱ्यावरून कोणत्याही किल्ल्यास समुद्रातून मदत पोहोचवू नये, +असा बंदोबस्त इंग्रजांनी ठेवावा. + * किल्ल्यात जे द्रव्य, सामान, दारूगोळा, तोफा वगैरे सापडेल ते सर्व +मराठ्यांस देण्यात यावे. + * मानाजीच्या मुलुखावर उभयतांनी हल्ला केल्यास खांदेरी बेट, बंदर व कित्येक गावे +(?) इंग्रज यांस द्यावीत. + * जरुरीप्रमाणे जास्त नानासाहेबांच्या संमतीने ठरविण्यात यावीत. + या करारानुसार विल्यम जेम्स या इंग्रज सरखेलाच्या हाताखाली इंग्रजी आरमार दि. २२ +मार्च १७५५ रोजी सुवर्णदुर्गावर चाल करून निघाले. जमिनीवरून दिनकर महादेव जोशी +आणि समशेरबहाद्दर हे देवरुखला येऊन थांबले होते. २२ मार्चला संध्याकाळी इंग्रजांचे +आरमार मुंबईहून निघाले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर +तुळाजींची अठरा गलबते इंग्रजांना फिरताना दिसली. इंग्रजांचे बलाढ्य आरमार पाहून +तुळाजींची गलबते माघारी वेगाने पसार झाली. याचवेळेस एक-दोन दिवसात सात तरावे, +एक बातेला आणि साठ गलबते असे मानाजींचे आरमार चौलच्या बंदरातून येऊन इंग्रजी +आरमाराला सामील झाले. त्यानंतर सुवर्णदुर्गच्या वाटेत मराठी आरमाराने काही ना काही +कारणाने मुक्काम करून 'वेळ काढला'. २९ तारखेला पेशवे आणि इंग्रजांच्या संयुक्त +<<< + +आरमाराचा सुवर्णदुर्गला वेढा पडला. त्या वेढ्याच्या वेळेस आरमारात आणि +इंग्रजांच्या आरमारात झटापट झाली. इंग्रजांनी जयगडच्या पाठलाग +केला, पण निसटून विजयदुर्गावर गेले. विल्यम जेम्स मुंबईच्या वरिष्ठांना पेशव्यांच्या + आरमाराविषयी अत्यंत चिडून लिहितो, "आम्ही सुवर्णदुर्गावर मारा केला, तरी पेशव्यांची +जहाजे आणि रामाजीपंतांचे लोक कसलीही मदत न करता निलाजरेपणे मजा बघत उभी +राहिली. तेव्हा त्यांच्या मदतीची आशा सोडून मी एकट्यानेच हल्ला केला." यानंतर १२ +एप्रिल १७५५ रोजी तोफांच्या धडाक्यात विल्यम जेम्स सुवर्णदुर्गात शिरला. + विल्यम जेम्स या इंग्रजी सरखेलान�� पेशव्यांच्या आरमाराला दिलेल्या शिव्या पाहून +रामाजीपंतांची चतुराई आपल्याला समजून येते, ती अशी- आरमार सुरुवातीला +इंग्रजांच्या दृष्टीस इंग्रजांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पण उघड समुद्रात +अठरा गलबतांचा हंग्रजांच्या बलाढ्य आरमारापुढे निभाव लागणार नाही, असे पाहून +रामाजीपंतांनी आपल्या आरमारासह मुद्दाम काही ना काही कारण काढून वेळ काढला. +जेणेकरून आंग्यांचे आरमार इंग्रजांच्या मारगिरीतून त्यांच्या इलाख्यात पोहोचेल. +एव्हाना इंग्रजांचे आरमार पुढे गेला होता, तो मागे फिरला. पण मधल्या काळात +रामाजीपंतांनी आपले सैन्य व एक तोफ जमिनीवर उतरवून लढाईचा पोरखेल चालवला +होता. रामाजी हे साधेसुधे सरदार नसून तीस वर्षांचा अनुभव असलेले सरसुभेदार होते. +त्यांनी तुळाजी आंग्रेंची कारकीर्द पाहिलेली होती. ते चांगलेच ओळखून होते. +विल्यम पुढे गेलाय हे पाहून लुटूपुदूच्या लढाईचे निमित्त करून रामाजीपंतांनी सुवर्णदुर्गच्या +किल्लेदाराशी संधान बांधले असावे. कारण नंतर रामाजीपंतांनी विल्यमला 'किल्लेदार ठार +झाला व आत अधिक माणसे नाहीत' असे खोटे सांगून सैन्यासह त्याला किल्ल्याच्या +माऱ्यात पाठवून आपण मात्र आरमारासह मागे राहिले. (विल्यम यालाच निलाजरेपणा +म्हणतो) जेव्हा दारू कोठाराचा उडाला तेव्हा किल्लेदाराने पंतांकडे तहासाठी माणसे +पाठवली. परंतु, यात काहीतरी डाव असल्याचा संशय आल्याने जेम्सने किल्ल्यात सैन्य +घुसवले. तेव्हा पंतांचा नाईलाज झाला. याच पत्रात जेम्स म्हणतो, "(किल्ल्यातील) लोक +दिनवाणी झाले. रामजीपंत हा दयार्द्र अंतःकरणाने सर्वांची विचारपूस करत आहे. अखेरीस +सुवर्णदुर्ग, त्याचे तीन संरक्षक किल्ले गोवा, आणि कनकदुर्ग हे रामाजीपंतांच्या हाती + आले. + इकडे सुवर्णदुर्ग हाती आल्यामुळे समशेरबहाद्दर आणि दिनकर महादेव यांनी +रत्नागिरीच्या किल्ल्याला वेढा घातला. रामाजीपंतांनी या वेढ्यासाठीही विल्यमला विनवले. +रामाजीपंतांच्या 'पूर्वीच्या' अनुभवावरून विल्यम मदत करणार नाही, हे त्यांनी ताडलेच होते +आणि तसेच झाले. हीच गत अंजनवेल आणि गोवळकोटच्या किल्लांच्या बाबतीतही झाली. + अखेरीस हरी दामोदर आणि महिपतराव कवडे यांनी दि. १४ जानेवारी १७५६ रोजी + किल्लेदार मोत्याजी विचारे यांच्याकडून अंजनवेल ज��ंकून घेतला. गोवळकोटही या +सुमारास काबीज झाला. यापाठोपाठ समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी रोजी रत्नदुर्गावरही +निशाण लावले. +<<< + + या घडामोडी सुरू असताना स्वतः तुळाजी विजयदुर्गावर होते. विजयदुर्ग हे आरमारी +केंद्र होते. सिंधुदुर्ग हा बलाढ्य 'जंजिरा' असला तरी तो केवळ एक जंजिरा होता, ही त्याची +दुखरी नस होती. विजयदुर्गच्या एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र असल्याने +खुष्कीचा मार्गही रसद पुरवठ्यासाठी खुला होता. याच कारणास्तव विजयदुर्ग हे +आरमारी मुख्यालय बनवले. पेशव्यांनी इंग्रजांशी तह केलेला पाहून तुळाजींनी ५ नोव्हेंबर +रोजी गोवेकर पोर्तुगीजांशी संधान बांधले, पोर्तुगीजांनीही तत्परतेने ५०० सैनिक +विजयदुर्गावर पाठवून दिले. दि. ११ डिसेंबर रोजी सह्याद्रीच्या मुलुखातील खारेपाटणजवळ +पेशव्यांचे सैन्य घाट उतरत असताना तुळाजींचा सरदार रुद्राजी धुळप याने अचानक हल्ला +चढवला. या हल्ल्यात पेशव्यांच्या फौजेपुढे रुद्राजींचा टिकाव लागला नाही. स्वतः रुद्राजी +आणि एक पोर्तुगीज सरदार जखमी झाले. काही पोर्तुगीज मारले गेले. कर्नल रॉबर्ट क्लाईव्ह +आणि अॅडमिरल वॉटसन हे दोघे इंग्रज अधिकारी हिंदुस्थानातील फ्रेंच सैन्याचा पाडाव +करण्यासाठी नुकतेच इंग्लंडहून नव्या आरमारासह मुंबईस आले होते. ६ फेब्रुवारी रोजी +त्यांना विजयदुर्गवर जाण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे ७ तारखेला १४ जहाजे, ८०० +इंग्रज शिपाई, १००० काळे शिपाई असे इंग्रजी आरमार घेऊन क्लाईव्ह आणि वॉटसन +विजयदुर्गाकडे निघाले. पण हे आरमार निघण्यापूर्वीच किंबहुना इंग्रजांचा विजयदुर्गाकडे +मोर्चा वळण्यापूर्वीच १७५५ च्या पावसाळ्यानंतर लगेच पेशव्यांचा सरदार खंडोजी माणकर +हा तर आसपासचा मुलुख सर्व जिंकत प्रदेश पेशव्यांच्या दक्षिणेकडे हाती निघाला. जानेवारी १७५६ पर्यंत विजयदुर्ग सोडला + आला होता. + ११ फेब्रुवारी रोजी इंग्रजी आरमार विजयदुर्गवर मोर्चेदाखल झाले. इकडे जमिनीवर +रामाजी महादेवांची फौज तयारच होती. इंग्रजांचे आरमार चालून येत आहे, हे पाहून आधीच +दि. ८ फेब्रुवारी रोजी तुळाजींनी आपल्या मेहुण्यास विजयदुर्गाचा ताबा देऊन ते +रामाजीपंतांच्या छावणीत भेटावयास आले. पण पेशवे आणि तुळाजी यांच्यातील इतक्या +वर्षांच्या वैमनस्यामुळे चटकन निर्णय आणि वाटाघाटी होईना. तीन दिवस उलटले आणि +चौथ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी इंग्रजांचा विजयदुर्गावर भडिमार सुरू झाला. वॉटसनने +मुंबईला कळवले, "तुळाजी आंग्यांचे व पेशव्यांचे (रामाजीपंतांचे) तहाचे बोलणे चालत +असल्याचे मला कळले, तेव्हा तुळाजीस याबाबतीत अवकाश द्यायचा नाही, असा निश्चय +करून, एकदम किल्ल्या स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यास निरोप पाठविला. ठरलेल्या +वेळात जबाब न आल्याने व पेशवेही जरा वेळ आहेत असे पाहून दि. १२ रोजी +आम्ही किल्ल्यावर मारा सुरू केला." १२ तारखेला संध्याकाळी ४ च्या सुमारास इंग्रजांच्या +तोफेचा एक गोळा एका जहाजाच्या दारूखान्यावर पडून त्या जहाजाने पेट +घेतला. या भडक्यात आसपासची इतरही जहाजे एकदम पेटली. आरमारातील +७४ तोफांचे एक गुराब, त्याहून थोड्या लहान आकाराच्या ८ गुराबा आणि ६० गलबते उळून +खाक झाली. + दि. १३ फेब्रुवारी रोजी कॅप्टन फोर्ड (फोर्ब्स?) हा साठ माणसांसह जमिनीवर उतरला. +पण पेशव्यांची फौजही किल्ल्यात शिरायला तयार आहे, असे पाहून इंग्रजी आरमाराने मुद्दाम +<<< + +किल्ल्यावर तोफांचा मारा सुरूच ठेवला. संध्याकाळी फोर्ड किल्ल्यात शिरला आणि +त्याने निशाण लावले. परंतु, त्याआधीच तुळाजी आंग्रे खंडोजी माणकरांच्या स्वाधीन झाले +होते. तुळाजी अत्यंत शूर होते, यात शंकाच नाही. क्लाईव्ह आणि वॉटसनला ग. बर्शियरने +स्पष्ट बजावले होते, "तुळाजी आंग्रे सापडल्यास मुंबईस आणावा. पेशव्यांचे हाती देऊ नये. +कारण ते कदाचित त्यास पुनरपि मोकळा आणि तो पुन्हा पहिल्यासारखा +आपणास त्रास देऊ लागेल." बर्शियरच्या उपदेशावरूनच कल्पना येते. शिवाय विजयदुर्ग +घेण्याचा त्यांचा मनसुबा होताच. त्यामुळे तुळाजी पेशव्यांच्या स्वाधीन झाले हे पाहताच +पेशव्यांचे सैन्य विजयदुर्गात शिरण्याआधीच इंग्रजांनी शिताफीने किल्ल्याचा ताबा घेतला. +इंग्रजांचे सैन्य प्रथम मराठे आणि किल्ल्याच्या मध्ये उतरले आणि बाहेरून इंग्रजी तोफांचा +भडिमार सुरू असल्याने किल्ल्यातील उरलेल्या माणसांनी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. +दुसऱ्या दिवशी रामाजीपंत अॅडेमिरल वॉटसनच्या भेटीला गेले असता, वॉटसनने +विजयदुर्गच्या हस्तांतरणासाठी गव्हर्नरच्या परवानगीची गरज असून त्याबदल्यात पेशव्यांन�� +तुळाजीला इंग्रजांच्या हाती सोपवावे, ही अट घातली. तहनाम्यात ठरल्याप्रमाणे पेशव्यांच्या +संमतीने ठरविण्यात येण्याचे ठरले असल्याने रामाजीपंतांना अचानक विजयदुर्गच्या +बदल्यात तुळाजींना हस्तांतरित करता येईना. रामाजीपंत स्पष्टपणे पेशव्यांना तसे +कलवितात, "कजिया करावा तरी पातशाही सरदार ... दरम्यान जनरल व तहनामा आहे +म्हणोन उतावळी न करता आहो ... " अखेरीस विजयदुर्गसाठी वॉटसनने अडवून धरले तसेच +रामाजीपंतांनीही तुळाजींचा ताबा शेवटपर्यंत इंग्रजांना दिला नाही. पेशव्यांनी दि. २० जुलै +रोजी पुण्यात आल्यानंतर मुंबईचा गव्हर्नर बर्शियरला अत्यंत कडक शब्दात 'आज्ञापत्र' +पाठविले आणि विजयदुर्ग पुन्हा मागितला. यावर १ ऑगस्ट रोजी बर्शियरने अत्यंत नरमाईचे +धोरण स्वीकारून पावसाळा संपताच विजयदुर्ग पुन्हा देण्याचे मान्य केले आणि आपले दोन +वकील (टॉमस वायफिल्ड आणि जॉन स्पेन्सर) पुणे दरबारात पाठविले. + पाडावानंतर नानासाहेब पेशवे दि. १ जानेवारी १७५७ ते १९ जून (१७५७) या +काळात कर्नाटकात श्रीरंगपट्टणमच्या मोहिमेवर गेले. याच काळात कर्नाटकात हैदरअलीच्या +उदयाला सुरुवात झालेली होती. हैदराबादचा निजाम हा तर पेशव्यांचा पिढीजात होता. +नानासाहेब कर्नाटक मोहिमेवर गुंतले आहेत हे पाहताच निजामाने पुन्हा कुरापती काढण्यास +सुरुवात केली. अखेर निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी १७५७ च्या दिवाळीनंतर नानासाहेब +पुण्याहून फौजेसह निघाले. वऱ्हाड प्रांतातील 'सिंदखेड' या गावी पेशव्यांची आणि +निजामाची गाठ पडली. या निजामाचा सपशेल पराभव झाला. यात झालेल्या +तहानुसार निजामाने सालीना २५ लाख रु. उत्पन्नाचा मुलुख पेशव्यांना देण्याचे कबूल केले. + नानासाहेब पेशवे आणि निजामाच्या मोहिमेवर असतानाच रघुनाथराव +सैन्यासह उत्तरेच्या मोहिमेवर गेले. शाहा अहमदशाह अब्दालीने दिल्लीवर आक्रमण +केल्याच्या बातम्या होत्या. याकरताच नानासाहेबांनी प्रचंड फौज देऊन राघोबादादांना उत्तरेत +रवाना केले. (नोव्हेंबर सन १७५६). राघोबादादांनी थेट दिल्ली गाठून अहमदशहा +अब्दालीच्या फौजांना खैबरखिंडीकडे लोटण्यास सुरुवात केली. या काळात बादशहा +<<< + + अहमदशहा हा अब्दालीला वश झालेला असल्याने रघुनाथरावांनी अहमदशहाला कैदेत +टाकले. अझीझउद्दीनखान याला 'आलमगीर' ही पदवी देऊन तख्तावर बसवले. +रघुनाथरावांनी आपली फौज पाठवून मथुरा, काशी, गया वगैरे सारी तीर्थक्षेत्रे यवनांच्या +तावडीतून मुक्त केली. जानेवारी सन १७५८ मध्ये दादासाहेबांनी कुरुक्षेत्रावर असलेले + 'कुंजपुरा' हे महत्त्वाचे ठाणे जिंकले. अब्दाली खैबरखिंडीतून पुन्हा अफगाणिस्तानात +गेल्याची खात्री झाल्यावर पश्चिमेकडे करत एका महिन्याच्या आत रघुनाथरावांच्या + फौजांनी 'लाहोर' आणि 'अटक' ही दोन्ही महत्त्वाची मुसलमानी ठाणी जिंकून हिंदुस्थानची +पश्चिम सरहद निर्धास्त केली आणि ऑक्टोबर सन १७५८ च्या सुमारास रघुनाथराव पुण्यात +परतले. नानासाहेबांना आपल्या बंधूंचा पराक्रम पाहून खूप आनंद झाला. ते स्वतः +रघुनाथरावांना सामोरे गेले व प्रचंड धुमधडाक्यात त्यांनी रघुनाथरावांचे स्वागत केले. या +मोहिमेमुळे रघुनाथरावांचा दरारा फार वाढला. थोरल्या बाजीरावसाहेबांसारख्याच फौजांच्या + झंझावाती हालचालींमुळे रघुनाथरावांना लोक 'राघो भरारी' या नावाने ओळखू लागले. +त्यांच्या या प्रचंड पराक्रमामुळे पेशव्यांची वाढलेली ताकद आणि भविष्यातला धोका + ओळखून इंग्रजांनीही ताबडतोब पेशव्यांशी 'मैत्रीचे संबंध' वाढवण्याच्या हेतूने आपला +वकील पेशव्यांच्या दरबारात पाठवला. +<<< + + मार्ग + + मराठी फौजांचे अटकेपार झेंडे + दरम्यान १७५७ च्या दरम्यान महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्रीमंत थोरल्या छत्रपती +शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी स्वराज्यात दाखल झाला. + दि. १० ऑक्टोबर १७५८ या दिवशी भाऊसाहेब पेशव्यांवर गारपिराच्या लष्करी +छावणीत मुझफ्फरखान याने खुनी हल्ला केला. भाऊसाहेब सावध असल्याने हल्ल्यातून +सुखरूप बचावले. प्रथम हा हल्ला पेशव्यांच्या राजकीय शत्रूंनी, म्हणजेच निजामाने किंवा +इतरांनी केला असावा, असा संशय होता. मुझफ्फर खानाचा जावई हैदर खान याने भाऊंवर +प्रत्यक्ष हत्यार चालवले आणि पकडला गेल्यावर त्याने मुझफ्फर खानाचे नाव घेतले. +मुझफ्फर खानाला निजामानेच हे नंतर सिद्ध झाले. याच सुमारास मस्तानीपुत्र +समशेरबहाद्दर आणि मेहेरबाई (समशेरबहाद्दरांची दुसरी पत्नी) यांना मुलगा झाला. +समशेरबहाद्दरांचे सारे आयुष्य 'ब्राह्मण' म्हणूनच गेल्याने मुलाचे बारसेही ब्राह्मणी पद्धतीनेच +<<< + +करण्यात ���ले. मुलाचे नाव ठेवण्यात आले अलीबहाद्दर. इ. स. १७५९ साली आणि १७६० +साली नानासाहेबांनी अनुक्रमे पटवर्धन-रास्ते आणि पटवर्धन-बिनीवाले या सरदारांना +कर्नाटकात मोहिमेवर पाठवले. नानासाहेब सततच्या विश्रांती घेण्यासाठी काही +काळ पुण्यातच थांबले. दि. १८ एप्रिल १७५९ या दिवशी नानासाहेबांची चुलत बहीण व +भाऊसाहेबांची सख्खी बहीण बयाबाई पेशवे यांचा मृत्यू झाला. या दिवशी मराठी तारीख +होती चैत्र वद्य षष्ठी शके १६८१ प्रमाथीनाम संवत्सर, दि. १ ऑक्टोबर १७५९. या दिवशी +नानासाहेब पेशव्यांनी समशेरबहाद्दरांना साहेबनौबतीचा मान दिला. समशेरबहाद्दरांनी +याआधी कितीतरी वेळा तलवार गाजवली होती. तुळाजी मोहिमेत +समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी १७५६ रोजी रत्नागिरीचा किल्ला जिंकला. रघुनाथरावांच्या +'अटकेवरील' स्वारीत यांनी दिल्लीची आघाडी सांभाळली. यानंतर बुंदेलखंडात राजा +छत्रसालांचे नातू म्हणजे समशेरबहाद्दरांचे मामेभाऊ जगतराय पुत्र हिंदुपताचा मृत्यू झाला. +हिंदुपतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांमधली भाऊबंदकी मिटवून न्याय देण्यात +महत्त्वाचा वाटा होता. + सिंदखेडला निजामाबरोबर झालेल्या लढाईनंतर निजामाने २५ लाख रु. उत्पन्नाचा मुलूख +पेशव्यांना द्यायचे मान्य केले होते. परंतु, पेशव्यांची पाठ वळल्यानंतर निजामाने या तहाला +वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आता मात्र इतर मोहिमांतून उसंत मिळाल्यानंतर नानासाहेब +पेशव्यांनी पुन्हा एकदा निजामाकडे लक्ष वळवले. नानासाहेबांनी या मोहिमेची सारी +मुखत्यारी सदाशिवरावभाऊंकडे सोपवली. या मोहिमेत भाऊसाहेबांबरोबर रघुनाथरावदादा +आणि समशेरबहाद्दरही होते. शिवाय नानासाहेबांचे तरुण पुत्र विश्वासराव हेदेखील सहभागी +झाले होते. पेशव्यांच्या फौजा चालून येत आहेत हे पाहताच निजामही हैदराबादेहून निघाला. +सदाशिवरावभाऊंची युद्धाची जय्यत तयारी पाहून निजामाचे बहुतांश सरदार मनातून घाबरले +होते. 'पेशव्यांशी झुंज न झालीयास बरे होईल' असेच प्रत्येकाला वाटत होते. उदगीरला +दोन्ही सैन्यांची रणांगणात समोरासमोर गाठ पडली. पेशव्यांच्या दराऱ्याने आधीच खचलेले +निजामाचे सैन्य प्रत्यक्ष लढाईला तोंड लागल्यावर थोड्याच वेळात चारही दिशांना पळत +सुटले. निजामाचा दारुण पराभव झाला. यावेळेस विश्वासराव ���ेशव्यांच्या हाताखाली +भाऊसाहेबांनी स्वतंत्र दहा हजाराची फौज दिली होती. युद्धात विश्वासराव पेशवे आणि +जयाप्पा शिंद्यांचे तरुण पुत्र जनकोजी शिंदे यांनी हत्तीवरून तिरंदाजी केली. शेवटी निजाम +नाक मुठीत धरून शरण आला. सदाशिवरावभाऊंनी पूर्वीच्या तहाचे २५ लाख आणि आताचे +६० लाख असे मिळून एकूण ८५ लाख रुपयांचा मुलुख, शिवाय शिवनेरी, देवगिरी, +अशिरगड, सोलापूरचा नळदुर्ग असे किल्ले आणि हैदराबाद व विजापूरची चौथाई +निजामाकडून घेऊन सदाशिवरावभाऊ पुण्याकडे परत निघाले. + भाऊसाहेब पेशवे सैन्यासह पुण्याकडे येत असतानाच इकडे पुण्यात धक्कादायक +बातम्या आल्या. पूर्वी राघोबादादांच्या अटक स्वारीनंतर दत्ताजी शिंदे लाहोरचा बंदोबस्त +करून परत माघारी फिरले होते. आता पुन्हा अब्दालीला पुन्हा येण्याकरिता पत्रे पाठवली. +इकडे नजीबखान आणि दत्ताजीमध्ये शुक्रतालच्या आसपास झटापटी होत होत्याच. +<<< + +अशातच अब्दाली आल्याने दत्ताजी शुक्रतालहून मागे वळले आणि कुंजपुऱ्यानजीक यमुना +ओलांडून दत्ताजी यमुनेच्या पश्चिमेस आले. इकडे अब्दालीने कुरुक्षेत्राच्या पूर्वेकडे यमुना +ओलांडली आणि तो अंतर्वेदीत उतरला. दत्ताजी आता पुन्हा यमुनेला उतार पाहत दिल्लीच्या +रोखाने जात असता इकडे अब्दाली थेट दक्षिणेकडे येऊन बुराडीजवळ यमुना ओलांडून +बेसावध असलेल्या दत्ताजींवर चालून आला. दि. १० जानेवारी १७६० रोजी दत्ताजी शिंदे +मारले गेले. दोन वर्षांपूर्वी मराठी सैन्याने जिंकलेल्या अटक, लाहोर, कुंजपुरा या ठाण्यांवर +अहमदशहा अब्दालीच्या फौजांनी हल्ला चढवून तेथील मराठी फौजा पराभूत झाल्याच्या +बातम्या आल्या. यावेळेस मराठ्यांचे मोठे सैन्य भाऊसाहेबांजवळ होते. + अब्दालीने अजून काही हालचाली करायच्या आतच त्याला पायबंद घालावा म्हणून +नानासाहेबांनी सदाशिवरावांना तसाच निरोप धाडला. यावेळेस सदाशिवरावभाऊ रघुनाथराव +आणि विश्वासरावांसह पैठणच्या जवळ पूर्णा नदीच्या काठी पडदूर येथे होते. नानासाहेबांचा +तातडीचा खलिता मिळाल्यावर पडदूर येथे सदाशिवरावांनी आपली फौज तयार केली व +कोणी कोणते काम करायचे याच्या नेमणुका करून दिल्या. दि. ७ मार्च १७६० रोजी +नानासाहेब पेशवे पडदूर येथे पोहोचले. लष्कराची वर्गवारी सुरू होती. उत्तरेत कोणी जावे, +कोणी नाही याबाबत खल सुरू ��ोते. शेवटी सदाशिवरावभाऊ, रघुनाथराव, समशेरबहाद्दर +आणि खुद्द नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेत जावे असे ठरले. विश्वासरावांनी पुण्याला जाऊन +दख्खन सांभाळावी. परंतु, विश्वासरावांना हे पटले नाही. आपण माराव्यात व परत +विजयश्री खेचून माघारा जावे. आपण माघारी बसून तीर्थरूपांनी युद्धास जावे है बरे नव्हे. +शेवटी मोठ्या मुश्किलीने विश्वासरावांनी सदाशिवरावभाऊ आणि नानासाहेबांचे मन वळवले +आणि दि. १४ मार्च १७६० रोजी मराठी फौजांनी पडदूरहून प्रस्थान ठेवले. पडदूरहून +नानासाहेब पेशवे पुण्यात परत आले आणि सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वाखालील मराठी +फौजा बऱ्हाणपूरमार्गे हांडियाचा घाट ओलांडून भोपाळ-सिरोंज-नरवरच्या घाटाने ग्वाल्हेर- +घौलपूर-मथुरा करत जुलैच्या अखेरीस दिल्लीत पोहोयल्या. दिल्लीत झटापट झाली. +दि. २ ऑगस्ट १७६० या दिवशी दिल्ली काबीज झाली. सलग सात महिने फौजा +होत्या. वास्तविक उदगीरच्या लढाईनंतर फौजा पुण्यात परतणार होत्या. परंतु, अचानक ही +अब्दालीची मोहीम निघाली. त्यामुळे मराठी फौजांचा पगार थकलेला होता. दिल्लीच्या +लालकिल्ल्यात घुसल्यानंतर सदाशिवरावभाऊ बादशहाच्या सिंहासनापाशी आले. मोंगल +बादशहाचे ते सुवर्णसिंहासन पाहून सदाशिवरावभाऊंना काय वाटले असेल? निश्चितच +त्यांच्या डोळ्यांसमोर थोरल्या शिवाजी महाराजांची व काका बाजीराव पेशव्यांची मूर्ती उभी +ठाकली असेल. अल्लाउद्दीन खिलजीच्या महाराष्ट्रावरच्या आक्रमणानंतर सतत अनेक शतके +याच सिंहासनावर बसून हे परकीय सुलतान अत्याचार करत होते. ज्यांनी त्यांची हुजरेगिरी +पत्करली ते वाचले. पण जे वाकले नाहीत त्यांच्यावर पडून स्त्रियांच्या अब्रुचीही +चाड राहिली नाही. थोरल्या शिवछत्रपतींनी स्वराज्याचे निशाण फडकवले. परंतु, काही वर्षे +जातात न जातात तोच आलमगीर मराठ्यांना मोडण्याकरता दक्षिणेत उतरला. आमच्या +सूर्यासारख्या तेजस्वी संभाजीराजांना मारून अन् अब्रूचे धिंडवडे काढून तो थांबला नाही तर +<<< + +उभ्या महाराष्ट्राचं तीर्थ असणाऱ्या जाऊन आमचं सिंहासनही फोडलं त्याने! +सदाशिवरावभाऊ संतापानं थरथरत होते. मोंगलांच्या त्या सिंहासनाकडे तुच्छतेने पाहत, +आपल्या आगीने भडकलेल्या डोळ्यांनी भाऊसाहेब जणू औरंगाबादेस बजावत होते, 'अरे +औरंगजेबा, तू स्वतःस आलमगीर म्हणवत होतास ना? हं! जिथे असशील त्या नरकातून +थोडंसं दिल्लीत डोकावून बघ. आमच्या राजाला मारल्याच्या उन्मादात तू आमचं तख्त +फोडलं होतंस. तुला काय वाटलं, मराठे पुन्हा उभे राहू शकणार नाहीत? अरे मूर्खा, मराठे +नुसते उभेच राहिले नाही, तर दिल्लीवर धडका देण्याइतकी ताकद त्यांच्यात आली आहे. +आज आमच्या थोरल्या महाराजांचं स्वप्न पूर्ण झालं. आजघडीला या दिल्लीचं तख्त +राखण्याकरता तुमचे बादशहा आमचे पाय धरतात. बघ, बघ. डोळे उघडून नीट बघ ...!! ' + परंतु येथे एक गोष्ट झाली. सदाशिवरावभाऊंनी दिल्लीचे ते सुवर्णतख्त फोडले नाही +(तख्त फोडले ही दंतकथा आहे). भाऊंनी तख्ताच्या वरची चांदीची मेघडंबरी फोडली. ती +मेघडंबरी काढून सदाशिवरावभाऊंनी ती टांकसाळात पाठवून नाणी घ्यावयास +सांगितले. त्यातून एकंदर नऊ लाख रु.ची नाणी मिळाली. या पैशातून भाऊसाहेबांनी +फौजेचा थकलेला पगार वाटून टाकला. दिल्लीची नीट व्यवस्था लावल्यानंतर भाऊसाहेबांनी +खासा दरबार भरवण्याची आज्ञा केली. बादशहा कैदेत पडला होता. दिल्लीतल्या साऱ्या +धनिकांना, व्यापाऱ्यांना, शाही सरदार-दरकदारांना आणि सर्वसामान्य जनतेलाही निरोप +गेले. दरबार खच्चून भरला होता. भाऊसाहेबांनी या सर्वांकरवी उद्याचे पेशवे असलेल्या +विश्वासरावांना मुजरे करवले. यानंतर भाऊसाहेबांनी आणि विश्वासरावांनी सर्वांना +सुरक्षिततेची हमी दिली. दरबार संपल्यावर विश्वासरावांनी लालकिल्ल्याची पाहणी केली. +यावेळेस केवळ अठरा वर्षे वयाच्या विश्वासराव पेशव्यांच्या नजरेतील सूज्ञपणा +वाखाणण्याजोगा होता. ऑक्टोबर महिन्यातही मराठी फौजांनी दिल्लीत लुटालूट केली. पण +यात लक्षात घेण्यासारखे हे की, मराठ्यांनी सर्वसामान्य जनता, स्त्रिया व लहान मुलं आणि +कोणत्याही धार्मिक स्थळाला अजिबात धक्का पोहोचवला नाही. यानंतर ऑक्टोबर +महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मराठी फौजा दिल्लीहून उत्तरेला कुरुक्षेत्राच्या रोखाने +निघाल्या. दि. १७ ऑक्टोबर १७६० या दिवशी भाऊसाहेबांनी कुंजपुऱ्याचा किल्ला +काबीज केली. विश्वासराव आणि राघोबादादांनी कुंजपुऱ्याच्या आसपासचा प्रदेश काबीज +केला. दि. १९ ऑक्टोबर या दिवशी 'दसरा' होता. कुंजपुऱ्याची काबीज केल्यावर +मराठी फौजांना ७ हजार ७ लाख रुपये, प्रचंड दारूगोळा आणि दहा हजार खंडी +धान्य सापडले. अहमदशहा अब्दाल��ने जपून ठेवलेला हा 'खजिना' मराठ्यांना अलगद +गवसला. १९ ऑक्टोबरचा दसरा कुंजपुऱ्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. + पेशव्यांच्या फौजांनी दिल्ली ते कुंजपुरा या मार्गावरची सोनेपत, ललेरी, समालखा, + कर्नाळ, (कुर्नुल) इ. गावे जिंकून घेतली होती. यावेळेस अब्दाली कुठे होता? तो +होता दिल्लीच्या आग्नेयेस कमीतकमी तीस कोस लांब ... कारण सदाशिवरावभाऊ दिल्लीवर +चालून येत आहेत, या बातमीने तो जरासा गडबडला होता. अर्थात भाऊंनाही याची खबर +होतीच! सुरुवातीला दिल्लीत असताना, पेशव्यांच्या फौजेचा मुक्काम दिल्ली शहराच्या +<<< + +दक्षिणेला होता. नंतर भाऊसाहेबांनी फौजांची छावणी दिल्लीच्या वायव्य सरहद्दीवरील, +दिल्लीपासून पाच कोसांवर असणाऱ्या सितारामाच्या सराईपासून बागेपर्यंत +पसरली. फैजा दिल्लीच्या दक्षिणेस असताना अहमदशहा अब्दाली गंगा नदीच्या तीरावर +अनुपशहर या ठिकाणी होता. परंतु या ठिकाणी अचानक आलेल्या पावसामुळे त्याचे सुमारे +दहा हजार घोडे आणि अनेक उंट पावसाच्या झडीमुळे आणि नंतर पसरलेल्या रोगराईमुळे +मेली. यामुळे अब्दाली आपल्या सैन्याचा तळ अनुपशहराहून उठवून दिल्लीच्या आग्नेय +बाजूला असलेल्या पटपरगंज या शहराजवळ आला. इथे अब्दाली व मराठ्यांच्या फौजा +एकमेकांच्या खूपच नजीक आल्या होत्या. यमुना नदीच्या पूर्वेकडे अब्दालीची तर पश्चिमेकडे +पेशव्यांची छावणी उभी होती. दोन्ही सैन्ये समोरासमोर आल्यानंतर एकमेकांवर तोफांचा +भडिमार सुरू झाला. परंतु, दुसऱ्याच दिवशी भाऊसाहेबांनी आपली छावणी दिल्लीच्या +वायव्येस हलवायला सांगितली. पेशव्यांची छावणी हलली, पण घाबरून बरं का! इकडे +अब्दाली मात्र उगाचच 'पेशवे घाबरले' या भ्रमात मिश्यांना पीळ देत बसला. +सदाशिवरावभाऊंनी वायव्येला येताच एकदम यमुनेच्या काठावरील साऱ्या होड्या जप्त +करून एकत्र आणून ठेवल्या होत्या. पेशव्यांची फौज बागेजवळ +असतानाच अहमदशाह अब्दालीने आपली छावणी दिल्लीच्या ईशान्येला शहाघड्याला +आणली. आता दोन्ही फौजा समांतर होत्या. परंतु दोन्ही फौजांच्या मध्ये आता कमीत कमी +तीन कोसांचे अंतर होते. इथे दोन्ही फौजांना एकमेकांवर हल्ले करता येईनात. शेवटी +भाऊसाहेबांनी उत्तरेची अब्दालीची ठाणी जिंकून घेऊन त्याला कोंडीत असा विचार +केला व भाऊसाहेबांचे सैन्य उत्तर दिशेला असणाऱ्या कर्नाळजवळच्या तीन कोसांवरच्या +कुंजपुऱ्याच्या निघाले. भाऊंना बातमी समजली होती, कुंजपुऱ्यात अब्दालीचा मोठा +खजिना ठेवलेला आहे. परंतु इथे भाऊंची चाल पूर्णपणे चुकली. पेशव्यांच्या फौजा +कुंजपुऱ्याला गेल्या, पण आता कुंजपुरा आणि दख्खन यात अब्दालीचे सैन्य आडवे आले +होते. दख्खनेतून येणाऱ्या मदतीच्या साऱ्या वाटा अब्दालीने रोखून धरल्या होत्या. + दिल्लीपासून चाळीस कोसांवर असलेल्या कर्नाळपर्यंत मोंगलांचा राजरस्ता होता. +कर्नाळपासून तीन कोस ईशान्येला कुंजपुऱ्याची होती. प्रचंड खोल खंदक +होता. कुंजपुऱ्याजवळ येताच मराठ्यांची मोर्चेबांधणी सुरू केली. यावेळी निजाबतखान +रोहिला हा अहमदशहा अब्दालीचा किल्लेदार कुंजपुरा लढवत होता. किल्ल्याच्या +खंदकाबाहेर कुतुबशहा हा पठाण तळ देऊन होता. इकडे मराठ्यांच्या पन्नास-साठ हजार +फौजेने कुंजपुऱ्याकडे मोर्चा वळवला हे पाहून या सर्वांची पायावर धारण बसली. याआधी +यमुना नदीच्या काठी बुराडीच्या घाटाजवळ कुतुबशहा पठाणाने दत्ताजी शिंद्यांना ठार केले +होते. याचा बदला घेण्यासाठी जनकोजी शिंद्यांनी आपल्या आघाडीच्या तुकडीसह +खंदकाजवळ उभ्या असणाऱ्या पठाण कुतुबशहावर भयानक हल्ला चढवला. +कुतुबशहाबरोबर खानही खंदकाबाहेर होता. मराठ्यांच्या इतर तुकड्यांनी +त्याच्यावर हल्ला चढवला. मराठ्यांच्या या वादळी दोघेही पठाण पराभूत होऊन +मागे रेटले जाऊ लागले. परंतु ऐन खंदकापाशी आल्यावर त्यांना अडकल्यासारखे झाले. +<<< + +अशातच आतून निजाबतखान रोहिला या दोघांना मदत करत नव्हता. शेवटी मराठ्यांनी या +दोघांनाही जिवंत कैद केले. याच सुमारास फौजेच्या असणारे खासे भाऊसाहेब, +विश्वासराव आणि इब्राहिमखान गारदी पुढे आले. भाऊसाहेब पेशव्यांनी दत्ताजी शिंद्यांच्या +वधाचा सूड म्हणून या दोघांचाही शिरच्छेद करण्याची आज्ञा फर्मावली. इब्राहिमखान गारदी +हा पेशव्यांच्या तोफखान्यावरचा प्रमुख होता. त्याने ताबडतोब तोफांचे मोर्चे लावून +कुंजपुऱ्याच्या तटावर तोफगोळ्यांचा भडिमार सुरू केला. यामुळे तटाच्या भिंती कोसळून +खंदकाचा काही भाग आपोआप बुजला गेला. तटाला पडलेल्या खिंडारावर मराठ्यांनी +एकदम सुलतानढवा केला आणि किल्ल्यात घुसून दिसेल त्या रोहिल्या पठाणाची कत्तल +आरंभली. या धुमश्चक्रीत किल्लेदार निजाबतखानही उतरला होता. शेवटी जबर +जखमा होऊन तो जिवंत कैद झाला आणि काही वेळातच मरण पावला. निजाबतखानाचे +एकंदर चार हजार पठाण कापले गेले होते. उरलेल्यांनी शरणागती पत्करली. भाऊसाहेबांनी +त्या शरण आलेल्यांना बाहेर जाण्यास वाट करून दिली. (दि. १७ ऑक्टोबर १७६०) इथे +मराठ्यांना सात हजार दहा हजार खंडी धान्य, दारूगोळा आणि सात लाख रु. +मिळाले. या सुमारास मराठी सैन्याची अन्नाची वणवण संपली. यानंतर तेथेच १९ +ऑक्टोबरचा दसरा साजरा करून नंतर भाऊसाहेबांनी कुंजपुऱ्याची जमीनदोस्त +करण्याचा हुकूम सोडला. यात पाच दिवस मराठे तटाला खणत्या लावत होते. कुंजपुऱ्याच्या +पाडावानंतर भाऊसाहेब, विश्वासराव, समशेरबहाद्दर, नाना फडणवीस, पार्वतीबाई पेशवे, +नाना फडणवीसांच्या मातोश्री इ. खाशी माणसे कुंजपुऱ्यापासून सोळा कोसांवरच +असणाऱ्या कुरुक्षेत्रावर जाऊन तीर्थस्नान करून आली. कुरुक्षेत्रावरूनच पुढे सरहिंदकडे +जाऊन तिथले जाट, शीख व इतर राजपुतांना एकत्र करावे असा विचार +सदाशिवरावभाऊंच्या डोक्यात घोळत होता. पतिआळ प्रांताचा राजा (सध्याचे पटियाला) +आलासिंग जाट हा कुरुक्षेत्राच्या जवळच 'मणूक' ला वास्तव्य करून होता. अब्दालीकडून या +लोकांना बरीच वर्षे तोशीस लागल्याने आलासिंगला मराठ्यांच्या येण्याने फार आनंद झाला. +परंतु, भाऊसाहेबांनी आता फार काळ उत्तरेत राहणे धोक्याचे होते. कारण या भागात +मजबूत ठाणे कुठेच नव्हते. त्यामुळे भाऊसाहेबांनी आता जास्त काळ इथे न थांबता +दक्षिणेला दिल्लीकडे जाण्याचे ठरवले. कारण मराठी फौजेबरोबर खासा जनाना होता आणि +या भागातून, पश्चिमेकडून कंदाहारच्या बाजूने अफगाणी फौजांच्या येण्याचेही संकट होते. +त्यामुळे भाऊसाहेबांनी तातडीने फौजांची दिशा दक्षिणेकडे वळवून दिल्लीला जाण्याचे +ठरवले. + उत्तरेला सदाशिवरावभाऊंच्या या हालचाली सुरू असतानाच अब्दाली गप्प बसला +नव्हता. पेशवे कुंजपुऱ्याकडे जाणार हे ओळखून अब्दालीने आपली फौज यमुनेच्या पूर्वेच्या +तीरावरून कुंजपुऱ्याच्या रोखाने रवाना केली. परंतु, मध्ये कुठेही यमुनेच्या पाण्याला उतार न +दिसल्याने ही फौज यमुना ओलांडून कुंजपुऱ्याच्या मदतीला पोहोचू शकली नाही आणि +भाऊसाहेबांनी कुंजपुरा घेतला. हे कळताच अहमदशहा अब्दाली शह���घड्याहून उत्तरेच्या +दिशेने यमुनेला कोठे उतार मिळतो का हे पाहण्याकरता सुमारे दहा कोसांचे अंतर पार करून +<<< + + आला. परंतु त्याला कोठेही जागा मिळेना. शेवटी बागपतच्या जवळच गौरीपूर उर्फ पनवाड़ी +या ठिकाणी असलेल्या एका ख्वाज्याच्या दर्ग्यावर अब्दालीने चादर चढवली व नमाज अदा + केला. यावेळेसच अब्दालीने त्याचा वाटाड्या गुलाबसिंग गुजर याच्या सांगण्यावरून यमुनेला + 'पानाचा विडा व पाच पैसे' दान दिले आणि केवळ योगायोगाने यावेळेलाच यमुनेचे पाणी + उतरले. इथूनच यमुना नदीच्या पश्चिमेला उतरण्यास अब्दालीने ठरवले. यमुना नदी ओलांडून + बागपतच्या जवळ गणोरा या ठिकाणी उतरला. येथून जवळच बागपतला + सदाशिवरावभाऊंचे ठाणे होते. परंतु इथे फारशी फौज नव्हती. त्यामुळे अब्दाली आला + पाहताच बागपतचे मराठे पळून गेले. दि. २५ ऑक्टोबर या दिवशी कुरुक्षेत्राच्या भूमीवर + असणाऱ्या भाऊसाहेबांना अब्दालीच्या यमुना ओलांडल्याची खबर मिळाली. यानंतर + भाऊसाहेब तातडीने हालचाली करून दि. २९ ऑक्टोबर १७६० या दिवशी या + कर्नाळच्या दक्षिणेस असणाऱ्या गावात आले. यावेळेसच अब्दाली आपल्या फौजेसह + दक्षिणेस आला होता. आता या दोन्ही फौजांमध्ये फक्त दीड कोसांचे अंतर होते. + अब्दाली मात्र एका विवंचनेत सापडला होता. कारण तो ज्या वेगाने दिल्लीहून इथे आला + होता, त्या वेगाने त्याची रसद दिल्लीहून येणे शक्य नव्हते. यामुळे अब्दालीच्या लष्करात + धान्याचे भाव अचानक कडाडले. पुरेसं धान्य नसल्याने अब्दाली हल्ला चढवू शकत नव्हता + आणि यावेळी मराठ्यांचाही आपल्यावर हल्ला होऊ नये, अशी तो अल्लाकडे मनोमन दुवा + मागत होता. हीच वेळ खरी भाऊसाहेबांना अनुकूल होती. जर हल्ला केला असता तर + अब्दालीला शरण येणं भाग होतं. परंतु, अब्दाली गप्प आहे यात त्याची काही चाल असेल, + असा मराठ्यांचा गैरसमज होऊन मराठ्यांनी हल्ला केला नाही. + पेशव्यांच्या फौजेतील एका सरदाराने आपल्या पत्रात म्हटलंय की, "यवन येथून दोन + कोसांवर येऊन राहिला आहे. नित्य थोड़ेथोड़े युद्ध होत आहे. श्रीमंतां(चा) ही चोहोकडे + तोफखाना पसरला आहे. आमचे सैनिक यवनांसमक्ष उभे राहून नित्य शे-पन्नास यवन मारून + उंट, आणितात. यवनास थोर भय जाहले आहे. पुढे येववत नाही. यवनाच्या सैन्यात + रसद बंद जाहली. यामुळे पीठ रुपयास ३ शेर व चणे (हरभरे-घोड्या���ना खाण्यास) रुपयास ४ + शेर, तूप रुपयास अर्धा शेर याप्रमाणे महाग जाहले आहे. आमचे सैन्यात (मराठी सैन्यात) गहू + रुपयास १६ शेर व चणे रुपयास १२ शेर व तूप रुपयास अडीच याप्रमाणे आहे. + अबदालीने स्वदेशास जावे तरी मार्ग नाही. युद्धे करावी तरी परिणाम नाही. याजमुळे आमची + फौज बहुत शेर आहे ... " वस्तुतः पाहता बरोबरच होते. परंतु हे कुठवर चालले असते? + एकदा का अब्दालीला दिल्लीहून रसद मिळाली की, तो फणा काढणार हे तर उघडच होते. + परंतु, मराठ्यांनी याचा विचार न करता स्वस्थ बसणेच पसंत केले. याला आणखी एक कारण + होते. भाऊसाहेबांनी स्वारीत आपली पत्नी पार्वतीबाई, नाना फडणवीसांची पत्नी व मातोश्री, + बळवंतराव मेहेंदळ्यांची पत्नी व मुलगा अप्पा बळवंत, विठ्ठल शिवदेव, मानाजी इ. + सरदारांचाही कुटुंबकबीला बरोबर आणला होता. शिवाय अनेक बाजारबुणगेही होते. त्यामुळे + समोरच्यांची चाल पाहण्याआधीच हल्ला करण्याचे भाऊसाहेब टाळत होते. + आता प्रदेशाची भौगोलिक रचना पाहूया. दिल्ली शहराच्या +<<< + +पश्चिमेकडची बाजू ही अरवलीच्या टेकड्यांमुळे मजबूत आहे. दिल्लीपासून +उत्तरेकडे हिंदुकुश, सिंध या भागात जाण्याकरता एक राजरस्ता बांधण्यात आला होता. हा +राजरस्ता उत्तरेकडून वाहत येणाऱ्या यमुना नदीला समांतर होता. यमुना व या रस्त्यांत सुमारे +आठ मैलांचे अंतर होते. या रस्त्यावर कर्नाळजवळच्या कुंजपुऱ्यापर्यंत एकही बळकट +किल्ला व ठाणे नव्हते. मधल्या मुख्य राजरस्त्यालगत अनेक मोंगली सराया किंवा +धर्मशाळा असत. जवळपास पिण्याच्या पाण्याची टाकी, एखाददुसरी खानावळ आणि +प्रार्थनास्थळ म्हणजेच मशिदही असे. या मुख्य राजरस्त्यावर दर सव्वा कोसांवर एक सुरक्षा +मनोरा (वॉच टॉवर) असे. दिल्ली ते उत्तरेकडच्या प्रदेशादरम्यान फक्त वाळवंट होते. यमुनेच्या +खोऱ्यात इथे प्रचंड मोठी रेताड मैदाने तयार झाली होती. याच रस्त्यावर असलेले हे +गाव सोनपत आणि कर्नाळच्या दरम्यान एका टेकाडाच्या उतरणीवर वसले होते. पूर्वेकडून +मोंगली राजरस्ता जात होता. त्याच्याही पूर्वेकडे सुकरतालचा भाग ओलांडल्यानंतर लगेच +रोहिलखंडाची सुरू होत होती. अर्थात यावेळचा नजीबखान रोहिला हा रोहिलखंडचा +राजा होता आणि मुख्य म्हणजे यानेच अब्दालीला बोलावले असल्याने तो मराठ्यांच्या +विरोधात होता उघड. या वाळवंट��� प्रदेशात सर्वात जवळचा सुपीक प्रदेश जर +कोणता असेल तर तो रोहिलखंड होता. यामुळे मराठ्यांना आता पुढे जास्त काळ +लागला तर अन्नधान्याचीही तोशीस लागणार हे उघडच होते. मराठ्यांची छावणी +पानिपतपासून पाच कोस उत्तरेला असणाऱ्या 'घरौंदा' या गावापर्यंत पसरली होती. मराठी +सैन्य टेकडीच्या साधारणतः दक्षिणेकडे किंवा बरेचसे आग्नेयेकडे होते. यावेळेस +सदाशिवरावभाऊंनी पानिपताच्या आसपास असणारा खंदक साफ करवून घेतला व त्या +खंदकाच्या आतही मराठी सैन्य उतरले. + आता मराठ्यांची सैन्यरचना कशी होती हे पाहूया. भाऊंनी इब्राहीमखान गारदी याला +आपल्या मुख्य तोफखान्यासह पुढच्या भागात ठेवले होते. इब्राहीमखानाने खंदकाच्या +बाहेरच्या बाजूला दगड-विटांचे उंच धमधमे बांधले व त्यावर आपल्या लांबपल्ल्याच्या तोफा +चढवल्या. या मुख्य तोफखान्याच्या मागे सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, समशेरबहाद्दर अशी +खाशी मंडळी आपापल्या हुजुरातीच्या सैन्यासह उभी होती. भाऊसाहेबांच्या पश्चिम बाजूला +शिंद्यांचा गोट होता. शिंद्यांच्या पश्चिमेकडे मल्हारराव होळकर उभे होते. होळकर, शिंदे आणि +पेशव्यांच्या उत्तरेला यशवंतराव पवार, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव विंचूरकर इ. +सरदार फौजेसह होते. यांच्या मध्यभागी छावणीचा बाजार त्यामागे काही नोकरचाकर +(बुणगे) आणि सर्वात शेवटी गारद्यांचा पहारा होता. दि. १ नोव्हेंबर १७६० या दिवशी +अब्दाली पानिपतावर आला आणि पहिल्यांदाच थेट मराठ्यांना भिडला. दोघांच्यातही +चकमक झाली. परंतु काही वेळातच अब्दालीने आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा हुकूम +दिला. ३ नोव्हेंबर या दिवशी अब्दालीची छावणी दहाड या गावाच्या दक्षिणेस पडली. +पहिल्याच हल्ल्यात आवेशाने आलेला अब्दाली मराठेही जय्यत तयारीत आहेत हे पाहताच +तितक्याच जोराने (की मराठ्यांच्या झटक्याने!) मागे आला. या चकमकीनंतर अब्दाली +स्वतःहून हल्ला करण्याचा बेत टाळत होता. याचाच फायदा घेऊन मराठे रात्रीच्या वेळेस +<<< + +अब्दालीच्या फौजेत शक्य होईल शिरून हाती येतील ते उंट, हत्ती आणि बैल +पळवत होते. पंधरा-वीस दिवसांतच मराठ्यांनी अब्दालीच्या छावणीतून बाराशे चारशे +उंट आणि चार हत्ती पळवले. यामुळे अब्दाली चिंतेत पडला. कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजेच +दि. २२ नोव्हेंबर या रात्री चंद्रग्रहण येत होते. ग्रहणकाळात हिंदू लोक धार्मिक कार्यात मग्न +असतात हे अब्दालीला माहित होते. त्यामुळे अब्दालीने आपल्या वझीराला लहानश्या +तुकडीसह मराठ्यांच्या छावणीत टेहळणी करायला पाठवले. आपण धर्मकार्यात गुंतलोय +याचा फायदा घेण्यासाठी अब्दाली हालचाल करणार याची मराठ्यांना कल्पना होतीच. +अब्दालीचा वझीर शहावलीखान पठाण शिंद्यांच्या छावणीजवळ येऊन टेहळणी करत +असतानाच शिंद्यांच्या तुकडीने त्याच्यावर हल्ला चढवला. शहावलीखान या अचानक +आलेल्या हल्ल्याने पुरता गांगरला. मराठे त्वेषाने हल्ला करीत होते. हा कोलाहल ऐकून + आपापल्या छावणीतले इतरही सैन्य परस्परांच्या मदतीला धावून आले. या लढाईत चारशे +पठाणांना कापून, पाच-सातशे जणांना जखमी करून हाती लागली अंदाजे दीड- +दोनशे घेऊन मराठे परत फिरले. त्यामानाने मराठ्यांचे फार कमी नुकसान झाले. मराठे +तीसएक मृत्युमुखी पडले आणि शंभर-दीडशे जखमी झाले. नंतर काळोख पडला. त्यामुळे +दोघांनीही माघार घेतली. यानंतर अब्दालीने मनाशी काहीएक ठरवून दि. १ डिसेंबर १७६० +रोजी माघार घेतली. याची अनेक कारणे होती. मराठ्यांच्या जवळ छावणी ठोकल्याने +मराठ्यांचा सतत उपद्रव होत होता. जर दिल्लीच्या दिशेने अब्दालीला मदत आली असती तर +मराठ्यांनी त्यातही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असता. शिवाय +दक्षिणांगास अब्दाली जेथे उतरला होता त्या प्रदेशाला उत्तरेकडून येणाऱ्या एका +कालव्यातूनच पाणीपुरवठा होऊ शकत होता. परंतु, हा कालवा प्रथम मराठी फौजांकडून +जात असल्याने मराठ्यांनी या कालव्याचे पाणीच बंद केले असावे. त्यामुळे पाणी +मिळवण्याकरता व इतरही कारणास्तव अब्दालीला यमुनेच्या तीरावरच जाणे भाग होते. + अब्दालीने आपली छावणी पूर्वीच्या जागेहून पाच-सहा कोस मागे म्हणजेच आग्नेयेला यमुना +नदीच्या जवळच असणाऱ्या जलालपूर गावाच्या आसपास पसरली. अब्दालीने मागे हटताना +मार्गातली सर्व झाडे तोडून एक मोकळे मैदान बनवले आणि मध्यभागी एक खांब बसवण्यात + आला. नंतर सुमारे दीड महिनाभर दोन्ही सैन्यात याच ठिकाणी चकमकी घड़त होत्या. +अब्दालीचे सैन्य हे पठाणांचे आणि रोहिल्यांचे होते. हे सैन्य मोकळ्या मैदानात शेर होते, परंतु + अडचणींच्या जागेत मात्र मराठ्यांचा हात कोणीही धरू शकला नसता. म्हणूनच अब्दालीने +बहुतेक मैदान बनवले असे वाटते. + दि. ७ डिसेंबर १७६० या दिवशी पहिली मोठी चकमक घडली. नजीबखान रोहिल्याचा +भाऊ सुलतानखान हा सात हजार रोहिले आणि पठाणांना घेऊन पेशव्यांच्या फौजेवर चालून +आला. तो ज्या दिशेने जात होता तेथे सरदार बळवंतराव मेहेंदळ्यांची होती. +सुलतानखान येतोय हे पाहताच बळवंतराव मेहेंदळे आपल्या लोकांना घेऊन ते चालून +निघाले. परंतु, दुर्दैवाने सुलतानखानाच्या सैन्यातील एकाच्या बंदुकीच्या (जंबुरीयाच्या?) +गोळीने त्यांच्या छातीला भयंकर दुखापत झाली. ही चकमक मराठी सैन्यापासून थोड्या +<<< + +अंतरावर चालली असल्याने मराठ्यांच्या तोफांनी रोहिले आणि पठाणांचा अचूक वेध घेतला. +त्यामुळे हजारएक रोहिले सहज मरून पडले. रोहिल्यांच्या काही जणांनी बळवंतराव +मेहेंदळ्यांना ओढले आणि त्यांची मान कापण्याकरता पुढे सरसावले. हे पाहून मराठे त्वेषाने +पुढे सरसावले. त्यांनी बळवंतरावांचा निष्प्राण देह माघारी सैन्यात आणला. बळवंतराव +पडल्यामुळे सदाशिवरावभाऊंना मोठा धक्का बसला. सैन्यात बळवंतरावांचा पुत्र आप्पा +बळवंत मेहेंदळे आणि बळवंतरावांची पत्नीही होती. बळवंतराव गेल्याने आकांत उडाला. +बळवंतरावांची पत्नी सती जायला तयार झाली. सैन्यात ब्रह्मवृंदही असल्याने धार्मिक + सती जाण्याचा विधी पार पडला. + याच सुमारास अफगाणिस्तानातून अब्दालीचा हस्तक असणारा अताईखान हा सरदार +आठ हजार पठाणांना घेऊन हिंदुस्थानात आला होता. परंतु येताना तो सिंध आणि पंजाबात +घुसून शिखांवर चालून गेला आणि नंतर, बहुदा यमुनेच्या पूर्वेने पेशव्यांच्या फौजेला +थांगपत्ताही न लागू देता अब्दालीपर्यंत पोहोचला. त्याच्या पंजाबातील तिकडून +मराठ्यांना येणारी रसद बंद पडली. आता मराठी फौजांना अन्नधान्याची निकड भासू +लागली. इकडे अब्दालीच्या फौजांत आता सारे आलबेल होते. सदाशिवरावभाऊंनी दिल्लीत +असणाऱ्या नारो शंकर आणि गोविंद बल्लाळ बुंदेले यांना दक्षिणेतून येणाऱ्या अब्दालीच्या +रसदा मारण्याचे लिहिले. गोविंदपंत बुंदेले हे थोरल्या बाजीरावांच्या समवयस्क असल्याने +त्यांचे वयही आता साठीच्या घरात होते नक्कीच. परंतु तरीही नारो शंकरना दिल्लीची +व्यवस्था बघण्यासाठी मागे थांबवून गोविंदपंत आपल्या सैन्यासह दक्षिणेला निघाले. मेरठ +प्रांतातून अब्दालीला रसद मिळत होती. गोविंदपंत बुंदेले आपल्या सैन्यासह मेरठमध्ये घुसले +आणि त्यांनी सर्रास लुटालुटीला आरंभ केला. अब्दालीला थोड्याच दिवसात ही गोष्ट +समजली. त्याने गोविंदपंत बुंदेल्यांना रोखण्याकरता अताईखान या आपल्या नव्या सरदाराला +मेरठकडे पाठवले. या अताईखानाबरोबर मुसेखान बलुची हा वाटाड्याही देण्यात आला. +यावेळी या अताईखानाजवळ पाच हजार पठाण होते. अताईखान अजिबात चाहूलही +न लागू देता मेरठमध्ये घुसला. त्या दिवशी संध्याकाळ झाली असल्याने गोविंदपंत बुंदेले +स्नान आणि सायंसंध्या करून भोजनाची तयारी करत असतानाच ते पाच हजार +पठाण तिथे चालून आले. गोविंदपंत घोड्यावर बसून पळण्याच्या बेतात असतानाच +पठाणांनी त्यांना गाठले. या दोनदा गोविंदपंत घोड्यावरून पडले. पण तिसऱ्या +खेपेस घोड्यावर चढण्याच्या आतच पठाणांचा वेढा पडला. गोविंदपंतांनी तलवार +उपसायच्या आतच त्यांचे मस्तक कापले गेले. गोविंदपंतांचा मुलगा बाळाजी गोविंद +कसाबसा दिल्लीस पोहोचला. इकडे अताईखानाने गोविंदपंतांचे शीर भाल्यावर खोचून + गाठले. अब्दालीने ते शीर तसेच सदाशिवरावभाऊंकडे पाठवून दिले. +सदाशिवरावभाऊ तो प्रकार पाहून भयंकर संतापले. त्यांनी गोविंदपंतांचे यथायोग्य दहन +केलं. याउपर एक प्रश्न उरतो की, गोविंदपंतांसारख्या हुशार माणसाला अताईखानाच्या +हल्ल्याची खबर नव्हती? नव्हती! एकतर अताईखान येताना भुलवण्यासाठी मराठ्यांची +निशाणे येत होता आणि दुसरे म्हणजे जेता गुजर नावाच्या एका जाटाने +<<< + +गोविंदपंतांचा घात करून अब्दालीला सैन्य पाठवण्याकरता वाट करून दिली होती. + दि. ३० डिसेंबर ते १० जानेवारी १७६१ या काळात अब्दालीने आपली यमुनातीरावरची +छावणी परत हलवून पानिपतास जाणाऱ्या मुख्य राजरस्त्यालगत आणून ठेवली. याच वेळी +कुंजपुऱ्यात मारल्या गेलेल्या नजाबतखानाचा मुलगा दिलेरखान याने उत्तरेत +जाऊन ज्याप्रमाणे मागे मराठ्यांनी कालवा अडवला तसेच, आता मराठ्यांचे पाणी +तोडण्यासाठी कालवाच फोडून टाकला. परंतु, आसपासच्या गावातल्या विहिरी शाबूत + असल्याने पाण्याची फार टंचाई अजूनतरी जाणवत नव्हती. शिवाय आजूबाजूला असलेल्या +गावांमधली लोकं अब्दालीच्या स्वाऱ्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्याने पैशाकरता रुपयास एक +कळशी याप्रमाणे पाणी विकत होती. + दि. १० जानेवारी १७६१ ���र्यंत सारा रंगच बदलला होता. अहमदशहा + अब्दाली आपल्या सैन्यासह पुन्हा राजमार्गानजीक मराठ्यांच्या समोर येऊन उभा ठाकला. +याआधी उभय पक्षांमध्ये वाटाघाटी करून तह करण्याची भाषाही सुरू होती. मुख्यतः + अब्दालीचा वजीर शहावलीखान हा मुत्सद्दी आणि दूरदृष्टीचा होता. मराठ्यांकडून + आपल्याला पैसाही मिळत असेल आणि आपले सैन्यही वाचणार असेल तर तह झाला +पाहिजे, या मतास तो अनुकूल होता. परंतु, अब्दालीचा आणखी एक साथीदार नजीबखान + रोहिला हा मात्र तह करण्याच्या विरोधात होता. नजीबखानाचा प्रदेश हा दिल्लीला लागूनच + असल्याने मराठे आपल्याला सतत छळत राहणार, त्यापेक्षा आत्ताच त्यांना दिल्लीतून +हाकलून लावावे असे त्याला वाटत होते. या नजीबखानाच्या सैन्यातील एका काजीने, त्याचे + नाव होते काजी 'इद्रिसखान', त्यानेही फतवा काढला की, "खऱ्या मुसलमानाने क्षुद्र +खंडणीकडे न पाहता पवित्र धर्माप्रमाणे वागायला हवे. कुरान-ए-शरीफ आणि मरहूम महंमद +पैगंबरांच्या आदेशानुसार (?) सच्च्या इस्लामी बंद्याने काफिरांविरुद्ध धर्मयुद्ध करावे व जन्नत + मिळवण्यासाठी जास्तीत जास्त हिंदूंची कत्तल करावी!" त्याच्या या फतव्यामुळे अब्दालीच्या +फौजेतले अंधश्रद्ध अफगाण (अर्थात सगळेच!) पेटून उठले व जणू त्यांनी काफिरांना कापून + अशा तोऱ्यात आघाडी उघडली. + मराठ्यांच्या छावणीत आता अन्नधान्याची फारच कमतरता भासू लागली. कितीही पैसा +द्यायचा ठरवलं तरी धान्य तर हवे ना! शेवटी धान्यसाठा पूर्णतः संपायच्या आत उपासमार +होऊन मरण्यापेक्षा लढणे योग्य असा विचार करून मराठ्यांच्या फौजेतले सैन्याचे सुभेदार +सदाशिवरावभाऊंकडे लढण्याची मागणी करू लागले. पौष शुद्ध सप्तमी, मंगळवार म्हणजेच +दि. १३ जानेवारी १७६१ या दिवशी सदाशिवरावभाऊंनीही आपला लढण्याचा विचार पक्का +केला. बाजारात असलेले राखीव धान्य साऱ्या भुकेल्या फौजेत वाटण्यात आले. रात्रीच्या +वेळेस जेवणं झाल्यानंतर सदाशिवरावभाऊंनी, समशेरबहाद्दर, रघुनाथराव, विश्वासराव, +इब्राहिमखान, नाना फडणवीस, नाना पुरंदरे अशा सर्व प्रमुखांना छावणीत बोलावले. +सर्वानुमते 'उद्याच झुंज घ्यावे' असे ठरले. भाऊसाहेबांनी युद्धाचा व त्यानंतर कोणी, कसे +काय करायचे याचा आराखडा सर्वांपुढे मांडला. 'युद्ध आपणच जिंकणार! परंतु जर +तसे न होता गिलचे आ���ि अफगाण जोरावर आले तर युद्धभूमी सोडून बाहेर जावे. +<<< + + बाहेर इतरत्र झाडांचा मार्ग असल्याने तोफखाना नेणे कष्टाचे होईल. त्यामुळे दिल्लीच्याच +रोखाने जावे. परंतु तिथेही अब्दाली असल्याने तो रस्ताही सुरक्षित नाही, तेव्हा पूर्वेच्या +रोखांस पाच कोसांवर यमुना ओलांडून दिल्लीकडे जावे व दिल्लीस फौज हुशार करून पुन्हा +झुंज घ्यावे.' शेवटी "दिल्लीचे रोखे जाण्याचा उपाय (ठरला!)." यानंतर प्रत्यक्ष रणांगणावर +सैन्याची व्यूहरचना कशी करायची याबाबत खल सुरू झाला. इब्राहिमखान गारदी हा प्रथम +निजामाच्या सैन्यातला असल्यामुळे आणि तो फ्रेंच युद्धपद्धती शिकल्यामुळे +सदाशिवरावभाऊंनी इब्राहिमखानाला बोलावून त्याच्या युद्धपद्धतीचा विचार करावा, असे +ठरवले. इब्राहिमखानाने आपली फ्रेंच पद्धतीची रचना सांगितली, "प्रथम सैन्याचा वर्तुळाकार +व्यूह बनवून त्याच्या आत बाजारबुणगे, बायका-मुले व नोकरचाकर ठेवावेत; चारही बाजूंना +मोठे अनुभवी सरदार-दरकदार ठेवावेत; हलक्या तोफा आजूबाजूला आणि मोठ्या लांब +पल्ल्याच्या तोफा गिलच्यांच्या समोर ठेवाव्यात. त्यामागे गाडद्यांचा रिसाला, त्यामागे + ठेवावी आणि मध्यभागी जनाना ठेवून त्यामागे अशीच फौज ठेवावी व झुंज +करावे!" इब्राहिमखानाच्या या व्यूहरचनेचा आपल्याला बराच फायदा होऊ शकेल असे +सदाशिवरावभाऊंना वाटले. त्यांनी ताबडतोब इब्राहिमखानाच्या पद्धतीस होकार दिला. परंतु +मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड, शिंदे इ. सरदारांना ही मसलत पटली नाही. त्या +लोकांनी भाऊसाहेबांना या नव्या पद्धतीने लढण्यापेक्षा 'गनिमी काव्याने' करावी असे +सुचवले. परंतु, भाऊंनी त्यांना या नव्या पद्धतीचा फायदा सांगून 'गनिमी कावा' नाकारला. +याचा परिणाम पुढे शिंदे-होळकरांच्या लढण्यावरही होणार होता. भाऊसाहेबांच्या +कडकपणामुळे त्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणातही नसल्याने सारे गप्प बसले. +शेवटी मसलत संपली व निरोपाचे घेऊन सारेजण उद्याच्या लढाईचा विचार करत +झोपायला गेले. + पौष शुद्ध अष्टमी शके १६८२, बुधवार म्हणजेच दि. १४ जानेवारी १७६१ चा दिवस +उजाडला. मराठी सैन्य पहाटेच जागे होऊन प्रातर्विधी-स्नान उरकून, देवपूजा करून आणि + खाऊन युद्धास सज्ज झाले. सर्वप्रथम इब्राहिमखान गारदी आपल्या मोठ्या तोफांसह + आग्नेय बाजूला ��ीड कोसांवर आपल्या गाड़दी सैन्यासह जाऊन उभा राहिला. +त्याच्यामागे ठरल्याप्रमाणे विठ्ठलराव विंचूरकर, दमाजी गायकवाड, अंताजी माणकेश्वर, +नारायण बाजी रेठरेकर इ. सरदार आपापल्या सैन्यासह होते. दमाजी मागे व +रांगेच्या मध्यभागी सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव हत्तीवर अंबारीत बसले होते. यांच्या +साधारणतः वायव्येला, काहीशा उत्तरेला बाजारबुणगे आणि स्त्रियांचा जनाना होता. यातच +व्यापारी आणि इतर नोकर-ब्रह्मवृंदही होता. सदाशिवरावभाऊ आणि या लोकांच्या मध्ये +नाना पुरंदरे, यशवंतराव पवार, समशेरबहाद्दर, सखोजी जाधवराव इ. सरदार फौजेसह होते. +खासा जनाना व बाजारबुणग्यांच्या मागे जनकोजी शिंदे व पेंढारी होते आणि सर्वात मागच्या +बाजूला मल्हारबा होळकर आपल्या तुकडीसह होते. + अहमदशहा अब्दालीच्या टेहळणी पथकांनी १४ जानेवारीच्या पहाटे मराठ्यांच्या या +हालचालींची बातमी अब्दालीला दिली. परंतु, अब्दालीसमोर मोठा पेच होता की, मराठे +<<< + +आग्नेयेकडे तोंड करून आहेत. ते दक्षिणेकडे का पूर्वेकडे जातील याचा भरवसा नाही व +आपली व्यूहरचना तयार होण्यात वेळ जाईल. त्यामुळे दक्षिणेचा राजमार्ग आणि पूर्वेचा +यमुनामार्ग रोखण्याकरता अब्दालीने पूर्व-दक्षिण अशा चंद्रकोरीच्या आकाराची सैन्यरचना +केली. मराठ्यांच्या हुजुरातीच्या म्हणजे खाशा पेशव्यांच्या समोर अहमदशहा अब्दाली आणि +त्याचा वजीर शहावलीखान उभे होते. शहावलीखानाच्या उजव्या बाजूला हाफीज रेहमतच्या +हिंदी रोहिल्यांचे पायदळ होते. त्याच्या उजवीकडे आणि होते. +अब्दालीच्या डाव्या बाजूस शुजाउद्दौलाचा तोफखाना आणि तीन हजार पायदळ, त्याच्या +डावीकडे नजीबखानाचे हशम व स्वतः नजीब होता. शिंदे हे नजीबखानाचे कट्टर +वैरी असल्याने अब्दालीने नजीबाला मुद्दामच शिंद्यांच्या समोरची जगा दिली असावी आणि +सर्वात शेवटी नजीबच्या डाव्या बाजूला शहापसंदखान आणि त्याचे पाच हजार स्वार होते. + पहिला प्रहर उजाडताच सदाशिवरावभाऊंनी युद्धाची घोषणा केली. त्याचबरोबर +विश्वासरावांनीही सैन्याला जोश दिला आणि क्षणभरातच "छत्रपती शिवाजी महाराज की +जय!" "हर हर महादेव" च्या युद्धघोषणांनी मराठ्यांनी आसमंत दणाणून सोडला. मराठे +आक्रमणास तयार झालेत हे पाहताच अब्दालीनेही आणि त्याच्या सैन्यानेही "अल्ला-हो- +अकबर’ च्���ा आरोळ्या ठोकल्या. दोन्ही फौजा प्रचंड वेगाने एकमेकांवर आक्रमण करण्यास +सिद्ध झाल्या. + आदल्या रात्री ठरल्याप्रमाणे इब्राहिमखान अब्दालीच्या फौजेला खिंडार पाडण्याच्या +हेतूने पुढे सरकला. त्याच्या तोफांनी समोरच्या हाफीज रहेमतच्या रोहिल्यांच्या तुकडीला +खिंडार पाडले. परंतु हे रोहिले बर्कंदाज होते. त्यामुळे इब्राहिमखानाला ती +अख्खी फळीच कापावी लागणार होती. परंतु रोहिल्यांच्या फौजेला खिंडार पडले. या नादात +दमाजी गायकवाड आणि विंचूरकरांच्या फौजा खिंडावर गेल्या. इब्राहिमखानाला असा प्रकार +घडेल याची कल्पनाही नव्हती. विंचूरकर आणि गायकवाड नजीक आल्याबरोबर रोहिल्यांनी +त्या स्वारांवर मोठा गोळीबार सुरू केला. यामुळे हाती फक्त भाले आणि तलवारी असलेले +कित्येक मराठे पडले. हे इब्राहिमला दिसत असूनही तो काहीही करू शकत नव्हता. जर +त्याने तोफांचा मारा केला असता तर त्यात मराठेच जास्त मरण्याची शक्यता होती. नेमका +याचाच फायदा रोहिल्यांना झाला. त्यांची रांग पुन्हा साधली गेली आणि ते थेट मराठ्यांच्या +तोफखान्यावर तुटून पडले. यामुळे तोफखाना बंद झाला. इब्राहिमने आपल्या इतरही +गाडद्यांना पुढे आणले आणि रोहिल्यांचे व त्यांचे भयंकर युद्ध सुरू झाले. सुमारे एक प्रहरभर +युद्ध झाल्यावर इब्राहिमखानाच्या आठ हजार गाडद्यांनी वीस-बावीस हजार रोहिल्यांचा साफ +धुव्वा उडवला. सुमारे दहा हजार रोहिले मारले गेले व बाकीचे पळत सुटले. + दुसऱ्या बाजूस अब्दालीचा वजीर शहावलीखान पेशव्यांच्या उजव्या बाजूवर उतरला. +त्याच्या तोफखान्याने मराठ्यांवर हल्ला केला. परंतु, मराठ्यांच्या तोफांनीही त्याला चांगलेच +प्रत्युत्तर दिले. शेवटी शहावलीखानाचा तोफखाना मागे हटू लागला. हे पाहताच सखोजी +जाधवराव, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे, अंताजी माणकेश्वर, मानाजी संताजी +वाघ, यशवंतराव पवार, धडफळे, खंडेरावराजे निंबाळकर आणि खुद्द सदाशिवरावभाऊ, +<<< + +विश्वासराव, समशेरबहाद्दर हे खासे गिलच्यांवर चालून निघाले. यात भाऊसाहेबांच्या नकळत +एक चूक झाली ती म्हणजे गिलच्यांना मारण्याच्या नादात मराठे आग्नेयेकडून दक्षिणेकडे +वळले. घोड्यांचे लगाम सैल सोडून हातचे भाले आणि तलवारी हवेत उंचावून 'हर हर +म्हादेव'च्या गर्जना करीत हे मराठे शहावलीखानाच्या अफगाणांवर आणि गिलच्यांवर तुटून +पडले. मराठ्यांच्या या भयावह आवेशाने अफगाण आणि गिलचे घाबरून मागे सरले. बरेचसे +गिलचे हातघाईत मारले गेले. यातच, मेरठजवळ गोविंदपंत बुंदेल्यांना ठार करणारा +अताईखान पठाणही मारला गेला. या धुमश्चक्रीत शहावलीखानाजवळ जेमतेम दोनशे +सैनिकच जिवंत उरले. सुरुवातीला झुंजात उतरलेला अहमदशहा मात्र नंतर प्रत्यक्ष युद्धाला +तोंड लागताच आपल्या छावणीत (घाबरून!) जाऊन बसला. शहावलीखानाच्या पराभवाची +वार्ता समजताच तो जास्तच घाबरला. वजीराची फौज पळतेय हे पाहून मात्र तो चिडलाच. +शेवटी जे होईल ते पहावे हे समजून त्याने आपल्या राखीब पठाणी सैन्याला पाठवून त्या +पळणाऱ्या गिलचे व पठाणांना पुन्हा लढाईत जाण्यास उद्युक्त केले. अब्दालीने पुन्हा +आपल्या फौजेची रचना चंद्रकोरीसारखी पूर्ववत केली आणि आपल्या वजीराला म्हणजेच +शहावलीखानाला नव्या फौजेसह पुन्हा हुजुरातीच्या दिशेने पाठवले. आधीच्या हल्ल्यात +शहावलीखानाचे पळालेले सैन्य पुन्हा येणार नाही असे वाटल्याने पेशव्यांची हुजुरातीची फौज +परत माघारा फिरली होती. ते मुख्य सैन्यात जाऊन पाणी पिऊन जरा ताजेतवाने होतात न +होतात तोच शहावलीचे नवै सैन्य येऊन कोसळले व कापाकाप करून इतरांचा हल्ला +व्हायच्या आत पुन्हा माघारी फिरले. या हातघाईत सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव +हत्तीवरच्या अंबारीतून उतरून घोड्यावर स्वार झाले होते. शहावलीच्या नव्या हल्ल्यातच +गिलच्यांच्या एका बंदुकीने अथवा जंबुरियाने विश्वासरावांचाच वेध घेतला. घाव वर्मी बसून +केवळ एकोणीस वर्षांचा तो तरुण अन् राजबिंडा राजपुत्र पडला. उद्याचा पेशवाच मारला +गेला. सदाशिवरावभाऊ विश्वासरावांच्या जवळच होते. विश्वासराव पडले हे पाहताच +भाऊसाहेबांनी त्यांचा निष्प्राण देह त्यांच्या हत्तीवरच्या अंबारीत सुरक्षित ठेवला. आपला +पुतण्या पडला, नानासाहेबांचा थोरला पुत्र पडला, उद्याचा पेशवाच पडला हे सहन न होऊन +भाऊसाहेबांचा धीरच सुटला. विवेक संपला, उरला फक्त अविवेक! आता शत्रूला तरी मारीन +नाहीतर मी तरी मरीन या हेतूनेच भाऊसाहेब पुन्हा स्वार झाले आणि अफगाणांवर तुटून +पडले. + इकडे मात्र वेगळेच दृश्य दिसत होते. दुपारी तिसऱ्या प्रहरी मध्यावरच मल्हारबा +होळकर, साबाजी शिंदे, विंचूरकर, दमाजी गायकवाड, गंगोबातात्या चंद्रचूड इ. +सरदार मैदान सोडून न पळत सुटले. मुळातच होळकर-शिंद्यांना लढाईची ही +पाश्चात्य पद्धत मान्य नव्हती. परंतु भाऊसाहेबांच्या धाकामुळे ते मैदानात उतरले होते. आता +भाऊसाहेब गुंतल्याचे पाहताच या लोकांनी पाय घेतला. गनिमी काव्याने लढू +म्हणणाऱ्या व प्रत्यक्षात "सर सलामत, तो या न्यायाने शिंदे- +होळकरांनी केवळ स्वतःचा जीव वाचवण्याच्या हेतूने पळ काढला. "हा पेशवा फुकटचा +मरणार आहे, पण मग त्याच्याबरोबर आपण का जीव द्यावा?" नाना फडणवीस या +<<< + + लोकांबद्दल लिहितात की, " ... लक्ष सैन्य, त्यात मोठे सरदार असता एकही ऐन (त्या) समयी + श्रीमंतास (भाऊसाहेबांस) आप्त न जाहला. बहुत दिवस अन्न भक्षिले, कृपा-पुत्रवत केली, + तितके चांगला काळ होता तेव्हा केशास धका लागल्या (स) प्राण देऊ अशी प्रतिज्ञा. परंतु + ईश्वरघटीत विपरीत काळ त्यास सोबती कोण होतो? सर्व (फक्त) सुखाचे सोबती ... " यानंतर + गिलच्यांच्या अनेक लोक पडले. खासे भाऊसाहेब मात्र केवळ शे-दीडशे + राऊतांनिशी होते. + इकडे सुरुवातीला नजीबखान शिंद्यांच्या समोर असल्याने जनकोजी शिंद्यांना + अब्दालीच्या नरड्याचा घोट घ्यायची इच्छा होती. परंतु नजीबखानाची लढाईची पद्धत + वेगळीच होती. तो प्रथम पेटते बाण सोडून आपल्यापासून काही अंतरावर धुराचा पडदा + बनवत असे. यानंतर त्याचे पायदळ पुढे सरकून एक खंदक खणत असे व त्या आडून + बंदुकींचा मारा केला जात असे. यामुळे मराठ्यांना, विशेषतः जनकोजी शिंद्यांना जागचे + हलताही येत नव्हते. अशातच नजीब आणि शिंद्यांच्यात अर्धा कोसाचे अंतर राहिले असताना + विश्वासराव पेशवे पडल्याची वार्ता आली आणि शिंद्यांचे सैन्य, साबाजी शिंदे-होळकर पळत + सुटले. शिंद्यांची जनकोजी, महादजी, तुकोजी वगैरे मंडळी मात्र भाऊसाहेबांच्या खाशा + हुजुरातीच्या फौजेत घुसली. शिंदे-होळकर पळाले आणि इब्राहिमखान गारदी पडला हे + पाहताच अहमदशहाने आपल्या सरदारांना वेढा आवळण्यास हुकूम दिला. यानुसार + भाऊसाहेबांच्या उजव्याबाजूने नजीबखान, शुजाउद्दौला, शहापसंदखान इ. सरदार, डाव्या +बाजूने बेग, बरखुद्दारखान इ. सरदार व समोरून अब्दालीचा वजीर + शहावलीखान हा आपल्या सैन्यासह चालून गेले होते. चौथ्या प्रहराच्या सुरुवातीला खासे + भाऊसाहेब, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, रामाजीपंत दाभोळकर, हरिपंततात्या व + बापूजीप��त फडके, नाना फडणवीस अशी मोजकीच माणसे होती. शेवटी शहावलीखानाने + आपले अफगाण सैनिक जोराने पुढे घुसवले व फास पक्का आवळला. यावेळी नाना + फडणवीस बाहेर असल्याने ते तडक पानिपताकडे पळत सुटले. जेणेकरून आता + मागचा खासा कबिला शत्रूहाती पडू नये. इकडे पठाण अगदीच अंगावर येताहेत हे पाहताच + भाऊसाहेबांनी अखेरची युक्ती म्हणून शहाजणे वाजवण्यास हुकूम दिला. जेणेकरून पळत + असलेले मराठे 'आपण जिंकलो' असे वाटून मागे फिरतील. पण भाऊंचे प्रयत्न फोल ठरले, + मराठे परतलेच नाहीत. आता मात्र सदाशिवरावभाऊ, जनकोजी व तुकोजी शिंदे आणि इतर + शे-पन्नास लोक प्राणपणाने लढू लागले. पण किती तुकोजी शिंदे घोड्यावरून + उतरले आणि काही वेळातच ठार झाले. जनकोजी मात्र भोवळ येऊन बेशुद्ध होऊन पडले. + आता फक्त भाऊच राहिले होते आणि अचानक, गिलच्यांच्या तेगीचा फटका भाऊसाहेबांच्या + मानेवरच उतरला ...... आता सूर्यास्त झाला होता! + नाना फडणवीस पळून मागे छावणीत आले. परंतु पाहतात तो तेथे कबिला नव्हताच! + भाऊसाहेबांनी यापूर्वीच आपल्या मागे स्त्रियांना अब्दालीच्या हाती न लागू देता बाहेर + काढण्याची व्यवस्था केलेली होती. याकरता विसाजी कृष्ण जोगदंड याला पाचशे धनगरांसह + मागे ठेवले होते. परंतु विसाजी कृष्ण ऐनवेळी कुठे नाहीसा झाला ते समजत नाही, यावेळी +<<< + +जानू भिंताडे नामक खिजमदगाराने पार्वतीबाईंना घोड्यावरुन सुखरूप बाहेर काढले होते. +त्यांच्याबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने पिराजी राऊतराव व नाना पुरंदरेही होते. या लोकांनी +अब्दालीचे सारे सैन्य हुजुरातीवर केंद्रीत झाले आहे हे पाहून मुख्य राजरस्त्याच्या बाजूनेच +दक्षिणेचा रस्ता धरला. + शुजाउद्दौल्याने विश्वासरावांच्या मुडद्याचा हत्ती ताब्यात घेतला. खासा अहमदशहा +अब्दाली विश्वासरावांचे प्रेत पाहण्यास आला. केवळ अठरा-एकोणीस वर्षांचा तो सुंदर +राजपुत्र शांतपणे निजलेला पाहून सगळ्यांनाच (अब्दालीच्या कठोर पठाणांनाही!) हळहळ +वाटली. अब्दालीने तर तोंडात बोटे घातली! पेशव्यांची मुलंच अशी आहेत तर पेशवा कसा +असेल ... यानंतर शुजाने ते प्रेत आपल्या छावणीत नेलं आणि त्याचा साथीदार काशिराजाच्या +ब्राह्मणांनी विश्वासरावभाऊंचे शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार केले आणि त्यांच्या अस्थी +प्रयागास पाठवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी शुजाने संपूर्ण रणमैदान फिरून-कोणी जिवंत +आहे का हे पाहिले. अशातच त्याला एक शिर नसलेले परंतु उंची वस्त्रे आणि मौल्यवान +मोत्यांचे अलंकार जवळ असलेले धड मिळाले. शुजाच्या बरोबर पूर्वी मराठ्यांकडून पळून +आलेले गारदीही असल्याने त्यांनी भाऊसाहेबांचे ते धड ओळखले. त्यावर आदल्यावर्षीच +गारपिराजवळ झालेल्या हल्ल्याची खूण होती. हे धड एका हत्तीवरून शुजाने आपल्या +छावणीत आणवले. त्याच्याच छावणीतल्या एका पठाणाकडे भाऊसाहेबांचे शीरही सापडले. +जनकोजी शिंदे जिवंत कैद झाले होते. ते ताब्यात होते. परंतु आपला वैरी +अजून जिवंत आहे हे पाहताच नजीबखानाने बरखुद्दारखानावर दबाव आणला आणि +जनकोजी शिंद्यांचा खून करवला. विश्वासरावांएवढ्याच वयाचा त्यांचा खास मित्र +दगाबाजीची शिकार बनला. युद्धाच्या अखेरच्या काळात समशेरबहाद्दर मात्र +बाहेर होते. अखेरीस ते जखमी अवस्थेत बाहेर दिगेस पोहोचले. दिगेस +पोहोचल्यावर त्यांना भाऊसाहेबही पडले, ही बातमी समजली. शेवटी जखमा फुटून "भाऊ! +भाऊ !! " असा शोक करत समशेरबहाद्दर मृत्यू पावले. + तीन दिवसांनंतर, दि. १७ जानेवारी या दिवशी अहमदशहा अब्दाली दिल्लीत परतला. +जयपूरच्या सवाई जयसिंहाचा पुत्र माधोसिंह याला लिहिलेल्या पत्रात अब्दाली म्हणतो, +"आमच्या शत्रूनेसुद्धा त्या दिवशी स्वतःला नामांकित करून सोडले. ते इतक्या उत्कटतेने +लढले की, तसे लढणे इतर कोणाच्याही शक्तीबाहेरचे होते ... आमच्या त्या निधड्या छातीच्या +रक्त वाहवणाऱ्या शत्रूंनीही आपल्या कामात कसूर ठेवली नाही. हेच काय, पण अत्यंत +महनीय कीर्तिस्पद अशी कृत्ये रणांगणात करून दाखवली !... " हे पत्र मूळचे फार्सीतले आहे. +याच सुमारास अब्दालीने पुण्याला नानासाहेब पेशव्यांकडेही एक पत्र रवाना केले. 'आमची +स्वतःची इच्छा (युद्ध करण्याची) नव्हती, परंतु तुमच्याच (भाऊसाहेबांच्या) झाले. +त्यात तुमचे बंधू, पुत्र व इतर लोक गेले याचा आम्हासही खेद आहे. आता याउपर आपण +कायमचा तह करावे हेच बरे' या आशयाचे पत्र घेऊन याकुबअलीखान दक्षिणेस निघाला. +परंतु मथुरेस गंगोबातात्या चंद्रचूड, बापूजीपंत हिंगणे इ.नी त्याला अडवले, पेशव्यांकडे +जाण्याची काहीच गरज नाही हे सांगून तात्या व पंतांनी तहाची बोलणी करण्यास सांगितले. +<<< + + तात्यांनी अन्वरउल्लाखान या आपल्या माणसाला अब्दालीला नजर करण्यासाठी + व वस्त्रालंकार देऊन पाठवले. परंतु, यादरम्यानच काहीतरी कारणाने शुजाउद्दौला, +नजीबखान आणि अहमदशहाचा आपापसात बेबनाव झाला. यानंतर शुजा बंगालकडे आणि + नजीबखान रोहिलखंडाकडे निघून गेला, आता मात्र अब्दाली पुरता एकटा पडला होता. + यासुमारास जर पेशव्याने आपली अडचण ओळखून पुन्हा हल्ला केला तर यावेळेस मात्र + आपली खैर नाही. मागच्या वेळेस केवळ तकदीर सिकंदर म्हणून आपण बचावलो. त्यामुळे + आता हिंदुस्थानात धोका आहे हे पाहून अब्दाली मायदेशी पळून गेला. + तिकडे पानिपतावर युद्धाची तयारी सुरू असताना इथे पुण्यातही काही घडामोडी षडत +होत्या. साधारणतः डिसेंबर महिन्याच्या (१७६०) मध्यापर्यंत मैदान मराठ्यांनाच + अनुकूल होते. त्यामुळेच भाऊसाहेब नक्कीच विजयी होऊन परतणार याची नानासाहेबांना + खात्री होती. परंतू सततच्या मोहीमा आणि कर्जाचे ओझे, निजामाकडून आणि इतर + मांडलीकांकडून न आलेली खंडणी, यामुळे कर्ज मिळवण्याच्या हेतूने नानासाहेब पेशव्यांनी + स्वतःचा दुसरा विवाह करण्याचे ठरवले. याकरिता मुली पाहण्यासाठी ते सिद्धटेक या श्री + गजाननाच्या ठिकाणी जाऊन राहिले होते. पुण्याजवळच्या नांदेड गावातून बाबुराव ठकारांची + मुलगी, उचेगावच्या कुलकर्ण्यांची मुलगी, बाजीराव माणकेश्वरांची मुलगी, अशा अनेक मुली + नानासाहेबांनी पाहिल्या. या प्रत्येकीला घरी परत पाठवताना पन्नास-पन्नास रु. दिल्याच्या + नोंदी आहेत. शेवटी पैठणच्या नारायण नाईक वाखऱ्यांची कन्या राधाबाई (माहेरचे नाव?) + पेशव्यांनी पसंत केली आणि मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १६८२ विक्रमनाम संवत्सरी, शनिवारी + म्हणजेच दि. २७ डिसेंबर १७६० या दिवशी हिरडपूर येथे नानासाहेबांचे आणि नऊ वर्षांच्या + राधाबाईंचा विवाह झाला. विवाहाप्रीत्यर्थ मोठा समारंभ झाला. अनेक चंद्रज्योती उजळल्या + गेल्या. विवाह झाल्यानंतर लगेचच पानिपताहून नाना पुरंदऱ्यांचा स्वार पत्राची थैली घेऊन + आला. पानिपतावरचे वातावरण आता बदलत चालले होते. मराठ्यांच्या कठीण काळास + सुरुवात झाली होती. नानासाहेब पुरंदऱ्यांनी मदतीचा निर्वाणीचा खलिता पाठवल्यानंतर + नानासाहेब पेशवे लगेचच (जानेवारी सुरुवात, १७६१) चाळीस हजार फौज घेऊन उत्तरेस + रोखाने निघाले. दि. १८ जानेवारी १७६१ या दिवशी नानासाहेब पेशवे माळव्यात + होते. १�� जानेवारीला, म्हणजे चार दिवसांपूर्वीच युद्ध झाले ही बातमी नानासाहेबांना + अजूनही समजली नव्हती. कारण दि. १८ जानेवारी १७६१ ला भाऊसाहेबांना लिहिलेल्या + पत्रात नानासाहेबांनी भाऊंना "अब्दालीस कोंडून राखावे" असं लिहिलं आहे. ते पत्र असे- + "चिरंजीव राजेश्री भाऊ यासी प्रती बालाजी बाजीराऊ प्रधान आसिर्वाद उपरी. वीस +हजार फौजेनसी दरमजल मालव्यात आलो. फौज कोणे मार्गे आपणास रवाना करावी ते + जलद ल्याहावे. माघमासी पूर्वी लिहित आलो त्या अन्वये कुमक पावावी हेच ईश्वराजवळ + इच्छितो. मागाहून पंधरा मजलींचे अतरियाने निजामअली चिरंजीव दादा चालीस हजार दोनी + फौजेसनी नीट हांडियावरून, कोटे बुंदीवरून जयनगरचे (जयपूर) सुमारे येतात. आपण + आबदालीस कोंडून राखावे. सर्व फौज येक होताच सपक्षपातीसह याचे उत्तमप्रकारे पारपत्य +करावे. येक उत्तरे प्रकारे पारपत्य जाहलीया सर्व कामे त्यात होतात. निजामअलीसी विरोध +<<< + +नाही. उसिरामुले गपा उठवितात त्याजवर मदार काय आहे? आमचे मागे पंधरा मजलीचे +अंतराने येतात, संशय नाही. मोगलाई लोक गपा उठवितील त्याजवर काय आहे? पैका किती +पावला, कोठे अटकला आहे हे ल्याहावे. छ१० जमादिलाखर. आसिर्वाद. लेखनसीमा." + यानंतर दि. २४ जानेवारी १७६१ रोजी भेलसा येथे मुक्काम असताना, एका सावकारी +डाकेतील पत्रातून संशयित माहिती समजली. अर्थात हा सावकार म्हणजेच मराठ्यांचा +एखादा सरदारच असला पाहिजे. कारण अब्दाली दरवेळेस पेशव्यांची डाक मारीत असल्याने +एखाद्या सरदाराने पानिपतानंतर चतुराईने हे पत्र पाठवले असावे. एरवी इतर सावकारांना +युद्धाचे काय पडले होते! परंतु त्या पत्रातील "दो मोती गलत, दस बीस आसेरफीत फरकात +खुद्रेकू रुपयाकू गणत या मजकुरावरून नानासाहेबांना पराभवाची आणि प्रचंड +नुकसानीची शंका आली होती. कारण या सांकेतिक भाषेनुसार 'दो मोती' म्हणजेच +सदाशिवरावभाऊ व विश्वासराव 'दस बीस अश्राफत' म्हणजे मोठे सरदार आणि 'रुपयाकू +गणत म्हणजे खुर्दा सैनिकांची तर गणतीच नाही, असाच अर्थ निघत होता. +परंतु, या तर्कावर विश्वास ठेवता येणंच शक्य नव्हतं. शेवटी नानासाहेबांनी तसंच पुढे जायचं +ठरवलं. ग्वाल्हेरच्या दक्षिणेला तीन कोसांवर पाठोरा येथे मुक्काम पडला असतानाच + आलेल्या मल्हारराव होळकर आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच आलेल्या नाना +पुरंदरे, ��ार्वतीबाई, नाना फडणवीस इ. लोकांची आणि नानासाहेबांची भेट झाली. प्रत्यक्ष +त्यांच्याकडूनच पराभवाची आणि विश्वासराव पडल्याची बातमी समजली आणि +नानासाहेबांना जबर धक्का बसला. सदाशिवरावभाऊंची मात्र काहीच माहिती मिळत +नव्हती. अर्थात नाना फडणवीस, हरिपंततात्या फडके यांना सदाशिवरावभाऊ पडले हे +माहिती होते. परंतु, जर ही बातमी पार्वतीबाईंना आणि नानासाहेबांना समजली तर ते +पूर्णपणे खचून जातील. शिवाय दक्षिणेत ही बातमी फुटली तर कर्नाटक भागातील +संस्थानिक आणि निजाम पुन्हा बंड करून उठतील, याची भीती होती. म्हणूनच नाना +फडणवीसांनी सत्य न सांगणेच योग्य मानले. आपल्या पुत्राचा वध करणाऱ्या गिलच्यांना +आपण मारावे, असे नानासाहेब पेशव्यांनी ठरवले. परंतु, युद्धातून परत आलेल्या +मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, नारोपंत इ. माणसांनी अब्दालीवर पुन्हा +चालून जागे शक्यच नसल्याचे सांगितले. त्यांच्या या प्रतिकूल विचारांमुळे नानासाहेबांनी पुढे +जाण्याचा विचार टाळला. नानासाहेबांनी उत्तरेतील सारी व्यवस्था पूर्ववत लावून पुन्हा +दक्षिणेचा मार्ग धरला. दि. १८ फेब्रुवारी १७६१ रोजी भेलसा येथे परतत असताना +नानासाहेबांनी नाना पुरंदरे आणि विठ्ठलपंत विंचूरकर यांना एक पत्र पाठविले. ते पत्र असे- +"चिरंजीव नाना, विठ्ठलपंत यांसी आसिर्वाद. कालगत कठीण. अद्याप भाऊचे ठिकाण लागत +नाही. आदी वाईट प्राप्त जाहले. तर कैसे करावे ते उघडून लिहितो. भाऊही या लोकातून +गेला तर हिंदुस्थानची दौलत गेली. तुमचा-आमचा धीर तो आहे, येणार एवढे आशेवरती. +आठापंधरा दिवसात तुटेल. जर तुटली आशा तर मग सात हजार फौज नवी, तुम्हाकडील +फौज मोडीली. काही कामाची नाही. सात हजार फौजेने काही आबदालीची टकर अथवा या +देशीचे राखवत नाहीत. विठ्ठलपंत म्हणतील की, मी काही होऊ, ग्वाल्हेर राखिन. +<<< + +परंतु येक माणूस जवल राहणार नाही, तेव्हा येकले काय करीतील? (पळणारच ना?). तेव्हा +ग्वाल्हेर, जाटाचे पलीकडील व आलीकडील याचे हवाली (अब्दालीचे) जाऊन देऊ नये. +वोडसेकर, दतियेकर अथवा खांडेराया याचे लेकाचे हवाली करावी. बाह्य रंगे आव भरावा. +परंतु निदान भाऊ नाहीसेच जाहले तर दौलत जाते. गेली ते हिंदू संस्थानिकांस द्यावी. परंतु +पलीकडील जाट मुसलमानांस जाऊ देऊ नये. या प्रांती हे जोर भारी जाहाले. कमाविसदार +स���बंदी वाईट या देशीची ठेवितात. यांच्याने निभवा. जमि(न)दाराने फिसाद केली तर होऊ +सकत नाही. मग अशा वडवानलापुढे कोणाच्याने उभे राहवत नाही. दिलीहून पलाला, यानी +वेढा घातला. तो फार थोडा. हे दुपट आहेत. आता पत्रे गेली बहुत माझी. तरी येता नये. + ते सर्व मिलोन तिकडे परिछिन फिसाद करतील. बसालतजंग कर्णाटकास लांब +जाणार असता बलवंतराव, गोविंद बलाल मारले गेले येवढे माघारे फिरले. +सारांश, असे कालांत चिरंजीव दादाचे येणे होत नाही. येऊन तेही गमाऊ नये इतका विचार +भाऊ नाहीसाच जाहला तर; जर ईश्वरे अघटित लाभ देऊन चिरंजीव भाऊस आणून +बुंदीपावेतो, अजमेरीपावेतो दिल्हे, त्याचे हातचे पत्र दिल्हे, तर तेवढ्यावर दो महिनीयात +चिरंजीव दादा येतील. चिरंजीव भाऊ, दादा, नवी फौज, मी मंत्रज्ञ मात्र (?), सर्व ईश्वर उत्तम +करील. हे पत्र निदानाचे येकले, तुम्ही विठ्ठलपंत, गंगोबा ऐसे मात्र बसून मंत्रभेद न +व्हावयाच्या शफता (शपथा) करून दोनचा वाचणे. यात गपा धैर्याच्या नाहीत व घाबरेपणही +नाही. समयोचित जवल आली यास्तव लिहिले. नाना, हा समये तात्यापेक्षा धैय अधिक +करून लिहिल्या अन्वये समयोचित करावे. छ. १२ रजब मु।। भेलसे." + या पत्रावरून एक गोष्ट स्पष्ट कळून येते की, नानासाहेबांचे आपल्या चुलतभावावर +प्रेम होते. या पत्रात नानासाहेब म्हणतात, "भाऊ गेला तो हिंदुस्थानची दौलतच गेली." +दुसऱ्या एका पत्रात नानासाहेब म्हणतात, "लेक तो (विश्वासराव) अल्पायुषी होता. सूर्यमंडळ +भेदून गेला. ते दुःख परमार्थ शास्त्रपुराणे करून टाकीले परंतु चिरंजीव भाऊ वाचून दुनिया +दौलत व्यर्थ आहे." या दोन्ही उद्गारांवरून असेही दिसते. भाऊ आता या जगात नाही हे +नानासाहेबांना समजले होते. परंतु त्यांनी ते दुःख जास्त दाखवले नाही. + उत्तरेतून परत येताना नानासाहेब पेशव्यांची सुवर्णतुला करण्यात आली. ही तुला +स्वतःच्या समाधानासाठी नव्हे तर पानिपतावर पडलेल्या आपल्या सैन्याच्या, आपल्या +पुत्राच्या आणि बंधूंच्या पराक्रमासाठी होती. ओंकारेश्वर या नर्मदाकाठच्या पवित्र +शिवालयासमोरच तुलादान झाले. यावेळी नानासाहेबांचे वजन भरले फक्त ११४ पौंडांचे. +म्हणजे मागच्या सुवर्णतुलेपेक्षा पेशव्यांचे वजन ६४ पौंडांनी कमी भरले होते (१७५४ = १७८ +पौंड). दि. ६ जून १७६२ या दिवशी नानासाहेब पुण्यात पोहोचले. त्यांची प्रकृती आता भाऊ +आणि विश्वासरावांच्या दुःखाने खंगत चालली होती. + रणमैदानातल्या बातम्या नानासाहेबांना समजल्या होत्या. नाना फडणवीस +जवळपास अखेरपर्यंत लढणारे असे एकटेच होते. बहुदा त्यांच्या युद्धाच्या कथनावरून शिंदे, +होळकर, पवार रणमैदान सोडून माघारी फिरले, हे समजल्याने नानासाहेब पेशव्यांनी या +सरदारांचे महाल जप्त केले. यानंतर मल्हारराव होळकरांचे दिवाण गंगोबातात्या चंद्रचूड यांनी +<<< + +पुण्याला राघोबादादांना पत्र लिहून कळवले, " ... पूर्वीपासून सारा कारभार राव कैलासवासी +(बाजीराव) यांनी राजेश्री सुभेदाराचे (मल्हारबाचे) हाती घेतला (दिला). परंतु आवंदा श्रीमंत +सिरोंजेहून मागे फिरलीयावर खावंदांनी पूर्वलोभास अंतर केले. चाकरांनी सेवा करावयास +अंतर केले नाही ... राजेश्री सुभेदार यांजकडील महाल देशचे जप्त केले म्हणोन यांचे चित्तास + जाहली. आजपावेतो सेवा केली त्याचे फळ हे? पुढे केलीया कळतच आहे !... " +पानिपतावरील झालेले नुकसान पाहता या पत्राचे आश्चर्यच वाटते. या पत्राचे +रघुनाथरावांनी काय केले ते माहीत नाही. परंतु, पुण्यात आल्याच्या आठवड्यातच +नानासाहेबांची प्रकृती बिघडली म्हणून हवापालटासाठी त्यांना पर्वतीवर नेण्यात आले. पुढे +प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे परत शुक्रवार, १२ जून रोजी पुण्यात आणण्यात आले. +यानंतर प्रकृती बरी वाटल्याने पुन्हा सोमवार २२ जून रोजी नानासाहेब पालखीतून +पर्वतीवर गेले. तेथे देवदेवेश्वराजवळच्या आपल्या वाड्यात त्यांना स्वस्थ वाटत होते. +रघुनाथराव मात्र शनिवारवाड्यातच होते. दुसऱ्या दिवशी पेशव्यांनी त्यांना पर्वतीवर बोलवून +घेतले. शेवटी ज्येष्ठ वद्य षष्ठी, शके १६८३, वृषनाम संवत्सरी मंगळवारी, म्हणजेच दि. २३ +जून १७६१ या दिवशी रघुनाथरावांच्या मांडीवर मस्तक ठेवून नानासाहेबांनी प्राण सोडला. +महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मुत्सद्दी पेशवा गेला. पुण्याचा खरा पेशवा गेला. सारे पुणे +हळहळत होते. + मोहिमेवरून पुण्यात परतताच नानासाहेबांनी पुण्याच्या +अर्धवट राहिलेले बांधकाम स्वतःच्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. नानासाहेबांच्या +मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी २४ जून रोजी याच त्यांना अग्नी देण्यात आला. +अंत्यसंस्कार विश्वासरावांनंतर ज्येष्ठ असलेल्या माधवरावांनी केले. नानासाहेब गेल्यान��� +दौलतीचे नुकसान मात्र फार झाले. + संदर्भ : +१) रोजनिशीतील उतारे : गो. स. सरदेसाई, २) मराठी रियासत : गो. स. सरदेसाई (थोरले +नानासाहेब), ३) पेशवे व सातारकर राजे यांची टिपणे : काव्येतिहास संग्रह, ४) मेस्तक +शकावली : काव्येतिहास संग्रह, ५) पुरंदरे दफ्तर भाग १ व ३ : कृ. वा. पुरंदरे, ६) साधन +परिचय (महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास) : आपटे-ओतूरकर, ७) सातारा गादीचा इतिहास : +विष्णु गोपाळ भिडे, ८) वतनपत्रे-निवाडपत्रे वगैरे : वाड, मावजी पारसनीस, ९) कैफियत- +यादी इत्यादी : वाड, मावजी पारसनीस, १०) सनदापत्रातील माहिती : द. ब. पारसनीस, +११) मराठ्यांच्या इतिहासाची साधने (निवडक) : राजवाडे, १२) मराठ्यांचे साम्राज्य : रा. +वि. ओतूरकर, १३) : १७६१ : त्र्यं. शं. शेजवलकर, १४) पेशवेकालीन महाराष्ट्र : वा. +कृ. भावे, १५) शाहू बखर : मल्हार रामराव (सं .: र. वि. हेरवाडकर), १६) मराठी दफ्तर +रूमाल १ व २ : वि. ल. भावे, १७) ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे चरित्र : पारसनीस, १८) +ऐतिहासिक पोवाडे : अॅक्वर्थ-शाळिग्राम, १९) पेशवे दफ्तरातील हिंदी कागद : भ. ग. कुंटे, +२०) मराठे व इंग्रज : न. चिं. केळकर, २१) चंद्रचूड दफ्तर : द. वा. पोतदार, द. वि. आपटे, +<<< + +२२) पेशवाईच्या सावलीत : ना. गो. चापेकर, २३) विंचूरकर घराण्याचा इतिहास : ह. र. +गाडगीळ, २४) काव्येतिहास संग्रह, पत्रे यादी वगैरे, २५) पेशवे घराण्याचा इतिहास : प्रमोद +ओक, २६) पुण्याचे पेशवे : अ. श. कुलकर्णी, २७) पेशवे बखर : कृष्णाजी विनायक +सोहोनी, २८) होळकराची कैफियत : य. न. केळकर, २९) होळकरांची कैफियत : सोवनी +खंड, ३०) भाऊसाहेबांची बखर : शं. ना. जोशी, ३१) बखर : रघुनाथ यादव +चित्रे, ३२) नागपूरकर भोसले बखर : काशिराव गुप्ते, ३३) HISTORY OF MARATHAS : +GRAND DUFF, ३४) HISTORY OF MARATHA PEOPLE : किंकेड-पारसनीस, ३५) +पेशवेकालीन पुणे : पारसनीस, ३६) शनिवारवाडा : ग. ह. खरे, ३७) मराठी रियासत + प्रकरण) : सरदेसाई, ३८) COLLECTIONS FROM BOMBAY +SECRETORIAT: VOL-I, ३९) निजाम पेशवे संबंध : शेजवलकर, ४०) ऐतिहासिक +संकिर्ण साहित्य खंड १४ : भा.इ.सं.मं., ४१) लढाईची हकीकत, ४२) +पेशवेकालीन सामाजिक व आर्थिक पत्रव्यवहार, ४३) आंगरे यांची हकीकत. + + सदाशिवराव चिमणाजी + (भाऊसाहेब) यांचे हस्ताक्षर + + विश्वासराव बल्लाळ + यांचे +<<< + + श्रीमंत सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव पानिपतावर पडले आणि यानंतर केवळ +पाचच महिन्यात त्���ांचा विरह सहन न झाल्याने श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीवर देह +ठेवला. हे सारे इतके अनपेक्षित होते की, भल्या भल्या मुत्सद्दयांनाही आता पुढे काय असा +प्रश्न पडला आणि अशातच निजामाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली होती. १९५९ +साली झालेल्या उद्गीरच्या लढाईत भाऊसाहेबांनी निजामाला चांगलेच फटकारले होते. +पूर्वीच्या सिंदखेड आणि उद्गीर अशा दोन्ही मोहिमांचे मिळून सुमारे ८५ लाख रु.चा मुलुख +स्वराज्यात आला होता. परंतु नंतर अचानक उद्भवलेली अब्दालीची मोहीम व नंतर +नानासाहेबांचा मृत्यू यामुळे हा प्रदेश दुर्लक्षितच राहिला होता. निजामाचा दिवाण +विठ्ठल सुंदर याने नळदुर्ग, अक्कलकोट इ. किल्ले पुन्हा काबीज केले. + इकडे पुण्यात मात्र काय अन् कसे करावे हे कोणाला सुचेचना! वयस्क मुत्सद्दी असे +म्हणावे तर महादजीपंतनाना पुरंदरे होते. त्यांच्या सल्ल्यानुसार नानासाहेब पेशव्यांचे दिवस +वगैरे आटोपून ते माधवराव, रघुनाथराव, आपले पुत्र निळकंठराव पुरंदरे, नाना फडणवीस, +सखाराम बापू बोकील वगैरे प्रभृतींसह साताऱ्यात आले. यावेळेपर्यंत राघोबादादांना 'आता +आपल्यालाच पेशवाई मिळणार' असे वाटत होते. परंतु नानासाहेबांचे दोन पुत्र हयात असता +त्यांच्यातील थोरल्या पुत्रासच पेशवाई मिळावी या हेतूने महादजीपंतांनी सातारकर राजाराम +महाराजांकडून वद्य तृतीया शके १६८३, वृषनाम संवत्सरी, सोमवारी म्हणजेच दि. +२० जुलै सन १७६१ रोजी माधवरावांना पेशवाईची वस्त्रे देववली. त्याचबरोबर निळकंठपंत +महादजी उर्फ आबासाहेब पुरंदरे यांना मुतालकी आणि सखारामबापू बोकील यांना +दिवाणगिरीची वस्त्रे देण्यात आली. यावेळेस माधवरावांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते. हा +सारा समारंभ होतानाच रघुनाथरावांच्या मनात मात्र तिरस्काराची एक झालर उठली होती. +त्यांना असे मनोमन वाटत होते की, आपण अनुभवी आहोत. एकेकाळी आपण अटकेपर्यंत +मजल मारून पेशव्यांचा दरारा प्रस्थापित केला होता. त्यामुळे आपल्याएवढा जाणकार +कोणीच नाही आणि पेशवाईची वस्त्रे मात्र अजूनही 'पोरगा' असलेल्या माधवालाच मिळाली! +नाही, हे काही ठीक वाटत नाही! परंतु असे वाटत असले तरीही या सुमारास रघुनाथरावांनी +आपल्या मनातला राग अजिबात जाणवू दिला नाही. + पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर माधवराव पुण्यात आले आणि पह��ल्यांदा नजर वळविली +ती निजामाकडे. निजामाने मराठे आता पुरते मोडले आहेत, असे समजून जाधव, +घाटगे अशा मराठा सरदारांना पेशव्यांविरुद्ध फितवले आणि नळदुर्ग काबीज केल्यानंतर तो +थेट पुण्याच्या रोखाने निघाला. इकडे माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी +करायचे ठरले. परंतु नुकत्याच युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे +माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. +निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत +आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते. ते शनिवारवाड्यातच होते. +निजाम मार्गावरची मंदिरे फोडत, जाळपोळ करत पुण्याच्या आग्रेयेस असलेल्या +<<< + +कांचन' या गावापाशी येऊन पोहोचला. निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबादादा गांगरून +गेले. कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरता पुण्यात फारशी फौजच नव्हती. आता +लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाळेल, ही भीती वाटल्याने दि. २९ डिसेंबर + १७६१ या दिवशी रघुनाथरावांनी निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये २७ लक्ष रुपये +वार्षिक उत्पन्नाचा मुलुखही देण्याचे कबूल केले. जानेवारी १७६२ मध्ये माधवरावांना +या तहाची बातमी मिळाली. आता काहीही करता येऊ शकत नव्हते. शेवटी नाईलाजाने +माधवराव पुण्यास परतले. + माधवराव पुण्यात येतात तोच फाल्गुन शु. द्वितीया शके १६८३ वृषनाम संवत्सरी +शुक्रवारी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी १७६२ रोजी वडगाव येथील पेशव्यांच्या वाड्यात + (सातेगावातल्या?) रघुनाथरावांची पत्नी आनंदीबाई प्रसूत होऊन पुत्र जन्म झाला. दि. २७ +मार्च रोजी बारसे होऊन पुत्राचे नाव ठेवण्यात आले 'भास्कर'. यानंतर लगेच दोन महिन्यात +ज्येष्ठ शु. पंचमी शके १६८४ चित्रभान संवत्सरी शुक्रवार म्हणजेच दि. २८ १७६२ रोजी +रघुनाथरावदादांनी पुण्यात शनिवारवाड्यात नारायणराव बल्लाळ यांची मुंज लावली. + आली. जून १७६२ च्या सुमारास रगुनाथरावांच्या मनातली पेशवेपदाची इच्छा पुन्हा उफाळून + यावेळेस माधवराव पेशव्यांचे दिवाण सखारामबापू बोकीलही रघुनाथरावांना सामील +झाले. रघुनाथराव आता उघडउघड पेशवाईचा हक्क सांगू लागले. माधवरावांनी त्यांना +समजावण्याचा प्रयत्न केला की, 'आपण सर्वथा पाठीशी राहून नेहमी मार्गदर्शन करणे. +आम्ही लेकरू, आपले आज्ञेबाहेर नाही.' परंतु हे रघुनाथरावांना पटत नव्हते. त्यांना मुख्य +पेशव्यांची गादी हवी होती. त्यांनी माधवरावांसमोर पेशवाईच्या बदल्यात 'पाच किल्ले आणि +दहा लाख रुपये सालीना उत्पन्नाची जहांगीर' मागितली. माधवरावांनी राज्याचे तुकडे +करण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी रघुनाथरावांनी फौजेच्या बळावर पेशवाई मिळविण्याचे +ठरवले. पण फौजेचा खर्च चालवायचा तरी कसा? माधवराव थोडीच मदत करणार होते? +याकरता रघुनाथरावांनी आपल्या स्वराज्यातले एक तीर्थक्षेत्र, 'श्री क्षेत्र पैठण' साफ लुटले. +सखारामबापूंना हे आवडले नाही. तरीही ते रघुनाथरावांच्या बाजूने उभे राहिले. दि. ७ +नोव्हेंबर १७६२ रोजी माधवराव पेशवे रघुनाथरावांचा बीमोड करण्यासाठी निघाले. +रघुनाथरावाला निजामाचीही फूस होतीच. शिवाय बापूंसारखे सल्लागारही होते. त्यामुळे १३ +नोव्हेंबर रोजी आळेगाव या ओतूरजवळच्या गावात दोन्ही फौजांमध्ये झालेल्या लढाईत +माधवराव पेशव्यांचा पराभव झाला. (की मुद्दाम हार मानली?) रघुनाथरावांच्या आडून +निजाम घुसू पाहतोय हे पाहून माधवरावांनी रघुनाथरावांना शरण जायचा निर्णय घेतला. +माधवरावांनी रघुनाथरावांच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केल्या ते समजत नाही. परंतु, +पेशवेपद मात्र माधवरावांकडेच राहिले. यावेळेस माधवराव गोपिकाबाईंना लिहितात, " ... +प्रस्तुत लागले." तिर्थरूप राजेश्री दादासाहेब व आम्ही एक जाहलो कारभारीही लगामी उत्तमप्रकारे + + रघुनाथरावांसारखा गळाला लागलेला सोन्याचा मासा हातून निसटला म्हणून निजामाने +नागपूरकर रघुजी भोसले यांचा पुत्र जानोजी भोसले यांना पेशव्यांविरुद्ध दि.९ +<<< + +फेब्रुवारी १७६३ रोजी कर्नाटकात कलबर्ग्याच्या निजाम आणि जानोजी भोसले नागपूरकर +यांची भेट झाली. निजामाने जानोजी भोसल्यांना सातारा गादीवर स्थापूत राज्य करण्याची +लालूच दाखवली. त्यामुळे जानोजीही उघडपणे निजामाला सामील झाले. भोसल्यांच्या तीस +हजार फौजेने निजामाचे एकूण संख्याबळ आता जवळपास ऐंशी हजाराच्या घरात पोहोचले. +निजामाने मोठ्या फुशारकीने पेशव्यांकडे वकील पाठवून भीमा नदीच्या पलीकडील (म्हणजे +नदीच्या उजव्या बाजूचा) सगळा मुलुख निजामाच्या ताब्यात द्यावा आणि तुम्ही जानोजी +भोसल्यांच्या आणि निजामाच्या साहाय्य��ने कारभार करावा. अर्थात, या गोष्टीला +माधवरावसाहेबच काय, अगदी रघुनाथराव आणि सखारामबापूंसारखी माणसेही किंमत +देणार नाहीत हे उघड होते. निजामाच्या या उपद्रवामुळे रघुनाथरावसुद्धा सगळे मतभेद +तात्पुरते विसरून माधवरावांच्या पाठी खंबीरराव उभे राहिले. माधवरावांनी गोपिकाबाईंना +लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, " ... सारे अवघडच आहे, प्रस्तुत दादासाहेब व आम्ही एक +जाहलो हीच गोष्ट एका करोडोची जाहली. त्यांची आमची एकवाक्यता जाहली. कारभारीही +(बापू, चिंतो इत्यादी दादाचे पक्षपाती) उत्तमप्रकारे लगामी लागले. ज्या गोष्टीने +दौलतीस कल्याण तीच गोष्ट साऱ्यांनी करावी ही बुद्धी आहे. परिणाम लावणार परमेश्वर व +वडिलांचे पुण्य समर्थ आहे." + निजामाचा तोफखाना प्रचंड होता, त्यासमोर निभाव लागणे मुश्किल म्हणून पूर्वीच्याच +गनिमी काव्याने निजामाला सतावण्याचे खेळ मांडावेत हा सखारामबापूंचा "शहाणा" सल्ला +अत्यंत महत्त्वाचा होता. पेशव्यांच्या फौजा नगर-पैठण करत निजामाचा मुलुख उद्ध्वस्त +करत ७ मार्च १७६३ ला औरंगाबादला आल्या. राघोबादादांनी औरंगाबादच्या किल्ल्यावर +हल्ला केला. पण किल्लेदाराने दोन लक्ष रुपये देऊन तात्पुरता तह करून घेतला. +दादासाहेबांनी पूर्वी निजामाला मिळालेल्या चंद्रसेन जाधवांचा पुत्र रामचंद्र जाधव याला +आपल्याकडे आणले खरे, पण आतून रामचंद्र जाधव निजामालाच सामील असल्याने त्याचा +काहीही उपयोग झाला नाही. एका हकीकतीत असलेला उल्लेख पुढीलप्रमाणे- "दादासाहेब +शहराहून (औरंगाबादहून) कूच करून निघाले, तेव्हा दोन प्रहरी भोजनोत्तर शेतखान्यातून +निघतेसमयी एका मुसलमान गाडद्याने त्यांजवर कट्यार चालवली, ती कारगीर जाली नाही. +त्या गाडद्याने नाव रामचंद्र जाधवाचे घेतले. मोगलास सामील असल्याचे कागद सापडले. +अन्याय लागू करून खुद्द रामचंद्र व त्याचा दत्तकपुत्र श्रीपतराव यांचे पायात बेड्या घालून +दौलताबादेवर ठेविले. त्यांचा गोट लुटून फस्त केला." येथेच पुढे येऊन १२ मार्चला होळकर +सामील झाले. यावेळी पैशाची चणचण भासू लागल्याने माधवरावांनी बापू आणि दादांच्या +सल्ल्याने आपल्या सरदारांकडून चौथ घेऊन अडचणीच्या प्रसंगी निभाव लागावा, अशी +योजना ठरवली. खुद्द पेशव्यांनी त्यांच्या खासगी जामदारखान्यातील ऐवज मोडून सरकारात +जमा करून पैशाची न��� भागवली. + औरंगाबादेस असताना जानोजी भोसले नागपूरकर आणि निजामाच्या एकत्रित फौजा +येऊ लागल्या. अशातच मध्येच दादासाहेबांचा लहानगा पुत्र भास्करराव मृत्यू पावल्याची +बातमी आल्याने राघोबादादा अस्वस्थ झाले. १५-२० मार्चला मराठी फौजा वऱ्हाड प्रांत लुटत +<<< + + मलकापूरवर गेल्या आणि तेथून सुमारे चाळीस हजार रुपयांची खंडणी वसूल केली. + पाठोपाठ निजाम-भोसले बाळापूरनजीक आल्याने पेशवे अचानक खाली हैद्राबादकडे + वळले. पैठण, नळदुर्ग, उदगीरमार्गे पेशवे हैद्राबादेत येऊन दाखल झाले. इकडे मराठे + आपल्या हातून निसटून हैद्राबादेकडे गेले हे पाहताच निजाम पुण्यावर चालून गेला. +मध्ये निजामाने लष्कराचे ३ भाग केले. पहिला, विनायकदास हा सरदार + लुटत त्या मार्गे पुण्याकडे आला. जानोजी भोसले थेट पुण्यावर आले आणि निजाम स्वतः + नगरात राहिला. पुण्यात एक महिन्यापर्यंत निजामाने धुमाकूळ घातला. विठ्ठल सुंदराने + सासवड जाळले. पेशव्यांचा कबिला आणि पुण्यातील मंडळी गेली. यादरम्यान + एका पत्रातील मजकूर असा- "सिंहगड माची व सरकारी जामदारखाना रघुजी कराड्याने + लुटून नेला. माणसे मारली. चार हजारांचा लोट एकदाच आला. पुण्यात एक देव लहान-मोठा + राहिला नाही. धर्मशाळा जाळल्या. सभोवत्या फौजा उतरून जाळपोळीस सीमाच ठेविली + नाही. लोहगडाच्या माचीस पुण्याचे लोक वित्तविषय घेऊन गेले होते त्यांची तीच गत झाली. + नाना फडणवीस वगैरे एक वस्त्रानिशी जीव बचावून गडावर गेले. विठ्ठल सुंदराने तोफखाना + घेऊन सासवडच्या रोखे राहून सर्व जाळले. पुरंदरपासून शिरवळपर्यंत गमाजींनी लुटून + सप्ताऋषीस गेले. मोर्चे दिल्हे. तमाम गावगन्ना एकसाला पैका रोखे करून घेतला. + मुलुख जाळला व लुटला. सातारा किल्ला मात्र रक्षीला. सखारामबापूंचे हिवरे जाळून विठ्ठल + सुंदराने अग्नी संतुष्ट केली. नीरथडी-भीमथडी मोगलांचे भक्ष्यस्थानी पडली." + याच काळात पेशव्यांनी भागानगरमधील विठ्ठल सुंदरचे औसा गाव जाळले, निजामाचा + प्रांत पूर्ण बेचिराख केला. सखारामबापूंनी इकडे गोपिकाबाईसाहेबांना लिहिले आहे की, + "मोगलाने तिकडे विध्वंस केला, यास्तव याणीही त्याप्रमाणेच अमलात आणिले. यंदाच्या + सारखा कहर पूर्वी झाला नव्हता. येथे मल्हारबा आदी लहान-मोठे येकदील आहेत. येक वेळ + मोगलाचे दात भग्न करावेत असा सर्वांचा विचार आहे. य��उपरी जे गोष्टी दौलतेस उचित ते + वर्तणूक करीत आहो." अखेरीस निजाम हैद्राबादेकडे आणि पेशवे पुण्याकडे आपापला + प्रदेश वाचवण्यासाठी वळले. भीमाकाठाने निजाम धारूरपर्यंत गेला, परंतु मराठे मागून हल्ले +करत असल्याने तो पुन्हा औरंगाबादेकडे वळला. ३ जुलै रोजी गुलबर्गा मुक्कामी निजामाचा + भाऊ बसालतगंज याला माधवरावांनी आपल्या बाजूला वळवून घेतले. + राक्षसभुवनाजवळ गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने निजामाने आधी स्वतःसोबत + आपला जनानखाना, बुणगे आणि काही हलक्या तोफा आपल्यासोबत गोदावरीच्या पलीकडे + नेल्या. मुख्य फौज मात्र सुंदराच्या हाताखाली अजून गोदावरीच्या अलीकडे + धोंडराईसच होती. निजामाचे सैन्य विठ्ठल सुंदरच्या अधिपत्याखाली खुद्द निजामासह + राक्षसभुवनवर आहे आणि जानोजी भोसले पूर्वेकडे १२ कोसांवर आहेत कळताच + पेशव्यांनी १० ऑगस्ट रोजी राक्षसभुवनवर निजामावर प्रचंड हल्ला चढवला. सुंदर + परशुरामी ठार झाला. माधवराव स्वतः घोड्यावर होते. निजामने हे पाहताच तहाचे बोलणे + लावले आणि इतक्यात प्रचंड पाऊस आल्याने युद्ध विस्कळीत झाले. निजाम गोदावरीच्या + पैलतीरावर असल्याने जीवानिशी वाचला, तो उरलेले सैन्य घेऊन पळाला. जानोजी भोसले +<<< + + १३ ऑगस्टला शरण आले आणि त्यांनी पेशव्यांशी तह केला. पेशव्यांच्या अचानक +निजाम पार घाबरून गेला. त्याने पेशव्यांकडे याचना केली की, "विठ्ठल सुंदरांनी तुम्हांसी +दावा बांधिला होता, त्याचा सूड तुम्ही घेतला. तुमची लूट आणिली आहे ती पाठवून देतो. +पूर्वी (उदगीरच्या वेळेस) भाऊसाहेबांचा करार आहे त्याप्रमाणे चालावे." परंतु माधवरावांनी +निजामाच्या या नाटकांना भीक घातली नाही. माधवरावसाहेब मातोश्रींना लिहितात, +"मोगलांची बातमी राखून, सर्व सरदार फुटलेले पाहून आजच प्रातःकाळी मुकाबला केला. +निजाम गंगापार व वरकड कुल सरदार अलीकडे होते. त्यांचे आमचे निकडीचे हत्यार जाले. +त्याचा मोड जाहला. आमची फत्ते जाहली. विठ्ठल सुंदर याचे डोचके कापून आणिले. त्याचे +पुतणे विनायकदास व खंदारचा राजा गोपाळदास ठार जाले. मुरादखान वगैरे सोळा सरदार +पाडाव सापडले. चार सहा घटका मातबर जाली. त्यांची निम्मी फौज सताठहजार व +चार-पाच हजार गाड़दी इतकी अलीकडे होती ती गारद जाहली. निजाम दहशत पाहून गंगा +उतरू लागला हे वर्तमान जानोजीने दादास कळवू�� सांगितले, जलादी येऊन पोचावे. आमचा +हल्ला होताच निजाम पलीकडे कायम होता तो लढाईचे वर्तमान कळताच तोफाबाणांची +मारगिरी न करीता जनानखाना पुढे पाठवून आपण अर्धरात्री डेरे बुणगे टाकून औरंगाबादेस +गेला. पंधरा हत्ती, पंचवीस तोफा व जनावरे वगैरे लुटून आणिली. पूर्वी झाल्या, पण +अशा प्रकारची जरब बसली नव्हती." + ३ सप्टेंबर १७६३ ला पेशव्यांनी औरंगाबादवर चाल केली. निजाम औरंगाबादेत कोंडला +गेला. अखेरीस २५ सप्टेंबरला निजाम पेशव्यांना शरण आला आणि उदगीरचा तह कायम +करून नवा २२ लक्षांचा करार झाला. + या तहानुसार पूर्वीच्या उद्गीरच्या लढाईतील साठ लाख आणि आताचा २२ लाख रुपये +उत्पन्नाचा एकूण ८२ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुख पेशव्यांना मिळाला. या लढाईनंतर +माधवराव जिवंत असेपर्यंत निजामाने डोके जराही वर काढले नाही. यावरूनच या युद्धाची +कल्पना येते. राक्षसभुवनहून जवळच असणाऱ्या पालखेड येथे पूर्वी बाजीराव पेशव्यांनी +याच निजामाच्या बापाचा पराभव केला होता. आता इथेच बाजीरावांच्या नातवाने निजामाला +मात दिली होती. या युद्धानंतर रघुनाथराव गोपिकाबाईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, + "चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत कमी केले नाही ... यांचा पुढे (होणाऱ्या) +कर्तेपणाचा भरवसा आम्हास आला. सांप्रत कारभार चिरंजीवच करतात. (परंतु) आमचे +मर्जीप्रमाणे वर्ततात ... " यानंतर रघुनाथराव व माधवराव पुण्यात परतले. + माधवराव निजामाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी अथवा मधल्या काळात पुण्यातही काही +घटना घडून गेल्या होत्या. फाल्गुन शु. द्वितीया शके १६८४, चित्रभानुनाम संवत्सरी सोमवारी +म्हणजेच दि. १४ फेब्रुवारी सन १७६३ रोजी विश्वासराव पेशव्यांच्या विधवा पत्नी लक्ष्मीबाई + शनिवारवाड्यात मृत्यू पावल्या. विश्वासराव गेल्यानंतर त्यादेखील पूर्णपणे खचून गेल्या होत्या +व अशातच आजारपण येऊन वारल्या. दि. १३ डिसेंबर १७६५ रोजी रघुनाथरावदादांनी +सातारा दरबारातील भवानराव श्रीपतराव पंतप्रधींना दूर करून त्या जागी आपल्या केवळ + आठ महिन्यांच्या चिरंजीवांना, 'भास्कराला' प्रतिनिधीपद दिले व नारो शंकराला मुतालिक +<<< + +नेमले. परंतु, फाल्गुन वद्य सप्तमी शके १६८४ चित्रभानुनाम संवत्सरी रविवारी म्हणजेच ६ +मार्च १७६३ रोजी भास्कराचा मृत्यू झाला आणि काय योगायोग असता�� पाहा. परंतु याच +दिवशी ६ मार्च रोजी निजामाळा फितूर झालेल्या रामचंद्रराव जाधवाने रघुनाथरावांना जिवे +मारण्यासाठी मारेकरी घातला. सुदैवाने रघुनाथराव हुशार असल्याने थोडक्यात बचावले. +वैशाख शु. नवमी शके १६८५ सुभानुनाम संवत्सरी शुक्रवारी म्हणजेच दि. २२ एप्रिल १७६३ +रोजी सिंहगड येथे कृष्णराव हरी साठ्यांची कन्या गंगाबाई आणि नारायणरावांचे लग्न झाले. +यावेळेस माधवराव निजामाच्या मुलुखात असल्याने व निजाम पुण्यावर चाल करण्याची +शक्यता असल्याने हे लग्न त्र्यंबकमामा पेठे यांनी पुण्यापासून सात कोसांवर, किल्ले +सिंहगडावर लावले. +<<< + + थोरले माधवराव पेशवे यांनी + राक्षसभुवन येथील लढाईत निजामाला धूळ चारली + निजामाच्या मोहिमेवरून परतल्यावर माधवरावांनी दि. १८ सप्टेंबर १७६३ या दिवशी +पुण्याच्या पुनर्उभारणीसाठी कामाला सुरुवात केली. अनेक पेठांची पुनर्रचना करून नवीन +पेठा वसवण्यास जागा दिल्या. निजामाच्या स्वारीत ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते, +त्यांना सरकारातून नुकसानभरपाई देण्यात आली. राक्षसभुवनाच्या लढाईनंतर +माधवरावसाहेबांची हुशारी, मुत्सद्देगिरी आणि कर्तव्यतत्परता नुसती पुण्यालाच नव्हे तर +साऱ्या हिंदुस्थानालाच दिसून येऊ लागली. दि. १७ फेब्रुवारी १७६४ या दिवशी माधवराव + पेशवे मोहिमेवर निघाले. सुमारासच म्हैसूर संस्थानात हैदरअलीचा उगम +झाला होता. त्याच्या उपद्व्यापांना लगाम घालण्यासाठी पेशवे दक्षिणेत निघाले. याआधीही + १७६२ मध्ये माधवरावांनी धारवाडवर स्वारी केली होती. आताच्या स्वारीत गदग, उंबळी, +कुंदगोळ इ. ठाणी जिंकून माधवरावांनी तुंगभद्रेच्या उत्तर तीरांपर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. +याला प्रतिकार करण्यासाठी आलेल्या हैदरला माधवरावांनी धारवाड आणि सावनूरच्या +लढाईत सपशेल हरवले. शेवटी कर्नूळच्या जवळ असलेल्या अनंतपूर येथे पेशवे आणि +हैदरअली यांच्यात तह झाला. या तहानुसार हैदरअलीने पेशव्यांना ३२ लाख रुपये रोख + खंडणीदाखल दिले. जून सन १७६५ मध्ये माधवराव पेशवे कर्नाटकाच्या स्वारीवरून पुण्यात + परतले. + माधवराव कर्नाटकात जाण्याच्या आधी त्यांचे आणि मातोश्री गोपिकाबाईंचे काहीतरी + बिनसले असावे. दोघांचाही स्वभाव तडफदार आणि करारी असल्याने माधवराव कर्नाटकात +गेल��यानंतर मार्च १७६४ च्या दरम्यान त्या नाशिकजवळच्या गंगापूर येथील वाड्यात राहायला +गेल्या. गंगापूर हे गाव त्यांच्या खासगी खर्चाचे होते. पेशव्यांतर्फे त्यांना वर्षास बारा हजार +रुपये वर्षासन मिळत होते. + श्रावण वद्य पंचमी शके १६८६ तारणनाम संवत्सरी गुरुवारी म्हणजेच १५ ऑगस्ट १७६४ +या दिवशी रघुनाथराव आणि आनंदीबाई यांना गंगापूराजवळच आनंदवल्ली या ठिकाणी +पुत्ररत्न झाले. बारशाच्या वेळी पुत्राचे नाव ठेवण्यात आले, 'विनायक'. यानंतर माधवराव +पेशवे हैदरच्या कर्नाटक स्वारीवरून परतले. त्याच्या पाच महिन्यानंतर मार्गशीर्ष वद्य तृतीया + शके १६८७ पार्थिवनाम संवत्सरी गुरुवारी म्हणजेच दि. ११. डिसेंबर १७६५ या दिवशी + रघुनाथराव आणि आनंदीबाईंना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव ठेवण्यात आले 'दुर्गाबाई' +यानंतर जानेवारी १७६६ मध्ये रघुनाथराव पेशवे उत्तरेच्या मोहिमेवर गेले. उत्तरेत जाट आणि + राजपूतांना वठणीवर आणण्यासाठी शिंदे आणि होळकरांना मदत करावी, या हेतूने + माधवरावांनी दादासाहेबांना पाठवले होते. परंतु, दादासाहेबांनी स्वतःचा वेगळा कारभार + मांडून अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यात अडथळा आणला. शिवाय नवीन काही खंडणी +वसूल करायच्या ऐवजी २५ लाखांचे कर्जच घेऊन आले. जून १७६६ मध्ये पुण्यास +परतल्यानंतर रघुनाथरावदादांच्या मनात पुन्हा पेशवाईची हाव निर्माण झाली. +<<< + + ऑक्टोबर १७६५ च्या सुमारास सदाशिवरावभाऊंसारखा दिसणारा एक ब्राह्मण पुण्यात +दाखल झाला. तो इतका तंतोतंत भाऊसाहेबांसारखा दिसत होता की, इतर लोकांचं जाऊ +द्या, पण खुद्द भाऊसाहेबांच्या पत्नी पार्वतीबाईदेखील संभ्रमात पडल्या. माधवरावांनाही या +'भाऊ' चा संशय आला होता खरा, कारण जर हा माणूस खरोखर भाऊसाहेब असेल तर + इतक्या वर्षांनी कसा आला? परंतु, भाऊसाहेब खरंच गेलेत याची +माधवरावांनाही खात्री नसल्याने तेदेखील गोंधळले. फक्त नाना फडणवीसांना खरे +भाऊसाहेब पानिपतात पडल्याचे माहीत असल्याने हा नवा 'भाऊंचा तोतया' आहे हे त्यांनाच +ठाऊक होते. म्हणूनच नाना फडणीसांनी या नव्या भाऊची पर्वतीवर चौकशी सुरू केली. त्या +तोतयाने सदाशिवरावभाऊंच्या अनेक सवयी आत्मसात केलेल्या असल्याने प्रथम तो नानांना +दाद देईना. परंतु अखेर नानांनी आपला खास हिसका दाखविल्यावर त्या तोतयाने आपण +कनोजी ब्राह्मण असल्याचे आणि आपले खरे नाव 'सुखलाल' आहे हे त्याने खुद्द +माधवरावांसमोर कबूल केले. सारा प्रकार उघड झाला. परंतु, पार्वतीबाईंना मात्र हे पटले +नाही. जोपर्यंत आपल्या पतीचा मृतदेह पाहून ते आता हयात नाहीत अशी खात्री पटत नाही, +तोपर्यंत आपली सौभाग्यलेणी उतरवणार नाही, असा त्यांनी धरला. भाऊसाहेबांचा +तोतया 'सुखलाल कनोजी' हा ब्राह्मण असल्याने माधवरावांनी त्यांना देहदंडाची शिक्षा केली +नाही, परंतु त्याला मोकळेही येत नव्हते. कारण हा उद्या आपल्याला फसवलं, तसं +हिंदुस्थानात कुठेही आपणच 'भाऊसाहेब' असल्याचे सांगत फिरेल. म्हणूनच पेशव्यांच्या +आज्ञेवरून त्याला अहमदनगरच्या किल्ल्यात डांबून ठेवण्यात आले. याच्या आधी काही वर्षे +उत्तरेत काशी आणि बुंदेलखंडांच्या जवळ सदाशिवरावभाऊ दिसल्याच्या बातम्या उठल्या +होत्या. बहुदा तोही तोतया भाऊसाहेब म्हणजे हाच 'सुखलाल कनोजी' असावा. + ऑक्टोबर १७६५ मध्ये पेशवे निजामाच्या समाचारासाठी निघाले. राक्षसभुवनाच्या +लढाईत निजाम चीतपट झाला असला, तरीही त्याची अंतस्थ कूटकारस्थाने सुरूच होती. +म्हणूनच दि. ५ फेब्रुवारी सन १७६६ या दिवशी माधवरावांनी निजामाची भेट घेतली. +भेटीप्रीत्यर्थ दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला, भेटीदाखल उंची वस्त्रे आणि नजराणे दिले. +वस्तुतः हा निजाम कसा आहे हे माधवरावसाहेब पक्के ओळखून होते. परंतु, यानिमित्ताने +त्यांनी केलेले राजकारण एखाद्या मुत्सद्द्याहूनही सरस होते. 'जर निजाम आणि पेशव्यात +सख्य झाले तर पुन्हा कोणीही कुरापती काढण्यास धजावणारही नाही' म्हणूनच केवळ +दाखवण्यापुरता का होईना, सलोखा ठेवून आपला हेतू साध्य करावा हेच उत्तम! मागे, +थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का, शहाजीराजे आदिलशाही +आदबखान्यातून सोडण्याकरता शहाजादा दारा शुकोहसारख्या 'परक्याशी' सलोखा केला +होता! नेमके तसेच हे ... + आता भाऊसाहेबांच्या तोतयाचा आणि निजामाच्या प्रकरणाचा निकाल लागतो न +लागतो तोच रघुनाथराव उत्तरेच्या मोहिमेवरून आले आणि जुन्याच कटकटी पुन्हा नव्याने +उफाळून वर आल्या ... रघुनाथरावांनी पुण्यात येताच राज्याची विभागणी करून स्वतःचा +मालकीहक्काचा हिस्सा मागितला आणि निम्मे राज्य वाटून द्यावे, असे सांगितले. प्रथम +<<< + +माधवरावांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु रघुनाथरावांनी धरल्याने +माधवरावसाहेबांनी त्यांना म्हटलं, "राज्य कोणाचे, आम्ही वाटणारे कोण! आमच्याने वाटवत +नाही! सर्व राज्य तुमचेच आहे. आम्ही चार बारगीर (राहतात) तैसे तुम्हा जवळ असू!" +यानंतरही माधवराव म्हणतात, " ... सर्व वडलांनीच (रघुनाथरावांनी) करावे. आम्ही स्वस्थ +भलते जागा (कुठेतरी) राहू. आपल्या आपल्यात भांडून दौलत बुडवली, हा लौकिक कशास +हवा? याउपरी हेच प्रस्तुत काळी बरे!" परंतु, रघुनाथराव काही ऐकेचनात तेव्हा माधवरावांनी +रघुनाथरावांवरच्या २५ लाख रुपये कर्जाची हमी घेतली. परंतु, राज्याच्या वाटणीबाबत काही +निर्णय होऊ शकला नाही. + नोव्हेंबर सन १७६६ च्या सुमारास माधवराव आपल्या तिसऱ्या कर्नाटकाच्या स्वारीवर +निघाले. यावेळेस मराठी फौजांनी थेट तुंगभद्रा नदीचा दक्षिण काठ गाठला. यावेळी +हौसकोट, शिरे, बाळापूर, बसवापट्टम वगैरे गावे काबीज केली. हा मुलुख पूर्वी स्वराज्याचाच +होता. शहाजीराजे जहागीरही. परंतु मध्यंतरीच्या काळात उत्तरेतल्या वाढत्या +व्यापामुळे पेशव्यांना दक्षिणेत लक्ष देणे जमले नव्हते. यामुळेच म्हैसूरचा हैदरअली आणि +हैदराबादचा निजाम हे दोघे हा सारा भूभाग गिळंकृत करून बसले होते. आता मात्र +माधवरावांनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून हा सारा प्रदेश ताब्यात घेतला व श्रीरंगपट्टणम +वगैरे भागांमधून तब्बल ३० लाख रु. रोख खंडणी वसूल केली. एवढेच करून पेशवे थांबणार +नव्हते, तर थेट चंदी तंजावरपर्यंत धडक मारून पूर्वीच्या स्वराज्यात असणारा सारा प्रांत +काबीज करणार होते. परंतु पुण्यात रघुनाथरावांनी फारच उच्छाद मांडल्याने शेवटी ही +मोहीम अर्थवट सोडून माधवरावांना पुण्यात परतावे लागले. जून सन १७६७ मध्ये माधवराव +शनिवारवाड्यात पोहोचले. + शनिवारवाड्यात आल्यावर माधवरावांनी रघुनाथरावांशी चर्चा सुरू केली. परंतु, +रघुनाथरावांचा सूर चर्चेचा नव्हता. त्यांनी उघडउघड माधवरावांसमोर आपल्या 'अमृतराव' +या दत्तकपुत्राच्या नावाने राज्याची वाटणी मागितली. माधवरावांनी काही विचार केला +असावा. ऑक्टोबर सन १७६७ मध्ये दसऱ्याच्या सुमारास आनंदवल्ली येथील +रघुनाथरावांच्या वाड्यात जाऊन माधवरावांनी रघुनाथरावांचे पाय शिवले आणि +रघुनाथरावांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. याचवेळेस माधवराव पेशवे गंगापूरला ज���ऊन +आपल्या मातोश्री गोपिकाबाईसाहेबांच्या भेटीसही जाऊन आले असावेत. रमाबाईही बरोबर +असाव्यात. (परंतु, अशी कोणतीही नोंद नाही) रमाबाई यांच्या काही काळ आधीच गंगाबाई +(नारायणरावांच्या पत्नी), पार्वतीबाई आणि इतर साऱ्या लवाजम्यासह पेशव्यांचे कुलदैवत +हरिहरेश्वराची यात्रा केली होती. + दि. १९ नोव्हेंबर १७६७ या दिवशी इंग्रज कंपनी सरकारचा वकील मॉस्टिन हा पेशव्यांना +भेटावयास पुण्याला यायला निघाला. तो पेणजवळच्या कल्याणगडापाशि आला असताना +त्वाच्या स्वागतार्थ गडावरून तोफा उडवण्यात आल्या होत्या. या तोफा बहुधा इंग्रज +वकीलाला खिजवण्याकरता मुद्दाम वाजवण्यात आल्या असाव्यात. कारण +जबरदस्त हार आणि नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर 'मराठे बुडाले' असा गैरसमज करून +<<< + +घेऊन इंग्रजांनी वसई-साष्टी भागात आपले उपद्व्याप सुरू केले होते. परंतु पुढे माधवरावांचा +पराक्रम जगाला दिसू लागला, तसा या धूर्त इंग्रजांनी आपला नाचणारा हात मागे घेतला. +आता हा मॉस्टीन त्याच संदर्भात माधवराव पेशव्यांशी वाटाघाटी करायला पुण्याला चालला +होता. दि. ३ डिसेंबर या दिवशी मॉस्टीन पुण्यात शनिवारवाड्यातल्या गणपती +रंगमहालात श्रीमंत माधवराव पेशवे यांना भेटला. माधवरावांनी त्याचे उत्तम स्वागत केले. +त्याच्या तहनाम्यातल्या बारीकसारीक व निरुपद्रवी गोष्टी मान्य केल्या. पण त्यातली मुख्य +अट धोकादायक होती. कंपनी सरकारने ठराविक रकमेच्या बदल्यात साष्टी-वसईची मागणी +केली होती. यातला धूर्तपणा आणि पुढचा संभाव्य धोका माधवरावांनी ओळखला होता. +त्यांनी नेमकी हीच अट नामंजूर केली. शेवटी इंग्रज वकील वरून समाधान दाखवत, पण +आतून चरफडत माघारा मुंबईस गेला. + इकडे माधवरावांनी रघुनाथरावांना स्वतंत्र वाटा देण्याचे मान्य केले होते. नंतर माधवराव +इतर राजकारणात गुंतत गेल्याने हा प्रश्न अधांतरीतच राहिला होता. मात्र 'आपल्याला +वाटा द्यावयाचा नाई, ऐसे रावसाहेबांचे मत ते हे जाणून (बुजून) करतात' असा +रघुनाथरावांचा गैरसमज झाला. आता आपल्याला जे हवे ते लढूनच मिळवावे लागणार, असे +म्हणून रघुनाथरावांनी फौजा जमवायला सुरुवात केली. अर्थात माधवरावांच्या अपरोक्षच! +त्यांनी मुंबईकर इंग्रज, हैद्राबादकर निजाम, बड़ोदेकर गायकवाड आणि नागपूरकर भोसले +या लोकांना गुप्त खलिते धाडले. हैद्राबादचा निजाम म्हणजे पेशव्यांचा वंशपरंपरागत शत्रू. तो + मार्फत घुसण्याची ही नामी संधी कसा सोडेल! तीच गोष्ट इंग्रजांची. साष्टी- +वसईच्या मागण्या माधवरावांनी साफ लावल्या होत्या. याचा फायदा इंग्रजांनाही +हवा होता. निजाम आणि इंग्रजांचं एक सोडा, ते तसेही बोलूनचालून परकेच होते, परंतु +गायकवाड आणि भोसले तर आपले होते ना? होय. पण दमाजी +पूर्वी नानासाहेबांनी सणसणीत पराभव केला होता, शिवाय अर्धा गुजरात आपल्या नावावर +करून घेतला होता. यानंतर युद्धातही योग्य साथ न दिल्याने +नानासाहेबांनी त्यांना समज दिली होती. या कारणास्तव गायकवाड पेशव्यांच्या विरोधात +होते, तर जानोजी भोसले नागपूरकरांविरुद्ध १७६५-६६ मध्ये माधवरावांनी कारवाई केली. +म्हणून तेही विरोधात गेले. बरं, हे दोघेजण कमीत कमी रघुनाथदादांशी (कदाचित) एकनिष्ठ +राहिले असते, परंतु निजाम व इंग्रज? ते थोडीच सभ्य होते? एकदा का माधवरावांना +हाकललं की रघुनाथरावांना कोण विचारतो? राज्य आपलेच होईल, या दुष्ट हेतूने ते +रघुनाथरावांना मदत करत होते. परंतु स्वतःला मुत्सद्दी, कर्तबगार म्हणवणाऱ्या दादासाहेबांना +निजाम आणि इंग्रजांना कुटिल डाव कळलाच नाही. रघुनाथरावांच्या या साऱ्या कुटिल +हालचाली १७६८ च्या प्रारंभापासूनच सुरू झालेल्या होत्या. प्रथम माधवरावांना या बातम्या +कळल्यावर त्यात काही तथ्य वाटले नाही. परंतु, राघोबादादा जेव्हा नाशिकजवळ असणाऱ्या +घोडपच्या किल्ल्यावर जाऊन राहिले आणि लवकरच त्यांनी १५ हजार फौज जमा केली +पाहून माधवराव संतापलेच. आता ही फौज घेऊन रघुनाथराव थेट शनिवारवाड्यावर चालून +येणार आहेत, अशा बातम्या पसरल्या. रघुनाथरावांनी काही हालचाली करायच्या आतच, +<<< + +आपणच त्यांना धरलं पाहिजे, असा विचार करून माधवरावांनी आपली फौज हुशार केली, +आणि जून १७६८ च्या पहिल्या सप्ताहात थेट घोडपगडाच्या दिशेने मारली. पेशव्यांच्या +फौजांनी पुणे सोडले आणि गणेशखिंड ओलांडून ते नाशिकच्या रोखाने येत आहेत +पाहताच रघुनाथराव दचकलेच. आपण फौज जमा केली आहे हे ऐकून माधवराव घाबरेल व +आपल्यापुढे नाक घासत शरण येईल असा रघुनाथरावांचा तर्क होता. पण पुतण्या भलताच +हुशार निघाला हो! त्याने काकाच्या पायाला हात लावण्याऐवजी थेट तलवारीलाच हात +घातला की! आता लढण्याशिवाय पर्यायच न��ही म्हणून रघुनाथरावांनी सैन्याला आदेश दिले. +घोडपगडाच्या जवळच मोकळ्या मैदानात रघुनाथराव आणि माधवराव पेशवे या दोघांच्याही +सैन्याची गाठ पडली. कितीही झालं तरी माधवराव हे आज पेशवे होते. त्यांच्याविरुद्ध तलवार +उचलताना रघुनाथरावांच्या फौजेतील मराठ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे +काही वेळ गेला असेल नसेल तोच रघुनाथरावांची फौज चारही दिशांना पळत सुटली. खुद्द +रघुनाथरावसाहेब आपल्या निवडक फौजेनिशी घोडपच्या किल्ल्यावर जाऊन लपून बसले. +गडाचे दरवाजे करकरत बंद झाले. माधवरावांनी गडाच्या चारही बाजूंना आपल्या सैन्याच्या +चौक्या बसवल्या आणि गडाची पूर्ण नाकाबंदी केली. सख्त वेढा पडला. गडावर +धान्यसाठाही अपुरा असल्याने रघुनाथरावांच्या पुढे एक मोठा यक्षप्रश्न उभा राहिला. शेवटी +एक आठवड्यानंतर ते माधवरावांना शरण आले. (जून अखेरीस) रघुनाथराव कोंडीत +सापडले आहेत हे पाहताच निजाम, इंग्रज, गायकवाड आणि भोसले यांनी हात वर केले. +माधवरावांनी रघुनाथरावांना सन्मानाने गडाखाली आणले. त्यांना अटक केली नाही किंवा +अपमानास्पद वागणूकही दिली नाही. परंतु, शनिवारवाड्यात परत आल्यानंतर मात्र +माधवरावांनी रघुनाथरावांच्या वाड्याभवताली आपल्या खास चौक्या बसवल्या व +रघुनाथरावांना राहत्या वाड्यात बदामी बंगल्यात, हा खास इंग्रजी पद्धतीने बांधवून घेतला +होता, नजरकैद केले. + रघुनाथरावांना नजरकैदेत ठेवल्यानंतर माधवराव नागपूरकर भोसल्यांच्या स्वारीवर +निघाले. वास्तविक पाहता १७६६ सालीच जानोजी भोसल्यांची कानउघडणी करून त्यांना +वठणीवर आणले होते. त्यांची जप्त केलेली जहागिरही परत केली होती. परंतु जानोजींनी +मात्र पुन्हा बंडाची निशाणे दाखवायला सुरुवात केली होती आणि आता माधवरावांना +पेशवेपदावरून हटवण्याकरता त्यांनी थेट रघुनाथरावांना साथ दिली, याचा भयंकर संताप +होऊन माधवराव भोसल्यांवर चालून गेले. भोसल्यांचे बळ तुलनेने कमी होते. माधवरावांच्या +झंझावाती हल्ल्यांपुढे जानोजी भोसले शरण आले. दि. ३० जानेवारी १७६९ आणि २३ मार्च +१७६९ रोजी अनुक्रमे खोलेश्वर आणि कनकेश्वरचा तह करून माधवरावांनी भोसल्यांना +अभय दिले. वस्तुतः दमाजी गायकबाड आणि इंग्रजांनाही समज देणे आवश्यक होते, परंतु + प्रकृती नादुरुस्त वाटल्याने माधवराव म���घारी पुण्यात आले. + सप्टेंबर सन १७६९ मध्ये माधवरावांनी रघुनाथरावांना पुन्हा एकवार समजवण्याचा +प्रयत्न केला. रघुनाथरावांनी यावेळेस पेशवेपदाच्या ऐवजी एक किल्ला व पाच लाख रु. +वार्षिक तैनातीची मागणी केली. माधवरावांनी रघुनाथरावांच्या या मागण्या अमान्य केल्या. +<<< + + परंतु, त्यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील जहागीर देऊ केली. शेवटी ते रघुनाथरावांनी + नाईलाजाने मान्य केले. माधवरावांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यातून बाहेर जाण्याची + परवानगी दिली. रघुनाथरावांनी नाशिकच्या पश्चिमेस दीड कोसांवर असणाऱ्या आनंदवल्ली + उर्फ चावंडस या गावात जाऊन राहावयाचे ठरवले. गाव मोठा सुंदर होता. जवळून + गंगागोदावरी वाहात होती आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्र्यंबकेश्वरासारखं तीर्थक्षेत्र + जवळच होतं. शिवाय गावाच्या पश्चिमेस दीड कोसांवर गंगापूर होते. इथेच माधवरावांच्या + मातोश्री गोपिकाबाई राहात होत्या. आनंदवल्ली येथे पूर्वी रघुनाथरावांनी एक वाडा बांधला + होताच. आता त्या वाड्याला शनिवारवाड्यासारखी तटबंदी बांधण्यात आली. आनंदवल्ली + आता जणू प्रती पुणे शोभू लागले होते, सतत वर्दळ. रघुनाथरावांच्या करमणुकीसाठी गवई, + वादक, नर्तक, नाटकशाळा तसेच धार्मिक वातावरण असल्याने अनेक शास्त्री-पंडित, + गोसावी, पुराणिक इ. लोक मोठ्या संख्येने होते. रघुनाथराव स्वतः धार्मिक होते. जवळच + असणाऱ्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी ते बहुतेक वेळेस जात असत. पूर्वी त्र्यंबकेश्वराचे + मंदिर जुने हेमाडपंती बांधणी असलेले होते. मार्गशीर्ष वद्य अष्टमी शके १६७७ युवनाम + संवत्सरी म्हणजेच इ. स. १७५५ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून + सभामंडप बांधण्यास प्रारंभ केला होता. ते बांधकाम अजूनही सुरूच होते. हे बांधकाम पुढे +नारायणरावांचे पुत्र सवाई माधवरावांच्या काळात पूर्ण झाले. देवभोळ्या रघुनाथरावांनी इथे, + म्हणजे आनंदवल्लीच्या वाड्यात अनेक पोथ्या, दुर्मिळ हस्तलिखिते आणि चित्रांचा संग्रह + केला होता. याशिवाय अध्यात्म रामायण, गीता शंकरभाष्य, मंजिरी, चातुर्वेद-उपनिषदे, + अठरा पुराणे, द्वारकामहात्म्य मानसोल्हास, शरीरभाष्य काव्यप्रदीप, अयोध्याकांड इ. अनेक + संस्कृत धार्मिक आणि अभ्यासकीय ग्रंथही दादासाहेबांनी संग्रहात ठेवले ह��ते. रघुनाथराव + आनंदवल्लीला असतानाच अश्विन शुद्ध दशमी शके १६९१ विरोधीनाम संवत्सरी गुरुवारी + म्हणजेच दि. १० ऑक्टोबर १७६९ रोजी रघुनाथराव आणि आनंदीबाईंना कन्यारत्न झाले. + परंतु दुर्दैवाने जन्मानंतर काही वेळातच मुलीचा मृत्यू झाला. + दि. ७ नोव्हेंबर १७६९ रोजी माधवराव पेशवे पर्वतीवर श्री देवदेवेश्वराच्या दर्शनास जाऊन + परत शनिवारवाड्यावर जात असताना दुपारच्या सुमारास पर्वती पायथ्याला आम्रबागेनजीक + त्यांच्यावर खुनी हल्ला झाला. सुदैवाने त्यातून माधवराव बचावले, परंतु यात त्या खुऱ्याचा + मात्र मृत्यू झाल्याने यामागे नक्की कोणाचा हात आहे ते शेवटपर्यंत समजू शकले नाही. याच + सुमारास माधवरावांना आतड्याचा क्षय (ट्यूबरक्युलॉसीस-टीबी) जडला. यामुळे + मोहिमेसाठी बाहेर पडणे अशक्य झाले. परंतु, त्र्यंबकमामा पेठ्यांच्या नेतृत्वाखाली + माधवरावांनी म्हैसूरच्या नबाब हैदरअलीखानविरुद्ध मोहीम उघडली. डिसेंबर सन १७६९ + मध्ये त्र्यंबकमामा पेठे, गोपाळराव पटवर्धन, मालोजी व्यंकटराव इ. सरदारांनी + कर्नाटकाकडे प्रस्थान ठेवले. या स्वारीत पेशव्यांच्या फौजा तुंगभद्रा ओलांडून दक्षिणथडीवर + उतरल्या. पेशव्यांच्या फौजांचा वेग इतका प्रचंड होता की, म्हैसूर जवळून दक्षिणेत येताना + हैदरला मराठे आल्याची बातमी समजली. ताबडतोब आपले सैन्य घेऊन हैदर मराठ्यांवर + चालून गेला. भैरवगड़ाजवळ दोन्ही फौजा परस्परांच्या समोर आल्या. तुंबळ युद्ध झाले. युद्ध +<<< + +मराठ्यांनी जिंकले, मात्र यात सरदार गोपाळराव पटवर्धन पडले. यानंतरच्या काळात कोलार +येथेही एक संहारक युद्ध झाले, परंतु येथेही हैदर पराभूत झाला आणि त्याने श्रीरंगपट्टणम +मुक्कामी पेशव्यांशी तह केला. या तहान्वये हैदरने पेशव्यांनी जिंकलेल्या मुलुखाला मान्यता +दिली आणि निश्चित खंडणी देण्याचे हैदरकडून आश्वासन घेऊन मराठी फौजा जानेवारी सन +१७७१ मध्ये पुण्यात परत आल्या. + या चौथ्या कर्नाटक मोहिमेत सुरुवातीला माधवराव स्वतः सामील झाले होते. परंतु +क्षयाचा त्रास पुन्हा उद्भवल्याने १३ १७७० रोजी माधवराव परत पुण्यात येण्यास निघाले. +दि. २५ १७७० या दिवशी या गावानजीक माधवरावांची कृष्णा आणि घटप्रभा या +दोन नद्यांच्या संगमावर सुवर्णतुला झाली. + आता माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव मोठे झ���ले होते. नुकत्याच झालेल्या कर्नाटक +मोहिमेत नारायणरावांना सहभागी करून त्यांना लढाईचे प्रत्यक्ष मैदानावरील डावपेच +शिकवायला माधवरावांनी सुरुवात केली होतीच, परंतु दि. २३ ऑगस्ट सन १७७० रोजी +माधवरावांनी सखारामबापू बोकील यांची दिवाणगिरी नारायणरावांना बहाल केली आणि +बापूंना मुतालकीची वस्त्रे दिली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीसच नागपूरकर जानोजी भोसले +माधवरावांच्या भेटीकरता पुण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती. माधवरावांनी +सेनासाहेब सुभा असलेल्या जानोजी भोसल्यांची उत्तम सरबराई केली. मेजवान्या आणि +भेटीदाखल नजराणे दिले गेले आणि ऑक्टोबर महिन्यात जानोजी परत नागपुरास फिरले. +माधवरावांची तब्येत अजूनही नादुरुस्तच होती. म्हैसूरचा हैदरअली दिलेली वचने पाळत +नव्हता म्हणून माधवरावांनी आपली फौज हरिपंततात्या फडक्यांच्या नेतृत्वाखाली +पुन्हा कर्नाटकात पाठवली. (अंदाजे १७७१ च्या सुरुवातीला). या फौजेने हैदरला पुन्हा हादरा +देऊन ३६ लाख रुपये रोख, कर्नाटकातला इतर पूर्वी स्वराज्यात असलेला मुलुख मान्य करून +घेतला. शिवाय दरसाल १४ लाख रु. खंडणी भरण्याचे हैदरला ठणकावून सांगितले. +कर्नाटकात ही मोहीम सुरू असतानाच माधवरावांनी उत्तरेत असलेल्या महादजी शिंद्यांना +दिल्लीवर स्वारी करण्यास सांगितले. यावेळेस उत्तरेतले सरदार विसाजी कृष्ण बिनीवाले +आणि रामचंद्रपंत कानडे यांना माधवराव कळवतात, " ... सर्वांनी येक येकाचे न्यून पाहून +घाण केली तैसे न करणे. मातबर सरदारांनी सरकारचे लक्ष सोडून धनियाचे कामाची +पायमल्ली केली ... त्याही अशा गोष्टी सहसा न कराव्या. धण्याचे लक्ष धण्याचे हीत ते त्यांनी +करावे ... " या पत्रावरून माधवरावांनी शिंदे-होळकरांवर चांगलेच ओढलेत. 'मातबर +सरदारांनी ... ' या वाक्यातून पानिपतावर मल्हारराव होळकरांनी विश्वासरावांचा आणि +सदाशिवरावभाऊंचा विश्वासघात केला, याकडे माधवराव लक्ष वेधू इच्छितात. या मोहिमेत +महादजी शिंदे यांनी थेट दिल्लीवर घालून दिल्ली काबीज केली. दिल्लीच्या लाल +किल्ल्यावर भगवे निशाण फडकू लागले. अब्दालीच्या स्वारीच्यावेळी शाहजादा शाहआलम +हा बंगालमध्ये पळून जाऊन इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. महादजी शिंद्यांनी +शाहआलमला सुरक्षेची हमी देऊन पुन्हा तख्तनशीन केले. अर्थातच आताचा ��ाहाआलम +बादशहा पेशव्यांच्या कृपेने गादीवर बसला असल्याने शाही शिक्के-कट्यार आता पूर्णपणे +<<< + +मराठ्यांच्या हातात आली होती. भयंकर नरसंहारानंतर केवळ दहा वर्षातच +मराठ्यांनी पुन्हा दिल्ली काबीज केली. या साऱ्या वार्ता ऐकून माधवराव खूप आनंदित झाले. +हे विजयी वीर पुण्यात येताना त्यांचे सुवर्णफुले उधळून स्वागत करावे, असे हुकूम +माधवरावांनी पुण्याच्या अंमलदारांना दिले. + माधवरावांची तब्येत आता खालावत चालली होती. म्हणूनच त्यांनी आपला कारभार +बहुतांशी आपल्या अत्यंत विश्वासातल्या प्रमुख सल्लागार आणि मुत्सद्द्यांकडे सोपवला +होता. सर्वात विश्वासू होते ते पंडितराव रामशास्त्री प्रभुणे. माधवराव रामशास्त्रींना आपल्या +तीर्थरूपांप्रमाणे मानत असत, हरएक बाबतीतला रामशास्त्रींचा सल्ला अत्यंत मोलाचा असे. +ते अत्यंत न्यायनिष्ठूर वृत्तीचे असल्याने माधवरावांनी त्यांना आपले मुख्य न्यायाधीश नेमले +होते. शनिवारवाड्यातल्या गणेश रंगमहालात रामशास्त्रींकरता एक स्वतंत्र स्थान होते. +पुण्यातले लोकही त्यांना मानत असत. नुसते पुण्यातच नव्हे, तर उभ्या हिंदुस्थानात +रामशास्त्रींची न्यायनिस्पृहता शुद्ध तुपातल्या सोनेरी दिव्यासारखी अखंड तेवत राहिली होती. +नाना फडणवीस आणि हरिपंततात्या फडके यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. नाना +फडणवीसांचे मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू. पूर्वी बाळाजी विश्वनाथ दिल्लील्या +स्वराज्याच्या सनदा आणण्याकरता गेले असता तेथे झटापटी होऊन मारले गेलेल्या (पूर्वी +आजोबांचेच नाव नातवाला ठेवण्याची पद्धत होती.) बाळाजी महादेव भानूंचे नातू म्हणजेच +हे नाना फडणवीस. मोरोबादादा फडणवीसांचे हे धाकटे चुलत बंधू. अतिशय तैलबुद्धीचे +चित्पावन म्हणजे माधवरावांच्या गळ्यातले ताईत होते. नानांचा दरारा आणि धाक उभ्या +हिंदुस्थानात होता. एखादे काम नानांनी हाती घेतले की ते पूर्ण झालेच म्हणून समजावे. +सदाशिवरावभाऊंच्या तोतयाचे प्रकरण नानांनी इतक्या कुशलतेने हाताळले होते की, +सुखलालाचे भांडे फुटले नसते तरच नवल! नाना फडणवीसांबरोबरच हरिपंत फडके +देखील दरबारातले एक हुशार मुत्सद्दी अन् सेनापती होते. नानांबरोबर हरिपंतांनी पूर्वी + युद्ध प्रत्यक्ष पाहिले असल्याने त्याचा पुढच्या प्रत्येक युद्धात त��यांना फार उपयोग +झाला. पुण्यातले सारे लोक त्यांना तात्यासाहेब म्हणत असत. हे दोघेही माधवरावांच्या +अत्यंत जवळचे असले तरीही माधवरावांच्या उग्र आणि रोखठोक स्वभावाने तेही सतत +भिऊन असत. हरिपंततात्या माधवरावांविषयी म्हणतात, "मर्जी फार कठीण ... जन्मपावेतो +विश्वासे कारभार केला. एक दिवस अंतर पडेल तर ... मागे चांगले (जे काही) केले ते +आठविणार नाहीत. एक दिवस शेवटास गेला म्हणजे कृतकृत्य होतो ... " यावरूनच +माधवरावांचा किती दरारा होता सहज लक्षात येते. या लोकांशिवाय त्र्यंबकमामा पेठे, +मुरारराव घोरपड्यांसारखे निकटवर्तीय सदा तत्पर असत. + दि. ९ जून १७७१ रोजी माधवराव रमाबाईंसह थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाकरता गेले. +तेथेच पेशव्यांचा लहानसा होता. या वाड्यात दहा दिवस मुक्काम करून दि. १९ जून +रोजी माधवराव पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर नानासाहेबांची द्वितीय पत्नी म्हणजेच +माधवरावांच्या सावत्र मातोश्री राधाबाई (वाखरे) यांची पुण्यातल्याच ओंकारेश्वराच्या मंदिरात +रौप्यतुला करण्यात आली. नंतर तब्येतीला आराम म्हणून हवापालटासाठी माधवराव +<<< + +गोदावरी नदीच्या काठी कटोरे या गावी जाऊन राहिले. कटोरे मुक्कामी असतानाच दि. १३ +जुलै रोजी माधवरावांची गोदातीरावर सुवर्णतुला करण्यात आली. कटोरे येथून पुण्यात परत +आल्यावर माधवरावांनी नारायणरावांना बोलावून घेतले व दि. २८ ऑगस्ट रोजी त्यांना काही +गोष्टी समजावून सांगितल्या. नारायणरावांना राज्यकारभाराचे शिक्षण द्यायला माधवरावांनी +यापूर्वीच सुरुवात केली होती. आपण शनिवारवाड्यात नसताना नारायणरावांचे शिक्के +चालवावेत अशी माधवरावांची आज्ञा होती. त्याकरता त्यांनी महादजीपंत करकरे यांना +मखलाशी (शेरा देण्यास) करण्यास सांगितले होते. दि. २३ ऑक्टोबर रोजी माधवरावांची +कचेश्वर या ठिकाणी सुवर्णतुला करण्यात आली. याच दिवशी चंद्रग्रहणही होते! + दि. ९ जानेवारी १७७२ रोजी माधवराव सिद्धटेकच्या गणपतीच्या दर्शनाला गेले ते दि. ५ +फेब्रुवारी १७७२ मध्ये शनिवारवाड्यात परत आले. परंतु दोन-तीन दिवस होत नाहीत तोच +पुन्हा थेऊरच्या वाड्यात गेले, ते थेट महिन्यात पुण्याला परत आले. दरम्यानच्या काळात +आनंदवल्लीहून पुण्यात परत आलेल्या रघुनाथराव पेशव्यांची दि. १९ मार्च १७७२ रोजी +नजरकैदेतून सुटका करण्यात आली. त्यापूर्वी कटकारस्थाने करणार नाही, फितुरी करून +राज्याचे तुकडे करणार नाही अशा अटी रघुनाथरावांना मान्य कराव्या लागल्या होत्या. परंतु, +त्या बदल्यात आपले दत्तक पुत्र अमृतराव यांना सात लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर +शिवाय स्वतः रघुनाथरावांना बारा लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर मिळावी, अशी त्यांनी +माधवराव पेशव्यांकडे मागणी केली. माधवरावांनीही काकांना जास्त करू नये, +म्हणून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. दि. २७ मार्च रोजी माधवराव सिद्धटेकहून पुण्याला +परत आले. यानंतर साधारणतः चार महिने माधवराव शनिवारवाड्यातच होते. प्रत्यक्ष +फडावर बसून कारभार बघणे शक्य नसल्याने ते रोजचे वर्तमान आपल्या महालात बसून +कथन करीत असत. क्वचित पर्वती पंचायतन आणि ओंकारेश्वराला जागे होत असे. मध्यंतरी +स्थिर असलेली माधवरावांची तब्येत परत अचानक खालावली. औषधं सुरू होती, परंतु +माधवराव प्रचंड गजाननाची भक्ती करत असल्याने जर काही बरेवाईट झालेच तर त्याच्या +चरणीच व्हावे असं म्हणून थेऊरला चिंतामणीसन्निध वाड्यात जाऊन राहिले. जाताना त्यांनी +शनिवारवाड्याची सारी व्यवस्था रघुनाथरावांच्या हाती जरी सोपवली असली तरी +हरिपंततात्या, नाना फडणवीस इ. लोकांना सावध राहण्यास बजावले होते. आता काका +'सुधारले' असले तरी पुन्हा काय करतील याचा नेम नाही. + आपल्या माघारी राज्याचे कसे होणार याची माधवरावांना सतत काळजी वाटत होती. +नारायणराव केवळ सोळा वर्षांचे होते. त्यांना हा भार पेलवेल किंवा नाही आणि त्याचबरोबर +रघुनाथरावांचे उपद्व्याप त्यांना सांभाळता येतील का, अशा विवंचनेत माधवराव सतत +बुडालेले असत. शेवटी माधवरावांनी पुण्याहून राघोबादादा, नाना फडणवीस, बापू, +रामशास्त्री प्रभुणे, हरिपंततात्या इ. आपल्या खाशा मंडळींना थेऊरला बोलावून घेतले आणि +पंडितराव रामशास्त्रींच्या सल्ल्यानुसार आपल्या पश्चात होणाऱ्या कारभाराविषयीची एक +यादीच तयार केली. या यादीत मुख्य नऊ होती. ही यादी म्हणजे एकप्रकारे +माधवरावांचे मृत्युपत्रच होते. या यादीतील नऊ पुढीलप्रमाणे- +<<< + + १) दौलतीस कर्ज आहे ते वारावयाचे. ऐवज आहे तो धरून तूर्त निवळ कर्ज असेल +त्यास द्यावा. दुसरा ऐवज दौलतीसंबंधी मसलत न करीता आधि कर्ज वारावे. मग +दौलतीसंबंधी जसे करणे तसे करावे. + २) कोकणात व देशात इजारे झालीयामुळे रयतेस सुख ते नाही. त्यास बारकाईने मनात +आणून वाजवीचे रितीने जसे जाहले असेल तै नीट करावे व प्रजापालन करावे. + ३) श्री काशी व प्रयाग ही दोन्ही स्थळे सरकारात यावी असा तीर्थरूपांचा हेतू होता. +त्यास प्रस्तुत करण्याजोगे दिवस आहेत. दहा-वीस लक्षांची जहागीर पडली तर देऊन दोन्ही +स्थळे हस्तगत करावीत. + ४) तीर्थरूप मातुश्रीसाहेबांचा हेतू काशीस जावयाचा आहे. त्यांस यात्रा + ५) तीर्थरूप भाऊसाहेबांची क्रिया माघमासी जरूर करावी. + ६) काशीचे ब्राह्मणांस वर्षासने आहेत, ती पिढीजात करून देऊन वर्षास पावती करीत +जावी. + ७) काशीस दोन लक्ष ब्राह्मणभोजन करावे. दक्षणा दोन पैसे प्रमाणे द्यावी. + ८) तीर्थरूप दादासाहेबांस पाच लक्षांची जहागीर निवळ लावून द्यावी. याहून थोड़े बहुत +अधिक मागितल्यास त्यांचा संतोष राखून मर्जी प्रसन्न राखावी. निदान सात लक्षांची जहागीर +देऊन अधिक मागू लागल्यास ऐकू नये. + ९) श्रावणमासाचा धर्मादाय पूर्वीपासून चालत आलेला आहे. पाच लक्षाची दौलत राहील. +तावत्कालपर्यंत चालवावा यासी अनमान करू नये. + याप्रमाणे पंडित रामशास्त्रींकडून माधवरावांनी ही नऊ कलमी यादी लिहून घेतली व सर्व +कारभाऱ्यांसमोर आणि रघुनाथरावांसमोर मांडली. सर्व कारभाऱ्यांनी 'आपण हुकूमाबर +हुकूम वर्तन जाऊ' असे वचन माधवरावांना दिले. यादीतील रघुनाथरावांविषयीची +माधवरावांची आज्ञा रघुनाथरावांनाही माहीत होतीच. त्यांना ती पटली नव्हती. ‘केवळ पाच +लाख, नाहीतर जास्तीत जास्त सात लाखांची जहागीर?' अशक्य! रघुनाथराव भयंकर चिडले +होते, परंतु इथे थेऊरास सर्वांसमक्ष काही बोलताही येत नव्हते. हा माधवरावांचा विचारपूर्वक +केलेला अंतिम निर्णय असल्याने ते पुढे अजून काही देण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे, +असे समजून रघुनाथराव मनाशी काहीतरी ठरवून पुन्हा पुण्यात आले. एक आठवडा उलटतो +न उलटतो तोच दि. ६ ऑक्टोबर १७७२ रोजी, ऐस दसऱ्याच्याच दिवशी रघुनाथराव +शनिवारवाड्यातून तुळापूरकडे गेले. परंतु, नाना फणडवीसांचे हेर रघुनाथरावांच्या मागावर +होतेच. तुळापूरात रघुनाथरावांना पुन्हा पकडण्यात आले. परंतु, ही कैद श्रीमंत माधवरावांच्या +हुकूमावरून झालेली नसल्याने रघुनाथरावांना पुन्हा शनिवारवाड्यातच नेऊन नजरकैदेत +ठेवण्यात आले. + आप��े हे दुखणे आता शेवटचेच आहे हे माधवरावांना आता कळून चुकले होते. आपला +प्राण श्री गजाननाच्या समोरच जावा, असे माधवरावांना वाटत होते. म्हणून दि. १ नोव्हेंबर +१७७२ रोजी माधवरावांच्याच आज्ञेनुसार त्यांना पेशव्यांच्या वाड्यातून श्री चिंतामणी +<<< + +मंदिराच्या ओवरीत हलवण्यात आले. यावेळी माधवराव आपला सारा श्रीमंती डामडौल +सोडून केळीच्या पानांच्या सुरळ्यांवर निजत. या जागेवरून सतत समोर गजाननाची मूर्ती +नजरेसमोर दिसत होती. माधवरावांच्या अंगी आता हालचाल करण्याइतकेही त्राण राहिले +नव्हते. नारायणराव स्वतः माधवरावांजवळ राहून त्यांना अन्न-पाणी भरवत असत. राजयक्ष्म +हा मुळात आतड्याचा रोग असल्याने गेलेले अन्न परत उलटून पडत होते. लागवणकर वैद्य, +रूपेश्वरवैद्य, महंमद अली हकीम, इंग्रजांनी आणि पोर्तुगीजांनी पाठवलेले आपले डॉक्टर्स +यांना माधवरावांनी जवळ बोलावून सांगितले, 'प्राण जाते समयी अन्न न घालणे. दूध व +गंगोदक मिलोन घालणे.' जेणेकरून अतिसार होईल, पण कफ होणार नाही. कारण जर +कफ झाला तर गजाननाचे नाव मुखातून उच्चारता येणार नाही. माधवरावांची स्मृती मात्र + अखेरपर्यंत 'अमरणांत' होती. + अखेर आपल्या आता काही शेवटच्या घटका राहिल्या आहेत हे जाणून माधवरावांनी +सर्वांना तयारी करण्यास सांगितले. रघुनाथरावांनाही पुण्याहून बोलावण्यात आले होते. +माधवरावांनी नारायणास बोलावले व त्यांचा हात रघुनाथरावांच्या हाती देऊन ते +रघुनाथरावांना म्हणाले, 'जसा नानासाहेब याणी सर्वांचा प्रतिपाळ केला, तसा तुम्ही या +लेकरास घेऊन राज्यकारभार करावा. आता मनात कोणेविशी धरू नये. सर्व तुमचेच + आहे, परंतु लेकरावर दृष्टी ठेवून राज्य चालवावे ... आपण सर्व जाणत आहा! या परते आता +काय सांगावे? मृत्यूपूर्वी माधवरावांनी आपल्या खाशा सुलक्षणी गाईंचे स्वहस्ते ब्राह्मणांस दान +दिले आणि त्यानंतर दोन घटिका तोंडाने गजाननाचे नामस्मरण सुरू केले. नारायणरावांनी +माधवरावांच्या मुखात गंगोदक सोडले आणि कार्तिक वद्य अष्टमी शके १६९४, नंदननाम +संवत्सरी बुधवारी म्हणजेच दि. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी पहाटे श्री चिंतामणीचरणी +माधवरावांनी इहलोकीची यात्रा संपवली. एखाद्या महायोग्याप्रमाणे माधवरावांचा नेत्राद्वारे +प्राण गेला. नारायणरावांनी त्यांचे उत्तरकार्य केले व अस्थि ना��िकजवळ गंगापूरास +गोपिकाबाईंकडे पाठवून दिल्या. माधवरावांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या समागमे रमाबाईही सती +गेल्या. पेशवाईच्या सुवर्णमाळेतला मेरूमणी गळून पडला होता. पानिपतानंतर मरणोन्मुख +महाराष्ट्राला पुन्हा आकाशी भिडवणारा एक मोती गळाला होता. भार्गवाचा अंश संपला +होता. 'मराठ्यांचा वाघ गेला होता! आता मागे सारी कोल्ही राहिली होती ..... ' + संदर्भ : + १) रोजनिशीतील उतारे : गो. स. सरदेसाई, २) मराठी रियासत : गो. स. सरदेसाई (थोरले +माधवराव), ३) पेशवे व सातारकर राजे यांची टिपणे : काव्येतिहास संग्रह, ४) मेस्तक +शकावली : काव्येतिहास संग्रह, ५) पुरंदरे दफ्तर भाग १ व ३ : कृ. वा. पुरंदरे, ६) साधन +परिचय (महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास) : आपटे-ओतूरकर, ७) सातारा गादीचा इतिहास : +विष्णु गोपाळ भिडे, ८) कैफियत-यादी इत्यादी : वाड, मावजी पारसनीस, ९) सनदापत्रातील +माहिती : द. ब. पारसनीस, १०) मराठ्यांच्या इतिहासाची साधने (निवडक : राजवाडे), ११) +मराठ्यांचे साम्राज्य : रा. वि. ओतूरकर, १२) पेशवेकालीन महाराष्ट्र : वा. कृ. भावे, १३) +<<< + +मराठी दफ्तर रूमाल १ व २ : वि. ल. भावे, १४) ऐतिहासिक पोवाडे : अॅक्वर्थ-शाळीग्राम, +१५) पेशवे दफ्तरातील हिंदी कागद : भ. ग. कुंटे, १६) मराठे व इंग्रज : न. चिं. केळकर, १७) +चंद्रचूड दफ्तर : आपटे, पोतदार, १८) पेशवाईच्या सावलीत : ना. गो. चापेकर, १९) +विंचूरकर घराण्याचा इतिहास : ह. र. गाडगीळ, २०) काव्येतिहास संग्रह, पत्रे यादी वगैरे, +२१) पेशवे घराण्याचा इतिहास : प्रमोद ओक, २२) पुण्याचे पेशवे : अ. श. कुलकर्णी, २३) +पेशवे बखर : कृष्णाजी विनायक सोहोनी, २४) होळकराची कैफियत : य. न. केळकर +(संपादक), २५) नागपूरकर भोसले बखर : काशिराव गुप्ते, २६) HISTORY OF +MARATHAS : GREAT DUFF, ?¿ ) HISTORY OF MARATHA PEOPLE : +किंकेड- पारसनीस, २८) थोरले माधवराव पेशवे यांची रोजनिशी : वाड-मावजी, २९) +निजाम पेशवे संबंध : त्र्यं. शं. शेजवलकर. +<<< + + माधवरावांच्या अकाली मृत्युमुळे साऱ्या दौलतीवर दुःखाची छाया पसरली होती. सारे +कारभारी अत्यंत उदास होते. "कैलासी जाण्याचे रावांचे हे वय नव्हे, .. परंतु ईश्वरी इच्छा +प्रमाण. कोण काय करील त्यास?" तरी त्यातल्या त्यात माधवरावांनी आपल्या मृत्यूपूर्वी +'मृत्युपत्र' बनवले असल्याने पुढचा कारभार कसा करावा याची चिंता फारशी नव्हती. +साताऱ्यास छत्रपती राजारामांना ही बातमी समजली. 'राव पेशवे गेले. दौलतीची शानच +��ेली. आता हा बांध कसा साधावा ... ' महाराजांनी दुखवट्याची वस्त्रे रवाना केली. दि. २ +डिसेंबर रोजी माधवरावांची सारी अंतिम क्रियाकर्मे उरकून नाना, बापू, हरिपंततात्या, +रघुनाथराव, नारायणराव इ. मंडळी पुण्यात आली. आता लवकरात लवकर नारायणरावांना +पेशवाईची वस्त्रे मिळावयास हवी होती. नारायणराव यावेळी फक्त सतरा वर्षांचे होते. ते +वयाच्या नऊ वर्षांपर्यंत गंगापूरला आपल्या आईजवळ, मातोश्री गोपिकाबाईसाहेबांजवळ +राहात होते. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे झाले. परंतु, आपल्या पुत्राच्या +तडफदार स्वभावामुळे गोपिकाबाई आपल्या धाकट्या पुत्रासह गंगापूरला जाऊन राहिल्या +होत्या. यामुळेच लहान वयात नारायणरावांचे संस्कृत, मराठी व्याकरण, अलंकार-काव्य +शास्त्रांचा उत्तम अभ्यास झाला होता. परंतु, लहान वयात राजकारणाचे जे गिरवावयास +हवे ते मात्र त्यांना मिळत नव्हते. एकदा माधवरावांनी कटोरे येथे मुक्काम असताना +नारायणरावांस उपदेश केला होता. 'पुण्यकर्म करावे, उदासीनता व क्रोध कार्यकारणे +धरावा, नाना फडणवीस आणि सौ. यांच्याशी सख्य असावे, तीर्थरूपांची भेट +झाली तर निव्वळ बोलून कृपा संपादन करावी, पुस्तकांचा बंदोबस्त करावा, त्रिपदी पाठ +करावी, इंद्रिय निग्रह करावा व पुण्यकर्मे विशेष करावीत, असे उपदेशवजा आदेश +माधवरावांनी नारायणरावांना केले असले (२८ ऑगस्ट १७७१, कटोरे मुक्कामी) तरीही मात्र +नारायणरावांच्या स्वभावातला अल्लडपणा आणि पोरपणा अजूनही पूर्णपणे गेला नव्हता. +शिवाय माधवरावांनी त्यांना एकटे असता नाना व हरिपंततात्यांचा विचार घेऊन कार्य +करण्याचा सल्लाही दिला होता. परंतु नारायणरावांच्या डोक्यात ते विचार काही पक्के शिरले +नाहीत आणि अखेर माधवराव त्यांना सोडून गेले. + दि. ३ डिसेंबर रोजी सखारामबापू बोकील, नाना फडणवीस, हरिपंततात्या +फडके, मोरोबादादा फडणवीस, रघुनाथराव यांच्यासह नारायणरावांनी साताऱ्याच्या दिशेने +प्रस्थान ठेवले. सातारा दरबारात पोहोचल्यावर राजारामांनी औपचारिक सांत्वनाचे शब्द +उच्चारले. परंतु लगेच नारायणरावांना पेशवाईची वस्त्रे मिळाली नाहीत. कदाचित इतर मंडळी +माधवरावांचे उत्तरकार्य करण्यात गुंतली आहेत, हे पाहून सातारला गुप्त स्वार पाठवून +रघुनाथरावांनी 'आपल्यालाच पेशवाईची वस्त्रे मिळावीत' असे राजारामांना कळवले +असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच कदाचित छत्रपतींनी थेट नारायणरावांना +लगेचच वस्त्रे दिली नाहीत. परंतु नाना-मोरोबादादा, हरिपंततात्या इ. मंडळींनी माधवरावांची +मृत्यूपूर्वीची नऊ कलमी यादी राजारामांना दाखवली. अखेर मार्गशीर्ष वद्य तृतीया शके +१६९४, नंदननाम संवत्सरी रविवारी म्हणजेच दि. १३ डिसेंबर सन १७७२ रोजी रात्रीच्या +<<< + +पहिल्या प्रहरी नारायणरावांना जरी पेशवाई मिळाली असली तरी सारा कारभार मात्र +राघोबादादाच बघणार होते. नारायणराव फक्त शिक्का मारण्यास नावाचे पेशवे बनले होते. +त्याचबरोबर पेशव्यांचे दिवाण किंवा मुख्य कारभारी म्हणून पंत सखारामबापू बोकील आणि +फडणवीस म्हणून नाना आणि त्यांचे चुलतबंधू मोरोबादादा यांची नेमणूक करण्यात आली. +या समारंभ सोहळ्यानंतर नारायणराव रघुनाथराव आणि कारभाऱ्यांसह माहुली तुळजापूर, +पंढरपूर इ. देवदेवस्थानांची यात्रा करून दि. ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाड्यात +दाखल झाले. + नारायणरावांना अजूनही पेशवाईची पोच निर्माण झाली नव्हती. त्यांचे वागणे फार +उतावीळपणाचे होते. बाबाजी बर्वे या नावाचा एक दुय्यम कारभारी होता. तो सतत +नारायणरावांच्या महालाभवती घुटमळत असे. साऱ्या लोकांचे असे म्हणणे होते की, हा +बाबाजी बर्वेच पेशव्यांना वाईटसाईट सल्ले देतो. म्हणून शेवटी सखारामबापूंनी या बर्व्याचा +कायमचा बंदोबस्त केला. एका अस्सल समकालीन पत्रात म्हटलं आहे की, "श्रीमंतांची मर्जी +फारच उतावीळ आहे ... लहान माणसांची चाल पडलेसी दिसते ... बापूंची मर्जी +कोकणस्थांवर कृद्ध आहे. (त्यातच) बाबाजी बर्व्याच्या नादाने चालतात. श्रीमंतांस आपपर +कळत नाही. धन्यात धनीपण नाही." + नारायणराव बहुतांशपणे माधवरावांच्या वागण्याची नक्कल करत असत. माधवरावांचा +स्वभाव तापट होता आणि ते बोलत असता समोरचा लहान आहे का मोठा हे न पाहता +रोखठोक बोलत असत. परंतु वेळप्रसंग पाहून ते एक पाऊल माघारही घेत असत. +माधवरावांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांना चैन आणि अजिबात मान्य +नव्हता. आपल्या पितामहांसारखे, श्रीमंत थोरल्या बाजीरावांसारखे फक्त दौलतीच्या कामी +जीवन करावे हेच माधवरावांच्या नजरेसमोर होते. नारायणराव माधवरावांची +फक्त नक्कल करीत. परंतु, त्यांची विवेकबुद्धी, कर्तव्यनिष्ठता, न्यायनिष्ठूरपणा +नारायणरावांना समजलाच नव्हता. त्यांच्या या अविवेकी स्वभावामुळेच कारभाऱ्यांना +नारायणरावांचे वागणे फार खटकू लागले होते. अशातच एका प्रकरणाची भर पडली. + माधवरावांच्या काळापासून विसाजीपंत लेले या नावाचे एक कारभारी पेशव्यांच्या सेवेत +होते. माधवरावांच्या अखेरच्या काळात हे गृहस्थ रघुनाथरावांच्याच आसपास असत. वस्तुतः +माधवरावांचे व त्यांचे पूर्वी काहीतरी बिनसले असावे. म्हणूनच त्यांचा माधवरावांवरही +काहीसा रोष होता. नंतर राघोबादादा आणि माधवरावांच्यात विस्तव निर्माण झाल्यानंतर +यांचे मन दादासाहेबांकडेच झुकले होते. दिवाण सखारामबापू बोकील यांच्या मनात +कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांविषयी आकस असला तरीही विसाजीपंत लेले आपणहून +राघोबादादांच्या पक्षात येताहेत हे पाहून त्यांना समाधानच वाटले. आता विसाजीपंत बापूंच्या +सल्ल्याखाली रघुनाथरावांचे काम करत होते. माधवरावांच्या काळात घोडपच्या लढाईपूर्वी +(जून १७६८) इंग्रज कंपनी सरकारची मदत मागण्यासाठी रघुनाथरावांनी विसाजीपंतांनाच +पाठवले होते. माधवरावांनी ज्यांना माफ करून पुन्हा पदरी घेतले त्या अस्तनीतल्या +निखाऱ्याने आता पूर्ण हातच जाळण्याचा उद्योग आरंभला होता. +<<< + + हरिपंततात्या हे मुख्यतः सेनापती असल्याने फडावरच्या राजकारणात ते पूर्णतः +सहभागी होऊ शकत नसत. जुने जाणते असे मोरोबादादाही आता वृद्धापकाळात होते. +आता सदरेवरची ही सारी राजकारणे ओळखू शकणारा फक्त एकच मुत्सद्दी उरला होता- +'नाना फडणवीस' उर्फ बाळाजी जनार्दन भानू. १७७१ मध्ये कटोरे मुक्कामी माधवरावांनी +नारायणरावांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला होता. 'नाना फडणवीस यांच्याशी बहुत +सख्य असावे.' म्हणूनच सुरुवातीला नारायणराव नानांच्याच सल्ल्याने चालत असत. +विसाजीपंत लेल्यांचे रघुनाथरावांकडचे वाढलेले जाणे-येणे नानांना समजत होते. पुन्हा नव्या +राजकारणाचा नानांना वास येऊ लागला होता. माधवराव असेपर्यंत सारे जरबेत होते, खुद्द +रघुनाथरावही. पण ते गेल्यानंतर सारेच बिनसल्यासारखे वाटत होते. 'हा विसाजीपंत सतत +इंग्रजांकडे जात असतो. या मूर्खास कळत नाही की आज कौतुक करणारे हे लबाड लोक +उद्या आपल्याच अंगावर वस्त्रही शिल्लक ठेवणार नाहीत. एकदा का फट दिसली की त्यातून +अलगद आत घुसणाऱ्या स���पाच्या औलादीचे हे!' नानांना हे लक्षण काही ठीक वाटेना. त्यांनी +नारायणरावांना एकांतात गाठून हा सारा प्रकार समजावून सांगितला. माधवरावांच्या काळात +रघुनाथरावांनी केलेली कारस्थाने नारायणरावांना माहीत होती. त्यांना नानांचे म्हणणे पटले +आणि एके दिवशी दरबारात त्यांनी विसाजीपंतांना पकडून कैदेत टाकण्याचे आदेश दिले. +नारायणरावांच्या आदेशाने सखारामबापू हादरलेच. परंतु, थोड्या वेळातच या निर्णयामागची +खरी 'अक्कल' कोणाची आहे हे लक्षात आले. लेले हा बापूंचा माणूस होतो. त्याच्या +अटकेमुळे बापू आणि नाना यांच्यात विस्तव निर्माण झाला. + फडावरची ही अंतर्गत राजकारणे रंगत असतानाच इकडे खासगीत मात्र आनंदाच्या +बातम्या मिळत होत्या. रघुनाथराव आणि आनंदीबाई यांची कन्या दुर्गाबाई (गोदुबाई) यांचा +विवाह ठरला होता. स्थळ मोठे तालेवार होते. मुख्य म्हणजे आप्तातलेच होते. बारामतीकर +सावकार बाबुजी नाईक जोशी (भिऊबाईंचे दीर?) यांचे चिरंजीव पांडुरंगपंत यांच्याशी विवाह +निश्चित करण्यात आला होता. नारायणरावांच्या मनात रघुनाथरावांविषयी जरी आकस +असला तरी आपल्या या बहिणीबद्दल मात्र त्यांना फार प्रेम वाटत असे. पेशवे घराण्यात ही +एकच बहीण होती म्हणूनही असेल कदाचित आणि म्हणूनच मुख्य मुख्य सरदारांना आणि +आप्तांना खाशा पेशव्यांनी जातीने जाऊन आमंत्रणे दिली होती. अखेर माघ शुद्ध पौर्णिमा +शके १६९४ नंदननाम संवत्सरी रविवारी, म्हणजेच दि. ७ फेब्रुवारी १७७३ रोजी गोदुबाई +आणि पांडुरंगपंतांचा विवाह शनिवारवाड्यात मोठ्या थाटामाटात लावण्यात आला. या +विवाहाच्या निमित्ताने काही दिवस का होईना, फडावरचे तंग वातावरण निवळले होते. खुद्द +नारायणराव आणि रघुनाथराव एकमेकांशी सलोख्याने वागत होते. हे मंगलमय वातावरण +पाहून कारकुनांनी सुटकेचे टाकले. + सुटकेचे हवेत विरतात न विरतात तोच पुन्हा पूर्वीची राजकारणे मढ्यातून बाहेर +आली. नारायणराव आणि रघुनाथरावही लग्नाच्या काळात एकमेकांशी सख्याने वागत होते, +पण वरवरच! आतून मात्र दोघांच्यांही मनातली कायम होती. या लग्नानंतरच्या काही +दिवसांतच नारायणराव गंगापूरला आपल्या मातोश्री गोपिकाबाईंच्या दर्शनासाठी निघाले. +<<< + +माधवरावांच्या अकाली मृत्युमुळे गोपिकाबाई फार खचून गेल्या होत्या. त्यातच रोजच्या या +अंतर्गत राजकारणाच्या खबरा त्यांना (नानांमार्फत?) समजत असल्याने त्या आणखीनच +काळजीत होत्या. आता आपला पुत्र आल्याचे पाहून त्या थोड्या सुखावल्या. या चार +दिवसांच्या काळात गोपिकाबाईंनी नारायणरावांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. नाना +आणि हरिपंततात्या, तसेच बजाबापंत पुरंदरे यांच्यावर गोपिकाबाईंचा विश्वास होता. +नारायणरावांनी त्यांच्या सल्लानेच कारभार करावा असे गोपिकाबाईंचे स्पष्ट मत होते. कारण +माधवराव गेल्यानंतर रघुनाथरावांच्या कारस्थानांना पुरून उरणारी फक्त हीच मंडळी होती. +गोपिकाबाईंचा हा सल्ला नारायणरावांनी फारसा मनावर घेतला नाही असंच दिसतं. (गंगापूर +मुक्काम १४ मार्च ते १० एप्रिल) + गंगापूरहून पुण्यात परतल्यानंतर नारायणरावांना पुन्हा एकदा रघुनाथराव काही +कारस्थानं करतायत असं वाटल्याने त्यांनी राघोबादादांना शनिवारवाड्यात नजरकैदेत ठेवलं. +आता खरंच रघुनाथरावांनी कारस्थानं रचली होती की, असा नारायणरावांना फक्त संशय +आला ते समजत नाही. परंतु, या नजरकैदेमुळे रघुनाथराव फारच एप्रिल १७७३ +च्या अखेरीस एके रात्री रघुनाथरावांनी या नजरकैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. +रघुनाथरावांच्या महालाभवती (बदामी बंगल्याभवती) पेशव्यांच्या खाशा चौक्यांव्यतिरिक्त +नानांनीही आपली विश्वासू माणसे पहाऱ्यावर ठेवली होती. कैदेतून पळून जाताना नानांच्या +पहारेकऱ्यांनी त्यांना अलगद पकडले. नानांच्या या कर्तव्यतत्परतेने नारायणरावांच्या मनात +त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. शिवाय गोपिकाबाईंनीही नानांच्या सल्ल्याने कारभार +पहावा, असे सांगितल्याने नारायणरावांनी सखारामबापूंना कारभारी पदावरून काढून ते पद +नाना फडणवीसांना दिले. यामुळे सखारामबापूंच्या मनातही नारायणरावांविषयी द्वेष निर्माण +झाला. नारायणरावांनी रघुनाथरावांवरची कैद आणखी कडक केली. सूर्यदर्शनासाठीही +रघुनाथरावांना महालाबाहेर येऊ द्यायचे नाही, असे कडक हुकूम पहारेकऱ्यांना दिले. +रघुनाथराव हे कडक सोवळे-ओवळे पाळणारे होते. परंतु त्यांना होमशाळेत वा देवघरातही +जाण्याची बंदी करण्यात आली. माधवरावांचा आपल्याला विरोध असूनही त्यांनी एवढे +टोकाचे पाऊल कधी उचलले नाही आणि आता हे नारायणराव मात्र अतिच करताहेत याचा +भयंकर राग आल्याने रघुनाथराव���ंनी अन्नाचा त्याग केला. पतीपाठोपाठ आनंदीबाईही +उपोषणास बसल्या. + साधारणतः याच वेळेस एका प्रकरणाचा निवाडा करताना नारायणरावांनी चांद्रसेनीय +कायस्थ प्रभूंच्या विरोधात निवाडा केला आणि एवढे करून ते थांबले नाहीत तर कायस्थांनी +वैदिक मंत्रांनी कार्ये करू नये, मंत्र येत असले तरी उच्चारू नयेत, आपल्या चाकरीत ब्राह्मण +पुरुष व बायका ठेवू नयेत, भाताचे पिंड करून ब्राह्मणभोजन घालू नये, शाळिग्रामास पुजू +नये इ. आदेश नारायणरावांनी दिले. या अपमानास्पद निकालामुळे फडावरचेही अनेक +कायस्थ मुत्सद्दी नारायणरावांवर चिडून रघुनाथरावांकडे झुकले. त्यातच नागपूरकर भोसलेही +नारायणरावांच्या विरोधात गेले. नागपूरकर जानोजीराजे अपत्य नव्हते. गादी पुढे +चालवण्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्याला, रघुजीला दत्तक घेण्याचे ठरवले. त्याकरता +<<< + +१७७० सालच्या अखेरीस जानोजी माधवरावांच्या भेटीसाठी पुण्यातही आले होते. जानोजी +भोसल्यांचा हा निर्णय माधवरावांना मान्य होता. परंतु आता प्रत्यक्ष दत्तक विधानाच्या +दिवस आधीच नारायणरावांनी या निर्णयाला विरोध केला. जानोजी भोसल्यांनी +नारायणरावांना सर्व परिस्थिती व्यवस्थित समजावून सांगण्याकरता सखो हरी गुप्ते या +आपल्या वकीलाला पुण्यास पाठवले. योगायोगाने गुप्ते हे कायस्थप्रभू असल्याने नुकत्याच +झालेल्या प्रभूंच्या निवाड्याबद्दल त्यांना समजले. सखारामबापूंच्याही मनात +नारायणरावांविषयी राग असल्याने त्यांनी सखो हरी गुप्ते व इतर प्रभू मंडळींना +रघुनाथरावांच्या पक्षात आणले. रघुनाथरावांना पेशवेपदी बसवल्यानंतर प्रभूंवरचा अपमान +धुवून येईल, असे पुण्यातल्या इतर प्रभूंनाही वाटले. + गणेशोत्सव जवळ आला होता. श्री गजानन हे तर पेशव्यांचे आराध्यदैवत. श्रीमंत +थोरल्या बाजीरावांच्या (प्रथम दीड दिवस, नंतर नानासाहेबांनी दहा दिवसांचा उत्सव सुरू +केला) काळपासून शनिवारच्या हवेलीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. +भाद्रपद शु. चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचे दहा दिवस +शनिवारवाडा अत्यंत गजबजलेला असे. रोज बिघ्नहर्त्या श्री गजाननासमोर गायन, वादन, +नृत्य असे अनके कलाविष्कार चालत. श्रीमंत पेशवे या साऱ्या कलाकारांना भरभरून +बिदागी देत. माधवराव अत्यंत गण��शभक्त होते. त्यामुळेच त्यांच्या काळातच +शनिवारवाड्यातल्या गणेशोत्सवाची ख्याती दूरवर पसरली होती. यावर्षी नारायणरावांचा +पेशवेपद मिळाल्यानंतरचा हा पहिलाच (आणि शेवटचाही!) गणेशोत्सव होता. +नारायणराव गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि तयारीत गुंतलेले पाहून सखारामबापू बोकील, +चिंतोपंत विठ्ठल रायरीकर, भवानराव पंतप्रतिनिधी, व्यंकटराव काशीपंत, सखो हरी गुप्ते इ. +मंडळींनी गुप्त खलबते सुरू केली. सर्वजण नारायणराव पेशव्यांच्या कारभाराला काही ना +काही कारणामुळे वैतागलेले होते. त्यामुळेच सर्वानुमते "प्रथम रघुनाथरावांना कैदेतून मुक्त +करावे. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने नारायणरावांना कैद करून रघुनाथरावांना पेशवेपदी +बसवावे." असे ठरले. यावेळेस हरिपंततात्या पुण्यात नव्हते. परंतु नाना फडणवीस, पुरंदरे +वा रामशास्त्रींसारख्या मंडळींनाही कळले नाही इतका हा कट गुप्तपणे रचण्यात +आला होता. + गणेश चतुर्थीला वाजतगाजत गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाली. नाच-गाणं झालं. यावेळेस +नारायणरावांनी रघुनाथरावांना उत्सवाच्या निमित्ताने कैदेतून काही दिवस मुक्त केलं होतं. +याच रात्री सर्व कटवाल्यांची पुन्हा एकदा गुप्त मसलत झाली. सगळा बेत रघुनाथरावांना +पटला, परंतु नारायणरावांना तरी कसे? पेशव्यांच्या खाशा रक्षकांचा गराडा मोडून +नारायणरावांना पकडणे शक्य नव्हते आणि हे करताना कोणी पकडला गेला तर? +सगळ्यांच्या समोर एकाच व्यक्तीचा चेहरा येत होता- नाना फडणवीस! जर नानांच्या हाती +लागलो तर एकवेळ यमदूत अन् नरक परवडला पण तो नाना नको रे बाबा! हेच सगळ्यांच्या +मनात येत होते. तिथेच दादासाहेबांचा खास हुजऱ्या तुळाजी पवार हाही होता. +शनिवारवाड्याच्या पहाऱ्यावर असणाऱ्या गारद्यांच्या प्रमुख असलेल्या सुमेरसिंग, +<<< + +बहादूरखान इ. लोकांशी त्यांची चांगली ओळख होती. हे लोक क्षुल्लक पैशांसाठी ते +काम करायला मागेपुढे पाहत नाहीत हे तुळाजीला माहीत होते. त्याने नारायणरावांना +पकडण्याकरता गारद्यांची मदत घ्यावी असे सुचवले आणि हे काम करण्याकरता गारद्यांचे +मन वळवण्यास तो स्वतः तयार झाला. या तुळाजी पवाराला नारायणराव पेशव्यांनी एकदा +चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे तुळ्याचा नारायणरावांवर भयंकर राग +होता. तुळ्या पवाराने केवळ ���ीन लाख रु. रोख देण्याच्या करारावर सुमेरसिंग, महंमद इसाफ +इ. गारद्यांना या कटात सहभागी करून घेण्यात यश मिळवले. + भाद्रपद शु. द्वादशीच्या दिवशी रघुनाथरावांनी गारद्यांना लिहिलेल्या 'तीन लक्ष रुपयांच्या +बदल्यास नारायणरावांस धरावे' अशा आशयाच्या वा खलित्यावर सही केली. हे +तीन लाख रुपये घेऊन गारदी आपल्या धन्याला पकडण्याचे काम करायला तयार झाले. + भाद्रपद शु. त्रयोदशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी सकाळी नारायणराव +पर्वतीवर देवदेवेश्वर आणि तिर्थरूप नानासाहेबांच्या समाधी दर्शनाकरता निघाले. गारद्यांचा +पहारा हा शनिवारवाड्याच्या बाहेरील भागात असे. आत मात्र खास विश्वासातले मराठे +पहाऱ्यावर असत. नारायणराव पेशवे शनिवारवाड्याबाहेर तुळ्या पवाराने सुमेरसिंग + आणि बहादूरखानास ही बातमी कळवली आणि आजच नारायणरावांना धरायचे हा विचार +पक्का झाला. दोन प्रहरी. अखेरीस नारायणराव पर्वतीहून पुन्हा पुण्याच्या रोखाने निघाले, +एवढ्यात एका विश्वासू खबरगिराने त्यांना वाड्यात घातपात होण्याची शक्यता आहे तेव्हा +वाड्यात जाऊ नये, बाहेरच रहावे असे विनवले. परंतु, नारायणरावांना या गोष्टीत तथ्य वाटले +नाही. रघुनाथराव आपल्या पेशवेपदावर नजर ठेऊन आहेत हे नारायणरावांना चांगलेच +माहीत होते. परंतु, अजूनही वाड्यात गणेशोत्सव सुरू असल्याने यावेळी तरी ते काही +करणार नाहीत असा नारायणरावांना विश्वास होता. पर्वतीवरून तिसऱ्या प्रहरी सुरुवातीला +नारायणराव शनिवारवाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांना दिल्ली दरवाजाच्या देवडीवरच +सुमेरसिंग दिसला. 'वाड्याच्या पहाऱ्याचे काम नीट कर' असे त्याला बजावून नारायणराव +आत आपल्या महालाकडे निघाले. सुमेरसिंगाची नजर आज काही वेगळीच दिसत होती. +नारायणराव आपल्या महालापर्यंत पोहोचतात न पोहोचतात तोच गारदी सुमेरसिंग + आपल्याबरोबर सात-आठशे गारद्यांना घेऊन तेथे आला. त्याची ती रोखलेली खुनशी नजर +पाहताच नारायणरावांना झटकन मगाशी खबऱ्याने दिलेल्या बातमीची आठवण झाली आणि +सारा प्रकार ध्यानात आला. नारायणरावांच्या महालापासून जवळच दक्षिणेला रघुनाथरावांचा + 'बदामी बंगला' होता. गारद्यांचा तो जमाव पाहून नारायणराव अतिशय घाबरले आणि थेट +पळत ते रघुनाथरावांच्या महालाच्या दिशेने निघाले. रघुनाथराव आपल्या महालात वाचत +बसले होते. दरवाजा होता. घाबरलेले नारायणराव थेट आत आले आणि एकदम +रघुनाथरावांच्या पायाला घट्ट मिठी मारत म्हणाले, "दादासाहेब, वाचवावे! पायाशी घ्यावे ... " + नारायणराव रघुनाथरावांची विनवणी करत असतानाच हातात नंग्या तलवारी घेतलेले +गारदी रघुनाथरावांच्या महालात आले. सुमेरसिंगाने रघुनाथरावांना म्हटले, 'रावास सोडा, +नाहीतर तुम्हा दोघांनाही ठार करू.' सुमेरसिंगाची धमकी ऐकताच रघुनाथरावांनी आपल्या +<<< + +हातांनी नारायणरावांची मिठी सोडवली आणि त्यांना दूर लोटले. सुमेरसिंगाने नारायणरावांना +धरून फरफटत खालच्या चौकात आणले. रघुनाथरावांना हे सारे दिसत होते. +नारायणरावांना गारदी ओढत असतानाच नारायणरावांचा हुजऱ्या चापाजी टिळेकर, +इच्छाराम ढेरे, नारोपंत फाटक इ. मंडळी त्यांना सोडवण्यासाठी पुढे सरसावली. परंतु, +गारद्यांनी त्यांना ठार केले. हे पाहताच रघुनाथराव दचकलेच! रक्तपात करण्याचा काहीच +संबंध नव्हता, त्याकरता रघुनाथराव खाली जायला वळणार तोच गारदी सुमेरसिंग अत्यंत +क्रूरपणे विकट हसला आणि क्षणार्धात त्याची तलवार नारायणरावांच्या मानेवर उतरली ... +केवळ अठरा वर्षांच्या त्या तरुण पेशव्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. + नारायणरावांना मारल्यानंतर सुमेरसिंगाने आपल्या तलवारीच्या जोरावर 'आपल्याला +निम्मे राज्य बाटून द्या' अशी रघुनाथरावांकडे मागणी केली. जर असं केलं नाही तर +'नारायणरावांसारखं तुम्हालाही मारून समशेरबहाद्दरचा मुलगा याला गादीवर +बसवू' अशीही धमकी दिली. शेवटी तीन लाखांच्या व्यतिरिक्त आणखी पाच लाख म्हणजे +एकूण आठ लाख रु. देण्याचे कबूल केल्यानंतरच गारदी शनिवारवाड्याबाहेर पडले. या +सगळ्या प्रकारात गोहत्या झाली, ब्राह्मणहत्या झाली आणि दोघी स्त्रियाही मृत्यू पावल्या. +इकडे हा सारा प्रकार घडत असतानाच गरोदर असलेल्या नारायणरावांच्या पत्नीला, +गंगाबाईंना आनंदीबाईंनी आपल्या महालात लपवून ठेवले, जेणेकरून गारद्यांनी तिला धक्का +पोहोचवू नये. + भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शके १६९५, विजयनाम संवत्सरी सोमवारी म्हणजेच दि. ३० +ऑगस्ट १७७३ रोजी दुपारी नारायणराव पेशवे मारले गेले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हा +दिवस आणखी एक दिवस म्हणून नोंदला गेला ... + + या लेखाची संदर्भग्रंथ सूची श्रीमंत पेशवे माधवराव नारायण + (सवाई माधवराव) या लेखात शेवटी दिलेली आहे. +<<< + + पेशव्यांच्या घरातील भाऊबंदकीला नारायणरावांसारखा तरुण पेशवा बळी पडला. +यावेळेस नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई सुमारे दोन महिन्यांच्या गरोदर होत्या. आनंदीबाईंनी +त्यांना गारद्यांपासून वाचवण्यासाठी आपल्या महालात अगदी सुरक्षित ठेवले होते. त्याच +दिवशी रात्री त्यांच्या केशवपनाचा विधी पार पडला. + नारायणरावांच्या खूनानंतर सारा शनिवारवाडा सुतकात होता, परंतु रघुनाथरावांना +त्याची काही फिकीर नव्हती. या साऱ्या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी रघुनाथरावांनी दरबार +भरवला. 'वैऱ्याचे सुतक कशाला पाळायचे?' असे विचारून दादासाहेब थेट पेशव्यांच्या +गादीवरच जाऊन बसले. नारायणरावांच्या नंतर आता आपणच पेशवे आहोत अशी दवंडी +साऱ्या पुण्यात फिरत होती. रघुनाथरावांच्या दरबारात आता सारेच कटवाले उघडपणे हजर +होते. चिंतो विठ्ठल रायरीकर, सखो हरी गुप्ते, आबाजी महादेव सोहोनी, व्यंकटराव प्रभू, +मानाजी फाकडे, मुधोजी भोसले इ. लोक रघुनाथरावांना पेशवे मानून त्यांना मुजरे करत +होते. परंतु, रघुनाथरावांचे पहिल्यापासूनचे पक्षपाती आणि ज्येष्ठ मुत्सद्दी सखारामबापू कुठे +होते? या साऱ्या लोकांत ते दिसतच नव्हते. + सखाराम भगवंतराव तथा सखाराम बापू बोकील हे थोरल्या नानासाहेबांच्या +काळापासून दौलतीचे कामकाज बघत होते. महादजीपंत पुरंदरे, मोरोबादादा फडणीस, +बापूजी श्रीपतराव इ. ज्येष्ठ मुत्सद्द्यांबरोबर सतत राहून सखारामबापूंनाही राजकारणी +डावपेचांचे उत्तम ज्ञान मिळाले होते. थोरल्या नानासाहेबांच्या काळात रघुनाथराव आणि +बापूंचे विशेष सख्य झाले. पुढे नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवरावांना पेशवेपद मिळाले +तेव्हा बापू वरकरणी माधवरावांच्या इशाऱ्यात असले तरी त्यांचा ओढा रघुनाथरावांकडेच +जास्त होता. एका पत्रात सखारामबापू म्हणतात, "माधवरावांसारखा कर्ता दुसरा नाही. +त्याजला सोडू नये असे चित्तापासून (वाटते). परंतु दादांकडील (राघोबादादा) कल आम्हांस +जरूर राखावा लागतो!" माधवराव गादीवर असताना बापूंनी रघुनाथरावांना त्यांच्या +कारस्थानांत अप्रत्यक्षपणे मदत केली होती आणि हे सारे माधवरावांनाही माहीत होते. परंतु +बापूंसारख्या ज्येष्ठ मुत्सद्दयाला आपण करू नये म्हणून माधवराव शांत होते. +माधवरावांची ही विवेकबुद्धी नारायणरावांकडे नसल्याने त्यांनी सखारामबापूंना +तडकाफडकी कारभारी पदावरून हटवले आणि ते पद नाना दिले. +बांपूसारख्या ज्येष्ठ मुत्सद्दयाचा हा अपमान त्या मानी माणसाने सहन केला तर नवलच! + आता मात्र बापूंनी रघुनाथरावांना पूर्ण साथ दिली. परंतु, अनपेक्षितपणे, कोणीही नुसता +विचारही केला नसता अशी नारायणरावांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्यामुळे सखारामबापू +दचकलेच. रघुनाथरावांच्या समोर दौलतीच्या पेशव्यांना जीवे मारले गेले आणि रघुनाथरावांनी +काहीच केले नाही, हे पाहून बापू सैरभैर झाले. प्रत्यक्ष खुनाच्या दिवशी बापू पुण्यात नसावेत, +परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना ही बातमी समजल्यावर काय करावे हे त्यांना समजेना. बायका- +मुलांना मागेच ठेवून बापू सकाळी दोन प्रहर दिवस वर येत असतानाच पळून गेले. पर्वती +ओलांडून ते चार कोस (कोल्हापूरकडे? सासवडकडे?) गेले, तोच त्यांच्या मनात काय विचार +<<< + +आला कोण जाणे, पण पुन्हा माघारी फिरून ते रात्री घरी आले. + नारायणरावांच्या दहाव्या दिवशी सारे मुत्सद्दी ओंकारेश्वराच्या मंदिरात तिलांजलीसाठी +जमले होते. यात रघुनाथरावांचे पक्षपाती कुणीही नव्हते. परंतु, सखारामबापू बोकील तेथे +आल्यानंतर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. बापूंना आता राघोबादादांना मदत केल्याचा + होत होता. सगळे विधी पार पडल्यानंतर सखारामबापूंनी नाना फडणवीस, +हरिपंततात्या, त्रिंबकमामा पेठे इ. मंडळींची भेट घेतली. त्यांना सत्य परिस्थिती सांगून +आपल्याला होतोय हे सांगितले. या मंडळींनी बापूंना केलेल्या कृत्याचा पश्चाताप +होत आहे हे पाहून बापूंना क्षमा केली. बाकीची सारी मंडळी पुन्हा आपापल्या घरी निघाली +असता त्रंबकमामा पेठे, सखारामबापू बोकील, नाना फडणवीस आणि हरिपंततात्या +हे ओंकारेश्वराजवळ नदीच्या वाळवंटात गेले. तिथे वाळूचे एक शिवलिंग तयार करून +चौघांनीही त्या लिंगावर हात ठेवून शपथ घेतली की, 'पेशवाई थोरल्या पातीची. ते स्वामी. +तेव्हा नानासाहेबांचा वंश पुढे चालवायचा. त्या वंशाशिवाय कारभार करायचा नाही. +रघुनाथरावांच्या वंशास नमस्कार करायचा नाही.' यानंतर प्रत्येकाने शिवलिंगावर बेलाचे पान +वाहिले व शनिवारवाड्याच्या दिशेने बारीक आवाजात बोलत निघाले. + नारायणराव आता गेले ��सल्याने रघुनाथरावांना पेशवाई मिळवण्यात आता कोणताच +अडथळा नव्हता. परंतु, नारायणरावांच्या खुनाची बातमी सर्वत्र पसरल्याने रघुनाथरावांना +सुरुवातीला पुण्याबाहेर पडण्यास भीती वाटली असावी. पेशव्यांच्याच वाड्यात एका ब्राह्मण +पेशव्याची हत्या होते हे पाहून इतर ब्रह्मवृंद खवळला होता. न जाणे, पण कदाचित +आपल्याला अपाय होईल अशी भीती वाटून रघुनाथरावांनी सातारहून पेशवाईची वस्त्रे +आणण्याकरिता स्वतः न जाता आपले ज्येष्ठ दत्तकपुत्र अमृतराव यांना साताऱ्याला पाठवले. +दि. १० ऑक्टोबर १७७३ रोजी छत्रपती राजारामांनी अत्यंत साधेपणाने पेशवाईची वस्त्रे +अमृतरावांच्या हाती सुपूर्त केली. छत्रपतींना नमस्कार करून अमृतराव साताऱ्यात जास्त +दिवस न थांबता पुण्याला येण्यास निघाले. रघुनाथरावांना साताऱ्यातल्या या साऱ्या +घडामोडी समजत होत्याच. अमृतराव साताऱ्यात गेले तेव्हा त्यांचे वय फक्त नऊ वर्षांचे +असल्यानेच त्यांना कदाचित कोणी काहीही बोलले नसावेत. ऑक्टोबरच्या अखेरीस +अमृतराव पुण्याच्या जवळ आले असता रघुनाथरावांनी त्यांना थेट आळेगावास जाण्याचा +निरोप पाठवला. रघुनाथरावांना पेशवेपदाची सूत्रं मिळण्यात पुण्यातले लोक कदाचित +आडकाठी आणतील म्हणून त्यांनी आळेगावला जाऊन दि. ३१ ऑक्टोबर १७७३ रोजी +स्वतःच धारण केली आणि नंतर पुण्यात परतले. + रघुनाथराव पुण्यात परत आल्यानंतर सखारामबापू नाना आणि हरिपंततात्यांना +रघुनाथरावांकडे घेऊन गेले. बापूही आता आपल्या विरोधात आहेत याची रघुनाथरावांना +जराही कल्पना नसल्याने उलट त्यांना बापूच नाना आणि पंतांना आपल्या पक्षात घेऊन आले +आहेत असे वाटले. रघुनाथरावांनी मोठ्या 'उदारपणे' नाना आणि हरिपंततात्यांना 'जवळ' +घेतले. पेशवेपद 'ग्रहण' केल्यावर लगेचच रघुनाथराव कर्नाटकात हैदरअलीच्या मोहिमेवर +निघाले. प्रथम सुरुवातीला सखारामबापू, हरिपंततात्या आणि नानाही या मोहिमेत सामील +<<< + +झाले होते. परंतु नंतर पुण्यात रघुनाथरावांच्या मागे काही कटकटी उत्पन्न व्हायला नकोत +असे कारण सांगून सखारामबापू पुण्याकडे निघाले, परंतु निघताना रघुनाथरावांचे मन +वळवून नाना आणि हरिपंततात्यांना बरोबर घेण्यास ते विसरले नाहीत. थोड्याच दिवसात हे +त्रिकूट पुण्यात आले. रघुनाथरावांनीही एके काळी अटकेपार फेकला होत��. त्यांचेही +नजरबाज होतेच की! पुण्यात रात्री रात्री जागवून या कारभाऱ्यांच्या होणाऱ्या गुप्त मसलती +रघुनाथरावांना समजत होत्या आणि एके दिवशी अचानक या साऱ्या कारभाऱ्यांच्या +वाड्यांबाहेर रघुनाथरावांचे चौकी-पहारे बसले. परंतु कितीही झालं, तरी ते 'बापू', 'नाना' +आणि 'तात्या' होते! या तिघांइतकी अक्कल दुसऱ्या कोणात असती तर मग +सखारामबापू मोठे गुळचट जिभेचे होते. त्यांनी चौकी-पहारेवाल्यांनाच फितवले आणि एके +रात्री हरिपंततात्या त्र्यंबकरावमामा पेठे, नाना फडणवीस, मालोजी +मोरोबादादा फडणवीस, रामशास्त्री इ. मंडळींना आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. रात्रभर +बैठक सुरू होती. या सर्वांनीच रघुनाथरावांच्या वर्तनाचा आणि निंदनीय कृत्याचा धिक्कार +करून त्यांना पेशवेपदावरून दूर करायचे ठरवले. पण मग त्यानंतर पेशवेपदावर कोण +बसणार? याचाही विचार ठरला होता. नानासाहेबांचा वंश अजून संपला नव्हता! +नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई या गरोदर होत्या. प्रथम गंगाबाईंच्या नावाने साऱ्या +कारभाऱ्यांनी एकदिलाने कारभार पहावा. नंतर गंगाबाईंना पुत्र झाल्यास त्याला गादीवर +बसवावे अथवा कन्या झाली तर एखादे मूल गंगाबाईंकडे दत्तक देऊन त्यास पेशवाई द्यावी, +असे ठरले. हेच ते प्रख्यात 'बारभाई कारस्थान' !! + गंगाबाईंच्या नावाने कारभार करावा, पण कसा? कारण यावेळेस गंगाबाई मात्र +आनंदीबाईंपाशी होत्या आणि आता त्या गर्भार आहेत हे समजल्यानंतर तर +रघुनाथरावांकडून गंगाबाईंच्या हत्येचा वा गर्भपात करण्याचा नक्कीच प्रयत्न होणार. नक्की +गंगाबाईच्या जिवाला धोका आहे. मग काय करावे? सारेच विचारात पडले. +शनिवारवाड्याच्या पहाऱ्याचे काम पूर्वीप्रमाणेच आप्पाजी तुळशीबागवाल्यांचा मुलगा +नारोपंत यांच्याकडेच होते. सखारामबापूंनी नारो आप्पाजीला ताबडतोब आपल्या +कारस्थानात सामावून घेतले. नारो आप्पाजींबरोबर त्यांचे पहारेकरीही सामील झाले. त्यामुळे +वेळ आणि आलेली संधी न दवडता, नाना आणि बापूंनी लगेचच गंगाबाईंना +शनिवारवाड्यातून बाहेर ठरवले. (दि. १८ जानेवारी १७७४) रघुनाथरावही पुण्यात +यायच्या आत हे काम उरकायचे ठरले. पण गंगाबाईंना शनिवारवाड्यातून दुसरीकडे न्यावे +कुठे? कारण जर पुन्हा प्रसंग आला, तर त्या रघुनाथरावांच्या हाती उपयोगी नाही. +सरदार पटवर्धन हे नानांच्या खास विश्वासातले होते. मिरजेला त्यांचा मोठा बळकट वाडा +होता. परंतु सैन्यापुढे टिकाव धरेल अशी जागा हवी होती. सखारामबापूंना +एक जागा दिसली. 'पुरंदरगड'! खरंच गड खूप बलाढ्य होता. वर्षानुवर्षे वेढा चालवण्याची +त्यांची शामत होती. सखारामबापूंनी रघुनाथराव दादांच्या महादजी सदाशिव गोडसे या +कारभाऱ्याला फितवले होते. दि. ३० जानेवारी १७७४ रोजी पहाटेच नारो आप्पाजी +तुळशीबागवाले यांनी गंगाबाई आणि त्यांच्याबरोबर सदाशिवरावभाऊंची पत्नी पार्वतीबाई, +<<< + +जनार्दनपंतांची पत्नी सगुणाबाई आणि रघुनाथरावांची कन्या दुर्गाबाई यांना सुखरूप +वाड्याबाहेर काढले आणि त्यांचे मेणे कडक बंदोबस्ताने पुरंदराच्या दिशेने रवाना केले. हे +मेणे दिवे घाट वा इतर मुख्य रस्त्याने न जाता मधल्याच आडवाटेने, कदाचित खिंडीतून +पुरंदरकडे गेले असावेत. या मेण्यांबरोबर हरिपंततात्या, नाना, बापू, त्र्यंबकमामा आदी सारी +मंडळीदेखील होती. त्याच दिवशी तिसऱ्या प्रहरी मेणे पुरंदरावर सुखरूप पोहोचले. इकडे +पुण्यात मात्र खळबळ माजली होती. रघुनाथरावांच्या हस्तकांना आता जाग आली होती. +त्यांनी हा सारा प्रकार रघुनाथरावांकडे लिहून कळवला! पुण्यात इतरांना धक्का बसला +असला तरी आनंदीबाई शांतच होत्या. असे वाटते की, कदाचित बारभाईच्या या प्रकाराला +आनंदीबाईंनीही अप्रत्यक्षरीत्या का होईना पण मदत केली असावी, कारण या आधीही +नारायणरावांच्या वधाच्या वेळेस गारद्यांनी गंगाबाईंना हात लावू नये म्हणून आनंदीबाईंनीच +त्यांना आपल्या महालात सुरक्षित ठेवले होते. गंगाबाई पुरंदरवर सुखरूप पोहोचल्यानंतर +बारभाईंनी उघडपणे रघुनाथरावांविरुद्ध बंड मांडून 'गंगाबाईंच्या' नावाची घोषणा केली. +स्वतः नाना फडणवीस आणि त्र्यंबकमामा पेठ्यांनी साताऱ्याला जाऊन राजाराम +महाराजांची भेट घेतली आणि आतापर्यंत पडलेला सारा प्रकार समजावून सांगितला. +राजारामांनीही बारभाईंची बाजू उचलून धरत हुकूम जारी केला की, "रघुनाथ बाजीराऊ +यांणी नारायण पंडित प्रधान यांजवर कसाला केला ही गोष्ट धर्मराज्यात अयोग्य जाहली. +त्यांणी (रघुनाथरावांनी) पेशवाई वस्त्रे मागितली ती संकट जाणोन पाठविली. परंतु (आता) +पेशवाईची मर्यादा अगदीच राहिली नाही. यास्तव त्यांजकडील पेशवाई दूर केली असे!" दि. +२८ फेब्रुवारी १७७४ रोजी काढलेले हे आज्ञापत्र साऱ्या दौलतीत फिरले. या आज्ञापनाच्या +जोरावरच दौलतीतले अनेक सरदार बारभाईंच्या पाठीशी उभे राहिले. दिवसेंदिवस बारभाईंचे +बळ होते. + सातारकर छत्रपतींनी काढलेले आज्ञापत्र आणि बारभाईंचे डावपेच रघुनाथरावांना +समजले. त्यांच्या अंगाचा उडाला. आतापर्यंत आपल्या पक्षात असणारे +सखारामबापू, मोरोबादादांसारखे मुत्सद्दी आपल्याला एवढा टोकाचा विरोध करतील असे +त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. कर्नाटकची मोहीम अर्धवट सोडूनच रघुनाथराव पुन्हा माघारी +फिरले. त्यांच्या फौजा आता वेगाने थेट महाराष्ट्राच्या दिशेने दौडत होत्या. सातारकर छत्रपती +राजारामांनी आपल्याला पेशवाईवरून हटवले है रघुनाथरावांना मान्यच होत नव्हते. +रघुनाथरावदादा सैन्यासह पुण्याच्या रोखाने येत आहेत समजल्यानंतर बारभाईंनी आपले +सैन्य तयार ठेवून ताबडतोब आघाडी उघडली. त्र्यंबकमामा पेठे, हरिपंततात्या फडके यांनी +फौजेचे नेतृत्व करावे असे ठरले. त्यांच्या जोडीला उत्तरेतून आलेले महादजी शिंदेही होतेच. +रघुनाथरावदादा पुणे वा पुरंदरजवळ येण्याच्या आधीच त्यांना रोखावे असा विचार करून +तात्या आणि शिंदे, त्र्यंबकमामांसह कर्नाटकाच्या रोखाने निघाले. दि. २६ मार्च १७७४ रोजी +पंढरपूरजवळच्या कासेगावनजीक बारभाईंच्या सैन्याची आणि रघुनाथरावांची समोरासमोर +गाठ पडली. समोर हरिपंततात्या आणि त्र्यंबकमामा दिसताच रघुनाथरावांनीच प्रथम हल्ला +चढवला. रघुनाथराव हे स्वतः एक उत्तम दर्जाचे सेनापती होते. मागे त्यांच्या फौजांनी थेट +<<< + +अटकेपर्यंत मजल मारली होती. परंतु, आता महादजी शिंदे आणि हरिपंततात्यांसारख्या +केसलेल्या योद्धयांपुढे रघुनाथरावांचे काही चालेना. प्रथम मोठ्या जोशात हल्ला चढवलेल्या +रघुनाथरावांना शिंदे आणि फडक्यांच्या कठीण चालींना तोंड देणे मुश्किल झाले आणि +रघुनाथरावांची फौज चौफेर पळत सुटली. खुद्द राघोबादादाही मराठवाड्याच्या दिशेने पळत +सुटले. रघुनाथराव आत्ता जरी पळत असले तरी नगरच्या जवळपास पोहोचताच ते पुन्हा +पुण्याकडे वळतील असे वाटल्याने तात्या आणि महादजी त्यांच्या पाठलागावर गेले. आपल्या +मागे फौज अजूनही येत आहे हे पाहून जवळच्या तुटपुंज्या फौजनिशी रघुनाथराव नर्मदा +ओलांडून खंबायतला पोहोचले. खंबायत होते दमणकर पोर्तुगीजांच्या ताब्यात, पोर्तुगीजांनी +अचानक आलेले हे संकट अंगावर घेतले नाही. न जाणो, कदाचित रघुनाथरावांना आश्रय +दिल्याबद्दल 'नव्या पेशव्यांच्या' फौजा पोर्तुगीजांवर चालून यायच्या. खंबायतला असतानाच +महादजी शिंद्यांनी आणि तुकोजी होळकरांनी रघुनाथरावांना पत्र पाठवून समजूत काढण्याचा +प्रयत्न केला होता. परंतु रघुनाथराव ऐकेनात. याच सुमारास पोर्तुगीजांनी रघुनाथरावांना +खंबायत सोडून जाण्यास सांगितले. म्हणून रघुनाथराव प्रथम भावनगरास आणि नंतर घोघो +(सध्याचे घोघा) येथे येऊन राहिले. इथूनच रघुनाथरावांनी आपले दत्तकपुत्र अमृतराव यांना +दोन हजार फौज देऊन सुरतकर इंग्रजांकडे पाठवले. अमृतरावांबरोबर रघुनाथरावांनी +इंग्रजांना निरोप पाठवला होता की, "मला पेशवाई परत मिळवून द्या. त्या बदल्यात तुम्हाला +तुमचा मोबदला मिळेल." खुद्द पेशव्यांच्या घरातील भांडणात फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ +साधणार नाहीत ते इंग्रज कसले! इंग्रजांनी रघुनाथरावांच्या 'विनंतीस मान देऊन' त्यांना +आणण्यासाठी आपले खास जहाज पाठवले. याच जहाजातून दि. २३ फेब्रुवारी १७७५ रोजी +रघुनाथराव सुरतेत दाखल झाले. रघुनाथराव सुरतेत आल्यानंतर काही दिवसांनी अमृतराव +आपल्या पूर्वीच्याच दोन हजार फौजेनिशी ठाणे जिल्ह्यातील तारापूर येथे जाऊन राहिले. +अमृतरावांचे वय फक्त बारा वर्षे असल्याने त्यांना सततची धावपळ सोसणार नाही हा विचार +करूनच रघुनाथरावांनी त्यांना तारापूरला पाठवले होते. रघुनाथरावांनी दि. ६ मार्च १७७५ +रोजी इंग्रजांशी पेशवाई पुन्हा मिळवून देण्याबाबत तह केला. यानुसार इंग्रजांना त्यांनी वसई, +साष्टी, ठाणे इ. प्रदेश देण्याच्या करारावर सह्या केल्या. हाच तो दुर्दैवी असा प्रख्यात 'सुरतेचा +तह' ! + रघुनाथरावांबरोबर पूर्वीची कर्नाटकाच्या स्वारीमधली काही फौज अजूनही होती. +कर्नाटकातून परत पुण्याला आल्यानंतर फौजेचा सारा पगार देण्यात येणार होता. पण कसलं +काय! इकडे बारभाईंनी रघुनाथरावांना पुण्यात येऊच दिले नाही, सळो की पळो करून +सोडले असता पगाराची गोष्ट कोणी काढायची? पुढे कासेगावची लढाई झाली आणि त्यात +हार पदरी पडून रघुनाथराव खंबायतला गेले आणि तिथूनच आता पुढे सुरतेत आले होते. +फौजेचा पगार मात्र अजूनही थकला होता. पुढच्या हालचाली आणि मोहिमांकरता फौजेला +पगार द्यावा लागणार होता. पण पैसा आणि खजिना कुठे होता? शेवटी फौजेचा पगारखर्च +भागवण्यासाठी रघुनाथरावांनी आपले खासे दागिने इंग्रजांकडे गहाण ठेऊन त्या बदल्यात +इंग्रजांकडून मिळालेले सहा लाख रु. घेतले आणि खर्च भगवला. याच सुमारास साधारणतः +<<< + +नाना 'रघुनाथरावांना तुम्ही पाठीशी घालू नका!' या अर्थाचा खलिता +आला. नाना इंग्रजांना पुरते ओळखून होते. इंग्रजही नानांना ओळखून होतेच! त्यांनी नानांना +दाखवण्यासाठी दि. २२ मार्च १७७५ रोजी रघुनाथरावांना सुरतेतून बाहेर काढून थेट +खंबायतला पोहोचते केले. परंतु इंग्रज स्वस्थ बसले तर ते राजकारणी कसले! थोड्या +काळात वातावरण निवळले आहे असे पाहून इंग्रजांनी रघुनाथरावांना पुन्हा सुरतेला +महंमदीबागेत आणले. + रघुनाथराव आणि इंग्रजांच्यात हे व्यवहार सुरू असताना पुण्यात आणि आसपास मात्र +निराळ्याच घडामोडी घडत होत्या. पुरंदरगडावर सुरक्षित असणाऱ्या गंगाबाई प्रसूत झाल्या. +वैशाख शु. ७ शके १७९६ जयनाम संवत्सरी बुधवारी म्हणजेच दि. १८ एप्रिल सन १७७४ +रोजी गंगाबाईच्या पोटी पुत्र जन्माला आला. हा अधिक मास होता. दि. ३० एप्रिल १७७४ +रोजी बाळाचे बारसे करण्यात आले. मागे माधवराव पेशव्यांच्या दहाव्याला पिंडाला कावळा +शिवत नव्हता. तेव्हा नारायणरावांना पुत्र झाला तर त्याचे नाव माधवराव ठेवावे असे म्हणून +उदक सोडले तेव्हाच पिंडाला कावळा शिवला होता. या साऱ्या प्रकाराची आठवण ठेवून या +नव्या, नारायणरावांच्या बाळाचेही नाव ठेवण्यात आले 'माधवराव'. इकडे पुण्यात +आनंदीबाईंना मात्र पुरंदरावर पुत्ररत्न झाल्याचे बारशाच्या एक-दोन दिवस आधीच +समजले. आनंदीबाईंना फार राग आला. नारायणराव हे आनंदीबाईंना पुत्रवतच होते, कारण +नारायणराव पेशव्यांच्या जन्मानंतर पाचच दिवसांनी आनंदीबाईंनाही पुत्र झाला होता, पण +तो त्याच दिवशी संध्याकाळी वारला म्हणून रघुनाथरावही नारायणरावांना प्रथम पुत्रवत +मानत असत. आता नारायणरावांना पुत्र झाला म्हणजे आनंदीबाईंना नातूच झाला की! +म्हणूनच दि. २९ एप्रिलच्या, बारशाच्या आदल्याच दिवशी सखारामबापूंना लिहिलेल्या पत्रात +आनंदीबाई म्हणतात, "आम्हांस पत्र न लिहावे ऐसा तुमचा आमचा ऋणानुबंध चालत आला +की काय? आम्हां नातू झाला म्हणोन खिंदमदगार चालो आले. त्यांस देण��यास सोन्याची +तयार नाहीत. तरी तुम्ही तेथे दोघांस दोन कडी (गंगाबाई व बाळास) द्यावीत. बाळाचा +समाचार नित्य पाठवावा ... " आनंदीबाईंच्या या पत्रांवरून त्यांना असलेली गंगाबाई आणि +बाळाची काळजी दिसून येते. कारण याच वेळी नाना लिहिलेल्या पत्रात त्या +म्हणतात, “किल्ल्याची (पुरंदरगडाची) हवा बहुत सर्द आहे. लेकरू लहान, यास्तव ज्या +जागेस लेकरास सुख पडेल तेथे न्यावे ... " अर्थात नाना आणि बापूंनी योग्य ती सर्व काळजी +घेतलेली होतीच. बाळाच्या जन्माच्या आधीच त्यांनी साताऱ्याहून पेशवाईची शिक्के-कट्यार +आणवली होती. कदाचित याच सुमारास नाना अपत्य झाले असावे. कारण +नारायणरावांच्या पुत्राच्या जन्मानंतर, त्याचे आणि नानांचे चेहरेपण मिळतेजुळते आहे असे +पाहून, मुलगी झाली होती. पण नानांनी आपला पुत्र ऐनवेळी पुरंदरावर आणला +असा युक्तिवाद रघुनाथरावांचे पक्षपाती करू लागले. बारभाईंनी या साऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष +करून बाळ केवळ चाळीस दिवसांचे असताना, म्हणजे वैशाख वद्य तृतीया शके १६९६, +जयनाम संवत्सरी शनिवारी म्हणजेच दि. २८ १७७४ रोजी पेशवाईची वस्त्रे देण्यात आली +आणि या नव्या बाळ माधवरावांनी नवी उपाधी धारण केली- 'सवाई माधवराव' !! आता +<<< + +सवाई माधवरावांच्या नावाने कारभार उघडपणे सुरू झाला होता. + इकडे इंग्रजांनी रघुनाथरावांना पुन्हा सुरतेला आणलेली ही गोष्ट लपून थोडीच +राहणार होती? नानांचे हेर दिल्लीपर्यंत फिरत होते, मग सुरतेची ती काय कथा! नानांना ही +बातमी समजल्यावर त्यांनी इंग्रजांना विलक्षण दमच भरला. आता, यावेळेस तरी उगाच + करून आत्मघात करून घेणे इंग्रजांना परवडणारे नव्हते म्हणून दि. २९ फेब्रुवारी +१७७६ रोजी इंग्रजांचा वकील पुरंदरगडावर आला. त्याने येताना नव्या बाळ पेशव्यांसाठी +नजराणा आणला होता. इंग्रजांनी रघुनाथरावांना मदत करणार नाही असे कबूल केले. हाच +तो मराठेशाहीच्या इतिहासातील 'पुरंदरचा दुसरा तह!' या तहान्वये इंग्रजांनी रघुनाथरावांना +वर्षाकाठी तीन लक्ष पंधरा हजार रु. तनखा देऊन गंगाकाठी जाण्यास सुचवले, परंतु एकदा +का बाहेर पडलो तर बारभाईंचे लोक आपल्याला पकडून कैदेत ठेवतील या विचाराने आणि +भीतीने रघुनाथराव सुरत सोडून बाहेर जाण्यास धजावत नव्हते. आता इंग्रजांपुढे हे नवीनच +संकट उभे ठाकले. त्यांनी रघुनाथरावांना फक्त दोनशे रक्षक बरोबर ठेवून सुरतेत राहण्यास +परवानगी दिली. रघुनाथरावांना हे असुरक्षित वाटले त्यांनी जेरोनिम नेव्हिस या पोर्तुगीज +माणसामार्फत गोव्याच्या पोर्तुगीज लोकांशी बोलणी सुरू केली. त्याकरता ते एका रात्रीत थेट +दमणला जाऊन पोहोचले. परंतु, नानांना या साऱ्या गोष्टींची आधीच कल्पना असल्याने +त्यांनी पोर्तुगीजांनाही रघुनाथरावांना मदत न करण्याचा दम भरला होता. म्हणून +पोर्तुगीजांनीही हात वर केले. शेवटी निराश होत रघुनाथराव मुंबईत 'मलबार हिल' या +ठिकाणी येऊन राहिले. रघुनाथराव मुंबईला येण्याच्या आधी तारापूरला गेले होते. तारापूरला +त्यांचे दत्तकपुत्र अमृतराव होते. नानांना रघुनाथराव तारापूरजवळ आल्याचे समजताच त्यांनी +भिवराव पानशांना तारापूरावर पाठवले. पण पानशांच्या फौजा येण्याआधीच रघुनाथराव +मुंबईला गेले होते. तारापुरात आता अमृतराव एकटे दोन हजार फौजेसह होते. पानसे येताहेत +हे पाहून अमृतराव सारा सरंजाम तसाच सोडून मुंबईला रघुनाथरावांकडे येऊन राहिले. + इंग्रजांनीही रघुनाथरावांशी पूर्ण संबंध तोडले होते असे नाही. मुंबई वास्तव्याला असताना +इंग्रज रघुनाथरावांना दरमहा १५ हजार रु. देत होते. मुंबईत वास्तव्याला असताना +रघुनाथरावांनी पुण्यातल्या आपल्या हस्तकांशी गुप्त संधान बांधून त्यांकरवी सवाई +माधवराव, गंगाबाई, सखारामबापू, नाना फडणवीस इ. बारभाईंतल्या प्रमुख लोकांना कैद +करण्याचा कट रचला होता. पण नाना वेळीच सावध झाले आणि हा कट फसला. + + या लेखाची संदर्भग्रंथ सूची श्रीमंत पेशवे माधवराव नारायण + (सवाई माधवराव) या लेखात शेवटी दिलेली आहे. +<<< + + दि. १८ एप्रिल १७७४ रोजी पुरंदरगडावर सवाई माधवरावांचा जन्म झाला आणि +अवघ्या चाळीस दिवसांतच त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. इतक्या लहान वयात +राज्यकारभाराच्या उच्चस्थानी बसलेली ही जगातील एकमेव व्यक्ती होती. साधारणतः सवाई +माधवरावांना वस्त्रे मिळाल्यानंतर एक-दोन महिन्यातच रघुनाथरावांनी आनंदीबाईंना आपल्या +हस्तकांकरवी शनिवारवाड्यातून बाहेर काढले आणि त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने धार येथे +खंडेराव पवारांच्या ठेवले. यावेळी आनंदीबाई या गरोदर होत्या. पुढे दि. १० जानेवारी +सन १७७५ रोजी आनंदीबाई प्रसूत होऊन मुलगा झाला. यावेळी रघुनाथराव इंग्र���ांच्या +मदतीच्या अपेक्षेने खंबायतला येऊन राहिले होते. येथून 'धार' जवळ होते. या नव्या बाळाचे +नाव रघुनाथरावांनी आपल्या पराक्रमी तीर्थरूपांची आठवण म्हणून 'बाजीराव' ठेवले. + रघुनाथराव आणि सुरतकर इंग्रजांमध्ये झालेला तह हा कलकत्तेकर इंग्रजांना अधिक +सुरक्षित वाटत नव्हता. ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याने पुण्यात +बारभाईंची भेट घेण्याकरता कर्नल मॉस्टिन याला वकील म्हणून पाठवले. परंतु नवे पेशवे +पुरंदरगडावर होते म्हणून मॉस्टिन पुरंदरावर आला. इथेच इंग्रज आणि पेशव्यांत पुरंदरवा +(दुसरा) तह झाला. या तहान्वये बारभाईंनी रघुनाथरावांच्या सुटकेबदल्याप्त साष्टी, वसई, +ठाणे इ. प्रदेश आणि रघुनाथरावांपोटी इंग्रजांना आलेला खर्च देण्याचे कबूल केले. याला +कारणही तसेच होते. पूर्वी माधवरावांच्या कारकीर्दीत अचानक आलेल्या +सदाशिवरावभाऊंच्या तोतयाने पुन्हा डोके वर काढले. माधवरावांनी (थोरल्या) सुखलाल +कनोजा नावाच्या या भाऊंच्या तोतयाला रत्नागिरीस कैदेत ठेवले होते. पुढे पुण्यातल्या या +साऱ्या पाहून रत्नागिरीच्या परांजपे मामलेदाराने सुखलालाला सोडून दिले. +सुटल्यानंतर सुखलालाने कोकणातच आपण सदाशिवरावभाऊ असल्याचे सांगून फौज +जमवली आणि पुण्यावर चालून आला. नाना फडणवीसांना अर्थात हा सदाशिवरावभाऊंचा +तोतया आहे हे ठाऊक होते. त्यांनी इंग्रजांशी तातडीने तह करून या सुखलालाने इतर +लोकांना फसवून फितवायच्या आत त्याला पकडले. पुन्हा एकदा साऱ्या पुणेकर लोकांसमोर +नानांनी खास आपल्या पद्धतीने त्याला बोलतं केलं आणि त्याचं पितळ उघडं पाडलं. नंतर +गाड्यावर (तोफेच्या?) बसवून पुण्यात फिरवलं. नंतर गाड्यावरून उंटावर बसवलं. +जेणेकरून साऱ्या लोकांना दिसावं. ही वरात नंतर शनिवारवाड्यावर आली. नानांनी दिवस +चार घटिका अवकाश असताना सुखलालाची मेखसुखाली गर्दन मारली. हा सारा प्रकार दि. +१८ डिसेंबर १७७६ रोजी पुण्यात घडला. + सवाई माधवरावांच्या जन्मानंतर गंगाबाईंची प्रकृती खालावत चालली होती. शेवटी + शु. ७ शके १६९९ हेमलंबीनाम संवत्सरी शनिवारी म्हणजेच दि. १२ जुलै सन १७७७ +रोजी गंगाबाई पुण्यात मृत्यू पावल्या. + इंग्रज आणि पेशव्यांच्यात पुरंदरचा तह झालेला पाहताच फ्रेंचांनाही पेशव्यांशी सलोखा +व्हावा असे वाटू लागले. फ्रेंचांनी आपला वकील ल्युबिन्सन बाला पुण्यात पाठवले. +ल्युबिन्सनने नानांची सन्मानाने भेट घेतली. १ १७७३ नंतर लगेच नानांनीही त्याची चांगली +<<< + +बडदास्त ठेवली. पेशवे आणि फ्रेंचांमध्ये तह आणि सलोखा निर्माण झाल्याचे पाहताच इंग्रज +चिडले. कारण याच सुमारास अमेरिकेत तिथल्या नेटीव्ह लोकांचे फ्रेंचांच्याच मदतीने + इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरू होते. तसंही पेशव्यांशी झालेला तह इंग्रज कधी ना कधीतरी + मोडणारच होते. गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज याने ताबडतोब पेशव्यांविरुद्ध झुंज घेण्याची + तयारी चालवली. एकंदरीतच या साऱ्या प्रकरणात नाना फडणवीसांना आता अधिकाधिक +महत्त्व प्राप्त होऊ लागले होते. सखारामबापूंच्या घशात पुन्हा द्वेषाची जळजळ सुरू झाली. +पूर्वीचे रघुनाथरावांशी असलेले स्नेहसंबंध त्यांना पुन्हा खुणावू लागले होते. नानांचा द्वेष +करणाऱ्यांच्यात फक्त बापूच होते असं नाही. यात बजाबापंत पुरंदरे, चिंतो विठ्ठल रायरीकर, +तुकोजी होळकर आणि खुद्द नानांचे चुलतबंधू मोरोबादादा फडणीसही होते. बापूंच्याच +म्हणण्यानुसार या साऱ्यांनी हेस्टिंग्जकडे गुप्त पत्र पाठवली की, 'रघुनाथरावांना सुखरूप + पुण्यात पाठवा. मग सवाई माधवरावाला गादीवरून काढून तुम्हास अनुकूल असणाऱ्या +दादासाहेबांना पेशवाई मिळेल.' इंग्रजांना हेचे हवे होते. त्यांनी बंदोबस्ताने रघुनाथरावांना +मुंबईहून पुण्यास रवाना केलं. + वास्तविक पाहता मोरोबादादा हे नाना फडणवीसांचे सख्खे चुलत बंधू होते. नानांपेक्षा ते +वयाने लहान होते. परंतु, प्रथमपासूनच ते आपण सर्वांत बुद्धिमान अन् हुशार आहोत + अशा गैरसमजात होते. स्वतः बाळाजी जनार्दन उर्फ नाना मात्र अत्यंत बुद्धिमान, हुशार +होते. त्यांचा कामाचा उरक मोठा होता. मुळात आधी आपल्याला जे शक्य नाही त्याबाबत +दुसऱ्याला काहीही कबूल करावयाचे नाही आणि जर कबूल केले तर मग अगदी कसाही + प्रसंग आला तरी ते कार्य तडीला न्यायचे हा त्यांचा दंडक होता. म्हणूनच नुसत्या मित्रांचाच +नाही तर अगदी शत्रूही त्यांच्यावर विश्वास ठेवत असत. राक्षसभुवनची लढाई झाल्यानंतर + थोरल्या माधवरावांनी सर्व कारभार एकहाती आपल्या हाती घेतला. त्याचवेळेस माधवरावांनी +नानांच्या हातचा चोखपणा व दूरदृष्टी ओळखली होती. अन् म्हणूनच त्यांनी ना��ांना पुण्यात + फड अन् दरबारी कामावर नेमले. मोरोबादादाला मात्र माधवरावांनी स्वतंत्र काम न देता + स्वतःजवळच ठेवून घेतले. म्हणजे स्वारी-शिकारीच्या वेळी मोरोबादादा कायम नजरेसमोर +राहील अन् त्याच्या वृत्तीला चाप बसेल. परंतु, माधवरावसाहेबांचा अंतस्थ हेतू या मोरोबाच्या +काही लक्षात आला नाही. त्याला वाटले आपण नानांपेक्षा कर्तबगार अन् हुशार आहोत +म्हणून पेशव्यांनी नानांना दूर ठेवले अन् आपल्याला जवळ केले. पुढे मृत्यूसमयी + माधवरावांनी जे मृत्यूपत्र अथवा नऊ कलमी यादी केली तेव्हा मोरोबादादाला आपली खरी + योग्यता समजली. परंतु, तोपर्यंत फार उशीर झालेला होता. नानांनी आपल्या वर्तनाने + बहुतांश लोकांची मने जिंकली होती. अन् हे पाहूनच मोरोबादादाला नानांविषयी द्वेष वाटू + लागला होता. + आता पुण्यात असलेल्या इंग्रजांच्या वकिलाशी, टॉमस मॉस्टिन याच्याशी मोरोबादादा +फडणीस आणि बाजाबापंत पुरंदऱ्यांनी संधान बांधले. त्याप्रमाणे १७७७ च्या ऑगस्ट + महिन्यात मॉस्टिन मुंबईत येऊन राहिला होता. तो रघुनाथरावाला पुण्यात नेण्यासाठी आला +होता. परंतु, ब्रिटिश गव्हर्नमेंट कौन्सिलची बैठक होऊन दि. ३ जानेवारी १७७८ रोजी +<<< + +कौन्सिलने मॉस्टिनला पुण्यात जाण्यास फर्मावले. शेवटी सहा महिने मुंबईत तळ ठोकून +मॉस्टिन दि. १० जानेवारी रोजी पुण्याला परतला. या आधी रघुनाथरावाच्याच सूचनेनुसार +गारद्यांनी पुण्यात धुमाकूळ घातला होता. इ. स. १७७७ च्या जून महिन्यात नानांना ठार +करण्याचा राघोबादादा-मोरोबादादा यांचा बेत होता. परंतु नाना मात्र 'वर्तमान आगाऊ +कळोन सावध झाले. ईश्वर रक्षणार. तेव्हा मनुष्य यत्न चालत नाही. कोणी करविले याचे +वर्तमान लागले नाही. परंतु यात दामोदर मंडळी मात्र फार करून आहेत' अशा आशयाचे दि. +९ जूनचे पत्र आहे. दामोदर हा परवलीचा शब्द आहे. दाम-उदर म्हणजेच खाण्याइतका पैसा +असलेले, गबर 'श्रीमंत' लोक असा याचा अर्थ होतो. हे गबर श्रीमंत म्हणजेच अर्थात +रघुनाथराव अन् मोरोबादादा, सखाराम बापू, बजाबा पुरंदरे अन् तुकोजी होळकरादी +दादासाहेबांचे चेले. + इ.स. १७७८ च्या उन्हाळी काळात हरिपंततात्या कर्नाटकात हैदरच्या मोहिमेवर +आणि महादजी शिंदे कोल्हापुरात होते. ज्याप्रमाणे मोरोबादादाला नानांचे वर्चस्व मान्य +नव्हते, तसेच तुकोजी होळकरांनाहा महादजीं���े वर्चस्व मान्य नव्हते. आता सध्या नाना- +महादजींचे विशेष सख्य असल्याने मोरोबा-तुकोजीसोबत बापूंनाही धोका जाणवू लागला +होता. + ज्यावेळेस नाना वाईजवळच्या मेणवली येथील वाड्यात होते त्याच वेळी इकडे मोरोबा- +बापू-तुकोजी यांचे गुप्त खलबत झाले. शपथा घेतल्या गेल्या. पेशवाईची गादी सवाई +माधवरावच चालवतील, परंतु कारभारी मात्र नाना-महादजी राहणार नाहीत. फौजा गोळा +करण्यासाठी बापूंनी तुकोजी होळकरास महादजींप्रमाणेच जहांगीर आणि किल्ला देण्याचे +वचन दिले. शिवाय ५ लक्ष होन खर्चासाठी दिले. पुढे होळकरांची गाड़दी अन् पठाणी फौज +पुण्यास यायला निघाली असतानाच इकडे नानांना त्याची खबर लागली. नानांनी ताबडतोब +पुरंदरावरून आपली फौज पाठवून पठाणांवर हल्ला चढवला. घोडनदीवर झालेल्या या +लढाईत पठाणांचा पाडाव झाला आणि हे सर्व कारस्थान मोरोबादादाचे आहे असा सगळा +प्रकार नानांना समजला. हे घडताच बापूंनी मोरोबादादास सावध केले. दि. २२ मार्च १७७८ +रोजी चिंतो विठ्ठल रायरीकर, बजाबा पुरंदरे, सदाशिव रामचंद्र इ. मंडळी बारामतीत +मोरोबादादांजवळ जमली अन् १६००० फौज घेऊन पुण्यावर चालून निघाली. हे पाहताच +नाना आपल्याजवळील पाच हजार फौज घेऊन, सवाई माधवरावांसह पुरंदरगडावर जाऊन +राहिले. नानांचे महादजी शिंदे-हरिपंततात्या फडके, आप्पा बळवंत मेहेंदळे इ. सरदार कानडी +मुलखात अडकले होते. + दि. २६ मार्च १७७८ रोजी मोरोबादादांच्या फौजांनी पुणे ताब्यात घेतले. नानांच्या ज्या +ज्या चौक्या होत्या त्या उठवून तेथे आपल्या चौक्या ताबडतोब बसवण्यात आल्या. यावेळेस +सदाशिवरावभाऊ पेशव्यांची विधवा पत्नी पार्वतीबाई ही शनिवारवाड्यातच होती. तोतया +प्रकरणावरून पार्वतीबाई नानांवर खूपच नाराज होत्या. अन् नेमका याचाच फायदा घेत +मोरोबादादांनी पार्वतीबाईंकडून शिक्केकट्यार, दिवाणगिरीची वस्त्रे, नौबत अन् जरिपटका +ताब्यात घेतला. अन् तिथून तडक चाल केली ती पुरंदरगडावरच. कारण सवाई माधवराव हे +<<< + +बालवयीन असले तरी 'पेशवे' होते. शिवाय नाना फडणवीस हेही पुरंदरावरच होते. + यावेळेस सखारामबापू सासवडलाच होते. त्यांनी थेट पुरंदरावर जाऊन नानांची +भेट घेतली. अशा परिस्थितीत नानांनी मोरोबादादाशी समेट करावा, असे बापूंचे म्हणणे होते. +नानांनी ते कबूल केलं आणि माधवराव सदाशिव जाधव या आपल्या खास वकिलाला +बापूंसोबत मोरोबादादाची भेट घेण्यास पाठवले. या सदाशिवरावांनी मोरोबादादांपुढे एकदम +मसलतच उलगडली. नानांनी स्पष्ट सांगितले होते, 'पुरंदरचा अन् बालपेशवे माधवरावांचा +बंदोबस्त आपणापाशीच (नानांकडे) रहावयास हवा. पुरंदर व पेशवे हाती घेऊ म्हणाल तर ते +कदापि होणे नाही.' कारण फौज, पैसा, सरदार इ. सारे नानांच्याच बाजूने होते. दादासाहेब +रघुनाथराव आणि इंग्रजांना एकत्र पुण्यात आणणे हे मोरोबालाही कसे परवडणारे नाही हे +वकिलांनी व्यवस्थित पटवून दिले. शेवटी नाना-मोरोबा या दोन्ही पक्षात चार कलमी मसुदा +तयार करण्यात आला, तो असा- + १) सखाराम बापू बोकील यांच्याकडे वडिलकीचा अधिकार रहावा. + २) नाना फडणवीसांस कारभारात पुन्हा घ्यावे. + ३) सर्वांचे सरंजाम यथापूर्व चालवावेत. + ४) तूर्तास रघुनाथरावांस पुण्यात आणू नये. + हा तहनामा झाल्यानंतर चिंता विठ्ठल रायरीकर, बजाबापंत पुरंदरे यांच्यासह +मोरोबादादा-बापू पुरंदरावर नानांकडे गेले. शेवटी दि. ३ एप्रिल १७७८ रोजी पाचही जणांनी +बालपेशवे सवाई माधवरावसाहेबांना नजराणे अर्पण करून मुजरे केले. + यापूर्वी सेंट ल्युबिनसन याच्याशी नानांनी केलेली बातचीत ही महादजी शिंद्यांना +अजिबात पसंत नव्हती. त्यांचे म्हणणे होते की, आधीच इंग्रज रघुनाथरावाला भरीस +घालतायत. आता फ्रेंचांशी आपण तह केला तर इंग्रज अजूनच शेवटी नानांनीही +दोन पावले माघार घ्यायचे ठरवले आणि मोरोबा-बापू-नाना या तिघा कारभाऱ्यांनी मॉस्टिन +वकीलाला 'आमचा ल्युबिनबरोबर कोणताही करार झाला नसून, फ्रेंचांशी आम्ही कधीही +दोस्ती ठेवणार नाही' या आशयाचे करारपत्र दिले. या करारपत्रावर तारीख आहे दिनांक २९ + १७७८. अन् त्याप्रमाणे खरंच ल्युबिनसनला दरबारातून रजा देण्यात आली. दि. १२ जुलै +१७७८ रोजी ल्युबिनसन पुणे सोडून दमण येथे निघून गेला. + मोरोबादादाच्या हातात कारभार येताच त्याला हर्षवायू झाल्यागत स्थिती झाली होती. +त्याने सखो हरी गुप्ते, नरसिंहराव गोविंद इ. रघुनाथरावांच्या हस्तकांना, ज्यांना पूर्वी नानांनी +कैदेत टाकले होते त्यांना मुक्त केले. नानांनी केलेली प्रत्येक गोष्ट उलथी पाडण्याचा मोरोबाने +उद्योग केला. नाना मात्र काळ पाहून गप्प बसले होते ... पण वरवरच! आतून ते +पुढच्या हालचाली काय व कशा कराव्यात याच्या विचारात होते. होळकरांसमोर नाना वाकले +असले तरी ते भोसले आणि शिंद्यांना जवळ बोलवत होते. कसल्याही प्रकारचे लेखी पत्र न +पाठवता हरिपंत फडक्यांच्या मदतीने नानांनी भोसल्यांना माहूरपर्यंत बोलावून घेतले. +निजामालाही आपल्या बाजूला ओढले. +<<< + + महादजी शिंदे ही एक अत्यंत मातबर असामी होती. महादजी हे नानांच्या पक्षातला +प्रमुख मोहरा होते. मोरोबादादाला काहीही करून महादजीना आपल्या बाजूला वळवायचे +असल्याने बजाबापंत अन् बापूंसह मोरोबादादा परिंच्याला जाऊन थांबले. इकडे महादजी +मात्र मोरोबादादाला हूल देऊन मोरगावात जाऊन थांबले. इथेच महादजींना हरिपंततात्या +फडके आणि परशुरामभाऊ पटवर्धन येऊन मिळाले. शेवटी सखारामबापूंच्या आग्रहामुळे दि. +१९ जून रोजी महादजी मोरोबादादाला भेदले, परंतु त्यात निष्पन्न काहीच झाले नाही. +महादजींनी तुकोजी होळकरांची आवर्जून भेट घेतली. त्यांनी तुकोजींचे मन वळवण्याचा +प्रयत्न केला. + "दौलतीमध्ये ऐवज म्हणावयास कारभारी दोघे ... बापू व नाना आणि सरदारात तुम्ही- +आम्ही. हरिपंत कर्नाटकात फसले. त्यांची कुमक करून त्यांस काढून (सोडवून) आणावे. +धनी लहान. राज्यास बखेडा, याचा बंदोबस्त करून द्यावा. स्वस्थता करून मग (आपण) +हिंदुस्थानास जावे पूर्वी मल्हारबा व राणोजी एकविचारे करोन एकनिष्ठतेने सेवा करोन +मातबरीस आले. समयास उपयोगी म्हणून किर्तीस पात्र झाले ... आता तुम्ही विरुद्ध मार्ग +धरीला. तेव्हा द्वैत वाढले. सिंदे-होळकर जोडफळांचा सांधा असता एक तुम्ही बगलेस +मारिले ... धनी बाळ तो खरा (सवाई माधवराव पेशवे) पण दैव सबळ आहे." महादजींच्या +या समजावण्याने तुकोजी होळकर पूर्णपणे पालटले आणि मोरोबादादा-रघुनाथरावांचा पक्ष +कायमचा सोडून नाना-महादजींना येऊन मिळाले. + तुकोजी होळकरांनंतर महादजींनी आपला मोर्चा सखाराम बापूंकडे वळवला. +गोडीगुलाबीने त्यांनी नाना-बापू, हरिपंततात्या-बापू त्याचप्रमाणे फडके अन् पटवर्धन +यांच्याशीही बापूंचे करार लिहून घेतले. मोरोबादादाला मात्र या गोष्टीचा काहीच सुगावा +नव्हता. परंतु जेव्हा तुकोजी होळकरांनी मोरोबांच्या गोपाळ नाईक, नारो गणेश इ. असामींना +कैद करून महादजींकडे सोपवले तेव्हा मोरोबांचे डोळे खाड्डकन उघडले. + मोरोबादादाला डाव आपल्या विरोधातच उलटला जात आहे याची हळूहळू जाणीव होऊ +लागली. तो पुणे सोड��न तड़क 'बहुल' या गावी गेला. तेथून तो नानांची पायधरणी करू +लागला. त्याने नाना फडणवीस अन् सखारामबापूंना शेवटचा निरोप पाठवला की, "शिक्के- +कट्यार, जरीपटका अन् शिवनेरी किल्ला आहे ते तसेच ठेवा. मी शिवनेरीला +जाऊन स्वस्थ बसतो." परंतु नाना अन् बापूंनी ते ऐकले नाही. त्यांनी मोरोबादादाला फेर- +जबाब पाठवला की, " ... तुमच्याकडे सरकारी सरंजाम काहीएक राहणार नाही. तुम्ही दोनशे +लोकांसह भीमातीरी बहुल येथे रहावे ... " परंतु, मोरोबादादाने आपले उसने अवसान काही +सोडले नाही. शेवटी दि. २२ जून १७७८ या दिवशी परशुरामभाऊ पटवर्धन आणि +हरिपंततात्या फडके यांच्या सैन्याने एकदम मोरोबादादाच्या गोटावर धाड टाकली अन् चौक्या +बसवल्या. शेवटी मोरोबादादाने जरिपटका आणि शिक्के-कट्यार नानांच्या हवाली केले. +यानंतर त्याच्यावरच्या चौक्या उठवण्यात आल्या. परंतु चौक्या उठताच मोरोबादादाने पुन्हा +नव्या कटकटी सुरू करण्यास आरंभ केला हे पाहून दि. ११ जुलै रोजी फौज पाठवून नानांनी +त्याला पुन्हा कैद केले. मोरोबादादा बरोबरच नारो गणेश आणि बजाबा पुरंदऱ्यांनाही +<<< + +पकडण्यात आले. विसाजीपंत बिनीवाले, नरसिंहराव धायगुडे यांना पकडून त्यांचेही सरंजाम +जप्त करण्यात आले. बजाबा पुरंदरे यांना वाईजवळच असणाऱ्या चंदनगडावर, गोपाळराव +नाईकाला रायगडावर आणि खुद्द मोरोबादादाला नगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले. +या सर्वांचे महाल व मालमत्ता सरकारजमा करण्यात आली. शिवाय प्रत्येकाला वेगळा दंड +ठोठावण्यात आला. अशाप्रकारे मोरोबादादाचे पर्व संपुष्टात आले. + युरोप अन् अमेरिकेत फ्रेंचांचे ब्रिटिशांशी होत असलेले सततचे झगडे यांचा परिणाम +हिंदुस्थानातही उमटू लागला. गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज याने दि. १० जुलै +१७७८ रोजी फ्रेंचांचे चंद्रनगर घेतले. यानंतर लगेच १६ जुलै रोजी अन् १० +१७७९ मध्ये माहे हे बंदरदेखील फ्रेंचांना गमवावे लागले. माहे या बंदरातून हैदरअलीला +शस्त्रसाठा पुरवण्यात येत असे. तो आता बंद झाल्यामुळेच हैदरअली इंग्रजांच्या विरोधात +गेला. + इकडे नाना ल्युबिनसनची घेतलेली भेट हे एकच कारण मनात धरून +हेस्टिंग्जने यमुनातीरावर 'काल्पि' या ठिकाणी फौजेची उभारणी केली अन् ती मुंबईकर +इंग्रजांच्या मदतीला पाठवून दिली. कर्नल लेस्ली नावाचा गोरा कप्तान या फौजेच�� नेतृत्व करत +होता. प्रथम पुण्याच्या आसपास जाऊन तळ द्यायचा अन् मग पुण्यावर हल्ला +लेस्ली अन् मॉस्टिनचे धोरण होते. परंतु पुण्याच्या प्रदेशात शिरकाव करण्यासाठी काहीतरी +कारण अन् मराठ्यांचे परवाने हवे होते. म्हणूनच हेस्टिंग्जने नाना "आम्ही +दक्षिणेत फ्रेंचांच्या आणि हैदरच्या पाडावासाठी जात आहोत. तेव्हा तुमच्या मुलुखातून +जाण्याचे परवाने आमच्या फौजेला मिळावेत" अशा आशयाचे एक पत्र पाठवले. नाना +अत्यंत हुशार अन् मुरब्बी राजकारणी होते. वॉरेन हेस्टिंग्जचा डाव न समजण्याइतके ते +लहान निश्चितच नव्हते. त्यांनी हेस्टिंग्जला फेरजबाब पाठवला- "आजपर्यंत तुमच्या फौजा +जलमार्गाने येत-जात होत्या. तर नेमकं आताच भूमार्गाचा वापर कशाला करत आहेत ?... " +या पत्राला हेस्टिंग्जने काही उत्तर पाठवले नाही. परंतु, इंग्रजी फौजा मात्र पुढे पुढे येतच +राहिल्या, हे पाहून नाना समजायचं ते समजले. + साधारणतः याच सुमारास आनंदीबाईंचे सखारामबापूंना एक पत्र आले. इंग्रजी फौजा +पुण्यावर येत आहेत अन् यामागे आपले खासे पती आहेत समजल्यावर आनंदीबाईंनाही ही +कळवतात- गोष्ट पटली नाही. दि. २ सप्टेंबर १७७८ रोजी सखारामबापूंना पत्र लिहून आनंदीबाई + + " ... बुंदेलखंडात इंग्रजांचे दोन कंपू आले आहेत. हुजूरची पत्रे जाऊन हे इंग्रज आले. +जबरदस्त आहेत. त्यांचे यांस (राघोबास) बोलणे की, आपणास दौलतीवर बसविणे, आम्हांस +राहण्यास जवळ जागा द्या व दहा हजारपर्यंत आमची फौज ठेवा. ही गोष्ट हुजुरांस कठीण +वाटली. परंतु, रानोमाळ हिंडावे त्यापेक्षा ल्याही श्रम कमी करून कबूल केले. असे इंग्रज +घरात येऊ पाहतात. तमाम अंमल आपले बसवितात. आम्ही निमित्तमात्र पण तेच दौलतेस +गिऱ्हाईक होतात. लखनौचे शुजा उद्दौले व अर्काटचे महंमद अली यांच्या घरात प्रथम हे इंग्रज +नम्रतेने पायरोव करून आता उभयतांस पोटापुरते देऊन आपण धनी झाले. तसेच आमच्या +<<< + +घरात होईल. सर्व गोष्टी तुम्हांस ठाऊक असोन हल्ली या तऱ्हा दिसतात. हुजुरची मर्जी +कोण्ह्या तऱ्हेने समजाविल्याने ठीक राहते, कोण्ह्या तऱ्हेने यांस तुम्ही माहीत +आहात. काळच विपरीत आले. परंतु आम्हांस हाच भरवसा आहे की, तुम्ही कालचक्रासही +फिरवाल. म्हणून तुम्हांस पत्र लिहिले आहे. तरी दौलत नीट राहून, हुजुरचाही संतोष राहून +बऱ्या होतील त्या गोष्टी कराव्या. नाहीतर जन्मभर चांगले केले आणि म्हातारपणी इंग्रजांच्या +घशात दौलत घातली हे अपेश येई तो अर्थ न करावा. हुजूर ऐकत नाहीत ऐसे म्हणाल तर +त्यांचे तुम्ही प्राण घेता किंवा पेचात आणता, त्या पक्षी काय होईल ते होवो. तुमचे हाती नच +लागावे हा निश्चय आहे. कोणासही पेच सोसत नाही. विशेष लिहावे तरी तुमचे दशांशही +आम्हांस समजत नाही. यशापयशाचे धनी तुम्ही. आम्ही लिहून विशेष तो नाही. तुम्ही +मोजितही नाही. परंतु, अंदाज दिसत चालला यास्तव सूचना लिहिलेली आहे. पूर्वी तुम्हांस +दोन पत्रे पाठविली त्याचे उत्तर आले नाही. पत्रे पोचली की नाही न कळें. नवी भावजय +लाडकी केली तिचे नाव काय ठेविले व दुसरी कधी करायची हा मजकूर त्यात विशेष होता. +तरी उत्तर पाठवणे. लेखनसीमा." + या पत्राच्याच वेळचे आनंदीबाईंनी नाना पाठवलेले पत्र पहा- " ... तुम्ही +तीन पिढ्यांचे दौलतीतील फडणीस असोन, हल्ली फितुरांनी ब्राह्मणी दौलत यवनाक्रांत होऊ +पहाते. तुमच्या चित्तातील उगिच आटी जात नाही. याचा बारीक मोठा विचार तुम्हीच करणे. +आम्ही तेथे तुमच्या स्वाधीन. पावणेदोन वर्षे झाली. तुमची कार्यसिद्धी काहीच न झाली. +तुमची फौज गुंतून आमच्या धन्याच्या पायाशी वियोग, हे उभयपक्षी नुकसान. तरी आम्हांस +मुंबईस पोहोचवणे ... " + या दोन्ही पत्रांवरून आनंदीबाईंना रघुनाथरावांचे वागणे पसंत नव्हते, असे दिसते. परंतु +त्याचबरोबर नाना-बापूंनाही त्या समजावतात. + यमुना नदीच्या दक्षिणांगास 'सागर'च्या जहागिरीत 'काल्पी'चा भुईकोट होता. हे ठाणे + थोरल्या बाजीरावांपासूनच गोविंदपंत खेर उर्फ बुंदेले यांच्या अखत्यारित होते. गोविंदपंत + मारले गेल्याने त्यांचा थोरला पुत्र बाळाजी गोविंद आणि धाकटा पुत्र गंगाधर +गोविंद हे जहागीर सांभाळत होते. हेस्टिंग्जच्या फौजेला शिंदे-होळकरांकडून परवाने मिळाले +होते. परंतु मुख्य पेशव्यांचे परवाने मिळणे आवश्यक होते. इकडे नानांनी बाळाजी गोविंदास +पत्र लिहून कळवले की, कोणत्याही परिस्थितीत लेस्लीला दक्षिणेत उतरू देऊ नका. जर +त्याने ऐकले नाही तर सामना करा. अन् नानांच्या अपेक्षेप्रमाणे लेस्लीने ऐकले नाहीच. तो +आपली फौज घेऊन सरळ दक्षिणेकडे जाऊ लागला. बाळाजीपंतांनी त्याला एकदा सूचना +केली. नानांनीही हेस्टिंग्जला पत्र पाठवले की, तुमच्या फौजा समुद्रमार्गाने जाऊ द्या. आमच्या +प्रदेशातून जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. इकडे १७७८ मध्ये लेस्ली काल्पिच्या +जवळ यमुना उतरून दक्षिण बाजूस येऊ पाहतोय हे कळताच बाळाजी व गंगाधर गोविंद या +बंधूंनी जागोजागी आपल्या चौक्या बसवून नाकेबंदी केली. हे पाहताच लेस्लीने काल्पिच्या +किल्ल्यालाच मोर्चे लावले आणि किल्ला घेतला. इथेच त्याचे चुकले. तो किल्ल्यात शिरल्याने +मराठ्यांनी फासा आवळला. अन् अशाच परिस्थितीत दि. ३ ऑक्टोबर १७७८ रोजी लेस्ली +<<< + +आजाराने काल्पिच्या किल्ल्यातच मरण पावला. त्याच्या जागी हेस्टिंग्जने कॅ. गॉडार्ड या +गोऱ्याची नेमणूक केली. परंतु या साहेबांच्या पुण्यप्रतापाने इंग्रजांचे अधिकच नुकसान झाले. +कॅ. क्रॉफर्ट, कर्नल पार्कर, मेजर फ्लर्टन इ. ५० इंग्रज आणि ३०० गारदी पाण्याविना +तडफडून मेले. शेवटी गॉर्डनने नर्मदा गाठली खरी, पण काल्पि पुन्हा मराठ्यांनी काबीज +केले. + + नवल राठी बोरघाट + + पनवेल + तळेगाव + + पुणे + + पहिले इंग्रज मराठा (अँग्लो मराठा) युद्ध, भाग १ + मराठी फौजा आणि इंग्रजी फौजा यांच्या हालचाली + इकडे साताऱ्यात मार्गशीर्ष शुद्ध ११ शके १६९९ म्हणजेच दि. डिसेंबर १७७७ रोजी +छत्रपती राजाराम महाराज मृत्यू पावले. राजारामांच्या मृत्यूपूर्वीच नाना-बापूंनी एक थोरली +मसलत पार पाडली होती. राजारामांना मुलगा नसल्याने वाविकर त्र्यंबकजीराजे भोसले +यांच्या थोरल्या पुत्रास, विठोजीस राजाराम महाराजांच्या मांडीवर बसवून त्याचे दत्तक विधान +केले. भाद्रपद शु. १३ रोजी झालेल्या या दत्तक विधानात विठोजींचे नाव ठेवण्यात आले +'शाहूराजे'. काही कारणांमुळे अभिषेक हा पुढे ढकलण्यात आला, तरीही नानांनी +शाहूराजांना गादीवर 'बसवले' !! + वॉरेन हेस्टिंग्जने नागपूरकर भोसल्यांना फितवून रामराजाच्या नंतर मुधोजी भोसल्यांना +छत्रपतीपद देण्याचे आमिष दाखवले होते. अर्थात नानांना या गोष्टींची कल्पना होतीच. दि. +२४ नोव्हेंबर १७७८ रोजी नाना आपल्या नागपूर दरबारातील बाबुराव वैद्य वकिलास +<<< + +लिहितात- + " ... इंग्रज घाटावर येऊ लागले त्यांचे पारिपत्य ईश्वरेच्छेने सत्वरच होईल. पण इंग्रजांचा +बिघाड झाला ही गोष्ट खुली. ... चक्राची गत अन् इंग्रजांची चाल एक ... दिवाकरपंत दादा +(भोसल्यांचे कारभारी), तुम्ही व सेनाधु���ंधर (भोसले) एकत्र बसून दूरदृष्टीने पोक्त मनसुबा +धरून सल्लाह लिहावी ... " यावर बाबुराव वैद्य लिहितात- " ... निजाम श्रीमंतांस अनुकूल, +फौजांची तयारी करितात पण संदेहात आहेत. इंग्रजांचा बिघाड श्रीमंतांशी आहे. आपण +निराळे आहोत असे भोसले बोलतात ... आम्ही त्यांस उत्तर केले की, नागपूरची दौलत व +पुण्याची दौलत दोन नाहीत." तरीही भोसले मात्र कायम इंग्रजांकडेच झुकले हे सांगायला +नको !! + काल्पिचे ठाणे इंग्रजांनी घेतल्यामुळे इंग्रज-मराठे यांच्यात बिघाड झाला आहे ही बातमी +उघडच होती. हेस्टिंग्जनेही मुंबईकर इंग्रजांना रघुनाथरावांना घेऊन पुण्यास जाण्यास +परवानगी दिली. त्यामुळे कर्नल इगर्टन या गोऱ्या साहेबाच्या नेतृत्वाखाली ५०० इंग्रज व +२००० हिंदुस्थानी शिपायांसह रघुनाथराव आणि अमृतराव मुंबईची ओलांडून +पनवेलजवळ उतरले. दि. २५ डिसेंबर १७७८ रोजी इगर्टन रघुनाथरावांसह बोरघाट चढून +खंडाळ्यास आले. परंतु हे पाहताच मराठ्यांनी आसपासच्या प्रदेशातील सर्व प्रदेश जाळून +टाकला. त्यामुळे इंग्रजांचे दाणा-पाणी संपूर्ण तुटले. दि. ३० डिसेंबर १७७८ रोजी इगर्टनची +फौज खंडाळ्याहून पुढे निघाली. दि. ४ जानेवारी १७७९ रोजी कार्ल्याजवळ इंग्रजी पलटणी +आल्या असता भिवराव पानशांच्या तुकडीने हल्ला चढवला. वडगाव मावळातील एकवीरा +भवानीसमोरच कॅ. स्टुअर्ट मारला गेला. याच सुमारास इगर्टन आजारी पडल्याने कॅ. कॉकथन +याने मोर्चा सांभाळला. दि. १३ जानेवारी रोजी तळेगावच्या मुक्कामी इंग्रज पलटणी +उतरल्या. पानशांच्या तोफखान्यात मुसा नारज हा एक फ्रेंच गोलंदाज होता. याचे मूळ नाव +होते 'मस्यू नोरोन्हा'. याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्रजांची पाचावर धारण बसली होती. +यानंतर पानशांच्या मदतीसाठी रामचंद्र गणेश कानडे, बाजी पंत, शिंदे-नाना इ. सर्वजण +४५००० फौजेसह वानवडीहून निघाले. मराठी फौजा थेट पलटणींना जाऊन भिडल्या. +इंग्रजांच्या पाच तोफा पाडाव झाल्या. चार-पाचशे माणसे पडली. दोन हजार बंदुकांची लूट +मिळाली. हे होत असतानाच बाळाजीपंत फाटक आपली चार हजार फौज घेऊन कल्याण +प्रांतात उतरले. बोरघाटाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली. इंग्रजांची रसद पूर्णपणे बंद +झाली. शेवटी इंग्रजांचे खूपच नुकसान होऊ लागले हे पाहताच कॅ. फॉर्मर या अधिकाऱ्याने +नाना, महादजी आणि हरिपंततात्यांची भेट घ��तली. नाना-महादजींनी फॉर्मरला स्पष्ट दमच +भरला की, रघुनाथरावांना मराठ्यांच्या हवाली केल्याशिवाय अन् मुलुखाच्या उपद्रवा +बदल्याचा तह केल्याशिवाय तुम्हाला परत जाता येणार नाही. यावर फॉर्मर म्हणाला की, "तह +करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही." तेव्हा नानांनीही स्पष्ट विचारले, "मग पुरंदरचा +तह मोडून मराठ्यांवर हल्ला करण्याचा अधिकार तुम्हाला कसा?" शेवटी नाईलाजाने +इंग्रजांनी मराठ्यांशी नवा तह केला. तो तहनामा पुढीलप्रमाणे- + १) रघुनाथरावदादास पुन्हा मराठ्यांच्या हवाली करावे. +<<< + + २) साष्टी, ठाणे, उरण आणि गुजरातचे काही महाल इंग्रजांनी परत मराठ्यांना द्यावेत. + ३) साष्टी कब्जा होईपर्यंत दोन इंग्रज इसमांनी मराठ्यांकडे कैदी म्हणून रहावे. + ४) रघुनाथरावांकडून घेतलेले सर्व दस्तऐवज परत करावे व कलकत्याहून येणाऱ्या +पलटणी परत पाठवाव्यात. + याशिवाय भड़ोच परगणा आणि ४१००० हजार रुपये महादजी शिंद्यांना नजराणा म्हणून +द्यावेत. + इंग्रजांनी या तहनाम्यावर सह्या करताच रघुनाथरावदादांसह कॅ. फॉर्मर आणि स्टुअर्ट हे +दोन इंग्रज मराठ्यांच्या स्वाधीन झाले आणि माघ शुद्ध १ म्हणजेच दि. १८ जानेवारी १७७९ +रोजी नारो गणेश, विसाजी कृष्ण इ. मंडळींनी इंग्रजी फौजांभवतीच्या चौक्या उठवल्या. + + होकन मराठी गेल्या फौजा + + पहिले इंग्रज मराठा (अँग्लो मराठा) युद्ध, भाग २ + मराठी फौजा आणि इंग्रजी फौजा यांच्या हालचाली + + रघुनाथरावांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यापूर्वी त्यांच्याकडून एक +करार लिहून घेण्यात आला. तो करार असा- + 'करार शपथपूर्वक दादासाहेब यांचा राजश्री माधवराव नारायण पंतप्रधान यांसी, +विद्यमान तुकोजी होळकर व महादजी शिंदे. तुम्हा आम्ही नानाप्रकारे विग्रह राज्यलोभास्तव +वाढून आम्ही दौलत साधावी यास्तव बहुत प्रयत्न केला. इंग्रजांकडे जाऊन त्यास आमचे +साह्यास बरोबर घेऊन तळेगावापर्यंत आलो. सरदारांची खर्चाची बेगमी करून देतो आणि +स्नानसंध्या करून स्वस्थ रहावे असे सांगितले. त्याप्रमाणे मान्य करून खर्चाची नेमणूक बारा +<<< + +लक्षांची जागा लावून दिली. ती आपण घेऊन स्नानसंध्या करून झाशीस राहू. राज्यलोभाने +दौलतीचा वारसा करणार नाही. नेमणूक करून दिली त्यात सत्काल क्षेप करून स्वस्थ राहू. +तुम्ही पंतप्रधान ���ाज्याचे धनी व चि. बाजीराव तुमचे कारभारी करून घ्यावे, असे उभयता +सरदारांचे व आमचे विचारें ठरून, आम्ही मान्य झालो. तुम्ही व चिरंजीव बाजीराव यांनी पूर्वी +नानासाहेब व भाऊसाहेब धणी व कारभारी या अन्वये वर्तत होते. त्याप्रमाणे प्रबुद्धपण +आलियावर परस्परे वर्तावे. स्वामीसेवक धर्म उभयतांनी अन्योन्यपणे निष्कपटपणे चालवावा. +तुम्हा उभयतांची धनीपणाची व कारभाराची पुस्त पुन्हा उभयता सरदार करतील. आम्ही +कारभाऱ्यांच्या प्रकरणात बिलकूल मन घालणार नाही. कलमबंदीची याद लिहून दिली आहे. +त्याप्रमाणे तुम्हांकडून अंमलात यावे. आम्हांकडूनही येईल. यास अंतर करू तर श्री सांबाची +व शपथ असे.' ता. ३ फेब्रुवारी १७७९ रोजी दिलेल्या या तहनाम्यात +दादासाहेबांनी सर्व अटी मान्य केल्या. म्हणूनच दादासाहेबांवरचे अडीच लाख रु.चे कर्ज +वारण्याचे शिवाय बजाबा पुरंदरे, राघो नारायण, सखो हरी गुप्ते, चिंतो विठ्ठल, सदाशिव +रामचंद्र इ. दादासाहेबांच्या माणसांना कैदेतून मुक्त करण्याचे कारभाऱ्यांनी मान्य केले आणि +अखेरीस दि. २४ फेब्रुवारी रोजी राघोबादादा यांनी झाशीला जाण्यासाठी +प्रयाण केले. + तळेगावच्या प्रकरणावेळी सखारामबापूंचे रघुनाथरावांशी गुप्त संगनमत सुरूच होते. ' ... +विनंती उपरी. दक्षिणेकडे (हैदरअलीकडे) सूचना केली आहे. आम्ही पाय पसरून बसलो +आहोत. अशांत जलदी कराल तितकी उपयोगी अशा अनेक नानांनी +पकडल्या होत्या. चिंतो विठ्ठल रायरीकरांकडूनही अनेक चिठ्ठया, ज्या बापूंनी दादाकरता +दिल्या होत्या त्या महादजींना मिळाल्या. महादजींनी त्या नानांना दाखवल्या. त्यामुळे बापू +बाहेरून जरी आपल्याला साहाय्य करत आहे असे दाखवत असले तरी आतून +रघुनाथरावांनाच फितूर आहे हे दोघांनाही समजून चुकले. एके दिवशी महादजींनी नाना +आणि बापूंना मेजवानीसाठी आपल्या घरी बोलवणे केले आणि तेथेच सखारामबापू +बोकीलांना कैद करण्यात आले. त्यांची रवानगी तड़क सिंहगडावर करण्यात आली. परंतु, +दोन महिन्यांतच त्यांना प्रतापगडावर ठेवण्यात आले. प्रतापगडावरही दोन वर्षे काढून त्यांना + नेण्यात आले. परंतु, शेवटी येथेच दि. २ ऑगस्ट १७८१, श्रावण शु. १३ रोजी बापूंचा +मृत्यू झाला. + सखारामबापूंना कैदेत टाकल्यानंतर दि. १५ मार्च १७७९ रोजी नाना फडणवीस आणि +महादजी शिंदे यांच्यात बंधुभावाची शपथक्रिया झाली. आता सर्व आलबेल झाले होते. सर्व +संकटे सध्या तरी दूर झाली होती. म्हणूनच नाना पुरंदरगडावर असलेल्या +बालपेशवा श्रीमंत माधवराव नारायण यांना मोठ्या कौतुकाने प्रचंड समारंभ करून पुण्यास +आणले. वैशाख शु. ५ शके १७०१ रोजी पर्वतीवर सवाई माधवरावांची मोठ्या थाटामाटात +मुंज करण्यात आली. यानंतर सहा दिवसांनी म्हणजेच वैशाख शु. ११, दि. २७ एप्रिल १७७९ +रोजी माधवरावसाहेबांची स्वारी पर्वतीहून मोठ्या वाजतगाजत मध्यरात्रीच्या सुमारास +शनिवारवाड्यात दाखल झाली. +<<< + + इंग्रजांच्या कॅ. गॉडार्डला मात्र अजूनही पुण्याच्या वडगावात झालेला इंग्रज- +मराठ्यांच्यातला अपमानकारक तह मान्य नव्हता. रघुनाथरावदादाही अजूनही मनातून +नानांवर दात-ओठ खातच होते. गॉडार्डची मदत आपण घेतल्याशिवाय आपली सोय योग्य +रीतीने लागणार नाही असेच रघुनाथरावांचे मत बनले. बऱ्हाणपुरात पोहोचताच दादांनी +आपल्या सहकाऱ्यांना गुप्तपणे बोलावून घेतले. त्याप्रमाणे मानाजी फाकडे, बाजीराव बर्वे, +सखोजी भोसले इ. लोक कोणालाही कळू न देता खानदेशात एकत्र जमले. +रघुनाथरावांबरोबर असणाऱ्या हरी बाबाजीला याबाबतीत कसलीच कल्पना नव्हती. शेवटी +आनंदीबाई बाजीरावासह बुऱ्हाणपुरात येताच राघोबादादाने हरी बाबाजीवर हल्ला चढवून, +त्याला ठार करून पंधराशे गारदी, पंधरा तोफा व पाचशे स्वार यांसह सुरतेच्या रोखाने +पलायन केले. हरी बाबाजी हा शिंद्यांचा माणूस होता. नाना दादाच्या या +पलायनामागे अप्रत्यक्षपणे शिंदेच आहेत अशी शंका येऊ लागली अन् यामुळे फडणवीस- +शिंद्यांमध्ये दरी उत्पन्न होऊ लागली. + परंतु, सध्यातरी या दोघांना आपापसात भांडून शत्रूचाच फायदा होणार हे उमजच +असल्याने दोघांनीही नरमाईचे धोरण स्वीकारले. मधल्या काळात दक्षिणेत हैदरअलीखानाने +मोठाच उपद्रव मांडला होता. इकडे इंग्रजही युद्धाच्याच तयारीत होते. एकाच वेळी या दोन्ही +शत्रूंशी लढणे हे सध्या तरी आपल्याला शक्य नसल्याचे नाना-महादजींनी ओळखले. तिकडे +निजामही इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत होताच. म्हणून +मग नानांनी नागपूरकर भोसल्यांचे मन वळवून हैदरअलीशी इंग्रजांविरोधात तहाच्या +वाटाघाटी सुरू केल्या. शेवटी दि. २० फेब्रुवारी १७८० रोजी पेशवे आणि हैदरअली य��ंच्यात +तह झाला. त्या तहाची पुढीलप्रमाणे- + १) तुंगभद्रेपलीकडील व अलीकडील जो मुलुख, कोट, किल्ले किंवा पाळेगार +हैदरअलीने जिंकले ते त्याच्याजवळच राहतील. त्याबाहेर त्याने मराठ्यांच्या मुलुखास उपद्रव +देऊ नये. + २) हैदरअलीने इंग्रजांचा करून चिनापट्टणम्, अर्काट, त्रिचनापल्ली इ. इंग्रजांची +ठाणी मारून त्यांस जेर करावे. पेशवे गुजरात प्रांतात त्यांस जेर करतील व निजाम +राजमहेंद्रीकडे जाऊन शह देईल. + ३) हैदरअलीने गरज पडल्यास पाच हजार फौज पेशव्यांच्या मदतीस पाठवून द्यावी. + ४) रघुनाथराव किंवा त्याच्या साथीदारांस आश्रय देऊ नये किंवा त्यांच्याशी कसल्याही +प्रकारचा संबंध ठेवू नये. + ५) इ. स. १७८० पर्यंत हैदरने दिलेल्या उपद्रवाची पंधरा लाख खंडणी पेशव्यांना द्यावी व +पुढे दरसाल बारा लाख खंडणी पुण्यास जमा करीत जावी. + ६) मराठ्यांच्या तंजावर संस्थानास होणारा इंग्रजांचा उपद्रव हैदरने मोडून + ७) नवीन जिंकलेला प्रदेश हैदर व पेशवे यांनी निम्मा-निम्मा वाटून घ्यावा. + ८) इंग्रजांशी तह करायचा झाल्यास परस्पर न करता उभयतांनी मिळून एकविचारे +<<< + +करावा. + ९) सरदार रास्ते हे एक हजार स्वारांनिशी हैदरच्या कुमकेस राहतील. + शेवटी दि. ९ ऑगस्ट १७८० रोजी हा तह कायम करण्यात आला. त्यामुळे आता +ब्रिटिशांच्या विरोधात श्रीमंत पेशवे, नागपूरकर भोसले, हैद्राबादकर निजाम आणि म्हैसुरचा +हैदरअली ही चौकड़ी एकत्र आली. पेशव्यांनी पश्चिम, भोसल्यांनी उत्तर, निजामाने पूर्व तर +हैदराने दक्षिण दिशेला कामगिरी करावी, असे ठरले. मधल्या काळात नाना अन् +महादजींमध्ये बेबनाव झाला होता. महादजींचे हरिपंततात्यांशी फारसे पटत नव्हते. परंतु +नानांनी त्यांना समजावून, कलेने घेऊन हा घेतला. + काल्पिवरून आणलेली फौज घेऊन कॅ. गॉडार्ड हा सुरतेत उतरला होता. त्याने येथून +जवळच असलेल्या गायकवाड यांच्याशी संधान बांधले. गॉडार्डने +पेशव्यांच्या डभईवर हल्ला चढवला. पण हल्ला येतोय हे पाहताच डभईच्या ठाणेदाराने शस्त्र +टेकवले. डभई पडली हे पाहताच फत्तेसिंह गायकवाड घाबरले. त्यांनी गॉडार्डशी एकदम +तहच करून टाकला. यातहात फत्तेसिंगांनी त्यांची तीन हजार फौज इंग्रजांच्या दिमतीस +द्यावी. शिवाय भडोच व सिनोर हे परगणेही इंग्रजांस द्यावेत. बदल्यात इंग्रजांनी महीच��या +उत्तरेकडचा सर्व प्रदेश द्यावा असे ठरले. दि. ८ मार्च १७८० रोजी गॉडार्ड + येऊन धडकला. हे पाहून महादजींनी तळेगाव-वडगावच्या लढाईत पकडलेले दोन +गोरे, फार्मर अन् स्टुअर्ट यांना सोडून दिलं. इंग्रज या गैरसमजात आले की, नानांच्या +जुलमाला कंटाळून महादजी आपल्याशीही स्नेहाने वागतायत. परंतु, महादजी मात्र प्रसंगी +फत्तेसिंगाला व ते जमले नाही म्हणून गोविंदराव आपल्याकडे वळवण्यात मग्न +होते. गोविंदराव पेशव्यांना सामील झाला आणि इंग्रजांचे डोळे उघडले. + दि. ३ एप्रिल १७८० या दिवशी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकरांचा मुक्काम +कामरोळ या ठिकाणी असतानाच गॉडार्डने अचानक हल्ला चढवला. मराठे मागे हटले, +कारण उघड मैदानात इंग्रजांच्या तोफखान्यासमोर मराठ्यांचा पाड लागणे अशक्य होते. +इंग्रजांना शक्यतोवर डोंगराळ भागात खेचावे या हेतूने शिंदे-होळकर माळव्याच्या दिशेने पळू +लागले. शेवटी दोन महिन्यांनंतर पाऊस सुरू झाल्याने कॅ. गॉडार्ड सुरतेला पुन्हा परतला. +इकडे दि. ११ १७८० रोजी कॅ. हार्टले याने कल्याणवर हल्ला चढवून ते ताब्यात घेतले. दि. +२६ ऑगस्ट रोजी गणेशपंत बेहेरे यांची इंग्रजांशी झाली. यात इंग्रजांनी +पारनेरा, युगनेरा आणि इंद्रगड हे किल्ले जिंकून घेतले. १७८० च्या पावसाळ्यात इंग्रजांनी +गोहदच्या जाटांना शिंद्यांविरुद्ध ग्वाल्हेरचा किल्ला हस्तगत केला. ग्वाल्हेर पडला. +(१७८०). हे पाहताच महादजींनी उज्जैनीत आपली छावणी टाकली. + इकडे नाना हिंदुस्थानातील, अगदी नेपाळच्या राजापासून +श्रीरंगपट्टणमपर्यंतच्या चेतसिंह जाट, हैदर, भोसले, पोर्तुगीज, फ्रेंच, डच इ. सर्वांना +इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार केले. इ. स. १७८० च्या पावसाळ्यातच हैदरअली १०० तोफा +अन् सत्तर हजार सैन्यासह थेट अर्काटच्या चालून गेला. अर्काटला वेढा पडला. +यानंतर हैदर थेट मद्रासच्या दरवाजातच जाऊन पोहोचला. इकडे हैदरअलीचा पुत्र टिपू +<<< + +सुलतान याने मद्रासचा लष्करी मुख्याधिकारी हेक्टर मन्रो याच्या दि. १० सप्टेंबर १७८० रोजी +प्रचंड हल्ला चढवला. यात जवळजवळ चार हजार इंग्रज मारले गेले. + नाना मुत्सद्दीपणाचीच ही कमाल होती. इंग्रज लोक आतून कसे आहेत +नानांनी पक्के ओळखले होते. दि. ७ फेब्रुवारी १७८० रोजीच्या एका पत्रात नाना म्हणतात- + "इंग्रजांस सांप्रतकाळी गर्व फार जाहला. पाच वर्षे त्यांचे चालीस पक्केपणे माहितगारी +आली. कौल, कटार, इमान त्यांचे गाविच नाही. प्रथम लिहिणे व बोलणे परम गोड. दुसऱ्यास +असे बाटावे की, काय इमान व वचन आहे, ते सर्व यांपाशीच. खरेपणाची रास यैसी भूलथाप +पाडावी. परिणामी (शेवटी) उमजते. त्यांची नजर केवळ वाकडी. सर्व मुलुख कब्ज केला. +एकास मिळवून घ्यावे, एकास हलके करावे, करावी, नाद राखावा यैसे आहे. +ज्याचे ईमान सुटले आणि वचनाची कायमता नाही ती दौलत एका दिवसात हा नेम. +ईश्वरे असे जाणूनच राव पंतप्रधान, निजाम, हैदर व भोसले इतक्यांची एकी होऊन त्यांस +ताण बसवावे यैसे ठरविले ... " + नानांच्या सखारामपंत पानसे आणि बाजीपंत जोशी या सहकाऱ्यांनी बोरघाट उतरून +मुंबईची नाकेबंदी केली होती. धुळपांचे आरमार मुंबईच्या किनाऱ्याजवळ फिरत होतेच. +नानांचा इंग्रजांवर थेट हल्ला चढवण्याचा बेत होता. परंतु तेवढ्यात मुंबईकर इंग्रजांनी +पारसिकचा किल्ला जिंकून घेऊन ते पनवेलच्या रोखाने निघाले. बेलापूर गावाजवळ +असतानाच पानसे-जोशींच्या मराठी फौजेने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि या हल्ल्यात +पाचशे असामी ठार केला. पानसे-जोशी बेलापूरवर गेलेले पाहताच पारसिकवरच्या गोऱ्यांनी +थेट कल्याणवर हल्ला चढवला अन् ते काबीज केले. इंग्रजांनी कल्याण लुटून ती लूट तडक +मुंबईला पाठवली. कल्याणमधे घरे जाळण्याचा उद्योग इंग्रजांनी सुरू केला. ही गोष्ट जोशी- +पानशांना कळताच ते तडक कल्याणकडे दौडत आले. दि. २५ रोजी मराठी फौजा +कल्याणवर हल्ला करणार तोच गुजरातेतून आलेल्या कर्नल हार्ट्लेच्या सैन्याने मराठ्यांवर +मागून हल्ला चढवला. त्यामुळे कल्याण पुन्हा घेण्याचा विचार सोडून मराठी फौजा +खोपोलीस येऊन राहिल्या. + ठाणे आणि कल्याण घेतल्यानंतर आता इंग्रजांची नजर वळली ती वसईवर. दि. १६ +ऑक्टोबर रोजी कॅ. गॉडार्ड सुरतेहून मुंबईकरांच्या मदतीसाठी निघाला. दि. २८ नोव्हेंबर +१७८० रोजी गॉडार्डने वसईला मोर्चे लावले. इंग्रजी तोफा वसईवर आग ओकू लागल्या. +यावेळी वसईवर मराठ्यांचे किल्लेदार होते- विसाजीपंत लेले. इंग्रजांच्या या हल्ल्याला +विसाजीपंतांनी दोन आठवड्यांपर्यंत चांगलाच प्रतिकार केला. परंतु, दि. १० डिसेंबर +रोजी इंग्रजांच्या प्रचंड मोठ्या तोफांचा मारा सुरू झाल्यावर मात्र विसाजीपंतांना काहीच +करता येईना. वास्तविक पानशांच्या तोफखान्यावरचा अनुभवी पोर्तुगीज गोलंदाज मस्यू +नोरोन्हा हा वसईच्या कुमकेकरता निघाला होता. परंतु तो वसईस पोहोचण्याच्या आतच, दि. +१२ डिसेंबर १७८० रोजी विसाजीपंतांनी हत्यार ठेवले. वज्रेश्वरीपर्यंत पोहोचलेल्या मराठी +फौजा पुन्हा चौक-खोपोलीकडे येऊन थांबल्या. + दि. ११ ऑक्टोबर रोजी मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या +<<< + +बदलापूरानजीक कुळगाव येथे असताना आनंदराव रास्त्यांच्या फौजांनी त्याच्यावर हल्ला +चढवला. यात विशेष नुकसान झाले नाही. तरीही बदलापूराजवळच्या हल्ल्याची +धास्त खाऊन तो टिटवाळा मुक्कामी गेला. रामचंद्र गणेश कानडे हे वसईच्या कुमकेकरता +जात असतानाच टिटवाळ्याच्या जवळच त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला +रामचंद्रपंतांनीही असे प्रत्युत्तर दिले की, पाचावर धारण बसली. अशावेळी +दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी वज्रेश्वरी नजिक आकाशात खूप मळभ असताना रामचंद्रपंत + हार्टलेला पकडण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, ऐनवेळी चक्क उन पडले आणि +हार्टलेला रामचंद्रपंत दिसले. इंग्रजांनी त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या आणि रामचंद्रपंत +ठार झाले. इकडे वज्रेश्वरीला पंत पडले अन् तिकडे त्याच सुमारास वसईदेखील पडली !!! + दि. १८ डिसेंबर १७८० रोजी वसईच्या पाठोपाठ अर्नाळाही इंग्रजांनी कब्ज केला. + चौकडीच्या तहानुसार भोसल्यांनी पूर्व हिंदुस्थानातून बंगालच्या प्रदेशातून इंग्रजांना +हुसकून लावावे असे ठरले होते. कारण बंगाल हा अत्यंत सुपीक प्रांत होता अन् इंग्रजांची +पैशाची खाण होती ही. वॉरेन हेस्टिंग्जने खंडोजींना स्वस्थ बसण्याच्या बदल्यात एकसाली +फौजेचा खर्च म्हणून पन्नास लाख रु. दिले. शिवाय भोसल्यांनी हेस्टिंग्जशी तह केला. +ज्यानुसार पेशव्यांची काहीही आज्ञा आली तरी भोसल्यांनी इंग्रजांशी दावा मांडू नये. + इकडे हार्ट्लेचे उपद्व्याप समजताच पुण्याहून हरिपंततात्या फडके व रघुनाथराव +पटवर्धन मोठ्या फौजेनिशी बोरघाट उतरून कोकणात आले. हरिपंततात्या मुक्काम +कर्जतजवळ दहिवली येथे पडला. बाजीपंत जोशी हे गारद्यांच्या तोफखान्यासह बदलापूर +जवळ तळ ठोकून होते. वसई जिंकल्यानंतर वज्रेश्वरीवर आलेला गॉडार्ड आता पुण्याच्या +दिशेने जाऊ लागला. हरिपंततात्याही बाजीपंतांच्या कुमकेस बदलापुरात आल���. गॉडार्ड +बोरघाटाकडे जात असतानाच हरिपंततात्या-बाजीपंतांनी त्याला अडवले. बदलापुरात दोन्ही +सैन्यात चकमकी झाल्या. परंतु बदलापूरचा प्रदेश हा मोकळ्या मैदानावर असल्याने तात्या- +पंतांनी माघार घेत गॉडार्डला खोपोलीपर्यंत येऊ दिले. जानेवारीच्या अखेरीस +खानदेशातून तुकोजी होळकर आणि कोल्हापूरहून परशुरामभाऊ पटवर्धन पुण्यात आलेच +होते. नानांनी ताबडतोब दोघांनाही घाटाखाली हरिपंततात्यांच्या कुमकेस पाठवले. इकडे +फेब्रुवारीच्या मध्यावर कॅ. गॉडार्ड बोरघाट चढून वर खंडाळ्यास पोहोचला. इकडे गॉडार्डची +चाल ओळखून तात्या आणि होळकर आधीच घाट चढून कार्ल्याच्या पायथ्याशी थांबले होते. +बाजीपंत जोशी अन् परशुरामभाऊ पटवर्धन मुंबईहून येणारी रसद अडवण्याकरता +घाटाखालीच थांबले होते. नानांनी संभाव्य धोका टाळण्याकरता सवाई माधवराव पेशव्यांना +पुरंदरगडावर पाठवले. परशुरामपंतांनी बोरघाटाकडे येणारी रसद पनवेलजवळ मारली. यात +इंग्रजांचा पाचशे माणूस पडला. शिवाय डेरे, तंबू, राहुट्या, दारू इ. सामान, पाच हजार बैल व + जप्त केली. तळेगावावर होळकरांची फौज असल्याने व मुंबईहून ज्यादा रसद पावत +नसल्याने गॉडार्ड भयंकर चिंतेत पडला. पुण्यावर चालून जाण्याचा विचार सोडून देऊन तो +पुन्हा कोकणाकडे जायला वळला. दि. १८ एप्रिल रोजी गॉडार्ड घाट उतरून खालापूरात +उतरला. त्याच्यापाठोपाठ फडके-होळकरही घाट उतरून आले. त्यांची अन् गॉडार्डची प्रथम +<<< + +खालापूरजवळ चकमक उडाली. यात इंग्रजांचे तीनशे लोक ठार झाले. यानंतर गॉडार्ड +पनवेलकडे जात असतानाच हरिपंततात्या, पटवर्धन आणि होळकर अशा तिघांनीही +गॉडार्डला चौकजवळ कोंडले. दि. २३ एप्रिल रोजी चौकजवळच्या चकमकीतही गॉडार्डचे +हजार-बाराशे लोक मारले गेले. शेवटी कसाबसा गॉडार्ड मुंबईस परतला आणि +त्याच्यापाठोपाठ बाजीपंतांच्या फौजा थेट सुरतपर्यंत मारत सुटल्या. अशाप्रकारे +पुण्यावर हल्ला चढवून राज्य घेण्याचा इंग्रजांचा डाव पुरता फसला. + दि. २ रोजी परशुरामभाऊ पटवर्धन घाटमाथ्यावर आले. नाना श्रीमंत +सवाई माधवरावसाहेब पेशवे यांच्या वतीने सर्व सरदारांचा उत्तम प्रकारे शिरपेच, +पालख्या, वस्त्र इ. देऊन बहुमान केला. या साडेतीन वर्षांच्या काळात मराठी फौजांचे +नुकसान झाले होतेच. परंतु, या काळात इंग्रजांना मात्र फौजेच्या खर्चापोटी तब्बल १, २०, +३८, ३८५ रु. इतका खर्च अंगावर आला. अन् मराठ्यांना हरवण्याचे मूळ उद्दिष्ट्य तर साध्य +करण्याचे दूरच राहिले !! + मुंबईकर इंग्रजांनी मराठ्यांकडून सपाटून मार खाल्ला होताच, परंतु दक्षिणेतही +हैदरअलीच्या सततच्या हल्ल्यांमुळे मद्रासकर इंग्रज अतिशय त्रासले होते. हिंदुस्थानातील +इंग्रजांविरुद्धच्या या युद्धाची वार्ता युरोपातही समजल्याने फ्रान्सच्या नौदलाची एक अधिकारी +सॅफ्रा हा मोठे आरमार घेऊन हिंदुस्थानच्या दिशेने येत होता. एकाच वेळेस इतक्या शत्रूंशी +लढताना इंग्रजही जेरीस आले होते. जून १७८१ मध्ये मद्रासवर लॉर्ड मेकॉर्टने याची बदली +झाली. तसेच मॅक्फर्सन हा नवा अधिकारी दाखल झाला. या दोन्ही +अधिकाऱ्यांनी युद्ध त्वरित थांबवण्याचा ब्रिटिश पार्लमेंटचा हुकूम हेस्टिंगला सांगितला. +वास्तविक गॉडार्ड अन् हेस्टिंग्ज या दोन्ही महत्त्वाकांक्षी अधिकाऱ्यांना हे आवडले नाही. +परंतु, पार्लमेंटचा हुकूम असल्याने नाईलाज होता. + वॉरेन हेस्टिंग्जने आपला वकील म्हणून डेव्हिड अँडरसन याला महादजी शिंद्यांकडे तह +करण्यासाठी पाठवून दिले. नानांना मात्र तह करण्याची अजिबात इच्छा नव्हती. इंग्रजांचे हे +बांडगुळ हिंदुस्थानातून समूळ उखडून अशी त्यांची इच्छा होती. परंतु, महादजी शिंदे +नानांशी सहमत नसल्याने, पुन्हा मराठमंडयळातच फूट नको असा विचार करून नानांनी +महादजीपुढे नमते घेतले. दि. २३ डिसेंबर १७८१ रोजी अँडरसन इंदौरजवळ महादजींना +जाऊन भेटला. नानांनी पूर्वी तह झाला असल्याने हैदरअलीचीही समजूत काढली अन् शेवटी +पाच महिने वाटाघाटी केल्यानंतर दि. १७ १७८२ रोजी 'सालबाई' या ठिकाणी तह +करण्यात आला. या तहाची पुढीलप्रमाणे- + १) यापूर्वीच्या तहानंतर जो प्रदेश, किल्ले, ठाणे इंग्रजांनी घेतली असतील किंवा +रघुनाथरावांनी दिली असतील ते सर्व वसई, अर्नाळ्यासह दोन महिन्यांच्या आत इंग्रजांनी +पेशव्यांच्या किंवा नाना सांगतील त्याच्या ताब्यात द्यावीत. + २) साष्टी (कसबे ठाणे व कोट), भड़ोच व जवळची तीन लहान बेटे इंग्रजांकडेच +राहावीत. +<<< + + ३) फत्तेसिंह व सयाजी जो प्रदेश इंग्रजांना दिला तो प्रदेश पुन्हा त्यांच्या +हवाली करावा. + ४) रघुनाथराव दादांनी तह पूर्ण झाल्यावर चार महिन्यांच्या आत आपले राह��्याचे +ठिकाण निश्चित करावे. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत अथवा आश्रय +देऊ नये. पेशवे सरकारनेही त्यांना कोणताही अपाय करू नये व दरमहा पंचवीस हजार रु. +खर्चास द्यावेत. + ५) फत्तेसिंह पूर्वी असलेला मुलुख राहील. त्या उपर पूर्वी +ठरलेली खंडणी भरून पेशव्यांची चाकरी करावी. + ६) पेशवे-हैदर तहानंतर (९ ऑ. १७८०) हैदरने जो मुलुख इंग्रज अथवा महंमदअलीचा +घेतला असेल तो त्याने परत करावा. इंग्रज याउपर हैदरशी संग्राम चालवणार नाहीत. + ७) इंग्रजांच्या दोस्तांस पेशव्यांनी उपद्रव देऊ नये व पेशव्यांच्या दोस्तांस इंग्रजांनी त्रास +देऊ नये. + ८) पेशव्यांनी व इंग्रजांनी आपापल्या हद्दीत उभयतांच्या जहाजास संचार करू द्यावा व +व्यापारास अडथळा आणू नये. + ९) दुसऱ्या टोपीकरांस (फ्रेंचांना, डचांना) पेशव्यांनी आश्रय देऊ नये. कोणी कोणाच्या +शत्रूंस मदत करू नये. + १०) इंग्रज कंपनी व पेशवे पंडित दोघांचाही माधवराव (महादराव?) शिंदे यांजवर मोठा +इतबार असल्याने उभयपक्षी तह पाळण्यास ते जामीन राहत आहेत. जो कोणी तह मोडेल +त्याच्या विरोधात शिंदे दुसऱ्यास मिळतील व पारिपत्य करतील. + हैदरअलीला या तहात आपल्यावर अन्याय झाला आहे, असे मनोमन वाटत होते. अन् +म्हणूनच त्याच्या समाधानाकरता नानांनी करारावर सह्या केल्या नाहीत. पुढे ७ डिसेंबर +१७८२ रोजी हैदर मरण पावल्यानंतर नानांनी २० डिसेंबर रोजी करार मान्य केला. + मराठे-इंग्रजांमध्ये झालेला तह अर्थात रघुनाथरावांनाही अमान्य होता. त्यांनी शेवटचा +प्रयत्न म्हणून दि. १८ जानेवारी १७८३ रोजी गव्हर्नर कौन्सिलला एक पत्र लिहिले. +आपल्याला दहा हजार फौज काही रसद व दारूगोळा पुरवावा. हे झाले तर इंग्रजांच्या शत्रूंना +मी नामोहरम करीन अशा आशयाचे ते पत्र होते. परंतु या पत्राचा इंग्रजांवर काही परिणाम +झाला नाही अन् दादाला पुन्हा हातावर हात ठेवून निपचित बसावे लागले. + सालबाईचा तह पुरा होताच इंग्रजांनी रघुनाथरावांना सुरत सोडून जाण्यास सांगितले. +नानांनी रघुनाथरावांचा ताबा घेण्याकरिता परशुरामभाऊ पटवर्धन आणि तुकोजी होळकर या +दोघांना रवाना केलं. चांदवडजवळच तीन कोसांवर दि. १६ जुलै १७८३ रोजी या उभयतांची +दादांशी गाठ पडली. रघुनाथरावाने प्रथम त्र्यंबकेश्वराजवळ गंगापुरास असणाऱ्या +गोपिकाबाई���ची, म्हणजेच आपल्या थोरल्या वहिनीची भेट घ्यावी व नंतर कोपरगावच्याच +वाड्यात रहावे असे ठरवले. कारण घेतल्याशिवाय भेटीसच काय, परंतु +आनंदवल्ली परिसरातही येऊ नये, असा गोपिकाबाईंचा आदेश होता. इ. स. १७८३ च्या +<<< + +ऑगस्ट महिन्यात रघुनाथराव कोपरगावाजवळ कचेश्वर या ठिकाणी पोहोचले. जवळच +त्यांचा होता. शेवटी आयुष्याच्या पूर्वार्धात केलेल्या कष्टाची फळे स्वतःच्या कर्माने +गमावणारा, पण अखेरीस गादीच्या हव्यासापोटी दौलतीस रुतू पाहणारा हा औटघटकेचा +पेशवा रघुनाथराव उर्फ राघोबादादा दि. ११ डिसेंबर १७८३ रोजी परलोकीच्या मोहिमेवर +मार्गस्थ झाला. दादासाहेबांचा मृत्यू झाला. + + पारस क + बदलापुर + + समुद्र + चाल मराठी मार्ग + अडवले + पहिले इंग्रज मराठा (अँग्लो मराठा) युद्ध, भाग ३ + मराठी फौजा आणि इंग्रजी फौजा यांच्या हालचाली + + रघुनाथरावांच्या मृत्युसमयी आनंदीबाई गरोदर होत्या. पुढे दि. ३० मार्च १७८४ रोजी +त्यांना मुलगा झाला. या मुलाचे नाव ठेवण्यात आले 'चिमणाजी'. (दुसरे चिमाजीआप्पा) + राघोबादादा पेशव्यांचा मृत्यूच्या आसपासच पेशव्यांच्या घरातील अनेक, जुन्या पिढीतील +लोकांचा मृत्यू झाला. सदाशिवरावभाऊंच्या तोतया प्रकरणानंतरही भाऊ जिवंतच आहेत +अन् कधी ना कधीतरी ते परत येतील असा (वेडा) विश्वास उराशी बाळगून असणाऱ्या +पार्वतीबाई दि. १६ ऑगस्ट १७८३ रोजी शनिवारवाड्यात मृत्यू पावल्या. त्यांच्या पाठोपाठ +थोरल्या बाजीरावांची विधवा सून, जनार्दनपंतांची पत्नी सगुणाबाईंचाही मृत्यू झाला. +<<< + +रघुनाथरावांच्या मृत्यूनंतर लगेचच थोरल्या बाजीरावांची लाडकी बहीण, सरदार व्यंकटराव +घोरपड्यांची पत्नी अनुबाई घोरपडे यांचाही मृत्यू झाला. एकूणच १७८३ हे साल पेशवे +घराण्याला अतिशय घटनांचे म्हणून गणले जाते. + स्वराज्यावरील आता सर्व संकटे दूर झालेली होती. जेव्हा इंग्रज वकील अँडरसन तहाची +बोलणी करावयास आला तेव्हाच नानांनी हे ओळखले होते. सवाई माधवरावसाहेबांचेही वय +आता आठ वर्षे झाले होते. मुंज होऊन तीन वर्षे उलटली होती. नानांनी मोठ्या कौतुकाने +केशवजी नाईक थत्ते यांच्या मुलीला सवाई माधवरावांसाठी मागणी घातली. हळद लागली +आणि दि. १० फेब्रुवारी १७८३ रोजी मुलगी पेशव्यांच्या शनिवारवाड्यात प्रवेशती +झाली. लग्नात हैद्राबादकर निजाम, म्हैसूरकर हैदरपुत्र टिपू सुलतान इ. लोकांनाही निमंत्रण +गेले होते. निजामाने पेशव्यांशी असलेले आपले पिढीजात वैर तात्पुरते विसरून आपल्या +मुलाला (निजामाचा मुलगा- पोलादजंग) म्हटलं, "राव पंण्डत प्रधान इनकी शादी है। तुम +साथ में फौज लेकर सरंजाम समेत पुणे (में) शादिकू जाना।" टिपू सुलतानही स्वतः पुण्यात +येण्यास निघाला. इकडे खुद्द सातारकर शाहूमहाराज (दुसरे) सरदार पटवर्धन, सरखेल +धुळप, आंग्रे, शिंदे, होळकर, फडके, भोसले इ. सर्व सरदार सरंजामासह आले. + कित्येक वर्षांनंतर पुण्यात, अन् पेशवे कुटुंबात असा मंगल प्रसंग येत होता. त्यामुळेच +सारं पुणं खुशीने बेहोष झालं होतं. सवाई माधवरावांचे सीमांतपूजनही मोठ्या धुमधडाक्यात +साजरे करण्यात आले. अंगात भरजरी अंगरखा, मस्तकी कलगी आणि शिरपेच-पिंपळपान +असणारी घेरेदार कानांत चौकडे, मोत्यांची भिकबाळी, हातात रत्नाच्या पोहच्या असा +थाट करून 'विनायक' या आपल्या आवडत्या सालंकृत हत्तीवरून माधवरावांनी मंडपात +प्रवेश केला. ही मिरवणूक मंडपाकडे जात असतानाच वाटेत लोक गच्चीवर उभे राहून, +घराच्या सज्ज्यातून श्रीमंतांवर सोन्या-रुप्याची फुले उधळीत होते. सिमांतपूजनापाठोपाठ +इतरही विधी करण्यात आले. एकंदर हा सर्व लग्नसमारंभ सुमारे दीड महिना चालला होता. +कृष्णाजी विनायक सोहोनी लिहिलेल्या पेशवे बखरीत म्हटलं आहे, " ... दीड महिनापर्यंत +कारभार दुसरा झाला नाही ... ". या सर्व सोहळ्यानंतर शाहू छत्रपतींना मोठ्या सन्मानाने +साताऱ्यास पोहोचवण्यात आले. + श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर पेशवे घराण्याच्या मागे लागलेले हे शुक्लकाष्ठ +तब्बल दहा वर्षांनंतर संपले होते. नानांनी राज्यकारभारासोबतच सवाई माधवरावांच्या नित्य +नैमित्तिक आचार आणि शिक्षणाकडेही लक्ष पुरवणे सुरू केले. वयाच्या सहाव्या वर्षीच + श्रीमंतांना मोडी उत्तमप्रकारे वाचता अन् लिहिताही येत असे. श्रीमंतांच्या शिक्षणासाठी +नानांनी महादाजी बल्लाळ गुरुजी यांना नेमून दिले होते. + सर्व अरिष्टे टळल्यानंतर इ. स. १७८४ च्या हिवाळ्यात नाना फडणवीस आणि +हरिपंततात्या फडके यांच्यासह श्रीमंत आपल्या आजीला भेटावयास गंगापूरला गेले. +यानंतरही १७८८ च्या मार्च महिन��यात हरिपंतांसोबत गंगापूरला जाणे झाले. १७८४ साली +(किंबहुना त्या आधीच) गोपिकाबाईंनी गंगापूरात बाळकृष्ण मंदिर उभारले होते. त्याच्या +खर्चासाठी दि. २५ नोव्हेंबर १७८४ रोजी सवाई माधवरावांनी सालीना एक लक्ष रुपयांची +<<< + +सनद करून दिली. + श्रीमंत थोरल्या बाजीरावसाहेब पेशव्यांनी मल्हारराव होळकरांना सरदार बनवलं. ते +त्यांच्या अंगातल्या निडर अन् लढाऊ वृत्तीमुळेच. परंतु, १७६६ सालच्या २० रोजी +मल्हारराव मृत्यू पावले त्यांचा पुत्र खंडेराव हा याआधीच मरण पावला असल्याने +मल्हाररावांनंतर इंदौरची गादी त्यांचा नातू व अहिल्याबाईंचा पुत्र मालराव यांच्या नावे सुरू +झाला. परंतु, मालरावही अल्पवयात गेल्याने माधवराव (थोरले) पेशवे यांनी सारी व्यवस्था +लावून दिली. त्यानुसार अहिल्याबाई होळकर यांनी फडावरचे काम पहावे तर तुकोजी +होळकरांनी बाहेरच्या माराव्यात असे ठरले. तुकोजी हा मल्हारराव होळकरांच्या +चुलत भावाचा मुलगा होता. + माधवरावसाहेबांच्या मध्यस्थीनंतर काही काळ सर्व सुरळीत चालू होते, परंतु थोड्याच +दिवसात तुकोजी आणि अहिल्याबाई यांच्यात वितुष्ट आले अन् १७७९ मध्ये तर ते अत्यंत +विकोपास गेले. अशातच नाना-महादजींनीही यात लक्ष घातल्याने चौरंगी सुरू झाली. +महादजी सुरुवातीपासूनच अहिल्याबाईंच्या पक्षात होते. त्यांचे म्हणणे होते की, तुकोजींचा +गादीशी काही संबंध नाही. कारण मल्हाररावांच्या वारसा हक्काने ही गादी अहिल्याबाईंच्याच +सल्ल्याने चालवली पाहिजे. तर नानांचे म्हणणे होते की, बाई फडावर योग्य आहेत, परंतु शत्रू +उठला असता प्रत्यक्ष युद्धासमयी तुकोजींसारखा शूरच त्या गादीवर असावयास हवा. परंतु, +पुन्हा होळकरांमुळेच दौलतीच्या दोन कारभाऱ्यांत वणवा पेटू लागल्याने नाना-महादजींनी या +प्रकरणातून आपले अंग काढून घेतले. + पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (१७७७-१७८२) इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गोहदकर +जाट राण्यांच्या हातात सुपूर्द केला होता. परंतु, नंतर गोहदकर जाट ग्वाल्हेर पुन्हा शिंद्यांकडे +द्यायला राजी नव्हता. शेवटी फेब्रुवारी १७८३ मध्ये महादजी शिंद्यांनी स्वतः जाऊन +ग्वाल्हेरला वेढा घातला. जवळच असणारे प्रसिद्ध 'पन्ना' शहरही मराठी फौजांनी काबीज +केले. गोहदकर जाटाची राणी आणि काही सावकार या किल्ल्यात होते. महादजींच्या प्रचंड +फौजेला घाबरून किल्लेदाराने हत्यार ठेवायची तयारी दर्शवली. परंतु, गोहदकर राणीला हे +समजताच ती खवळलीच. तिने आपल्याच किल्लेदाराला तोफेच्या तोंडी दिले. शेवटी पाच +महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर महादजींना त्यांची 'ग्वाल्हेरी' परत मिळाली (दि. २१ जुलै +१७८३). यानंतर महादजींनी गोहदच्या किल्ल्यालाही वेढा घातला आणि दि. २६ फेब्रुवारीला +१७८४ रोजी गोहदचाही पाडाव झाला. आधीच इंग्रजांविरुद्धचा प्रचंड विजय अन् आता +ग्वाल्हेर-गोहदची यशस्वी मोहीम यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वावर पुन्हा +एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. दिल्लीकर मोगलांनाही आता पुन्हा एकदा मराठ्यांचे +'भीती' वाटू लागली होती. + मराठ्यांचे वर्चस्व पाहून इंग्रजांच्या घशात पुन्हा एकदा जळजळ उठली. आता +कोणत्याही प्रकारे हिंदुस्थान कब्जा करायचा तर दिल्लीचा पातशहा 'आपला' असला +पाहिजे याची पूर्ण खात्री वॉरेन हेस्टिंग्जला पटली. अन् म्हणूनच भविष्याचा विचार करून +त्याने दिल्लीचा शहाजादा 'जबानबक्श' याला आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू +<<< + +केले. बादशहाला ही बातमी समजली तेव्हा त्याची झोपच उडाली. बापाचा खून करून गादी +बळकवण्याची थोर परंपराच जणू मोगलाईत होती. अशावेळेस आपल्याही मागे कोणीतरी +मातब्बर असावा, जो इंग्रजांस शह देऊ शकेल असे बादशहाला वाटू लागले. असा मातब्बर +कोण होता? होता ना ... मराठ्यांचा सेनापती, महादजी शिंदे !! बादशहाने ताबडतोब निरोप +पाठवून महादजींची भेट मागितली. मोगलांचा शक्य तितका वापर दौलतीकरता करता यावा +या हेतूने महादजीही आग्र्याकडे मार्गस्थ झाले. दि. २४ ऑक्टोबर १७८४ रोजी +सिक्रीनजीकच बादशहाचा विश्वासू अफरासिआबखान आणि महादजींच्या भेटी झाल्या. हे +पाहून अफरासिआबचा कट्टर शत्रु अन् शाहजादा जबानबक्शचा हस्तक महंमदबेग हमदानी +याने १ नोव्हेंबरलाच अफरासिआबचा दग्याने खून पाडला. महादजींना समजताच त्यांनी +हमदानीवर सैन्य पाठवून त्याला कुंभेरीपार पाठवून दिले. शेवटी दि. १३ नोव्हेंबर १७८४ +रोजी भरतपूरजवळच महादजी शिंदे आणि बादशहाची भेट झाली. महादजींनी बादशहाला +स्पष्टच सांगितले की, 'आपणास संपूर्ण अधिकार असल्याशिवाय आपल्याकडून बादशाहीचा +बंदोबस्त होणे नाही.' आणि म्हणूनच महादजींनी श्रीमंत पेशव्यांच्या नावाने बा��शहाजवळ +'वकील-इ-मुतालिक' ही सनद मागितली. बादशहाने म्हटले, पेशवे दूर पुण्यात राहतात. +आपण त्यांस ओळखत नाही तेव्हा 'वकील-इ-मुतालिक' म्हणून महादजींच्याच नावे सनदा +देण्यात येतील. आता खरंच बादशहाने असे म्हटले की, महादजींनीच बादशहाला सनदा +'आपल्याच' नावे करण्यास सांगितले हे समजत नाही. परंतु, बादशहाने मात्र मूळ सनदा +महादजी शिंद्यांच्या नावे व त्यांचा नायब म्हणून श्रीमंत पेशव्यांचा उल्लेख केला. आता +महादजींनीच जाणूनबुजून पेशव्यांचा नायब म्हणून उल्लेख केला अन् अपमानास्पद वागवले +अशी शंका पुण्यात नानांना येणे साहजिकच होते. + नानांची समजूत काढण्याकरता दि. १३ जून १७८५ रोजी महादजी शिंघांनी नाना +फडणवीसांना एक पत्र पाठवले. त्यात ते म्हणतात- " ... आपली पत्रे आलियावरी वकील-इ- +मुतालकी, नायब मुनायब व मीरबक्षीगिरी या तीनदी फर्दां पुन्हा दफ्तरातून काढून पाहिल्या. +त्यात श्रीमंतांचे नावे वकील-इ-मुतालकी व मीरबक्षीगिरी ऐसे दोन फर्दां दस्तकसुद्धा आहेत. +नायब मुनायबी आमचे नावे आहे. हलके पद श्रीमंतांचे नावे घेणे आमचेकडून होणार नाही. +पूर्वी आपणाकडे पत्रे पाठविली, त्यात लिहिण्यात उलटे पडले. फारसी फार्दां लिहिणाऱ्यास +फारसी वाचता येत नाही (?). श्रेष्ठ व हलके पद कोणते हे न जाणोन हस्तदोष पडला. आता +बजिन्नस नकलाच पाठविल्या आहेत त्यावरून कळेल. सरंजामाची रवानगी केली ते माघारा +फिरविल्यास लौकिकात वाईट. याकरिता तूर्त उज्जैनीत राहील. तीनही पदे सरकारात(च) +आहेत. आपले लिहिल्याप्रमाणे आम्ही सरकारी चाकरी करावयाची ते केली. आमचे येथील +काम नामंजूर असेच आपले चित्तांत आहे हे अपूर्व आहे. श्रीमंतांचे प्रतापे करून आम्ही +पातशहास आणून स्थापना केली, हा गौरव श्रीमंतांचा. यापेक्षा वकील-इ-मुतालिक पद +आपले नावे करून घ्यावे हे विशेष नाही, असे जाबसाल सदाशिव दिनकरापाशी केले. परंतु +त्यांचे बोलण्यातील अर्थामुळे आपले चित्तांत संशय आला. याकरिता सरंजाम उज्जैनीत +ठेवून आपणास लिहिले. जसे उत्तर येईल तसे करू. खिलत न घेतल्यामुळे येथे अनेक तऱ्हा +<<< + +व तर्क चालू झाले आहेत ... " + इ. स. १७८७ च्या मध्यावर राजपुतान्यात राजपुतांनी जबर उठाव केला. लालसोटजवळ +ब्राह्मणी येथे बादशाही आणि महादजी शिंद्यांच्या संयुक्त फौजा राजपुतांना भिडल्या. इथे +महादजींना प्रचंड विजय मिळाला. परंतु, अशातच भयानक पर्जन्यकाळ आणि चमेली +नदीला आलेल्या पुरामुळे महादजींना राजपुतान्यातून बाहेर पडणे अशक्य झाले. हे पाहून +पहाडसिंग राजपुतासह हमदानीचा पुतण्या इस्माइल बेगच्या फौजांनी महादजींना चौफेर + घेरले. अशा वेळी महादजींकडे सैन्याचा पगार देण्याइतकाही पैसा उरला नव्हता. नानांनी +महादजींच्या मदतीकरता थोरल्या बाजीराव पेशवे आणि मस्तानीचा नातू, समशेरपुत्र + अलिबहाद्दर याला फौज देऊन उत्तरेत रवाना केलं. परंतु दक्षिणेकडे टिपू सुलतानची मोहीम +सुरू असल्याकारणानेच नाना पैसा मात्र पुरवू शकत नव्हते. + पूर्वीपासून होळकर हे उत्तरेतून चौथाई जमा करीत होते, तरीही ती चौथ सहजगत्या +दक्षिणेकडे वळत नव्हती असे दिसते. नानासाहेब पेशवे तर म्हणतच असत, 'भगिरथ समान +कैलासवासी यांनी उत्तरेहून दक्षिणपावेतो सुवर्णनदी प्रवाह चोवीस वर्षे वाहविला. श्री इच्छेने +यावर्षीही द्रव्यनदी उत्तमच या सैन्यात आहे, परंतु पुण्याकडे जाता रूक्ष देश फार आहे, +यांजमुळे सर्व जिरून जाईल ... " मल्हारराव गेल्यानंतरही सुवर्णनदीचा ओघ दक्षिणेकडे +वळला नाही. आताही महादजी शिंद्यांना पैशाची निकड असताना, केवळ पूर्वी महादजींनी + पाठिंबा दिला नाही या एकाच समजुतीने अहिल्याबाईंनी कोंडीत सापडलेल्या +शिंद्यांना एका पैशाचीही मदत केली नाही. महादजी शिंद्यांनी अहिल्याबाईंकडे एक कोट रु. +कर्जाऊ मागितले. परंतु, तेही त्यांना मिळाले नाहीत. अलिबहादूरच्या मागाहून तुकेजी +होळकर आले. त्यांनाही अहिल्याबाईंकडून कसलीही मदत झाली नाही. + महादजी संकटात आहेत हे पाहून इंग्रजांनाही स्वस्थ बसवेना. लॉर्ड कॉर्नवॉलीस आणि +फॉर्मर यांनी पुन्हा कुरापती काढण्यास सुरुवात केली. कॉर्नवॉलीसने जबानबख्ताशी संधान +बांधले होते. जबानबख्ताच्या उठाठेवींमुळे पातशहा घाबरून महादजींबाबत धरसोडीचे + धोरण पत्करत होता. महादजी चंबळेच्या अलीकडेच अडकून पडलेले होते. त्यांनी यमुना + मोकळी मिळतेय हे पाहताच मथुरा-वृंदावन काबीज केले आणि शीख राजांनी महादजीला +साहाय्य करत अंतर्वेदीत उतरून रोहिल्यांच्या भागात लूट सुरू केली. + अलिबहादूरदेखील मथुरेला येऊन महादजींना सामील झाले. दि. १९ डिसेंबर १७८८ रोजी +दिल्लीत घुसलेल्या गुलाम कादरला कैद करण्यात आले. अन् शेवटी पुन्हा दिल्लीच्या +बादशहाला राखणारे फक्त मराठेच आहेत हे हिंदुस्थानला कळून चुकले. + १७८७ च्या मध्यावर नजीबखान रोहिल्यांचा नातू आणि झाबेतखानाचा मुलगा गुलाम +कादर दिल्लीत आला. याला दिल्लीच्या बादशहाकडून अमीर-उल-उमरा, रोशन उद्दौला +बहादूर अशी पदवी होती. हे महाशय प्रचंड व्यसनाधीन असत. औरत आणि शराब हा यांचा + पूर्णवेळाचा कार्यक्रम. एकूणच दिल्लीदरबारात त्याचे कोणाशी पटण्याजोगे वर्तन नव्हते. +नजीबाचाच नातू तो, सरळ असला तरच नवल. बादशहाने चंबळेच्या काठावरच असलेल्या +महादजी शिंद्यांना मदतीसाठी बोलावले. महादजी दिल्लीच्या रोखाने जात असता आग्र्याच्या +<<< + +जवळ गुलाम कादर आणि महादजींमध्ये लढाई होऊन गुलाम दिल्लीत जाऊन बसला आणि + त्याने पुन्हा दिल्लीत हैदोस घालायला सुरुवात केली. त्याने प्रत्यक्ष बादशाह शाहआलमचे +डोळे काढून त्याला तुरुंगातच टाकले. लहान मुले आणि स्त्रियांचे प्रचंड हाल झाले. नोकर- + चाकर, दासी बटकींच्या हालाला तर परिसीमाच नव्हती. गुलामच्या आणि त्याच्या + रोहिल्यांच्या वासनेला राजघराण्यातील आणि इतरही सुंदर स्त्रिया बळी पडल्या. दिल्लीच्या + किल्ल्याला खणत्या लागल्या. श्रीमंत व्यापारी आणि सावकारांकडून अमाप पैसा + उकळण्यात घातले. आला. एकंदर दीड-दोन महिने गुलामने दिल्लीत पिसाळल्यासारखे थैमान + + महादजींच्या फौजेतील जीवबादादा बक्षी आणि रायाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली +मराठी फौजा दिल्लीच्या रोखाने निघाल्या आणि हे पाहून गुलाम कादरने दिल्लीची लूट घेऊन + अंतर्वेदीचा रस्ता धरला. शिंद्यांच्या विरुद्ध मदत करण्यासाठी गुलामने अहिल्याबाई + होळकरांनाही पत्रे लिहिली. पण अहिल्याबाईंनी त्याला कवडीचीही किंमत दिली नाही. + अंतर्वेदीत मेरठजवळ असतानाच गुलामला मराठी फौजांनी घेरले. घोसागडमध्ये गुलाम + कादरची आई होती. गुलामने तहाची बोलणी सुरू केली. महादजींनी गुलामला +पकडण्यासाठी आता जंग जंग पछाडले होते. त्याचे पारिपत्य करण्यासाठी जो जे मागेल ते +देऊ केले. गुलामने तहाचे बोलणे लावले असले तरीही महादजींनी त्याच्याशी तह न करता + त्याला जिवंत पकडण्याचे आदेश दिले. गुलाम कादर दि. १९ डिसेंबर १७८८ रोजी शामली + येथे मराठ्यांच्या हातात जिवंत सापडला. गुलाम कादरची आई पंजाबमध्ये पळून जाण्याच्या + बेतात होती. तिच्या मागावर रायाजी पाटलांना पाठवण्यात आले. घोसगडचा किल्ला मराठी + फौजांनी तोफा डागून जमीनदोस्त केला. २३ डिसेंबर १७८८ रोजी महादजी पुण्याला नाना + फडणवीसांना लिहितात, "गुलाम कादर याणे बादशहाशी बेकैद (होऊन) आणखी +हरामखोरी केली. त्याचा नतीजा त्यास तसाच देऊन जिवंत धरून पारपत्य करावे, याकरिता + फौजेने, पैक्याने व मेहनतीने जितके प्रयत्न होते तितके केले. त्याचे सार्थक श्रीमंतांचे प्रतापे +होऊन मार्गशीर्ष वद्य सप्तमीस गुलाम यास जिवंत धरला." + गुलाम कादरने बादशहा शाहआलमचे डोळे काढले होते. त्याच शाहआलमला + महादजींनी पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले आणि त्याच्या उपस्थितीतच गुलाम कादरचे + डोळे काढण्यात आले. गुलामचा साथीदार नझीर मंजूरअल्ली यालाही ठार मारण्यात आले. +या मोहिमेतील खर्च वजा करून महादजींनी बाकी लूट दिल्लीला पुन्हा रवाना केली. मराठी + फौजांच्या या मदतीमुळे आणि रोहिल्यांच्या उच्चाटनासारख्या पराक्रमामुळे बादशहाने लाल + किल्ल्यावर मराठ्यांच्या पवित्र भगवा ध्वज लावायची परवानगी दिली. पुढे पंधरा वर्षे हा + भगवा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दिमाखाने फडकत होता. + यानंतर दोन वर्षांच्या कालावधीतच तुकोजी होळकरांच्या अनेक कुरापती, त्यामुळे +महादजींचा पडलेला गैरमेळ याला कंटाळून मस्तानीचा नातू अलिबहाद्दर १७९० च्या +दसऱ्याच्या सुमारास बुंदेलखंडात कायमचा निघून गेला. त्याने अनुपगीर गोसाव्याच्या +मदतीने अल्पावधीत बुंदेलखंड काबीज केला आणि नानांच्याचमार्फत बांद्याचे नबाब म्हणून +<<< + +पेशव्यांची सनद मिळवली. एकप्रकारे बुंदेलखंडातही मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा पक्के झाले. + इ.स. १७९१ च्या अखेरीस महादजींनी पुन्हा महाराष्ट्रात येण्याचे ठरवले. गेली सात वर्षे +त्यांचे वास्तव्य उत्तरेतच, बहुतांशी मथुरा शहरातच असे. अतिशय पवित्र असणारे हे शहर +त्यांना अत्यंत प्रिय होते. शिवछत्रपती महाराजांपासून काशी, मथुरा, प्रयाग, वृंदावन ही +तीर्थक्षेत्रे स्वराज्यात असावीत, असे प्रत्येकाचेच स्वप्न होते. अन् तीच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी +पेशवे अहोरात्र झटत होते. नानांनी महादजींना पत्र लिहून कळवले की, 'मथुरा व वृंदावन ही +दोन्ही महास्थळे सरकारचे नावे करून घ्यावीत' यावर महादजींनी उत्तर दिले, 'मथुरा-वृंदावन +इ. तीर्थांच्या जागा अविंधांकडे होत्या. त्या घेऊन तीर्थांच्या ब्राह्मणांकडे दिल्या आहेत. +ब्राह्मणांस उत्पन्न पोचते पातशाहाजाद्याकडून स्थळांचा करार करून घेतला.' यावर नानांनी +आणखी एक पत्र पाठवले, 'श्री काशीत विश्वेश्वराचे मंदिर जुने हजार वर्षांचे मोडून मसिद +केली, त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन पूर्ववत देवालय व देवस्थापना व्हावी हे +हिंदुधर्मास उचित आहे ...! ' यानंतर पूर्वीच्या वकील-इ-मुतालिकीच्या सनदा आणि आताच्या +मथुरा-वृंदावनच्या सनदा घेऊन महादजी पुण्याकडे निघाले. दि. १३ जानेवारी १७९२ रोजी +महादजींनी प्रतापगडाहून (उज्जैनजवळील) कूच केले आणि उज्जैन, हुताशनी, बीड, नांदूर, +तुळजापूर, जांबगड या मार्गाने दि. ११ जून १७९२ रोजी पुण्याच्या संगमावर पोहोचले. +पुरत्या आठ वर्षांनंतर महादजी पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले !! + मधल्या काळात लॉर्ड कॉर्नवॉलीस या हेस्टिंग्जच्या जागी नेमलेल्या गव्हर्नर जनरलने सर + मॅलेट या अधिकाऱ्याला मार्च १७८६ मध्ये इंग्रजांचा प्रतिनिधी अथवा रेसिडेंट म्हणून +नेमले. कॉर्नवॉलीसने उत्तरेत महादजींचा फारच धसका घेतला असल्याने त्याने +मराठ्यांविरुद्ध न दक्षिणेत टिपू सुलतान विरुद्ध मोहीम सुरू केली. टिपूने दक्षिणेत +हिंदूंचाही भयंकर उच्छाद मांडला होता. म्हणूनच नानांनी कॉर्नवॉलीसला मदत करण्याचे +ठरवले आणि टिपूवर स्वारी केली. या संपूर्ण मोहिमेत मराठ्यांना चित्रदुर्ग, धारवाड, चैतगिरी +इ. ठाणी मिळाली असली तरी दक्षिणेकडे इंग्रजांचा पाया मजबूत होऊन पुढे पेशवाईला +धोका उत्पन्न होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली होती. + महादजी शिंदे संगमावर पोहोचल्यानंतर अकरा दिवसातच, दि. २२ जून १७९२ रोजी +पुण्याच्या गारपिरावर (ससून हॉस्पिटल) मोठा शामियाना उभारण्यात आला. त्यापूर्वी +दिल्लीच्या सनदा स्वीकारल्याबाबत सातारच्या छत्रपतींचे अनुज्ञापत्र घेतले. यानंतर २२ जून +रोजी गारपिराच्या शामियान्यात मोठा दरबार भरवण्यात आला. शिंदे आणि हरिपंततात्या +मोर्चेल वारीत असलेल्या ठिकाणी श्रीमंत सवाई माधवरावसाहेब पेशवे अदबीने बसले. नंतर + आणि शिंदेही बसले. यानंतर पेशव्यांच्या अनुमतीने फारसनवीसांनी शाही फर्माने +वाचली. त्यात बादशहाने श्रीमंतांना 'महाराजाधिराज राव पंडित प्रधान सवाई माधवराव +बहादूर' असा बहुमान बहाल केला. श्रीमंत पेशव्य���ंनी १०१ मोहरा बादशहास नजर केल्या. +यानंतर महादजींनी पेशव्यांना ५१ मोहरा नजर केल्या. तोफाबंदुकांचे बारही काढण्यात आले. +एकूणच फर्मानबाडीच्या या दरबाराचा मोठा महजर करण्यात आला. + दरम्यानच्या काळात पुण्यात घाशीराम कोतवालाचे प्रकरणही फार गाजले. पुण्याचा +<<< + +जुना जाणता कोतवाल नारायणराव केतकर १७७७ मध्ये वारल्यानंतर नाना +आपला खास नजरबाज घाशीराम सावळादास या सारस्वत ब्राह्मणास पुण्याची +कोतवाली दिली. चोऱ्यामाऱ्यांना आळा घालणे, वेश्याव्यवसाय बंद करणे, शहराची स्वच्छता +राखणे इ. अनेक गोष्टी घाशीराम कोतवालाच्या काळात अत्यंत उत्तमरित्या सुरू होत्या. परंतु, +काही वेळा मात्र पैशाच्या लोभाने लोकांना त्रास देण्याचेही प्रकार कोतवाल व त्याच्या +माणसांकडून होत असत. अशाच एके वर्षी घाशीरामाकडून एक अक्षम्य अपराध घडला. +श्रावणमासात निरनिराळ्या दानधर्मांप्रमाणेच ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची प्रथा थोरल्या +शिवछत्रपती महाराजांनी सुरू केली. नंतर मध्यंतरीच्या धामधुमीच्या काळात ही प्रथा बंद +पडली. परंतु शाहूमहाराज गादीवर आल्यानंतर श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या +काळापासून दक्षिणा वाटपाचे काम अव्याहत सुरू होते. अशीच श्रावणमासाची दक्षिणा +घेऊन पुन्हा आपल्या देशास जाण्यास निघालेले २५-३० तैलंगी ब्राह्मण रात्रीच्या +मुक्कामाकरिता घाशीरामाच्या बागेत उतरले. हा भाग घाशीरामाच्या अखत्यारीत असून +लष्कराच्या छावण्याही येथेच असत. बागेच्या पहाऱ्यावर असणाऱ्या घाशीरामाच्या लोकांनी +या ब्राह्मणांवर हत्यार उगारले आणि पैशाच्या लोभाने श्रावणमासाची मिळालेली रोख रक्कम +लुबाडून या सर्व तैलंगी ब्राह्मणांना त्याच बागेतील एका लहानशा खोलीत कोंडून ठेवले. +(भवानी पेठेतील भुयारात) ही खोली बहुदा साठवणीची असल्याने एका लहानशा + खोलीला दुसरे दारे अथवा खिडक्या नव्हत्या. दोन दिवस उलटून गेले अन् +खोलीत अन्न, पाणी आणि प्राणवायूच्या अभावामुळे त्या ब्राह्मणांपैकी केवळ दोन ब्राह्मण, +तेही असल्याने वाचले. तिसऱ्या दिवशी सकाळी मानाजी फाकडे हे +कोतवालाच्या बागेजवळून जात असताना या दोन ब्राह्मणांनी आरडाओरडा केला. मानाजींचे +लक्ष तिकडे जाताच त्याने या दोघांची सुटका केली आणि ही बाब तड़क जाऊन पेशव्यांच्याच +���ानावर घातली. ही गोष्ट घाशीरामलाही समजली. तो घाबरून नानांकडे गेला आणि नानांना +म्हणाला की, 'ते लोक भामटे होते, शहरातून चोऱ्या करून निघाले यास्तव कोठीत कोंडले.' +परंतु त्या दोघा ब्राह्मणांच्या जबानीवरून आणि श्रावणमासी दक्षिणेच्या सरकारी नोंदींवरून +ते भामटे नसल्याचे सिद्ध झाले. + श्रीमंत सवाई माधवरावांनी प्रथम घाशीरामास हजर होण्यास फर्मावले. परंतु तो येईना. +तेव्हा शेवटी त्याच्या घरावर ढालाईत हत्यारबंद पाठवून त्याला कैद करण्यात आले आणि +शनिवारवाड्यात पेशव्यांसमोर हजर करण्यात आले. घाशीरामाचा गुन्हा हा अक्षम्य होता. +त्याच्या हातून पातक घडलेले होते. सुनावणी झाल्यानंतर त्याच्या अंगावरचे सरकारी मरातब +अन् डोईवरचे कोतवाली पागोटे अथवा काढून घेण्यात आली. त्याच्या मुसक्या बांधून +वेताच्या छड्यांचे फटके मारण्यात आले आणि त्याच्या पायात बेड्या घालून त्याला +पानशांच्या तोफखान्यात बंद ठेवण्यात आले. घाशीरामाच्या या निंदनीय कृत्याचा निषेध +करण्यासाठी ब्राह्मण शनिवारवाड्यासमोर जमले होते. त्याला शिक्षा झाल्याशिवाय +अन्न ग्रहण न करण्याचा निर्णय पुण्यातल्या ब्रह्मवृंदाने जाहीर केला. दुसऱ्या दिवशी +घाशीरामाच्या पायातल्या बेड्या तोडून त्याचे तोंड फडक्याने बांधून त्याला कोतवाल +<<< + +चावडीवर आणण्यात आले. तेथे त्याच्या डोक्यावर शेंदूर फासून उंटावर उलटा बसवून +पुण्यातल्या आठही पेठांमध्ये फिरविला आणि गारपिराजवळ त्याला सोडून देण्यात आले. +यानंतर या मिरवणुकीत सहभागी झालेल्या ब्राह्मणांना नानांनी म्हटलं, ‘की याला तुमच्या +हवाली केला आहे. तुम्हांस पाहिजे राखा अथवा मारा'. यानंतर संध्याकाळी दोन घटिका +सूर्यास्तापूर्वी पुण्यातल्या ब्रह्मवृंदांनी त्याला दगडांनी चेचून मारले. (३१ ऑगस्ट १७९१). + घाशीराम कोतवाल प्रकरणात नानांना मोठा त्रास सहन करावा लागला. कारण +घाशीरामाची नेमणूक नानांनी केली होती अन् शिवाय घाशीरामाच्या मुलीशी, ललिता गौरीशी +नानांचे अनैतिक संबंध होते अन् म्हणूनच नाना घाशीरामाला पाठीशी घालतात, अशी हूल +सर्वत्र उठली होती. अर्थात ही केवळ अफवा होती. नानांच्या हितशत्रूंनी त्यांच्या विरोधात +केलेली ही एक चाल होती !! यानंतर पूर्वीच्याच आनंदराव काशी याला कोतवाली देण्यात +आली. + दि. ३१ जानेवार�� १७९३ रोजी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब रमाबाई या दीर्घ +आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले +नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी +विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या +प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी +रोषणाई करण्यात आली. रात्रीचा एक प्रहरभर दारूकाम सुरू होते. दारूचा हनुमंत करण्यात +आला होता. ती दारू पेटवल्यावर आकाशात उड्डाण करणारा हनुमंत पाहून लोक फारच +अचंबित झाले. चैत्र शु. १ शके १७१५ म्हणजेच दि. १३ मार्च १७९३ रोजी हुताशनीचा +मानाचा दरबार शनिवारवाड्यातील आरसे महालात (गणपती रंगमहालात?) भरवण्यात +आला. यानंतर तिसऱ्या प्रहरी श्रीमंत माधवरावसाहेब हत्तीवर अंबारीत बसून वानवडीस +शिंद्यांच्या मुक्कामाकडे रवाना झाले. रास्ते, पानसे, पुरंदरे अशा सर्व सरदारांच्या +वाड्याच्या गच्च्यांवर पाण्याचे बंब ठेवण्यात आले होते. श्रीमंतांचा हत्ती जवळून जाताच त्या +बंबातून पर्जन्यवृष्टीसारखा पाण्याचा वर्षाव होत होता. श्रीमंतांच्या अंबारीत गुलालाची अनेक +ताटे ठेवण्यात आली होती. रस्त्याने जाताना स्वतः श्रीमंत हाताच्या मुठी भरभरून गुलालाची +उधळण करीत होते. सर्व पेठांतून फिरत फिरत श्रीमंतांची स्वारी वानवडीच्या मुक्कामी +पोहोचली. तेथे पोहोचल्या पोहोचल्यानंतरही महादजींसोबत सर्वजण रंग खेळले. रंगाचे खेळ +आटोपल्यानंतर श्रीमंतांसह सर्वांनी गरम पाण्याने स्नान केले. स्नान झाल्यावर नाचगाण्याचा +कार्यक्रम सुरू झाला. पोवाडे, नृत्य, लावण्या, वग, शाहिरी, गोविंदाची सोंगे इ. सहा +घटकांपर्यंत खेळ सुरूच होते. यानंतर रात्रीच्या शेवटच्या प्रहरी श्रीमंत शनिवारवाड्यावर +परतले. या समारंभात घडलेली, दौलतीच्या दृष्टीने अत्यंत शुभकारक अशी गोष्ट म्हणजे नाना +फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यामधले सर्व गैरसमज दूर झाले. नाना-महादजी +कायमचे एकत्र आले. + नाना-महादजींची ही दिलजमाई झाली खरी, परंतु त्याचा आनंद दीर्घकाळ टिकू शकला +नाही. कारण पुढच्या एक-दोन महिन्यांतच महादजींस ज्वर येऊ लागला. पुढचे आठ महिने +<<< + +महादजी आजारीच होते. परंतु, याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर पडलेला अजिबात +दिसत नाही. फेब्रुवारी १७९४ च्या पहिल्या आठवड्यात मात्र महादजींची तब्येत जास्तच + लागली. खुद्द पेशवे आणि नाना फडणवीस महादजींना भेटून आले. हरिपंततात्या तर +एक दिवसाआड जाऊन येत असत. शेवटी दि. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी तापाच्या आणि +कफाच्या अति प्रभावाने रात्रीच्या पहिल्या प्रहरी महादजी शिंद्यांनी देह ठेवला. मृत्यूसमयी +महादजींचे वय ६७ वर्षांचे होते. + अखेरपर्यंत महादजी हे 'वय झालेले' आहेत असे वाटतही नव्हते. महादजींचा परिवारही +मोठा होता. त्यांना अन्नपूर्णा, भवानी, भवानी (दुसरी), पार्वती, गंगाबाई, राधाबाई, भगिरथी, +यमुना आणि लक्ष्मीबाई अशा नऊ बायका होत्या. परंतु, महादजींच्या मृत्यूसमयी शेवटच्या +तीन बायकाच जिवंत होत्या. परंतु महादजींना पुत्र नव्हता. म्हणून महादजींच्या धाकट्या +बंधूंचा, आनंदरावाचा नातू दौलतराव याला पेशव्यांनी दत्तकविधान करवून शिंद्यांच्या गादीवर +बसवले. + महादजी शिंद्यांच्या पाठोपाठ चार महिन्यात पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होऊन +पेशव्यांचे दुसरे सेनापती हरिपंततात्या फडके हेदेखील मृत्यू पावले. (२० जून १७९४). +हरिपंततात्यांना चिंतामण, रामचंद्र, लक्ष्मण आणि माधवराव असे एकूण चार पुत्र होते. +नानांनी हरिपंततात्यांच्या मृत्यूनंतर सारी जबाबदारी रामचंद्रावर सोपवली. मृत्यूसमयी +हरिपंततात्यांचे वय पासष्टीच्या आसपास होते. अतिशय शांत, सुस्वभावी अन् कर्तव्यतत्पर +असणाऱ्या हरिपंततात्यांच्या मृत्यूमुळे दौलतीला दुसरा जबर धक्का बसला होता. + थोरल्या माधवराव साहेबांनी राक्षसभुवन येथे निजामाच्या फौजेचा जबर पराभव +केल्यानंतर निजाम मुकाट्याने चौथाई वेळोवेळी पावती करत होता. परंतु, माधवराव +साहेबांच्या मृत्यूनंतर पेशवाईत उसळलेला अंतस्थ कलह अन् नंतरच्या इंग्रजांबरोबरच्या +युद्धाचा फायदा घेत निजामाने चौथाई देणेच बंद करून टाकले. आतापर्यंत चौथाईच्या +रकमेची थकबाकी तीन कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. अशातच दिल्ली +दरबारकडून पेशव्यांना वकील-इ-मुत्लक ही सनद मिळाल्याने निजामाचा भयंकर +जळफळाट झाला आणि त्यात भरीस भर म्हणून निजामाचा दिवाण मुशिरून्मुल्क गुलाम +सय्यदखान इराणी याने निजामास त्याचे म्हणणे होते की, चौथाईची तीन कोटी रु. +रक्कम �� तीस लक्ष उत्पन्नाचा बीड प्रांत फुकाफुकी पेशव्याला देण्याऐवजी त्याच रकमेतून +आपण आपले सैन्य अजून प्रबळ बनवू आणि पेशव्यांचा कायमचा काटा काढू. याच +सुमारास महादजी शिंदे आणि हरिपंततात्या हे पेशव्यांचे दोन्ही मातबर सेनापती +पाठोपाठ मृत्यू पावल्याने निजामालाही दिवाणाचा हा बेत मनोमन पटला. पेशव्यांचे वकील +गोविंदराव काळे हे पूर्वीपासून हैदराबादच्या दरबारात डोळे अन् कान ठेवून वावरत होते. +गोविंदराव काळ्यांच्यामार्फत निजामाची अगदी पुण्यात नाना +समजत होती. + टिपू सुलतान हा मराठ्यांचा जसा कट्टर शत्रु होता, तसाच तो निजामाचाही शत्रू होता. +किंबहुना, टिपू सुलतान हा पेशव्यांपेक्षाही निजामाला जास्त कट्टर प्रतिस्पर्धी मानीत असे. +<<< + +निजाम मात्र सुरुवातीस टिपू मुसलमान असल्याने आपल्या बाजूने आहे अशाच गैरसमजात +होता. इ. स. १७९४ च्या उन्हाळ्यात निजामाच्या एका मुलाच्या लग्नास टिपूला बोलावणे +असतानाही टिपूने या आमंत्रणाचा स्वीकारही केला नाही. लगेच काही दिवसात टिपूच्या +मुलाचे लग्न झाले. या लग्नात टिपूने निजामाला आमंत्रण तर दिले नाहीच, उलटपक्षी +पुण्याला पेशव्यांकडे खास दूत पाठवून 'घरचे कार्य आहे, ते सिद्धीस न्यायला समक्ष हजर +रहावे' असे लिहिले. + ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर याने मात्र या सगळ्या प्रकरणात +तटस्थ राहण्याचे ठरवले होते. अर्थात दोन सत्ताधीशांमध्ये भांडण होऊन तटस्थ राहण्यातच +फायदा आहे हे शोअर ओळखून होता. निजामाच्या दिवाणाने, गुलाम सय्यदाने सर जॉन +शोअरपाशी मदतीची खूप याचना केली, परंतु शोअरने काही केल्या त्याचे ऐकले नाही. परंतु, +शोअरच्या सांगण्यावरून निजामाने दि. १ जुलै १७९४ रोजी मीर आलम या आपल्या +वकीलाला पुण्यास पाठवले. परंतु, नाना अखेरपर्यंत पूर्ण थकबाकीची मागणी +केल्याने बोलणी फिस्कटली. + नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला निजामाच्या फौजा बिदरहून पुढे कूच करत असल्याच्या +बातम्या आल्या. पेशव्यांशी रघुनाथरावांच्या पुत्रांनी, अमृतराव-बाजीरावांनी मागे पुन्हा बंड +करू नये याकरता त्यांना आनंदवल्लीहून गोविंदपंत गोडबोले यांच्या नजरकैदेत, शिवनेरीवर +ठेवले. पुण्याच्या बंदोबस्ताकरता रामचंद्रपंत कानड्यांचा पुत्र माधवराव याला नेमले. + निजाम अहमदनगरच्या रोखाने पु���्यात येऊ पाहात होता. पेशव्यांच्या फौजांनीही त्याच +रोखाने पुणे सोडले अन् पूर्वेस घोडनदीवरून श्री गोंद्याच्या मार्गाने कूच सुरू झाले. सीना +नदीच्या काठावर मिरजगाव येथे पेशव्यांची छावणी पडली. जवळच्याच घोडेगाव, रत्नापूर, +धानोरे या गावांमध्येही पेशव्यांच्या फौजा विखुरल्या गेल्या. निजामाचे सैन्यही खर्डा गावाच्या +पश्चिमेला दोन कोसांवर खर नदीच्या काठावर येऊन उतरले. दोन्ही बाजूचे नजरबाज +परस्परांच्या फौजांमधल्या टिपत होते. + एकदा तर गंमतच झाली. मराठ्यांच्या सैन्यातील सेनापती रामचंद्रबाबा मोगली +फौजेची व्यवस्था बघण्यास गेले असता निजामाच्या फौजेतील एका तुकडीने त्यांच्यावर +अचानक हल्ला चढवला. त्यामुळे फडक्यांना पळून जावे लागले. हे पाहताच मुशिरून्मुल्क +गुलाम सय्यद दिवाणाला समजताच त्याने मराठ्यांचे वकील गोविंदपंत काळे यांना बोलावून +घेतले. गोविंदपंत येताच निजामासमक्ष त्यांना स्त्रियांच्या वेशातल्या पुरुषांचे तमाशे दाखवले. +या तमाशात नाना फडणवीस, परशुरामभाऊ पटवर्धन, दौलतराव शिंदे अशा नावाची सोंगे +करून दिवाण कुत्सितपणे मस्करी करत होता. गोविंदपंतांनी ही सारी हकीकत नाना + कळवली. निजाम इकडे पेशव्यांच्या कारभाऱ्यांची खिल्ली उडवून टिंगल +करीत असतानाच तिकडे नाना रत्नापूरला 'दळबादल' नावाचा प्रचंड डेरा +उभा करून दरबार भरवला. निजामाच्या या कुत्सितपणाची सर्व हकीकत नानांनी मानकरी + आणि सरदारांसमोर वाचून दाखवली. या गोष्टीमुळे निजामाचा सूड घेण्याची ईर्ष्या सर्वांच्याच +मनात उत्पन्न झाली. नानांनी मोहिमेची सर्व जबाबदारी परशुरामभाऊ पटवर्धन यांच्यावर +<<< + +सोपवली. परशुरामभाऊ पटवर्धन आणि रामचंद्रपंत फडके यांच्या हाताखाली लखोबानाना +आणि जिवबा बक्षी हे शिंद्यांतर्फे, भोसल्यांतर्फे विठ्ठलपंत सुभेदार, होळकरांच्या वतीने +बापूराव होळकर अशी असामी सिद्ध झाली. या साऱ्या फौजा घोडेगावात मोर्चे बांधून सिद्ध +झाल्या होत्या. + फाल्गुन वद्य ५, दि. ११ मार्च १७९५ रोजी निजामाच्या फौजा कूच करून घोडेगावच्या +दिशेने येऊ लागल्या. पेशव्यांच्या फौजाही तयारीतच होत्या. परशुरामभाऊंच्या डाव्या बगलेस +शिंदे, उजव्या बगलेस होळकर, मागे विठ्ठलपंत अशी सैन्याची रचना होती. परशुरामभाऊ +आघाडीला तोफा उभ्या करण्यासाठी जागा पाहत असतानाच निजामाच्या फौजांनी हल्ला +चढवला. या हल्ल्यात परशुरामभाऊंचा पुतण्या पटवर्धन ठार झाला. हे पाहताच + फौज मागे येऊन थांबली. या चकमकीत भाऊंच्याही उजव्या डोळ्याच्या +वरच्या बाजूस तलवारीचा वार बसला अन् जखम झाली. विठ्ठलपंतांची फौज मागे हटलेली +पाहून निजामाच्या फौजेने डाव्या बाजूस (निजामाच्या फौजेच्या उजव्या बाजूस) असणाऱ्या +दौलतराव शिंद्यांवर हल्ला चढवला. हे पाहताच होळकर अन् हुजरातीच्या खाशा फौजेनेही +निजामाला घेरले आणि मारा सुरू केला. पुरत्या कोंडीत सापडलेल्या मोगली फौजेवर +शिंद्यांनी तोफांचा मारा करायला सुरुवात केली. निजामाच्या सैन्याला हा मारा सहन होईना. +शेवटी संध्याकाळी सूर्यास्तास सहा घटिका अवकाश असताना मराठ्यांचा मारा थांबला, परंतु +होळकरांचे दहा-बारा हजार पेंढारी निजामाच्या फौजेची लूट करण्यासाठी त्या फौजेत शिरले. +मराठ्यांचा पुन्हा जबर मारा होत आहे असे वाटून निजामाची फौज अवघ्या दोन कोसांवर +असणाऱ्या खर्ड्याच्या किल्ल्यात गेली. या झटापटीत निजामाकडचे लालखान, वजीरखान +पठाण, अश्गुलखान असे खासे सरदार ठार झाले. पंधराशे मोंगल असामी कापली गेली. +कित्येक तोफा अन् दारूगोळा मराठ्यांच्या हाती आला. + दुसऱ्या दिवशी दि. १२ मार्च १७९५ रोजी मराठी फौजांनी खड्याला वेढा घातला आणि +किल्ल्यावर तोफांचा जबरदस्त मारा सुरू केला. मराठ्यांच्या या भयंकर हल्ल्यामुळे मुळातच +भेदरलेल्या निजामाने पेशव्यांकडे तहाची बोलणी करण्यासाठी विनंती केली. वास्तविक +पाहता, निजामाच्या आतापर्यंतच्या सर्व कृत्यांना लक्षात घेता त्याला जिवंत ठेवू नये, असेच +सर्वांचे मत होते. परंतु नानांनी दूरदर्शीपणा दाखवून त्याला जीवदान देण्याचे ठरवले. मागे +जशी इंग्रजांविरुद्ध एकी घडवून आणण्यात निजामाने सहकार्य केले होते, तशीच वेळ पुन्हा +आली तर असा विचार यामागे होता. शेवटी निजामाचा दिवाण गुलाम सय्यद याला ताब्यात +देण्याची अट घालून नाना फडणवीसांनी तहाकरता मंजुरी दिली. एकूण तह ठरला तो असा- + १) मैनुद्दौला गुलाम सय्यद हा पेशव्यांच्या बंदोबस्तात राहील. + २) यापूर्वीचे चौथ व सरदेशमुखीचे तीन कोट रु. आणि या मसलतीची भरपाई म्हणून +दोन कोट असे एकूण पाच कोट रु. रक्कम तीन वर्षांत सरकारात भरणा करावी. + ३) तीस लक्षांचा मुलुख व दौलताबा��ेचा किल्ला सरकारात द्यावा. + ४) नागपूरकर भोसल्यांचे जे महाल व ऐवज घेतला असेल तो परत करावा. +<<< + + इंग्रजांच्या बातमीनुसार मराठ्यांकडे ८४ हजार घोडदळ, ३८ हजार पायदळ आणि १९२ +तोफा असे सैन्य होते, तर निजामाकडे ४५ हजार घोडदळ, ४४ हजार पायदळ आणि १०८ +तोफा होत्या. याशिवाय शिंद्यांच्या फौजेत पेरॉन आणि निजामाकडे रेमंड हे युरोपीय +गोलंदाज होते. + निजामाने गोडीगुलाबीने गोविंदराय काळ्यांमार्फत आणि इतरही सरदारांमार्फत नानांना +अगदीच गळ घातली तेव्हा इतर कायम ठेवून नानांनी 'तीन कोटी दक्ष लक्ष रु. रोख +आणि साडेचौतीस लक्षांचा मुलुख' देण्याच्या कराराला मान्यता दिली. दि. २७ मार्च रोजी +मुन्शिरूलमुल्क दिवाण गुलाम सय्यदला मोठ्या इतमामाने नाना ताब्यात +घेतले आणि पेशव्यांच्या विजयी फौजांनी पुण्याच्या रोखाने कूच केले. गर्जत गर्जत निघालेली +ही मराठी फौज दि. १ १७९५ रोजी पुण्यात येऊन पोहोचली. जवळपास तीस वर्षांच्या +प्रदीर्घ काळानंतर, राक्षसभुवननंतर पेशवे आणि निजाम यांच्यात झालेली ही +पेशव्यांनी जिंकली अन् निजामाला पुन्हा मान खाली घालावी लागली, हाच मोठा निर्णायक +विजय होता. + सवाई माधवरावांच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा पहिलावहिला (अन् शेवटचाही) विजय +होता. परंतु, हा विजय जवळपास बहुतांशी नाना हुशारीचा अन् कर्तबगारीचा +होता. नानांनी या बाबतीत मात्र जरा अधिकच अधिकार बजावला होता. वास्तविक थोरल्या +माधवरावसाहेबांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कारभाराची सूत्रे हातात घेतली असतानाही +त्यांच्याच रक्ताच्या सवाई माधवरावांना मात्र ही मोकळीक नव्हती. त्यांच्या लहानपणी +नानांनी त्यांचा सांभाळ करून व्यवस्था लावून दिली असली तरीही नंतर तरी त्यांना मुखत्यार +होऊ देणे गरजेचे होते. परंतु नंतरही नानांनी पेशव्यांभवती दिनकरपंत आणि +सखोपंत साने यांना नेमून दिले. परवानगीशिवाय दरबारस्वारी होऊ नये. ते +सांगतील ते ऐकावे' अशा परिस्थितीत सवाई माधवराव राहत होते. गोपिकाबाईंनाही हा +प्रकार आवडत नव्हता. इ. स. १७८८ मध्ये सवाई माधवराव त्यांच्या भेटीसाठी गंगापुरात गेले +असता बाईंनी हरिपंतांना सवाल केला, 'यांणी शहाणे कधी व्हावे?' सवाई माधवराव +प्राण्यांची शिकार उत्तम करीत होते. परंतु प्रत्यक्ष लढाईतील शिकारीचा अनुभव त्यांना मिळू +शकल�� नाही. +<<< + + अहमदनगर O खर्डा + मिरजगाव C + + फौजाचा + खर्डा येथील लढाई + + सवाई माधवराव लहान असताना ते नानांच्याच सल्ल्याने चालत असत. परंतु नंतर नंतर +मात्र नानांचा त्यांच्या आयुष्यातील हस्तक्षेप त्यांनाही नकोसा वाटू लागला होता. शिवनेरीवर +कैदेत असणाऱ्या रघुनाथरावांच्या पुत्रांविषयी, विशेषतः बाजीरावांविषयी सवाई माधवरावांना +आपुलकी वाटत होती. रघुनाथरावांच्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना का द्यावी, हा प्रश्न त्यांना नेहमी +सतावत होता. नाना मात्र हे अजिबात मान्य नव्हते. बाजीराव आणि सवाई +माधवरावांदरम्यानची गुप्त पत्रे नानांनी पकडली. शिवनेरीवर रघुनाथरावांच्या मुलांवर नजर +ठेवण्यास असणाऱ्या बळवंतराय नागनाथाला कोताई केली म्हणून नानांनी कैदेत टाकले +आणि सवाई माधवरावांनाही अधिक शब्द बोलले. + नानांच्या या वर्तनाने सवाई माधवराव खूपच खचून गेले होते. वास्तविक बाजीराव +आपला चुलता असल्याने गादीवर खरा हक्क त्याचा आहे हे सवाई माधवरावांचे म्हणणे +नानांना मान्य नव्हते. आपल्यामुळे उगाच निरपराध माणसांना कैद म्हणून सवाई +माधवरावही दुःखी होते. + गणेश चतुर्थीपासूनच सवाई माधवरावांचे आजारपण सुरू झाले. त्यांना अंगात ज्वर भरू +लागला होता. यानंतर दसऱ्याच्या समारंभात पडलेले कष्ट यामुळे तो तापाचा त्रास असह्य +होऊ लागला होता. + अश्विन शुद्ध त्रयोदशी, दि. २७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी श्रीमंतांना खूपच +ताप आला. हा ताप अंशतः मस्तकातही गेला होता. अशावेळी नानांच्या कैदेत असल्याची +अपराधीपणाची जाणीवही सलत होती. एके क्षणी वाताचा तीव्र झटका आला आणि माडीत +कठड्यापाशी आलेले सवाई माधवराव तोल जाऊन खालच्या हजारी कारंज्यावर +पडले. दीड भाला खोल असणाऱ्या या कारंज्याच्या हौदावर आपटून श्रीमंत तत्काळ गतप्राण +झाले. + दौलतीच्या पेशव्यांचा अत्यंत अल्पवयातच अतिशय हृदयद्रावक अंत झाला होता. +पेशव्यांच्या नशिबास उतरण लागावयास आता सुरुवात झाली होती. +<<< + + श्रीमंत नारायणराव, रघुनाथराव तसेच सवाई माधवराव या तीनही + पेशव्यांचे एकत्रित संदर्भ येथे दिले आहेत + (ही तीनही प्रकरणे परस्परांस पूरक व संबंधित असल्याने व सर्व + संदर्भग्रंथ तीनही प्रक��णात आल्याने एकत्र देत आहे) + संदर्भ : + १) रोजनिशीतील उतारे : गो. स. सरदेसाई, २) मराठी रियासत : गो. स. सरदेसाई (सवाई + माधवराव), ३) पेशवे व सातारकर राजे यांची टिपणे : काव्येतिहास संग्रह, ४) मेस्तक + शकावली : काव्येतिहास संग्रह, ५) पुरंदरे दफ्तर भाग १ व ३ : कृ. वा. पुरंदरे, ६) साधन + परिचय महाराष्ट्राचा : द. वि. आपटे-रा. वि. ओतूरकर, ७) सातारा गादीचा इतिहास : विष्णु + गोपाळ भिडे, ८) सनदापत्रातील माहिती : द. ब. पारसनीस, ९) मराठ्यांच्या इतिहासाची + साधने (निवडक) : राजवाडे खंड, १०) पेशवेकालीन महाराष्ट्र : वा. कृ. भावे, ११) मराठी +दफ्तर रूमाल १ व २ : वि. ल. भावे, १२) ऐतिहासिक पोवाडे : १३) + पेशवे दफ्तरातील हिंदी कागद : भ. ग. कुंटे, १४) मराठे व इंग्रज : न. चिं. केळकर, १५) + नाना फडणवीस व मराठी राज्य प्रशासन : म. रा. कुलकर्णी, १६) चंद्रचूड दफ्तर : पोतदार- + आपटे, १७) शिंदेशाही इतिहासाची साधने : फाळके, १८) पेशवाईच्या सावलीत : ना. गो. + चापेकर, १९) विंचूरकर घराण्याचा इतिहास : ह. र. गाडगीळ, २०) काव्येतिहास संग्रह : पत्रे + यादी वगैरे, २१) पेशवे घराण्याचा इतिहास : प्रमोद ओक, २२) पुण्याचे पेशवे : अ. रा. + कुलकर्णी, २३) पेशवे बखर : कृष्णाजी विनायक सोहोनी, २४) होळकराची कैफियत : य. न. + केळकर, २५) नागपूरकर भोसले बखर : काशिराव गुप्ते, २६) HISTORY OF + MARATHAS : GREAT DUFF, ?0) HISTORY OF MARATHA PEOPLE : + किंकेड- पारसनीस, २८) ORIGIN & AUTHENTIC NARRATIVE OF THIS + MARATHA WAR : J. ALMON & J. DEBRETT (LONDON), ?8) SPEECHES IN + HOUSE OF COMMONS : PHILIP FRANCIS, ३०) सवाई माधवराव पेशव्यांची + रोजनिशी : वाड-भावजी, ३१) नाना फडणवीस यांची बखर, ३२) सवाई माधवरावांसाठीची + बखर, ३३) निजाम पेशवे संबंध : शेजवलकर, ३४) ईस्ट इंडिया कं. - पेशवे-फार्सी + पत्रव्यवहार : गं. ना. मुजुमदार, ३५) नारायणराव पेशव्यांची बखर, ३६) नारायणराव +पेशव्यांच्या निधनाची हकीकत ३७) खर्ड्याच्या स्वारीची बखर, ३८) नाना + आत्मवृत्त, ३९) हैदर व टिपू यांची कैफियत. +<<< + + दि. २७ ऑक्टोबर १७९५ रोजी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचं निधन झालं आणि + पेशवाईला उतरती कळा लागली. सवाई माधवरावांना पहिल्या पत्नीपासून एकही मुलगा + झाला नव्हता आणि दुसऱ्या पत्नीला, यशोदाबाईंना वाड्यात येऊन जेमतेम दोन वर्षे होत + नाहीत तोच पेशव्यांचा मृत्यू झाला. आता सवाई माधवरावांच्या विधवा पत्नीने एखाद्या + मुलाला दत्तक घ्यावे आणि त्याला गादीवर बसवावे असे ठरले. + सवाई माधवराव पेशव्यांच्या अखेरच्या क��ळात त्यांना नानांची नजरकैद नकोशी वाटू + लागली होती. मुळात वारसा हक्काप्रमाणे नसली तरी वयाच्या श्रेष्ठत्वाने पेशवाई ही + रघुनाथराव आणि नंतर त्यांचा पुत्र बाजीराव यांना मिळावयास हवी होती, असे सवाई + माधवरावांना फार वाटे. नानांच्या अपरोक्ष परशुरामभाऊ पटवर्धन आणि दौलतराव शिंद्यांच्या + मार्फत ते शिवनेरीवर पत्रव्यवहार करत होते. अन् म्हणूनच की काय परंतु पटवर्धन आणि + शिंद्यांचे मत रघुनाथरावांच्या पुत्रांपैकीच एकाला दत्तक घेण्याकडे झुकत चालले होते. + नानांना नेमकी हीच गोष्ट नको होती. कारण रघुनाथरावांच्या पुत्रांमध्येही त्यांचेच रक्त +वाहत होते. अन् रघुनाथरावांचा धाकटा पुत्र चिमाजीआप्पा तरी आता फक्त बारा वर्षांचा +होता. म्हणजेच लहान होता. परंतु, अमृतराव या दत्तकपुत्राचे पराक्रम नानांना चांगलेच + लक्षात होते. पूर्वी रघुनाथराव नारायणरावांच्या मृत्यूनंतर जेव्हा सुरतेला इंग्रजांकडे पळून गेले + होते तेव्हा अमृतरावही त्यांच्या सोबत होते. राघोबादादांनी अमृतरावांबरोबर दोन हजारांची + वेगळी फौज दिली होती. त्यामुळेच अमृतरावांना पेशवाई देणे शक्यच नव्हते. राहता राहिला + प्रश्न मधले चिरंजीव बाजीरावांचा! + बाजीरावांच्या वयाच्या आठव्या वर्षी रघुनाथरावांचा मृत्यू झाला. त्यामुळेच याआधीचे + सारे जीवन धावपळीचे व नंतरचा सारा काळ (आजपर्यंत) बंदिवासातच गेला होता. आधीच + कारभाऱ्यांच्या नजरकैदेत आणि त्यातून आनंदीबाईंच्या कडक शिस्तीत असल्याने + बाजीरावांचा स्वभाव विक्षिप्त अन् बनला होता. कैदेत असताना आनंदीबाई + 'दिनचर्या' अथवा रोजनिशी लिहित असे. + आपल्या मुलाचे, बाजीरावांचे सारे गुणदोष आनंदीबाईंनी स्वतः लिहिले आहेत. बाजीराव + दिवसभराचा संपूर्णवेळ फक्त खेळात अन् हुंदडण्यात घालवतो असं आनंदीबाई म्हणतात. + बाजीरावाचे शिक्षणात अजिबात लक्ष नव्हते. मुळात नानांनी अन् इतर कारभाऱ्यांनी त्याच्या + शिक्षणाची चोख व्यवस्थाच लावली नव्हती. बाजीरावांचा स्वभावही हेकेखोर अन् + बनला होता. ते दिवसभर गोदावरीच्या नदीच्या डोहात पोहत असत. बाजीरावांचे + लग्न झालेले होतेच. तरीही वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना गुप्तरोगाची लागण झाली होती. + आनंदीबाई तर अक्षरशः हतबल झाल्या होत्या. त्या म्हणत- + 'बाजीराव थोर जाले असता अद्या���ी मर्यादेची तऱ्हा नाही. काल चर्येस काय म्हणावे? + आम्ही पेचात अन् मुले अशी, तशात हा मुख्य! (निदान) याची तऱ्हा अशी नसावी. यास + कोणी जपत नाही. मूल शहाणे होऊ नये असे साऱ्यांस वाटते ... येथे बाजीरावाजवळ शहाणा + माणूस कोणी ठेविला नाही. मूल नासून (बिघडवून) टाकले ... ' बाजीरावांच्या अर्वाच्यगिरीला +<<< + +आवर घालण्यासाठी आनंदीबाईंना प्रसंगी त्यांना चपराका वा अक्षरशः लाथांचा मारही द्यावा +लागत असे. + असे हे बाजीराव लहानपणापासून नानांच्या नजरेसमोरच असल्याने त्यांना गादीवर +बसवणे म्हणजे अधःपातच करून घेणे हे नानांना कळत होतेच. पटवर्धन आणि शिंद्यांनाही +बाजीरावांचे हे सारे उपद्व्याप माहीत होते. म्हणूनच त्यांनी रघुनाथरावांचा कनिष्ठ पुत्र +चिमणाजी उर्फ चिमाजीआप्पा याला यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक म्हणून बसवावे असा +प्रस्ताव मांडला. या गोष्टीला नानांचा तर विरोध होताच, परंतु बाजीरावांचाही विरोध होता. +कारण मुळात याआधी रघुनाथराव पेशवे म्हणून गादीवर बसले होते. त्यामुळे दत्तक विधान +करण्याची अजिबात गरज नाही आणि दुसरे म्हणजे चिमणाजी हा बाजीरावांचा धाकटा +भाऊ होता. वारसा हक्काप्रमाणे रघुनाथरावांनंतर पेशव्यांच्या मसनदीवर बाजीरावांचाच +हक्क होता. + पेशवाई आपल्यालाच मिळावी म्हणून बाजीरावांनी सर्वप्रथम जाऊन परशुरामभाऊ +पटवर्धनांची भेट घेतली. भाऊंच्या पायावर डोके ठेवून पदर पसरून बाजीरावांनी म्हटलं, " ... +मागील (रघुनाथरावांचे आणि तुमच्यातले) द्वेष तुम्ही मनात आणू नये. मीही आणणार नाही. +वडिलांच्या जागी आपण मला मान्य आहात. धाकट्यास दौलतीवरी बसवावे अन् मी बंदित +रहावे हे आपल्या विचारास येते का?" असे म्हणून बाजीरावांच्या डोळ्यांत अश्रू आले. तेव्हा +परशुरामभाऊंनी त्यांचे केले व नाना सल्ला घेऊन ठरवतो असे म्हटले. +यानंतर बाजीराव मोत्यांची माळ अन् तुरा घेऊन दौलतराव शिंद्यांच्या भेटीकरता गेले. इकडे +बाजीराव दौलतराव शिंद्यांच्या छावणीत गेले आहेत असे पाहून परशुरामभाऊ पटवर्धन +शिवनेरीवर आले. त्यांनी चिमाजीअप्पाला पुण्याला नेऊन दि. २५ रोजी त्याचे +दत्तकविधान 'उरकून' घेतले आणि दि. २ जून १७९६ रोजी त्याला पेशव्यांच्या मसनदीवर +'बसवले'. + नाना आणि दौलतराव शिंद्यांना परशुरामभाऊंची ही घाई अन् विश्वासात न घेता केलेले +काम अजिबात आवडले नाही आणि नाईलाज असला तरीही या दोघांनी बाजीरावास +गादीवर बसवण्याचे ठरवले. दि. ५ डिसेंबर १७९६ रोजी बाजीरावांना पेशवेपद देण्यात आले. +नानांनी सातारकर शाहू महाराजांकडून वस्त्रेही आणली. बाजीराव आता अधिकृतरित्या +पेशवे झाले. चिमाजीअप्पा हे तसं पाहिलं तर वयाने अन् नात्यानेही यशोदाबाईंपेक्षा वडील +होते. ते यशोदाबाईंचे चुलत सासरे होते. त्यांचे दत्तकविधान करणे हे अतिशय चुकीचे असून +अशास्त्रीय आहे असे पुण्यातल्या धर्मसभेचे मत होते. बाजीरावांनीही गादीवर बसताच +पुण्यातल्या शास्त्री-पंडितांची सभा बोलवून हे दत्तकविधान अधिकृतरित्या गैर ठरवले आणि +तडक चिमाजी अप्पांना नजरकैदेत ठेवले. + गादीवर बसल्यानंतर थोड्याच दिवसात बाजीराव पेशवे नाना न जुमानता +स्वतः मुखत्यार होऊन कारभाराचे निर्णय नानांना न विचारता स्वतःच घेऊ लागले. बाजीराव +ऐकत नाही आणि हळूहळू तोही रघुनाथरावांच्याच वळणावर जात आहे असे नानांना वाटू +लागले. त्यामुळे नाना कडेकोट बंदोबस्तात प्रथम साताऱ्यास जाऊन छत्रपतींची भेट घेऊन +<<< + + इथे येऊन राहिले. महाडच्या मुक्कामात नानांनी अनेक कारस्थाने केली. प्रसंगी +बाजीरावांना काबूत ठेवण्यासाठी निजामाशीदेखील करार केला. या करारानुसारच नानांनी +खरड्याच्या लढाईत पकडलेला निजामाचा वकील मुशिरून्मुल्क गुलाम सय्यद याला कैदेतून +सोडून दिले. निजामाने तशी अटच घातली होती. यानंतर काही दिवसातच नाना पुन्हा पुण्यात +येऊन कारभारात लक्ष घालू लागले. + बाजीराव पेशवे हे बहुतांशी दौलतराव शिंद्यांकडेच झुकले होते. नाना मुख्य कारभारी +असल्यापासून शिंद्यांच्या फौजेचा पगार थकलेला होता. त्यामुळे तो पगार अन् पैसा +मिळेपर्यंत शिंदे नानांवर कायमच तगादा लावत असत. एकदा का शिंद्यांना त्यांचा खर्च +मिळाला की, ते उत्तरेत परत जातील आणि मग इथे आपण मात्र एकटे नानांच्या हातात +सापडू, अशी बाजीरावांना भीती वाटू लागली होती. त्यामुळे बाजीराव शिंद्यांना सहजासहजी +उत्तरेत जाऊ देत नव्हते. + अशातच दौलतराव शिंद्यांचा सासरा सर्जेराव घाटगे हा कारभारात लुडबूड करू लागला +होता. त्याची अत्यंत रूपवान कन्या बायजाबाई ही दौलतरावांची बायको होती. त्यामुळे +दौलतराव, बायकोच्या, म्हणजेच त्याच्या सासऱ्याच्या विचारांनी चालू लागले होते. अर्थातच +बाजी���ावही अप्रत्यक्षरीत्या सर्जेरावाच्याच तंत्रानुसार वागायला लागले होते. एका समकालीन +कागदात असं म्हटलंय की, "आजचा प्रसंग जो जबरदस्तीने राहील त्याचा आहे. कोणी +कोणास विचारावयाचे नाही. ईश्वराचे चित्ती आजउपरी ब्राह्मणाचा हुकूम चालू नये याप्रमाणे +आले आहेसे भासते. मग दैवदशा कळत नाही." शिंद्यांच्या फौजेकरता लागणारा पैसा नाना +मुद्दाम अडवून ठेवत आहेत असे काही बाही सांगून सर्जेराव दौलतरावांना होता +आणि इकडे बाजीराव पेशवेही 'आपल्या आई-वडिलांच्या आणि आपल्या या अवस्थेला +प्रथमपासून सर्वस्वी फक्त नानाच जबाबदार आहेत.' असा समज करून संधी मिळताच +नानांवर सूड उगवण्याच्या भावनेने वागत होते. शेवटी एके दिवशी दौलतराव शिंद्यांनी उत्तरेत +जाण्याच्या निमित्ताने त्याआधीच्या खास मेजवानीकरिता नाना आपल्या +छावणीत निमंत्रण दिले. नानांना आतली बातमी काहीच ठाऊक नव्हती. ते मेजवानीच्या +निमित्ताने शिंद्यांच्या छावणीत जाताक्षणीच शिंद्यांनी त्यांना दग्याने कैद केले. (शिंद्यांचा फ्रेंच +सेनापती मेजर फिलोज याने अटक केले) नाना पकडले गेले हे पाहताच इकडे दौलतराव +आणि सर्जेरावाच्या माणसांनी नानांचा गोट साफ लुटला. नानांच्या माणसांचे अतोनात हाल +करून त्यांच्याकडून रुपये उकळले गेले. नाना कैद झाले ही बातमी शनिवारवाड्यात +बाजीरावांना समजताच त्यांना हायसे वाटले. कारण नानांसारख्या मुत्सद्दयाला पकडणे +म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. दि. ३१ डिसेंबर या दिवशी नानांची रवानगी +अहमदनगरच्या किल्ल्यात करण्यात आली. परंतु, नाना पुण्यातून दूर +केल्यानंतर कोणाचाच कोणावर धाक अन् निर्बंध राहिला नाही. सगळीकडे अराजक माजले. +बेबंदशाही सुरू झाली. राज्यकारभाराचा अजिबातच अनुभव नसताना एकदम हातात +पेशवाई आल्याने बाजीरावांना आता अशा परिस्थितीत नेमके काय करावे हा मोठा प्रश्न +पडला. 'भीक नको, पण ... ' अशी अवस्था झाली होती. नाना कारभारात आले तर त्यांची +<<< + +ढवळाढवळ बाजीरावांना नको होती आणि परत पूर्वी सवाई माधवरावांना केले तसेच ते +आपल्यालाही फक्त त्यांच्याच इशाऱ्यावर चालणारं बाहुलं बनवतील अशी बाजीरावांना भीती +वाटत होती. परंतु आता उत्पन्न झालेले अराजक मिटवण्याची क्षमता फक्त नानांच्यातच होती. +अशातच इंग्रजही नाना नाहीत, हे पाहून आपल�� हात पाय पसरू लागले होते. आता मात्र +नानांना कैदेतून मुक्त केल्यावाचून काहीच पर्याय नव्हता. म्हणून अखेरीस दि. ८ जून १७९८ +या दिवशी बाजीरावांनी नानांची सन्मानपूर्वक सुटका केली. यानंतर बाजीरावांनी नानांना +त्यांचे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणे होते तसेच पुन्हा बहाल केले. अर्थात यानंतरही नाना आणि +बाजीराव बाह्यदर्शनी जरी एकमेकांशी सख्ख्याने वागत असले तरी दोघांच्याही मनातली +परस्परांबद्दलची काही दूर झालेली नव्हती. + कैदेतून सुटून आल्यानंतर नानांनी प्रथम पुण्यात माजलेले अराजक थंड केले. बंडखोरी +करून दंगे माजवणाऱ्यांना तुरुंगाची वाट दाखवण्यात आली. नाना बाहेरून पूर्वीसारखेच +वाटत असले तरी आतून मानसिकदृष्ट्या ते फार थकले होते. गेली जवळपास पंचवीस वर्षे ते +पेशवाईचा कारभार एकहाती करत होते. कै. श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर अन् +नारायणरावांच्या दुर्दैवी हत्येनंतर उतरती कळा लागलेल्या पेशवाईला सावरून प्रसंगी एक +पाऊल पुढे वा एक पाऊल मागे टाकून त्यांनी पेशवाईला एका अत्यंत उंचीवर नेऊन ठेवले +होते. हिंदुस्थानात पाय पसरू पाहणाऱ्या गोऱ्या टोपीकरांना नानांचा प्रचंड धाक वाटत होता. +इंग्रजांचा धोका पूर्वी जसा शिवाजी महाराजांनी ओळखला होता तसाच तो नानांनीही अचूक +ओळखला होता. रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात म्हटलं होतंच, "हे टोपीकर तो वरकड +साहुकार (व्यापारी) नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक देशात राज्यच करीत आहेत. त्यांचेच +हुकुमाने हे लोक येथे येतात. राज्य करणाऱ्यास स्थल लोभ नाही हे काय पाहते (शक्यच +नाही!)? त्यात ही (इंग्रज) हट्टी जात. हातास आले स्थल मेल्यानेही सोडावयाचे नाहीत. +त्यांची तो आले (अन्) गेले अशीच असो द्यावी.". नानाही अगदी या विचारा +बरहुकुमच चालणारे होते. नाना कैदेतून सुटल्यानंतर थोड्याच दिवसात, ईस्ट इंडिया +कंपनीचा वकील सर मॅलेट याने पुणे दरबारात येऊन पेशव्यांना विनंती (हुकूमच!) +केला की पूर्वी 'सवाई माधवरावांनी दिल्ली दरबारच्या सनदा जशा उभारून त्या +सनदा स्वीकारल्या होत्या तशीच आता इंग्लंडच्या राजाचीही शिफारसपत्रे स्वीकारावी. परंतु, +नानांनी मात्र बाजीरावांना स्पष्ट सांगितले, 'दिल्लीपती शिवाय सामोरे जाणे अथवा + करणे ही चाल नाही. मागे थोरले रावसाहेबांचे वेळेस (थोरले माधवराव पेशवे) +इंग्रजांच्या पातशाहीकडील पत्र आले होते ते टोपीकरांनी कचेरीस (फडावर) रावसाहेबांचे +हाती दिले.' तेव्हा बाजीरावांनीही नानांचे ऐकून मॅलेटला स्पष्ट नकार दिला. नानांनी मॅलेटला +स्पष्टपणे सांगितले, "श्रीमंत सामोरे येणार नाहीत. डेरा देऊन व्हायची नाही. +उभ्यानी पत्रे घ्यावयाची. इंग्रज पत्रे घेऊन वाड्यात येतील तेव्हा श्रीमंत इंग्रजांच्या भेटीकरिता +कचेरीस येतील. त्या संधीत (काळात) इंग्रजांची पत्रे (स्वतः येऊन) श्रीमंतांच्या हाती द्यावी. +श्रीमंतांनी पत्रे (वाचण्याकरिता) मुनशीच्या हवाली करावी!". नानांच्या अशा कड़क +शिस्तीमुळे अन् सावधपणामुळेच इंग्रजांनाही त्यांचा प्रचंड धाक वाटत होता. +<<< + + परंतु, आता मात्र नाना फारच थकले होते. त्यांची तब्येत खालावत चालली होती. श्रम +सोसवत नव्हते. नानांच्या अखेरच्या काळातील पत्रांत याचा उल्लेख आढळतो. ' ... वैद्य +(औषधपाणी) करतात. त्याजला यांची (नानांची) तनू कलत नाही. आजार सुटत नाही. दोन +दिवस कोन्हाचा नमस्कार नाही ... ज्वरांश जाला. दिवाणखान्यात भस्मेस्नान घेणे झाले. +नानांची प्रकृत ग्लानी जाली. पलंगावर निद्रारूप आहेत. अन्न खातात ... फार करून +निद्रा करीत आहेत. पंधरा दिवस झाले बेलबागात नमस्कारास जात नाहीत. भस्मस्नानावर +क्रम चालला आहे ... ' + अखेरीस दि. १३ मार्च १८०० या दिवशी पहाटे नाना फडणवीसांनी देह ठेवला. +शनिवारवाड्यात बाजीराव पेशव्यांनाही ही बातमी समजली आणि ते बुधवारपेठेतील +नानांच्या वाड्यावर गेले. अंत्ययात्रा निघण्याची वेळ झाली, त्याच सुमारास अरबांनी आपल्या +हिशोबाकरिता घातला. शेवटी पुण्याच्या प्रतिष्ठित 'दुर्लभशेठ' यांनी हवाला +घेतल्यानंतर अरबांनी वाट सोडली. नानांच्या अंत्यदर्शनाकरिता अख्खे पुणे लोटले होते. +नदीवर दहा हजार माणसे जमली होती. + गेली पंचवीस वर्षे डोळ्यात तेल घालून पेशवाई सांभाळणारा हा अखेरचा 'मुत्सद्दी' +काळाच्या पडद्याआड गेला. ब्रिटिशांचा पुण्यातील वकील पामर म्हणतो, 'नाना गेले आणि +त्यांच्या निधनाने मराठी राज्यातील सारा शहाणपणा आणि नेमस्तपणा लयाला गेला.' +खरंच ... नाना गेले अन् आता पुणे पोरके झाले होते !! + बाजीरावांना पेशवेपद मिळाल्यापासून नाना मृत्यूपर्यंत पेशवे घराण्यातही +अनेक सुख-दुःखाच्या घटना घडल्या होत्या. दि. ५ डिसेंबर १७९६ ��ा दिवशी बाजीरावांना +पेशवेपद मिळाले. परंतु, यानंतर एक महिन्यातच, दि. ६ जानेवारी १७९७ रोजी बाजीरावांच्या +द्वितीय पत्नी सरस्वतीबाई वारल्या. यानंतर दि. १६ फेब्रुवारी, माघ वद्य ६, शके १७१८ या +दिवशी सेनापती हरिपंततात्या फडक्यांची नात, दाजीपंत फडक्यांच्या मुलीशी, राधाबाईंशी +बाजीराव पेशव्यांचा विवाह झाला. या विवाहप्रसंगी फडक्यांनी आपली खास 'मोतीबाग' +पेशव्यांना भेट म्हणून दिली. नाना कैदेत टाकल्यानंतर बाजीरावांनी आपले +ज्येष्ठ दत्तक बंधू अमृतराव यांना आपले कारभारी म्हणून नेमले. या कामाकरिताच त्यांच्या +खासगत खर्चासाठी सहा महालही नेमून देण्यात आले. नानांच्या मृत्यूनंतर, दि. २३ एप्रिल +१८०० या दिवशी बाजीरावांनी अमृतरावांना आपले 'दिवाण' म्हणून नेमले. परंतु, +अमृतरावांना बाजीरावांचा एकहाती अन् विक्षिप्तपणाचा कारभार आवडत नसे. यामुळेच, +एके दिवशी २० जुलै रोजी अमृतराव कारभार सोडून पुण्यातून जुन्नरला निघून गेले. + बाजीरावांना दूर करून आपण पेशवाई हातात घ्यावी अन् राज्याची व्यवस्था लावावी, +असा विचार करून अमृतरावांनी विठोजी होळकरांना आणि यशवंतराव होळकरांना पुण्यास +बोलावले. या बदल्यात अमृतराव होळकरांना एक कोट रु. रोख देणार होते. या प्रकारात +विठोजी होळकरांनी पंढरपूरवर चाल केली. परंतु, बाजीराव वेळीच सावध झाले अन् त्यांच्या +गोखले, रास्ते, पुरंदरे, पानसे अशा सरदारांसमोर होळकरांचे काहीच चालू शकले नाही. +विठोजी होळकर पकडले गेले. बाजीरावांनी विठोजी होळकरांना तडक मृत्युदंडाचीच शिक्षा +<<< + +ठोठावली. दि. १६ एप्रिल सन १८०१ या दिवशी शनिवारवाड्यासमोरील चौकात विठोजींना +प्रथम दोनशे छड्या मारल्या आणि त्यानंतर हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केले. ही शिक्षा +बाजीरावांच्या डोळ्यादेखत अमलात आणण्यात आली. + विठोजींना ठार मारल्यानंतरही यशवंतरावांचा बाजीरावांवर राग होता, असे दिसत नाही. +कारण दि. १७ जून १८०१ रोजी ते बाजीरावांना म्हणतात, "विठ्ठलराव होळकर यांणी +स्वामींची आज्ञा न घेता श्री पंढरपूराकडे जाऊन क्षेत्रास उपसर्ग दिल्यामुळे (पेशव्यांची) +इतराजी होऊन प्रकार घडला तो समजला. तथापि, स्वामींचे हाते जे घडेल ते सेवक लोकांस +श्रेयस्करच आहे." असे असले तरी शिंदे-होळकर अंतर्गत कलह आणि दौलतराव कायम +बाजीरावांच्या बाजूने असल्याने यशवंतरावांनी मीरखान पठाण या आपल्या माणसाला +सैन्यासह पुणे प्रांतात धुमाकूळ घालण्यासाठी पाठवून दिले. मीरखान चार महिने पुण्याच्या +भवतालच्या परिसरात दंगे माजवत होता. अखेरीस अश्विन वद्य १४, दि. २५ ऑक्टोबर +१८०२ या ऐन दिवाळीच्या दिवशी खुद्द यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला केला. +यशवंतरावांनी बाजीरावांकडे अव्वाच्या सव्वा मागण्या केल्या व त्या पूर्ण होत नाहीत असे +पाहून युद्धाला उतरले. हडपसरच्या मैदानात होळकर आणि पेशवे या दोघांच्याही सैन्याची +गाठ पडली. परंतु, होळकरांच्या फौजेपुढे बाजीरावांचे काही चालले नाही. अखेरीस बाजीराव +प्रथम सिंहगडावर आणि तिथून थेट सुवर्णदुर्गावर गेले. बाजीराव पुण्यातून पळून +गेल्यानंतर यशवंतरावांनी अमृतरावांना जुन्नरहून पुण्यात बोलावले. दि. १२ नोव्हेंबर रोजी +अमृतरावांनी कारभार हाती घेतला, परंतु त्यांनी पेशवेपद मात्र नाकारले. त्यांनी आपला पुत्र +विनायक याला पेशवेपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, तेही जमणारे नव्हतेच. +अमृतरावांनी पूर्वी कबूल केलेले एक कोट रु. यशवंतरावांना अजूनही मिळालेले नव्हतेच. +आताही अमृतराव पेशवेपदाबाबत वेळ काढत असल्याचे पाहून यशवंतरावांनी पुण्यात +लुटालूट आणि जाळपोळ सुरू केली. मीरखान पठाणाने पुण्यात हैदोस मांडला. पुण्यातल्या +घरांना खणत्या लावण्यात आल्या. खुद्द शनिवारवाड्यातील चांदीच्या वस्तू, हत्तीवरच्या +चांदीच्या अंबाऱ्या आणि शस्त्रागार लुटण्यात आले. + इकडे बाजीरावांनी प्रथम दौलतराव शिंद्यांना दक्षिणेत येण्यासंबंधी कळवले. परंतु, +शिंद्यांच्या येण्याची वाट न पाहताच बाजीराव दि. ८ डिसेंबर रोजी वसई आणि त्यानंतर १० +डिसेंबर रोजी मुंबईत येऊर गव्हर्नर डंकन याला भेटले. डंकन याने बाजीराव पेशवेच हातात +आले आहेत हे पाहून आपला पुण्याचा रेसिडेंट लेफ्टनंट कर्नल बॅरी क्लोज याला बोलावून +बाजीरावांशी वाटाघाटी करण्यास सांगितले. बाजीराव पेशव्यांनी दौलतराव शिंद्यांच्या +संमतीने तह करण्याची सूचना केली होती, परंतु क्लोजने ती सूचना सरळ लावली. +अखेरीस पौष शु. ७, दुंदुभीनाम संवत्सरी, शके १७२४ म्हणजेच दि. ३१ डिसेंबर सन १८०२ +या दिवशी वसई मुक्कामी बाजीराव पेशवे आणि इंग्रजांच्यात 'वसईचा' तह झाला. हाच तो +अपमानास्पद 'तैनाती फौजेचा तह' ! + मार्च सन १८०३ मध्ये यशवंत होळकरांनी पुणे सोडले आणि ते उत्तरेकडे रवाना झाले. +यशवंतराव गेल्याचे पाहताच अमृतरावदेखील पुणे सोडून नाशिकजवळ 'आनंदवल्ली' ला +<<< + +जाऊन राहिले. दि. १३ १८०३ रोजी सर ऑर्थर वेलस्ली याने बाजीराव पेशव्यांना 'हिज +हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहाद्दर' अशी उपाधी बहाल करून पुन्हा पेशव्यांच्या +मसनदीवर बसवले. आपला विचार जराही न करता बाजीरावांनी अतिशय उतावीळपणे +इंग्रजांशी तह केला दौलतराव शिंद्यांनाही आवडले नाही. दौलतराव हा महादजींचा पुतण्या +(दत्तक पुत्र) होता. नाना-महादजींची पूर्वीची इंग्रजांच्या विरोधातली नीति दौलतरावाच्या अंगी +पक्की मुरली होती. आपापसातल्या भांडणापायी परकीय इंग्रजांना दौलतीत शिरकाव करू +देणे हे त्यांना अजिबात पटले नव्हते. दौलतराव शिंद्यांनी ताबडतोब नागपूरकर रघुजी भोसले +(दुसरे) आणि सरदार यशवंतराव होळकर यांना पत्रे पाठवून खलबतं केली आणि या +तिघांनीही इंग्रजांना दौलतीमधून हाकलून लावण्याबाबत परस्परांशी तह केला. + इंग्रज गव्हर्नर सर ऑर्थर वेलस्ली हा पूर्वीच्या इंग्रज-मराठे युद्धावरून बराच हुशार झाला +होता. मराठ्यांच्या या तीनही प्रबळ सरदारांची एकत्र ताकद आपल्याला मात देऊ शकते +तो पक्के समजून चुकला होता. अन् म्हणूनच जरी या तिघांच्यात कागदोपत्री तह जरी झाला +असला तरी प्रत्यक्षात त्यांना एक होऊ न देण्याचा ऑर्थर वेलस्ली प्रयत्न करू लागला. +दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी प्रथम इंग्रजांच्या हिंदुस्थानातील +अनेक ठिकाणांवर छापे घालून ती जिंकून घेतली. आसई, अडगाव अशी महाराष्ट्रातलीही + अनेक ठाणी इंग्रजांच्या हातातून गेली. परंतु प्रथम आक्रमक असणारे शिंदे आणि भोसले +वेलस्लीच्या कवायती कंपूसमोर दुबळे पडू लागले. मराठ्यांच्या सैन्याची अवस्था काही +काळातच अत्यंत बिकट झाली. अखेरीस शिंदे आणि भोसले यांनी इंग्रजांशी तह करण्याचा +निर्णय घेतला. अखेरीस देवगाव या ठिकाणी झालेल्या तहानुसार रघुजी भोसल्यांनी + ओरिसामधील कटकचा संपूर्ण प्रदेश इंग्रजांना देऊन टाकला. शिंद्यांनी इंग्रजांशी सुर्जी- + अंजनगाव इथे झालेल्या तहानुसार अंतर्वेद (गंगा आणि यमुना नद्यांमधील दुआब), दिल्ली- + आग्रा आणि बुंदेलखंडातील काही प्रदेश तसेच गुजरातचा भड़ोच प्रांत इंग्रजांना देऊन +टाकला. शिंदे-भोसल्यांनी १८०३ च्या अखेरीस इंग्रजांशी हे तह केले असले तरी यशवंतराव +होळकर मात्र तहाला तयार नव्हते. त्यांनी इंग्रजांशी युद्ध सुरूच ठेवले. शिंदे-भोसले आता +गप्प झाल्याने इंग्रजांना होळकरांशिवाय दुसरा कोणीच शत्रू उरला नव्हता, इंग्रजांचा सारा +रोख आता होळकरांकडेच वळला. इंग्रजांच्या फौजेपुढे होळकरांचाही निभाव लगेना. + अखेरीस 'स्वराज्यात जलचरांचा प्रसार विशेष जाला. हा घडू नये यास्तव महाल मुलकाची + आशा न ठेवता कळेल त्या प्रमाणे फौज व कंपू वाढवून रुपयांचे पेचात (कर्जात) +येऊन आज दोन-अडीच वर्षे होत आली.' त्यामुळे आता पुढचे काय? असा विचार करून +दि. २४ डिसेंबर १८०५ या दिवशी यशवंतराव होळकर इंग्रजांना शरण आले. राजपूर घाट +येथे झालेल्या तहानुसार यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चंबळ नदीच्या पश्चिम आणि उत्तर +तीरावरील प्रदेश देऊन टाकला. इ. स. १८०२ ते १८०५ या तीन वर्षातील हे 'दुसरे इंग्रज- +मराठा' युद्ध अखेरीस इंग्रजांनीच जिंकले. हिंदुस्थानातील मराठी सत्तेला आता उतरती कळा +लागली होती. बाजीरावांनी 'तैनाती फौजेचा तह' केला त्याबरोबरच मराठ्यांचे सार्वभौमत्व +संपले होते. +<<< + + शिंदे-होळकर-भोसले या तिघांनीही इंग्रजांशी तह केले हे पाहून + इंग्रजांशी मैत्रीचा करार केला. इंग्रज फार धूर्त होते. वेलस्लीने तह करताना + एका सरदाराचा दुसऱ्या सरदाराशी अथवा पेशव्यांशी थेट संबंध उरणार नाही याची पुरेपूर +काळजी घेतली होती. प्रत्येकाला त्याने आपल्या इशाऱ्यावर नाचता येईल अशा अटींनी +बांधून टाकले होते. पेशवे आता पूर्णपणे एकटे पडले होते. १८०५ च्या दुसऱ्या इंग्रज मराठा +युद्धानंतर सर्वत्र शांतता पसरली. इंग्रजही आता दक्षिणेतल्या सुलतानाच्या राजकारणात +गुंतले होते. अमृतरावदेखील इंग्रजांशी स्वतंत्र तह करून १८०५ च्या अखेरीस दख्खन + कायमची सोडून 'वाराणसी' ला स्थायिक झाले. + ज्येष्ठ शु. १ शके १७२८, क्षयनाम संवत्सरी सोमवारी म्हणजेच दि. १९ १८०६ या + दिवशी बाजीराव पेशव्यांच्या तृतीय पत्नी 'राधाबाई' यांचा शनिवारवाड्यात मृत्यू झाला. + यानंतर लगेच वाईच्या नारायण गोपाळ रास्ते (गोपिकाबाईंचे नातलग?) यांच्या कन्येशी, + वाराणसीबाईंशी दि. ११ जून १८०६ रोजी बाजीरावांनी लग्न केले. यानंतर सहा महिन्यातच, + २२ डिसेंबर रोजी पुण्याचा र���सिडेंट कर्नल बॅरी क्लोज याच्यामार्फत मुंबईच्या प्रतिष्ठित डॉक्टर + कॉट्सकडून देवी काढण्यात आल्या. म्हणजेच त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात + आले. लस देण्याचा हा प्रथमच प्रयोग असल्याने बाजीरावांनी कॉट्सला दोन हजार रु. + बक्षिस दिले. + बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा हे १७९७ पासूनच बाजीरावांच्या नजरकैदेत होते. + १८०२ मध्ये बाजीराव पुण्यात परत आल्यानंतर त्यांच्या मनात चिमाजीअप्पांविषयीचा संशय +बळावला होता. चिमाजीअप्पांचे सासरे, सीताबाईंचे वडील मोरोपंत अप्पाजी दामले हे +चिमाजीअप्पांना मदत करतात अन् भडकवतात या आरोपाखाली बाजीरावांनी त्यांना अटक +केले. अखेरीस चिमाजीअप्पांनाही नजरकैद अन् हाल अगदीच सोसवेनासे झाल्यामुळे त्यांनी +बयाजी नाईक या माणसामार्फत माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनशी मध्यस्तीसाठी बोलणे लावले. + एलफिन्स्टनने दि. १७ नोव्हेंबर १८०६ या दिवशी चिमाजीअप्पा आणि बाजीराव या + उभयतांनाही एकत्र बसवून मध्यस्ती केली. यानुसार बाजीरावांनी पेशवाईच्या कारभारात +ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर चिमाजीअप्पांना सालीना दोन लक्ष रु.ची नेमणूक केली. + ज्येष्ठ शु. ९ शके १७३०, प्रभवनाम संवत्सरी शुक्रवारी म्हणजेच दि. ३ जून १८०८ या + दिवशी तळेगावच्या हरी रामचंद्र देवधर-ढमढेरे यांची कन्या कुसाबाई यांच्याशी बाजीरावांचे +लग्न झाले. यांचे नवे नाव ठेवण्यात आले 'वेणूबाई'. + फाल्गुन शुद्ध एकादशी शके १७३० म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी सन १८०९ या दिवशी + एक भयंकर घटना घडली. चिमाजीअप्पांच्या पत्नी सीताबाई या संध्याकाळच्या सुमारास +जवळच असणाऱ्या ओंकारेश्वरला रिवाजानुसार दिवा लावण्यासाठी गेल्या. परंतु हातातील + तबक निसटून अंगावर आले अन् त्या निरांजनाच्या ज्योतीने सीताबाईंच्या + लुगड्याने पेट घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि आसपासच्या लोकांनी सीताबाईंना +वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु, काही वेळातच सीताबाई मृत्यू पावल्या. + शुक्रवार पेठेत पेशव्यांचा पाच मजली भव्य वाड़ा होता. या वाड्यात अश्विन शु. १३, शके +<<< + +१७३२, प्रमोदनाम संवत्सरी बुधवारी म्हणजेच दि. १० ऑक्टोबर १८१० रोजी +वाराणसीबाईंच्या पोटी पुत्र जन्मास आला. बाजीरावसाहेबांचा हा पहिलाच पुत्र! बाजीरावांना +फार आनंद झाला. पुत्रजन्मानिमित्त बाजीरावांनी पुण्यात फार मोटा समारंभ केला. +देवस्थानांना अन् साधु-संतांना देणग्या दिल्या. या समारंभाचा एकूण पावणेदोन लाख रु. +(१,७८,६४१ रु.) खर्च झाला. कार्तिक शु. सप्तमीला बाळाचे मोठ्या थाटात बारसे करण्यात + आले. आपला पुत्र तिन्ही लोक संपादन करणारा व्हावा म्हणून (बारसे- दि. ३ नोव्हेंबर + १८१०) बाजीरावांनी मोठ्या कौतुकाने त्याचे नाव ठेवले 'वामन'. परंतु दुर्दैवाने जेमतेम पाच +महिन्यांचा असतानाच, दि. २७ मार्च १८११ या दिवशी त्याचा मृत्यू झाला. + वामनच्या मृत्यूपूर्वी दोन महिने आधीच, दि. १४ जानेवारी १८११ या दिवशी सवाई +माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई या आजारपणात रायगडावर मृत्यू पावल्या. पुण्याला + ओंकारेश्वराच्या मंदिराजवळ त्यांच्या अस्थी पुरण्यात आल्या. + वैशाख शु. १० शके १७३४, अंगिरानाम संवत्सरी बुधवारी म्हणजेच दि. २० में १८१२ या +दिवशी पुण्याच्याच महादजीपंत जोशी यांची कन्या कावेरीबाई हीचे एलफिन्स्टनच्या +मध्यस्थीने चिमाजीअप्पांशी लग्न लावून देण्यात आले. हे लग्न कोपरगावातील पेशव्यांच्या +वाड्यात झाले. + इ. स. १८०८ पासूनच बाजीरावांचा शनिवारवाड्यातील वावर खूप कमी झाला होता. +थोरल्या रायांच्या यवन स्त्रीचा, मस्तानीचा झालेला छळ, नारायणराव पेशव्यांचा झालेला खून +या घटनांमुळे बाजीरावांना तो वाडा नकोसा लागला होता. मस्तानी आणि +नारायणरावांच्या आत्म्यांच्या पिशाच्चबाधेमुळेच आपल्याला पुत्र होत नाही, अशी +बाजीरावांची भ्रामक समजूत झालेली होती. म्हणूनच इ. स. १८१२ मध्ये बाजीरावांनी +थोरल्या रायांच्या दिवाणखान्याच्या बाजूलाच तटालगत असणारा मस्तानी महाल पाडून +टाकण्याचा आदेश दिला. महाल जमीनदोस्त करण्यात आला. परंतु तरीही बाजीरावांच्या +मनातली अनाठायी भीती मात्र काही कमी होत नव्हती. ते जास्तीत जास्त काळ +शनिवारवाड्याच्या बाहेरच असत. त्यांनी पुण्यात बुधवारपेठेत अन् शुक्रवार पेठेत +मोठे वाड़े बांधले होते. याशिवाय सदाशिवपेठेतला 'विश्रामबाग' वाडा तर बाजीरावांनी खास +श्रीमंती थाटात तयार करवून घेतला होता. मोठे समारंभ, खास दरबार वा गुप्त थोरल्या +मसलती या शनिवारवाड्यात केल्या जात. परंतु याव्यतिरिक्त मात्र बाजीराव + शनिवारवाड्याबाहेरच राहणे पसंत करीत ... + मार्गशीर्ष वद्य १३, शके १७३४, अंगिरसनाम ���ंवत्सरी गुरुवारी म्हणजेच दि. ३१ डिसेंबर + १८१२ या दिवशी बाजीरावांचेच सरदार बळवंतराव निळकंठराव पेंडसे यांची कन्या +सरस्वतीबाई यांच्याशी बाजीरावांचे लग्न लागले. साताऱ्याच्या जवळच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री +माहुली इथल्या पेशव्यांच्या वाड्यात हा विवाह संपन्न झाला. यानिमित्त आशीर्वाद द्यायला +सातारकर महाराजही उपस्थित राहिले होते. माहुली संगमावर मोठा दानधर्म करण्यात आला. +बाजीरावांनी मोठाच थाट केला होता. + इ.स. १८०१ मध्ये गव्हर्नर जनरल वेलस्ली याने पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट म्हणून कर्नल +<<< + +क्लोज याची नेमणूक केली. कर्नल क्लोज हा अतिशय सभ्य मनुष्य होता. हिंदुस्थानी भाषा, +विशेषतः तमिळ आणि मराठी त्याला अत्यंत उत्कृष्ट येत असत. हिंदु संस्कृतीबद्दल त्याला +प्रचंड आत्मीयता आणि उत्सुकता वाढत असे. म्हणूनच त्याने आपल्या घरात गोमांस (काऊ- +मिट) खाण्याचे पूर्णतः बंद केले होते. क्लोज हा व्यवहारात अतिशय साधा, परंतु तीक्ष्ण +होता. अन् त्याच्या याच स्वभावामुळे बाजीराव पेशव्यांचे आणि त्याचे अत्यंत मैत्रीपूर्ण +सलोख्याचे संबंध होते. इंग्रजांनाही क्लोजचे प्रचंड कौतुक वाटत असे. इंग्रज इतिहासकारांनी +तर त्याला (मुत्सद्दयांचा राजा) किंवा Prince of the diplomats अशी पदवीच बहाल +केली होती. बॅरी क्लोज हा बाजीरावांचा व्यक्तिश: मित्र झाला असला तरी त्याची राजकारणं +मात्र पुढे पेशवाईला अतिशय घातक ठरणार होती. १८०१ मध्ये पुण्याचा रेसिडेंट म्हणून +नियुक्त झालेल्या क्लोजने बाजीरावांना प्रसंगी गोड बोलून 'तैनाती फौजे'चा स्वीकार +करण्यास भाग पाडले होते. मराठे सरदार बाहेरून एकमेकांशी कितीही वैरभाव दाखवत +असले तरीही ऐनवेळेस ते एकत्र येतात हा अनुभव वेलस्लीला होता आणि त्यामुळेच त्याने +मराठ्यांच्या शिंदे-होळकर-गायकवाड़-भोसले अशा प्रत्येक सरदाराशी स्वतंत्र तह करून +त्यांना बांधून टाकले होते. हिंदु संस्कृतीबद्दलच्या आत्मीयतेचा क्लोजला फार उपयोग झाला. +किंबहुना तो त्याने करून घेतला. बाजीराव पेशव्यांची 'धार्मिक' नाडी क्लोजने उत्तमरीत्या +ओळखली होती, असेच म्हणावे लागेल. पेशव्यांना धर्मसभा, चर्चेत गुंतवून +हिंदुस्थानातल्या ब्रिटिशांच्या राजकारणाविषयी अनभिज्ञ ठेवणे हे क्लोजला सहज शक्य +झाले होते. अर्थातच ब्रिटिशांची 'तैनाती फौज' पुण्यात पेशव्यांच्या मदतीकरता आल्याने +पावलोपावली बाजीरावांना क्लोजचा सल्ला घेणे भाग पडू लागले. + इ. स. १८०५ मध्ये लॉर्ड वेलस्ली निवृत्त होऊन पुन्हा एकदा लॉर्ड कॉर्नवॉलीस याची +गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती झाली. यानंतर पाच वर्षातच बॅरी क्लोज निवृत्त झाला आणि +त्याच्या जागी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन याची नियुक्ती करण्यात आली. + एलफिन्स्टनचा जन्म १७७९ सालचा. वयाच्या सोळाव्या वर्षी तो ईस्ट इंडिया कंपनीत +रुजू झाला. तत्कालीन गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर याचा लेखनिक म्हणून एलफिन्स्टन +काम करत असे. इ. स. १८०१ मध्ये इंग्रजांच्या 'राजनितीज्ञ महाविद्यालयात', फोर्ट विल्यम +कॉलेजमध्ये एलफिन्स्टनने प्रवेश मिळवला. बॅरी क्लोजप्रमाणेच एलफिन्स्टनलाही हिंदुस्थानी +प्राचीन संस्कृतीबद्दल कमालीची उत्सुकता वाटत असे. लॅटीन, फ्रेंच अशा युरोपियन भाषांच्या +बरोबरीने तो संस्कृत आणि इतर हिंदुस्थानी भाषादेखील उत्तमप्रकारे बोलत असे. इ. स. +१८०१-०२ मध्ये तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने पुण्याचा रेसिडेंट कर्नल क्लोज +याचा साहाय्यक म्हणून एलफिन्स्टनची नेमणूक केली. त्यामुळे अर्थातच क्लोज-बाजीराव +यांच्यात झालेल्या वसईच्या 'तैनाती फौजेच्या करारा' च्या वेळेस एलफिन्स्टनही तिथे हजर +होता. या करारातल्या बारीक खाचाखोचा एलफिन्स्टनला अगदी जवळून समजल्या होत्या. + इ. स. १८०४ मध्ये एलफिन्स्टनची 'नागपूरकर भोसल्यांचा वकील' म्हणून नागपुरास +बदली करण्यात आली. १८०८ पर्यंत तो नागपुरातच होता. त्यानंतर इ. स. १८०८-१० या +काळात काबुल-कंदहार प्रांतात इंग्रजांचा राजदूत म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. या +<<< + +काळात त्याच्याकडून फारशी काही कामगिरी न होऊ शकल्याने अखेरीस इ. स. १८१० मध्ये +त्याला परत बोलवण्यात आले अन् दि. २८ फेब्रुवारी १८११ या दिवशी माऊंट स्टुअर्ट +एलफिन्स्टनने पुण्यात पेशवे दरबाराच्या रेसिडेंट पदाची सूत्रे हातात घेतली. पूर्वी 'तैनाती +फौजेच्या करारा नुसार आता एलफिन्स्टनला पुणे दरबारातल्या कामाबरोबरच मराठी +राज्यातल्या परिस्थितीवरही नियंत्रण ठेवण्याचे बंधन होते. मराठी राज्य म्हणजे आता +एकसंध राज्य नव्हतेच. मराठा संघराज्य (Maratha Confederacy) मुळे मूळे मालक +छत्रपती-पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्यात बेबनाव झाला होता. दोन्ही पक्षां���ध्ये प्रचंड दरी +निर्माण झाली होती. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन, देसाई, पवार असे अनेक +सरदार छत्रपतींपासून आणि पेशव्यांपासून फारकत घेऊन आपली 'स्वतंत्र राज्ये' निर्माण +करायच्या विचारात होते. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालल्याने एलफिन्स्टनने उभय +पक्षांच्या दरम्यान समझोत्यासाठी एक मसुदा तयार केला. तो साधारणपणे असा- + १) जहागिरदारांचे वर्चस्व कमी करावे, पण पूर्णपणे नष्ट करू नये. + २) जो मुलुख जहागीरदार/सरदारांनी बळकावला आहे तो परत करावा. + ३) पूर्वीचे झालेले आपापसातले तंटे विसरून, पेशवे सरकारची मने लावून इमानेइतबारे +सेवा करावी. + ४) उभय पक्षात कोणताही वाद निर्माण झाला तर त्याचा निवाडा हा इंग्रज करतील +आणि तो उभयतांना मान्य असावा. + ५) इंग्रजांना जहागिरदारांशी कोणताही तह करावा लागल्यास त्याला पेशव्यांच्या +संमतीची गरज नसावी. + एलफिन्स्टनच्या या अहवालाला कंपनी सरकारने हिरवा कंदील दाखवला. मुळातच हा +अहवाल पेशवे आणि सरदार यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणारा नसून जास्तच फूट +पाडणारा होता मात्र त्यावेळेस कोणाच्याही लक्षात आले नाही. यातही एलफिन्स्टनने एक +धूर्तपणा असा केला की, जर हा करार सरदारांनी अमान्य केला तर पेशव्यांच्या मदतीने +त्यांच्यावर कारवाई होणार होती. परंतु, 'पेशव्यांच्या मागण्या' सरदारांनी अमान्य केल्या +आणि पेशव्यांनी कारवाई केली तर मात्र इंग्रज त्यांना अजिबात मदत करणार नव्हते. जुलै +१८१२ मध्ये बाजीराव पेशवे 'आषाढीच्या वारी'निमित्त पंढरपूरला गेले. त्यांच्या पाठोपाठ +माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन पेशव्यांचे कारभारी सदाशिव माणकेश्वर आणि इतर प्रमुख +सरदारांसह पंढरपुरात दाखल झाला. दि. १९ जुलै १८१२ या दिवशी उभय पक्षांनी +एलफिन्स्टनच्या या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हाच तो प्रसिद्ध 'पंढरपूरचा करार'. + पंढरपूरच्या करारानंतर लगेचच बेळगाव प्रांतातील चिकोडी निपाणीच्या प्रदेशावरून +कोल्हापूरकर आणि पेशव्यांमध्ये वाद सुरू झाला. सरदार पटवर्धन आणि बाजीरावांचे +कारभारी सदाशिवभाऊ माणकेश्वर हे आतून कोल्हापूरकरांना सामील होते. अखेरीस +कोल्हापूरकरांनी निपाणी जिंकले आणि भाऊंच्या या फितुरीचा बाजीरावांना पत्ता लागला. +बाजीरावांनी त्यांना तात्काळ कारभारी पदावरून दूर केले आणि ���्यांच्या जागी एक +<<< + +जबरदस्त महत्त्वाकांक्षी असा माणूस कारभारी म्हणून नेमला- त्रिंबकजी डेंगळे पाटील !! + त्रिंबकजी डेंगळे हा एक अत्यंत मुत्सद्दी माणूस होता. कोल्हापूरकरांनी निपाणी काबीज +केल्यानंतर एलफिन्स्टनचा मोर्चा त्यांच्याकडे वळला. इंग्रजांनी कोल्हापूरकरांकडे मालवण +बंदर आणि त्याच्या बाजूच्या परिसराचा ताबा मागितला. इंग्रजांची ही मागणी +कोल्हापूरकरांप्रमाणे त्रिंबकजींनाही अमान्य होती. इंग्रजांनी मालवण मागण्याचा त्यांना +काहीच अधिकार नव्हता. कोकण किनाऱ्यावरही आता इंग्रज लोक हातपाय पसरू लागले +आहेत याची जाणीव त्रिंबकजी डेंगळे आणि पेशव्यांना होऊ लागली. कोल्हापूरकर हे आपले +'रयत' असल्याने कंपनी सरकारच्या मागण्या पेशव्यांना दाखवाव्यात असं बाजीरावांनी +कळवलं. आजपर्यंत पेशव्यांनी अशी अट अथवा मागणी घातली नव्हती. मग आताच का +घालावी? असा विचार करून एलफिन्स्टन सावध झाला आणि त्याने पेशव्यांची ही मागणी +भावनेच्या सरळ लावली. अखेरीस पेशव्यांनी नमतं घेतलं. परंतु +त्रिंबकजी डेंगळे आणि बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांच्या साऱ्या अटी अन् करारनामे +धुडकावून इंग्रजांचा कायमचा काटा काढण्याचं मनातून ठरवलं आणि त्यासाठी आतून +हालचाली करण्यास प्रारंभही केला. अखेरीस कोल्हापूरकरांनी इंग्रजांना मालवण बंदर देऊन +कंपनीच्या व्यापारासंबंधीच्या सर्व अटी बिनशर्त मान्य केल्या. + परंपरेनुसार सातारकर छत्रपतींकडून गुजरात, खानदेश आणि प्रदेश +पेशव्यांच्या जहागिरीत होता. परंतु पूर्वी दाभाड्यांच्या अस्तानंतर गुजरातेत सालीना खंडणी +अथवा मोबदल्याच्या बदल्यात पेशव्यांनी गुजरात प्रांत बहाल केला होता. +परंतु मध्यंतरी पेशवे घराण्यातल्या भाऊबंदकीमुळे आणि इतर राजकारणांमुळे दाभाडे ही +रक्कम भरेनासे झाले होते. ही शिल्लक खंडणीची रक्कम जवळपास तीन कोटी रुपयांच्या +घरात होती. आता बाजीराव पेशव्यांनी हा विषय पुन्हा एकदा काढल्यामुळे +इ. स. १८१४ मध्ये वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन पुण्यास आले. +गंगाधरशास्त्री ही अत्यंत मातबर असामी होती. दरबारात त्यांचे फार वजन होते. + पेशव्यांशीही पूर्वपरिचय होताच. याचाच काही उपयोग करून घेता येईल +का, असा विचार करून शास्त्रीबुवांना पुणे दरबा���ात पाठवले होते. दुसऱ्या +इंग्रज मराठे युद्धानंतर इंग्रज कंपनी सरकारशी करार केला होता. त्यानुसार +गायकवाडांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी इंग्रजांची होती. वकिलाशी, +गंगाधर शास्त्र्यांशी बोलणी करण्याचे संपूर्ण अधिकार बाजीराव पेशव्यांनी त्यांचे कारभारी +त्रिंबकजी डेंगळे यांना देऊन टाकले. गंगाधरशास्त्री हे पेशव्यांना अनुकूलच होते. इंग्रजांना +हुसकावून लावण्याच्या आपल्या या मसलतीत पूर्वीचे सारे हेवेदावे विसरून गायकवाड +आणि अशाच आपल्या इतरही सरदारांना सामील करून घ्यावे हा त्रिंबकजी डेंगळे यांचा +सल्ला बाजीरावांना मनोमन पटला होता. वाटाघाटींच्या निमित्ताने शास्त्रीबुवांशी गुप्त +खलबतखान्यात त्रिंबकजींनी हा सारा बेत मांडला होता. गंगाधरशास्त्रीही त्रिंबकजींशी +सहमत होते. गंगाधरशास्त्री आणि पेशव्यांचे संबंध अजून घट्ट व्हावेत यासाठी त्रिंबकजींनी +अजून एक बेत मांडला. सोयरिक जोडण्याचा! मुलगा आणि +<<< + +बाजीरावसाहेबांच्या पत्नी सरस्वतीबाईंची बहीण यांचा विवाह व्हावा म्हणणे पेशवे आणि +गंगाधरशास्त्री या दोघांनाही एकदम पसंत पडले. + परंतु इकडे एलफिन्स्टनला मात्र त्रिंबकजींच्या या गुप्त राजकारणाचा वास येऊ +लागलाच! निवाड्यासाठी गंगाधरशास्त्री आपल्या मुलाची सोयरिक +पेशव्यांशी जुळवेल या गोष्टीचा एलफिन्स्टनला संशय आला. त्याने दरबारातील +गंगाधरशास्त्र्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी गोविंदराव बंधुजी याला हातात धरून 'शास्त्री +रिवाजानुसार काम करीत नाहीत. फितूरीची राजकारणे चालली आहेत' अशा आशयाच्या +बातम्यांनी गंगाधरशास्त्र्यांविषयी मन कलुषित केले. ताबडतोब +पुण्याला गंगाधरशास्त्र्यांना एक पत्र लिहून या तथाकथित फितुरीबद्दल त्यांची चांगलीच +खरडपट्टी काढली. अखेरीस रोष नको म्हणून शास्त्रीबुवांनी आपल्या मुलाच्या +सोयरिकीची बोलणी रद्द केली. ही सर्व बोलणी रद्द झाली तरी एलफिन्स्टनला मात्र अजूनही +गंगाधरशास्त्र्यांचा अन् त्रिंबकजी डेंगळ्यांचा धोका वाटत होताच. आता एलफिन्स्टनच्या +इंग्रजी डोक्यात एक वेगळाच कुटिल डाव फेर धरू लागला होता. कंपनी सरकारचा जम +बसवायचा तर गंगाधरशास्त्री आणि त्रिंबकजी या दोन्ही मुत्सद्दयांना बाजूला करणे गरजेचे +होते. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव एलफिन्स्टन रचत होता, अन् सापडला! +त्याला दगड सापडला !! + इ. स. १८१५ च्या महिन्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाजीराव पेशवे पंढरपूरला +गेले. त्यांनी गंगाधरशास्त्री पटवर्धनांनाही आग्रह केल्यामुळे त्रिंबकजी डेंगळे आणि शास्त्रीबुवा +पंढरपूरला गेले. यावेळेस पंढरपुरात प्रचंड गर्दी होती. दि. १० जुलै १८१५ या दिवशी रात्रीच्या +वेळेस मंदिरात कीर्तन ऐकून पुन्हा मुक्कामावर जात असतानाच मंदिराजवळच्या एका +बोळात काही अज्ञात मारेकरी घालून शास्त्रीबुवांचा खून करण्यात आला. +संरक्षणाची सर्व जबाबदारी ही इंग्रजांची, पर्यायाने एलफिन्स्टनची असल्यानेच त्याने +ताबडतोब पेशव्यांकडे चौकशी अन् तपास करण्याची मागणी केली आणि पेशव्यांचा तपास +पूर्ण व्हायच्या आतच 'शास्त्रीबुवांच्या खुनाच्या वेळी त्रिंबकजी तिथे होता' असा आरोप +करून एलफिन्स्टनने त्रिंबकजी डेंगळ्यांच्याच अटकेची मागणी केली. एलफिन्स्टनच्या या +सर्व चाली त्रिंबकजी आणि बाजीराव पेशव्यांनी पुरेपूर ओळखल्या होत्या. परंतु एलफिन्स्टन +अगदी हट्टालाच पेटला आणि त्रिंबकजीच्या अटकेच्या कारणावरून इंग्रजी पलटण पुण्यात +घुसवणार हे पाहताच त्रिंबकजी डेंगळे स्वतःहून एलफिन्स्टनच्या अधीन झाले. आधी दि. ५ +सप्टेंबर १८१५ या दिवशी बाजीराव पेशव्यांनीच त्रिंबकजींना सातारा प्रांतातील वसंतगड +किल्ल्यावर कैदेत ठेवले (दिखावा केला!) परंतु तैनाती फौजेचा अधिकारी कॅ. फोर्ड आणि +एलफिन्स्टन या दोघांनीही 'त्रिंबकजीला आमच्या स्वाधीन करा' असा धरल्याने दि. १९ +सप्टेंबर १८१५ या दिवशी त्रिंबकजीला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले. इंग्रजांनी त्यांना +कडेकोट बंदोबस्तात ठाण्याच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवले. + यावेळेस बाजीराव पेशव्यांकडे जसे त्रिंबकजी डेंगळ्यांसारखे अत्यंत हुशार अन् मुत्सद्दी +कारभारी होता तसाच एलफिन्स्टनकडेही एक माणूस होता. त्याचं नाव- बाळाजी नारायण +<<< + +नातू ! बाळाजीपंत नातू हा चित्पावन ब्राह्मण मूळचा वाईजवळ असणाऱ्या 'पाचवड' गावचा. +वाईच्या सरदार खंडेराव रास्त्यांचा हा कारकून होता. त्यांचा सारा पत्रव्यवहार, त्यांची +मालमत्ता अन् पागा पाहण्याचे कामही बाळाजीपंताकडेच होते. इ. स. १७७३ मध्ये सेनापती +हरिपंततात्या फडक्यांच्या छावणीत नोकरीकरता बाळाजीपंत गेला असता सरदार रास्त्यांचे +लक्ष त्याच्याकडे गेले. बाळाजीपंत वाई मुलखातलाच असल्याने रास्त्यांनी त्याला आपलाच +कारभारी-कारकून म्हणून नोकरीवर ठेवले. सरदार रास्त्यांच्या लहानशा कामात +बाळाजीपंतांचे मन रमेना. म्हणून १८०३ च्या सुमारास, तो शनिवारवाड्यात फडावर नोकरी +मागण्याकरता गेला. परंतु काही कारणास्तव पेशव्यांकडून त्याला हवी तशी साथ मिळाली +नाही. या प्रकरणावरूनच बाळाजीच्या मनात पेशव्यांविषयी निर्माण झाली होती. परंतु इ. +स. १८१० च्या सुमारास सरदार खंडेराव रास्ते यांनी आत्महत्या केल्याने आपल्या धन्याच्या + अशा विदारक अंताकरता बाजीरावच जबाबदार आहे, अशी बाळाजीपंत नातूंची पक्की +समजूत झाली. + रास्त्यांच्या काही दरबारी कामकाजाकरता बाळाजीपंताला पुण्याच्या रेसिडेन्सीत जावे +लागत असे. तत्कालीन इंग्रज रेसिडेंट कर्नल बॅरी क्लोज याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध झाले +होते. १८१० मध्ये कर्नल क्लोजसोबत तो माळव्यात गेला होता. या दरम्यानच त्याला इंग्रज +कवायती पलटणी, त्यांची शिस्त अन् शाही बडदास्त याचे दर्शन घडले असावे. अखेरीस +रास्त्यांकडची नोकरी सोडून बाळाजी पूर्णपणे ब्रिटिश रेसिडेन्सीत सामील झाला. +एलफिन्स्टनचा पूर्वीचा मदतनीस खरशेटजी मोदी हा गृहस्थ अत्यंत सज्जन होता. त्याचे +पेशवे आणि अर्थातच नंतर त्रिंबकजी डेंगळे यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. पण + एलफिन्स्टनला हे कसे पटावे? त्याने एक दिवस दग्याने खरशेटजीचा खून +करवला आणि त्याच्या जागी बाळाजीपंत नातूची नेमणूक केली. बाळाजीपंत आता +एलफिन्स्टनचा मुख्य कारभारी झाला होता ...!! इंग्रज सरकारकडून बाळाजीपंत नातूला +पालखीचा मान दिला होता. त्यासोबतच पंचवीस स्वार आणि पन्नास इतर असामी +बाळगण्याची परवानगी होती. बाळाजीपंत नातू पुण्यातल्या मंडळींना अन् सरदार- +दरकदारांना फितवून इंग्रजांकडे वळवण्याचं महान कार्य करत होता. त्यामुळेच +एलफिन्स्टनची त्याच्यावर फार मर्जी होती. तो बऱ्याच वेळा बाळाजीपंताच्याच सल्ल्याने +चालत असे. आताही गंगाधरशास्त्री पटवर्धनांच्या खुनाच्या प्रकरणात त्रिंबकजी डेंगळ्यांना + अडकवून बाजीरावांची ताकद फोडण्याची चाल बाळाजीपंताचीच होती. अपेक्षेप्रमाणेच डाव +यशस्वी झाला. एलफिन्स्टनने बाजीरावांना प्रसंगी दम देऊन तर प्रसंगी गोड बोलून कोंडीतच +पकडले होते. अखेरीस १९ सप्टेंबरला त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले ... +त्रिंबकजी डेंगळे हे एक उत्तम कारभारी आणि प्रशासक होते. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर +गेल्या पंधरा वर्षात असा उत्तम कारभारी पेशव्यांना मिळालेला नव्हता. नानांची काम +करण्याची पद्धत, त्यांची शिस्त, आणि मुख्यतः दौलतीचे हीत हे सारे गुण जसेच्या +तसे त्रिंबकजीत पुरेपूर उतरले होते. वसईच्या तहामुळे पेशव्यांची झालेली नामुष्की आणि या +गोऱ्यांच्या अवलादीपासून दौलत वाचवायची असेल तर त्रिंबकजीच हवे हे बाजीरावही पक्के +<<< + +जाणून होतेच. बाजीरावांनी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याकरिता गुप्त +हालचाली सुरू केल्या. अन् अखेर एक वर्षानंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. दि. १ +सप्टेंबर १८१६ या दिवशी त्रिंबकजी डेंगळे इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या त्या +कडक बंदोबस्तातून अलगद निसटले. + त्रिंबकजी डेंगळ्यांना सोडवण्यात बाजीरावांचाच हात आहे हे इंग्रजही पक्के ओळखून +होतेच. त्रिंबकजी पळाले हे पाहताच माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने बाजीरावांना हे सारे +कळवले. त्रिंबकजी सातारा परिसरात शंभू महादेवाच्या डोंगररांगांमध्ये गुप्तपणे फौजांची +जमवाजमव करत आहेत, अशा खबरा एलफिन्स्टनला मिळाल्या. त्याने पुण्याला +बाजीरावांकडे एक खलिता पाठवून 'त्रिंबकजीला लवकरात लवकर यावे याकरिता +त्याचा कुटुंबकबीला पकडून इंग्रजांच्या ताब्यात द्यावा' अशी मागणी केली. बाजीरावांनी +'स्त्रियांना दग्याने पकडण्याची मराठ्यांची रीत नाही' अशा आशयाचे फेरजवाब पाठवून +एलफिन्स्टनला नकारच दिला. अर्थात एलफिन्स्टनलाही हे अपेक्षित होतेच. त्याने पेशव्यांना +दुसरा खलिता पाठवला. हा खलिता जरब आणि साळसूदपणा यांच्या एकत्रीकरणाचा एक +उत्तम नमुना होता. 'जर त्रिंबकजीचा कबीला येत नसेल तर पेशव्यांनी त्याला +पकडण्यासाठी इनाम जाहीर करावे. जर हेही जमत नसेल तर मग इंग्रजांच्या पलटणी +आपल्या मार्गाने त्याला शोधून अशा आशयाचा हा खलिता होता. बाजीरावांनी +अखेर त्रिंबकजीला पकडण्यासाठी 'दोन लक्ष रु. रोख आणि एक हजार रु. उत्पन्नाचा गाव +इनाम' देण्याचे बक्षीस जाहीर केले. परंतु तरीही याचा काहीही उपयो��� झाला नाही. इंग्रजांना +त्रिंबकजींचे नखही दिसत नव्हते. एलफिन्स्टन मात्र दिवसेंदिवस वैतागत होता. त्रिंबकजी +बाहेर राहणे हे इंग्रजी सत्तेकरता अत्यंत धोक्याचे होते. पेशवे वरवर आपल्याला मदत +करण्याचा आभास निर्माण करून आतून त्रिंबकजीलाच फूस देतायत हे त्याला पक्के +समजून चुकले होते. अखेरीस दि. ८ १८१७ या दिवशी इंग्रज पलटणींनी पुणे शहराला वेढा +घातला आणि पेशव्यांना एक खलिता पाठवून दिला. त्यात एलफिन्स्टनने 'एकतर +त्रिंबकजीला एकत्र नाहीतर रायगड, पुरंदर, सिंहगड आणि त्रिंबकगड हे चार किल्ले जामीन +म्हणून इंग्रजांच्या हवाली करा' असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यावर बाजीरावांनी +एलफिन्स्टनला कळवले, " ... उच्चार करताच माझे अंगात कापरे भरते. नुसत्या +सलामीच्या तोफा करावयाच्या (वाजवायच्या) त्यासुद्धा स्वारीसमोर न करिता आपण जरा +बाजूस गेलो म्हणजे करीत जाव्या अशी माझी (माइया सैन्याला) ताकीद आहे. हे सर्व तुम्ही +जाणत असता मी इंग्रज सरकारशी युद्ध करू इच्छितो ही कल्पना तरी तुमच्या मनात कशी +उत्पन्न होते ?... " परंतु बाजीरावांच्या या पत्राचा एलफिन्स्टनवर काहीही परिणाम झाला +नाही. त्याने त्रिंबकजीला पकडण्याची मागणी सुरूच ठेवली. इंग्रजांच्या ताब्यातून एकदा +सुखरूप सुटलेल्या त्रिंबकजींना पुन्हा त्यांच्या हवाली करणे हे मूर्खपणाचे होते. या वेळेस +एलफिन्स्टनने त्यांना जिवंतच ठेवले नसते. अखेरीस इंग्रजी पलटणी मागे घेण्याच्या बदल्यात +पेशव्यांनी रायगड, सिंहगड, पुरंदर, त्रिंबकगड किल्ले अन् त्याशिवाय अहमदनगर, माळवा +आणि बुंदेलखंडाचा काही भाग इंग्रजांना देण्याचे मान्य केले. दि. १३ जून १८१७ या दिवशी +<<< + +शनिवारवाड्यात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हाच तो अत्यंत नामुष्कीचा असा +प्रसिद्ध 'पुण्याचा तह' !! + पुण्याच्या तहनाम्यावर स्वाक्षऱ्या करून बाजीराव आषाढीच्या वारीनिमित्त पंढरपूरला +निघून गेले. 'वारी' हे एक निमित्त होते. सर्वच 'वार'कऱ्यांना एकत्र बोलवण्यासाठी हे एक +उत्तम ठिकाण होते. स्वतः पेशवे, नरहर गणेश उर्फ बापू गोखले, सदाशिव माणकेश्वर, +मोरदीक्षित गणपतराव पानसे, निळकंठराव उर्फ आबासाहेब पुरंदरे आणि सर्वांत महत्त्वाचे +असणारे त्रिंबकजी डेंगळे अशी खाशी मंडळी एकत्र येऊन गुप्त खलबतं सुरू झाली. +पुण्याच्या तहानुस��र इंग्रजांनी पेशवे आणि त्यांच्या सरदारांने उरलेसुरले संबंधही कायमचे +तोडले होते. तरीही होळकरांचा एक सरदार रामदीन पेंढारी हा आपल्या पेंढाऱ्यांच्या कडव्या +फौजेसह पेशव्यांना येऊन मिळाला होता. महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या शूर अन् +काटक भिल्लांसारखेच हे पेंढारी शूर होते. त्रिंबकजी डेंगळे यांच्यावरच 'कारभारी' म्हणून +सगळा भार होता. अखेरीस सर्वानुमते इंग्रजांशी लवकरच झुंज घ्यावे हा विचार पक्का +ठरला. यावेळेस जय्यत तयारीनिशी हल्ला चढवून इंग्रजांचे हे बांडगूळ उखडून टाकायचेच +असा प्रत्येकाच्या मनात विश्वास फेर धरू लागला होता ... + दि. १४ ऑक्टोबर १८१७ या दिवशी बाजीरावांनी शनिवारवाड्यात मोठा दरबार +भरवला. एलफिन्स्टनलाही निमंत्रण देण्यात आले होते. त्रिंबकजी डेंगळे पेंढाऱ्यांच्या मदतीने +मुलखात धुमाकूळ घालत आहेत, असे आभासी चित्र निर्माण करून बाजीरावांनी एक नवी +फौज उभी केली होती. पेशव्यांनी दरबारात बापू गोखल्यांचा मोठा सत्कार करून त्यांना या +नव्या फौजेचा सेनापती म्हणून नेमले. त्यांच्यासोबतच सरदार आबासाहेब पुरंदरे, +तोफखान्याचे प्रमुख सरदार गणपतराव पानसे इ. सरदारांचेही मानपान करण्यात आले. +एलफिन्स्टनचाही बाजीरावांनी सत्कार केला आणि त्याला मैत्रीचे आश्वासन दिले. अर्थात हे +सारे फक्त वरवर दाखवण्याकरता होते. एलफिन्स्टनला असंच गाफील ठेवून त्याला बाहेरून +मदत मिळण्यापूर्वीच फडशा पाडायचा असा मराठी फौजांचा बेत होता. एलफिन्स्टनला मदत +मिळाली तर ती मुंबईकडूनच मिळणार अशा हेतूने त्रिंबकजी डेंगळ्यांचे काही स्वार आणि +पेंढारी बोरघाटातून येणारी रसद मारण्याच्या हेतूने लपून बसले होते. दि. २८ ऑक्टोबर + १८१७ च्या मध्यरात्री एलफिन्स्टनला ही बातमी समजली आणि त्याचे धाबे दणाणले. कारण +वरवर भित्रा वाटणारा पेशवा आता आपल्याही पुढे जाऊन युद्धाची तयारी करतोय हे पाहूनच +एलफिन्स्टन गडबडला. आता मराठे आज-उद्याकडे नक्कीच हल्ला करणार हे स्पष्टच होते. +परंतु त्याचं सुदैव की काय कोण जाणे, मराठे चालून आलेच नाहीत. हे पाहून +एलफिन्स्टननेही संगमावर सैन्याची जमवाजमव सुरू केली. + दि. ५ नोव्हेंबर १८१७ या दिवशी पुण्यात इंग्रजी फौजा सज्ज झाल्या, अशी हाक उठली. +पेशव्यांचंही सैन्य तयार होतंच. बाजीरावांनी सरदार गणपतराव ��ानसे आणि सेनापती बापू +गोखल्यांना हुकूम सोडला. दिवस पाच घटका राहिल्या असतानाच मराठी फौजा ब्रिटिश +रेसिडेन्सी म्हणजेच संगम बंगल्याच्या दिशेने कूच करू लागल्या. बंगल्यात कॅ. फोर्ड (ग्रँट +डफ- कॅ. जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ, एलफिन्स्टनचा साहाय्यक) (THE HISTORY OF +<<< + + MARATHAS चा लेखक), बाळाजीपंत नातू अन् खुद्द एलफिन्स्टन अशी खाशी मंडळी +होती. मराठे इतक्या लवकर येतील याची एलफिन्स्टनला कल्पनाही नव्हती. फौजाही तयार +नव्हत्या. मराठ्यांच्या फौजा जोरदार युद्धगर्जना देत येत असल्याचे पाहून एलफिन्स्टनसह +सर्वजण जीव मुठीत घेऊन पळत सुटले. बंगल्यातील महत्त्वाची कागदपत्रे अन् करारपत्रे + घेणेही त्यांना जमले नाही. सर्वजण पळत नदी पार करून छावणीत आले. अन् +मागे वळून पाहतात तो काय, संगमावरून प्रचंड काळ्या धुराचे लोट उठत होते. मराठी + फौजांनी संगम बंगल्याला आग लावली होती. बंगला पेटला. बंगल्यातील + एलफिन्स्टनची पुस्तके, पत्रे, करारनामे इ. सर्व महत्त्वाचे कागद जळून खाक झाले. बंगला +जाळल्यानंतर मराठी फौजा रोखाने वळल्या. परंतु, मुळा नदीच्या काठावर दोन्ही +सैन्यात झटापट झाली आणि इंग्रजांना 'मुळे'पार ढकलून मराठी फौजा परत फिरल्या. + मैदानातील या लढाईमुळे तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाला तोंड लागले !! + खडकीच्या मैदानात मराठी फौजांची सरशी झाली खरी, परंतु या विजयाच्या उन्मादात +म्हणा किंवा अतिहर्षाने म्हणा, मराठी फौजांच्यात मात्र एक प्रकारचा निर्धास्तपणा आला. + मराठी फौजा सुस्त झाल्या. नेमकी हीच गोष्ट आता पुढे मराठ्यांना महागात पडणार होती. + दि. १६ नोव्हेंबर १८१७ या दिवशी मराठी फौजा आणि इंग्रजी पलटणी पुन्हा +समोरासमोर आल्या. येरवड्याच्या मैदानात झुंजाला तोंड फुटले. खडकीच्या पराभवानंतर +इंग्रजही जय्यत तयारीनेच मैदानात उतरले होते. दिवसभर प्रचंड चकमक झाली आणि + अखेरीस सायंकाळच्या वेळेस मराठी फौजांनी माघार घेतली. मराठ्यांचा पराभव झाला. बापू +गोखले सैन्यासह थेट पर्वतीवर पेशव्यांपाशी आले. पेशव्यांनी आता पुण्यात राहणे योग्य +नव्हते, असे त्यांना समजावून मराठी फौजा पेशव्यांसह साताऱ्याच्या रोखाने लागल्या. + दि. १७ नोव्हेंबर या दिवशी इंग्रजी फौजा पुण्यात शिरल्या. पुण्यातले लोक प्रचंड +घाबरून गेले होते. हाती जे काही घेता येईल ते घेऊन लवकरात लव��र पुणे सोडण्याची +प्रत्येकाची घाई चालली होती. एलफिन्स्टनला हे सर्व काही समजताच त्याने ताबडतोब + पुण्याचा नगरशेट हरेश्वरभाई याला बोलावून घेतले व आपला मनसुबा सांगितला की, "संगम +बंगल्याची जी अवस्था मराठ्यांनी केली तीच अवस्था आम्ही आता पुण्याची करणार + आहोत." यावर हरेश्वरभाईंनी एलफिन्स्टनला म्हटले, "रयत गरीब, काय आहे? + तिकडील पक्षाचे (पेशवे) आता कोणी राहिले नाही. शहर जाळू नये." बाळाजीपंत नातू + यानेही पुणे न जाळण्याबद्दल एलफिन्स्टनला समजावले. त्यामागचे कंपनी सरकारचे हीत +पटवून दिले. अखेरीस एलफिन्स्टनने शहर न जाळण्याचे मान्य केले. परंतु तो म्हणाला, "जर + शहर राखणे तरी निशाणे लवकर लावा. एकदा का मोठा साहेब (जनरल माल्कम) आला + म्हणजे मला काही करता येणार नाही." एलफिन्स्टनने ही जबाबदारी बाळाजीपंत नातूवर + सोपवली. परंतु, नातूने एलफिन्स्टनला म्हटले, "बाजीरावसाहेब व त्यांचे सारे मजवर +दुश्मनी. सारे लोक एकीकडे व मी एकटा कंपनी सरकारच्या नोकरीत होतो. सबब मला तेथे + जाण्यास भय वाटे की हे लोक मज अपाय करतील ... " म्हणून मग एलफिन्स्टन स्वतः + आपल्याबरोबर तीनशे कुडतीवाले (हत्यारबंद स्वार) घेऊन पुण्यात आला. सर्वप्रथम +<<< + +शनिवारवाड्यापाशी येऊन बाळाजीपंताने वाड्याच्या किल्ल्या आणवून दिल्ली दरवाजा +उघडवला. मग एलफिन्स्टन आणि बाळाजीपंताने पेशव्यांच्या गादीस कुर्निसात केला (?) +आणि दिल्ली दरवाज्यावर असणाऱ्या उंच आकाशदिव्याच्या काठीवरच इंग्रजांचे निशाण + थोरल्या श्रीमंत बाजीराव साहेबांनी बांधलेल्या या पवित्र वाड्यावरचा पवित्र +भगवा कायमचा उतरवला गेला. त्याच्या जागी आता इंग्रजांचा युनियन जॅक फडकू लागला +होता !... इंग्रजी तुकडीबरोबर घेऊन नातू पुण्यात फिरला. पेशव्यांच्या वाड्यांचा ताबा +घेऊन तिथली संपत्ती जप्त करण्याचं काम त्याच्याकडे होतं. एलफिन्स्टनने बाजीरावांच्या +शुक्रवारवाड्याला आणि इतर वाड्यांच्या दफ्तरखान्यांना आगी लावण्याचे हुकूम सोडले. +बाळाजीपंत नातू मात्र पुण्यातल्या लोकांना धीर देत फिरत होता. + पुण्यातून निघाल्यानंतर बाजीराव जेजुरीमार्गे मिरज, तेथून अथणी, माहोली, फलटण, +नातेपोते, पंढरपूर, सिद्धटेक, संगमनेर, लोणी, पाबळ, नारायणगाव-ओतूर करत +ब्राह्मणवाड्यावर आले. तेथून बाजीराव चाकण मुक्कामी आले आणि इंग्रजां��ा वाटले, +बाजीराव पुन्हा पुणे घेणार! शिरूरहून कॅ. स्टाँटन नावाचा अधिकारी पुण्याच्या बचावास येत +होता. तो १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगावनजीक उतरला. बाजीरावांची छावणी भिमेच्या +काठावर होती. त्यांनी पुण्याकडे जाण्याची हूल उठवली खरी, पण बेत मात्र दक्षिणेचा होता. +श्रीमंतांनी बापू गोखल्यांना दक्षिणेत जाण्याचा मार्ग मोकळा करावा, असे सांगितले. यावरून +बापूंच्या फौजांनी इंग्रजांवर हल्ला केला. इंग्रज कोरेगावच्या तटबंदीच्या आश्रयाला गेले. +मराठ्यांनी इंग्रजांना कोरेगावात कोंडले आणि बाजीरावांचा मार्ग मोकळा झाला. दिवसभर +चाललेल्या कोरेगावच्या या लढाईत १७५ इंग्रजांकडील व ५०० मराठ्यांकडील लोक पडले. +पेशवे पुढे गेल्याची खात्री पटताच मराठी फौजा मागे फिरल्या आणि त्यातच इंग्रजांना +'आपला विजय झाला' असा गैरसमज झाला. एल्फिन्स्टनने आपला मोर्चा साताऱ्याकडे +वळवला. इंग्रजांच्या तोफखान्याला घाबरून 'अजिंक्यतारा' पडला. दि. ११ फेब्रुवारी १८१८ +या दिवशी एलफिन्स्टनने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात त्याने म्हटले होते, "बाजीराव +पेशव्यांच्या 'कैदेत' असणाऱ्या सातारच्या महाराजांना 'आम्ही' मुक्त करणार आहोत. त्यांना +व त्यांच्या कुटुंबियांना सुखाने व वैभवाने राहता येईल एवढ्या मोठ्या विस्ताराचे राज्य करून +देणार आहोत." एलफिन्स्टनच्या या भूलथापांना बळी पडून छत्रपती प्रतापसिंह भोसले +आणि राजमाता माईसाहेब यांनी एलफिन्स्टनला बाजीरावांविरुद्ध मदत करण्याचे ठरवले. +छत्रपतींच्या या निर्णयाचा फायदा एलफिन्स्टनने पुरेपूर करून घेण्याचे ठरवले. + दि. २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी गोपाळ अष्टी येथे झालेल्या मराठी आणि इंग्रजी +फौजांच्या चकमकीत मराठ्यांचा पराभव झाला. परंतु पराभवापेक्षाही मोठी मानहानी झाली +होती ती म्हणजे, पेशव्यांचे सेनापती बापू गोखले तोफेचा गोळा लागून ठार झाले होते. +कोरेगावच्या लढाईत झालेल्या जखमा ओल्या असतानाही गोखले लढले होते अन् अखेरीस +दौलत वाचवण्यासाठी पडले. सेनापती पडला अन् मराठी फौज उधळली गेली. खुद्द +बाजीराव पेशवे, त्यांचे बंधू चिमाजीअप्पांसह या युद्धात हाती शस्त्र घेऊन उतरले होते. परंतु, +पळणाऱ्या मराठी फौजेला अडवणे त्यांनाही शक्य झाले नाही. अखेरीस मार्गच राहिला नाही +<<< + +तेव्हा बाजीराव पेशवेही आपल्या सरंजामासह वाट दिसेल तिकडे पळत सुटले आणि तिसरे +इंग्रज-मराठा युद्धही संपुष्टात आले. + गोपाळ-अष्टीच्या लढाईच्या आधीच मराठ्यांचा छत्रपती इंग्रजांना वश झाला होता. ११ +फेब्रुवारीच्या एलफिन्स्टनच्या भूलथापांना बळी पडून 'श्रीमंत महाराज बहादूर हिज हायनेस +प्रतापसिंह' यांनी बाजीरावांना पेशवे पदावरून पदच्युत केले होते. एलफिन्स्टनने मोठ्या +अक्कल हुशारीने कोळ्यापेक्षाही किचकट जाळं विणलं होतं. त्याने महाराष्ट्रातल्या अन् बाहेर +असलेल्या जनतेची अशी खोटी समजूत करून दिली की, 'पेशव्यांनी राजाकडून सत्ता +बळकावली आणि स्वतःची मसनद स्थापन केली आणि हीच बंडखोरी उलथून टाकण्याकरता +कंपनी सरकारने पेशव्यांशी युद्ध पुकारलं आहे. ब्राह्मण सत्ताधीशाला हटवून तेथे मराठा +सत्ताधीश करण्याचं आमचं उद्दिष्ट्य आहे ... ' दुर्दैवाने महाराष्ट्राचा राजा आणि जनता या +इंग्रजी काव्याला फसली. एलफिन्स्टनने प्रतापसिंह महाराजांना अनेक आश्वासने दिली होती. +'प्रतापसिंह महाराजांनी सातारच्या तख्तावर बसून राज्य करावे. बाजीरावाची काही तोशीस +लागणार नाही ही काळजी कंपनी सरकार करेल' अशा गोड आश्वासनांनी 'महाराजसाहेब' +हुरळून गेले. दि. ४ मार्च १८१८ या दिवशी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन आणि प्रतापसिंहांची +पहिली भेट झाली. तेव्हा एलफिन्स्टन त्यांना म्हणाला की, 'आपले म्हणणे मी +वरिष्ठांपुढे यावर प्रतापसिंहांचे उत्तर असे- " आमचे लाटसाहेब (लॉर्डसाहेब = लॉर्ड +गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज) वगैरे सर्व तुम्हीच! तुम्ही (तुम्हांस) पाहिजे तसे करावे ... ". +प्रतापसिंहांनी असे बोलून स्वतःची संपूर्ण मालकीच जणू. एलफिन्स्टनला बहाल केली. +<<< + + तिसरे इंग्रज मराठा (अँग्लो मराठा) युद्ध, भाग १ + मराठी फौजा आणि इंग्रजी फौजा यांच्या हालचाली + + माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन आणि सर थॉमस मन्रो या दोघा इंग्रज अधिकाऱ्यांनी गव्हर्नर +जनरल वॉरेन हेस्टिंग्जशी गुप्त खलबतं करून प्रतापसिंहाला द्यावयाच्या राज्याच्या सीमा +ठरवल्या. उत्तरेस निरथडी ते दक्षिणेस वारणेचा काठ आणि पूर्वेस निजामाची सरहद्द ते +पश्चिम बाजूस घाटमाथ्यापर्यंतच असलेल्या प्रदेशात प्रतापसिंहांचे नवे 'राज्य' होते. जेमतेम +१५ लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाचा हा मुलुख छत्रपतींना 'मान्य' झाला. औंधचे पंत प्रतिनिधी, +भोरचे पंतसचिव, अक्कलकोटचे भोसले (अप्पासाहेब), फलटणचे नाईक-निंबाळकर, जतचे +उफळे आणि वाईचे शेखमिरे असे सहा जहागीरदार या नव्या 'राज्यात' होते. ४ मार्च रोजी +पुरंदराजवळ बेलसर (खळद) या ठिकाणी वाटाघाटी झाल्यानंतर प्रतापसिंह आपला +लवाजमा आणि इंग्रज अधिकाऱ्यांसमवेत वाजतगाजत सातारच्या रोखाने निघाले. दि. १० +एप्रिल १८१८ या दिवशी या सर्वांचे साताऱ्यात मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. दि. +१० एप्रिल रोजी तिसऱ्या प्रहरी दरबार भरवण्यात आला. प्रतापसिंह भोसले हिज हायनेस +बहादूर मोठ्या 'अभिमानाने' सिंहासनाधीश्वर झाले. त्यांच्या उजव्या बाजूस खासे सरदार, +पंतमंडळ आणि उजव्या बाजूस एलफिन्स्टन, मन्रो, डफ असे खासे गोरे बसले. +<<< + +आनंदाप्रीत्यर्थ नाच झाला आणि एलफिन्स्टनच्या आभाराप्रीत्यर्थ तोफा उडवण्यात आल्या. +यानंतर पुढचे तीन दिवस जंगी समारंभ होत होते. महाराजांनी एलफिन्स्टनला मोत्याचे +शिरपेच, हत्ती, घोड़े इ. ११ भेटवस्तू दिल्या. राजमाता माईसाहेबांनी हिऱ्याची अंगठी 'प्रेमाची +अन् उपकाराची भेट' म्हणून दिली. सातारा राज्याचा प्रतिनिधी (पॉलिटिकल एजन्ट) म्हणून +एलफिन्स्टनने कॅ. जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ या आपल्या अत्यंत विश्वासू माणसाची नेमणूक +करून दिली. त्याच्या साहाय्याकरिता बाळाजीपंत नातू या सद्गृहस्थाला नेमून दिले. यानंतर +दि. १३ एप्रिल रोजी सारे सण-समारंभ आटोपून प्रतापसिंह भोसले आपल्या लवाजम्यासह +किल्ले अजिंक्यताऱ्यावर राहायला गेले आणि सातारचे राज्य ग्रँट डफच्या हवाली करून +एलफिन्स्टन पुण्याच्या मुक्कामी परतला. + इकडे गोपाळ अष्टीच्या पराभवानंतर पळत असणाऱ्या बाजीरावांच्या पाठलागावर सर +जॉन माल्कम आपल्या सैन्यासह दौडत होता. बाजीराव आता गोपाळ अष्टीनंतर दक्षिणेचा +रस्ता सोडून थेट उत्तरेकडे वळले होते. इतर कोणी नाही, परंतु आपले पूर्वीचे स्नेही दौलतराव +शिंदे आपल्याला नक्की मदत करतील असा बाजीरावांना विश्वास होता. बाजीरावांना गादीवर +बसवण्यात दौलतरावांचीही मोठी मदत झाली होती. हेच जुने संबंध अजूनही कायम आहेत +अशा आशेवर पेशवे उत्तरेकडे दौडत होते. परंतु दौलतराव शिंद्यांनीही मदतीस असमर्थता, +थोडक्यात नकार दिल्याने बाजीराव अत्यंत निराश झाले. दि. १६ १८१८ या दिवशी +बाजीरावांनी इंदूरजवळ महू या ठिकाणी आपला वकील माल्कमच्या छावणीत पाठवला +आणि माल्कमला, 'आपण आजपर्यंत अनेकांचा सांभाळ करून त्यांस पदरात घेतले आहे. +तर या संकटसमयी मलाही हात देऊन माझा निभाव करावा' अशा आशयाचे पत्र पाठवले. +वास्तविक बाजीरावांचा पाठलाग करून माल्कमही फार थकला होताच. परंतु, बाजीराव +स्वतःहून तहाची मागणी करत आहेत हे पाहून माल्कमने आपली झाकली मूठ तशीच झाकून +ठेवली आणि मागणी मात्र सव्वा लाखांची केली. त्याने बाजीरावांना 'संपूर्ण शरणागती' ची +अट कळवली. बाजीरावांनी प्रथम ते मानले नाही. परंतु, २ जून रोजी माल्कमने बाजीरावांना +निर्वाणीचा निरोप पाठवला. अखेरीस बाजीरावांनी माल्कमच्या सर्व अटी मान्य करण्याचे +ठरवले. माल्कमने त्याच्या अटी पत्राद्वारे कळवल्या. त्या अटी अशा- + १) बाजीरावांनी पुण्याच्या गादीवरचे सारे हक्क आणि अधिकार यांचे स्वतःसाठी आणि +आपल्या वारसांसाठीचे त्यागपत्र स्वतः लिहून द्यावे. + २) २४ तासांच्या आत बाजीरावांनी माइया (माल्कमच्या) छावणीत शरण यावे. + ३) मी (माल्कमने) बाजीरावांच्या निवासाची जी जागा ठरवली असेल तिकडे कसलीही +तक्रार न करता रहावयास जावे. + ४) कंपनी सरकार बाजीरावांना 'हिज हायनेस बाजीराव पंडित बहादूर' अशी पदवी +बहाल करत असून सरकार जो तनखा ठरवेल त्याचा बिनशर्त स्वीकार करावा. + ५) त्रिंबकजी डेंगळे यांना इंग्रजांच्या ताब्यात द्यावे. त्याचा इंग्रज जो फैसला करतील +त्यात बाजीरावांनी हस्तक्षेप करू नये. +<<< + + तिसरे इंग्रज मराठा (अँग्लो मराठा) युद्ध, भाग २ + मराठी फौजा आणि इंग्रजी फौजा यांच्या हालचाली + + ६) याउपर आयुष्यात कधीही बाजीरावांनी नर्मदा ओलांडून मराठी मुलुखात जाण्याचा +प्रयत्न करू नये. + अखेरीस नाईलाजाने बाजीरावांनी या करारपत्रावर स्वाक्षरी केली आणि दि. ३ जून + १८१८ या दिवशी सकाळी दहा वाजता खानदेशात अशिरगडाजवळ 'धुळकोट बारी' या +ठिकाणी बाजीराव पेशवे माल्कमला शरण आले. माल्कमने मोठ्या औदार्याने आणि प्रेमाने +त्यांचे स्वागत केले. + जनरल माल्कमने गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जची समजूत काढून त्याची संमती + मिळवली आणि बाजीरावांना सालीना आठ लक्ष रु. तनखा देण्याचे मान्य करून कायमचं +कानपूरच्या उत्तरेस सुमारे पाच कोसांवर असणाऱ्या बिठूर उर्फ ब्रह्मावर्त या ठिकाणी +राहण्याची व्यवस्था केली. + बाजीराव पेशवे आपल्या ल��ाजम्यासह आपले राज्य, सुख, समाधान, रयत, पुण्याचा +वाडा अन् आपली जिवाभावाची माणसं अशीच मागे ठेवून कायमचे नर्मदापार निघाले. पुन्हा +कधीच न परतण्याच्या मार्गाने. ते आता 'महाराष्ट्राचे पेशवे' राहिले नव्हते ... शंभर वर्षांची +पेशवाई आता संपली होती ... सूर्यास्त झाला होता ... + संदर्भ : + १) रोजनिशीतील उतारे : गो. स. सरदेसाई, २) मराठी रियासत : गो. स. सरदेसाई (सवाई +माधवराव), ३) पेशवे व सातारकर राजे यांची टिपणे : काव्येतिहास संग्रह, ४) मेस्तक + शकावली : काव्येतिहास संग्रह, ५) पुरंदरे दफ्तर भाग १ व ३ : कृ. वा. पुरंदरे, ६) +साधनपरिचय (महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास) : आपटे-ओतूरकर, ७) सातारा गादीचा +इतिहास : विष्णु गोपाळ भिडे, ८) सनदापत्रातील माहिती : द. ब. पारसनीस, ९) मराठ्यांच्या +इतिहासाची साधने (निवडक) : राजवाडे, १०) मराठ्यांचे साम्राज्य : रा. वि. ओतूरकर, ११) +पेशवेकालीन महाराष्ट्र : वा. कृ. भावे, १२) मराठी दफ्तर रूमाल १ व २ : वि. ल. भावे, १३) +ऐतिहासिक पोवाडे : य. न. १४) मराठे व इंग्रज : न. चिं. +केळकर, १५) पेशवाईच्या सावलीत : ना. गो. चापेकर, १६) विंचूरकर घराण्याचा इतिहास : +ह. र. गाडगीळ, १७) पेशवे घराण्याचा इतिहास : प्रमोद ओक, १८) पुण्याचे पेशवे : अ. रा. +कुलकर्णी, १९) पेशवे बखर : कृष्णाजी विनायक सोहोनी, २०) होळकराची कैफियत : य. न. +केळकर, २१) HISTORY OF MARATHAS : GREAT DUFF, २२) HISTORY OF + MARATHA PEOPLE : किंकेड- पारसनीस, २३) SPEECHES IN HOUSE OF +COMMONS : PHILIP FRANCIS, २४) दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची रोजनिशी : वाड- + भावजी, २५) नाना फडणवीस यांची बखर, २६) LETTERS AT MARATHA CAMP + (1809) : THOMAS D. BROUGHTON, ?0) NOTES RELATIVE TO LATE +<<< + + TRANSACTIONS IN MARATHA EMPIRE : (FORT WILLIAMS)/LONDON, + २८) लोकहितवादींची शतपत्रे, २९) निजाम पेशवे संबंध : त्र्यं. शं. शेजवलकर, ३०) ईस्ट +इंडिया कं. - पेशवे-फार्सी पत्रव्यवहार : गं. ना. मुजुमदार, ३१) ऐतिहासिक लेखसंग्रह + (निवडक) : वासुदेवशास्त्री खरे, ३२) मराठ्यांच्या इतिहास : शिवरामपंत परांजपे, + ३३) प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापुजी : प्रबोधनकार ठाकरे, ३४) बापू गोखले यांचे +चरित्र : शं. तु. शाळिग्राम, ३५) एलफिन्स्टनची रोजनिशी, ३६) ऐतिहासिक संकीण साहित्य +खंड १० : भा.इ.सं.मं., ३७) पेशवेकालीन सामाजिक व आर्थिक पत्रव्यवहार : भा.इ.सं.मं., + ३८) पानसे घराण्याची कैफियत, ३९) बापू गोखले यांची कैफियत, ४०) गंगाधरशास्त्री +पटवर्धन यांचे आत्मचरित्र, ४१) पेशवाईच्या अखेरची अखबार, ४२) १७३८ शतकातील +हकीगत. +<<< + + इ. स. १७१३ ते इ. स. १८१८ या साधारणतः एकशे पाच वर्षांच्या काळात श्रीवर्धनहून +देशावर आलेल्या 'भट' घराण्याने पेशवेपदाची धुरा सांभाळली. एकूणच एकाच घराण्यातील +पेशवेपद दीर्घकाळ चालवण्याच्या या परंपरेला पेशवाई असे म्हटले जाते. या पेशवाईत अनेक +चुका घडल्या, वारंवार घडल्या. परंतु पेशवाईत फक्त चुकाच घडल्या, चांगले काही घडलेच +नाही असा खोटा प्रचार गेली काही वर्षे, किंबहुना पेशवाईच्या अस्तानंतर काही +काळापासूनच केला जात आहे तो मात्र अत्यंत दुर्दैवी आहे. अन् त्यातही खेदाची गोष्ट अशी +की, आताच्या काळात सर्व साधने, अस्सल पुरावे, पत्रे उपलब्ध असतानाही आजही लोक या +गैरसमजांवर अंधपणाने विश्वास ठेवतात. पेशवे घराणे आणि पेशवाईतले जे काही गैरसमज +आहेत त्यामागचे सत्य नेमके काय आहे हे समजावून देण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. + सर्वात पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ भट उर्फ बाळाजीपंत नाना पेशवे यांनी इ. स. +१७१९ मध्ये दिल्लीदरबारातून स्वराज्याच्या आणि 'सहा सरसुभे दख्खन'मधील चौथाई +आणि सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. इतिहासकारांकडून असा आक्षेप घेतला जातो की, +'बाळाजी विश्वनाथाने शाहूमहाराजांना या सनदांच्या बेड्या घालून मोंगलांचे मांडलिक +बनवले, गुलाम केले.' परंतु यामागचे बाळाजी विश्वनाथांचे राजकारण मात्र समजून घेतले +जात नाही. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मराठेशाही जवळजवळ संपुष्टातच +आणली होती. जो सुरू होता तो केवळ एक लोकसंग्राम होता. यानंतर शाहूमहाराज सुटून +महाराष्ट्रात आले, परंतु त्यांच्या मातोश्री येसुबाईसाहेब आणि इतर राजपरिवार मात्र अजूनही +मोंगलांच्या 'कैदेतच' होता. त्यामुळे नव्याने निर्माण केलेल्या स्वराज्याच्या बळकटीसाठी जो +पैसा हवा होता तो मोगलांच्या दख्खन सुभ्यातून वसूल करण्याचा बाळाजीपंतांचा सल्ला +शाहूमहाराजांना अगदी मनोमन पटला. शिवाय राजमाता येसुबाईंचा राजपरिवारासह +सुखरूप महाराष्ट्रात आणायचे होते. म्हणून बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी दिल्ली दरबारात +महंमदशहा बादशहाला मुजरे करून सय्यद बंधूंकडून या सनदा मिळवल्या अन् +राजपरिवाराची तब्बल तीस वर्षांनंतर सुटका करून घेतली. बाळाजी विश्वनाथांच्या या एका +'मुत्सद्देगिरी'मुळेच मराठी राज्याचं आयुष्य किमान शंभर वर्षांनी तरी वाढलं. प्रथम +मो���लांच्याच पैशाच्या बळावर मराठी राज्य प्रबळ करायचं आणि मग भविष्यात दिल्लीच्या +राजकारणाची सारी सूत्रं मराठ्यांच्या हातात आणायची असे बाळाजीपंतांचे राजकारण होते. +<<< + + अन् हेच राजकारण पुढे तडीला गेले. + बाळाजी विश्वनाथांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या संदर्भातही अनेक + दंतकथा आणि गैरसमज पसरले आहेत. १७२८ मध्ये महंमदखान बंगश याने + छत्रसालांचा पराभव केला. यामुळेच छत्रसालांच्या मदतीच्या विनंतीला मान देऊन बाजीराव + पेशव्यांनी बुंदेलखंडात जाऊन बंगशाला हाकलून लावले. बाजीरावांच्या या शौर्यावर खुश + होऊन छत्रसालांनी आपल्या बुंदेलखंडाचा तिसरा हिस्सा अन् आपली कन्या बाजीरावांना + दिली. या मस्तानीवरून महाराष्ट्रात बरेच वादंग पेटले. आजही काही इतिहासकारांच्या मते + ती एक कंचनी/कलावंतीण होती, तर काहींच्या मते ती धर्मपत्नी होती! मुळातच एक पाहिले + तर आपल्याला स्पष्ट दिसून येते की, मस्तानी ही मुसलमान होती, म्हणजेच तिची आई ही + मुसलमान होती. छत्रसाल हे बुंदेले म्हणजे राजपुतच होते. त्यामुळे राजपुतांच्या कट्टर धर्मप्रेम + अन् मान-मरातबाच्या पगड्यामुळे त्यांची धर्मपत्नी ही इराणी वंशाच्या मुसलमान + घराण्यातली असणे हे अशक्य होते. मस्तानीची आई ही छत्रसालांची उपपत्नी किंवा रक्षा + होती. अन् म्हणूनच मस्तानी हीदेखील छत्रसालांची 'अनौरस' संतती होती. औरस राजकन्या + नव्हती हे निश्चितच !! अशा या मस्तानीला पेशवे 'रितसर लग्न' करून जरी महाराष्ट्रात घेऊन + आले तरी वाद उद्भवलेच. बाजीराव हे स्वतः बाहेर स्वारीवर असताना अभक्ष्य भक्षण करीत + असले तरी भटांचे घराणे हे शुद्ध गार्भ्य गोत्री ऋग्वेदी चित्पावनांचे घराणे होते. घरात सोवळे- + ओवळे प्रचंड असे. मस्तानी पुण्यात आल्यावर तिने ब्राह्मणाच्या घराण्याशी संबंध + म्हणून बाकीचे ब्राह्मण शिमगा करत होते. परंतु राधाबाई आणि चिमाजीअप्पा यांनी + मस्तानीला विरोध केला तो या कारणाकरिता खासच नव्हता! मुळातच ब्राह्मणी संस्कृतीत + बहुभार्या करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. बाजीरावांची पहिली पत्नी काशिबाई या हयात होत्या. + त्यामुळे उद्या समजा बाजीरावांपासून मस्तानीला मुलगा झाला अन् त्याने गादीवर आपला + हक्क सांगितला अथवा राज्याचा वाटा मागितला तर काय करायचं असा प्रश्न या + मायलेकांसमो�� होता. कारण शाहूमहाराज आणि ताराबाईंच्यातला संपूर्ण संघर्ष राधाबाईंनी + अगदी जवळून पाहिलेला होता. शिवछत्रपतींच्या काळातही गादीकरता सावत्रपणाच्या + भावनेतून किती नुकसान झालं होतं हा इतिहास ताजा होता. त्यामुळेच जर पेशवे कुटुंबात + उद्या गादीवरून कलह झाला तर राज्याचं नुकसान होईल आणि त्याचं संपूर्ण खापर हे + बाजीरावांच्या माथी फोडण्यात येईल. यामुळेच राधाबाईंचा आणि अप्पांचा मस्तानीला + सुरुवातीपासूनच विरोध राहिला. ती 'यवनी' होती म्हणून तिला विरोध होता हा गैरसमज + आहे. मस्तानी 'यवनी' आहे असा आरोप करून पेशव्यांच्या घरची धर्मकार्य करण्याचं + पुण्यातल्या ब्रह्मवृंदाने नाकारलं तेव्हा 'उत्तरेत स्वाऱ्या करून धर्माचे रक्षण करणारा + पेशव्यांव्यतिरिक्त दुसरा कोणी तुमच्याकडे आहे का? तुम्ही धर्मकार्य करण्याचं नाकारलं तर + पेशवे उत्तरेहून ब्राह्मण आणून धर्मकार्य करतील' असं राधाबाईंनी त्यांना ठणकाहून सांगितलं +होतं. + बाजीराव पेशव्यांचे पुत्र थोरले नानासाहेब यांच्याबद्दलही अनेक आरोप केले जातात. +त्यातले दोन मुख्य म्हणजे आरमार बुडवले हे आणि दुसरा आरोप म्हणजे +<<< + +युद्धाच्या वेळेस नानासाहेबांनी ख्यालीखुशालीकरता दूसरा विवाह केला हा! + इ. स. १७५६-५७ च्या सुमारास कोकणातल्या बाणकोट ते तेरेखोल दरम्यानच्या +मुलखात तुळाजी मुजोरी फारच वाढली होती. पूर्वी सरखेलपद देण्याच्या वेळी +पेशव्यांनी आपल्याला डावललं याचाच सूड म्हणून तुळाजी आपल्या आरमारी सामर्थ्याच्या +जोरावर पेशव्यांच्या सरदार आणि त्यांच्या नातेवाईकांना उपद्रव देऊ लागले. कोकणातली +घरे लुटणे, घरांना आगी लावणे, बळजबरी करणे अशा या तुळाजींच्या वर्तनाने पेशव्यांचे सारे +सरदार अतिशय मेटाकुटीला आले होते. तुळाजींच्या या पुंडाव्याचा काहीतरी बंदोबस्त +करायलाच हवा होता. परंतु, आंग्रे आरमाराच्या जोरावर प्रबळ होते. पेशव्यांचे स्वतःचे असे +आरमार नव्हते. सरदार धुळपांचे आरमारी सामर्थ्य फारच कमी, नगण्यच होते. शेवटी + या पुंडाव्याला रोखू शकतील असे फक्त इंग्रजच राहिले असल्याने अखेरीस +नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली. यात दुर्दैवाने आपलेच आरमारी सामर्थ्य कमी +झाले असले तरी त्याला काही पर्याय नव्हता. मात्र नानासाहेबांनी संपूर्ण आरमार +नष्ट केले ह��� गैरसमज आहे. तुळाजींना जेरबंद केल्यानंतर सरदार कृष्णराव धुळप यांना +आरमाराचे प्रमुख नेमण्यात आले. पुढे १७७३ च्या सुमारास तर धुळपांच्या आरमाराने +आरमारी युद्धात इंग्रजांचाच पराभव केला. त्यामुळे जेरबंद केल्यानंतरही मराठी +आरमार पूर्वीच्याच ताकदीने सागरात विहार करत होतं, हे नक्की. + नानासाहेब पेशव्यांबाबतचा दुसरा आरोप म्हणजे मराठ्यांचा चुरडा उडत +असताना त्यांनी आपल्या 'आनंदाकरता' इथे दुसरे लग्न केले. हा आरोपही पूर्णतः +बिनबुडाचा आहे. फेब्रुवारी १७६० मध्ये उदगीरला निजामाचा पराभव झाला खरा. परंतु +निजामाने कबूल केलेल्या खंडणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. उत्तरेत भाऊसाहेब +अब्दालीच्या मोहिमेत गुंतले होते. याच सुमारास दक्षिणेत हैदरअलीनेही उचल खाल्ली. या +दोन्ही मोहिमा चालवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. मोहिमेच्या वेळी होणाऱ्या +खर्चासाठी पेशवे सावकारांकडून कर्ज घेत असत. परंतु, आता निजामाच्या मोहिमेनंतर +मराठी सैन्य तडक उत्तरेकडे रवाना झाले. त्यांचा पगारही थकलेला होता. निजामानेही +खंडणी न दिल्याने पेशव्यांना सावकारांची देणी देता येत नव्हती आणि यामुळेच भाऊसाहेब + असतानाच सावकारांनी कर्ज देण्याचे बंद करून टाकले. पेशवे मोठ्या आर्थिक +विवंचनेत सापडले. उत्तरेतील एकाही सरदाराने भाऊसाहेबांना एका पैशाचीही मदत केली +नाही. म्हणून सदाशिवरावभाऊ वेळोवेळी पुण्याला नानासाहेब पेशव्यांकडे पैशाची मागणी +करत होते. अखेरीस पैशावाचून खूप मोठे नुकसान होत आहे हे पाहताच, पैठणकर नाईक- +वाखरे सावकारांनी कर्ज देण्याचे मान्य केले. परंतु एका अटीवर ... त्यांनी आपल्या मुलीचा, +राधाबाईंचा पेशव्यांशी विवाह झाला तरच मदत करण्याची तयारी दर्शवली. अखेरीस पाऊण +लक्ष मराठी सैन्याच्या भल्यासाठी दि. २७ डिसेंबर १७६० या दिवशी नानासाहेबांनी आपला +दुसरा विवाह केला. या विवाहानंतर एका आठवड्याच्या आतच श्रीमंत नानासाहेब पेशवे +चाळीस हजार फौज आणि पैसा घेऊन रोखाने निघाले !! + श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांचे तृतीय पुत्र नारायणराव +<<< + +यांना पेशवाई मिळाली. नारायणरावांचे शिक्षण खूप उत्तमरित्या झाले होते. परंतु, वयाच्या +सतराव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी अंगावर पडूनही नारायणरावां���्या मनात पोच + निर्माण झाली नव्हती. वयाने ते अल्लडच राहिले होते. एका समकालीन पत्रात म्हटलं आहे + की, "श्रीमंतांची मर्जी फारच उतावीळ आहे असे आहे. लहान माणसांची चाल पडलेसी + दिसते. आपपर कळत नाही. कारभारी करतील ते प्रमाण. धन्यात धनीपण अजिबात + नाही." वास्तविक नानासाहेबांनंतर पेशवेपद आपल्याला मिळावे अशी सुप्त +इच्छा होती. परंतु माधवरावांच्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे रघुनाथरावांचे काही चालले + नाही. परंतु माधवरावसाहेब गेल्यानंतर नारायणराव पेशवाई सांभाळण्यास योग्य नाहीत असे + म्हणून त्यांनी पुन्हा कारस्थाने सुरू केली. सखारामबापूंसारख्या 'देशस्थाने'ही दादासाहेबांना +साथ दिली. बापूंनी पहाऱ्यावरच्या गारद्यांना फितवले. गारद्यांच्या प्रमुखांना- सुमेरसिंगाला, +महंमद इसाफ, खरकसिंग आणि बहादूरखान यांना तीन लक्ष रु. देण्याचे मान्य केले. बापूंनी + 'नारायणरावांस धरावे' अशा अर्थाचे पत्र करून, त्यावर रघुनाथरावांची स्वाक्षरी घेऊन ते +गारद्यांना दिले. नारायणरावांची 'हत्या' झाली. या प्रसंगावरून अनेक तर्कवितर्क पुढे आले. + पेशवाईला धनी म्हणून आपलाच पती त्या गादीवर बसावा असे म्हणून आनंदीबाईंनीच मूळ + पत्रात 'ध'चा 'मा' केला असा गैरसमज पसरवण्यात आला. परंतु असत्य आहे. + नारायणरावांच्या हत्येनंतर नानासाहेबांनी पकडलेल्या महंमद इसाफने जबानी दिली की, + 'नारायणरावांना मारावे असे कोणाचेच मत नव्हते. ते काम आयत्या वेळेस सुमेरसिंगाने + केले.' त्यामुळे बखरकार आणि इतिहासकारांनी पुढे आनंदीबाईवर सर्व आरोप केले ते + चुकीचे आहेत. आनंदीबाई या अत्यंत कडक परंतु शिस्तप्रिय अन् सुस्वभावी होत्या. +नारायणरावांना धरण्याच्या (कदाचित मारण्याच्याही) मसलतीत फक्त रघुनाथरावांचाच हात + असावा. कारण यानंतरच्या एका पत्रात म्हटलं आहे, "(मृत्यूचे) सुतक नाही. नित्य नमस्कार + सूर्यास घालीतात. 'वैरियाचे सुतक कशास?' ऐसे म्हणतात ... ". यामुळेच नारायणराव + पेशव्यांच्या खुनाच्या प्रकरणात आनंदीबाईंचा काही हात नसावा असे दिसून येते. स्वतःच्या +सख्ख्या पुत्राचे (बाजीरावांचे) सर्व दोष जगासमोर मांडणाऱ्या, नारायणरावांच्या मृत्यूनंतर + त्यांच्या गरोदर पत्नीला गारद्यांपासून वाचवणाऱ्या, त्यांच्या पुत्राला (सवाई माधवराव) 'सुख +पडेल तेथे न्यावे' असे नाना फडणवीसांना खडसावणाऱ्या आनंदीबाईंना उगाचच आरोपीच्या + पिंजऱ्यात उभे केले गेले. + श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या बाबतीत तर ते 'अस्सल भट कुलोत्पन्न' आहेत की +नाहीत यावरूनच वाद उत्पन्न झाले होते. सवाई माधवरावांचा चेहरा हा नाना +बराचसा मिळताजुळता होता. योगायोगाने गंगाबाई गरोदर असतानाच नाना +पत्नीही गरोदर होती. बारभाईंच्या कारकीर्दीत नाना गंगाबाईंसोबत आपलेही +कुटुंब पुरंदरावर नेले होते. सवाई माधवरावांच्याच जन्माच्या वेळी नानांनाही अपत्य झाले. +पण ती कन्या होती. हे पाहून नानांच्या विरोधकांनी आणि रघुनाथरावांच्या समर्थकांनी असा + अपप्रचार चालवला की, वास्तविक नारायणरावांना, म्हणजेच गंगाबाईंना 'कन्या' झाली + असून नानांना 'पुत्र' झाला आणि केवळ पेशवाई चालवायची म्हणून नानांनी आपला पुत्र हा +<<< + +नारायणरावांचा 'पुत्र' म्हणून गादीवर बसवला. तेव्हा या मुलाचा, म्हणजेच सवाई +माधवरावांचा गादीवर काही हक्क नाही. परंतु या सर्व गोष्टींवर नानांनी मात केली आणि +बाळ केवळ ४० दिवसांचं असताना त्याला पेशवाई मिळवून दिली. + हे झालं अस्सल समकालीन वर्तमान. परंतु नंतरच्या काळात तर मात्र कहरच झाला. +राज्य करण्याच्या हेतूने इंग्रज इतिहासकारांनी आणि एकंदरीतच ब्राह्मण अन् पेशवाईबद्दल +आकस असणाऱ्या जातीयवादी लोकांनी असाही गैरसमज पसरवला की, नाना फडणवीस +आणि गंगाबाई यांचे अनैतिक संबंध होते आणि सवाई माधवराव हा नाना +गंगाबाईला झालेला अनौरस पुत्र आहे !! अन् याहूनही अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे बऱ्याच +लोकांनी या गैरसमजुतीवर विश्वास ठेवला. + रघुनाथराव पेशव्यांचे पुत्र बाजीराव (दुसरे) यांच्याबद्दल तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड राग +आहे. परंतु, त्याबद्दलच अनेक गैरसमजही आहेत. अन् काही गैरसमज हे मुद्दाम पसरवण्यात +आले आहेत. + सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतरच्या राजकारणातून बाजीरावांना अचानक अनपेक्षितपणे +पेशवाईची सूत्रे मिळाली. इतकी वर्षं कैद अन् एकदम अशी सत्ता हातात आल्यानंतर काय +करायचं हे बाजीरावांना न समजल्याने सुरुवातीला त्यांच्या हातून अनेक गंभीर चुका घडल्या. +नाना कैदेत टाकणे, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्यावेळी मराठी सरदारांना मदत +न करणे, इंग्रजांशी 'वसईचा तह' करणे या सर्व बाजीरावांच्या अत्यंत मोठ्या घोडचुकाच +म्हणायला हव्यात. परंतु, इ. स. १८११ मध्ये पुण्याचा रेसिडेंट म्हणून कर्नल बॅरी क्लोज +याच्या जागेवर जेव्हा माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन या शिस्तप्रिय इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक +झाली तेव्हा मात्र बाजीरावांनाही 'कंपनी सरकार'चा खरा हेतू आणि आपण केलेल्या चुकांची +जाणीव होऊ लागली. परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला होता. एलफिन्स्टन हा अत्यंत धूर्त +गृहस्थ होता. त्याचं हेरखातं जबरदस्त होतं. बाजीराव पेशवे जेवायला बसण्यापूर्वीच त्यांच्या +ताटात काय पदार्थ असणार आहेत याची त्याला कल्पना येत असे. बाजीरावांनाही ही गोष्ट +कळून चुकली होती. आपण एलफिन्स्टनच्या जाळ्यात पुरते आहोत अन् आता +यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत सावधपणे अन् नाजूक हातांनी जाळं तोडायला पाहिजे +हे त्यांना पक्क समजून चुकलं होतं. म्हणूनच बाजीराव दरवेळेस एलफिन्स्टनसमोर 'आपण +खूप मृदू स्वभावाचे, युद्ध-लढाईऐवजी ख्यालीखुशालीत रमणारे आहोत. मोहिमांचा +आपल्याला खूप तिटकारा आहे. तोफांचा आणि बंदुकांचा नुसता आवाजही आपल्याला +सहन होत नाही' असे बहाणे करत असत. परंतु, याच बरोबरीने इंग्रजांचे मूळ कायमचे +उखडून टाकण्याची तयारीदेखील सुरू होतीच. म्हणूनच बाजीरावांनी सदाशिव +माणकेश्वरांच्या फितुरीचे निमित्त करून त्यांचा कारभारी म्हणून त्रिंबकजी डेंगळे या +जबरदस्त असामीला नेमले. त्रिंबकजी डेंगळे म्हणजे दुसरे नाना फडणवीसच होते. नानांची + शिस्त, कारभारावरची मजबूत पकड, शत्रुंविषयीचे योग्य ते धोरण, परकीय +गोऱ्यांविषयीची शंका इ. साऱ्या गोष्टी त्रिंबकजींमध्ये जशाच्या तशा होत्या. आपण स्वतः फार +कर्तबगार नाही आहोत हे स्वतःला समजल्यामुळेच बाजीरावांनी सर्व कारभाराची मुखत्यारी +<<< + + त्रिंबकजींना दिली होती. नेमकी हीच गोष्ट बाजीरावांच्या भवतीच्या लोकांना खटकू लागली + आणि त्यातूनच 'बाजीराव हा भित्रा आहे. तो पूर्णपणे त्याचा खुषमस्कऱ्या त्रिंबकजी + डेंगळ्यांच्या कह्यात गेला आहे' अशा अफवा उठू लागल्या. + त्रिंबकजी डेंगळ्यांनी बापू गोखले, आबाजीपंत पुरंदरे, गणपतराव पानसे अशा शूर + सरदारांना एकत्र करून गुप्तपणे इंग्रजांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केली. नेमकं +हेच एलफिन्स्टनला जाऊ लागलं. कसंही करून त्रिंबकजींना कारभारातून हटवणं + गरजेचं होतं. नेमकं ���ाच वेळेस गंगाधरशास्त्र्यांचं प्रकरण उद्भवलं. एलफिन्स्टनने गोविंदराव + बंधुजी या माणसामार्फत पंढरपुराण शास्त्रयांचा खून करवला आणि त्याबद्दल त्रिंबकजीला + दोषी ठरवून कैद केलं. पुढे त्रिंबकजी डेंगळे कैदेतून निसटले, परंतु बाजीरावांना मात्र त्यांच्या + जिवाखातर 'पुणे करार' करावा लागला. + १८१७-१८ च्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मात्र बाजीराव पेशवे स्वतः हाती शस्त्र + घेऊन इंग्रजांविरुद्ध मैदानात उतरले असता, बाकीच्या सरदारांनी मात्र ऐनवेळी पेशव्यांचा + घात केला. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले हे ऐनवेळी वतन हवे म्हणून अडून बसले. + नागपूरकर भोसल्यांना 'सेनासाहेब सुभा' हे पद हवे होते. ग्वाल्हेरच्या शिंद्यांना + 'अलिजाबहाद्दर' अशी पदवी हवी होती. शिदोजीराव नाईक निंबाळकर उर्फ निपाणकर + देसाई, घोरपडे, रास्ते असे अनेक सरदारही इंग्रजांना सामिल झाले. गोखले, पानसे, दीक्षित हे + लोक रणांगणात पडले आणि बाजीरावांच्या शरणागतीपर्यंत केवळ त्रिंबकजी डेंगळे, + विठ्ठलराव विंचूरकर आणि आबा पुरंदरे हे तीनच सरदार पेशव्यांच्या पाठी सावलीसारखे उभे + होते. + पेशवाई बुडाल्यानंतर जनमानसात दुसऱ्या बाजीरावांविषयी अन् त्रिंबकजी + डेंगळ्यांविषयी प्रचंड चीड अन् राग होता. तो असणं स्वाभाविक होतं. कारण थोरल्या + शिवछत्रपतींनी पाया घातलेलं आणि थोरल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी कळसाला नेलेलं + मराठी राज्य, धरणीकंपात एखादी कोसळावी तसं कोसळलं होतं. परंतु मराठी राज्य + बुडण्याचा दोष फक्त बाजीरावांनाच देणं हे कितपत योग्य आहे याचा विचार मात्र दुर्दैवाने + कोणीही केला नाही. ललित लेखक आणि इतिहासाचे जाणकार असलेल्या श्री. ना. सं. + इनामदार यांनी या गोष्टीचं अत्यंत योग्य अन् मोजक्या शब्दात विवेचन केलं आहे- ('झेप'- + प्रस्तावना (ले. ना. सं. इनामदार)) " ... मराठ्यांपासून राज्य हिसकावून घेताना आमचे + राज्यकर्ते (पेशवे) त्यांचे साहाय्यक हे सर्व अत्यंत नालायक होते असं रंगवणं जेत्यांना + (इंग्रजांना) क्रमप्राप्तच होतं. ते त्यांनी अगदी मनापासून केलं ... पेशवाई नष्ट झाल्यावर + पेशव्यांचा प्रचंड दफ्तरखाना आणि निरनिराळ्या सरदारांची-जहागिरदारांची दफ्तरं + एलफिन्स्टन आणि ग्रँट या जोडगोळीच्या हातात अनायासेच पडली. त्यांनी ती किती + साफसूफ करून ठेवली असतील हे आता कल्पनेवरच सोपवलं पाहिजे. याला आणखी एक + कारण आहे. परवापरवापर्यंत मोठ्या दिमाखानं उभं असलेलं मराठी राज्य अकस्मात लयाला + गेल्यामुळे मराठी मनात विस्मययुक्त संताप दाटला होता. उघडपणे त्याचं खापर इंग्रजांच्या + डोक्यावर फोडता येत नव्हतं. त्याचमुळे नकळत आम्ही आमच्याच लोकांना दोषी धरून +<<< + +त्यांच्याबद्दल आमचा संताप व्यक्त करू लागलो. अशा संतापाचा सर्वात मोठा बळी दुसरा +बाजीराव पेशवा ... " इनामदारांनी मांडलेली ही गोष्ट अत्यंत खरी आहे. सामान्य जनतेने +पेशवाई बुडाल्याचा संताप आणि इंग्रजांविरुद्ध बोलण्याची भीती यामुळे बाजीरावांनाच दोषी +धरलं. परंतु 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोपाळ हरी देशमुखांनीही सत्य न +तपासता पेशव्यांनाच शिव्या द्याव्यात ही अत्यंत गोष्ट होती. वास्तविक या +लोकहितवादींचे वडील सरदार बापू गोखल्यांचे 'फडणीस' होते. गोपाळ अष्टीच्या लढाईत +बापू पडले. देशमुखांचेही कुटुंब उघड्यावर आले. परंतु, माल्कमला शरण आल्यानंतर +'आपल्या व आपल्या सरदारांच्या सरंजामांची योग्य सोय इंग्रजांनी लावावी' अशा +बाजीरावांच्याच अटीमुळे माल्कमनेही ती सोय विनातक्रार लावली. यातच काही काळात +हरिपंत देशमुखांचं निधन झालं आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र गोपाळराव याला इंग्रजी भाषेचं उत्तम +ज्ञान असल्याने एलफिन्स्टनने आपल्या कचेरीत नोकरी दिली. इ. स. १८४२ मध्ये वयाच्या +एकोणिसाव्या वर्षी गोपाळराव नोकरीला लागले. इ. स. १८४८ पासून त्यांच्या विचारांची +'शतपत्र' निघण्यास सुरुवात झाली. या शतपत्रांत बालविवाह, विधवा विवाह, जुन्या अनिष्ट +चालीरिती यांबाबत टीका असली तरी टीकेचा मुख्य विषय होता 'ब्राह्मण आणि त्यांचा +मूर्खपणा'. लोकहीतवादींनी आपले विचार लोकांच्या गळी उतरवले. एका पत्रात ते म्हणतात +की, 'फक्त भट आणि लोकच बाजीरावाची स्तुती करतात.' लोकहितवादींचा जन्म +आहे १८२३ सालचा. त्यांची शतपत्र निघायला लागली तेव्हा त्यांचं वय जवळपास पंचवीस +वर्षे होतं. अन् यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर, १८५१ साली दुसऱ्या बाजीरावांचा मृत्यू झाला. +मग इकडे एलफिन्स्टनच्या कचेरीतील सुरक्षा बाजूला सारून ब्रह्मावर्तावर जाऊन +बाजीरावांना त्यांच्या चुकांबद्दल जाब विचारण्याचं धाडस लोकहितवादींनी दाखवलं नाही. +ब्रिटिश रेसिडेन्सीच��या भिंतीं आडून बाजीरावांना शिव्या देणं तसं फारसं 'धोकादायक' नव्हतं +हेच यामागचं कारण असावं बहुदा !! लोकहितवादी म्हणत की, पेशवाईत फक्त ब्राह्मणांचीच +चलती होती. परंतु 'अत्यंत नालायक' म्हणून हिणवलं गेलेल्या दुसऱ्या बाजीरावांच्या +काळातही जे सरंजाम दिलेत ते पाहण्यासारखे आहेत. त्यात नवीन पागा ज्यांना दिल्या +आहेत असे केवळ तीन ब्राह्मण आणि चोवीस अब्राह्मण आहेत. याच्यात एका महाराचं अन् +एका मुसलमानाचंही नाव आहे. गाड़दी बाळगण्याचा अधिकार तीन ब्राह्मण आणि तीन +अब्राह्मणांना दिला आहे. ही माहिती तपासूनही नजरेआड केली असल्यास त्यात शंका +नाही !!! + त्रिंबकजी डेंगळे या माणसाविषयीही अनेक पूर्वग्रह आहेत. हा माणूस बाजीरावाचा +खुषमस्कऱ्या होता, एलफिन्स्टनचा हेर होता, त्याने बाजीरावाला अनभिज्ञ ठेवून कारभार +'कब्जात' घेतला असे अनेक आक्षेप त्यांच्याबद्दल आहेत. परंतु मूळ साधनांच्या +माहितीवरून त्यांची तुलना केवळ नाना फडणवीसांसारख्या बृहस्पतीशीच करता येऊ +शकते. एकीकडे त्रिंबकजीकडे असे आरोप होत होते. परंतु दुसरी गोष्ट कोणी मानायलाच +तयार नव्हतं. प्रकरणात हस्तक्षेप करून त्रिंबकजींनी एलफिन्स्टनला +पहिल्यांदा अडचणीत आणलं. हे प्रकरण जाणार असं वाटत असतानाच त्रिंबकजींनी +<<< + +इंग्रजांविरुद्ध मोठंच राजकारण आरंभलं. नेपाळच्या राजाने इंग्रजांचा प्रचंड पराभव केला +होता. याचाच आधार घेऊन त्रिंबकजींनी, पूर्वी नाना जशी चौकड़ी उभी केली +तसं करायचं ठरवलं. पूर्वेकडून ब्रह्मदेशच्या राजाने, उत्तरेकडून नेपाळच्या राजाने, +पश्चिमेकडून पंजाबच्या शीख रणजितसिंह यांनी आणि दक्षिणेकडून पेशवे आणि त्यांच्या +सरदारांनी एकदम इंग्रजांवर हल्ला अशी त्रिंबकजींची योजना होती. परंतु, दुर्दैवाने +ब्रह्मदेशच्या राजाने आणि इंग्रजांशी स्वतंत्र तह केलेल्या मराठी सरदारांनी या योजनेला +प्रतिसाद न दिल्याने ही योजना बारगळली अन् अपयश मात्र त्रिंबकजींच्या पदरी पडले. + अर्थात बाळाजीपंत नातूंसारखे इंग्रजांनी फेकलेले तुकडे चघळणारे अनेक फितूर +आपल्याकडे असल्याने त्रिंबकजींच्या या गुप्त राजकारणाचा सुगावा एलफिन्स्टनला लागला +आणि त्रिंबकजींपासून असणारा धोका ओळखून त्यांना गंगाधरपंत शास्त्रांच्या खुनाच्या +प्रकरणात अडकवण्यात आल��. एलफिन्स्टनने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जला स्पष्ट लिहिलं +होतं की, "पेशवाईचा खरा सूत्रधार बाजीराव नसून त्रिंबकजीच आहे. त्याला कारभारातून दूर +केल्याशिवाय आपल्याला काहीही करता यायचं नाही ... " या साऱ्या गोष्टींवरूनच +त्रिंबकजींची हुशारी अन् त्यांचे महत्त्व लक्षात येते आणि बाजीरावांनी सारा कारभार त्यांच्या +हातात का दिला हेही स्पष्ट होते. + बाजीरावांविषयीचा आणखी एक आक्षेप म्हणजे ते स्त्री-लंपट होते. त्यांची अकरा लग्नं +झालेली होती, ते कायम बायकांच्याच घोळक्यात असायचे इ. अनेक! मुळातच मराठी +राज्यकर्त्यांचं बहुभार्या असण्याचं कारण हे एकपत्नी व्यवस्था असणाऱ्या इंग्रजांना +मानवणारं नव्हतं. परंतु अगदी भगवान श्रीकृष्णापासून आपल्याकडे बहुभार्या पद्धत + अस्तित्वात आहे. खुद्द शहाजीराजांची तीन लग्नं झालेली हे तर सर्वज्ञात आहेत. श्री थोरल्या +राजारामांनाही जानकीबाई, ताराबाई आणि राजसबाई अशा तीन पत्नी होत्या. थोरल्या +शाहूमहाराजांनाही अंबिकाबाई, सावित्रीबाई, सकवारबाई, सगुणाबाई अशा चार राण्या +याशिवाय विरूबाई नावाची रक्षा होती. याशिवाय लक्ष्मीबाई आणि सखुबाई या नाटकशाळा +होत्या. त्यामुळे एलफिन्स्टनसारख्या इंग्रजाचं ठीक आहे, परंतु वरील उदाहरणे ज्ञात +असणाऱ्या मराठी माणसांनीही बाजीरावांना शिव्या द्याव्यात? मग बाजीरावांना एक न्याय +आणि वरील माणसांना दुसरा हे कसे? काही इतिहासकार शाहिरांच्या पोवाड्यातील +कथानकावरून बाजीराव पेशव्यांना स्त्रीलंपट म्हणतात. उदा .- 'कृष्णदास' नावाच्या एका + शाहिराने रचला आहे. या पोवाड्यात तो म्हणतो- + "बाजीराव महाराज अर्जी ऐकितो बायकांची, + चल गडे, जाऊ पुण्याशी, हौस मोठी माझ्या मनाची ... + हा सर्वस्वी देह केला अर्पण करुनी आण तुमची, + शुक्रवार पेठेत बसूनी हाजिरी घेतो बायकांची ... " + शिदरामा नावाचा एक शाहीर म्हणतो- + "गेले बाजीराव श्रीमंत पडली त्याला + भ्रांत, लुटविली दौलत कसबिणीला +<<< + + कोण पुसेना त्या, राव-कंचनिला + नित करीती गायनकला या नाटकशाळा + मेण्यांमध्ये बसवून आणती त्यांला, + ये आयने महाल त्याच्या राव बैठकीला ... " + परंतु या शाहिरांच्या पोवाड़ा 'कथना' वर विश्वास कितपत ठेवायचा हाच सर्वात मोठा प्रश्न +आहे. जसे बाळाजीपंत नातू होता तसेच हे शाहीरदेखील एलफिन्स्टनने फेकलेले चार तुकडे +चघळत बाजीरावांच्या विरोधात बोलत नसतील कशावरून? शाहिराची लोकप्रियता अन् +जनमानसात त्यांची सहज एकरूप होण्याची प्रवृत्ती यामुळे बाजीरावांच्या बाबतीत लोकांच्या +मनात विष पेरण्याकरता एलफिन्स्टननेच या शाहिरांना फितूर केले नसेल हे कशावरून +सांगता येईल? आणि जर शाहिरांवरच विश्वास ठेवायचा झाला तर मग दुसऱ्या बाजीरावांना +अक्षरशः देवासमान मानणारे शाहीरही होतेच की ... शाहीर होनाजी शिलारखाने (होनाजी +बाळा) म्हणतो- + "दिन असता अंधार, आकाशतळी पडला बाई, + विश्वतरंगाकार प्रभूवीण शून्य दिशा दाही + निर्मळ शशीसारखी आचळ आहे पदरी पुण्याई + तरीच भेटतील स्वामी येरव्ही नसे उपाय काही ... + पारखी होऊन जाहली अयोध्यापुरी राया हरिश्चंद्राशी + रोहिदास, तारामती राणी जाले त्रिवर्ग वनवासी ... " + सगनभाऊ नावाच्या एका मुसलमान शाहिरानेही बाजीरावांची स्तुती केली आहे. तो +म्हणतो- + "भोळा माझा सांभ अहो निर्मळ काया, + त्याच्या पदरचे चार उठले बसले बुडवाया + निमकहरामी झाले लक्षपती धन खाया + सात ताल हवेलीचा ज्यांनी ढासळला पाया + शिकारखाने रमणे ब्राह्मण मोकलती धाया, + एक्याप्राण्यावाचून शहर करीती गायावाया, + थान पितें बालक लोटून दिलेस रघुराया + मी अनाथ माऊली कशी नाही आली तुज माया ... " + मग आता शाहिरीवर विश्वास ठेवायचा म्हटलं तर आपण बाजीरावांना देवाचीच उपमा +का देऊ नये? शाहिरी/पोवाडे ही एक काव्यमय बखर असते. त्यातली सगळीच माहिती +चुकीची असते असं नाही परंतु तीवर किती विश्वास ठेवावा यालाही काही मर्यादा असतातच. +त्यामुळेच शाहिरांच्या 'कथना'वरून बाजीरावांना स्त्रीलंपट म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. + 'पेशवाईच्या' आणि 'पेशव्यांच्या' बाबतीत असणाऱ्या, गेली अनेक वर्षे ज्या गैरसमजुती +होत्या, जे गैरसमज जाणता-अजाणता पसरलेले होते ते दूर करण्याचा हा एक लहानसा +<<< + +प्रयत्न होता. १८१८ पासून या क्षणापर्यंत ज्या वाईट नजरेतून पेशव्यांकडे जातं त्या +नजरेला काही गोष्टी आणाव्यात हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. कोणाच्याही घराण्याची +अथवा व्यक्तीची बदनामी करण्याचा कसलाही हेतू नाही. बहुत काय लिहावे? +<<< + + शाहूछत्रपतींची स्वदस्तुराची मृत्यूपत्रे + + मार्गशीर्ष वद्य २, शके १६७१ म्हणजेच दि. १४ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती +शाहूमहाराजांनी स्वहस्ताक्षरात दोन याद्या केल्या. या दोन याद्या म्हणजे शाहूछत्रपतींची +स्वदस्तुराची मृत्यूपत्रेच आहेत. या मृत्यूपत्रानुसार शाहूछत्रपतींनी राज्यकारभाराची +जबाबदारी नानासाहेबांकडे सोपवली. शाहूराजे बाळाजी पंडित प्रधान उर्फ थोरल्या +नानासाहेबांना काय म्हणतात, त्याचा दोन्हीही याद्यांमधील सारांश असा- "राजमान्य राजेश्री +बाळाजी पंडित प्रधान यांस आज्ञा केली जे सगळ्यांना आज्ञा केली पण त्यांच्या दैवी नाही, +तेव्हा तुम्ही फौज सांभाळून, राज्यकारभार चालवायला हवा तर त्याकरीता गादीवर वंश +बसवणे, पण कोल्हापूरच्या गादीपैकी न घेणे! चिटणीस आमचे विश्वासू, त्यांना सर्व सांगितले +आहे. राज्यकारभार तुम्ही चालवाल हा भरवसा स्वामींस (शाहूराजांना) आहे. +तुमच्याविषयीची खातरजमा चिटणीसांनी अढळ केली. तुमच्या मस्तकी आमचा वरदहस्त +आहे. जो वंश होईल तो तुमचे प्रधानपद चालवेलच, तुमची घालमेल करणार नाही, त्यात +अंतर करेल तर त्यास शपथ असे. त्याच्या आज्ञेत चालून राज्य राखणे." + +छत्रपती शाहूमहाराज मृत्यूपत्र यादी क्र. १, यादी क्र. २ स्रोत व सौजन्य मराठी +रियासत, मध्य विभाग २ (सन १९२१ ची आवृत्ती) +<<< + + 'रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ +ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंड' येथील कागद +<<< + + पेशव्यांचा सर्वधर्मसमभाव + श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या अंतःकाळची स्थिती एका समकालीन बखरवजा कागदात +नमूद आहे. इंग्लंडच्या Royal Asiatic Society च्या संग्रहात असलेल्या या + कागदात नानासाहेबांचे, किंबहुना यानिमित्ताने साऱ्याच पेशव्यांची + अशाकरिता की यामध्ये नानासाहेब आपल्यावर अप्पांनी हे संस्कार केल्याचे लिहितात, तसेच +संस्कार पुढल्या पिढ्यांवरही झाले. याच कागदात भट (पेशवे)- पुरंदरे यांच्यातील घरोब्याचे +संबंध स्पष्ट होतात. भट घराण्याच्या सुरुवातीपासून ते पेशवाईच्या अखेरपर्यंत पुरंदरे घराणे +पेशव्यांच्या कायम सोबत राहिले, याचे विस्मरण पेशव्यांना कधीही झाले नाही. येथे + अंतःसमयी नानासाहेब आपले धाकटे बंधू रघुनाथरावांना उपदेश करत आहेत. वर दिलेल्या +दोन्ही कागदांमध्ये असलेल्य�� मजकुराचा सारांश असा- + "मराठे, मोंगल, पठाण, राजपुत-रांगडे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी इत्यादी जे जे सरदार या +दौलतीशी बांधील आहेत आणि ज्यांनी आमच्यासोबत जाती-जमातीनिशी या राज्यासाठी +कष्ट केले आहेत, त्यांचे वंशपरंपरागत आम्ही चालवत आलो, तसेच तुम्हीही चालवावे. या +दौलतीत देशस्थ ब्राह्मण अंबाजीपंत पुरंदरे आणि त्यांचे पुत्र महादोबा हे पूर्वीपासून फार +मेहनतीने आपल्यासोबत आहेत, त्यांचे आणि त्यांच्या वंशाचे पहावे. त्यांना परके समजू नये. +देशस्थ, कोकणस्थ, प्रभू, शेणवी इत्यादींचा द्वेष बाळगू नये. ही दौलत सगळ्यांमुळे आहे. +सगळ्यांची मने सांभाळावीत. तिर्थरूप चिमाजीअप्पांची आज्ञा आहे की, मनुष्याला राजी +राखल्याने दौलतीचे काही नुकसान होत नाही. आम्ही जातो म्हणून उदास होऊ नये. ज्याचे +त्याचे व्यवसाय वगैरे सांभाळावे. इतरांचे द्रव्य वा त्यांची संपत्ती वगैरे अन्यायाने घेऊ नये. + अन्याय होत असल्यास कडक शिक्षा करावी. धर्मनीति सोडू नये. गोब्राह्मण- प्रजासंरक्षण +कोणावरही अन्याय न करता यथान्याये करावे. हिंदू-मुसलमान आपापली कामे चोख करीत +असल्यास कोणाचाही द्वेष करू नये. ज्याचा जो धर्म आहे, ज्याचे जे दैवत आहे, त्याविषयी +द्वेषी मन असू नये." \ No newline at end of file